नाडिग्रंथांतील जन्मदिनांकाची नोंद - एक अभ्यास.

हैयो हैयैयो's picture
हैयो हैयैयो in काथ्याकूट
7 Nov 2010 - 6:28 pm
गाभा: 

नाडिग्रंथांतील जन्मदिनांकाची नोंद - एक अभ्यास.

वाचकमित्रहो, विशेषतः मिसळपावप्रेमींनो,

नमस्कार! ह्यापूर्वी मिसळपावावर नाडिग्रंथांविषयी बरेच लेखन होऊन गेलेले आहे, बर्‍याच चर्चा झडून गेल्या आहेत. त्यामध्ये एक तमिळभाषक आणि पुरातन तमिळभाषेचा अभ्यासक ह्या नात्याने आत्तापर्यंत कोणीही न चर्चिलेले विषयांस मी हाती घेतले हे आपणांस ठावूक आहेच.

नाडिग्रंथांमध्ये लेखन केलेले असते काय, असल्यास ते कोण्या लिपीमध्ये ह्या स्वत:स पडलेल्या प्रश्नाच्या उत्तरासाठी मी केलेल्या संशोधनामध्ये मला जे काही आढळले ते मी "कूटलिपी - एक विचार" ह्या शोधनिबंधात स्पष्ट केलेलेच आहे.

ह्या शोधनिबंधानंतर आंतरजालावरील उपक्रम, विशेषत: मिसळपावावरील तसेच माहितीतील अनेकांनी स्वत: होवून आपणा स्वत:च्या तसेच आप्तस्वकीयांच्या नाडिग्रंथांवरून लिहून काढलेल्या वह्या मजजवळ (नांवे उघड न करण्याच्या अटींवर) अभ्यासासाठी पाठवून दिल्या. त्या अनुषंगाने व्यक्तीच्या वह्यांमध्ये जन्मविषयक नोंद श्लोकाच्या रूपाने कशी मिळते, त्यांत काय सांगून येते, त्यांतून नाडिवाचक आपणांस आपला जन्मदिनांक कसा सांगतो, त्याबद्दल यंदाच्या उपक्रम दिवाळी विशेषांकामध्ये लिहिले आहे.

उपक्रम / मिसळपावावरील ज्या सदस्यांची उदाहरणे ह्या अभ्यासात घेतली गेली आहेत, ह्या सदस्यांना धन्यवाद!

वाचकांनी हा लेख वाचावा, आणि प्रतिसादरूपाने / विपत्राने अभिप्राय कळवावा ही विनंती. धन्यवाद! लेखाचा दुवा: उपक्रम दिवाळी विशेषांक २०१० - नाडिग्रंथांतील जन्मदिनांकाची नोंद - एक अभ्यास

-

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

8 Nov 2010 - 10:44 am | विजुभाऊ

हा लेख आवश्यक आहे का?
असेल तर एक अत्यावश्यक लेख लिहिण्याबद्दल धन्यवाद
नाडी _का_अन्त विजुभाऊ

वेताळ's picture

8 Nov 2010 - 10:59 am | वेताळ

मी नाडी ग्रंथाच्या लेखनमालेमुळे माझी व माझ्या एका मित्राची नाडपट्टी वाचनासाठी अंगठ्याचा ठसा देवुन आलो आहे.बघुया नाडपट्ट्या मिळतात का ते.
कोल्हापुरच्या वाचकांसाठी माहिती: नाडीपट्टीकेंद्र राजारामपुरी ११वी गल्ली जैनमंदीरासमोर आहे.

रणजित चितळे's picture

8 Nov 2010 - 4:23 pm | रणजित चितळे

मी बंगळुरला अस्तानाचा माझा अनुभव - एका आप्तेष्टांकडे होसुरला गेलो असताना त्यांनी मला सांगीतले की होसुरला एक नाडी ज्योतीष आहे. काहीशा शंकेनीच मी आणि बायको त्या कडे गलो (ह्या आधी कधीही आम्ही कोणच्याही ज्योतिषा कडे गलो नव्हतो) नेहमीच्या (नंतर कळले) त्याने ज्योतिष सांगीतले (५०० रु चा न्यनतम पॅक घेतला होता) तेव्हा मी थक्क झालो. माझ्या स्वभावाचे रेखाटन इतके बरोबर केले होते त्याने, की माझे नाडीशास्त्राबद्दल चे कुतूहल वाढले(मी स्वतः इंजिनीयर असुन).

पण हे लोक भविष्य वर्तवतात का? कारण आपला स्वभाव, भूतकाळ जाणून घेऊन उपयोग काहीच नसतो. भविष्यातील घटना कळल्या तर काही फायदा तरी होऊ शकतो.

आत्मशून्य's picture

9 Nov 2010 - 1:21 am | आत्मशून्य

सहमत

अपूर्व कात्रे's picture

8 Nov 2010 - 5:08 pm | अपूर्व कात्रे

नाडीग्रंथावरून भविष्य सांगणाऱ्यांचा असाच एक अनुभव मला आला. माझ्या जन्मदिनांकावरून आणि उजव्या अंगठ्याच्या ठश्यावरून त्यांनी माझा महत्वाचा भूतकाळ, माझ्या आरोग्यविषयक अडचणी, स्वभाव आणि social status, तसेच माझ्या आईवडिलांचा थोडासा भूतकाळ सांगितला. सगळाच बरोबर निघाला. त्यांनी सांगितलेली माझी career stream आणि मला हवी असणारी career stream यातही फारसा फरक नाही.

वेताळ's picture

8 Nov 2010 - 5:35 pm | वेताळ

५०० रुपये पेक्षा कमीचे पॅकेज आहे का?

रणजित चितळे's picture

9 Nov 2010 - 10:31 am | रणजित चितळे

त्याच्या कडे नव्हते

रणजित चितळे's picture

9 Nov 2010 - 10:37 am | रणजित चितळे

आमच्या सारख्या शंकाखोरांना सुद्धा प्रश्न पडला की हा इतका बरोबर आपले नाव, वडलांचे नाव, आई कोणत्या आजाराने गेली इत्यादी कसे सांगु शकतो. कोणी म्हणतात ती लोकं आपले मन वाचु शकतात. आहो जरी आपण धरलं कि हे ज्योतीष वगैरे काही नाही नुसते माइंड रिडिंग आहे पण तरी सुद्धा एवढे तंतोतंत मन वाचायचे म्हणजे जादुच म्हटली पाहीजे. इतक्या वर्षांनी स्वतःच्या जोडीदाराचेही मन अजुन ;) वाचता येत नाही.

शशिकांत ओक's picture

9 Nov 2010 - 10:51 am | शशिकांत ओक

मित्र हो,
आपणाला वाटेल की नेहमी नाडीवरच्या धाग्यावर हिरीरीने भाग घेणारे व आवाज उठवणारे कलावंत अजून हैयोहैयैयोंच्या अभ्यासपुर्ण लेखावर शांत कसे?
एकांकडे चौकशी करता सध्या माझा आवाज बसलाय असे हळुवार स्वरात सांगितले गेले.असो.
आशा आहे की वाचक हैयोंचा लेख वाचून अभ्यासपुर्ण प्रतिक्रिया नोंदवतील. वाट पाहूया.
हा लेख आवश्यक आहे का? नाडीत भविष्य असते का? कितीचे पॅकेज उपलब्ध? कुठे जावे? आदी उलगडे तज्ञ लोक करतील.

नाडी_ का_ न्त

व्यक्ती नाडीकेंद्रात जाणार नाहीत ही अट मान्य करून, केवळ, अनेक व्यक्तींच्या बोटांचे ठसे पाहून कोणी नाड्या देणार असेल तर "अनुभवावर आधारित खात्री" करून घेण्यास मी तयार आहे.

त्या नाडीपट्ट्या बनविणार्‍या नाडीतज्ञांच्या प्रामाणिकतेविषयी (आणि त्या अनुषंगाने जातकांच्या भोळसटपणा नसण्याविषयी) मला शंका आहे:

श्री. रिकाम टेकडे यांनी वरील बाबी हैयोंच्या नाडी ग्रंथांच्या अभ्यासपुर्ण लेखावर उपस्थित केल्या आहेत.
जर शंका आपणांस आहे तर त्याशंकेचे निरसन आपणालाच प्रत्य़क्ष अनुभवाने व नाडीग्रंथांची विविध अंगांनी परीक्षा फावल्या वेळात करायला नको काय? हे काम आपण टाळण्याने आपणांस शाब्दिक लेखनात फक्त रिता वेळ घालवायचा आहे, असा समज होतो.
हैयोंचा लेख नाडी पट्टीत जे कूट तमिळ लिपीतून लिहून येते त्याच्या ओळींची फोडकरून सामान्य तमिळ भाषेत ते मांडून गैर तमिळ लोकांना त्यातील अर्थाची ओळख करून देणे असा आहे. त्याअर्थांच्या विश्लेषणाच्या बाबत आपणांस काही विचारणा करावीशी वाटत असेल तर त्याबद्दल तेथे चर्चा होऊ शकते. ३जून१९७९ला बुधवार येतो हे विधान वगळता ज्याअर्थी तशी आपण ती करत नाही त्या अर्थी हैयोंच्या अर्थाची फोड आपणांस मान्य आहे असे मानावे लागेल. पर्यायाने नाडी ग्रंथांच्या पट्यात जन्मदिनांक व त्यावेळची ग्रहस्थिती श्लोकबद्ध असते हे मान्य आहे. बुधवार का मंगळवार याचे विश्लेषण नाडी केंद्रातील तज्ञांकडून केले जाऊ शकते. आपणास वेळ मिळाला तर कोणत्याही केंद्रातून ते मिळवावे.
आता ते श्लोक खरोखरीच तेथे असतात की नाही या शोधासाठी आपण नाडी केंद्रात जायचे का नाही याची गरज निर्माण करून निर्माण होणाऱ्या समस्येला आपण वा आपल्या सारख्या विचारांच्या लोकांनी तो प्रश्न नाडीकेंद्र वाल्यांशी विचार विनिमय करून सोडवावा लागेल. त्यांनी मान्य केले तर आमच्यासारख्या इतरांनी हो किंवा नाही म्हणण्याचा प्रश्न उद्भवत नाही. पण त्यासाठी आपणाला पुढाकार घेऊन तुम्हीच तो सोडवला पाहिजेत.
नाडी केंद्रात न जाताच नाडी ग्रंथांचा अनुभव केवळ ठसे पाठवून व ताडपट्या पाहून परीक्षा घेण्याचा आपला आग्रह असेल ही. पण हैयो आपल्याला लेखातून आपण म्हणता त्या तऱ्हेनी नाडी पट्ट्या शोधतात असा दावा जर करत नाहीत आणि नाडीतज्ञ वाचक नाडी पट्या केंद्रात बसून(नव्या) बनवतात अशी नाडीवाचकांच्याच्या प्रामाणिकतेची शंका आपणास असेल तर त्यांना भेटून त्यांच्या कडून ती सप्रमाण निरसन करून घ्यायला जे काही करावे लागेल ते आपणासारख्यांनी करायचे आहेत.
अपेक्षा करतो की हैयोंनी जशा काही नाडी पट्ट्यांचा अर्थ सादर करून व त्याची फोड करून दाखवली तशी आपण आपल्या स्वतःची ताडपट्टी शोधावी व त्यातील जन्मकालीन ग्रहस्थिती वर्णन करून सादर करावी. त्यासाठी आपणांस हैयोंची मदत हवी असेल तर त्यांना आपण विनंती करावी ते शोधकवृत्तीचे समतोल विचारक आहेत असा त्यांचा दावा आहे. म्हणून त्यांच्या सचोटीबाबत आपणल शंका नसावी.
ही विनंती ज्यांनी नाडीग्रंथांना थोतांड म्हणून लेखन केले आहे यांनाही लागू होते.