"इंडिअन आयडॉल" चा रोड शो ..........

स्पा's picture
स्पा in काथ्याकूट
2 Dec 2010 - 3:10 pm
गाभा: 

आता बॉलीवूड च्या बरोबरीने "छोटे स्टार" सुद्धा रस्त्यावर वाहन धड्कावण्यात आघाडीवर आहेत....
हे वाचा....

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=118...

आता या शुक्रे बाई गाण्याचा रियाझ वगेरे करायचं सोडून, "रेस रेस" खेळतात.....

आणि तो सावंतांचा अभिजित..... करिअर ची गाडी रेस मध्ये मागे पडलेली असताना(शिवाय लग्न झालेलं असताना ) .... शुक्रे बाई बरोबर रेस लावतोय....
मजबूत चापटवला लोक्कानी....
या बाबतीत कोर्टाने काही कडक नियम करायला हवे असे वाटते का?
कि " स्टार" पदामुळे यांनी काहीही केले तरी "जामिनावर मुक्तता" हाच एक नियम यांना लागू?

असो..... रस्त्यावरून चालताना आता हातात डायरी आणि पेन असू द्या
कुठल्या स्टार ने ठोकलं चुकून माकून तर लगेच "आटोग्राफ" घ्यायला..... ;)

प्रतिक्रिया

गाडि चालवण्याबद्दल्चे नियम आणि कारवाई कडक नकेके करावी असे वाटते ..

..
परंतु ज्यांची चारचाकी आहे त्यांचेच दरवेळेस चुकलेले असते असे वाटत नाही.
मी स्वता बाईक चालवतो, पण कीत्येक बाईक वाले कसे ही बाईक चालवताना पाहुन मलाच यीतका राग येतो की कधी कधी कानफाडाव त्यांना असे वाटत (हे या लेखातील लोकांच्या बाजुने लिहित नाहिये, हे प्रकरण मला माहीत नाही) .

परंतु ते कार रेशिंग खेळत होते हे कोणी सांगितले .. म्हणजे बाकीच्या मित्रांनी की कोणी. ते कार रेशिंग कत्रत होते हे येथे कोणाकडुन कळाले हे ही लिहायला हवे होते खरे तर
कारण मेडिया अश्या गोष्टी निर्मान करते बर्याचदा असे वाटते..
कोणी सांगितले असेन तर ठिक आहे ...
----

गांधीवादी's picture

2 Dec 2010 - 4:00 pm | गांधीवादी

हि बातमी वाचली. ह्या मध्ये शर्यत वगेरे लागली होती, असे काही म्हटलेले नाही.

असो, पण 'सत्तेची आणि प्रसिद्धीची नशा चढते' हे मात्र नक्की.
पण कदाचित हे 'त्याचे' उदाहरण असण्याची शक्यता कमी वाटते आहे.

बाकी जामिन वगेरे म्हणजे विचारणं झाले का ? ज्या देशात बेफाम गाडी चालवून निष्पाप लोकांना यमसदनी पाठविलेले तद्दन हिरो मोकाट फिरतात, तिथे असे प्रश्न विचाराने म्हणजे..........

स्पा's picture

2 Dec 2010 - 4:02 pm | स्पा

गांधीवादी.....

त्या बातमिखाल्चे प्रतिसाद सुद्धा वाचनीय आहेत...... :)

गांधीवादी's picture

2 Dec 2010 - 4:20 pm | गांधीवादी

हो वाचले ना,

अहो, मी 'शक्यता कमी आहे' असे म्हणालो, 'शक्यता नाही' असे नाही.

पत्रकारांना जर का खरेच 'शर्यत लागलेली होते' अशी भनक लागली असती तर त्यांनी सोडले नसते, शेवटी TRP कोणाला नकोय ? किंवा कदाचित शर्यत लागलेली हि असेल, आणि नंतर पोलिसांकडून तोडपानी झालेले असेल.

पण एकंदरीत आजकाल गाड्या चालाविण्यामागे शिस्त नाही हे मात्र सत्य आहे.

अवांतर : हे सिनेमंडळी तरी एक वेळ स्वतःच्या पोटापाण्याचा विचार करून कायद्यापुढे थोडे झुकतील, पण ह्या राजकारण्यांनी पोसलेले अनंत हुकुमशहा भर दिवसा कायद्याला नग्न करतात. त्यांना ना कायद्याची भीती ना पोटापाण्याची.

तो उत्तरला 'मी कोण आहे माहितीये का ? गप गुमान बाजूला हो, साल्या, **व्या. (अजून एक दोन आई बहिणीवरून शिव्यांची लाखोली). जरा भांडण होण्याची परिस्थिती येताच लगेच एक दोघा सुज्ञ गृहस्थांनी मला बाजूला घेतले. मी थोडा घाबरूनच बाजूला झालो. पुढे वाट मिळाल्याने ती व्यक्ती लाल सिग्नल तोडून, गाडी आडवी तिडवी घालून भरधाव वेगाने पुढे निघून गेली. बरं पोलिसाला सांगाव म्हटले, तर काय करता, इतका वेळ वाहतूक पोलीस समोरच उभा असून सुद्धा त्याने कानडोळा केला, ह्यावरून मी समजून गेलो , कि तो नक्की तिथला कोणीतरी (कु)विख्यात असला पाहिजे. नाहीतर त्याचा मामा, काका तरी कुठलातरी नेता पाहिजे.

स्पा's picture

2 Dec 2010 - 4:27 pm | स्पा

:(

पुष्करिणी's picture

2 Dec 2010 - 4:17 pm | पुष्करिणी

इंडियन एक्स्प्रेस वाले म्हणतात की बाइकवाले अचानक लेन बदलून कार समोर आले, त्यामुळे कारचा धक्का लागला आणि नंतर कारही झाडावर आदळली.
http://www.indianexpress.com/news/indian-idol-beaten-up-after-runnerup-crashes-car/719013/

नक्की खरी बातमी काय कोणास ठाउक?

योगी९००'s picture

2 Dec 2010 - 4:59 pm | योगी९००

सामनामधल्या बातमीत असे सांगितले आहे की
"इंडियन आयडॉलफेम प्राजक्ता शुक्रे हिच्या गाडीला काल रात्री सांताक्रुझ येथे अपघात झाला. यात तिचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी स्कूटरवर धडकून दोन जण जखमी झाले. यावेळी संतप्त जमावाने तिला घेरले असता पाठोपाठ दुसर्‍या गाडीने येणार्‍या गायक अभिजित सावंतने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र मध्ये पडलेल्या अभिजितला रोषाला सामोरे जावे लागले व जमावाने त्यालाही धक्काबुक्की केली."

कदाचित अभिजित सावंत शिवसेनेचा प्रचारक असल्याने रेस लावली होती असा या बातमीत कोठेही उल्लेख नाही.

अरे वा प्रत्येक पेपरात वेगवेगळी बातमी असेल असं वाटलं नवतं

पर्नल नेने मराठे's picture

2 Dec 2010 - 5:06 pm | पर्नल नेने मराठे

च्यायला अभिजितकडे ऑडी :-/

आहो एक कोटी जिंकलेन त्याने. ३०% कर जरी बसला तरी ७० लाख उरलेच की :P

तिमा's picture

3 Dec 2010 - 6:33 pm | तिमा

तुमच्या तोंडी चुचुवाणीच शोभून दिसते. हे 'च्यायला' वगैरे नजरेला खटकते.

च्यायला अभिजितकडे ऑडी :-/

एवढा सुस्पष्ट typing ?
:)

शिल्पा ब's picture

3 Dec 2010 - 3:00 am | शिल्पा ब

गाडी चालवणारे अन बाईक चालवणारे दोघही वाट्टेल तशी चालवत असतात...मग असे अपघात होतात...बहुदा बाईकवालेच वाकडी तिकडी, चुकीच्या बाजूने (wrong side ) अशी कशीही चालवतात हे मी बघितलंय म्हणुन सांगते.

नितिन थत्ते's picture

5 Dec 2010 - 8:44 am | नितिन थत्ते

ज्या हिरिरीने "रेस लावली नसणार", "बाईकवाले मध्ये आले" वगैरे प्रतिसाद दुवे वगैरे शोधून दिले जातायत ते पाहून डोळे पाणावले.

दोघे मराठी म्हणून की .............. ?

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

8 Dec 2010 - 8:45 am | निनाद मुक्काम प...

अश्या शुल्लक घटना पुढे माणसाला दंबग बनवितात .तेव्हा हा स्टार होण्याचा प्रवासाचा सुरवात झाल्याबद्दल अभिनंदन
प्राजक्ताच्या गाडीत चुकून धक्का हे गाणे बहुदा वाजत असेल .पण हा धक्का चुकून लागला नाही .असे पादचारी वर्गाचे मत झाले .मागाहून आलेला अभिजित मोहबत्ते लुतौंगा म्हणत होता .पण जनतेने त्याचेही एकले नाही
सारे गामाचे लिटील स्टार मोठेपणी हा आदर्श घेणार नाहीत म्हणजे मिळवले .

स्पा's picture

8 Dec 2010 - 9:06 am | स्पा

+१