आजकाल बरेच जण आय-टी वाले आहेत. त्यांना जीवनाच्या सन्ध्याकाळी पेन्शन नसणार आहे. आणि बर्याच इतर jobs मध्येही पेन्शन योजना बंद झाल्या आहेत :-( परिस्थिती वाईट आहे.
अशा वेळी आपल्यासारख्या तरूण पिढीवर ३ प्रकारच्या जबाबदार्या आहेत.
१) आपल्या आई-वडिलांची जबाबदारी
(कारण बर्याच महाराष्ट्र राज्य कर्मचार्यांना पेन्शन मिळत नाही. म्हणून बर्याच जणांच्या आई-वडिलांना पेन्शन मिळत नाही.)
२) आपली स्वतःची आणि आपल्या जीवनसाथीची आताची आणि रिटायरमेंट नंतरची तजवीज, आजचे खर्च, विमे, emergency fund
३) आपल्या मुलांसाठी, त्यांच्या शिक्षण-आरोग्य-भविष्य इ. गोष्टींसाठीची तजवीज
अशा वेळी नेमकी कुठे, किती, कशी गुंतवणूक करावी काही कळेनासे झाले आहे. काय आणि कितीही केले तरी १०-२० वर्षांनी त्याची काही value च उरणार नाही असे वाटू लागले आहे :-(
माझा विविध कंपन्याच्या तयार रिटायरमेंट/चाइल्ड प्लान्सवर फारसा भरोसा नाही. तरीही तशा काही चांगल्या योजना असतील तर जरूर सांगा. अन्यथा बाकी काही alternatives असतील ते सूचवा.
म्हणून
१) आपल्यासाठी रिटायरमेंट प्लान्स आणि
२) चाइल्ड future प्लान्स
हे प्लानिंग कसे करावे याबद्दल कोणी जाणकार काही मार्गदर्शन करू शकतील का.
टीपः फिनान्स क्षेत्रात फारसे knowledge नसल्याने जाणकारांनी layman terms मध्ये (सामान्य माणूस समजून) माहिती द्यावी ही विनंती :-)
प्रतिक्रिया
7 Dec 2010 - 3:39 pm | अवलिया
आमचे सहजराव दिसत नाहीत आजकाल.. त्यांचा फार अभ्यास आहे या विषयावर
7 Dec 2010 - 3:43 pm | नितिन थत्ते
येथली चर्चा रोचक वाटू शकेल.
7 Dec 2010 - 4:08 pm | Pearl
जुनी चर्चा असेलही कदाचित. पण अस्मादिक नवीन सभासद असल्याने जुने काहीच माहिती नाही.
Anyways, तुम्ही दिलेल्या लिंकबद्दल धन्यवाद.
ती लिंक चांगली informative आहे. परंतू ज्यासाठी मी हा धागा काढला त्यासाठी it helps very little.
कारण त्या लिंक वर महिन्याचे budget चर्चिले गेले आहे आणि मला
१) रिटायरमेंट प्लान्स
२) चाइल्ड future प्लान्स
याबद्दल माहिती हवी आहे.
7 Dec 2010 - 4:29 pm | नितिन थत्ते
प्ल्यानिंग करण्यासाठी टारगेट किती रकमेचे हवे या माहितीसाठी तो दुवा दिला होता. त्यात एका सदस्याने अडीच कोटी अशी फ़िगर काढली आहे. :( ही रक्कम अर्थातच वयानुरूप बदलेल.
8 Dec 2010 - 2:55 pm | Pearl
तसे असेल तर मग ही चर्चा नवी आहे, जुनी नाही :-p
7 Dec 2010 - 3:53 pm | टारझन
तारुण्यात करावे ते फ्यामिली प्ल्यानिंग .. हे असले प्ल्यानिंग करायचे ते फ्यामिली प्ल्यानिंग नंतर ..
तेंव्हा तुम्ही प्रोसेस नुसार आधी फ्यामिली प्ल्यानिंगचा धागा काढायला हवा.
- मोतीलाल
7 Dec 2010 - 3:55 pm | अवलिया
आधी डबा.. मग गादी.. मग असं करुन मग फ्यामिली प्ल्यानिंग सोईचे पडेल
तेव्हा डब्बा कुठे आणि कसा मिळेल हा धागा आधी हवा
7 Dec 2010 - 4:02 pm | विनायक प्रभू
वरच्या प्रतिसादात काहीतरी गडबड वाटते.
7 Dec 2010 - 4:26 pm | Pearl
कोणीतरी विषयाला धरून उत्तर देइल का :-O
एखादा तरी विषयाला धरून reply येइल का.
जाणकारांच्या प्रतिक्षेत....
- Pearl
7 Dec 2010 - 4:32 pm | टारझन
विषयाला धरल्यावर मग प्रतिसाद कसा देणार ? च्छ्या .. तुमचं आपलं काही तरीच ;)
अवांतर : संबंधीत प्रतिसाद आहेत , समजुन घेतले तर :)
7 Dec 2010 - 4:36 pm | गणपा
धागा चांगला आहे. मी ही काही माहीती मिळते का या उद्देशाने धागा उघडला.
पण माननिय जेष्ठ्य सदस्यांनी धाग्याचा पार खफ केलेला आढळला. :(
7 Dec 2010 - 4:57 pm | शैलेन्द्र
रिटायरमेंट प्ल्यानींग्चे गणित साधारण असे असते...
समजा तुम्ही वय वर्ष ६० पर्यंत काम करणार आहात... व त्यापुढे २५ वर्ष जगणार असे गृहीत धरु.
आज तुमचे वय ३५ आहे असे समजु.. म्हणजे पुढच्या २५ वर्षात तुंम्हाला साधारण त्यापुढील २५ वर्ष लागणारा पैसा जमवायचाय, तोही तुमचे दुखणे/आजार-जिवन्शैली - चलनवाढ या गोष्टी ध्यानात घेवुन...
यासाठी आज तुमचा जो खर्च असेल त्यातले मुलांचे शिक्षन वगैरे खर्च काढुन टाकुन तितके पैसे तुम्हाला त्या काळात लागतील हे ध्यानी घ्या. समजा असा खर्च जर १०००० प्रती महिणा येत असेल तर वर्षाला १ लाख २०००० प्रमाणे तुम्हांला २५ वर्ष बचत करावी लागेल. यात तह्यात मेडीक्लेम आत्ताच घेवुन ठेवा. साधारण्पणे आज वाचवलेला १ रुपयाचे २५ वर्षांनी १६ रुपये होतिल(पोस्ट किंवा बँकेत), पण चलण्वाढही तितकीच होइल. म्हणुन, एक रुपयातले ४०-५० पैसे बाजारात गुंतवा.. जर योग्य नियोजन केलेत तर या ४०-५० पैशाचे २५ वर्षाने ५० रुपये सहज होतिल.
गणित किचकट वाटतय? सोपा उपाय सांगु?
एक वेगळा, थोडासा छोटा फ्लॅट बुक करा, फक्त तो भाड्याने देता आला पाहिजे. समजा, २०००००० चा फ्लॅट घेतला, दाउन पेमेंट जावुन मासिक हप्ता, १५०००, त्यातुन त्याचे भाडे ६०००-७००० कमी करा (जे हळुहळु वाढत जाइल).. म्हणजे साधारण २० वर्ष तुम्ही ६-७ हजार रुपये दर महीणा भराल, शक्य झाले तर आजचे २०००००० चे घर दर ५ वर्षांनी विकुन ऐपतीप्रमाणे मोठे घ्या, असे एक दोनदा करा. या प्रकारे तुमची इन्वेस्त्मेंट २५ वर्षांनी इतकी मोठी असेल की इतर काहीही न करता तुम्ही आरामात मजेत जगु शकाल.
8 Dec 2010 - 1:59 am | यकु
>>>>>>>>>>>>>>>>>यासाठी आज तुमचा जो खर्च असेल त्यातले मुलांचे शिक्षन वगैरे खर्च काढुन टाकुन तितके पैसे तुम्हाला त्या काळात लागतील हे ध्यानी घ्या. समजा असा खर्च जर १०००० प्रती महिणा येत असेल तर वर्षाला १ लाख २०००० प्रमाणे तुम्हांला २५ वर्ष बचत करावी लागेल. यात तह्यात मेडीक्लेम आत्ताच घेवुन ठेवा. साधारण्पणे आज वाचवलेला १ रुपयाचे २५ वर्षांनी १६ रुपये होतिल(पोस्ट किंवा बँकेत), पण चलण्वाढही तितकीच होइल. म्हणुन, एक रुपयातले ४०-५० पैसे बाजारात गुंतवा.. जर योग्य नियोजन केलेत तर या ४०-५० पैशाचे २५ वर्षाने ५० रुपये सहज होतिल<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
उत्तर भलतं म्हणजे भलतंच आवडलं!!! :)
पण एवढा काळ पैसा दाबून ठेवण्याचा पेशन्स/ परिस्थिती यायला हवी.
9 Dec 2010 - 12:50 pm | शैलेन्द्र
म्हणुनच दुसरा उपाय सांगीतला.
7 Dec 2010 - 5:06 pm | शैलेन्द्र
चाइल्ड प्लॅन- दर महीना एका मुलासाठी २००० रुपये, चार म्युच्युअल फंडात विभागुन टाका (सिप), मार्र्केट १००० पॉइंट चढल कि यातले २०% विकायचे व १००० पाँईट उतरला की तेवढेच परत खरेदी करायचे. मुलाच्या जन्मापासुन असे केलेत तर त्या मुलाच्या २०व्या वर्षी एखाद करोड रुपये सहज जवळ असतील.
7 Dec 2010 - 5:19 pm | अप्पा जोगळेकर
१) आपल्या आई-वडिलांची जबाबदारी
(कारण बर्याच महाराष्ट्र राज्य कर्मचार्यांना पेन्शन मिळत नाही. म्हणून बर्याच जणांच्या आई-वडिलांना पेन्शन मिळत नाही.)
- सध्या लोकं फार जगत आहेत. जिकडे पाहावे तिकडे वयोवॄद्ध माणसे. त्यामुळे ही चिंता रास्त वाटते.
२) आपली स्वतःची आणि आपल्या जीवनसाथीची आताची आणि रिटायरमेंट नंतरची तजवीज, आजचे खर्च, विमे, emergency fund
यासंदर्भात श्री. टारझन यांचा सल्ला योग्य वाटला.
काय आणि कितीही केले तरी १०-२० वर्षांनी त्याची काही value च उरणार नाही असे वाटू लागले आहे
रुपयाचे अवमूल्यन खरोखरच इतक्या वेगाने होत आहे काय याबाबत साशंक आहे.
- तब्बल ३ वर्षे नोकरी करुन कंटाळलेला
8 Dec 2010 - 3:06 pm | विश्वनाथ मेहेंदळे
पर्ल, येथील सन्माननीय सदस्यांनी मिपाला गतवैभव प्राप्त करून देण्याच्या उद्दात हेतूने धागा भरकटवण्याचे पवित्र काम हाती घेतले आहे. या मंगल कार्यासाठी तुमच्या धाग्याची निवड केल्याबद्दल तुम्ही त्यांचे आभार मानले पाहिजे.
असो, तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे तर इतकेच म्हणेन की गुंतवणूक आणि financial planning (आर्थिक संयोजन?) हा खूपच विस्तृत विषय आहे. एकतर या विषयात एका प्रश्नाला एकच उत्तर नसते. प्रत्येकाच्या आर्थिक परिस्थिती आणि धोका पत्करण्याच्या तयारीनुसार त्याला वेगवेगळे पर्याय निवडावे लागतात. वर शैलेंद्र यांनी म्हटल्याप्रमाणे घरात गुंतवणूक करता येईल. त्याचप्रमाणे म्युच्युअल फंड (सिप) हाही उत्तम मार्ग आहे. सोन्यात गुंतवणूक करणे ही उत्तम. (सोने म्हणजे सोन्याचे दागिने नाही, सोनेही हल्ली कागदी स्वरुपात विकत घेता येते)
गुंतवणूक कुठेही केलीत तरी काही गोष्टी लक्षात ठेवा
१) गुंतवणूक आणि ट्रेडिंग यात फरक आहे.
२) एकतर चांगला सल्लागार गाठा किंवा स्वतः या विषयावर वाचन करा.
३) wealth creation करायची असेल तर गुंतवणूक हे काम अनेक वर्ष चिकाटीने करावे लागते. Compound interest is a powerful tool.
४) गुंतवणुक करताना कर या प्रकारचा अभ्यास करावा. गुंतवणुकीतून मिळणारे व्याज करमुक्त आहेत का किंवा पैसे काढताना ती रक्कम taxable income मध्ये धरली जाते का हे पाहावे. उदा:- FD मधील व्याजावर कर भरावा लागतो. NSC मधील रक्कम काढताना ती taxable income मध्ये धरली जाते (बहुधा).
7 Dec 2010 - 8:20 pm | तिमा
तरुण असाल तर पीपीएफ अकाऊंट स्वतःच्या व बायकोच्या नांवाने उघडा. त्यात दरवर्षी जमेल तेवढे पैसे टाका. १५ वर्षांनंतर पैसे काढून न घेता ५-५ वर्षांनी नूतनीकरण करत रहा. आणि चमत्कार बघा. रिटायरमेंटच्या वेळेस भरपूर पैसा जमा होईल आणि त्यानंतर त्याच्या फक्त व्याजावर राहू शकाल. मुद्दलाला हात न लावता. मुद्दल शेवटी मुलांना! म्हणजे चाईल्ड प्लानिंगही झाले.
7 Dec 2010 - 8:26 pm | ए.चंद्रशेखर
रिटायर होण्याच्या वेळी हातात रुपयाच्या त्या वेळच्या क्रयशक्तीच्या प्रमाणात आपल्याजवळ एवढे भांडवल जमा होणे आवश्यक आहे की ज्याच्यावरच्या व्याजावर आपला योगक्षेम व्यवस्थित चालू शकेल. या साठी २ सूत्री कार्यक्रम सुचवासा वाटतो.
१. दर महिन्याला जेवढे पैसे स्पेअर करणे शक्य असतील तेवढ्या पैशांचे मग ते ५० रुपये असोत किंवा ५०० रुपये किंवा ५००० रुपये, त्या पैशातून ब्लू चिप्स शेअर्स(उदा. हिंदुस्थान लिव्हर, आयटीसी, रिलाय न्स, सिमे न्स, टाटा मोटर्स ) विकत घेऊन स्वतःजवळ ठेवणे . या शेअर्सची विक्री करू नये किंवा त्यांचा बाजारभाव रोज बघत बसू नये. रिटायर झाल्यावर हे सर्व शेअर विकून टाकले की आपल्या भांडवलात किती प्रचंड वृद्धी झाली आहे हे लक्षात ये ईल.
२. राहत्या घराखेरीज कोणत्या ना कोणत्या स्वरूपातल्या स्थावर इस्टेटीत पैसे गुंतवावे. ही स्थावर इस्टेट कोठेतरी खेड्यात वगैरे घेऊ नये. ही शहरात शक्यतो असावी. अर्थात ही गुंतवणूक शेअर्सच्या मानाने जास्त धोकादायक असते. परंतु ९० टक्के वेळा तरी १० ते १०० पट॑ भांडवल वृद्धी हो ऊ शकते.
7 Dec 2010 - 8:46 pm | नगरीनिरंजन
चिंता करू नका. कोणतीही गुंतवणूक करताना, जर म्युचुअल फंडात करत असाल तर त्या फंडाचे प्रयोजन काय आहे ते नीट वाचा. शक्यतो नव्या फंडांमध्ये एकदम जास्त गुंतवणूक करू नका. नावाजलेले आणि उत्तम परताव्याचा सातत्यपूर्ण इतिहास असलेले फंड निवडा. सगळी गुंतवणूक एकाच प्रकारची करू नका. वरती विमें म्हणाले त्याप्रमाणे सोन्याचे सर्टिफिकेट्स, रिअल इस्टेट फंड, गव्हर्मेंट व इन्व्हेस्टमेंट ग्रेडचे कॉर्पोरेट बाँड्स इत्यादी बर्याच ठिकाणी पैसे गुंतवता येतील. चक्रवाढ व्याजाची जादू कळण्यासाठी बरीच वर्षं आणि सातत्याने गुंतवणूक करत राहा.
विमे तीन प्रकारचे घ्या. एक जीवन विमा, दुसरा वैद्यकीय आणि अपघात/अपंगत्व विमा आणि तिसरा मुलांसाठीच्या काही विशेष योजना असतात त्या.
शेवटी म्हत्वाचे, म्हातारपणात डाऊन साइझिंग करून, रिव्हर्स मॉर्ट्गेज वगैरे योजना वापरून व्यवस्थित राहता येतं. ती काळजी सोडा. म्हातारपणासाठी पैसा साठवण्यापेक्षा आत्ता त्याचा मनमुराद आनंद घ्या आणि स्वतःच्या आरोग्यावर खर्च करताना हात आखडता घेऊ नका.
माझ्या पाहण्यात असे काही वृद्ध लोक आहेत ज्यांनी पै पै करून बराच पैसा जोडला पण त्याचा उपभोग घ्यायला त्यांच्याकडे आता शक्ती नाही.
फार उपदेशपर झालं असेल तर क्षमस्व. शुभेच्छा!
7 Dec 2010 - 10:34 pm | शैलेन्द्र
"विमे तीन प्रकारचे घ्या. एक जीवन विमा, दुसरा वैद्यकीय आणि अपघात/अपंगत्व विमा आणि तिसरा मुलांसाठीच्या काही विशेष योजना असतात त्या"
मुलांसाठी विमा अजिबात घेवु नका....
8 Dec 2010 - 5:33 am | नगरीनिरंजन
मुलांसाठी पालकांचा विमा. यात काही अशा योजना असतात की पालकांना काही झाल्यास प्रिमिअम भरण्याची गरज उरत नाही आणि ठराविक वर्षांनी मुलांना रक्कम मिळते. यात मला तरी काही वाईट वाटत नाही. तुमचे काही अनुभव असतील तर अवश्य सांगा.
8 Dec 2010 - 8:41 pm | शैलेन्द्र
यातल्या बहुतेक योजना "युलीप" प्रकारच्या असतात, त्याऐवजी, प्लेन लाईफ कव्हर घ्याव, व उरलेला पैसा म्युच्युअल फंडात किंवा इतर ठीकाणी गुंतवावा.
7 Dec 2010 - 11:08 pm | राजेश घासकडवी
माझ्या मते नगरीनिरंजन यांनी महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. गुंतवणुक या शब्दाचा व्यापक अर्थ घेतला, तर त्यात निव्वळ पैसेच येत नाहीत. तुमचा वेळ, व पैसा - दोन्ही येतात. आनंद घेणे (त्यासाठी योग्य प्रमाणात पैसे खर्च करणे) व काळजी कमी करणे (भविष्यासाठी योग्य प्रमाणात गुंतवणुक करणे) या दोहोंमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करा. हे सांगणं सोपं असतं, पण प्रत्यक्षात आणणं तितकं सोपं नसतं.
तुम्ही बचत/गुंतवणुक करताना कुठच्या टप्प्यावर आहात त्यानुसार व किती जोखीम पत्करण्याची तुमची मानसिकता आहे त्यानुसार आत्ता जोखमीच्या गुंतवणुकी व नंतर हळुहळू अधिक सुरक्षित पण कमी परतावा देणाऱ्या गुंतवणुकी कराव्यात. अर्थातच प्रत्येकच वेळी तुमच्या गुंतवणुकी शक्य तितक्या वेगवेगळ्या माध्यमांत ठेवाव्यात.
यातून मूळ प्रश्नाला उत्तर मिळालं की नाही माहीत नाही. पण निव्वळ पैशांचा विचार करू नये असं सांगावंसं वाटलं इतकंच. गुंतवणुकीचा सल्ला देणारे बहुतेक सल्लागार 'हे पुरेसं नाही' असं बिंबवण्याचा प्रयत्न करतात असा माझा अनुभव आहे. त्यात त्यांचा फायदा असतो.
8 Dec 2010 - 12:11 am | विकि
ले़खकाने फार चांगला मुद्दा मांडला .आजकाल बरेच जण आय-टी वाले आहेत. त्यांना जीवनाच्या सन्ध्याकाळी पेन्शन नसणार आहे. आणि बर्याच इतर jobs मध्येही पेन्शन योजना बंद झाल्या आहेत Sad परिस्थिती वाईट आहे. हो बरोबर आहे तुमचे . यापुढे निवृत्तीवेतन हा शब्दच बाद होणार आहे,
तुम्ही अतिशय खोलात जाऊन विचार केला आहात ले़खकाच्या विचाराला तोड नाही. येथे काही जणांनी ले़खकाची खिल्ली उडचवली हे वाचून फार वाईट वाटले पण लेखक सुज्ञ आहे त्याने खिल्लीकडे दुर्लक्ष केले असणार.
लेखकाने गुतंवणुक तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा असेच मी सांगेन. कारण शेवटी आम्ही संपत्तीचा मोह नसलेली आणि आयुष्यात कसलीही गुंतवणूक न केलेली माणसे आहोत. तेव्हा लेखकाने योग्य अशी वाढ मिळणारी गुंतवणूक करावी.
8 Dec 2010 - 7:31 am | गांधीवादी
लेखकाने चांगला मुद्दा मांडला आहे. प्रतिसाद देणार्यांकडून माहिती येत आहे. प्राथमिक दृष्टीकोनातून विचार करण्यासाठी या माहितीचा नक्की उपयोग होऊ शकतो. शेवटी निर्णय मात्र आपले पांघरून पाहूनच घ्यावे लागतात.
8 Dec 2010 - 10:42 am | प्रसाद_डी
धन्यवाद Pearl...
मी पण काही दीवसां पसुन या बाबतीत शोध घेत आहे....
बघुयात सन्माननिय उपस्तित आणी अनूभवी मि.पा करां कडून कही मदत पुर्न माहीती मिळ्ते का ?
ए.चंद्रशेखर शैलेन्द्र विश्वनाथ मेहेंदळे चे सल्ले आवडले... अजुन भर टाकावी ही वीनंती...
टारझन भाउ........ नेहमी प्रमाने................... टारा टिरी चच्या ओघातली पण..... सो कॉल्ड "पाँइन्ट टू बी नोटेड" ...
8 Dec 2010 - 2:49 pm | Pearl
सर्व जाणकारांचे मनापासून आभार. आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.
+१
मिपा जाणकारांनी अजुन भर टाकावी ही विनंती...
8 Dec 2010 - 9:01 pm | धमाल मुलगा
चाईल्ड प्लॅन्स जे असतात त्यांचे परतावे तसे कमी असतात, आणि प्रिमियम मात्र जास्त.
कोणे एके काळी आम्ही इन्शुरन्स पॉलिसीच्या वर्गाला गेलो होतो तिथे शिकवलेलं तत्व असं होतं की " चाईल्ड प्लॅन हा 'इमोशनल ब्लॅकमेल' करुनच उत्तम विकू शकाल. त्याचे आर्थिक टप्पे उलगडून सांगायला गेलात तर ही पॉलिसी कोणी घेणार नाही.
मला स्वतःला पी.पी.एफ.चा पर्याय उत्तम वाटतो.
शिवाय, युलिपच्या भानगडीत न पडता, नेहमीच्या एन्डॉव्हमेंट पॉलिसी काढाव्यात. LIC ची जिवन आनंद ही अशीच एक. ह्या पॉलिसीमधली मला आवडलेली एक गोष्ट म्हणजे मॅच्युरिटीच्या वेळपासून पुढे तुम्हाला दर वर्षी ठराविक रक्कम मिळते - थोडक्यात आपणच आपल्या पेन्शनची सोय करतोय.
PLI पोस्टल लाईफ इन्शुरन्स हे देखील एक उत्तम पर्याय आहे. कमीत कमी प्रिमियम आणि त्यावर उत्तम परतावा अशी सोय आहे.
ह्याशिवाय, शक्य असल्यास राहत्या घराखेरीज आणखी घर घ्यावे. ते रितसर भाडेकरारावर द्यावे. पुढेमागे जर पैशांची चणचण भासलीच तर ते दुसरे घर विकून पैसा उभा करता येऊ शकतो.
8 Dec 2010 - 10:04 pm | शैलेन्द्र
"शिवाय, युलिपच्या भानगडीत न पडता, नेहमीच्या एन्डॉव्हमेंट पॉलिसी काढाव्यात"
इंशुरन्स व इंव्हेस्ट्मेंट याची गल्लत करु नये. एन्डॉवमेंट पॉलीसी न काढता, प्लेन लाइफ इंशुरन्स काढावा, वाचलेले पैसे इतर ठीकाणी गुंतवावे.
8 Dec 2010 - 10:32 pm | धमाल मुलगा
मला काही ह्या विषयातली अक्कल नाही खरं, पण मला जे काही सल्ले दिले होते त्यावरुन सांगितलं.
शैलेंद्र,
ह्याबद्दल थोडं सविस्तर सांगाल काय?
9 Dec 2010 - 9:09 am | शैलेन्द्र
प्रयत्न करतो...
इंशुरन्स म्हणजे जीवन विमा, तो किती असावा? तर याचा "थंब रुल" म्हणजे, तुमच्या आजच्या वार्षीक उत्पन्नाच्या कमित कमी २०-३० पट किंवा आजच्या वार्षीक खर्चाच्या ५० पट, यातले जे मोठे असेल ते, समजा आजचे तुमचे वार्षीक उत्पन्न ५ लाख आहे, तर तुम्ही ५०-७५ लाखाचा विमा काढावा. जर तुमचे आजचे वय ३०- ३५ वर्ष असेल तर असा ५० लाखाचा विमा, २५ वर्षांसाठी तुम्हाला साधारण १५-२० हजार प्रती वर्ष या दराने मिळतो. हा विमा म्हणजे "रिस्क कव्हर" असते. यात भरलेला एकही रुपया तुम्हाला कधी परत मिळत नाही (मोटार वाहण विम्यासारखे, फक्त यात रिपेअरींग्चा, म्हणजे आजारपणाचा खर्च मिळत नाही, त्यासाठी वेगळा मेडिक्लेम). यात वेगवेगळे रायडर, म्हणजेच "अॅड ऑन" मिळतात, जसे "परमनंट डिसॅबीलिटी/ अॅक्सिडेंट" म्हणजे तुमचा एखादा महत्वाचा अवयव निकामी झाला, तर त्याबद्दल, तुम्हाला त्या रायडर इतकी रक्कम, साधारण जीवन विम्याच्या २०-४० % मिळते, व तुमचा विमाही सुरु राहतो. तसेच "क्रिटीकल इलनेस्स" साठीही अॅड ऑन मिळतो, यात तुंम्हाला कॅन्सर वा तत्सम १५-२० आजर झाले तर उपचारासाठी ठराविक रक्क्म मिळते. म्हणजे, (कमावत्या व्यक्तीचा)जिवन वीमा + योग्य रायडर + फॅमीली फ्लोटर मेडीक्लेम हे घेतल की तुमची संपुर्ण कुटुंबाची (शारीरिक व आयुष्याची )जोखिम पुर्ण कव्हर होते (हे सेव्हिंग नव्हे). जीवन विमा कधीही, न कमवत्या व्यक्तीचा किंवा निवृत्ती जवळ आलेल्या व्यक्तीचा घेवु नये. लहान मुलांचा/गृहीनींचा विमा काढु नये. विमा ही प्रत्येकाने कारकिर्द व कमाई सुरु झाल्यावर स्वता: काढायची गोष्ट आहे. इंश्युरंस एजंट ही पॉलीसी सहसा कधीहि विकत नाही, कारण यावर त्यांना किरकोळ कमिशन मिळते.
वयाच्या ४० वर्षापर्यंत दर ३ वर्षांनी आपल्या "इंश्युअर्ड स्टेटस" चे अवलोकन करुन वरील सुत्रानुसार त्यात योग्य फेरबदल करावे.
आता इंडोव्मेंट पॉलीसी, हाही एक प्रकारचा जिवन विमाच, पण लोकांच्या मानसिकतेचा फायदा घेवुन कंपण्यांनी काढलेली एक पळवाट आहे. म्हणजे, आपण विम्यासाठी भरलेले पैसे आपल्याला कधीच परत मिळणार नाही हे आमच्या पब्लीकला काही पटत नाही. प्रत्येक विमा कंपनी "रिस्क कव्हर"साठी पैसे भरतेच हे त्यांना लक्षात येत नाही. आपण ५-६ लाखाच्या गाडीचा विमा, ८-१० हजार भरतो, पण स्वता:च्या अमुल्य शरिरावर खर्च करायला मागत नाही. एंडोव्मेंट पॉलीसीचा सगळ्यात मोठा तोटा म्हणजे यात विमा कव्हर फार कमी असते, कारण जर विमा कव्हर वाढवले तर हप्ता काहीच्या काही वाढतो, तुम्ही समजा वार्षीक ५०००० रुपये या योजनांत भरत असाल तर कंपणी तुम्हाला १०-१५ लाखाचा विमा देवुन, उरलेली रक्क्म गुंतवते. यावरचा परतावा, ५-६% पेक्षा जास्त नसतो. फंड मॅनेजमेंट व अॅडमीनिस्ट्रेटीव चार्जेस हे खर्च असतातच, ऑल इन ऑल, ना तुम्हाला धड विमा संरक्षन मिळते ना परतावा. म्हणुनच या योजनांच्या नादाला न लागता, वर सांगितल्या प्रमाणे, समजा २० हजाराचा जिवन विमा+रायडर घ्यावा, म्हणजे तुंम्हाला साधारन, ५०+२०=७० लाखाचे कव्हर मिळते. उरलेले ३० हजार, महीना प्रत्येकी ५०० या प्रमाणे, ३ म्युच्युअल फंडात, व १ हजार बॉन्ड्/एफ डी/ पोस्ट यात गुंतवावे. अशा गुंतवलेल्या ३० हजाराचे पुढील २५ वर्षांनी, कमीत कमी १२-१४ लाख होतील, म्हणजे जर तुम्ही आजपासुन (वय ३०-३५) रिलीजीअस्ली असे पैसे गुंतवत राहीलात तर निवृत्तीनंतर दर वर्षी तुम्हांला १२-१५ लाख मिळत जातील. शिवाय ५०/७० लाखाचे लाइफ कव्हर आहेच.
इतका फायदा कोणतीही एंदोव्मेंट पॉलीसी देत नाही.
.
9 Dec 2010 - 9:25 am | गांधीवादी
उत्तम प्रतिसाद.
9 Dec 2010 - 12:28 pm | शैलेन्द्र
धन्यवाद
9 Dec 2010 - 12:37 pm | विश्वनाथ मेहेंदळे
छान प्रतिसाद. इतके सविस्तर लिहिल्याबद्दल आभार. एकाच वाक्याबद्दल छोटासा आक्षेप घेऊ इच्छितो.
>>आता इंडोव्मेंट पॉलीसी, हाही एक प्रकारचा जिवन विमाच, पण लोकांच्या मानसिकतेचा फायदा घेवुन कंपण्यांनी काढलेली एक पळवाट आहे.
साधारण १० वर्षापूर्वीपर्यंत टर्म इंशुरन्स हा प्रकारच भारतात उपलब्ध नव्हता.याचे कारण तुम्हीच वर म्हटल्याप्रमाणे पैसे अजिबात परत न मिळणे हे येथील लोकांच्या पचनी पडत नाही. पण लोकांनी विमा घेणे तर गरजेचे आहे. म्हणून विमा कंपन्यांनी (म्हणजे LIC, कारण LIC अशा इंडोव्मेंट पॉलीसी आपल्याकडे प्रायवेट कंपन्या येण्याच्या आधीपासून विकते आहे) ही युक्ती काढली.
तुमचे विधान बरोबर असले तरी वाक्याचा सूर हा नकारात्मक आहे. तो तसा असण्यावर आक्षेप आहे. उदाहरण द्यायचे झाले तर, समजा एखाद्या आजारावर एक गुणकारी पण कडू औषध आहे. लोक ते कडू असल्यामुळे घेऊ इच्छित नाहीत. यावर उपाय म्हणून कंपनीने ते औषध गोड आवरणातून (sugar coating करून) विकण्यास सुरुवात केली तर याला आपण "लोकांच्या मानसिकतेचा फायदा घेवुन" असे म्हणू का? याला "लोकांच्या मानसिकतेमुळे" असे म्हणता येईल फार फार तर.
9 Dec 2010 - 12:48 pm | शैलेन्द्र
कसेही असो, पण आजच्या घडीला एंडोव्मेंट पॉलीसी न घेता टर्म इंशुरन्स घ्यावा इतकेच सांगणे होते.
"लोकांच्या मानसिकतेमुळे" मान्य आहे पण, आजच्या घडीला "विमा एजंटच्या मानसिकतेमुळे" अजुनही हे प्लॅन जास्त खपतात.
9 Dec 2010 - 3:16 pm | धमाल मुलगा
हे झकास्सए राव. :)
मला टर्म इन्शुरन्सबद्दल फार कोणी सांगायचंच नाही. विचारलं तर 'आम्ही त्यात डिल करत नाही' अशी उत्तरं द्यायचे.
आता पुन्हा एकदा हे सगळं चौकशी करुन प्लॅन करतो.
मनापासून धन्यवाद शैलेंद्र. :)
>>इतका फायदा कोणतीही एंदोव्मेंट पॉलीसी देत नाही.
हे मात्र खरं!
9 Dec 2010 - 3:39 pm | विश्वनाथ मेहेंदळे
टर्म इन्शुरन्स खूप स्वस्त असतो. साधारण ३० वर्षाच्या माणसाला ५ लाखाच्या पॉलीसीला १५००-१६०० प्रीमियम पडतो. म्हणजे तुम्ही २५ लाखाची पॉलीसी काढलीत तरी वर्षाला ८०००-९००० च्या आसपास खर्च येईल.
(संदर्भ :- http://www.licindia.in/term_assurance_001_benefits.htm)
विमा कंपनी निवडताना त्यांचा क्लेम सेटलमेंट चा इतिहास बघावा. काही कंपन्या (नावे घेत नाही, हवी असतील तर व्यनी करा) खास बदनाम आहेत या बाबतीत. विकताना मोठ्या मोठ्या पॉलीसी विकतात, क्लेम देताना काटछाट करतात.
9 Dec 2010 - 5:42 pm | शैलेन्द्र
साधारणतः टर्म इंशुरंस क्लेममधे प्रोब्लेम होत नसावे अस वाटत, कारण हि, यस किंवा नो, अशी परिस्थीती असते.
15 Dec 2010 - 12:31 pm | Pearl
धन्यवाद.
खूप छान माहिती दिलीत.
15 Dec 2010 - 4:29 pm | शैलेन्द्र
:-)
8 Dec 2010 - 11:39 pm | केशवराव
एल. आत. सी. चे नवीन प्लॅन्स या साठी विचारात घ्या.
३/४ प्लॅन्स एकत्र करुन [मीक्स] आपल्या गरजे प्रमाणे एकत्रीत फायदा मिळवीता येतो.
आधिक माहीती हवी असल्यास ९८८२२२४८४७१ वर संपर्क साधा. नीश्चित योग्य माहीती देईन.
9 Dec 2010 - 4:58 am | पान्डू हवालदार
अमेरीकेत किवा कानडा ला स्थायीक व्हा..
कानडा बेटर ... रिटायरमेंट वेळी पेन्शन आणी फुकट आरोग्य वीमा :-)
9 Dec 2010 - 12:39 pm | विश्वनाथ मेहेंदळे
उत्कृष्ट सल्ला !!!
बाय द वे, हे कानडा कुठेसे आहे? कोल्हापूरच्या बाजूला की अंबरनाथच्या पुढचे स्टेशन ??
9 Dec 2010 - 12:45 pm | नितिन थत्ते
नाशिकला एक चौक आहे त्याचे नाव कानडा आहे.
9 Dec 2010 - 3:11 pm | धमाल मुलगा
'कानडा'ऊ विठ्ठलु कर्नाटकु...
असं तर नसेल ना?
10 Dec 2010 - 3:14 am | पान्डू हवालदार
तस्लेच काही तरी :-)