स्त्री-पुरुष समानता आणि स्त्री-पुरुष कायद्यातील विषमता

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in काथ्याकूट
2 Dec 2010 - 3:52 pm
गाभा: 

भारत हा मजबूत कुटुंबव्यवस्था आणि विविध प्रकारचे नातेसंबंध यामुळे ओळखला जातो.
तथाकथित पाश्चिमात्त्य संस्कृतीमुळे आधीच काही नातेसंबंधांत दुरावा निर्माण होत आहे.
त्यात वेगवेगळे कायदे करून सरकार किंवा न्यायालय आणखी ते नातेसंबंध बिघडविण्यात हातभार लावत आहे.

***भाग १ : मुलगा आणि मुलगी या नात्यातल्या "मुलगी" कडून असणारे कायदे: ***

पारंपारीक प्रथेनुसार वडील आपल्या मुलाला शिक्षण देवून मोठे करतात आणि मोठेपणी मुलगा त्यांना सांभाळतो.
मुलगा मुलगी समानता यामुळे मुलीलाही मुलाच्याच तोडीचे शिक्षण आज पालक देतात.
मुलीचे लग्न करतांना हुंडा मिळूनही मुलगी नोकरी करते आणि तो पगार सासू-सासऱ्यांना ती देते.
किंवा आजकाल त्याला हुंडा न म्हणता आम्ही स्वखुशीने देतो से म्हटले जाते.
आणि सरकार इकडे कायदा करतं की-सासऱ्याच्या संपत्तीवर सूनेचा हक्क नाही.
असे कसे काय बुवा?
मग सुनेचा पगार सासू-सासऱ्यांना कसा चालतो?
तो मग तीने आई-वडीलांना दिला पाहिजे.
मुलगा मुलगी समानता आली असे वाटत असतांनाच स्त्रीधार्जिण्या कायद्यांमुळे अमाप फायदा फक्त स्त्रीलाच होतो आहे.
मुलगा मुलगी समानतेच्या मी विरोधात नाही. कुणी नसावं सुद्धा.
पण मग जर समानता आहे, तर विशिष्ट कायदे मात्र स्त्रीयांनाच फायदेशीर का?
मग स्त्रीयांना प्रत्येक ठिकाणी आरक्षण कशाला हवे?
मुलगा-मुलगी दोघांचा जर संपत्तीवर "समान" हक्क आहे तर दोघांनीही आई-वडीलांना सांभाळायला हवे.
मुलीनेसुद्धा वडिलांना सांभाळायला हवे. तसे होत नाही.
आणि संपत्ती मध्ये काय काय मोडतं हे कायदा स्पष्ट करेल का?
वडीलांचे पेन्शन ही सुद्धा संपत्ती मानली जाते का?
वडिलांचे रिटायर झाल्यावरचे पैसे ही सुद्ध वडिलांची संपत्ती असते का?
याबाबत कायदा काय सांगतो?
मुळात सरकार अश्या प्रकारचे कायदे जेव्हा करतं तेव्हा घरा घरांत जावून सर्वेक्षण करतं का?
आता मुलीचा सुद्धा वडीलांच्या संपत्तीत अर्धा वाटा असतो असा कायदा आहे.
ती संपत्ती मुलीला मिळाली म्हणजे अर्थातच जावयाला आपोआपच मिळाली.
इकडे सून आणि मुलगा त्या सासू-सासऱ्यांचं सगळ करणार (जे क्रमप्राप्त आणि योग्यच आहे याबद्दल दुमत नाही)
पण सूनेला संपत्तीत वाटा नाही असे कसे काय?
मग मुलाचा अपघाती म्रूत्यू झाल्यास सुनेला मग सासऱ्याचा संपत्तीत काहीच मिळणार नाही असे समजायचे का?
की त्या सूनेला ते तीच्या माहेरी पाठवून देणार?
आणखी एक कायदा असा आहे की मुलाच्या संपत्तीवर वडीलांचा हक्क आहे.
म्हणजे ती संपत्ती पुन्हा वडीलांकडून "मुलीला" आणि पर्यायाने "जावयाला" जाणार.
सगळा "गो गो गो गोलमाल" आहे.
अस कसे काय?
कुणी यावर एक शक्कल शोधून काढील की जो मुलगा आहे तो कुणाचा न कुणाचा जावई सुद्धा असतोच की.
आणि जी मुलगी आहे ती कुणाची न कुणाची सून आहेच की.
होय हे बरोबर आहेच.
पण, मग अशा वेळेस अश्या कायद्यांमुळे "पैशांनी गरीब" असलेल्या वडिलांच्या मुलीशी कुणी लग्न करणारच नाही!
हे योग्य नाही.
आजकाल म्हणतात की, आजकालची मुलं मोठी झाल्यावर आई- वडीलांना सांभाळत नाहीत.
वृद्धाश्रमात पाठवतात वगैरे.
आता हे जे "आजकालचे मुलं" आहेत ती ज्यांची जावई आहेत ते वृद्ध जोडपे मात्र त्या जावयाचे कौतुक करतात.
"जावयाचे आई-वडील जावयाजवळ राहात नाहीत" याचे कारण ते खालीलप्रमाणे देतात:
"त्या जावयाची पत्नी (म्हणजे मुलगी)चांगली आहे हो,पण तीच्या सासू सासऱ्यांचाच स्वभाव खडूस आहे"
म्हणजे प्रत्येक मुलगा आणि सून एकाचवेळेस चांगले आणि वाईट असतो.
कसे काय?
सगळे सापेक्ष असते.
पण कायद्यांमुळे कुणा एकाच्या पारड्यात गरज नसतांना खुप काही येते आणि ज्याला खरोखरी गरज आहे त्याला काहीही मिळत नाही.

***भाग २ : लग्न संस्थेतले पती अणि पत्नी या नात्यामध्ये "पत्नी" कडून असलेले कायदे ***

पती-पत्नी च्या नात्यांत ही तसेच.
बहुतेक घटस्फोटासंदर्भातले कायदे हे स्त्री कडूनच आहेत.
जर मुलगा आणि मलगी समान आहेत तर घटस्फोट घेतांना फक्त पतीनेच पत्नीला का पोटगी द्यावी?
पत्नीही जर कमावती असेल तर पोटगीची गरज नाही आणि फक्त पत्नी कमावती असेल तर पत्नीने पतीला पोटगी द्यायला हवी.
पती पत्नी यांच्या एकमेकांतील मानसिक छळ हा प्रकारही तसाच आहे. तो कायदा सुद्धा स्त्री कडूनच आहे.
पत्नी मानसीक छळ करत असेल तर त्या संदर्भात कायदा का नाही?
मुलगा आणि मुलगी समान आहेत ना!
स्त्री तर उलट मानसिक दॄष्टया जास्त सक्षम असते.
बहुतांश हार्ट एटॅक पुरुषांनाच येतात.
तरीही फक्त पुरुषच स्त्रीचा मानसिक छळ करतो असे कसे?
निदान कायदा तरी असेच सांगतो.
विविध पॉलिसी काढण्यासाठी सुद्धा पुरुषांवर स्त्रीयांकडून दबाव आणला जातो, असे मी मध्यंतरी वाचले होते तसेच आजकाल पॉलिसीच्या जाहिराती सुद्धा अशाच बनत आहेत, जेणेकरून पत्नी व मुले यांच्या दृष्टीकोनातून वडील म्हणजे कर्ता पुरुष हा मरेपर्यंत पैसे कमावणारी न थकणारी आनी मेल्यानंतरही पैसे देणारी एक मशीन आहे.

***भाग 3 : लिव्ह ईन रिलेशनशीप मधील पुरुष आणि स्त्री या नात्यामध्ये "स्त्री" कडून असलेले कायदे ***

आता तर यावर कडी म्हणजे लिव्ह ईन रिलेशनशिप मध्ये मजा दोघेही मारणार आणि सोडून जातांना मुलगा मुलीला पोटगीचे पैसे देईल कारण ती त्याच्या पत्नीच्या दर्जाची आहे? असे कसे?
मला तरी या सगळ्या कायद्यांत एकवाक्यता दिसत नाही.
सगळा सावळा गोंधळ आहे.
आपल्यासारख्या सामान्य माणसाला तर हा सगळा अगम्य प्रकार वाटतो.
आपल्याला काय वाटते?
कुणी जाणकार सांगेल काय?

प्रतिक्रिया

इरसाल's picture

2 Dec 2010 - 5:38 pm | इरसाल

चला !!!!!!! तुम्हीसुद्धा आता तलवार काढलीच आहे तर पुढील रणधुमाळी वाचायला मजा येणार हे निश्चित झाले

1)

>>>मुलीनेसुद्धा वडिलांना सांभाळायला हवे. तसे होत नाही.

बरेचदा मुली तयारही असतात आई-वडिलांना सांभाळायला, in fact त्यांना मनापासून वाटत असते की माझ्या आई-वडिलांनी माझ्यासाठी इतके कष्ट घेतले आहेत, भरपूर प्रेम दिले आहे, लाड केले आहेत सो मला त्याना नक्कीच सांभाळायचे आहे or i want them to stay with me. (which is actually not allowed in our so called ekatra kutumb paddhat
:-O . Anyways forget about staying together with wifes mom-dad point for time being.)

पण हे ९९.९९% जावयांना मान्य नसते. मी अशा कित्येक मुली पहिल्या आहेत की ज्यानी यासाठी लग्न केले नाहिये कारण लग्न ठरवायच्या वेळेस त्यांनी आपल्या भावी नवर्‍याला सांगितले की माझ्या आई-वडिलांची जबाबदारी माझ्यावर आहे. म्हणून मी त्यांना सांभाळणार आहे. is it fine? तेव्हा १००% भावी नवर्‍यानी नाही असे सांगितले. so त्या मुलींनी मग लग्न नाही केले.

हीच गोष्ट जेव्हा मुलाच्या आई-वडिलांबद्दल असते तेव्हा कोणत्याही भावी नवरीला त्याबाबत विचारले जात नाही. ते इतके
implied मानले जाते की नवर्‍याचे आई-वडिल आहेत. त्याना सांभाळायला पाहिजेच.

2)

>>>पण सूनेला संपत्तीत वाटा नाही असे कसे काय?
हो. ना. Its surprising. Actually मी पण वाचले आहे की सासर्‍यांच्या नावावर घर असेल तर सुनेचा त्या घरावर काही अधिकार नसतो. किती funny आहे हे. म्हणजे सासू, सासरे, सून, मुलगा हे एकत्र रहात असतील आणि उद्या मुलाचे काही बरे वाईट झाले तर सर्व जबाबदार्‍या पार पाडून, राहत्या घरावर खर्च करुनही सूनेला काय मिळणार... तर ... nothing. तिच्या हाती धुपाटणेच राहील. अशा वेळी जर काही कारणाने सासू, सासर्‍यांशी कही वाद झाले तर they can easily tell her to leave their house.

3)

>>>पण सूनेला संपत्तीत वाटा नाही असे कसे काय?
>>>मग मुलाचा अपघाती म्रूत्यू झाल्यास सुनेला मग सासऱ्याचा संपत्तीत काहीच मिळणार नाही असे समजायचे का?

मी अशी case पाहिली आहे की जेथे तरुण मुलाच्या लग्नानंतर ३/४ वर्षांनी त्याचे निधन झाले, तर सूनेला आणि नातवाला घरी राहू देणे तर दूरच पण त्याच्या विम्याचे पैसे पण नाही दिले. (विमा पोलिसीवर nominee म्हणून सासू, सासर्‍यांचे नाव होते आणि मुलाने लग्नानंतर ते बदलण्याची तसदी घेतली नव्हती किंवा त्याला तशी गरज वाटली नव्हती.)
आज त्या बिचार्‍या single working mom ला(thank god. she is at least a working women) नवीन घरापासून ते मुलाच्या education पर्यंत सगळे एकटीला पार पाडायचे आहे. सुदैवाने her mom dad are there to support her.

४)
अजून १ गोष्ट,
आता मला सांगा ही वरील घटना वाचून किंवा otherwise ही जर एखाद्याच्या बायकोने असे suggest केले की नवर्‍याच्या विमा पोलिसीवर nominee म्हणून सासू, सासर्‍यांचे नाव असेल तर ते update करुन (वा ते काढून) तिचे नाव टाकावे, तर नवरे लोक त्यावर कसे react करतील, नवरे लोकांच्या त्यावर काय प्रतिक्रिया असतील.

५) समजा एका मुलाच्या आई-वडिलांनी छोट्या खोलीत राहून अपार मेहनत घेऊन, खूप खस्ता खाऊन, प्रसंगी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून आपल्या मूलाला शिकवले, मोठे केले आणि त्या मूलाने नंतर नोकरी करुन स्वत:चे घर घेऊन तो आई-वडिलांना आपल्यासोबत रहायला घेउन गेला, तर उद्गार येतात की, "व्वा! क्या बात! पोराने नाव काढले बघा. आई-वडिल किती नशीबवान. आई-वडिलांच्या कष्टाचे चीज झाले बर का."

आणि हेच जर

समजा एका मुलीच्या आई-वडिलांनी छोट्या खोलीत राहून अपार मेहनत घेऊन, खूप खस्ता खाऊन, प्रसंगी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून आपल्या मूलीला शिकवले, मोठे केले आणि त्या मूलीने नंतर नोकरी करुन तिने स्वत:चे घर घेतले. तर इथपासूनच प्रश्न सुरू होतात
१) ती आई-वडिलांना आपल्यासोबत रहायला घेउन गेली, तर लग्नानंतर नवर्‍या मूलाला त्याच्या सासू सासर्‍यांसोबत रहाणे मान्य आहे?
२) समाजातून उद्गार येतात की, "मुलगी चांगली शिकली. पण आई-वडिलांनी स्वतःच्या म्हातारपणाची काहीच कशी सोय केली नही."
३)आई-वडिलांनी म्हटले जाते की "हे घर तुमचे कसे. हे तर तुमच्या जावयाचे."

हे झाले मुलीने घर घेतले तर,
पण most of the times मुली घर न घेण्याचे प्रेफर करतात कारण घर घेतले म्हणजेच कर्ज घेणे आले आणि डोक्यावर कर्ज तेही माहेरच्या घराचे असेल तर अशा मुलीशी लग्न कोण करणार. सो ती घर घेत नाही. मग उद्गार,
१) आई-वडिलांचे काहीच कसे saving नाही. आई-वडिलांनी स्वतःच्या म्हातारपणाची काहीच कशी सोय केली नही.
२) मुलीला शिकवली खरी पण आता लग्नासाठी पैसा कूठून आणणार.

सूर्यपुत्र's picture

2 Dec 2010 - 5:40 pm | सूर्यपुत्र

स्त्री-पुरुष समानता आहे, किंवा असावी असे जर आपण असे म्हणत असू, तर बसमध्ये सुद्धा अमुक भाग हा फक्त स्त्रियांसाठी असे म्हणणे सुद्धा चुकीचे नाही का? जर काही कायदे निर्माण केल्यामुळे एकाला फेवर आणि दुसर्‍याला धक्का असे केले तर कायदे मोडण्याचे प्रमाण अर्थातच वाढणार नाही का??

परिकथेतील राजकुमार's picture

2 Dec 2010 - 5:48 pm | परिकथेतील राजकुमार

आदरणीय युयुत्सु कुठे आहेत ?

प्रियाली's picture

2 Dec 2010 - 6:37 pm | प्रियाली

आदरणीय युयुत्सु कुठे आहेत ?

४९८अ कायद्याबद्दल पेपरांत बातम्या झळकल्या त्या वाचल्या का? वाचल्या असल्यास वरील प्रश्न विचारणार नाहीस परा. युयुत्सु सेलिब्रेट करत असावेत. ;)

विनायक प्रभू's picture

2 Dec 2010 - 5:49 pm | विनायक प्रभू

लोकसंख्येत वाढ होउन राहीली आहे रे परा.

परिकथेतील राजकुमार's picture

2 Dec 2010 - 5:51 pm | परिकथेतील राजकुमार

आता समानता दूर झाली आणि विषमता एकत्र आली की लोकसंख्येत वाढ होणारचना गुर्जी ?

हा मला फावल्या वेळेत सारखा प्रश्न पडतो.

विनायक प्रभू's picture

2 Dec 2010 - 6:07 pm | विनायक प्रभू

ह्या प्रश्नाचे उत्तर शुन्यात गेल्यावरच कळते.

रेवती's picture

2 Dec 2010 - 8:14 pm | रेवती

खी खी खी.

सोनार साहेब. ईथे बोलुन काहीच फायदा होणार नाही.
कोर्टात पेटीशन का नाही दाखल करत?
तुम्ही लढा द्या.युयुत्सुंचा जोरदार पाठिंबा आहे तुम्हाला.

परिकथेतील राजकुमार's picture

2 Dec 2010 - 6:18 pm | परिकथेतील राजकुमार

कोर्टात पेटीशन का नाही दाखल करत?

सासुरवाडीत प्रिंटाऔट देऊन येउ काय रे ह्या तुझ्या प्रतिसादाची ? ;)

परा तु माझा खर्रा खर्रा मित्र किनै..:P

५० फक्त's picture

2 Dec 2010 - 11:37 pm | ५० फक्त

मग आतापासुनच प्रोटेक्शन ऑफ मॅन अग्नेस्ट द मिस युज ऑफ सच अनफेअर अ‍ॅक्ट्स हि चळवळ सुरु करावी लागेल.

कोणताही कायदा हा दुधारी तलवार असतो, जसा तो एखाद्याला वाचवतो तसांच आणि तेंव्हाच तो दुस -याचा जिव पण घेतो. आणि सरकार जेंव्हा फक्त तलवारींचेच उत्पादन करणार असेल तर ढाली / तलवारी कोणितरी बनवायलाच हव्यात ना. अशा जीव घेणा-या कायद्याविरुद्ध उभं राहणं हे नॅसर्गिक न्यायाने बरोबरच आहे. इथं जीव घेणं हे फक्त शारिरीक नाही तर मानसिक व आर्थिक पण आहे.

जर स्त्रिया हे कायदे आक्रमण हाच उत्तम बचाव म्हणुन वापरणार असतील तर पुरुषांनां सुद्धा या उत्तम बचावाची संधी मिळायलाच हवी.

"भारत हा मजबूत कुटुंबव्यवस्था आणि विविध प्रकारचे नातेसंबंध यामुळे ओळखला जातो.
तथाकथित पाश्चिमात्त्य संस्कृतीमुळे आधीच काही नातेसंबंधांत दुरावा निर्माण होत आहे.
त्यात वेगवेगळे कायदे करून सरकार किंवा न्यायालय आणखी ते नातेसंबंध बिघडविण्यात हातभार लावत आहे." - शंभर टक्के सहमत श्री. सोनार.-- ह्या पेक्षा सरकारने आपल्या विविध खात्यांचा कारभार कसा सुधारता येईल ते पाहावे.

आई वारल्यानंतर घरातली पुरुष मंड्ळी स्मशानात जाउन येईपर्यंत आईचे दागिने आणि साड्या यावरुन भावजयीशी वाद
घालणा-या मुली मी पाहिल्या आहेत.

हर्षद.

"आई वारल्यानंतर घरातली पुरुष मंड्ळी स्मशानात जाउन येईपर्यंत आईचे दागिने आणि साड्या यावरुन भावजयीशी वाद घालणा-या मुली मी पाहिल्या आहेत."

चर्शाद यांचे वरील म्हणणे अगदी बरोबर.
यापेक्षाही वाईट पद्धतीने बाया वागतात.
सवडीने उदाहरणे देईनच.

सोनार साहेब, तुमचे बरेचसे मुद्दे चुकीचे / चुकिच्या गृहितीकावर आधारीत आहेत. काही अर्धवट / ऐकीव माहीतीवर आधारीत आहेत. अधीक आणी अचुक माहीती तुम्हाला कोणताही कुटुंव न्यायालयात प्रॅक्टीस करणारा वकीलच देउ शकेल.

भारतातील कायदे हे जर बाकी (तथाकथीत पुढारलेल्या) देशांच्या तुलनेत खुपच पुरुश धार्जीणे आहेत. तुम्ही जर अमेरीकेतील कायदे पाहीलेत (जगातील पहीली लोकशाही म्हणुन) तर भारतातील कायदे कीती पुरुषांच्या बाजुचे आहेत हे तुम्हाला समजेल.

आणी आपले कायदे पुरुश धार्जीणे असण्याचे कारण म्हणजे अविभक्त कुटुंब पद्धती.

भारतात अजुन तरी पोटगी ही खरोकरच स्त्रीचे जेमतेम पोट भरेल एवढीच मीळते, कारण नवर्यावर आई, वडिल आणी बाकी कुटुंबाची जबाबदारी असते / येईल म्हणुन.

विश्वास ठेवा, आत्तचे कायदे खुप सौम्य आहेत. जसजशी विभक्त कुटुंब पद्ध्ती वाढत जाइल तसे हे कायदे (पाशवी स्त्री संघटनांच्या दबावाखाली :) ) आणखी कडक, पुरुषांवर अन्याय करणारे होतील. आपण सर्व गोष्टींत अमेरीकेचे अनुकरण करत आहोतच. या बाबतीत ही नक्कीच करु.

तेव्हा राजा, सावध रहा. रात्र, दिवस, सगळेच वैर्याचे आहे.

युयुत्सु's picture

3 Dec 2010 - 10:49 am | युयुत्सु

निमिष सोनार,

तुझी (माझ्यापेक्षा वयाने लहान आहेस म्हणून) जवळपास सर्वच निरीक्षणे त्या त्या संदर्भात बरोबर आहेत. थोडा खोल गेलास तर असं लक्षात येईल की या सर्व कायदेशीर असमानते मागे काही तत्त्वे 'मार्गदर्शक' तत्वे आहेत, जी कायदा करताना स्वीकारली जातात. जसे "woman is to be protected at all costs". स्त्री ही अजूनही पुरुषाच्या 'मालकीची' आणि म्हणून 'सांभाळ करायची' वस्तू म्हणून कायदा बघतो... आणि याला खुद्द स्त्रीवादीही प्रत्यक्ष उत्तेजन देतात.

पुरुषांच्या होणा-या छळाची दखाल आता माध्यमे घेऊ लागली आहेत. ही त्यातल्या त्यात स्वागतार्ह बाब आहे.

अवलिया's picture

3 Dec 2010 - 11:21 am | अवलिया

हांग आश्शी !

परिकथेतील राजकुमार's picture

3 Dec 2010 - 11:31 am | परिकथेतील राजकुमार

सौ सोनार की, एक ....