नवीन असतांना एवढं मराठी पाहून बिचकलो.मराठी लिहीता येते की अशी शंका होती. म्हणून सदस्य नाम इंग्रजीत लिहीले. मराठी लिहीले पण ते भलतंच लिहील्या गेलंय. आता ते बदलावं म्हणतो.
अश्या अनेक प्रश्नांवर सदस्य नाम बदलने हा एक उपाय आहे.
१) यासाठी प्रवेश केल्यानंतर डाव्या समासात माझे खाते वर टिचकी मारा.
२)त्यानंतर आपल्या सदस्यनामाच्या खाली संपादन वर टिचकी द्या.
३)तेथे खाते सुचना च्या चौकटीत सदस्यनाम नावाची छोटी चौकट आहे. येथे तुम्हाला हवे ते नवीन नाव द्या.
४)पानावर सर्वात खाली जाऊन प्रकाशित करा वर टिचकी द्या व बदल साठवा.
संपादन मधे गेलाच आहात तर वैयक्तिक माहिती
व्यावसायिक माहिती आदींवर टिचकी देऊन तुमचे व्यक्तीचित्र (प्रोफाईल) पुर्ण करा.
धन्यवाद.
प्रतिक्रिया
10 Apr 2009 - 6:06 am | सचिन घुले
"२) संपादन वर टिचकी" दिल्यानंतर "खाते संरचना" या चौकटीतील "खाते सूचना" चौकट दिसली. पण या चौकटीत "सदस्यनाम" नावाची छोटी चौकट"दिसत नाही. मी काही चुकीचे तर करत नाही ना?
--
सचिन
10 Apr 2009 - 11:54 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नीलकांत, सदस्यनामाची चौकट दिसत नाही असे वाटते ?
असाच अनुभव कोणाला आहे का ?
10 Apr 2009 - 12:04 pm | मदनबाण
खाते सुचना मधे विरोपपत्ता,संकेताक्षर:,संकेताक्षर पडताळणी,हेच पर्याय दिसतात !!!
सदस्यनामाची चौकट दिसत नाही.
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
13 Apr 2009 - 12:53 pm | sukhada singh
सद्स्य नामाचि चौकट दिसत नाहि.
13 Apr 2009 - 6:39 pm | बाकरवडी
होय सद्स्य नामाचि चौकट दिसत नाहि
कही तरी करायला हवे लवकर !
19 May 2009 - 8:27 am | prachi
चौकट गायब :S :( :/
19 May 2009 - 12:52 pm | नीलकांत
नमस्कार,
सरपंचांच्या आज्ञेवरून सदस्यनाम बदलण्याची मूभा आता काढून टाकण्यात आलेली आहे. सर्वांनी याची नोंद घ्यावी. काहीचे नाव लिहीण्यात चुकी झालेली असल्यास त्यांनी सरपंचाना व्य. नि. केल्यास त्यांचे नाव बदलले जाईल.
नीलकांत
20 Jan 2010 - 8:13 pm | केदी
मी कुणालाच काही निरोप करू शकत नाहीये :( नाव चेंज करायचय मदत हव्ये
***
A falling leaf
looks at the tree...
perhaps, minus me
28 Apr 2010 - 7:21 pm | सन्दिपभलेरओ
आता नाव कसे बदलावे ते सांगा ?
7 Jul 2010 - 5:34 pm | स्मिता चावरे
मला देखील नाव बदलायचे आहे. आणि मला खरड सुविधा कधी उपलब्ध होणार?
22 Jul 2010 - 10:19 pm | आमोद शिंदे
मला देखिल बदलायचे आहे. वरील कृतीक्रम बदलला आहे का?
22 Jul 2010 - 10:23 pm | क्रेमर
आता तसे करता येत नाही.
-क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क))
_________________
सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.
23 Jul 2010 - 1:17 am | शिल्पा ब
का नावं बदलताय? अधीच नाहि का विचार करुन ठेवायचा?
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
23 Jul 2010 - 1:30 am | आमोद शिंदे
इथे आल्यावर एखादे इरसाल नाव घ्यावेसे वाटत आहे. त्यात काय चुकिचे आहे?
13 Apr 2019 - 6:20 pm | चौथा कोनाडा
काही नवीन मिपा सदस्यांनी इंग्रजी (रोमन लिपी) मध्ये सदस्यनाम घेतलेले आहे.
त्यांचे इंग्रजी (रोमन लिपी)तून मराठीत (देवनागरीत) बदलण्यासाठी मदत व्हावी म्हणून हा धागा वर काढत आहे. सदस्यनाम
ज्यांनी नुकतेच सदस्यनाम बदलून घेतले आहे त्यांना विनंती आहे त्या संबंधीची माहिती, प्रोसिजर इथे पोस्ट करावी.
धन्यवाद !