स्वाभिमानाचे अग्निकुंड पेटलेच पाहिजे...

अप्पा जोगळेकर's picture
अप्पा जोगळेकर in काथ्याकूट
26 Nov 2010 - 3:10 pm
गाभा: 

सदर लेख मी लिहिलेला नाही. खूप महिन्यांपूर्वी तो मला एका ढकलपत्रातून आला होता. आज श्री. सुधीर काळे यांचा धागा पाहिल्यावर त्या लेखाची आठवण झाली. तो लेख जसाच्या तसा इथे देत आहे. संपादक मंडळाला हे आक्षेपार्ह वाटत असेल तर हा धागा उडवावा.
- अप्पा जोगळेकर

आई तुळजाभवानीच्या मूर्तीवर घण बसले, तेव्हा भाल्याच्या टोकावर अफझलचं मुंडकं नाचेपर्यंत या महाराष्ट्रात कोणी स्वस्थ बसले नव्हते. संभाजी
महाराजांच्या देहाचे तुकडे तुकडे झाले, तेव्हा घराघरातून तलवार उठली.
औरंग्याला इथेच गाडेपर्यंत शांतता नव्हती. लालाजींच्या अंगावर
यमदूतांच्या लाठया बरसल्या, तेव्हा इंग्रज साम्राज्याच्या शवपेटीवर खिळे
ठोकणारे कैक मर्द निपजले... मग आत्ताच का सगळं शांत शांत? आमच्या
श्रध्दास्थानांवर आघात होतात, आणि आम्हालाच सगळे म्हणतात 'शांत रहा, शांत रहा'. जाहीरपणे आम्हाला बांगडयाच भरायला सांगितले जाते. का?
आम्ही काय नेभळट आहोत का? की आम्ही दूधखुळे आहोत - उगी उगी हं बाळा, तुला नाय कोनी माल्लं, गप गप... असं म्हटलं की आम्ही गप्प! हाताची घडी तोंडावर बोट?
आम्ही जवान आहोत, मर्द आहोत... रक्तात शिवाजी सळसळतो आमच्या, 'शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा' म्हणणारा भीम सळसळतो! आमच्या हातात भवानी आहे, पण डोळयावर पट्टी आहे. आम्हाला शत्रू कोण, हेच कळत नाही. गनिम कावा साधून जातो, आणि मग आम्ही मेणबत्त्या घेऊन मूक मोर्चे काढतो. असल्या भेदरट मेणबत्त्यांच्या उजेडात दुष्मन दिसत नाही. त्यासाठी डोक्यात उजेड पडावा लागतो आणि छाती निधडी असावी लागते. आमच्यात आणखी एक प्रकार आहे. राग आला की, आम्ही शेजार पाजारच्यांना ठोकून काढतो, दंगे करतो. खूप भुई थोपटतो पण साप मरत नाही.
मीडिया काहीही सांगतो, आणि आपण ऐकतो? कोणी म्हणतं इस्लामी अतिरेकी, तर कोणी म्हणतं दहशतवाद्याला धर्म नसतो... सुटका झालेल्या दोन तुर्की नागरिकांनी सांगितलं, की आम्हाला अतिरेक्यांनी आमचा धर्म विचारला, आम्ही मुसलमान म्हणून आम्हाला सोडले, सोबतच्या तीन आर्मेनियन ख्रिस्ती महिलांना ठार मारले. पकडलेला अतिरेकी सांगतो की, मी मदरशात शिकलो. आमचे गृहमंत्रालय म्हणते, की उत्तर सीमेवर मदरसे वेगाने वाढतायत... हे सगळं काय आहे? आम्हाला उत्तरं मिळालीच पाहिजेत. माझे मुसलमान मित्र-मैत्रिणी आहेत, ते अतिरेकी नाहीत. आमचे लाडके माजी राष्ट्रपती, आमचे गायक, संगीतकार, खेळाडू, परमवीरचक्र मिळवलेले शहीद सैनिक - हेही मुसलमान आहेत. पण ते जिहादी नाहीत... मग हा जिहाद काय आहे, मदरसे काय आहेत, या विषवल्लीचं मूळ कुठे आहे? आम्हाला उत्तरं मिळालीच पाहिजेत. उत्तरं मागण्याचा अधिकार हे लोकशाहीतले पहिले हत्यार आहे. आहे ना खुमखुमी? मग उचला हे हत्यार!
तीस-पस्तीस वर्षांपूर्वी इस्राएलच्या खेळाडूंची ऑलिंपिक मध्ये हत्या झाली होती. पुढच्या दोन वर्षात ही हत्या करणाऱ्या प्रत्येक अतिरेक्याला जगाच्या कानाकोपऱ्यातून शोधून काढून इस्राएलच्या कमांडोंनी ठार मारले. दुसऱ्या महायुध्दात हजारो ज्यूंची हत्या करणाऱ्या ऍडोल्फ आइकमनला इस्राएलच्या हेरांनी परदेशातून शोधून उचलून आपल्या देशात आणला, त्याच्यावर खटला चालवला, आणि त्याला देहदंड दिला. टीचभर देश आहे इस्राएल. पण त्यांचा राष्ट्रीय स्वाभिमान जागा आहे. कोण आहेत त्यांचे नेते? आणि मग आमचेच असे कसे?
आम्ही मतदानाच्या दिवशी पिकनिकला जातो, किंवा आमची मतं विकतो, किंवा १८ पूर्ण झाली तर नावच नोंदवत नाही... मत देताना रस्ते आणि पाणी एवढेच मुद्दे दिसतात आम्हाला, मग निवडणूक पंचायतीची असो नाही तर लोकसभेची! लोकशाहीत प्रजेच्या लायकीवर किंवा नालायकीवर राजा ठरतो. आम्हाला स्वाभिमानी निडर नेतृत्त्व हवे असेल, तर जागरूक राहिले पाहिजे. आत्ताच्या नेत्यांमध्ये सगळेच बुणगे दिसत असतील, तर स्वत:च राजकारणात उतरले पाहिजे.
शांत रहा, शांत रहा... असं कोणीही सांगितलं तरी गप्प बसण्याची वेळ नाही
आता. लोकशाहीतली हत्यारं उचलून लढलं पाहिजे. सूडाच्या अग्निकुंडात आपल्या अभिमानाची आहुती पडली आहे. संसदेवर हल्ला झाला आहे, ताजची राख झाली आहे... इतक्या आहुती देऊनही जर स्वाभिमानाची भवानी जागी होणार नसेल, तर आमचे राष्ट्र नष्टच होणार असेल.
शंभर शिशुपालांचे हजार अपराध भरलेत, जनतेतल्या जनार्दना - उठ!

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

26 Nov 2010 - 3:19 pm | नितिन थत्ते

हा लेख राहतो का उडतो ते पाहतोय.

>>मत देताना रस्ते आणि पाणी एवढेच मुद्दे दिसतात आम्हाला, मग निवडणूक पंचायतीची असो नाही तर लोकसभेची!

परवाच सर्वांनी "विकास महत्त्वाचा असे मतदारांनी आता ठरवले आहे" म्हणून बिहारच्या मतदारांचे कौतुक केलेले पाहिले.

रन्गराव's picture

26 Nov 2010 - 3:25 pm | रन्गराव

हा लेख राहतो का उडतो ते पाहतोय.
हे वाचून मला तुमचा आयडी रहातोय का उडतोय त्याची काळजी वाटाया लागली आता!

नितिन थत्ते's picture

26 Nov 2010 - 3:29 pm | नितिन थत्ते

माझ्या आयडीची काळजी करण्यापेक्षा देशात स्वाभिमान कसा जागृत करावा याची काळजी करा. :)

छोटा डॉन's picture

26 Nov 2010 - 3:33 pm | छोटा डॉन

श्री. थत्ते ह्यांच्या आयडीची काळजी रन्गरावांनी करु नये असे सांगतो.
त्यांनी आधी 'स्वाभिमान जागृतीचे' बोलावे, एकदा तो जागृत झाला की त्यावर असे १काय पण १००० आयडी कुर्बान :)

- छोटा डॉन

रन्गराव's picture

26 Nov 2010 - 3:40 pm | रन्गराव

एकदम माझ्या मनातल बोलतात थत्ते साहेब. तुमाला हेच सांगायच होतं जरा शब्द घावले नाहीत एवढ्च.
दुरूस्ती करून परत - लेखाची काळजी करण्यापेक्षा देशात स्वाभिमान कसा जागृत करावा याची काळजी करा.

शब्द सुचवल्याबद्दल धन्यवाद!

काय अप्पा कुणाला उठवताय तुमी? ए. सी. मध्ये कसला निवांत बसलोय मी. आनी काय तुमी स्वाभिमानाचे चटके घ्यायला सांगताय. प्रगती, स्थैर्य, अहिंसा ह्यांचा महत्व कधी कळनार तुमासनी?

ये वक्त नही है लढनेका,
ये वक्त हे डॉलर कमानेका,
घर का EMI भरनेका,
चान्स मिला तो ऑनसाईट जानेका,
दुनिया शांती संदेश देनेका,
ओबामाके साथ हात मिलानेका,
राहूलबाबा के साथ सपने देखनेका,
राजके साथ अपने ही लोगो को मारणेका,
॑अडवाणीके साथ मंदीरपर कलटी मारणेका,
फिरभी GTalk status ;"मेरा भारत महान, " यईच लगानेका!

आम्ही सज्जन भोळे बापडे लोक हाये, आमासनी हानामार्या शिकवू नगा!

छोटा डॉन's picture

26 Nov 2010 - 3:29 pm | छोटा डॉन

>>ए. सी. मध्ये कसला निवांत बसलोय मी.
+१, हेच म्हणतो.
आम्ही इथे छानपैकी ए.सी.त बसलो आहोत, गाणी ऐकत आहोत, कॉफी पित आहोत.
ऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑ .... कसला मस्त कंटाळा आला आहे.

>>आनी काय तुमी स्वाभिमानाचे चटके घ्यायला सांगताय. प्रगती, स्थैर्य, अहिंसा ह्यांचा महत्व कधी कळनार तुमासनी?
होय ना, आम्हाला 'स्वाभिमान' म्हणजे काय अज्याबात कळत नाही.
इनफॅक्त तो कशाशी खातात हे ही माहित नाही.

कृपया रन्गराव ह्यांनी 'स्वाभिमान' म्हणजे नक्की काय हे आम्हाला सम्जावुन द्यावे.
तसेच स्वाभिमान समजण्यासाठी ए.सी. चालत नसेल तर ते ही कळवावे म्हणजे आम्हाला योग्य ती सोय करता येईल, बाकी इतर आवश्यक बाबीही समजुन द्याव्यात.
एकदा हे समजले की पुढे यज्ञकुंड किंवा अग्नीकुंड जे काय आहे ते पेटवायला हरकत नाही असे सांगतो.

- छोटा डॉन

रन्गराव's picture

26 Nov 2010 - 3:36 pm | रन्गराव

>>कृपया रन्गराव ह्यांनी 'स्वाभिमान' म्हणजे नक्की काय हे आम्हाला सम्जावुन द्यावे.

गरीबाची थट्टा करता क राव? आमासनी कळाल असतं तर लेखच लिवला नसता होय लांबलचक! आजकाल तर असा वाटाया लागलय, स्वाभिमान देवासारखा असतो. सगळे सांगत्यात देव असतो म्हणून पण दिसत तर कधीच नाय. स्वाभिमानाच पण असच झालय, सगळे म्हण्त्यात आमाला हाय म्हणून पण मला कसा नाय घावला अजून कुणास ठोस. जरा डोक कमीच दिलेल दिसतय देवान मला! बर बाकी कुणाला माहीती अस सांगा बाबानू. देव तुमच्या पोराबाळांच बर करेल ( अजून झाली नसतील तर व्हायची सोयबी करेल ;)

छोटा डॉन's picture

26 Nov 2010 - 3:43 pm | छोटा डॉन

>>आजकाल तर असा वाटाया लागलय, स्वाभिमान देवासारखा असतो.
आत्ता आलात ना मुद्द्यावर !
ही व्याख्या पटण्यासारखी आहे, संकटात किंवा अडचणीच्या परिस्थीत त्या अदृष्य देवासारखा ( ह्याला मानत नसाल तर अजुन काही ) तो सदैव तुमच्या पाठीशी असतो व तोच तुम्हाला त्यातुन मार्ग काढण्यासाठी धैर्य देतो.
असो.

बाकी ते ए.सी. वगैरेची काळजी सोडा बरं का, क्रांती किंवा विकास नेहमीच रक्त वाहुन आणि घाम गाळुन करावा लागतोच असे नाही. मात्र आपण असे वारंवार हिणवल्याने एक दिवस ए.सी. आणि नॉन ए.सी. गटात संघर्ष उभा राहिला तर त्याचे सर्वात जास्त पाप आणि जबाबदारी तुम्हा लोकांना उचलावी लागेल.

* तुम्ही लोक : जे वारंवार ए.सी. वाल्यांच्या क्षमतेवर आणि राष्ट्रप्रेमावर शंका घेतात आणि इतर नॉन वर्गात ही भावना हळुह़ळु मजबुत करण्यास सहाय्य करतात. बाकी असो.

- छोटा डॉन

अवांतर : माझा अशा विषयांवारचा कोणताही प्रतिसाद थट्टा करणारा नसतो, काही वेळा त्यात 'तिरकसपणा' असतो इतकेच.

रन्गराव's picture

26 Nov 2010 - 3:56 pm | रन्गराव

बाकी ते ए.सी. वगैरेची काळजी सोडा बरं का, क्रांती किंवा विकास नेहमीच रक्त वाहुन आणि घाम गाळुन करावा लागतोच असे नाही. मात्र आपण असे वारंवार हिणवल्याने एक दिवस ए.सी. आणि नॉन ए.सी. गटात संघर्ष उभा राहिला तर त्याचे सर्वात जास्त पाप आणि जबाबदारी तुम्हा लोकांना उचलावी लागेल.

१००% मान्य!

* तुम्ही लोक : जे वारंवार ए.सी. वाल्यांच्या क्षमतेवर आणि राष्ट्रप्रेमावर शंका घेतात आणि इतर नॉन वर्गात ही भावना हळुह़ळु मजबुत करण्यास सहाय्य करतात. बाकी असो.

जरा स्पष्टीकरण देतोच आता. मी ही ए. सी वालाच आहे गेल्या पाच वर्षापासून, आणि जे काही वर लिहिलं आहे ते स्वतःला आधी लागू आहे ह्याची जाणीव आहे. स्वतःला आरशात आणि आजूबाजूच्या बहुतांशांना( सगळ्यांनाच नाही, अपवाद कमी असले तरी आहेत) बघितल्यावर जे स्पष्ट दिसतं ते नाकारू शकत नाही मी, कदाचित बर्याच जनांना आवडल नाही तरी.

इंटरनेटस्नेही's picture

26 Nov 2010 - 3:42 pm | इंटरनेटस्नेही

बीअर प्या, चिल रहा.. कशाला टेन्शन घेताय मित्रांनो?

चिलॅक्स! = चिल + रिलॅक्स!

गवि's picture

26 Nov 2010 - 4:09 pm | गवि

काय करावं..

गांधीवादी's picture

26 Nov 2010 - 4:35 pm | गांधीवादी

अप्पाजोगळेकर काका, काळजी करू नका,
खूप खूप अवघड आहे. पण प्रयत्न चालू आहेत.

काहीही विधायक करायला हाती घेतले कि हजार अडचणी आल्याच म्हणून समजा. पण हे मन काही ऐकत नाही. सुर्योदयापुर्वीच पुन्हा नव्याने, नवी लढाई लढायला तयार होते. (आपल्या सारख्यांचे असे लेख वाचूनच असेल होत असेल कदाचित. )

परिकथेतील राजकुमार's picture

26 Nov 2010 - 4:47 pm | परिकथेतील राजकुमार

अग्निकुंड पेटले की सांगा राव कोणीतरी, एक शिग्रेट पेटवुन घेतो त्यावर.

अवलिया's picture

26 Nov 2010 - 5:32 pm | अवलिया

म्या बी योक बीडी पेटवुक म्हंतो..

नगरीनिरंजन's picture

26 Nov 2010 - 4:50 pm | नगरीनिरंजन

ज्याने त्याने स्वतःचे काम मनःपूर्वक करणे पुरेसे आहे. मग काहीही पेटवायची गरज पडणार नाही असे वाटते.

स्वाभिमान आता थोडा बाजूला ठेऊया. रस्ते, पानी, विज इ. विकासातच आपला “विकास” आहे हे बिहारच्या निवडणुकींनंतर स्वाभिमानवाल्यांनाबी यकदम पटलंय. आता विकासासाटी लोकं जात-धर्म पन इसरायला लागालेत म्हणे. चांगलंच आहे. स्वाभिमान बाळगून खायाचं काय? विकासात खायाची भरपूर संधी हाय. ७०/८० टक्के खायाचं २० टक्के विकास करायचा. लोकानचं भलं करायचा हा नवीन फंडा हाय. म्हणजे, नेत्यांचं भलं झालं की लोकांनला बी बरं वाटतंय. तुमी खावा पन आमालाबी थोडं द्यावा येवडंच लोकानला हवय. तुमाला खायाला दिलं नाय तर आमाला थोडंबी मिळणार नाय. म्हनून निवडणूकीत जरूर तुमाला निवडून देऊ. सौदा पक्का! आता निवडनुकीत दुसरं काय र्‍हायलंय? लोकशाही वगैरे ? पारदर्शकतेच्या...............ड. कुल्फी खावा, चिल र्‍हावा.(बीअर परवडत नाय).

साला आमचे ढकलपत्र आता नुसते विझलेले कोळसे झाले आहे. नवीन ढकलपत्र आयडी तयार करावा लागतोय कि काय .असे मेल आम्हाला कधी आलेच नाहीत.

अतिषय जबरदस्त शब्दात मुळ लेख आहे .. खरेच अंगात जोर निर्मान करतो ...

जणतेला असा जोर देणारे ही आता कोणी उरत नाहि आणि दिला तरी आपल्याच मश्गुलीत सगळे असतात ...

मेरा भारत महान आहे हे कधी कधी अजीबात वाटत नाही ..

अवांतर :
चर्चे वर उगाच टाकला हा छानसा धागा ..

अविनाशकुलकर्णी's picture

26 Nov 2010 - 7:33 pm | अविनाशकुलकर्णी

खरेच अंगात जोर निर्मान करतो ...

२७ तारीख सुरु झाली कि लोक सारे विसरति.

ईन्टरफेल's picture

26 Nov 2010 - 9:02 pm | ईन्टरफेल

वाचतोय मस्त आहे ले़ख !
(मुर्दाड मराठा)

ठाणा स्टेशनच्या बाहेर आज २६/११ साठी मेणबत्त्या लावल्या होत्या.... आणि बॅक ग्राउंडला स्टेरिओवर गाणे लावले होते....

दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल
साबरमती के संत तूने कर दिया कमाल...

आता एवढी विनोद बुद्धी असताना कुठलं अग्निकुंड पेटवणार?

रणजित चितळे's picture

27 Nov 2010 - 12:35 pm | रणजित चितळे

मत पटले.

राष्ट्रव्रत घ्या

आम्ही मतदानाच्या दिवशी पिकनिकला जातो, किंवा आमची मतं विकतो, किंवा १८ पूर्ण झाली तर नावच नोंदवत नाही...

सर्व पक्षांचे लोक भ्रष्ट असताना कोणालाही मतदान केले किंवा नाही केले तर काय फरक पडतो?

लोकशाहीत प्रजेच्या लायकीवर किंवा नालायकीवर राजा ठरतो.

थोडी सुधारणा: लोकशाहीत "बहुसंख्य" प्रजेच्या लायकीवर राजा ठरतो. राष्ट्राचे चारित्र्य, स्वाभिमान हा लोकांच्या चारित्यावर अवलंबून असते. आपल्या बाबतीत ते हजारो वर्षांपूर्वीच लुप्त झाले आहे.
थोड्या लोकांकडे हे गुण असतील, तर त्याचा देशाला फायदा होण्याऐवजी इतर नालायक बहुसंख्यांचाच त्यांना त्रास होतो.

आम्हाला स्वाभिमानी निडर नेतृत्त्व हवे असेल, तर जागरूक राहिले पाहिजे. आत्ताच्या नेत्यांमध्ये सगळेच बुणगे दिसत असतील, तर स्वत:च राजकारणात उतरले पाहिजे.

अव्यवहार्य. तुम्ही स्वत: हे करून पाहिले आहे का ?

अप्पा जोगळेकर's picture

28 Nov 2010 - 9:07 am | अप्पा जोगळेकर

अव्यवहार्य. तुम्ही स्वत: हे करून पाहिले आहे का ?
हा लेख मी लिहिलेला नाही हे मी सुरुवातीसच लिहिले आहे. तुमचा प्रश्न या लेखाच्या लेखकाला उद्देशून असेल तर ठीक आहे.

हो. लेखकास उद्देशून आहे.
त्याने किंवा त्याचे निकटवर्तीय, समर्थक किंवा कुठल्याही ज्ञानी /अनुभवी व्यक्तीने उत्तर दिले तरी चालेल.

गांधीवादी's picture

28 Nov 2010 - 10:20 am | गांधीवादी

जुन्या काळाच्या कथांमध्ये देवाधिदेव सुद्धा इतक्या पटापट गायब होत नसत, पण आजच्या कलियुगात मात्र गायब होणे आणि गायब करणे हे एक जब्बरदस्त हत्यार राजकारण्यांनी वापरायला सुरुवात केलेली आहे.

आज आदर्शाच्या घोटाळ्याचे महत्वपूर्ण कागदपत्र गायब आहेत,
उद्या CWG ची कागद पत्रे, परवा 2G स्पेक्ट्रम ची कागदपत्रे, एवढे कमी तर त्या मागील हि माणसे सुद्धा गायब होतील.

नाहीतरी चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी करून दुसर्या देशात जाऊन निवांत राहत असलेली काही मंडळी ऐकिवात आहेतच.

नव्या राजकारणाचे नवे हत्यार : गायब.

अवांतर : आमच्या कंपनीत आम्ही आमच्या कामाचे काही कागदपत्रे गुणवत्ता विभागास तत्परतेने उपलब्ध होण्यासाठी ती कागदपत्रे संगणकावर उतरवून घेतो. त्याने एक फायदा होतो, हि कागदपत्रे लागलीच उपलब्द होतात आणि ती साठवून ठेवण्याची जागाही वाचते. बर हे करून ती लाखो कागदपत्रे वर्षानुवर्षे एका (ठीक दर्जाच्या) तबकडीत सामावून ठेवता येतात. अशी संकल्पना आमच्या कंपनीत राबविणे सुरु केल्यामुळे मला त्या महिन्याचे 'निरंतर सुधार' हे पारितोषिक देखील मिळाले होते.
Continuous improvement award : For storing the check lists in soft copies.

एक जोक : आजचे युग माहिती तंत्रज्ञानाचे आहे. जनतेच्या हातात माहिती अधिकाराचे शस्त्र आहे, पण माहिती गायब आहे.

तिमा's picture

28 Nov 2010 - 12:46 pm | तिमा

काहीतरी पेटवायचेच असेल तर स्वतःची शेपूट पेटवा. त्याला कोणाचीच हरकत असणार नाही. एकदा ती पेटली की तुम्हाला काहीतरी करावेच लागेल.

तिमा's picture

28 Nov 2010 - 12:51 pm | तिमा

रद्द