अपेक्षित

लॉरी टांगटूंगकर's picture
लॉरी टांगटूंगकर in काथ्याकूट
1 Nov 2010 - 12:41 am
गाभा: 

गेले २ दिवस ज्या काही घडामोडी चालू आहेत त्या बद्दल काही तरी लिहिला जाण्याची वाटच बघत होतो पण तशी काही चिह्ने दिसत नाहीयेत;हे तुम्हा सगळ्या लोकांना इतके अपेक्षित होते का?

असो बरीच मिपा कर मंडळी फोरेनर आहेत त्यांना सांगण्यासाठी हि लींक
http://72.78.249.107/esakal/20101101/5442208261395513630.htm
http://72.78.249.107/esakal/20101031/4989233220531104330.htm
आता मत-प्रदर्शनाला सुरुवात होऊ द्यात.
मा मु अशोक रोजी चावण यांनी राव नावात जोडल्या मुळे असा घोळ झाला असे पण ऐकतोय.
विशेष आश्चर्य माजी लष्कर प्रमुख दीपक कपूर यांची नावा मुळे झाले.लष्करात प्रचंड भ्रष्टचार आहे त्यांना तर काय आपलेच वेगळे कोर्ट असते म्हणे ......करायची आहे ती बोंब करा कोणाचा बाप नाही विचारात......
फार झाले तर सी बी ऐ चौकशी केली जाईल.....मंजेच congress burue of investigation

काही बेसिक प्रश्न आहेत
कारगील मधल्या शहीद जवानाच्या कुटुंबियान साठी होती असे म्हणत्यात तर त्यांना अजून अपेक्ष्हित मदत दिली गेली नव्हती असेच ना???
ती सोसायटी इतक्या मुख्य जागेत आहे कि खरच अशी जागा कोणी शाहिदना देईल का??
आणि बाकी बरेच आहेत तुमची मते ऐकायला आवडतील बोला .......

प्रतिक्रिया

सूर्याजीपंत's picture

1 Nov 2010 - 3:37 am | सूर्याजीपंत

हि जागा कारगिलच्या हुतात्म्यांच्या परिवारासाठी होती असे ऐकतो आहे, म्हणजे त्यांना फुकटात flat देणार होते का ? तेथील एक घर तीस कोटींचे आहे आणि राजकारण्यांनी ते ६० लाखाला विकत घेतले असेही वाचनात आले म्हणजे हुतात्म्यांच्या परिवाराकडून किती पैसे घेतले जाणार होते हेसुद्धा काळात नाही. तसेच शहीद झालेल्या ४५० हुतात्म्यांच्या परिवारासाठी कसे निकष लावणार होते तेपण कळायला काही मार्ग नाही.
हा झाला घर वाटपाचा प्रकार, पण नौदलाने उंच इमारत आपल्या विभागाजवळ असल्याला आक्षेप घेतल्याने सगळा प्रकार सुरु झाला आहे, तर हि इमारत मग पडून टाकणार का ?
मुख्यमंत्री बदलून प्रश्न सुटणार आहे का ? कि या प्रकरणात बाकीच्या दोषी लोकांना वाचवायला आणि प्रश्नाच्या मुळापर्यंत जायला लागू नये म्हणून फक्त मुख्यमंत्री बदलायचे नाटक करणार आहेत. तसेच ओबामाच्या दौऱ्याच्या फक्त २ आठवडे आधी मुख्यमंत्री बदलून सगळे प्रशासन परत विस्कटून टाकणार आहेत का ?
नवीन तर काय वाचतोय कि "दिवसभरात चव्हाण यांची राहुल गांधींशी भेट होऊ शकली नाही. मात्र, काल रात्री उशिरा त्यांनी राहुल यांचे निकटवर्तीय ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांना भेटून मदतीचे साकडे घातल्याचे समजते." आता राहुल गांधींचा या प्रकरणात काय संबंध आहे ? ना ते संरक्षण मंत्री ना त्यांच्याकडे महाराष्ट्राचा कार्यभार. आणि राहुल गांधीचे निकटवर्तीय कोण तर दिग्विजयसिंह ? जे असंबद्ध विधाने करण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. म्हणजे एकूण काय तर प्रकरणात संभ्रम आहेच पण त्याची चौकशी करून कारवाई करण्यात तर अजून जास्त गोंधळ आहे.

हुप्प्या's picture

1 Nov 2010 - 9:04 am | हुप्प्या

राहुलजी कोण म्हणूनी काय पुसता
ते तर राजे ह्या देशाचे!
आपल्या देशात राजेशाही नाही म्हणणार्‍यांना ह्या प्रकरणाने उत्तर मिळाले असेल.
मुख्यमंत्री राजीनामा राजीनामा राज्यपालाकडे देतात असे नागरिकशास्त्र शिकवते. पण इथे काय होते आहे? अशोकराव महासम्राज्ञींची चरणधूळ मस्तकी लावायला दिल्लीला पळाले. आपला राजीनामा त्यांच्या चरणावर ठेवते झाले. युवराज राहुलजींची लाळ घोटण्याकरता त्यांना दिल्लीभर हुडकत होते.
राहुलजींचे कर्तृत्व इतके अफाट आहे की काय विचारूच नका.
भर्तॄहरीची क्षमा मागून

यस्यास्ती गांधी उपनामम्
स नरः कुलीनः स पंडित:
स श्रुतवान गुणज्ञा
स एव वक्ता स च दर्शनीयः
सर्वे गुणः गांधीवंशे आश्रयंते!

आपले शिवराय त्या काळच्या दिल्लीश्वराच्या दरबारात न डरता कडाडले होते. आणि आता हे राज्यकर्ते आपल्या पोलादी कणा लवचिकपणे वाकवून दाखवत आहेत.
धन्य धन्य!

क्लिंटन's picture

1 Nov 2010 - 10:51 am | क्लिंटन

मुख्यमंत्री राजीनामा राजीनामा राज्यपालाकडे देतात असे नागरिकशास्त्र शिकवते. पण इथे काय होते आहे? अशोकराव महासम्राज्ञींची चरणधूळ मस्तकी लावायला दिल्लीला पळाले. आपला राजीनामा त्यांच्या चरणावर ठेवते झाले.

आणि म्हणूनच अजूनही अशोक चव्हाण मुख्यमंत्री आहेत.राज्यपाल सोडून आणखी कोणालाही त्यांनी दिलेला राजीनामा ग्राह्य धरला जाणार नाही भले मग ते राजीनामा सोनियांना देवोत की आणखी कोणाला अशा राजीनामापत्राची किंमत कागदाच्या कपट्याएवढी.

राहुलजी कोण म्हणूनी काय पुसता
ते तर राजे ह्या देशाचे!
आपल्या देशात राजेशाही नाही म्हणणार्‍यांना ह्या प्रकरणाने उत्तर मिळाले असेल.

या प्रकरणावरून राहुल देशाचे राजे आहेत हे कसे सिध्द होते? राहुल कॉंग्रेसचे नेते आहेत हे तर उघडच आहे. कदाचित राहुल गांधी आपली खुर्ची वाचवू शकतील असे अशोक चव्हाणांना वाटले असेल आणि त्यासाठी त्यांनी त्यांची भेट घ्यायचा प्रयत्न केला असेल.यातून राहुल कॉंग्रेसचे मोठे नेते आहेत हे जरूर सिध्द होते पण ते देशाचे राजे आहेत हे कसे सिध्द होते?

इनोबा म्हणे's picture

1 Nov 2010 - 10:58 am | इनोबा म्हणे

तो 'राजा' नाही 'युवराज' आहे.

पंख's picture

1 Nov 2010 - 10:33 am | पंख

आदर्श सोसायटीतील एक फ्लॅट साधारण ७-८ कोटींचा आहे.. ६० हजार रु. प्रति स्क्वे.फुट या दराने.. ३० कोटी किंवा ७५ कोटी या आपल्या सबसे तेज प्रसारमाध्यमांच्या करामती आहेत... बाकी तिथल्या भ्रष्टाचाराचा निषेधच आहे..

>>हा झाला घर वाटपाचा प्रकार, पण नौदलाने उंच इमारत आपल्या विभागाजवळ असल्याला आक्षेप घेतल्याने सगळा प्रकार सुरु झाला आहे, तर हि इमारत मग पडून टाकणार का ?

संरक्षण मंत्रालयाने आता आक्षेप घेतला आहे का ? सगळी ईमारत एका रात्रीत तर ऊभी राहीली नाही ना ? ईमारत ऊभी रहात असताना हे लोक काय झोपा काढत होते काय ?

एकुणच या सर्व प्रकारात सर्वांच्याच भूमिका संशयास्पद आहेत...

पंख's picture

1 Nov 2010 - 10:34 am | पंख

आदर्श सोसायटीतील एक फ्लॅट साधारण ७-८ कोटींचा आहे.. ६० हजार रु. प्रति स्क्वे.फुट या दराने.. ३० कोटी किंवा ७५ कोटी या आपल्या सबसे तेज प्रसारमाध्यमांच्या करामती आहेत... बाकी तिथल्या भ्रष्टाचाराचा निषेधच आहे..

>>हा झाला घर वाटपाचा प्रकार, पण नौदलाने उंच इमारत आपल्या विभागाजवळ असल्याला आक्षेप घेतल्याने सगळा प्रकार सुरु झाला आहे, तर हि इमारत मग पडून टाकणार का ?

संरक्षण मंत्रालयाने आता आक्षेप घेतला आहे का ? सगळी ईमारत एका रात्रीत तर ऊभी राहीली नाही ना ? ईमारत ऊभी रहात असताना हे लोक काय झोपा काढत होते काय ?

एकुणच या सर्व प्रकारात सर्वांच्याच भूमिका संशयास्पद आहेत...

बातमी कळली हो.
फारेनरांनाही कळली.
हे सगळे बोलण्यापलिकडचे असले तरी आपल्याकडे (खरं तर जगभर) हे प्रकार मस्त खपून जातात.
आपल्याला काय वाटतं, ते आपल्या भल्यासाठी बसलेत काय पदावर?
आजकाल या लोकांना दोष नाही द्यावासा वाटत.

नितिन थत्ते's picture

1 Nov 2010 - 7:44 am | नितिन थत्ते

>>फार झाले तर सी बी ऐ चौकशी केली जाईल.....मंजेच congress burue of investigation

वाचून मौज वाटली.

गांधीवादी's picture

1 Nov 2010 - 9:12 am | गांधीवादी

>>गेले २ दिवस ज्या काही घडामोडी चालू आहेत त्या बद्दल काही तरी लिहिला जाण्याची वाटच बघत होतो पण तशी काही चिह्ने दिसत नाहीयेत;हे तुम्हा सगळ्या लोकांना इतके अपेक्षित होते का?
वाट तर आम्हीही बघत होतो, कि घटना छातीशी बडवणारे, राजकारण्यांचा उदो उदो करणारे, प्रखरपणे हाती लेखणी घेतील. पण पदरी घोर निराश आली.
असो,

सैनिकांनो तुम्हाला एक आवाहन,
लढाईला जाताना आपला कुटुंबियांना वार्यावर टाकून जाऊ नका, थोडीफार धन दौलत त्यांच्या नावावर करा, मगच मरणासाठी तयार व्हा. तुम्ही शहीद झालात तर तुमच्या कुटुंबीयांकडे लक्ष द्यायला सरकारला पुरेसा वेळ नाही, आणि तुम्ही लढाईत अपंग झालात तर तुमचा हाल कुत्रेही (हो खरोखरचेच कुत्रे, आणि ह्यात कुत्रे जमातीचा अपमान नाही.) विचारणार नाही.

माननीय मन्द्या,
आपल्या बलात्कारित घटनेप्रमाणे, CBI चा अर्थ central bureau investigation असा आहे. तो तसाच वापरवा.

सध्या आम्ही CWG मुळे गर्वानी छाती फुगवून, दिवाळीचा फराळ खाण्यात मग्न आहोत.

नितिन थत्ते's picture

1 Nov 2010 - 9:56 am | नितिन थत्ते

>>>वाट तर आम्हीही बघत होतो, कि घटना छातीशी बडवणारे, राजकारण्यांचा उदो उदो करणारे, प्रखरपणे हाती लेखणी घेतील. पण पदरी घोर निराश आली.

हॅ हॅ हॅ. नेहमी लष्कराचा उदोउदो करणारे सुद्धा यात उतरले नाहीत. कारण त्यांचे दैवत असलेले लष्करी अधिकारी सुद्धा यात गुंतले आहेत असा संशय आहे. :)

इनोबा म्हणे's picture

1 Nov 2010 - 11:01 am | इनोबा म्हणे

आपली दैवते ही इथे गुंतली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुख्यमंत्री असला म्हणून काही एकटा खात नसतो. फुल ना फुलाची पाकळी दिल्लीलाही पोचती होतेच. हॅ हॅ हॅ.

नितिन थत्ते's picture

1 Nov 2010 - 11:02 am | नितिन थत्ते

असेच म्हणतो.

अनामिका's picture

1 Nov 2010 - 12:01 pm | अनामिका

सहमत

अनामिका's picture

1 Nov 2010 - 12:01 pm | अनामिका

"चोरांच्या हाती तिजोरीच्या चाव्या"असे सध्या महाराष्ट्राचे व तमाम देशाचे चित्र आहे..कॉमन्वेल्थ गेम्सच्या निमित्ताने झालेला काही हजार कोटींचा भ्रष्टाचार अजुन जनता पचवते न पचवते तोच आदर्श सोसायटीच्या निमित्ताने काँगीजनांद्वरे केला गेलेला अजुन एक भ्रष्टाचार जनतेसमोर आलाय..जनतेने असले धक्के पचवण्यापुर्वीच हे काँग्रेसी ढेकर देऊन मोकळे झालेले असतात ...काँग्रेस व त्यांच्या अप्पलपोटी बगलबच्च्यांकडुन तसे देखिल आदर्श वागणूकीची अपेक्षा नाही.....भ्रष्टाचाराचा "आदर्श "नमुना म्हणजे काँग्रेसपक्ष व त्यांचे सहकारी हे आता आदर्श सोसायटीच्या निमित्ताने जनतेसमोर आले....मोगल व इंग्रज निदान परकिय तरी होते त्यांनी केलेली देशाची लुट निदान पटण्यासारखी आहे ,पण गेली ६ दशके स्वकिय असलेल्या काँग्रेसपक्षाने या देशात जी लुट केली त्याचे काय करायचे?मढ्याच्या टाळू वरचे लोणी खाणार्‍या काँग्रेसपक्षाने स्वकियांशीच केलेला हा देशद्रोह आहे.......काँग्रेस आणि भ्रष्टाचार यांचे अभेद्य नाते स्वातंत्र्य मिळाल्यापासुन जुळलेले आहे...INC याचा अर्थ Indian netas corruption असेच आता काँग्रेसपक्षाला संबोधणे योग्य ठरावे...........१९४७ पासुन सगळ्यात जास्त काळ काँग्रेसपक्ष सत्तेत आहे ..काँग्रेसच्या निमित्ताने वाढिस लागलेली हि किड आता लष्कराला देखिल लागली याचे दु:ख आहे............देशाच्या व देशबांधवांच्या संरक्षणार्थ स्वत:च्या प्राणांचे मोल देणार्‍या सैनिकांच्या हक्कावर गदा आणत स्वतःची खळगी भरणार्‍यांना कधीही क्षंमा केली जाता कामा नये....सोनियांदेवींकडून काही भरीव कार्य व कठोर निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा करुन स्वतःचाच अपेक्षाभंग निदान मी तरि करु इच्छित नाही ....पण तरिही स्वत:च वेगळेपण सिद्ध करायचे असेल तर निदान या असल्या खाबू नेत्यांना पक्षातुन हाकलावे.. मागे काँग्रेसचे आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस रेड्डिच्या अपघाती मृत्युनंतर तेथे बर्‍याच लोकांनी आत्महत्या केल्या होत्या ,त्या रेड्डिंवरील प्रेमापोटी नसून रेड्डिंमार्फत होणार्‍या काळ्याधंद्यामधे केली गेलेली मोठया रकमेची गुंतवणूक बुडाल्या बद्दलच्या नैराश्यातुन केल्या गेलेल्या होत्या
भ्रष्टाचाराच्या बाबतीत इतर पक्ष देखिल काही सोवळे नाहित हे कर्नाटकच्या निमित्ताने दिसलेच.........सुरेश प्रभूंचे नाव या आदर्श प्रकरणात आले याचे आश्चर्य वाटले त्याही पेक्षा धक्का बसला..........पण कायम माध्यमांसमोर पोपट पंची करण्यात आणि राणाभिमदेवी थाटात गर्जना करण्यात आघाडीवर असणारा पवारांचा पित्त्या आव्हाड याचा देखिल या प्रकरणात सहभाग आहे .........सध्या कुठे तोंड लपवुन बसलेत आव्हाड्?....आज तर पृथ्वीराज चव्हाणांना देखिल एक फ्लॅट दिला गेलेला आहे अशी बातमी येतेय्......राणेंनी सेना सोडण्यामागचे खरे कारण आता लक्षात येतेय !केवळ स्वतःची तुंबडी भरण्यासाठीच राणेंनी पक्ष बदलला हे सांगणे न लागे .सत्तेचा वापर करायचा आणि पुन्हा निर्लज्जपणे तोंड वर करुन इतरांवर आरोप करायचे.......काँग्रेसच्या आदर्शवादाचे गोडवे गाणार्‍यांना हाच आदर्शवाद अपेक्षित असावा बहुदा!.............या राजकिय नेत्यांची असली काळी करणी बघुन शालेय अभ्यासक्रमातुन व एकंदरीतच आता लोकशाहीची मूळ व्याख्या बदलून लोकशाहीची नवी व्याख्या 'Buy the people ,Buy the politician and then Sell the country!" अशी केली पाहिजे..
अवांतर -मंद्या यांनी सकाळचा दिलेला दुवा बघुन अंमळ गंमत वाटली कारण गेले पाच दिवस हा विषय माध्यमांमधे व देशात चर्चीला जात असताना सकाळने याची दखल फार उशीराने घेतली.....पवारांच्या आज्ञेची वाट पहात असावेत बहुदा!
जय हिंद!
जय महाराष्ट्र!

नितिन थत्ते's picture

1 Nov 2010 - 12:20 pm | नितिन थत्ते

१९७४ च्या जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनापासून आजतागायत कॉंग्रेस आदर्शवादी असल्याचा दावा कुणी केल्याचे ऐकिवात नाही.

काँग्रेसच्या निमित्ताने वाढिस लागलेली हि किड आता लष्कराला देखिल लागली याचे दु:ख आहे............ या वाक्यातला आता हा शब्द गंमतीदार वाटला.

मृत्युन्जय's picture

1 Nov 2010 - 12:41 pm | मृत्युन्जय

थत्ते चाचा ही कीड मग लष्कराकडुन काँग्रेसला लागली आहे असे म्हणायचे आहे का तुम्हाला. कीड जिथे आधी लागली तिथुन ती दुसर्‍यापर्यंत पोचली हे महत्वाचे. त्यातला "आता" हा शब्द फारसा महत्वाचा नाही. हा आता काँग्रेसी भ्रष्टाचारी नाहीत असे तुम्हाला म्हणायचे असेल तर गोष्ट वेगळी.

नितिन थत्ते's picture

1 Nov 2010 - 12:45 pm | नितिन थत्ते

नाही बॉ. मला फक्त आता या शब्दाची गंमत वाटली. आता या शब्दाने ४०-५० वर्षे अभिप्रेत असतील तर माहिती नाही. :)

llपुण्याचे पेशवेll's picture

1 Nov 2010 - 12:50 pm | llपुण्याचे पेशवेll

अहो काहीतरीच काय बरळतात. मिपा वाचा तिथे एका उच्चपदस्थ लष्करी अधिकार्‍यांना भेटणार्‍या मिपाकराने ते कसे झोपलेले नाहीत आणि सतर्क आहेत आणि हा लष्करातील भ्रष्टाचार कसा केवळ अपवादात्मक आहे ते लिहीलेले दिसेल. तिथे वरील सद्गॄहस्थांचे +१ देखील दिसेल.

अनामिका's picture

1 Nov 2010 - 3:19 pm | अनामिका

थत्तेचाचा!
लष्करी अधिकारी देखिल भ्रष्ट असू शकतील पण काँग्रेसच्या पित्त्यांसारखे ते गल्लोगल्ली सापडत नाहित व दारोदारी निवडणुकांदरम्यान कटोरा घेऊन मतांची भिक मागायला जात नाहीत..........काँग्रेसचा व तस्मात काँगीजनांचा ,नेत्यांचा, प्रमुखांचा भ्रष्टाचार सर्वशृत आहे...........युवराज व राजमातेपर्यंत किती थैल्या पोहोचल्या अथवा पोहोचतात हे तुमच्यासारख्या सुज्ञास म्या पामराने काय सांगावे...नाही का?
मुळ विषयाला बगल देत मुद्दा दुसरीकडे भरकटवण्यात काँगीजनांचा हातखंडा आहे.....ते जे करातात ते तुंम्ही करता मिपावर यात नवल ते काय?

१९७४ च्या जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनापासून आजतागायत कॉंग्रेस आदर्शवादी असल्याचा दावा कुणी केल्याचे ऐकिवात नाही.

स्वपक्षाची अशी बदनामी करु नये.....

नितिन थत्ते's picture

1 Nov 2010 - 3:45 pm | नितिन थत्ते

>>काँग्रेसच्या पित्त्यांसारखे ते गल्लोगल्ली सापडत नाहित

तुमचा आणि त्यांचा (लष्करी अधिकार्‍यांचा) संपर्क फार येत नाही असे म्हणणे जास्त सयुक्तिक आहे.

>>व दारोदारी निवडणुकांदरम्यान कटोरा घेऊन मतांची भिक मागायला जात नाहीत..........

यात काय चुकीचे आहे हे कळले नाही.

>>युवराज व राजमातेपर्यंत किती थैल्या पोहोचल्या अथवा पोहोचतात हे तुमच्यासारख्या सुज्ञास म्या पामराने काय सांगावे...नाही का?

मी सूज्ञ नाही त्यामुळे तुम्हाला थैल्या पोचल्याची जी संख्या कळली आहे ती येथे उघड करून सांगावी.

>>स्वपक्षाची अशी बदनामी करु नये.....

हा हा हा. मी काही काँग्रेसचा सदस्य नाही. :)

लॉरी टांगटूंगकर's picture

1 Nov 2010 - 4:28 pm | लॉरी टांगटूंगकर

सोरी शक्तिमान
पुढच्या वेळी कोणत्या पेपरचे धागे टाकू???विन्ग्लीश सांगू नका काय त्याच्याशी आमचे पटत नाय....,आता ई सकाळ कसे टाइप करायला लहान म्हणून तो.......... जाऊ दे तुमचा पेपर सांगा

गांधीवादी's picture

1 Nov 2010 - 1:01 pm | गांधीवादी

हा काय एक नवीन प्रकार चालू झालेला आहे ?
लष्कर विरुद्ध राजकारणी, असा कोणताही पायंडा पडून देऊ नये.

लष्करी अधिकार्यांचा आणि राजकारण्यांचा भ्रष्टाचार ह्यात खूप फरक आहे.
हेच लष्करी अधिकारी वेळ आली तर आपल्या छातीवर गोळी झेलून जनतेचे रक्षण करतील ह्याची खात्री आहे, पण किती युवराज आणि राजमाता अश्या प्रकारचे बलिदान देण्यास तयार होतील ?

नितिन थत्ते's picture

1 Nov 2010 - 1:27 pm | नितिन थत्ते

>>हेच लष्करी अधिकारी वेळ आली तर आपल्या छातीवर गोळी झेलून जनतेचे रक्षण करतील ह्याची खात्री आहे,

मागे अमेरिकन लष्करी अधिकार्‍याचे एक मत ऐकले होते.
War is not won by dying for your country, it is won by making the other person die for his country.

बाकी स्वतः छातीवर गोळी झेलण्यासाठी जाणे हे सत्याग्रह्यांचे काम असते.

तुमच्या वाक्याच्या दुसर्‍या भागाचे उत्तर (युवराजांच्या वडिलांनी आणि आजींनी) देऊन झालेले आहे असा क्लेम ;) पूर्वीपासून आहे. :)

>>लष्कर विरुद्ध राजकारणी, असा कोणताही पायंडा पडून देऊ नये.

सहमत आहे. हा पायंडा येथे सातत्याने काश्मीरविषयक लेखन करणार्‍यांनी आणि पांढर्या दहाषतवादाबद्दल सारखे बोलणार्‍यांनी मुख्यत्वे पाडला आहे.

इनोबा म्हणे's picture

1 Nov 2010 - 3:38 pm | इनोबा म्हणे

आपल्या पक्षाच्या विचारसरणीनुसार दहशतवादाला कुठलाही रंग नसतो. (भगवा सोडून)

गांधीवादी's picture

1 Nov 2010 - 3:29 pm | गांधीवादी

माननीय थत्ते, पांढऱ्या दहशतवाद्यांबद्दल लिहिल्याने कसा काय असा पायंडा पडतो ?
आणि मिपावर सातत्याने पांढऱ्या दहशतवाद्यांबद्दल लिखाण करणे मिपाच्या धोरण विरुद्ध आहे काय ?

आपल्या सारख्या सुज्ञांकडून वरील विधान अपेक्षित नाही (सहमत कि असहमत, हि बाब वेगळी) त्यामुळे मुद्दामून आपल्याला प्रतिसाद दिलेला नाही.

लॉरी टांगटूंगकर's picture

1 Nov 2010 - 4:39 pm | लॉरी टांगटूंगकर

लष्कराची शस्त्रास्त्र खरेदी मंजे लैई भारी असते बघा !!!
डी आर डी ओ मध्ये काय लोक गोट्या खेळत नाहीत तरी सगळी शास्त्रे बाहेरूनच घेली जातात .आमचे म्हणणे आहे कि डी आर डी ओ असतात अशी बाहेरून खरेदी का होते??? जर का स्पेस रेसअरच मध्ये प्रायवेट सेक्टर असते तर istro तरी या उंची ला गेले असते का???
सामान्य सैनिकांच्या देशप्रेमाबद्दल त्यांना सलाम... हा लष्कराचा भ्रष्टचार डिफेन्स मिनिस्ट्री मधूनच होत असावा.आता मिनिस्ट्री मान्ह्ली कि भ्रष्ट आचार आलाच .

IES मधून डिफेन्स मिनिस्ट्रीत कसे जायचे बघणारा
मन्द्या

सूर्याजीपंत's picture

1 Nov 2010 - 10:39 pm | सूर्याजीपंत

लष्करात भ्रष्टाचार होत नाही म्हणणे म्हणजे आपल्याच डोळ्यांवर पट्टी बांधून घेणे आहे. Ketchup Colonel ची गोष्ट तर प्रसिद्धच आहे. लष्कराचा ज्या ज्या खात्यांचा नागरिकांशी संबंध येतो तिथे बरेचदा भ्रष्टाचार झालेला आहे. शस्त्रास्त्र खरेदी बद्दल तर न बोललेलेच बरे. परदेशात शस्त्र खरेदी साठी बरेचसे अधिकृत दलाल असतात. पण जेव्हा वेळ येते तेव्हा सैनिक जीव देतातच, आणि जीव देणे आणि जीव घेणे यापेक्षा तोफाबंदुकिंच्या रणधुमाळीमध्ये कोणीही राजकारणी जात नाही. त्यामुळे खरतर सैनिक आणि राजकारणी अशी तुलना करण्यापेक्षा सैनिकामधली व्यक्ती असा विचार कारण मला जास्त सयुक्तिक वाटतं.