भरला बांगडा- (माझा म्हंटल असत पण राहु दे .)

स्पंदना's picture
स्पंदना in पाककृती
29 Nov 2010 - 10:43 am

तर्रीदार रश्श्याचे आधण गरमा गरम |
स्वादिष्ट वास चौफेर, हे ची आग्रही आमंत्रण |

जाहले पाट पाणी, भोवती रेघ रांगोळीची |
स्वादिष्ट भोजनासाठी , इतुकेच थाट मी करी |

हा भात मसालेदार अन धार तुपाची वरी |
वाढते आग्रहाने, मी सुग्रण 'कोल्हापुरी' |

मंडळी , कोल्हापूर अन मांसाहार याचं अतूट नात आहे. अशी चव , असं स्वयंपाक बनवण, की ज्याचा वास गल्लीभर फिरत असतो. अन रविवारी तर हा वास घराघरातून येत असतो.
आज मी बनवते, सॉरी सॉरी , खिलवते आहे भरला बांगडा !

हे बांगडे !
From Drop Box" alt="" />

बघून घ्या ! काय आहे असाच आणखी एक मासा असतो पण चव मात्र जरासुद्धा याच्या जवळ पास नाही पोहोचत !
त्याला मध्ये म्हणजे चपटा बांगडा जर हातावर धरला तर पोटावर एक रेघ दिसते. अन काही निळसर रेघा पण असतात. बराचसा फडफडीत वाटतो अन आपण फसतो !
बांगड्याला थोडासा गोडसर वास असतो. इथे बांगड्याला kambong अन त्या माश्याला selar म्हंटल जात. एव्हढ ज्ञान पुरे !

तर मासे साफ करून घ्या .
आता साहित्य.:-
चिंचेचा कोळ साधारण १ टे. स्पून.
हळद ११/२ टी स्पून.
मीठ बघून घाला.
तिखट आवडीनुसार.
आल लसूण कोथिंबीर पेस्ट २ तव ३ टे स्पून. ( हीं मी भरपूर तयार करून फ्रीझर मध्ये आईस क्यूब सारखे क्यूब करून ठेवते.)

हे सार एकत्र करून माश्याला व्यवस्थित आतून बाहेरून लावून घ्या. हवे असतील तर माश्याला थोडे तिरके काप दया .

स्टफिंग : जवळ जवळ १० ते १२ हिरव्या मिरच्या , मीठ , थोड्या लसूण पाकळ्या , कोथिंबीर, अन लिंबू रस.
घ्या चर्नर मध्ये फिरवून ! थोड जाडसर राहू द्या.

आता हे वाटण माश्याच्या पोटात असं भरून घ्या.

From Drop Box" alt="" />

मासा थोड्या तांदळाच्या वां ज्वारीच्या पिठा मध्ये मीठ तिखट घालून त्यावर घोळवून घ्या अन असा तांबूस रंगावर तळा. ( तांदळाच्या वां ज्वारीच्या पिठाने कुरकुरीतपणा येतो.)
From Drop Box" alt="" />

माश्याचा रस्सा.

ओल खोबर ३ टे. स्पून.
१ मध्यम टोमेटो भाजून.
लवंग ४ वां ६
दालचिन दोन इंच .
मिरे ६ ७
रवी फुल १

भाजणी
१ टे, स्पून धणे.
१/२ टी स्पून मेथी.
अर्धा कांदा . पातळ कापून.

From Drop Box" alt="" />

थोड्याश्या तेलात पाहिला कांदा अगदी खरपूस भाजून घ्या.
आता तो बाजूला करून पाहिला धणे अन मग मेथी भाजून घ्या .

आता वरील सर्व मसाला म्हणजे खोबर , टोमेटो , लवंग दालचिन मिरे रवी फुल अन हा परतलेला मसाला एकत्र करून बारीक वाटून घ्या.
कांदा कापून गरम तेलात परतून घ्या अन त्यावर माश्याचे तुकडे अन हळद टाकून परतून घ्या . वरील मसाला घालून आणि थोडा परत अन मग पाणी मिसळा . चांगले उकळू दया . तयार!
From Drop Box" alt="" />

प्रतिक्रिया

धमाल मुलगा's picture

29 Nov 2010 - 10:53 am | धमाल मुलगा

अपर्णे,
कुठे फेडशील गं हे पाप? भर सोमवारी, सक्काळसक्काळी हे असं काहीतरी समोर आणलंयस, आता आम्हाला कसलं जेवण गोड लागतंय? हा भरला बांगडा आता दिसभर डोळ्यापुढं भांगडा करत राहणार. :)

नगरीनिरंजन's picture

29 Nov 2010 - 10:57 am | नगरीनिरंजन

+ १

>>हा भरला बांगडा आता दिसभर डोळ्यापुढं भांगडा करत राहणार.
=)) =))

श्रावण मोडक's picture

30 Nov 2010 - 12:49 am | श्रावण मोडक

­धमु, तू ­ओळखतोस यांना? मग सुपारी ­घेतोस? म्हणजे दोन्ही. ­एक ­आ­धी ­­घे. ­एक जेव­णानंतरचीही. विचार करून सांग.

धमाल मुलगा's picture

1 Dec 2010 - 8:00 pm | धमाल मुलगा

अमेरिकेची वारी कोण स्पॉन्सर करत असेल, तर पुढचं बोलण्यात अर्थ आहे.
नसेल तर, ही चर्चा करणंही व्यर्थ आहे. ;)

बॅटमॅन's picture

5 Aug 2013 - 3:27 pm | बॅटमॅन

काय चारोळी आहे वाह!!!!

यकु's picture

29 Nov 2010 - 11:12 am | यकु

निम-मांसाहारी लोकांसाठी मासा तेवढा बाजूला काढून ताटं मांडा म्हणजे झालं! :)
तर्री झकास दिसत असली तरी आम्हाला त्या मांसात दात खुपसायची बिशाद नाही अजून. :(

तुम्ही मासे खात नाही?

हाय रे दैवा..

आपण काय गमावतोय याचीही तुम्हास कल्पना नाही..अरेरे..

यकु's picture

29 Nov 2010 - 12:43 pm | यकु

नाही ना नचिकेतजी.
खायचा प्रयत्न केलाय - पण जमलेलं नाही अजून.
मजा गमावतोय हे मान्य, पण आम्ही कोकणपुत्र नाही ना! :(

जाताजाता मासे खाणार्‍यांवरची ही पाणचट चारोळी. मंगेश पाडगावकरांनी केलेली.

कोकणातला बामण
समुद्रावर बसून संध्या करी मासा दिसला की जानव्यानं धरी
मासा म्हणे रे पळून जायन
बामण म्हणे रे तळून खायन

;-) ;-) ;-)

नक्की शब्द आठवत नाहीत. पण अशीच आहे ती चारोळी.

पापलेट खावा आणि सुरुवात करा.

काहीतरी खोबरेलात तळलेलं सुखट किंवा तत्सम खाल्लं असाल्..म्हणून नाही जमलं..

ते ही झकासच्..पण आधी पापलेट.

या धाग्याच्या लेखकांस विनंती: कमी वासाचे मासे सुचवा एकनाथजींना प्रथमावताराच्या प्रथमाहारासाठी..

यकु's picture

29 Nov 2010 - 12:49 pm | यकु

सुचवा - सुचवा.
इथल्या सुगरणींच्या भरवशावर आमच्याइथल्या "मालवणी गजाली" त जाऊन येतो.

एडव्हान्समध्ये थांक्यू! :)

नाय नाय्..मुम्बैस येवून खावा.

तुमच्या संभाजीनगरास पोहोचेपर्यंत सर्वच मासे "वासा"चे होतात..

बर. पुढच्या टायंबाला "औट ऑफ ब्ल्यू" मध्ये बसू मग.
येता का?

नाथसागरात पापलेट आणि सुगरणींनी सुचवलेले मासे मिळतील की नाही कोण जाणे.

धमाल मुलगा's picture

29 Nov 2010 - 1:44 pm | धमाल मुलगा

मासे हा धडा हवं तर नंतर अभ्यासाला घे, आधी खेकड्याचं कालवण/ खेकड्याचं सूप ह्याची चव तर घेऊन पहा..मग आपोआप एकेक करत सरावशील. :)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

29 Nov 2010 - 9:06 pm | विश्वनाथ मेहेंदळे

धमू राजे,
आवरा स्वतःला. अहो बिगरीत असताना दहावीचा पेपर नका टाकू.

यशवंत,
सुरुवात गवि म्हणाले त्याप्रमाणे पापलेट. नंतर सुरमई, हलवा. कोलंबी हा चांगला पर्याय आहे सुरुवातीला.
बांगडा, छोटे मासे आणि इतर खास मासे यांपासून लांब रहा पहिले काही महिने.
कोलंबी वगळता शेलफिश पण टाळा. खेकडा, lobster, तिसऱ्या वगैरे.

खात्रीचे हॉटेल निवडा. मासे ताजे पाहिजेत. किंवा उत्तम म्हणजे मासेखाऊ मित्राकडे जा.

बाकी मुद्दे हळू हळू येतीलच.

कमी वासाचे मासे सुचवा "यशवंत एकनाथजींना" प्रथमावताराच्या प्रथमाहारासाठी..

Aivaji Yashwant type karaayache raahoon gele aani phakt Ekanathji ase vaaky rahile.

Mee yaa najarchuki saathi aatyantik manaapaasoon maafi magat aahe Yashwant. Aapalya adaraneey vadilanchyaa baabteet anavadhaanaane typo error mhanoon ka hoinaa pan mase khane asa ullekh jhala..
Sorry again..

चिंतामणी's picture

30 Nov 2010 - 12:08 am | चिंतामणी

या धाग्याच्या लेखकांस विनंती: कमी वासाचे मासे सुचवा एकनाथजींना प्रथमावताराच्या प्रथमाहारासाठी..

या धाग्याच्या लेखकांस विनंती: कमी वासाचे आणि कमी काट्याचेमासे सुचवा यशंवतजीना प्रथमावताराच्या प्रथमाहारासाठी..

बिनवासाचे आणि कमी काट्याचे -

पापलेट, हलवा, मुडदुशा.

विजुभाऊ's picture

29 Nov 2010 - 12:16 pm | विजुभाऊ

मासे मांसाहारी नाहीत हो.
कुठल्याही बोंगाली बोंधूला विचारा तो हेच सांगेल.

चिंतामणी's picture

30 Nov 2010 - 12:09 am | चिंतामणी

फक्त बंगाल काय घेउन बसलात. माझ्या माहितीप्रमाणे युरोपात मासे "व्हेज सदरात येतात.

रविवारला सहा दिवस बाकी असताना..

छळ, दुष्टता, क्रौर्य..:-)

(आवडला लेख..)

मनीषा's picture

29 Nov 2010 - 11:58 am | मनीषा

बांगडा मस्तच गं

आमंत्रण स्विकारले आहे .

अवलिया's picture

29 Nov 2010 - 1:48 pm | अवलिया

ठार मेलो !

स्पंदना's picture

29 Nov 2010 - 8:49 pm | स्पंदना

सर्वांचे आभार.

यशवंत माझ्या मते सुरवात सुरमाईन करा. काय चव असते म्हणुन सांगु! माझा अतिशय आवडता मासा.

धमु खेकड्याची आठवण करुन दिल्याबद्दल निषेध!!

प्राजु's picture

29 Nov 2010 - 9:56 pm | प्राजु

कठीण आहे माझं. !
मलाही जरा धडे द्या रे... मासे खाण्याचे! :)

प्रकाश घाटपांडे's picture

30 Nov 2010 - 7:16 pm | प्रकाश घाटपांडे

भयालीदेवींकडे उत्त्तम धडा मिळतो या विषयावर.

मिसळभोक्ता's picture

2 Dec 2010 - 7:44 am | मिसळभोक्ता

हे हे हे.. चूक आहे.. अगदी चुकीची माहिती.

आम्हाला प्रत्यक्ष अनुभव आहे.

असे धडे वगैरे काहीही मिळत नाहीत, कारण की त्या बिजी असतात :-()

आग्रहाबद्दल सर्वांना थैंक्यू! :)
पहा बरं, उगाच बायका सुगरण असतात असा गैरसमज पसरवून ठेवलेला असतो ! कित्ती लोकांनी मस्त मार्गदर्शन केलं आहे.
अवांतरः
माशांची पाककृती टाकताना एखादीनं/एखाद्यानं तरी
मासे कसे खावेत? हे लिहीलंय का आजपर्यंत?
लिहा राव. आमच्यासारख्या हौशी मांसाहारींना फार फायदा होईल.

नंदन's picture

30 Nov 2010 - 5:41 am | नंदन

वा, वा, नुस्ते (कोकणीतला श्लेष अभिप्रेत ;)) फोटो बघूनच 'आमोद सुनासि आले'! आमटीची पाकृही मस्तच. बांगड्याच्या आमटीत तिरफळं घातली की एक वेगळा मिरमिरीत स्वाद येतो, तो मत्स्याहारींनी चुकवू नये असाच.

नगरीनिरंजन's picture

30 Nov 2010 - 6:13 am | नगरीनिरंजन

मस्त! कधी येऊ जेवायला?

आशिष सुर्वे's picture

30 Nov 2010 - 9:51 am | आशिष सुर्वे

अपर्णा तै..

तोडलंत!!
एकदम सट्टाक पाकृ..
कोकन्याला अजून काय हवंय हो.. भरलेला बांगडा, गरमागरम चुलीवरची भाकर अन् कडक कांदा.. बस्स.. स्वर्ग, स्वर्ग म्हणतात तो हाच!!

अपर्णा मी येते ग जेवायला तुझ्याकडे, बांगडा सांभाळुन ठेव.

स्पंदना's picture

30 Nov 2010 - 11:39 am | स्पंदना

या जागुताई अवश्य या!

प्राजु ,आशिष, न नि, नंदन तुम्ही पण या!

चिंतामणी's picture

30 Nov 2010 - 5:22 pm | चिंतामणी

या जागुताई अवश्य या!

प्राजु ,आशिष, न नि, नंदन तुम्ही पण या!

पार्शिलीटी केल्याबद्दल निषेध. इथे प्रतिक्रीया लिहीणार बरेच जण आहेत. पण निमंत्रण फक्त मोजक्यांनाच (कोण म्हणाले शेलक्यांना????????)

निषेध निषेध निषेध

आशिष सुर्वे's picture

30 Nov 2010 - 7:20 pm | आशिष सुर्वे

चि. भाऊ..

वाद निर्माण केलात तर्र अपर्णा तै त्याच भरलेल्या बांगड्याच्या काट्याने हाणेल हं.. जपून..

:)

जागुतै आणि अपर्णाचे हे धागे पाहून मी मत्स्याहारी होणार लवकरच!;)

आचारी's picture

30 Nov 2010 - 9:53 pm | आचारी

११/२ ह्ळद म्हणजे ५.५ चमचे का? बाकी पा.क्रु मस्तच !! तोन्डाला पाणी सुटले ताई

बेसनलाडू's picture

30 Nov 2010 - 10:35 pm | बेसनलाडू

११/२ म्हणजे दीड चमचे (१+१/२) असावे.
(अंदाजपंचे)बेसनलाडू
५.५ चमचे हळदीने बांगड्याला बेसनलाडवाचा रंग येईल :) चव तर वेगळाच मुद्दा!
(पिवळाधमक)बेसनलाडू

संदीप चित्रे's picture

1 Dec 2010 - 7:43 pm | संदीप चित्रे

हे फोटू आणि रेसिपी म्हणजे त्रास आहेत, अपर्णा !
एकदा इष्ट कोस्टाची वारी करून इथल्या बांगड्यांची रवानगी इष्ट कोस्टावरच्या मिपाकरांच्या पोटात कर :)

दिपक's picture

2 Dec 2010 - 11:49 am | दिपक

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

10 Dec 2010 - 7:06 am | निनाद मुक्काम प...

पाणी सुटले जिभेला
बाकी एवढ्या १०/ १२ मिरच्या युरोपियन पूर्ण वर्षात खात नाही .त्यामुळे आमची बॉंब

विजुभाऊ's picture

4 Aug 2013 - 8:15 pm | विजुभाऊ

माताय..........
इकडे अफ्रीकेत हे असले माशे मिळतात कुठे ते पहायला हवे.
इकडे रिबलेट्स वगैरे मिळते पण ते आपल्यासाठी खाद्य या सदरात कुठे मोडते?

प्रभाकर पेठकर's picture

4 Aug 2013 - 9:03 pm | प्रभाकर पेठकर

विजुभाऊ रिबलेट्स हा मटणाचा प्रकार आहे. माशांचा नाही. गुगलून पाहता असेच कांहीसे सापडले. कोवळ्या बोकडाच्या पाठीच्या बरगड्यांचे तुकडे ह्यात वापरतात. कधी खाल्ले नाहीत पण बार्बिक्यू मेनूतील फेवरीट आयटम दिसतो आहे.

त्रिवेणी's picture

4 Aug 2013 - 9:27 pm | त्रिवेणी

अवांतर-
परवा लालन सारंग यांच्या मासेमारी त फिश खाल्ले, मस्त मस्तच होते

भावना कल्लोळ's picture

5 Aug 2013 - 3:09 pm | भावना कल्लोळ

अर्पे, मार हि डालोगे ….