सावली देणारे पण ...

sagarparadkar's picture
sagarparadkar in काथ्याकूट
26 Oct 2010 - 6:43 pm
गाभा: 

माझ्या शेजारच्या आंगणातलं गुलमोहोराचं झाड चांगली सावली देत होतं. पण त्याची मुळं वर जमिनीतून पसरून ८/१० फुटांवरील इमारतीलाच धोका ठरू लागली. म्हणून शेवटी शेजार्याने ते पाडून टाकलं.

आता दिवसभर दोघांच्याही अंगणात कडक ऊन लागते. म्हणून मी अश्या झाडांच्या शोधात आहे, जे वरती छान सावली देईल पण त्याची मुळं जमिनीत खोलवर जातील, जेणेकरून माझ्या किंवा आजूबाजूच्या कुठल्याच इमारतीला त्या झाडामुळे धोका संभवणार नाही.

अशी कोणती झाडं सहज उपलब्ध होत असल्यास तज्ञांनी ह्याच धाग्यावर कळवावे ही नम्र विनंति.

प्रतिक्रिया

Dhananjay Borgaonkar's picture

26 Oct 2010 - 7:20 pm | Dhananjay Borgaonkar

चंदनाच झाड लावा.

ते झाड मोठे झाले की त्या इमारतीत राहणा-याना त्रास होईल नक्की.

मुळे खोलवर गेली तरी नंतर ती इमारतीला धोकादायक असतात ..
उदा. अंबा वा तत्सम मोठी झाडे ...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Oct 2010 - 10:33 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

थोडे जास्त कष्ट होतील, पण असं असेल तर वेली चढवा. घरच्या घरी भाज्याही पिकवता येतील!

इंटरनेटस्नेही's picture

27 Oct 2010 - 2:44 pm | इंटरनेटस्नेही

सेंट्र्ल एसी लावा.

इंटरनेटस्नेही's picture

27 Oct 2010 - 2:45 pm | इंटरनेटस्नेही

http://www.misalpav.com/node/12501 हा माझा धागा पहा.

त्याना दिवाळ काढायचे नाही.

इंटरनेटस्नेही's picture

28 Oct 2010 - 1:20 am | इंटरनेटस्नेही

एसी ने आपली वीज देयके अधिक रकमेची येतात हे मान्य... पण ते हवेत थंडावा येण्यासाठी लावलेल्या झाडांच्यामुळांमुळे आपली इमारतच पडण्यापेक्षा केव्हाही किफायतशीर ठरावे! हो की नाही? ;)

.
.

.
ह. घ्या. ;)

शिल्पा ब's picture

27 Oct 2010 - 10:40 pm | शिल्पा ब

जिकडे तिकडे स्वतःच्या धाग्यांची जाहिरात कशाला करायची?

इंटरनेटस्नेही's picture

28 Oct 2010 - 12:18 am | इंटरनेटस्नेही

ह्म्म्म...जाहिरात करण्यात काय पाप आहे?

नारळ, सुपारीची झाडे लावु शकता.

५० फक्त's picture

27 Oct 2010 - 3:34 pm | ५० फक्त

अशोकाची झाडे लावु शकाल, भर दुपारी जरी सावली मिळाली नाहि तर संध्याकाळी तरी निश्चित सावली मिळेल.

हर्षद.

कीती वर्षांनंतर सावली हवी आहे? नाय आता झाडं लावनार म्हंजी...

चेतन शिवणकर's picture

27 Oct 2010 - 9:34 pm | चेतन शिवणकर

तुळ्शीचं झाड लावा.