खोल खोल खोली !

स्वैर परी's picture
स्वैर परी in काथ्याकूट
23 Nov 2010 - 9:03 pm
गाभा: 

सहज एके दिवशी माझ्या कार्यलयातिल सहकार्र्याशी त्याच्या नवीन घराबद्दल बोलत असताना मी त्याला म्हटले, "आतल्या खोलीत कोण राहणार मग?".. तर माझ्या या प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजि तो जोरात केकाटलाच! "ई..ई.. खोली काय?" मला समजेचना कि हा का ओरडला ते! मी त्याला कारण विचारले असता तो मला म्हणाला , " खोली हा शब्द मराठित फक्त पाण्याची खोली किंवा तत्सम संदर्भात वापरतात. घराच्या संदर्भात नाहि वापरत! " मग नक्कि खरे काय किंवा खोटे काय हे कळेच ना!
म्हणुनच यावर जाणकरांची कय मते आहेत, हे जाणुन घेण्यासाठी हा धागा सुरु केला आहे! तरी आपण त्यावर थोडा प्रकाश फेकुन मारावा हि विनंती . ;)

प्रतिक्रिया

बहुधा तुमचा मित्र वायझेड असेल.

संदीप चित्रे's picture

23 Nov 2010 - 10:11 pm | संदीप चित्रे

असंच म्हणतो...
आता तुम्ही ही माहिती त्याला देऊन त्याच्या शब्दकोष वाढवा...
<<'आपल्याला माहीत नाही' हेच बर्‍याच जणांना माहिती नसतं>>
ह्या वाक्यासाठी तुमच्या मित्राचे उद्गार म्हणजे योग्य उदाहरण आहेत :)

घराला खोल्या नसतात तर काय रूम्स असतात?

हो, रुम्सच असू शकतात, फ्लावर (भाजी) असतो ना तसेच.

प्रियाली's picture

23 Nov 2010 - 9:47 pm | प्रियाली

मुंबईचे चाळसंस्कृतीला सरावलेले लोक अख्ख्या घरालाच खोली म्हणतात.

"मग येऊ काय तुमच्या खोलीवर?" म्हणजे "येऊ का तुमच्या घरी?"

यकु's picture

23 Nov 2010 - 9:51 pm | यकु

खोलीला खोलीच म्हणतात हो मराठीत.
आणि खोली खोल नसते काय?
आमच्या शेजार्‍यांच्या ग्राऊंड लेव्हलपासून खाली असलेल्या खोलीत पावसाचं पाणी शिरलं.
त्याला आत जाऊन वस्तू बाहेर काढ म्हट्लं तर तो म्हणे "खोली फार खोल आहे!"

ग्रामीण बोलीत आतल्या खोलीला मागची वढ असा एक शब्द आहे.

बैठक, दिवाणखाणा हे शब्द आहेत पण ते वेगळे.

"तुम अपने कम्रे में जाओ" हे कितीही वेळा ऐकलं तरी खोलीला कम्रा म्हणावं वाटत नाही.

मनीषा's picture

23 Nov 2010 - 10:02 pm | मनीषा

घरामधे खोली असते आणि अपार्टमेन्ट मधे रूम असते ..

मी एकदा म्हणले कि, आमच्या वाडयात बरेच भाडेकरु होते ... तर लोकांना माझी भाषा सुधारण्याची गरज भासू लागली .

गोगोल's picture

23 Nov 2010 - 10:33 pm | गोगोल

मित्राला या विषयातील खोली जरा कमीच दिसती आहे.

अविनाशकुलकर्णी's picture

23 Nov 2010 - 10:40 pm | अविनाशकुलकर्णी

खोली यास खालील संस्कृत शब्द आहेत........
कक्षा
अवकाश
कोष्टक
कोष्ठ
कक्ष
प्रकोष्ठ
व्यचस्
निवेशन
वासगृह

हे पर्याय त्त्याला देवुन त्याची बोलति बंद करा

मी नवीन ब्लॉक घेतला तेव्हा माझी आजी म्हणाली होती "छान आहे हो तुझी खोली".. हे ऐकताना मलासुद्धा जरा कसंसंच झालं होतं! कदाचीत खोली म्हंटलं की माझ्या डोळ्यापुढे चाळीतल्या छोट्या छोट्या खोल्यांची घरं उभी राहतात त्यामुळे असेल.

घरातली लादी पुसणे ह्याला 'जागा पुसणे' हा अशाच संदर्भातला एक वाक्प्रचार. मी माझ्या बायकोच्या तोंडून ऐकला तेव्हा मला विचित्र वाटला होता.. (आता वाटत नाही.. रोज रोज "ऐकायला" लागतो ना!:) )

नितिन थत्ते's picture

23 Nov 2010 - 10:55 pm | नितिन थत्ते

मित्राला "आतल्या गाळ्यात कोण राहणार मग?" असे विचारावे. किंवा "पण मी घरासंबंधी बोलत नाहीये, तुझ्या गाळ्यासंबंधी बोलत आहे" असे म्हणावे. :D

पुष्करिणी's picture

23 Nov 2010 - 11:23 pm | पुष्करिणी

तुमचे मित्र त्यांच्या मराठी भाषेत खोलीला काय म्हणतात ?

यकु's picture

23 Nov 2010 - 11:36 pm | यकु

तुम्ही वकील आहात काय?

सुनील's picture

23 Nov 2010 - 11:47 pm | सुनील

महालात राहणारा तुमचा हा मित्र कदाचित दालन हा शब्द वापरत असेल! आता दालनाला खोली म्हणायचं म्हंजे कैच्या कैच, नै का!!

बापरे! तुमच्या सहकार्‍याचे म्हर्‍हाटीचे ज्ञान पाहून काय म्हणावं सुचत नाही.
असल्या माणसासाठी आम्ही आमचा बहुमोल प्रकाश का म्हणून फेकायचा?;)

शिल्पा ब's picture

28 Nov 2010 - 12:53 am | शिल्पा ब

समाजसेवा करा की थोडी!!
आमच्याकडुन थोडी सेवा : म्हर्‍हाटी नाही तर मराठी
आता तुमची पाळी

तिमा's picture

24 Nov 2010 - 8:02 pm | तिमा

त्याला राज ठाकरेकडे पाठवा, म्हणजे खोलीच काय आणखी बर्‍याच मराठी शब्दांचे अर्थ समजतील.

स्वैर परी's picture

24 Nov 2010 - 9:48 pm | स्वैर परी

मिपाकरांच्या प्रतिसादांवरुन तरी हे कळतय कि 'खोली' हा शब्द घराच्या संदर्भात वापरणे चुकीचे नाहिए.
धन्यवाद!

धमाल मुलगा's picture

24 Nov 2010 - 9:54 pm | धमाल मुलगा

तुमच्या त्या मित्रवर्यांना हल्ली मराठी वर्ड्स रिमेंबर करायला जरा डिफिकल्टच जात असेल. त्यामुळं असं झालं असेल गडबडीत. ;)

खोली हाच शब्द योग्य.पिटिशन ग्रँटेड.रूल अॅब्सोल्यूट .नो कॉस्ट्स.

अवांतर: खोली आणि त्यापेक्षाही रूम या शब्दांना उगीच स्कॅंड्युलस वास येतो.
माझ्या घरी येतेस? असं मैत्रिणीला विचारणं आणि
माझ्या रूमवर येतेस..
असं विचारणं.


यकु's picture

25 Nov 2010 - 11:16 am | यकु

माझ्या घरी येतेस? असं मैत्रिणीला विचारणं आणि
माझ्या रूमवर येतेस..
असं विचारणं.


सहमत.

स्वैर परी's picture

25 Nov 2010 - 8:47 pm | स्वैर परी

घर आणि रूम या दोघांत बराच फरक आहे! माणस फक्त झोपण्यापुरती येतात ती रूम ! आणि जिथे संवाद आणि विचारांची देवाण घेवाण होते ते घर! :)
हा फरक मला घरापासुन लांब राहायला आल्यानंतर काही दिवसांतच कळला!
पण अर्थातच घर म्हणणे रूम म्हणण्यापेक्शा केव्हाहि चांगलेच! :)

शैलेन्द्र's picture

27 Nov 2010 - 5:14 pm | शैलेन्द्र

"घर आणि रूम या दोघांत बराच फरक आहे! माणस फक्त झोपण्यापुरती येतात ती रूम ! आणि जिथे संवाद आणि विचारांची देवाण घेवाण होते ते घर! Smile"

शेवटी तुंम्ही कीती वेळ राहता यापेक्षा कोणाबरोबर राहता ते महत्वाच.. माझ्या नसलेल्या आमच्या हॉस्टेल "रुम" वर जी देवानघेवाण व्हायची ती पाहता मी तरी हि व्याख्या करणार नाही.

विजुभाऊ's picture

26 Nov 2010 - 12:04 am | विजुभाऊ

माझा एक मित्र मुलुंड्ला रहातो. तो नेहमी घराला रूम म्हणतो .
विचारताना तो विचारतो तुझा रूम किती बी एच के चा आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

27 Nov 2010 - 5:36 pm | परिकथेतील राजकुमार

आमच्याकडे 'खोलीवर जाणे' हा शब्दप्रयोग फारच वेगळ्या अर्थाने वापरतात.

शिल्पा ब's picture

28 Nov 2010 - 12:56 am | शिल्पा ब

तुमची भाषासुद्धा वेगळीच

सद्दाम हुसैन's picture

28 Nov 2010 - 1:54 am | सद्दाम हुसैन

सुंदर विचार .... :)

अवलिया's picture

28 Nov 2010 - 11:07 am | अवलिया

चालायचेच !!