फार पूर्वी एका सर्वोदय मासिकासाठी काही रेखाचित्रे काढली होती. (ती प्रकाशित झाली नाहीत हा भाग वेगळा)
पण राघव म्हणाला तसे cross hatching technique इथे वापरले होते. याने थोडा 3D effect आणता येतो. माझा हा कदाचित पहीला अणि शेवटचाच प्रयत्न असावा. परत चालू करावा वाटतो पण इच्छाशक्ती कमी पडते. :) :) :)


प्रतिक्रिया
30 Oct 2010 - 7:43 pm | सहज
दोन्ही चित्रे छान आहेत.
अजुन येउ द्या.
30 Oct 2010 - 8:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दोन्ही चित्रे छान आहेत.
अजुन येउ द्या.
30 Oct 2010 - 7:57 pm | श्रावण मोडक
छानच!
30 Oct 2010 - 8:04 pm | जयंत कुलकर्णी
फार म्हणजे फारच सुंदर. माझा सल्ला आहे की आपण ही कला सोडून देऊ नये. मला खात्री आहे थोड्याश्या सरावाने आपल्या हातून एक से एक चित्रे तयार होतील. स्केचींगची मजा काही औरच असते.
दर महिन्याला एक चित्र येथे टाकायची कल्पना कशी वाटते तुम्हाला ?
स्केचींग चालू करा !स्केचींग चालू करा !स्केचींग चालू करा !स्केचींग चालू करा !स्केचींग चालू करा !स्केचींग चालू करा !
:-)
अवांतर : आपण मिरज्/सांगली/मंगळ्वेढ्याचे आहत का ?
30 Oct 2010 - 8:12 pm | किल्लेदार
धन्यवाद....
पण आजकाल वेळ मिळत नाही.
मी विदर्भातला. पण सध्या मुम्बई-पुणे मधे असतो.
30 Oct 2010 - 8:19 pm | नगरीनिरंजन
मस्त!
31 Oct 2010 - 9:11 am | मदनबाण
वा... सुंदर. :)
स्केचींग चालू राहुन दे...
1 Nov 2010 - 12:17 pm | युयुत्सु
दूसरे स्केच जास्त आवडले
1 Nov 2010 - 7:46 pm | विकास
दोन्ही चित्रे फारच छान! मात्र दुसरे जास्त आवडले.
अजून रेखाटने येऊंदेत,
1 Nov 2010 - 11:02 pm | बेसनलाडू
(सहमत)बेसनलाडू
स्केचिंग पुन्हा चालू करा आणि चालू ठेवा.
(सल्लागार)बेसनलाडू
1 Nov 2010 - 11:08 pm | पैसा
वरच्या तिघांबरोबर सहमत.
(युयुत्सुंबरोबर सहमत म्हणायची वेळ आणली ह्यानी....)
1 Nov 2010 - 12:24 pm | आनंदयात्री
लै भारी रे किल्ल्या. मागच्या वेळचे फोटो पण उत्तम होते.
माझं रेखाचित्र काढणार का ?
1 Nov 2010 - 12:27 pm | इनोबा म्हणे
दोन्ही रेखाचित्रे आवडली.
माझं रेखाचित्र काढणार का ?
विनोबांच्या पोझमध्ये? :O
1 Nov 2010 - 12:32 pm | आनंदयात्री
>>विनोबांच्या पोझमध्ये?
किल्ल्या या छुप्या गांधीवाद्याचे पण गांधींच्या पोझमधे काढ रेखाचित्र मस्त सूत काततांना !!
1 Nov 2010 - 12:39 pm | इनोबा म्हणे
नको. त्यापेक्षा शेळीचे दूध काढतानाचा प्रसंग छान दिसेल.
1 Nov 2010 - 12:42 pm | आनंदयात्री
ठ्ठो !!
1 Nov 2010 - 4:45 pm | किल्लेदार
काढायला हरकत नाही. पण तुमचेच येइल याची आता खात्री देउ शकत नाही......:)
1 Nov 2010 - 12:27 pm | परिकथेतील राजकुमार
चाबूक !!
1 Nov 2010 - 12:46 pm | यशोधरा
रेखाचित्रे दिसत नाहीत.
1 Nov 2010 - 12:48 pm | आनंदयात्री
मंजे फ्ळिकर ब्याण आहे !!
1 Nov 2010 - 12:50 pm | यशोधरा
फ्ळिकर ब्याण >> :(
1 Nov 2010 - 3:07 pm | किल्लेदार
आता बोटांना शट् र क्लिक करायची सवय आहे. पेंसिल ची सवय गेली. तरी बघू कसे जमते ते.
1 Nov 2010 - 3:12 pm | आंबोळी
दादानु,
तुम्ही परत स्केचींग सुरू कराच... लै भन्नाट काढलित राव चित्रे....
दुसरे चित्र तर फारच जबर्या आलाय....
1 Nov 2010 - 4:50 pm | मराठमोळा
दोन्ही रेखाचित्रे मस्तच.
छंद चालु ठेवा, फार कमी लोकांना जमते अशी कला.
1 Nov 2010 - 7:43 pm | स्वाती दिनेश
दोन्ही चित्रे आवडली.
वेळ काढून स्केचिंग चालू ठेवा..
स्वाती
1 Nov 2010 - 11:11 pm | प्रियाली
दोन्ही रेखाटने सुरेख आहेत.
1 Nov 2010 - 11:32 pm | डावखुरा
छान...सगळ्यांकडुन प्रोत्साहन मिळालंय आता त्यापासुन प्रेरणा घेउन किल्लेदार साहेब जोमाने सरावाला लागतील अशी आशा करतो..
पण जयवंतराव महिन्यातुन एकदा का? मी तर म्हणेन रोज एक...
2 Nov 2010 - 1:21 am | किल्लेदार
आता एखादे तरी काढावेच लागेल....खरे तर विनोबांचे चित्र काढून चित्रसन्यासच घेतला होता.
2 Nov 2010 - 10:07 am | मोहन
दुसरे चित्र अप्रतिम. रेखाटने सुरू ठेवा विदर्भराज. तुमच्यामुळे इतरांनाही स्फुर्ती येवू शकते.
मोहन
2 Nov 2010 - 10:21 am | राघव
बर्याच जणांना दुसरं चित्र आवडतं.. पण मला खरंतर पहिलंच चित्र जास्त आवडतं.
पहिल्यातले बारकावे खरोखर अप्रतीम आहेत. ते तसे काढणे म्हणजे अक्षरशः हाल आहेत..
उदा: किंचित कुरळी लकब असलेले डोक्यावरचे काळसर पांढरे केस, पांढरी दाढी, चष्म्याच्या काचेचा ईफेक्ट आणण्याचा प्रयत्न (येथे काचेवरचे प्रकाशाचे रिफ्लेक्शन न दाखविता हे केलंय.. खरंच कठीण!), उजव्या हाताच्या बोटांची ठेवण दाखवतांना ध्यानात ठेवलेले बाकीच्या चित्राचे प्रपोर्शन.. हे एकदम सगळं जाणवत नाही पण काढून बघतांना समजतं कसली दमछाक करणारी गोष्ट ही! कशी काढली असेल यानं पांढरी दाढी?? :)
अवांतरः
कितीतरी वर्षांपासून सांगतोय पण या किल्लेदाराला मी सांगून बर्याच गोष्टी पटत नाहीत. इथं मिपावर आणण्यासाठीही कितीतरी महिने मला याच्या पाठीमागे लागावे लागले.
इतकी चांगली प्रतिभा आहे की ज्या कलेत हात घालेल तिथं सोनं करेल.. पण कुणाच्या बापाचं न ऐकण्याच्या स्वभावावर काय औषध?? म्हणून तर वर जेव्हा हा स्वतःच म्हणायला लागतो की एकतरी चित्र आता रेखाटावे, तेव्हा खरंच राहवत नाही... मिपा इज द बेस्ट स्टेज! :)
5 Nov 2010 - 11:05 pm | स्वप्निल..
मलापण पहिलेच जास्त आवडले .. बारकावे खरोखरच मस्त आहेत!
तसे दोन्हीही छानच!! अजुन येउ द्या!!
अवांतरः विदर्भात कुठे?
2 Nov 2010 - 2:25 pm | किल्लेदार
हा हा हा.... राघवा.......
माझ्या चित्रातल्या बारकाव्यांपेक्शा तुझे निरीक्षण जास्त बारीक आहे. ते असो. शिव्यांबद्दल धन्यवाद....!!!!
2 Nov 2010 - 2:26 pm | बिपिन कार्यकर्ते
दोन्ही सुंदरच ... अप्रतिम. पण मला दुसरे जास्त आवडले. जिवंतपणाचा फील दुसर्या चित्रात जास्त आहे.
5 Nov 2010 - 10:40 pm | चिगो
राजेहो.. क्काय मस्त स्केचींग केलंयस भाऊ, मस्त !! प्लिझ, तुमची ही कला जिवंत ठेवा.. शुभेच्छा...
(गुणांची कदर असलेला) चिगो