लुटा लुत्फ शब्दांचा

यकु's picture
यकु in काथ्याकूट
1 Dec 2010 - 4:42 pm
गाभा: 

काही अभंग/ कवने, गाणी, आपल्याला सदासर्वकाळ आवडत असतात. नुसती ऐकली तरी आपल्याला शांत करून, वेगळ्याच जगात घेऊन जाऊन डोळ्यांतून अश्रू काढण्याची, कधीकधी तर भलतं सेंटीमेंटल करून ढसाढसा रडवण्याची ताकद या गाण्यांमध्ये असते. ही गाणी मग प्रेमगीतं असतील, अभंग असतील, भावगीतं असतील, गझलेची एखादी ओळ असेल की एखादी कविता की एखाद्या लेखकांना मन आकाशा एवढं मोठं करून लिहीलेल्या ओळी असतील.
कितीही पत्थरदिल माणूस झाला तरी अशी गाणी, अभंग, कवनं, उतारे प्रत्येकाचे असतातच. उदा. अवलिया यांनी ज्ञानेश्वरीतील ओवीबद्दल केलेले आजचे सुंदर प्रकटन. कुणी सांगतं, कुणी सांगत नाही. कृपया तुमच्या अशा दर्दभर्‍या जागा/ गाणी सांगा आणि त्यांचा लुत्फ सर्वांना लुटू द्या.
सुरूवात मी करतो. बाबामहाराज सातारकरांच्या आवाजातील संत तुकारामांच्या "गायनाचे रंगी शक्ती अद्भुत हे अंगी, हे तो देणे तुमचे देवा घ्यावी अखंडीत सेवा, अंगी प्रेमाचे भरते नेघे उतार सरते, तुका म्हणे वाणी प्रेम अमृताची खाणी" ऐकले की डोळे मिटले जाऊन पापण्यांत पाणी येतेच.

प्रतिक्रिया

आकाशी या झेप घे रे पाखरा..

निघालो घेऊन दत्ताची पालखी.. आम्ही भाग्यवंत आनंद निधान...

परिकथेतील राजकुमार's picture

1 Dec 2010 - 5:02 pm | परिकथेतील राजकुमार

आमचे अतिशय आवडते गाणे व श्री. फटू ह्यांचे त्यावरील सुंदर विवेचन मिसळपाव वर वाचता येईल.

यकु's picture

1 Dec 2010 - 5:03 pm | यकु

=)) =)) =)) =)) =))
खपलो!!! ठार वाहून गेलो त्या नळाच्या पाण्यात!

तारे जमीन पर,
ब्रेथलेस-शंकर महादेवन.,
अवघे गर्जे पंढरपुर,,,
बाजेरे रे मुरलिया,
कस्तुरी तिलकम्,
आरंभी वंदिन,
भारत हमको जान से प्यारा है..
तु ही रे,,
तु गेली तेव्हा..
तु तेव्हा तशी...
वंदे मातरम्...

गुंडोपंत's picture

24 Jan 2011 - 5:54 am | गुंडोपंत

||कस्तुरी तिलकम्
ललाट पटले
वक्षःस्थले कौस्तुभम्||

पंडीतजींच का?
मलाही फार आवडते ते!
मला एकुणच त्यांची सगळीच संस्कृत भजने फार आवडतात.

स्वानन्द's picture

1 Dec 2010 - 8:47 pm | स्वानन्द

अभंग : हाची नेम आता, न फिरे माघारी

नगरीनिरंजन's picture

1 Dec 2010 - 9:20 pm | नगरीनिरंजन

माझी आजी म्हणते कधी कधी "उमा म्हणे यज्ञी माझे जळाले माहेर". म्हणताना स्वतःही रडते आणि ऐकणार्‍यालाही रडवते.

मी पहील्यांदा हे गाणं आज ऐकलं. खरच फार करुण आणि जीवघेणं आहे. नगरीनिरंजन आपली आभारी आहे इतकं सुरेख गाणं इथे उधृत केल्याबद्दल. तसेच यश्वंत यांनी हा धागा काढला म्हणून ते कळलं त्यांची देखील आभारी आहे. -

मानभंग हाचि झाला मंडपी आहेर । उमा म्हणे, यज्ञी माझे जळाले माहेर ।।
माहेरीच्या सोहळ्यात, नाहि निमंत्रिले जामात । चहू दिशी चालू होते संपदेचे थेर ।।
लक्ष्मीचे जमले दास, पुसे कोण वैराग्यास । लेक पोटीचीही झाली कोप-यात केर ।।
आई-बाप, बंधु-बहिणी, दारिद्र्यात नसते कोणी । दीन दानतीचे सारे धनाचे कुबेर ।।
दक्षसुता जळली मेली, नवे रूप आता ल्याली । पित्याघरी झाला ऐसा, दिव्य पाहुणेर ।।
परत सासु-याशी जाता, तोंड कसे दावू नाथा । बोल ईश्वराचे झाले सत्य की अखेर ।।
प्राणनाथ करिती वास, स्वर्गतुल्य तो कैलास । नाचतात सिद्धी तेथे, धरूनिया फेर ।।

kamalakant samant's picture

2 Dec 2010 - 10:37 am | kamalakant samant

काही गाणी कवीमुळे तर काही गाणी गायकामुळे कायमची मनात घर करतात.
स॑त साहित्य वगळता मनात ठसलेली काही गाणी.
भा.रा.ता॑बे-मावळत्या दिनकरा,मधु मागशी माझ्या,जन पळभर्,डोळे हे जुल्मी गडे,नववधु प्रिया मी,
कळा ज्या लागल्या जीवा,तिन्ही सा॑जा सखे,निजल्या तान्ह्यावरी इत्यादि.
माणिक वर्मा-इथेच आणि या बा॑धावर्,चा॑दण्या रात्रीतले ते,तुझा नी माझा एकपणा,त्या चित्तचोरट्याला,
तुझ्या मनात कुणितरी लपल, र॑ग रेखा घेउनि, इत्यादि.
मालती पा॑डे-कशी रे तुला भेटू,त्या तिथे पलिकडे,या कातरवेळी,लपविलास तू हिरवा चाफा इत्यादि.
भरपूर मोठी यादी होइल.आठवली तेवढी लिहिली.

मनिम्याऊ's picture

23 Jan 2011 - 9:11 pm | मनिम्याऊ

माझं अत्यंत आवडतं गाणं...
दिल्ली ६ सिनेमातलं

अर्झियां सारी मै, चेहरे पे लिख के लाया हुं
तुमसे क्या मांगु मै, तुम खुद ही समझ लो...

या मौला... मौला मौला मौला मेरे मौला
मौला मौला मौला मेरे मौला
मौला मौला मौला मौला

दरारें दरारें है माथे पे मौला
मरम्मत मुकद्दर की कर दो मौला...

तेरे दर पे झुका हुं, मीटा हुं बना हुं
मरम्मत मुकद्दर की कर दो मौला...

जो भी तेरे दर आया, झुकने जो सर आया
मस्तींयाँ पिये सब को झुमता नझर आया
प्यास लेके आया था, दरिया वो भर लाया
नूर की बारिश मे भिगतासा तर् आया
मौला मौला मौला मेरे मौला

इक खुशबू आती थी
मैं भटकता जाता था
रेश्मी सी माया थी
और मै तकता जाता था..
जब तेरी गली आया, सच तभी नज़र आया,
मुझमें ही वो खुशबू थी, जिसे तुने मिलवाया..
मौला मौला मौला मेरे मौला

टूट के बिखरना मुझको ज़रूर आता है,
वरना इबादत वाला सरुर आता है,
सजदे मे रहने दो, अब कहीं नही जाऊंगा,
अब जो तुमने ठुकराया, तो सँवर ना पाऊंगा...
मौला मौला मौला मेरे मौला

सर उठा के मैने तो कितनी ख्वाहिशें की थी
कितने ख्वाब देखे थे, कितनी कोशिशें की थी
जब तु रुबरू आया...
जब तु रुबरू आया, नजरें ना मिला पाया..
सर झुका के इक पल में मैंने क्या नहीं पाया...!!

मौला... मौला मौला मौला मेरे मौला
मौला मौला मौला मेरे मौला
मौला मौला मौला मौला

मोरा पिया घर आया.. मोरा पिया घर आया..
मौला मौला मौला मेरे मौला
मौला मौला मौला मौला

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

23 Jan 2011 - 11:46 pm | निनाद मुक्काम प...

कुठल्याही अनिवासी भारतीयाचे भावविश्व दर्शविणारे गाणे म्हणजे
मे जहा राहू मे काही भी राहू तेरी याद साथ हे गाणे
http://www.youtube.com/watch?v=tsxFWUW6YJI