पार्श्वभूमी - माधुरी आणि नुपूर या माझ्या सहकारी माझ्याहून १० ते ८ वर्षाने तरी लहान आहेत. परवाचीच गोष्ट आम्ही ६० मैल दूर कॉर्पोरेट ऑफीसला कामानिमित्त जाऊन आलो आणि दुसर्या दिवशी रात्री डिप्लॉयमेंट होती म्हणून दोघी माझ्या खोलीवर राहील्या.
रात्री डिनरच्या वेळी साहजीकच कॉर्पोरेट ऑफीस , तेथील नवीन सहकारी यांचा विषय निघाला. गाडी या रूळावर आली की कोणते सहकारी कसे वाटले? आणि काही रोचक पण सामाइक मुद्दे समोर आले.
जसं मला आणि माधुरीला योगेश आवडला,
नुपूरला सुमीत आवडला,
मला आणि नुपूरला हेमंत अजीबात आवडला नाही
तीघींनाही अली सो सो वाटला.
पहीली सुरुवात मी केली "माधुरी , ये हेमंतको कुछ मॅनर्स नही लगता है यार. कल एक तो लंच पर इतना काफी अंतर था बीचमें फीर भी चिल्ला चिल्ला के मुझे पूछ रहा था कहां से हूं, फिर पुणे मे एक्झॅक्टली कहांसे? फिर महाराष्ट्रीअन हूं क्या? वो समझनेके बाद बोलने लगा - कस काय हाय, बर हाय काय?" ...... "रिअली एम्बॅरॅसींग!"
माधुरीने इतकं नीरीक्षण केलं नव्हतं पण नुपूरने दुजोरा दिला. ती म्हणाली तो जरा तसाच आहे एकदा तिचा डिफेक्ट लाटला होता तेव्हा पासून तिने फोनवर त्याच्याशी डिफेक्ट ची चर्चा करणं बंद केलं.
आमच्या तीघींच एक मत पक्क होतं ते होतं अली बद्दल की हा स्वतःबद्दल अति बोलतो. मान्य त्याची बायको पहीलट्करीण आहे, फेब्रुवारीमधे त्यांना मुलगी होणार आहे पण पूर्ण लंच सगळ्यांना त्याच विषयावर वेठीला धरण्याचं कारण नव्हतं.
नुपूरला सुमीत खूप आवडला होता. सुमीत मॅनेजर होता. माधुरी गेल्या महीन्यात भारतातून अमेरीकेत आली आहे. असो.
मला आणि माधुरीला योगेश आवडला कारण तो फार बोलत नव्हता , जे बोलत होता ते सेन्सीबल बोलत होता. त्याच्यामध्ये मार्दव एक प्रकारचा जंटलनेस होता. तो खूप वेलमॅनर्ड आनि सौजन्यशील वाटला.
हे सर्व आत्ता आठवण्याचं कारण की पुढील लेख वाचनात आला- http://timesofindia.indiatimes.com/life-style/relationships/man-woman/5-...
. हा लेख आहे पुरुषांना कशा प्रकारच्या स्त्रिया आवडत नाहीत. गोषवाराच सांगायचा तर - (१) कटकट्या - २४ X ७ कशा ना कशा बद्दल कीरकीर करणार्या, नकारात्मक दृष्टीकोन असलेल्या. (२) वजनाची फार काळजी करणार्या म्हणजे खाणं पीणं एंजॉय न करता सतत स्वतःच्या वजनाचीच काळजी करणार्या (३) सतत सासरच्या माणसांबद्दल उफराटं बोलणार्या (४) कामामध्ये अति व्यग्र स्त्रिया (५) सतत दुसर्यांची दुखणी खुपणी बरी करण्याकरता धावणार्या
आणि आमची या लेखाच्या बरोब्बर उलटी चर्चा आठवली ती म्हणजे स्त्रियांना कशा प्रकारचे पुरुष आवडतात. खालील निष्कर्ष हे मैत्रिणींबरोबर केलेल्या चर्चेतून निष्पन्न झालेले आहेत. मी त्यांची जबाबदारी घेत नाही. मी फक्त मांडण्याचं काम करते आहे.
(१) "पॉवरफुल" - आदिमानवाच्या काळात कदाचित शारीरीक सबळता हा निकष असेल पण आता आधुनिक युगामधे तो निकष तितक्या प्रिमिटीव्ह पातळीवर न राहता तो निकष देखील विकसीत झाला आहे . "आर्थिक", "सामाजिक", "बौद्धिक" दृष्ट्या सक्षम पुरुष हे स्त्रियांना चटकन अपील होतात (भावतात). नात्यामधे स्त्रीला सुरक्षेची भावना महत्वाची वाटते. जी सुरक्षा अर्थिकदृष्ट्या स्थिर किंवा स्वतःच्या कार्यक्षेत्रामधे स्थिर झालेली व्यक्ती परिपूर्ण रीतीने देऊ शकते. त्याचप्रमाणे नात्यामधील "कमीटमेंट" ही स्थैर्य लाभलेले पुरुषच देऊ शकतात. शेवटचा मुद्दा अशा रीतीने स्थैर्य लाभलेल्या पुरुषाचा सहवास प्रिय वाटणं कारण स्त्रीला स्वतःला स्थिरता लाभल्याने जणू सुर्यप्रकाश मिळालेल्या कमळासारखी ती विकसीत होणं.
(२) "मार्दवपूर्ण" - काही पुरुष अतिशय मार्दवपूर्ण वागणारे , बोलणारे, सौजन्यशील, सिव्हिलाइज्ड असतात. दुर्मीळ पण क्वचित सापडतात खरे. स्त्रियांना हे "नॉन्-थ्रेटनिंग" वाटतात. त्यांच्याबरोबर मन मोकळं करता येईल असं काहीसं वाटतं. हे पुरुष आवडण्यामागे शास्त्रीय कारण हेदेखील असू शकतं की मार्दव असल्याने मूल वाढविण्यास हा योग्य जोडीदार आहे असा "सबकॉन्शस" निर्णय मेंदू घेत असावा. शिवाय मित्र या रूपातदेखील हे पुरुष अगदी फिट बसतात.
(३) "बॅड बॉय" - हे पुरुष रुढार्थाने पारंपारीक नसतात तर थोडे बंडखोर, धोकादायकच असू शकतात्.त्यांच्यामध्ये गुंतण्यात एक प्रकारचा धोका असतो. पण या धोक्यातच थ्रिल असतं. परत आपण अशा पुरषाला बदलू शकू हा अटळ आत्मविश्वास .आपलं प्रेम या आडमार्गाला गेलेल्या पुरषाला पारंपारीक सज्जनतेच्या मार्गावर घेऊन येइल आणि आपला अहंकार सुखावेल अशी काहीशी मनोभूमिका यामागे असू शकते.
(४) "रोमँटीक" - कधीही पहीला वाढदिवस, पहीली भेट, पहीलं अमकंटमकं न विसरणारे हे पुरुष. फुलं देतील, चॉकलेटचा भडीमार करतील, भेटवस्तू, कवितांची पखरण करतील. भरपूर लाड आणि खूप लक्ष पुरवतील आपल्या प्रियेकडे. काही स्त्रियांना असे पुरुष का आवडतात हे ओळखणं फार अवघड नसावं.
अजूनदेखील अनेक प्रकार असतील यात वाचकांनी जमेल तशी भर घालावी.
प्रतिक्रिया
31 Oct 2010 - 4:00 pm | पर्नल नेने मराठे
शुचे छान हो !!! माझ्या ऑफिसात वरील पैकी १ हि पुरुश नाहिये :(
म्हणुन मी ऑफीसच बदलायचे ठरवलेय ;)
31 Oct 2010 - 7:14 pm | शुचि
उत्तम निर्णय. चुच्स अशीच तुझी क्षीतीजे विस्तारत राहोत हीच ईश्वराचरणी प्रार्थना :P
31 Oct 2010 - 4:09 pm | प्रीत-मोहर
माझ्या हापिसातल्या सगळ्या पुर्शांची लग्न ठरलेली आहेत....
31 Oct 2010 - 4:14 pm | पर्नल नेने मराठे
अग मेले मग त्याने काय फरक पडतोय ;) =)) =))
31 Oct 2010 - 4:20 pm | प्रीत-मोहर
पड्तो ना ...आता मला ते आवडुन काय फायदा? सग्ले बूक्ड आहेत.....;)
31 Oct 2010 - 4:23 pm | पैसा
ऑफिस बदल
31 Oct 2010 - 4:24 pm | पर्नल नेने मराठे
म्हणुन मी तुला कुठे नेत नाही.... x(
31 Oct 2010 - 4:11 pm | योगी९००
मस्त आहे हो हा लेख..
माझे नाव योगेश आहे..म्हणूनच जास्त आवडला (ह. घ्या.)
(मार्दवपूर्ण पॉवरफुल)
31 Oct 2010 - 4:22 pm | पैसा
नवरा हा जोपर्यंत नवरा झालेला नसतो, तोपर्यंत त्याच्यात शुचिने लिहिलेल्या सगळ्या सगळ्या गुणांचं दर्शन कधी ना कधी होतं. काही वर्षांनंतर म्हणजे जेव्हा तो 'मुरलेला' नवरा तयार होतो, तेव्हा सगळ्या पुरुषांचा 'रंग' एकसारखाच असतो असं माझ्या बहुतेक मैत्रिणी म्हणतात.
31 Oct 2010 - 4:37 pm | प्रीत-मोहर
=)) लोणच मुरांब्याची आठवण झाली
31 Oct 2010 - 4:39 pm | पैसा
कळेल तुला आणखी २० वर्षांनी....
31 Oct 2010 - 4:28 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
..आणि पुरुष कोणत्या रुपात आवडतो?....याचा "खुला" सा केला नाहिये शुची! ;)
म्हणजे....
powerful भाउ.....
मार्दवपूर्ण मित्र + नवरा + soulmate
त्यात एक अजुन catagory टाकु शकतेस....
एक अजुन जात आहे Tall Dark and Handsome.... Very Rare species ..... hard to see around....but quiet interesting! यातला मित्र, प्रियकर्,नवरा....या रुपात आवडू शकतो. किंवा आपला भाउ पण असा असावा छान Tall ark ( wheatish) and Handsome!
1 Nov 2010 - 12:01 am | शिल्पा ब
<<<Tall Dark and Handsome
माझा नवरा आहे असाच...बाकी लग्न झाल्यावर सगळे पुरुष सारखेच होतात..कोणाशीही लग्न करा..
2 Nov 2010 - 11:52 pm | मिसळभोक्ता
अर्र!
लग्न झाल्या नंतर हे सर्व टॉल-डार्क-हँडसम पुरुष खुजे-गोरे-कुरूप होतात, ही माहिती प्रथमच कळली.
3 Nov 2010 - 12:05 am | पैसा
निदान जाडी हळूहळू उंचीशी स्पर्धा करू लागते...
31 Oct 2010 - 6:47 pm | विसोबा खेचर
अरे वा..
छान, माहितीपूर्ण लेख.. :)
31 Oct 2010 - 7:10 pm | स्वानन्द
सगळ्या मेल्या चावट दिसतात... जावंच इथून :(
जगदम्ब जगदम्ब!
31 Oct 2010 - 7:38 pm | शुचि
स्वानंद तुम्ही म्हणताय त्या प्रकारच्या चावटपणा वरून हा विनोद आठवला -
एक मनुष्य मनोविश्लेषणतज्ञाकडे जातो. तो तज्ञ त्याला काही प्रश्न विचारतो.
तज्ञ: (एक ठीपका दाखवून) ह्म्म काय दिसतं आहे?
मनुष्य - आता कसं सांगू - पण एक स्त्री आणि पुरुष एका गोल टेबलवर प्रणयसुखात मग्न आहेत चक्क.
(आता तज्ञ त्या मनुष्याला एक चौकोन दाखवतात.)
तज्ञ - काय दिसतं आहे?
मनुष्य - अहो काय हे डॉक्टर या खिडकीतून मला आत डोकवायला सांगत आहात जेव्हा की तुम्हालाही माहीत आहे आत ते जोडपं काय करत आहे ते.
(तज्ञ आता एक त्रिकोण दाखवतात)
तज्ञ: बरं आता काय दिसतं आहे?
मनुष्य: आता तर तीघंजण ??? अहो डॉक्टर काय लावलय काय तुम्ही मगासपासून???
तज्ञः हे पहा माझं निदान झालं आहे. तुमच्या डोक्यात अतिशय चावट विचार भरलेले आहेत. यु आर अ परव्हर्ट.
मनुष्य : छान!!!!!! म्हणजे मगासपासून तुम्ही भलती सलती चित्र मला दखवत आहात आणि पर्व्हर्ट ठरतोय मी. याला म्हणतात चोराच्या उलट्या...
31 Oct 2010 - 7:50 pm | स्वानन्द
मी तुम्हाला त्यांच्यातून वगळले हो. तुम्ही आपलं एक बिंदू... आपलं सॉरी एक षटकोन दाखवला... आणि या झाल्या सुरू!
जाऊ दे ना आपण नाही लक्ष द्यायचं ;)
31 Oct 2010 - 7:54 pm | शुचि
डॅम्बीस कुठचे ..... हा बरा कावा आहे आमचा डाव आमच्यावर उलटवण्याचा. हा हा हा .... कसली हसतीये. मज्जा!!!!
31 Oct 2010 - 11:21 pm | मृत्युन्जय
त्रिकोणात ३ कोन असतात. षटकोनात सहा. ;)
31 Oct 2010 - 7:48 pm | स्वछंदी-पाखरु
शुचि तै,
ह्याला म्हणतात... सोताच लपवण्यासाठी दुसर्याच उघड दाखवणे
31 Oct 2010 - 7:22 pm | गोगोल
तुम्ही गृहशोभिकेत लिहीत होता काय?
31 Oct 2010 - 8:47 pm | शुचि
नाही हो पण तशा प्रकारचा विषय झाला आहे खरा.
1 Nov 2010 - 12:09 am | शिल्पा ब
अय्या फक्त हाच नाही काही !! ;)
31 Oct 2010 - 10:15 pm | अनुप्रिया
काय बोलू?? माज्झे शब्दच संपले.
31 Oct 2010 - 11:38 pm | चित्रा
अगदी मोकळेपणाने बोला. याआधीही असे विषय मिपावर आले आहेत.
बायकांचे फोटो दाखवणारे इ. इ. तेव्हा चर्चा झाल्या आहेत. तेव्हा इथे केवळ एका स्त्रीने असा विषय चर्चेसाठी घेतला म्हणून शब्द संपू नयेत. :)
शिवाय शुचि यांनी लेख उघड आणि मोकळेपणाने लिहीला आहे असे माझे मत झाले.
स्त्रियांना आणि पुरुषांनाही एकंदरीत प्रेमाची, स्थैर्याची अपेक्षा पूर्ण करणारा जोडीदार हवा असतो असे म्हटले तरी पुरेसे होईल. बाकी म्हणजे डीटेलिंग झाले. त्यात अमूक प्रकारचे नाक असलेला, तमूक उंची असलेला अशाही कॅट्यागरी येतात. त्याही त्या त्या व्यक्तीपुरत्या ठीक आहेत. पण त्यापलिकडे जाऊन काही बघत असावेत ते म्हणजे विशेषतः प्रेम, स्थैर्य इ. लाँग टर्मसाठीच्या गोष्टी.
बॅड बॉय बहुदा थोड्या वेळापुरते म्हणजे जेवणातल्या लोणच्यापुरते वगैरे ठीक असावेत (अनुभव नाही!). नेहमी नेहमी अशा लोकांबरोबर जगणे म्हणजे बहुतेक पळून जावेसे वाटत असावे.
1 Nov 2010 - 12:05 am | शिल्पा ब
लोणचं खावं वाटतंय की काय? ;)
1 Nov 2010 - 12:39 am | Nile
म्हणजे वरील प्रकारचे आणि ह्या लेखासारखे लेख 'यावेत' असे तुम्हाला वाटते का? 'बायकांच्या फोटो दाखवणार्या' लेखामध्ये तुमची भुमिका उलट होती अस मला आठवते आहे. आता मात्र अशा लेखांना तुमचे प्रोत्साहन आहे असे दिसते आहे.
1 Nov 2010 - 1:39 am | शुचि
नाइल या लेखात मी कोणताही फोटो दाखवत नाहीये. विषय हलका फुलका आहे म्हणून तुमचं पोटशूळ उठतय का? तुम्हाला फक्त विचारजंती खडाष्टकी लेख्च वाचण्यात रस असेल . सगळ्यांना नसेल.
1 Nov 2010 - 6:01 am | Nile
मी तुम्हाला काहीही म्हणलेले नाही. तुमचे चालुद्या.
1 Nov 2010 - 2:21 am | चित्रा
प्रोत्साहन आहे असे मी लिहीले आहे का?
पण पुरुषांच्या सौंदर्याचे उठवळ प्रदर्शन करण्याची गरज न पडता जो लेख शुचि यांनी लिहीला, त्याबद्दल त्यांचे कौतुक वाटते.
तुम्हाला स्त्रियांच्या लेखनातील मोकळेपणाचा इतका जाच होत असेल असे वाटले नव्हते. का इथेही परत पूर्वीचे "सम आर मोअर इक्वल" वगैरे?! ;)
आणि शिल्पातै, अनुभव नाही याचा अर्थ अनुभव घेण्याची इच्छा आहे असा नाही. तरी, विचारलंतच म्हणून - आम्ही जेवणच चटकदार बनवतो. ;) लोणच्याची मग गरज नाही वाटत.
1 Nov 2010 - 6:01 am | Nile
याचा अर्थ या प्रकारचे विषय 'वेलकम' आहेत असा मला लागला.
मला ह्या विषयाचा किंवा इतर कुठल्या मोकळेपणाचा जाच आहे असे मी तरी कुठे म्हणले नाही. त्याशिवाय, 'फोटो दाखवण्यार्या' लेखांवरील भुमिका पाहिल्यास 'सम आर मोअर' इक्वलचा आरोप माझ्यावर लावला नसतात. तुमच्या भुमिकेतील फरकाचे आश्चर्य वाटल्याने केलेला प्रश्न होता. तो धाग्यापेक्षा थोडा महत्त्वाचा वाटल्याने(का ते स्पष्टच आहे) धाग्यावर विषयांतर केले.
1 Nov 2010 - 7:16 am | चित्रा
>> मला ह्या विषयाचा किंवा इतर कुठल्या मोकळेपणाचा जाच आहे असे मी तरी कुठे म्हणले नाही.
मान्य. मग त्याच न्यायाने त्यातून तुम्हीही मला 'असे' विषय 'वेलकम' आहेत असा जावईशोध कुठून लावलात?
मला शब्दच संपले हा प्रतिसाद काहीसा आश्चर्यकारक वाटला. इथे नक्की काय अश्लील आहे, पाचकळ आहे, हे दाखवून द्याल की बोलतीच बंद व्हावी? का मोकळेपणा बोलती बंद करण्यासारखा वाटला? म्हणून असे लिहीले होते एवढेच. बोलण्याचा मोकळेपणा मी नक्की 'वेलकम' करते. विशेषतः ते बोलणे वैयक्तिक, अश्लील, किंवा आगाऊपणाचे नसले तर. म्हणून आधीच्या धाग्यांचाही संदर्भ दिला की असे धागे आधीही येऊन गेले आहेत. अनुप्रिया या जुन्या सदस्य आहेत. तेव्हा त्यांना बहुदा माहिती असावे म्हणून आठवण करून दिली.
तुमच्या भुमिकेतील फरकाचे आश्चर्य वाटल्याने केलेला प्रश्न होता. तो धाग्यापेक्षा थोडा महत्त्वाचा वाटल्याने(का ते स्पष्टच आहे) धाग्यावर विषयांतर केले.
भूमिकेत फरक नाही. शुचि यांचा लेख पुरुषांच्या अॅब्ज आणि तत्सम गोष्टींवरून असता तर तुम्ही म्हणता ते माझी भूमिका अशी नसती. स्वभाववैचित्र्ये आणि त्यामुळे असलेले प्रेफरन्सेस (आवडीनिवडी) अशा प्रकारे लिहीलेल्या लेखाला नावे ठेवण्याचे कारणच मला कळलेले नाही एवढेच म्हणते.
1 Nov 2010 - 7:33 am | Nile
ह्या ओळींचा अर्थ तुम्हीच मला समजावुन सांगा बरं, कदाचित माझीच आकलनशक्ती कमी असेल.
मी काढलेला अर्थ.
"अगदी मोकळेपणाने बोला.याआधीही असे विषय मिपावर आले आहेत".
म्हणजे अश्या विषयांचे मिपाला वावडे नाही, तसेच तुमचे मत अश्या विषयांवर मिपावर मोकळेपणाने बोलायला काहीच हरकत नाही उलट तुमचे बोलायला प्रोत्साहनच आहे.
असे म्हणजे कुठले ब्वॉ?
" बायकांचे फोटो दाखवणारे इ. इ. तेव्हा चर्चा झाल्या आहेत."
तेव्हा चर्चा झाल्या आहेत, पण मग तेव्हाच्या चर्चेची निष्पत्ती अश्या धाग्यांवर मोकळेपणाने बोला अशी आहे काय? तुम्ही तरी तेव्हा 'चर्चा झाल्या आहेत' यामध्ये अधिक काही लिहित नाही. म्हणजे तुमच्या मते निष्पत्ती 'हरकत नाही' अशीच आहे असा अर्थ कसा नाही बरे.
तसा नसता तर मी किंवा इतरांनी तरी पुर्वी अश्या धाग्यांवर चर्चा झाली आहे, अमुकतमुकता वगळली तर धागे चालावेत असे लिहले असते असे मला वाटते, यात काही चुक असेल तर दाखवावे.
1 Nov 2010 - 9:18 am | चित्रा
प्रोत्साहन आहे असे वाटत असले तर खुशाल समजा. समजा माझे प्रोत्साहन आहे, असे वाटते आहे तर टाका एखादा असा धागा - अर्थात मिपाच्या धोरणात बसेल असा ;) मग तिथे चर्चा करू. इथे कशाला हायजॅक करायची शुचि यांची चर्चा?
1 Nov 2010 - 11:17 am | शिल्पा ब
अय्या इतकं रागवायला काय झालं?
स्त्रियांना सुद्धा पुरुष आवडतातच आणि त्याची थोडी चर्चा केली तीसुद्धा अश्लीलता गाळून तर काय हरकत आहे? आम्ही काही म्हणतो का इथे बघा तिथे बघा करत फोटोची लिंक दिल्यावर? मग?
1 Nov 2010 - 11:20 am | पंख
>>स्त्रियांना सुद्धा पुरुष आवडतातच आणि त्याची थोडी चर्चा केली तीसुद्धा अश्लीलता गाळून तर काय हरकत आहे?
-- ईथल्या पुरूषांनाही पर -पुरुष आवडतात असे तुमचे म्हणने आहे काय ?
1 Nov 2010 - 11:36 am | शिल्पा ब
असेल बॉ..आपल्याला काय माहीत?
1 Nov 2010 - 11:47 am | पैसा
http://www.misalpav.com/node/14276
इथे अतिशय "उद्बोधक" चर्चा झाली होती...
1 Nov 2010 - 5:54 pm | चित्रा
तुमच्यावर कोण रागावणार?
31 Oct 2010 - 10:28 pm | प्रशु
टाइम्स मधला लेखाचा परिणाम वाटतं...
तो गेल्या आठवड्यात एक सर्वे आला होता तो...
31 Oct 2010 - 11:27 pm | चिगो
समजा वाटल्यास... पण
फेब्रुवारीमधे त्यांना मुलगी होणार आहे पण पूर्ण लंच सगळ्यांना त्याच विषयावर वेठीला धरण्याचं कारण नव्हतं.
अहो, जन्मपुर्व लिंग-निर्धारण कायद्यानं गुन्हा आहे, हे सांगा त्याला..
31 Oct 2010 - 11:46 pm | मृत्युन्जय
अहो ते भारतात. परदेशात नसेल कदाचित. शुचितै अंतरं मैलात मोजताहेत. म्हणजे बहुधा अमेरिकेतल्या असव्यात त्या. तिकडे असेल कदाचित कायदेशीर. तिकडे काही लोकं लिंगनिदान झाल्यावर मुलगी असल्यास गर्भपात करुन घेत नसतील.
1 Nov 2010 - 12:08 am | मी-सौरभ
हा तर कौलाचा विषय आहे...:)
मला एकच प्रश्न पडतो...
सामान्य पोरींना नायक लोक भुरळ पाडतात पण नायिका मात्र सामान्यतः त्यांच्याकडे आकर्षित झालेल्या दिसत नाहीत. ???????
असं का असाव??
1 Nov 2010 - 12:14 am | जाई अस्सल कोल्हापुरी
बा सौरभा,
का असं होतय तुला...कधीपासून होतं? वेळीच निदान करुन घे बरं... (ह्.घे.)
( नक्की काय म्हणायचंय तुला ही का sssssss ही समजले नाही!)
can you explain please?
1 Nov 2010 - 7:21 am | मुक्तसुनीत
धाग्याबद्दल मौनम् सर्वार्थ साधनम् :-)
मात्र, बायकांचे फोटो असणारे धागे येतात म्हणून असे धागेही यावेत हा युक्तिवाद मला रोचक वाटला खरा.
1 Nov 2010 - 12:18 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
>> बायकांचे फोटो असणारे धागे येतात म्हणून असे धागेही यावेत हा युक्तिवाद मला रोचक वाटला खरा. <<
बायकांचे फोटो असणारे धागे आले असताना त्यांना विरोध न करता इथे मात्र लेबलं चिकवटणं रोचक वाटलं खरं! काय वाचावं आणि काय वाचू नये याची निवड हातात असताना मुद्दामच 'गृहशोभिका' उघडायचं आणि वर त्यात 'स्टारडस्ट'टाईप चित्रं न दिसल्याने कटकट करायची हे पटलं नाही.
1 Nov 2010 - 10:36 pm | आर्या
बायकांचे फोटो मेन पेज वर असत होते तेव्हा, दंगा न करणारे कुठे गेले काय माहिती बै !
1 Nov 2010 - 5:50 pm | चित्रा
मी चर्चा मोकळेपणाने करा, एवढेच म्हटले. कारण शब्द संपण्याचे कारण मला कळत नाही.
शुचि यांना ताप होतो बरेचदा याचे कारण त्या या विषयांवरचे धागे सरळ भिडस्तपणा न ठेवता टाकतात आणि त्या स्त्री आहेत. असाच धागा पुरुष टाकतो तेव्हा त्याला शब्द संपतात, असे प्रतिसाद येत नाहीत. म्हणून माझा मूळ मुद्दा एवढाच आहे की "तेव्हा इथे केवळ एका स्त्रीने असा विषय चर्चेसाठी घेतला म्हणून शब्द संपू नयेत."
बाकी माझे मत काय आहे ते मांडलेलेच आहे.
1 Nov 2010 - 8:21 pm | मितान
+ १
अदिती आणि चित्राशी सहमत !
कोणताही पुरूष हा थेट त्याच्याशी कोणतंतरी नातं जोडता आलं किंवा शक्यता असली तरच आवडला पाहिजे का ? सहज जाता जाता निव्वळ 'दिसलेला' कोणी आवडू शकतो. चार तासांच्या प्रवासात सहप्रवासी असलेला आवडू शकतो किंवा नावडू शकतो. यात शुचीनी मांडलेले मुद्दे उदाहरण म्हणून घ्या. त्यात एका स्त्रीने हे लिहावं यात 'नवल' वाटण्यासारखे काय !!! असे नवल वाटणारे पुरूष मित्र हे ही काही नवल नाही ;)
1 Nov 2010 - 11:43 pm | प्राजु
हेच म्हणते. आदिती आणि चित्रा ताईशी पूर्णपणे सहमत आहे.
1 Nov 2010 - 11:31 am | परिकथेतील राजकुमार
एकुणच धागा आणि त्यावरच्या 'चर्चा' वाचुन चुकून 'हळदी कुंकवाच्या' कार्यक्रमाच्या हॉलमध्ये शिरल्यासारखे वाटले.
बाकी चालु द्या...
अवांतर :- मिपाला आता खरडफळ्याची खरच गरज उरली आहे का ? (हे स्वगत आहे. मिपा पदाधिकारी वर्गाला उद्देशुन हा प्रश्न नाही.)
1 Nov 2010 - 12:00 pm | सुहास..
शुचि लेख आवडला ,
प्रश्न हा पडला की 'त्या' पुरूषांना कसे पुरुष आवडत असतील. आणी 'त्या' स्त्रियांना कश्या प्रकारच्या स्त्रिया आवडत असतील ?
अवांतर : 'त्या' स्त्रियांच्या सत्यकथेवर आधारित http://en.wikipedia.org/wiki/Monster_(2003_film) (मॉनस्टर) नक्की पहावा.
1 Nov 2010 - 1:32 pm | Dhananjay Borgaonkar
शुचि, एक धमाकेदार लेखमाला होऊनच जाउदे यावर :)
1 Nov 2010 - 5:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शुची यांचे लेखन आणि त्यावर आलेले प्रतिसाद आवडले. :)
-दिलीप बिरुटे
1 Nov 2010 - 6:11 pm | धमाल मुलगा
निवांत : हापिसात जाणे, पगार घरी आणणे आणि निवांत जगणे. 'हेच का केलंस? तेच का नाही केलंस' वगैरे प्रश्नांच्या भानगडीत पडण्याचा कंटाळा असलेले पुरुष. बर्याचदा अशा पुरुषांना वाचनाचा किंवा टिव्ही/सिनेमे पाहण्याचा नाद असतो. त्यांना अगदी रोजचं वर्तमानपत्रदेखील पुरवुन पुरवुन, 'छोट्या जाहिराती'सकट वाचायची हौस असते. अशा प्रश्नांमध्ये डोकं घातल्यास वाचनाची समाधी भंग पावते, रसभंग होतो त्यामुळं 'हे पैसे! तुला मी कधी काही अडवलंय का तुला काय हव्वं ते कर ना प्रिये!' वगैरे गोग्गोड टाकून बर्याचशा झेंगटातून स्वतःला सोडवून घेत, सोफ्यावर लोळत टिव्ही किंवा पुस्तकं वगैरे वाचनाचा आनंद घेणारे पुरुष. अशा निवांत पुरुषांचा एक फायदा असतो, की त्यांचं डिट्टेलिंगकडं फारसं लक्षच नसतं. त्यामुळं वादाचे फार प्रसंग येत नाहीत. अर्थात काही स्त्रीया अशा पुरुषांना 'निर्लज्ज' वगैरे शेलकी विशेषणं लाऊन बदनाम करतात, पण त्याकडे लक्ष देण्यापेक्षा होणारा फायदा हा जास्त फायदेशीर असतो. ;)
(असं मला एकुण ८ स्त्रीयांनी पटवून दिलं होतं, त्यातल्या शेवटीच्या गळाला लागलोच. ;) =)) )
1 Nov 2010 - 6:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>> असं मला एकुण ८ स्त्रीयांनी पटवून दिलं होतं,
पुरुषांना अशी वाढीव संख्या सांगण्यात मोठा रस असतो. ;)
[याला म्हणायचं पुरुषी अहंकार]
धमाल, पुरुषांना कशा प्रकारच्या स्त्रीया आवडतात यावर एक धागा काढा राव.
दिवाळीचा फराळ करता करता चर्चा करु, काय म्हणता ?
-दिलीप बिरुटे
1 Nov 2010 - 6:22 pm | धमाल मुलगा
काय हे गुर्जी? वाढीव काय राव? स्वतःचा छळ कशाला कोण वाढवून सांगतो का? :(
>>[याला म्हणायचं पुरुषी अहंकार]
अत्यंत पाशवी प्रतिसादामुळे माझ्या कोमल मनास इंगळ्या डस्ल्या हे मी इथे खेदानं नमुद करु इच्छितो.
अहो, पुरुषांना अहंकार बाळगायला हल्ली परवानगी आहे का? ;)
(पळा आता...नायतर खातंय पाशवी मार )
>>धमाल, पुरुषांना कशा प्रकारच्या स्त्रीया आवडतात यावर एक धागा काढा राव.
हा हा हा...इकडं नको. तुम्ही एखादा दिवाळी अंक काढा,त्याला देतो लेख ;) (पर्या गप...मी मचाकला कथा देणार नैय्ये.)
>>दिवाळीचा फराळ करता करता चर्चा करु, काय म्हणता ?
जरुर जरुर...पण त्यापायात आपलं दिवाळं काढेल इथलं पब्लिक त्याचं काय? घाबरके रैना पडता है भिडू... :D
1 Nov 2010 - 6:28 pm | परिकथेतील राजकुमार
अहों धागा कशांला ?
अरे धम्या प्रा.डाँ. ना मचाकची लिंक दे. एक थिसेसच लिहुन होईल येवढी माहिती मिळेल त्यांना.
1 Nov 2010 - 6:33 pm | कुंदन
थिसेस नंतर मग काय , प्रा डॉ हे डब्बल डॉ होतील.....प्रा डॉ (डॉ)
1 Nov 2010 - 6:48 pm | अवलिया
मस्त धागा ! :)
1 Nov 2010 - 7:16 pm | योगप्रभू
(प्रतिक्रिया केवळ विनोद निर्मितीसाठी. ह. घेणे)
शुची,
स्त्रियांना विशेषतः विवाहानंतर आवडणार्या पुरुषांच्या कॅटॅगरीत एक अॅड करावी म्हणतो. अनुभवाचे बोल.
नंदीबैल पुरुष : हे नेहमीच बायकांच्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्या चेहर्याकडे बघून, अंदाज घेऊन देतात. स्वतःची फारशी अक्कल चालवत नाहीत. खरेदीच्या वेळी पिशव्या सांभाळायला, गाडी थांबल्यावर/ सिनेमाच्या मध्यंतरात वडापाव-कोल्ड्रिंक व पाणी आणायला, बाहेर गेल्यावर लहान मुलांच्या हमखास होणार्या 'शिशु'कार्यक्रमांवर निरीक्षक म्हणून अशा अनेक प्रसंगी हे पुरुष उपयुक्त ठरतात. यांचे पाकिट किंवा कार्ड बायकोच्या ताब्यात असते. यांचा वर्षातून एकच सण म्हणजे 'बैलपोळा'. तो दिवाळीच्या पाडव्याला असतो. त्या दिवशीच बायका उपचार म्हणून यांना अंघोळ घालतात व केवळ त्याच प्रसंगी दोन बोटे तेल चोपडतात. बैलाचे पोवळे खाजवल्यावर तो मान वर करत जातो तसे हे पुरुष अंगावर आणखी हात फिरेल या अपेक्षेने वर पाहतात. अशावेळी चतुर बायका गडबडीने बाहेर जाऊन औक्षणाचे तबक आणतात आणि काही सेकंदात ओवाळून पळ काढतात. पुन्हा 'बाबाच्या अंघोळीला फुलबाज्या लावा' असे सांगून मुलांना स्नानगृहाच्या दाराशी उभे करतात. या अल्पकालीन उपकाराचा मोठा मोबदला त्या पुरुषांकडून त्या दिवशी वसूल करतात.
हे पुरुष बैल असले तरी झापड लावलेला घोडा आणि ओझ्याचे गाढव अशा भूमिकाही उत्तम वठवतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या अंगावर वस्सकन ओरडल्यास ते भांडणात माघार घेतात आणि 'बरं बाई. तुझं खरं' असे म्हणतात. या पुरुषांना इमोशनल ब्लॅकमेल करणे सोपे असते. जादा घरकाम/जड वस्तूंची हलवाहलव करायची असेल त्यावेळी स्वयंपाकघरात भांडी वाजवत एकच वाक्य म्हणायचे ' त्या सुयोगचे वडील बघा. किती मदत करतात घरात. नाहीतर इकडे. आमचे नशीबच मेले खोटे' हे ऐकल्यावर बैलोबा निमूट उठून काम करतात. :)
1 Nov 2010 - 7:37 pm | धमाल मुलगा
हिट्ट्ट आहे हा प्रतिसाद. :D
1 Nov 2010 - 7:45 pm | यशोधरा
LOL! :d
1 Nov 2010 - 7:47 pm | अवलिया
हा हा हा
लै भारी !!
1 Nov 2010 - 7:56 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
५००% सहमत!
मला स्वतः ला जरी आवडत नसले तरी बहुसंख्य एस्त्रीयांना ही क्याट्यागिरी आवडतेच आवडते.....! :)
1 Nov 2010 - 8:10 pm | शुचि
माझ्या साधारण (आधी सुमारच लिहीलं होतं) लेखाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणारा प्रतिसाद.
जिओ शब्दप्रभू!!
1 Nov 2010 - 8:24 pm | मितान
अग्गं माय !!! ( तोंडावर पदर ठेऊन दात न दाखवता हसणारी बाहुली ) =))
1 Nov 2010 - 9:27 pm | श्रावण मोडक
आत्ता कळलं, तुमचं नाव योगप्रभू का आहे ते! ;)
1 Nov 2010 - 9:29 pm | धमाल मुलगा
_/\_
धन्य!
1 Nov 2010 - 10:32 pm | शिल्पा ब
:D आणि इथे अजून एक लोळेरी स्मायली समजून घेणे...
लै भारी...
1 Nov 2010 - 10:52 pm | बेसनलाडू
कडक प्रतिसाद. जवळजवळ सर्वच विवाहित पुरुषांना पटण्यासारखा!
(विवाहित)बेसनलाडू
यावरून आमच्या बैल या विडंबनाची आठवण झाल्याशिवाय राहवले नाही.
(स्मरणशील)बेसनलाडू
2 Nov 2010 - 11:54 pm | मिसळभोक्ता
साला, आमचे आत्मचरित्र लिहिण्याचे काम योगप्रभूंना औटसोर्स केले आहे.
1 Nov 2010 - 11:18 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
माझ्या एका मित्राला मैत्रिणींबरोबर गंमतीत आणि मैत्रीत फ्लर्टची फार सवय आहे; जेवढी मैत्री जास्त तेवढं याचं फ्लर्टींग जास्त! त्याच्या गर्लफ्रेंडलाही या सगळ्याची मजा वाटते आणि ती पण माझी खूप चांगली मैत्रीण आहे. तो सगळ्यांचा खूप चांगला मित्र आहे याचा आनंद होतो आणि तिला हे असं इतर मैत्रीणींशी केलेलं मैत्रीखात्यातलं फ्लर्टींग आवडतंही. कधीमधी तीसुद्धा काड्या लावत बसते. आमच्या एकूणच मित्रमंडळात हा मित्र खूप लाडका आहे हे वेगळं सांगायची गरज नसावी.
सामान्यतः मुलींना मुलगी म्हणून न वागवणारे, एक माणूस म्हणून वागवणारे लोकं मला आवडतात, अशा लोकांशी माझी मैत्री चटकन होते.
1 Nov 2010 - 11:22 pm | मुक्तसुनीत
सामान्यतः मुलींना मुलगी म्हणून न वागवणारे, एक माणूस म्हणून वागवणारे लोकं मला आवडतात, अशा लोकांशी माझी मैत्री चटकन होते.
प्रतिसादामधले हे वाक्य १०० टक्के पटले.
2 Nov 2010 - 5:04 pm | बिपिन कार्यकर्ते
+२ ... पटले.
(सामान्य मुलींना माणूस म्हणून वागवणारा) ;)
2 Nov 2010 - 5:26 pm | धमाल मुलगा
सामान्य हा शब्द काळजाला भिडला, अंमळ हळवा झालो आणि डोळे पाणावले.
(नो थ्यांक्स बिरुटेसर, रुमाल आहे माझ्याकडं, तुम्ही पाठीवरती हात ठेऊन फक्त लढ म्हणा!)
2 Nov 2010 - 5:27 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
भेटा एकदा!*
*ही धमकीच आहे.
1 Nov 2010 - 11:22 pm | पिवळा डांबिस
इश्य!!
कसचं कसचं!!
;)
1 Nov 2010 - 11:35 pm | शिल्पा ब
अय्या इतकं काय लाजायचं ते !! ;)
1 Nov 2010 - 11:39 pm | पिवळा डांबिस
शी बै!
काहीच कळत नाही हिला!!
;)
1 Nov 2010 - 11:38 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
काका, माझा हा मित्र आता अमेरिकेत असला तरी मी त्याच्याबद्दल बोलते होते, तुमच्याबद्दल नाही! ;-)
1 Nov 2010 - 11:41 pm | पिवळा डांबिस
रापचिक रापचिक, कूल कूल!!
:)
1 Nov 2010 - 11:46 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
भेटा तुम्ही एकदा!*
*ही धमकी नव्हे!! :-D
1 Nov 2010 - 11:39 pm | शुचि
>> मुलींना मुलगी म्हणून न वागवणारे, एक माणूस म्हणून वागवणारे लोकं मला आवडतात >>
वय वाढेल तसे असेच लोक जास्त भेटतात ग बाई. लहान आहेस तोवर मुलगी म्हणून वागावणं एन्जॉय करून घे. ;)
गम्मत करतेय :)
1 Nov 2010 - 11:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हॅ हॅ हॅ ... वय वाढेल तेव्हा मुलगी म्हणून वागवणारे जास्त आवडतील! ;-) पुढचं पुढे ... आणि तेव्हा हे मित्रंही म्हतारे 'काका'च झाले असतील ना!!
एखाद्या मुलाशी चांगली दोस्ती झाली आहे हे समजण्याचे उपाय म्हणजे बर्याचदा 'ही काय मुलगी आहे का?' अशी वाक्य कानावर येतात. नाहीतर स्कूटर, बाईक सर्व्हीसिंगला टाकायची असताना मुलं लिफ्ट मागतात.
मी सध्या भलत्या काहीतरी विषयात नोकरी करत असल्यामुळे मुली ही अतिशय दुर्मिळ वस्तू आहे. त्यातही माझ्यासारख्या टवाळ पोरीच आजूबाजूला जास्त! त्यामुळे बर्याचदा अनिच्छेनेही मुलगी आहे यावरून "एन्जॉय" करून घेते.
1 Nov 2010 - 11:58 pm | राजेश घासकडवी
इतक्या महत्त्वाच्या विषयावरचा लेख अस्थायी किंवा अश्लील किंवा कोणी सुरू केली आहे व तिच्यात चित्रं आहेत की नाहीत अशी चर्चा का व्हावी ते कळलं नाही. मूळ लेखातल्या यादीत थोडी भर. यातल्या काही गोष्टी स्त्री व पुरुष दोहोंना लागू पडतात.
१. 'विनोदबुद्धी असलेले' - जग गमतीदार आहे असा दृष्टीकोन असणारे, आणि ती गंमत शेअर करण्यात उत्साह दाखवणारे कोणाला आवडणार नाहीत?
२. 'संगीताचं अंग असलेले' - ज्यांना एखादं वाद्य वाजवता येतं अशांना स्वरांच्या माध्यमातून मोहिनी टाकता येते. निदान रसिकपणे कानसेन असणंही महत्त्वाचं असतं.
३. 'खेळांमध्ये प्रवीण असलेले' - म्हणजे अर्थातच अगदी सचिन तेंडुलकर नाही, पण काहींना जात्याच खेळांमध्ये गती असते. हालचाली सौष्ठवपूर्ण असतात.
४. 'सकारात्मक भूमिका असलेले' - हातपाय गाळून बसणे, तक्रार करणे याऐवजी उत्साहाने सगळ्याला सामोरं जाणारे.
2 Nov 2010 - 12:03 am | Nile
गुर्जी, तुमचे यशस्वी फार्म्युले काम नाही ना करुन राह्यले इथं!
-इनोद सकारात्माराम खेळकर.
2 Nov 2010 - 9:58 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
गुर्जींना अंमळ उशीर झाला ना ... असो!
2 Nov 2010 - 8:49 pm | Nile
नाही नाही, उशीरच असा काही झालेला नाही. फार्म्युले काम करत नाहीएत इतकंच सांगतोय आम्ही. आणि उशीराचा बाबतीत म्हणाल तर बेटर लेट.... यु नो!
2 Nov 2010 - 12:15 am | श्रावण मोडक
आवरा राव आता. आत्ता या दोन छोट्या चकमकी वाचून फुटायची वेळ आली. ;)
2 Nov 2010 - 12:25 am | Nile
विरोधाचा क्षीण प्रयत्न! ;-)
2 Nov 2010 - 1:31 am | सुहास..
तरुणाईच्या जाहीरातबाजीचा क्षीण प्रयत्न !!
अवांतर : लगेच खरडी करु नयेत , सिनियर सिटीझन्सशी आम्ही भांडत नाही हे तरी कितिवेळा सांगायच !!
2 Nov 2010 - 9:56 am | स्वानन्द
बरं ते सगळं राहू दे.... लग्न झालेल्या तुम्हा मुरांब्यांना विचारतो... लग्न करावं की नाही मग आम्ही?
2 Nov 2010 - 8:29 pm | पैसा
जो खाए वो पछताए, न खाए वो भी पछताए! कळलं?
(आणि हा १०० वा प्रतिसाद)
2 Nov 2010 - 8:55 pm | धमाल मुलगा
कसं आहे ना मित्रा,
वाघोबा म्हणलं तरी खातो, अन वाघ म्हणलं तरी खातो..मग जरा लढून, मजा करुन, सोबत थोडं जगुन पहावं असं माझं मत आहे. :)
2 Nov 2010 - 4:01 pm | इंटरनेटस्नेही
हम्म्म्म वाचतोय... :)
(सकारात्मक, मार्दवपुर्ण, आणि सिंगल) इंट्या.
2 Nov 2010 - 4:39 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
"मी सिंगल आहे", "मी लहान आहे", "माझं वय अमुकतमुक" असं बोंबलणारी बाळं बर्याचशा मुली-बायकांना आवडत नाहीत असं माझं आणखी एक निरीक्षण नमूद करते.
2 Nov 2010 - 4:48 pm | परिकथेतील राजकुमार
अशा मुली-बायका चाईल्ड अॅब्युजला प्रोत्साहन देतात असं माझं आणखी एक निरीक्षण नमूद करतो.
2 Nov 2010 - 5:28 pm | धमाल मुलगा
अग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्गं !!!!!!!
प्रिय मित्र प.रा.,
तू चाइल्ड हेल्पलाइनला कॉल घेतोस की करत असतोस? ;)
2 Nov 2010 - 6:05 pm | परिकथेतील राजकुमार
जसा मूड असेल त्यावर डिपेंड ;)
2 Nov 2010 - 4:50 pm | इंटरनेटस्नेही
ही ही ही... जबरी... जोरदार ठसका लागला.. :D
(बोबंलणारं बाळ) इंट्या, (इयत्ता - पहिली - अ)
असो. सिरिअसली, मी तुमची सुचना विचारात घेतली आहे. धन्यवाद. :)
3 Nov 2010 - 6:20 pm | वाहीदा
उगीच आपली जाहीरातबाजी करु नये बाळा ;-)
3 Nov 2010 - 8:44 pm | इंटरनेटस्नेही
हो ना.. पण कधी कधी इतकं 'डेस्पो' व्हायला होतं की विचारता सोय नाही..
4 Nov 2010 - 12:32 pm | वाहीदा
'डेस्पो' म्हणजे काय रे भाऊ ?? :-?
ॠषि, अभ्यासात लक्ष घाल ;-)
4 Nov 2010 - 3:58 pm | इंटरनेटस्नेही
डेस्पो म्हणजे डेस्परेट.. मला वाटलेलचं की तरुणाईचे शॉर्टफॉर्म्स तुमच्या जमान्यातील लोकांना कळनार नाहीत म्हणुन... :D
.. अभ्यास सुरु आहे... लेट्स सी..
4 Nov 2010 - 4:12 pm | वाहीदा
क्यूं बच्चू,
दूध के दात निकले नहीं और अभी से डेस्पो ?? ;-)
4 Nov 2010 - 4:27 pm | इंटरनेटस्नेही
:D .. परा हे आमचे सर्वच बाबतीत आर्दश आहेत! परा यांच्या सारखा संत सज्जन मागील १०,००० वर्षांत झाला नाही आणि पुढेही होणार नाही कदाचित!
4 Nov 2010 - 4:31 pm | परिकथेतील राजकुमार
इंट्या... अरे दादा धाग्याचे शिर्षक निट वाच रे. ' स्त्रियांना कशा प्रकारचे पुरुष आवडतात' असा धागा आहे, 'पुरुषांना कशा प्रकारचे पुरुष आवडतात] असा नाहीये.
4 Nov 2010 - 4:44 pm | इंटरनेटस्नेही
पराशेठ, ही ही ही.. जबरी!
__/\__
आमचा प्रणाम स्वीकारावा!
___________________
सहजराव,
थांबतो आता. :)
2 Nov 2010 - 6:03 pm | नरेशकुमार
सलमान खान आवडतो.
2 Nov 2010 - 8:22 pm | वेताळ
व प्रदीपकुमार नायक का झाला ते कळाले.
3 Nov 2010 - 6:18 pm | वाहीदा
भारतभूषण अन प्रदिपकुमार वरिल सर्व गुण त्यांच्याकडे होते म्हणून नायक झाले? अन ते स्रियांना आवडतात ?? ==)) ==))
हे नविनच कळले . लेकीन यह बात कुछ् हजम नहीं हुई ! ;-)
बाकी शुची तुझा Bold (!) and Beautiful( ;-) ) लेख आवडला
~ वाहीदा
3 Nov 2010 - 6:30 pm | मृत्युन्जय
कदाचित स्त्रियांना मनोनिग्रही पुरुषही आवडत असावेत.
भारतभुषणचा मनोनिग्रह प्रचंड होता. समोर मधुबाला असताना देखील त्याच्या चेहेर्यावरची माशी सुद्धा कधी हलली नाही. अरे अशी मुलगी समोर असताना च्यायला विश्वामित्राची पण तपश्चर्या ढळली असती. आणि याच्या चेहेर्यावर कसलेच भाव नसायचे. जो माणूस मधुबालासमोर रॉमँटिक नाही होउ शकला त्याचा मनोनिग्रह किती कमालीचा पॉवरफुल्ल असेल विचार करा.
3 Nov 2010 - 6:33 pm | यशोधरा
>>भारतभुषणचा मनोनिग्रह >> =))) अगदी, अगदी! मला ते जिंदगीभर नहीं भूलेगी... गाणे आठवले आणि तो ठोंब्या भाभू!
3 Nov 2010 - 6:53 pm | वाहीदा
ठोंब्या !
यडपट, बावळट वाटायचा नुसता तो भारतभूषण
3 Nov 2010 - 7:08 pm | परिकथेतील राजकुमार
तुमच्या जमान्यातले बरेचसे हिरो तसेच होते ग ;)
3 Nov 2010 - 7:13 pm | वाहीदा
तुमच्या जमान्यातले म्हणजे काय रे हलकट्ट परा ??
आता तू भेटच मला, तुला या जमान्यातील नायिका काय इंगे दाखवू शकते ते सांगते ...
~ वाहीदा
3 Nov 2010 - 7:34 pm | परिकथेतील राजकुमार
इथे एक स्त्री सदस्या मला धमकी देत आहे. तरी क्रुपया संपादकांनी ह्याची दखल घ्यावी आणि मज पामरास अभय द्यावे.
3 Nov 2010 - 8:58 pm | पुष्करिणी
नायिका बोलतेय यांच्याशी तर यांना अभय हवाय , अरेरे :)
3 Nov 2010 - 9:07 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
>> ... तर यांना अभय हवाय ... <<
नशीब तरी आता एकमेव अॅक्टींग करणारा देओल मागतोय! ;-)
4 Nov 2010 - 12:29 pm | वाहीदा
इथे एक स्त्री सदस्या मला धमकी देत आहे. तरी क्रुपया संपादकांनी ह्याची दखल घ्यावी आणि मज पामरास अभय द्यावे.
हा ! हा ! हा !
माझे पाशवी हास्य तुझ्या पर्यंत पोहचले असेल बाकी तुझा interest एवढा बदलला असेल असे वाटले नव्हते हो कधी, "एकदम अभय हवाय" ?? :-? परा तुझी परी होत चालली की काय ? ;-)
क्या करें जमाना बदल रहा हैं , और तुम भी .. ;-)
4 Nov 2010 - 12:47 pm | परिकथेतील राजकुमार
आली आली पाशवी स्त्रीयांची कंपुधाड आली.
4 Nov 2010 - 4:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
तरीही दिला तुझा अभय! :p