ही कला की विकृती?

युयुत्सु's picture
युयुत्सु in काथ्याकूट
13 Nov 2010 - 9:41 pm
गाभा: 

dpreview.com या छायाचित्रणाला वाहिलेल्या पोर्टलवर नियमित पणे वेगवेगळ्या विषयावरील छायाचित्रे चॅलेन्ज म्हणुन आमंत्रित केली जातात. मला सध्या जाहिर केलेला 'खाटिक' हा विषय जरा विचित्र वाटला. क्रौर्य कलाकृतीचा अनेक वेळा विषय बनले आहे. पण खाटिक विषयावर अनेकानी पाठवलेली छायाचित्रे कलाकृती वाटली नाहीत.

http://www.dpreview.com/challenges/ChallengeSlideshow.aspx?ID=3599&Entry...

प्रतिक्रिया

हरकाम्या's picture

13 Nov 2010 - 10:45 pm | हरकाम्या

या चित्रांना कोणी कला म्हणत असेल तर तो इसम "डोक्याने पांगळा " किंवा त्याच्या कवटी नामक खोबणीत "सडका "
मेंदु असला पाहिजे. अत्यंत घाणेरडी विचारसरणी व सडकी कल्पना

राजेश घासकडवी's picture

13 Nov 2010 - 11:00 pm | राजेश घासकडवी

७ नंबरचा फोटो केवळ अप्रतिम. त्याच्या डोळ्यासमोर पातं असल्यामुळे त्या नजरेलाच धार आलेली आहे. पहिला, तिसरा व शेवटून तिसराही चांगले आहेत. बाकीचे काही फोटो यथातथाच.

एकेकाळी जवळपास संपूर्ण मानवजात हे काम करत असे. असे उद्योग आपण आता मध्यमवर्गीय मानसिकतेला धक्का देतात म्हणून दूर ठेवलेले आहेत. अमेरिकेत सुपरमार्केटमध्ये निर्जंतूक, प्लास्टिकमध्ये गुंडाळलेलं, रक्तविरहित मांस घेण्याकडे कल असतो. पण कलाकारांनीदेखील मध्यमवर्गीय मानसिकता स्वतःवर लादून घ्यावी म्हणणं धार्ष्ट्याचं वाटतं.

या चित्रांवरून तात्याचा मुडदा शिंपी हा लेख आठवला...

चिंतामणी's picture

14 Nov 2010 - 12:25 am | चिंतामणी

शंका का आली???????

१०० % विकृतीच आहे.

अनेक फोटोत रचना फोटोसाठी केली आहे हे समजते. ते नैसर्गिक वाटत नाही.

गुर्जींच्या मताशी विशेष करुन "कलाकारांनीदेखील मध्यमवर्गीय मानसिकता स्वतःवर लादून घ्यावी म्हणणं धार्ष्ट्याचं वाटतं" या वाक्याशी असहमत.

कुठल्याही कलेमुळे आनंद मिळायला पाहीजे. ओकारी येता कामा नये.

कला या हेडिंगखाली बसवणं योग्य का ते सांगता येत नाही.पण निदान जे लोक या प्रक्रियेचे फ़िनिश्ड प्रॉडक्ट चवीने रस्सा किंवा सुके अशा स्वरुपात ओरपतात त्यांना केवळ ती हिंसक क्रिया आणि त्यातल्या 'सुरुवातीच्या' स्टेप्स बघायला किळस येते किंवा विकृती वाटते हे सध्या ठीक पण पुनर्विचारेबल.फोटोग्राफी हे तर माध्यम. जे मांस खातात ते फोटो ऐवजी प्रत्यक्ष दृश्य बघू शकतील?की 'कशाला बघायचं? विकृत' असं म्हणतील? Buying at eating is normal? closing your eyes to gory things and thinking that they don't happen? Doesn't something that opens your eyes and make you sick qualify as art?
Is happiness, good feeling etc the only output that art should give?
Then the things that shake you should be named something else but not striked off as abnormal.
For pure veg people this is understandable and beyond question.

घासकडवी म्हणतात त्याप्रमाणे माझ्यातल्या मध्यमवर्गीयाला या छायाचित्रानी प्रथम धक्का दिल्यामुळे ही विकृती वाटली. पण माणसाची 'संवेदनशून्यता' टिपायचा प्रयत्न म्हणून ती कलाकृतीच ठरतात.

अवरंग's picture

14 Nov 2010 - 8:55 am | अवरंग

मेंदू सडका म्हणने ही देखील विकृती नाही काय ?

राजेश घासकडवी यांच्या प्रतिसादाशी सहमत.. ...

सहज's picture

14 Nov 2010 - 9:05 am | सहज

नथिंग स्पेशल!

नगरीनिरंजन's picture

14 Nov 2010 - 2:07 pm | नगरीनिरंजन

असेच म्हणतो. फोटो सुंदर किंवा बीभत्स वाटले नाहीत त्यामुळे फार कलात्मक नाहीत. विकृती नाही एवढं नक्की. जे आहे ते दाखवलंय.

स्वानन्द's picture

14 Nov 2010 - 9:51 am | स्वानन्द

बघवतच नाय राव.... पाणी आलं डोळ्यातून

पण याचा फोटो काढणं याला विकृती नाही म्हणता येणार. वर युयुत्सुंच्या आणी गगन्विहारींच्या प्रतीसादाशी सहमत.

मानवतावादी लोकाच्या अश्रुंची भिती वाटली.

प्रकाशछायाचित्रण म्हणजे केवळ सुंदर फुलापानांची, लॅंडस्केप्स वगैरे ह्यांची दृश्ये टिपणे नव्हे.
स्ट्रीट फोटोग्राफी किंवा एखाड्या दृश्याचं बोलकं चित्रण करणं हेही कौशल्यच आहे.
तुम्ही दिलेल्या दुव्यावरील छायाचित्रं पाहून तुम्हांला किळस आली असेल, तर ते छायाचित्रकाराचं कौशल्य. ह्यात विकृतीचा काय संबंध?

चिंतातुर जंतू's picture

14 Nov 2010 - 1:16 pm | चिंतातुर जंतू

इसवी सनाहून काहीशे वर्षांपूर्वीच्या भारतीय उपखंडात होऊन गेलेल्या भरतमुनींच्या रससिध्दांतामध्ये करुण, बीभत्स, भयानक हे रस आहेत. जर काहींना ही छायाचित्रं पाहून किळस येत असेल, किंवा बळी जाणार्‍या प्राण्यांविषयी करुणा वाटत असेल किंवा रक्तरंजिततेचं भय वाटत असेल, तर या छायाचित्रांतून रसनिष्पत्ती होते असं म्हणता येईल. त्यामुळे भारतीय परंपरेनुसार ही कला मानता येईल.

अविनाशकुलकर्णी's picture

14 Nov 2010 - 1:39 pm | अविनाशकुलकर्णी

मांसाहार सोडावा वाटतो