माझा मालक कोण ?

मिसळभोक्ता's picture
मिसळभोक्ता in काथ्याकूट
2 Dec 2010 - 8:43 am
गाभा: 

इथे मिसळपावावर अनेक मराठी लोक आहेत. मराठी म्हणजे काय, तर कधीतरी जे मराठी बोलत होते, ते लोक.

मीही त्यातलाच एक. बायकोशी मराठीत, आणि मुलांशी इंग्रजीत बोलणारा इतर भारतीयांसारखा एक.

जकार्त्यात राहून भारताच्या राष्ट्रपतीला पत्रे जरी लिहीत नसलो, तरी भारताविषयीच्या महत्वाच्या बातम्या वाचणारा एक माणूस.

आता समजा, मी गूगल न्यूज सारख्या संकेतस्थळावर बातम्यावाचायला गेलो, तर अर्थातच गूगलला माझा आय पी पत्ता कळणार, आणि तो आय पी पत्ता कॅलिफोर्नियातला आहे, असे समजून उत्तर कॅलिफोर्नियातल्या बातम्या गूगल मला दाखवणार. पण मला त्याचा काय उपयोग ? असोसिएटेड काँटेण्ट सारख्या संकेतस्थळांवरून ह्या अति-लोकल (हायपर-लोकल) बातम्या मला कळतातच. पण, गूगल न्यूज वर मी जातो, ते भारतातल्या बातम्या बघण्यासाठी.

हे गूगल न्यूज ला कसे कळणार ? मी जेव्हा गूगलवर जातो, तेव्हा मी भारताविषयीच्या बातम्या बघतो, हे गूगलने माझी आधीची वर्तणूक बघून ठरवायला हवे. अर्थातच, गूगलमध्ये माझ्यापेक्षा अधिक बुद्धिमान डोकी आहेत, आणि त्यांनी हे आधीच ओळखले आहे. त्यांनी माझा गूगल-प्रवास आधीच नोंदवून ठेवला आहे.

अर्थात, हा माझा प्रवास आहे, तेव्हा मला ह्या प्रवासाची सर्व नोंद असायला हवी की नाही ?

मी समजा हा "माझा" प्रवास गूगल ला मागितला, तर ते देतील का ?

अद्याप तरी नाही.

पण गूगल ही एकच संस्था नाही की ज्यांना माझा प्रवास माहिती आहे. याहू वरील मेल मी नेहमी बघतो. याहू न्यूज देखील बघतो. फेसबूक वर मित्र-मैत्रिणीशी (मित्र जास्त, मैत्रिणी कमी, गैरसमज नसावा) संपर्क साधतो, ट्विटरवर काही बाही लिहितो, जे लोक वाचतात.

मी जे काही ऑनलाईन करतो, ते त्या त्या संकेतस्थळावरच्या माझ्याशी संलग्न लोकांना कळते. म्हणजेच, "माझी" माहिती मी गूगल, याहू, फेसबूक ह्या संकेतस्थळांना दिलेली आहे. त्या माहितीचा मालक कोण ? मी ? की गूगल, फेसबूक, याहू ?

अर्थातच, मला वाटेल, की माझी माहिती.. त्यामुळे, मी मालक.

पण तसे खरेच आहे का ?

गूगल, फेसबूक वगैरे मोठी लोके सोडा. आपले छोटेसे मिसळपाव घ्या.

मी मिसळपावावर जे लिहिले, ते कुणाच्या मालकीचे आहे ?

समजा मिसळपावावर माझ्या लिखाणाचा दुवा कुणी स्वतःच्या वर्डप्रेसवर दिला, तर ती चोरी ठरते का ? (माझ्या मते नाही.)

समजा मी मिसळपावावर मी लिहिलेले सर्वच्या सर्व तसेच्या तसे कुणी स्वतःच्य ब्लॉगावर कॉपी-पेस्ट केले, तर ती चोरी ठरते का ? (माझे मिसळपावावरचे नाव दिले असेल, तर नाही.)

माझे टोपणनाव दिले नाही तर ? मग नक्की ती चोरी ठरते.

पण समजा, मी इथल्या कुणाला दिलेली माहिती व्यनीतून खाजगी म्हणून दिलेली असेल, आणि त्याने/तिने ती कुठेतरी प्रकाशित केली तर ?

आता ही मजा आहे. ह्या वर्तणूकीला कायद्याचे किंवा मोरॅलिटीचे बंधन नाही.

उदाहरणार्थ, मिसळभोक्ता हा मिसळपावावरील आयडी, म्हणजे प्रत्यक्षात कोण आहे, हे ज्यांना माहिती आहे, त्यांनी समजा फेसबुकवर "स्वतःच्या" भिंतीवर ते लिहिले, तर मिसळभोक्ता काही आक्षेप घेऊ शकतो का ?

नाही !!!

त्रिवार नाही !!!

त्यामुळे मिसळभोक्ता स्वतःचे स्वत्व जपण्यासाठी (टू प्रोटेक्ट द आयडेंटिटी) येथे स्वतःचे खरे स्वत्व उघड करेल का ?

करेलही, कदाचित. केल्यास तो स्वतःच जबाबदार.

पण समजा त्याला स्वतःचे स्वत्व उघड करायचे नसेल, तर त्याला काय पर्याय आहे ?

एकच. मिसळपावावर काहीही लिहू नये. मिसळपावावर येऊही नये, कारण मिसळपाव मिसळभोक्त्याचे काय-काय कलेक्ट करते, ते त्याला अद्याप त्यांनी कुठे सांगितले आहे ?

सांगायला हवेच आहे का ? अर्थातच. मिसळभोक्त्याला ते माहिती असणे आवश्यक आहे. अन्यथा मिसळभोक्ता नर्वस होईल.

तर, काय काय जमवता भाउ ??

सांगा ना आता!

(ता. क. जुन्या मिपा मालकांनी आम्हाला बर्‍याच गोष्टी सांगितल्या आहेत. त्या त्यांच्या कामाला आल्या. आमच्याही थोड्याफार कामाला आल्या, म्हणा ;-) आता येऊ नयेत, असे वाटते.)

प्रतिक्रिया

नरेशकुमार's picture

2 Dec 2010 - 8:59 am | नरेशकुमार

माझं एक रिझर्व बॅकेत आनि एक स्विस बॅकेत सेविन्ग खाते आहे, त्याचा पासवर्ड घेतात का ?

आंतरजालावर कोणीही सुरक्षित नाहीये ही माहिती सुद्धा आता जुनी झाली हो... ;)
मी समजा हा "माझा" प्रवास गूगल ला मागितला, तर ते देतील का ?
ह्म्म्म... गुड प्रश्न. ;) जी-मेल मधे असा यक पर्याय आहे जो बदलला की तुमची गुगल वेब हिस्ट्री डिसेबल करता येते. ( मी कधीच बंद केलीय .) तिथे गेल्यावर तुम्ही आत्ता पर्यंत गुगलचा काय आणि कसा व कशा करता वापर केलाय हे सहज पहाता येइल.) अर्थात गुगल ने तुमचा कसा आणि किती माग काढलाय हे सांगणे तसे कठीनच हो. ;)

माझी" माहिती मी गूगल, याहू, फेसबूक ह्या संकेतस्थळांना दिलेली आहे. त्या माहितीचा मालक कोण ? मी ? की गूगल, फेसबूक, याहू ?
या माहितीचे मालक तेच असतात्...टर्म्स आणि कंडीशन या फडतुस गोष्टी वाचण्या आधी लोक आय अ‍ॅग्रीवर टिचकी मारण्यातच धन्यता मानतात तर मग दोष कोणाचा ? फुकट जालावर जागा उपलब्ध करुन द्यायला कुबेर त्यांचा नोकर नसावा असा माझा अंदाज आहे... ;)
पण समजा, मी इथल्या कुणाला दिलेली माहिती व्यनीतून खाजगी म्हणून दिलेली असेल, आणि त्याने/तिने ती कुठेतरी प्रकाशित केली तर ?

मेंदुला मुंग्या आल्या तर तुमच्या डोक्यात तो आहे याची तुम्हाला खात्री पडेल... जास्त महत्वाचीच बडबड केली असेल तर मग रक्तदाब वाढण्याचा धोका असतो !!! ;)
स्वतः बद्धल लोकांना सांगण्याची खाज असेल तर मग असे धोके घ्यावेच लागतील... शेवटी काय स्वतःची इमोशनल भूक भागवण्यासाठीच लोक जालावर पडीक राहणे पसंत करतात ना !!! ;)
आत्ता साठी एवढेच पुरे...इतरांचे प्रतिसाद वाचावे म्हणतो... ;)

जाता जाता :--- The biggest guru-mantra is: never share your secrets with anybody. It will destroy you.
Chanakya

आत्मशून्य's picture

2 Dec 2010 - 10:21 am | आत्मशून्य

:D

विकास's picture

2 Dec 2010 - 10:25 am | विकास

जर एकच आयडी हे एकापेक्षा जास्त वापरत असतील तर त्या आयडीमधून जे लेखन झाले असेल त्याचा मालक कोण?

सांगायला हवेच आहे का ? अर्थातच. मिसळभोक्त्याला ते माहिती असणे आवश्यक आहे. अन्यथा मिसळभोक्ता नर्वस होईल.
पण हिच मागणी मिभो इतर संस्थळाच्या बाबतीत पण करतात का? :-)

ता. क. जुन्या मिपा मालकांनी आम्हाला बर्‍याच गोष्टी सांगितल्या आहेत.
जुन्या मालकांची गोष्टी सांगण्याच्या बाबतीतले कौशल्य चांगलेच आहे हे सर्वच मान्य करतील...

त्या त्यांच्या कामाला आल्या. आमच्याही थोड्याफार कामाला आल्या, म्हणा

म्हणजे नक्की काय फायदा झाला?

ब्रिटिश टिंग्या's picture

2 Dec 2010 - 11:37 am | ब्रिटिश टिंग्या

सबका मालिक एक! :)

श्रावण मोडक's picture

2 Dec 2010 - 11:55 am | श्रावण मोडक

हे... या बिग ब्रदरला काय झालंय? हे प्रश्न त्यांना कधीपासून पडू लागले. ;)
अदिती अजून पोचली नाहीये ना तिथं? त्याच्या आधीच ही स्थिती? बापरे, भविष्यात काय-काय वाढून ठेवलंय हे बिग ब्रदरच जाणे... ;)

परिकथेतील राजकुमार's picture

2 Dec 2010 - 11:58 am | परिकथेतील राजकुमार

'मालक' ह्या शब्दाचा शाळेत असतानाचा लाँगफॉर्म आठवला

योगी९००'s picture

2 Dec 2010 - 1:08 pm | योगी९००

'मालक' ह्या शब्दाचा शाळेत असतानाचा लाँगफॉर्म आठवला..

आम्हाला पण सांगा की राव..

एक's picture

2 Dec 2010 - 10:55 pm | एक

एक्झाक्टली तेच मला पण आठवलं. :)

मालक आणि बालक..

-(पेरुगेट भा.स्कू. मधला) एक

धमाल मुलगा's picture

2 Dec 2010 - 11:05 pm | धमाल मुलगा

सगळे साले हलकट एकाच माळेचे ;)

--(म.ए.सो. बारामती मधला) ध.

बॅटमॅन's picture

15 May 2012 - 12:45 pm | बॅटमॅन

ही ही ही ही ही

ए.चंद्रशेखर's picture

2 Dec 2010 - 12:06 pm | ए.चंद्रशेखर

मी मिसळपावावर जे लिहिले, ते कुणाच्या मालकीचे आहे ?
ते फक्त माझ्या मालकीचे आहे.
समजा मिसळपावावर माझ्या लिखाणाचा दुवा कुणी स्वतःच्या वर्डप्रेसवर दिला, तर ती चोरी ठरते का ?
आंतरजालावरचे लेखन हे सार्वजनिक स्वरूपाचे (कोणीही ते वाचू शकते.) असल्याने त्याचा दुवा देणे चोरी ठरू शकत नाही.
समजा मी मिसळपावावर मी लिहिलेले सर्वच्या सर्व तसेच्या तसे कुणी स्वतःच्य ब्लॉगावर कॉपी-पेस्ट केले, तर ती चोरी ठरते का ?
तुमचे नाव (खरे किंवा घेतलेले) व URL देणे व तुमची आगाऊ परवानगी आवश्यक अन्यथा ही चोरी समजता ये ईल.
पण समजा, मी इथल्या कुणाला दिलेली माहिती व्यनीतून खाजगी म्हणून दिलेली असेल, आणि त्याने/तिने ती कुठेतरी प्रकाशित केली तर ?
तुमच्या दोघांच्यातील परस्पर विश्वासाच्या नात्याचे हे उल्लंघन ठरेल. ही माहिती देताना जर त्या व्यक्तीकडून तुम्ही आपण ही माहिती कोणालाही सांगणार नाही असे स्टॅम्प पेपरवर लिहून घेतलेले असेल तर ते बेकायदेशीर ठरावे अन्यथा नाही.
यापुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे जी मंडळी स्वतःची आयडे न्टिटी लपवण्यासाठी दुसरेच नाव घेऊन लिखाण करतात त्यांच्याबद्दलचा आहे. ही पद्धत बेनामी व्यवहारांसारखीच असल्याने या अशा दुसर्‍या नावाने केलेले लिखाण कोणी चोरले तर काही करणे शक्य नसते. तोंड दाबून मारणे म्हणजे काय ते अशा मंडळींना अनुभवास येते.
थोडक्यात म्हणजे जे लिहायचे ते खर्‍या नावाने लिहा. (उदा. सुधीर काळे) जे नाव तुमचेच आहे हे तुम्हाला कायदेशीर रित्या सिद्ध करता ये ईल. अन्यथा लिखाणाची चोरी झाली म्हणून हाय हाय करण्याशिवाय दुसरे काहीच करता येणार नाही.
श्री. मिसळभोक्ता यांनी त्यांच्या खर्‍या नावावर लेखन सुरू केल्यास वरीलपैकी बर्‍याच प्रश्नांवर कायदेशीर उपाय शोधणे त्यांना शक्य होईल.

विनायक प्रभू's picture

2 Dec 2010 - 1:10 pm | विनायक प्रभू

तुम्हीसुद्धा पंतप्रधानाना आणि राष्ट्रपतींना पत्र लिहा. अगदी चेष्टा झाली तरी सुद्धा.
फक्त जकार्ता वाल्यांनीच का बरे लिहावी.
सुरु करा लगेच.
मग मालक कोण असे प्रश्न पडणारच नाहीत.
आपण सर्व जगाचे मालक आहोत असे वाटेल.

आमोद शिंदे's picture

3 Dec 2010 - 2:41 am | आमोद शिंदे

अगदी चेष्टाच काय कुचेष्टा झाली तरी पत्र लिहणे सोडू नये

पिवळा डांबिस's picture

3 Dec 2010 - 9:06 am | पिवळा डांबिस

तुम्हीसुद्धा पंतप्रधानाना आणि राष्ट्रपतींना पत्र लिहा.
परभूमास्तरांशी १००% सहमत!
मिभोकाका, तुम्ही हे कराच!!!
;)

योगी९००'s picture

2 Dec 2010 - 1:14 pm | योगी९००

मी जे काही ऑनलाईन करतो, ते त्या त्या संकेतस्थळावरच्या माझ्याशी संलग्न लोकांना कळते. म्हणजेच, "माझी" माहिती मी गूगल, याहू, फेसबूक ह्या संकेतस्थळांना दिलेली आहे. त्या माहितीचा मालक कोण ? मी ? की गूगल, फेसबूक, याहू ?

अर्थातच, मला वाटेल, की माझी माहिती.. त्यामुळे, मी मालक.


मला वाटते माझी माहिती म्हणून मीच मालक.....गूगल/याहू/फेसबूक वगैरे माध्यमे आहेत तुमची माहिती तुम्ही कशी लोकांपर्यंत आणता त्यासाठी...

अवांतर.
फेसबूक वर मित्र-मैत्रिणीशी (मित्र जास्त, मैत्रिणी कमी, गैरसमज नसावा)
गैरसमज नाही पण आम्ही योग्य तो समज करून घेऊ.

>>फेसबूक वर मित्र-मैत्रिणीशी (मित्र जास्त, मैत्रिणी कमी, गैरसमज नसावा)
गैरसमज नाही पण आम्ही योग्य तो समज करून घेऊ.>>

हॅ हॅ हॅ, ह्यास दोस्ताना म्हणतात

आत्मशून्य's picture

3 Dec 2010 - 12:31 pm | आत्मशून्य

:D:D:D:D:D:D:D:D

रन्गराव's picture

2 Dec 2010 - 4:44 pm | रन्गराव

मिपावर तुम्ही जे लिहिता ते तुमच्या मालकीचे आहे हा गोड गैरसमज आहे. तसे असते तर संपादक मंडळाला कुठलाही लेख लेखकाच्या परवानगीशिवाय उडवता आला नसता. कुणाच्या प्रतीक्रिया ठेवायची हा अधिकारही लेखकाला नाही.

छोटा डॉन's picture

2 Dec 2010 - 5:07 pm | छोटा डॉन

>>. कुणाच्या प्रतीक्रिया ठेवायची हा अधिकारही लेखकाला नाही.

चुक ...
रन्गराव, तुमची साफ गल्लत होत आहे. कशी ते सांगतो खाली.

समजा तुम्ही आणि मी एकाच गल्लीत रहात आहोत. समजा तुमच्या मालकीची ५० गाढवं आहेत, असु द्या, वाईट नाही.
माझे आपले एकुलते एक झोअडीवजा घर आहे.
काही वेळेस काय होते की मी माझ्याच घरी शांत, निवांत किंवा अन्य काही करत बसलो असता तुमची गाढवं आमच्या अंगणात येऊन दंगा घालतात, सर्व अंगण विस्कटुन ठेवतात, वाळत घातलेले चांगले कपडे खराब करतात, उगाच अंगणात घाण करुन ठेवतात.
मी १-२ वेळेस शांतपणे समजावुन घेतो, नंतर तुम्हाला सांगतो की 'बाबारे, जरा संभाळ, मला त्रास होतो ह्याचा'.
पण परिस्थीत काहीच फरक पडत नाही.
मग मी काय करतो की एक जळके लाकडी फळकुट घेतो आणि जे गाढव माझ्या अंगणात येऊन दंगा घालते त्याचा पाठीत दण्णादण्ण फटके घालतो आणि त्याला पळवुन लावतो.

आता बघा, गाढवं तुमची आणि त्यावर कंट्रोल तुमचा, पण समजा ती माझ्या अंगणात येऊन माझी शांतता भंग करत असतील तर मी त्यांना मारणे करेक्ट आहे की नाही, कारण तुमचा तर कंट्रोल नाही, तुम्ही तो ठेवलात तर ही मारहाण होनारच नाही, बरोबर.
शिवाय मी मारहाण करुनसुद्धा गाढवे शेवटी तुमचीच राहतात, त्यावर 'हक्क' तुमचाच आहे, फक्त त्यांनी माझ्या अंगणात आल्यावर 'चुकीचे वर्तन' करु नये हे ठरवण्याचा अधिकार मला आहे.
मुद्दा समजला ?

असो, आता थोडक्यात मॉरल. :)
जेव्हा माणसाला 'अधिकार (प्रतिक्रिया , लेख लिहणे वगैरे वगैरे )' मिळतो तेव्हा त्याबरोबर वाढलेली 'जबाबदारी आणि जाणीव' ह्याचे भानही माणसाला यावे हे अपेक्षित असते म्हणजे कलहाला सुरवात होत नाही.

असो, धन्यवाद :)

- ( शांतताप्रिय ) छोटा डॉन

रन्गराव's picture

2 Dec 2010 - 6:00 pm | रन्गराव

काय हे? एवढी चांगली गोष्ट चुकीच्या संदर्भात सांगितलीत. असो काही दिवसापूर्वी नानांचा एक गंभीर लेख तुम्हाला मजेशीर वाटला होता, त्या तुलनेत बरीच सुधारणा झाली.

एक तर शांतता भंग होते अस म्हणून जगाच्या शांततेची, कायदा व सुव्यवस्थेची जाणीव आणि सद्सदविवेक बुद्धी फक्त संपादक मंडळाला आहे असा दिखावा करून काय मिळते ते माहीत नाही. मिपावर ज्या विभूतींचे फोटो लावले आहेत त्यांचा इतिहास आपणास जर माहिती असेल तर नीट मनन चिंतन करा. आणि त्यांना मूर्ख म्हणाणारे आणि त्यांच लेखन इंद्रायणीमध्ये बुडवणार्या लोकांची (आम्हीच ज्ञानी अशी) मनोवृती आणि तुमचे विचार ह्यात काही साम्य सापडत का बघा.

जेव्हा माणसाला 'अधिकार (प्रतिक्रिया , लेख लिहणे वगैरे वगैरे )' मिळतो तेव्हा त्याबरोबर वाढलेली 'जबाबदारी आणि जाणीव' ह्याचे भानही माणसाला यावे हे अपेक्षित असते म्हणजे कलहाला सुरवात होत नाही.

खूप छान वाक्य आहे. पण "Practice what you preach" हे समजल असेल तर अशी वाक्यं वापरू नयेत संपादक मंडळाने. आणि समजल नसेल तर पुढं जसा पाहिजे तसं प्रत्युत्तर द्या.

अजून एक गोष्ट, "थोड्क्यात मारल" वगैरे कायदा सुव्यवस्थेची वाट लावणार्या भडकाउ वक्तव्यांची कमीत कमी संपादक मंडळाकडून अपेक्षा नाही.

छोटा डॉन's picture

2 Dec 2010 - 6:01 pm | छोटा डॉन

************** सुचना सुरु **************
मी इथे अजिबात तुमच्या प्रतिसादाच्या चिंध्या करणार नाही. त्याविषयी एक शब्दही लिहणार नाही.
जाऊ द्या, सोडुन दिले ह्यावेळी
************* सुचना समाप्त **************

शांततेतच घ्या, गडबड करु नका, गोंधळु जाऊ नका !
मी तो प्रतिसाद 'संपादक' म्हणुन लिहला असे कुठे म्हटले ?

एकदम जनरल घ्या की, त्यात काय चुकले ते ही सांगा की. बुद्धी वगैरे काढणे लै सोपे असते हो, पण जाऊ दे.
अवघड आहे, मला मान्य आहे. कदाचित उगाच धडाधड बेसलेस उलटे पालटे लिहायचे सोपे असेलही.

अजुन एक, वारंवार हे मिपाच्या वातावरणावर टिका, उडवाउडवीच्या घटनांचे वारंवार अनावश्यक उल्लेख, संपादक मंडळावर आगपाखड आणि तोंडसुख आदी घटना 'एखाद्या त्रयस्थ धाग्यात' ताबडतोब थांबल्या तर बरे होईल अशी छोटा डॉन ह्या 'सदस्या'ची इच्छा आहे. माझ्या मते ह्यात रुची नसलेल्या 'इतर सामान्य' सदस्यांना ह्याचा खरोखर त्रास होतो.
पडद्यामागे बर्‍याच गोष्टी घडत असतात की ज्या तुम्हाला माहित नसु शकतात ही शक्यता लक्षात घेत जावा, प्रत्येकच गोष्ट सर्वांपर्यंत पोहचवणे शक्य आणि योग्य नसते.

बाकी असो.

- छोटा डॉन

धमाल मुलगा's picture

2 Dec 2010 - 6:14 pm | धमाल मुलगा

वारंवार हे मिपाच्या वातावरणावर टिका, उडवाउडवीच्या घटनांचे वारंवार अनावश्यक उल्लेख, संपादक मंडळावर आगपाखड आणि तोंडसुख आदी घटना

जर कोणी केवळ तेव्हढ्यासाठीच इथं येण्याचे कष्ट घेत असतील तर?
शेवटी कसंय, बरं चाललेलं सगळ्यांनाच पहावतं असं थोडंच आहे डानराव?

शैलेन्द्र's picture

3 Dec 2010 - 12:19 am | शैलेन्द्र

"माझ्या मते ह्यात रुची नसलेल्या 'इतर सामान्य' सदस्यांना ह्याचा खरोखर त्रास होतो."

खरचं, सुरवातीला बरा वाटतो हा राडा, पण नंतर "त्रास" होतो.

इतर (अतिसामन्य)
शैलेन्द्र.

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Dec 2010 - 7:15 pm | बिपिन कार्यकर्ते

खुद के सथ बातां : या रन्गरावांनाच संपादक केले तर?

विश्वनाथ मेहेंदळे's picture

3 Dec 2010 - 9:52 am | विश्वनाथ मेहेंदळे

रन्गराव, छोटा डॉन ने "थोडक्यात मॉरल" असे लिहिले आहे "थोड्क्यात मारल" असे नाही. मॉरल चा अर्थ इथे तात्पर्य असा घ्यावा. ते "कायदा सुव्यवस्थेची वाट लावणारे भडकाउ वक्तव्य" वाटत नाही. बरोबर ना?

नीट वाचा की राव. तो तुमचा हत्ती तुमच्या घरी येऊन गेला की काय?

रन्गराव's picture

3 Dec 2010 - 12:41 pm | रन्गराव

अरेच्चा खरच की. चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद विमे :)

विनायक प्रभू's picture

2 Dec 2010 - 5:12 pm | विनायक प्रभू

जळक्या लाकडाच्या फळकुटाचा मार खाउन सुद्धा आपल्या सवयी न सोडणार्‍या गाढावांचे चोता दोन काय करतात कुणास ठाउक?

वा वा वा वा एकदम चपखल उदाहरण आहे.
बाकी नो कॉमेन्ट्स

अविनाशकुलकर्णी's picture

3 Dec 2010 - 12:01 am | अविनाशकुलकर्णी

ब~याच घरात काय जेवायचे काय पेहनायचे? कुठे व कधि जायचे..किति पैसे खर्च करायचे हे पत्नी ठरवत असल्याने माझा मालक कोण हा प्रष्ण पडत नसेल

राजेश घासकडवी's picture

3 Dec 2010 - 5:51 am | राजेश घासकडवी

आपल्या 'माहिती'विषयी मला नेहेमीच काही मूलभूत प्रश्न पडतात.
- असं नक्की काय असतं की जे इतरांना कळणं धोकादायक असेल? (अर्थातच मी इथे माझे पासवर्ड्स, सोशल सिक्युरिटी नंबर वगैरे म्हणत नाही. किंवा मी खून केले असतील तर त्याबद्दलचे पुरावे, किंवा माझ्या काळ्या पैशांच्या हिशोबाच्या फायली वगैरे पण म्हणत नाही.)

-माझी माहिती गोळा करणाऱ्यांना नक्की काय फायदा होतो? तिची किंमत नक्की किती? व ती गोळा करणाऱ्यांना काय स्वरूपात मिळते? विशेषतः आंतर्जालावरची माहिती कशी वापरली किंवा विकली खरीदली जाते?

मिसळभोक्ता's picture

3 Dec 2010 - 8:55 am | मिसळभोक्ता

आपल्या महितीवर अवलंबून असलेल्या ट्विटर, लिंक्ड इन, फेसबूक आणि इतर "सोशल स्टार्टप्स" ची किंमत बघितली, तर आपल्या माहितीची किंमत नक्कीच ट्रिलियन डॉलर्स अशी होईल. जगातील समजा १ बिलियन लोक अशी माहिती सदर संकेतस्थळांना देतात, असे गृहीत धरले, तर प्रत्येकाच्या माहितीची किंमत १००० डॉलर्स एवढी सरासरी होईल. त्यात भारतातील सरासरी आय (इन्कम) अमेरिकेतील सरासरी आय पेक्षा खूप कमी असे धरले, तर, माझ्या माहितीची किंमत जास्त, म्हणजे सुमारे ६०००० डॉलर्स एवढी होते. मला ही रक्कम फेसबूक, ट्विटर, इत्यादींकडून परत हवी आहे.

छोटा डॉन's picture

3 Dec 2010 - 9:23 am | छोटा डॉन

>>माझ्या माहितीची किंमत जास्त, म्हणजे सुमारे ६०००० डॉलर्स एवढी होते. मला ही रक्कम फेसबूक, ट्विटर, इत्यादींकडून परत हवी आहे.

ओके, समजा ही किंमत योग्य आहे हे गृहीत धरले तर बाकी असे अनेक प्रश्न आहेत.
तुम्ही जसे तुमच्या माहितीचे इव्हॅल्युएशन केले तसे त्या साईट्सने त्यांच्या सर्व्हिसेसचे इव्हॅल्युएशन करुन तुम्हाला भरमसाट बील पाठवले तर ?
१. फेसबुक, ओर्कुटवर तुम्हाला अनेक जुने मित्र भेटले असतील व त्यांच्याबरोबर तुम्ही अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला असेल.
किंमत = ???
२. फोटो किंवा इतर काही दुसर्‍याला सांगाविशी वाटणारी गोष्ट पटापट शेअर करता आली ती साईट्समुळेच, ती ही जगाच्या कानाकोपर्‍यात.
किंमत = ???
३. फोनचा पैसा न घालवता तुम्हाला इथे गप्पा मारता येतात, अगदी जगातल्या कुठल्याही भागातल्या आप्तांशी.
मग ते चॅट असो किंवा टॉक किंवा आजकालचे व्हिडिओ कॉल्स वगैरे.
किंमत = ???
४. भयंकर वैताग आला असताना किंवा अजुन कुठल्या क्षणी जेव्हा तुम्हाला हे नेटवर्क जवळचे वाटले असेल व त्यामुळे तुम्हाला शांत होण्यास मदत झाली असेल.
त्या कन्सल्टिंग मिडियाची किंमत = ???

टीप : तुम्ही सेवा घेताना 'ह्या सर्व सुविधा विनामुल्य आहेत' हे पाहुनच सेवा घेतल्या हे मान्य.
शिवाय 'माहिती सत्य आणि नक्की किती' असावी असे काही ह्या सर्व्हिसेसचे बंधन नाही, मात्र त्यातला कंफर्टनेस किंवा उपयोगीपणा पाहुन तुम्हीच ती माहिती शेअर केली असेच आहे ना ?

मला माझे म्हणणे अजुन योग्य किंवा विस्तृतपणे मांडता येत नाही हे कबुल करतो :)

- छोटा डॉन

मिसळभोक्ता's picture

3 Dec 2010 - 9:30 am | मिसळभोक्ता

कॉस्ट आणि व्हॅल्यू ह्यात गोंधळ करताय डॉण शेठ. व्हॅल्यू म्हणजे मी, एक ग्राहक ठरवतो ती. माझ्यामते ती ०.

Pain's picture

6 Dec 2010 - 6:52 am | Pain

त्यांचा मुद्दा आणि त्यावर तुमचा प्रतिसाद पाहून "दिनूचे बिल" या धड्याची आठवण झाली :)

राजेश घासकडवी's picture

3 Dec 2010 - 12:32 pm | राजेश घासकडवी

आपल्या महितीवर अवलंबून असलेल्या ट्विटर, लिंक्ड इन, फेसबूक आणि इतर "सोशल स्टार्टप्स" ची किंमत बघितली, तर आपल्या माहितीची किंमत नक्कीच ट्रिलियन डॉलर्स अशी होईल.

धन्यवाद. पण अजूनही माझा प्रश्न पूर्णपणे सुटलेला नाही. तुम्ही म्हणता ती किंमत शेअरबाजाराने किंवा एकंदरीत बाजाराने ठरवलेली किंमत असावी. अशी किंमत ठरते तेव्हा त्या कंपन्यांतून भविष्यकाळात काहीतरी विशिष्ट दराने उत्पन्न निर्माण होईल हे गृहितक आहे. तुम्ही किमतीचा अंदाज दिला. पण नक्की काय प्रकारे उत्पन्न निर्माण होतं किंवा भविष्यात होणार आहे? थोडं उदाहरणासह स्पष्टीकरण दिलं तर बरं होईल.

आणखीन छिद्रान्वेषीपणाच करायचा तर किती माहिती दिली आहे यापेक्षा 'ट्रॅफिक' किती आहे यावरून ही किंमत ठरत नाही का? म्हणजे समजा तुमचा काही खजिना तुम्ही काचेच्या भिंती असलेल्या गोदामात ठेवला. तर तुम्हाला जी माल सुरक्षित ठेवण्याची व तुमच्या मित्रांना दाखवता येण्याची सोय मिळते त्याबदल्यात गोदामवाल्यांनी आसपास जाहिराती लावून पैसा केला तर त्यात तुमचा हक्क आहे का असा तुमचा प्रश्न वाटतो. मला नक्की उत्तर माहीत नाही. पण या जाहिरातींमधून खरंच इतका पैसा मिळतो का?

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

8 Dec 2010 - 9:34 am | निनाद मुक्काम प...

मुद्दा योग्य आहे
साहित्यातले अन्नू मलिक जागोगाजी सापडतील .
माझ्याशी ओर्कुट वर मैत्री होऊन १ महिना होत नाही .तर त्या महाशयांनी रंग उधळले .माझे जर्मनीतील काही फोटो चक्क इंग्लड च्या अल्बम म्हणून टाकले . बाकीचे फोटो सुद्धा असेच उचलेगिरी करून आणले असतील .
शेवटी मी माझ्याच चोरलेल्या फोटोखाली सुरेख हो फोटो ,कधी काढले ?(माझा गर्भित प्रश्न असायचा माझ्या प्रोफाईल वरून ?) सायबर सेल /व कायदे विकसित नाही झाले तर कठीण आहे एकूण .