ईब्राहीम रोझा

किल्लेदार's picture
किल्लेदार in कलादालन
18 Oct 2010 - 1:57 am

ईब्राहीम रोझा......बिजापूर

IMG_02081_2__tonemapped"

IMG_0229"

IMG_0254"

IMG_0282"

IMG_0278"

Ibrahim Rouza 2"

Ibrahim Rouza 1"

स्थिरचित्र

प्रतिक्रिया

चित्रा's picture

18 Oct 2010 - 4:37 am | चित्रा

फार छान फोटो.. अजून माहितीही देता आली तर बघा.

नगरीनिरंजन's picture

18 Oct 2010 - 7:33 am | नगरीनिरंजन

असेच म्हणतो. फोटो खूप छान आहेत.

मदनबाण's picture

18 Oct 2010 - 7:36 am | मदनबाण

हेच म्हणतो...

स्पंदना's picture

18 Oct 2010 - 9:11 am | स्पंदना

किल्ल्लेदार तुम्ही कुठाय?
नुसतेच फोटो? नाही छान आहेत पण तुमच कस्.....जरा हटके असत ना?

किल्लेदार's picture

18 Oct 2010 - 10:05 am | किल्लेदार

लिहीण्याचा मला फार कंटाळा आहे..........
जुलै मधे बिजापूर ला गेलो होतो. त्यात सगळ्यात शेवटी ईब्राहीम रोझा बघितला. गोल गुम्बझ , उपळी बुरुज , मलीक ए मैदान तोफ हे जास्त प्रसिद्ध आहेत. पण ईब्राहीम रोझा मला जास्त भावला.

फक्त ईब्राहीम रोझा बिजापूर शहराच्या तटबन्दी बाहेर आहे त्यामुळे बरेच लोक जाण्याचा कंटाळा करत असावेत. बिजापूर शहर जरी मला बकाल वाटले तरी जुन्या वास्तू उत्तम राखल्या आहेत.

गोल गुम्बझ नि:संशय सुन्दर वास्तू , स्थापत्यशास्त्राचा अप्रतिम नमुना आहे. त्याचे फोटोज पण टाकिनच.

अप्पा जोगळेकर's picture

18 Oct 2010 - 12:04 pm | अप्पा जोगळेकर

अप्रतिम फोटो आहेत आणि वास्तूसुद्धा अप्रतिम असावी असं वाटतंय.

कानडाऊ योगेशु's picture

18 Oct 2010 - 1:32 pm | कानडाऊ योगेशु

किल्लेदारसाहेब.फोटो भन्नाटच.
माझे मूळ गाव विजापूरच. (हिंदी मध्ये व चा उच्चार सर्रास ब करत असल्याने हिंदीत ते बिजापूर होते पण खरे नाव विजापूर.इतिहासात पण विजापूर ह्या नावानेच ह्या शहराचा उल्लेख आहे. उदा.विजापूरच सरदार चालुन आला आहे इ.इ.)
इब्राहीम रोजापासुन २-३ कि.मी अंतरावर आमचे वडिलोपार्जित घर आहे.लहानपणी सुट्टीत विजापूरला गेल्यावर उपली बुरुज्,मुलुखमैदान तोफ आणि इब्राहीमरोज्यात नेहेमी जात असु.
विजापूरातल्या तासबावडी,चंदाबवाडी ह्या मोठ्या विहीरी (त्यांना बावडी असे म्हणतात)सुध्दा पाहण्यासारख्या आहेत.
लहानपणी त्यांचा आकार आणि त्यातले हिरवेकंच पाणी पाहुन डोळे भिरभिरत असत.
फार जुन्या आठवणी ताज्या झाल्या तुमच्या धाग्यामुळे.
धन्यु.

श्रीराजे's picture

18 Oct 2010 - 4:02 pm | श्रीराजे

सुंदर फोटो आहेत.
माझे आजोळ विजापुरचेच...! दरवर्षी मे च्या सुट्टीत आम्ही सर्व नातवंडे विजापुरला भेटायचो आणि खुप धमाल करायचो.

विजापुरमधील सर्वच जुन्या वास्तु उत्तम राखल्या आहेत. स्थापत्यशास्त्राचा अप्रतिम नमुना आहेत.

किल्लेदार तुमच्या फोटोमुळे बालपणीच्या बर्‍याच आठवणी ताज्या झाल्या.
तुमचे मनापासून धन्यवाद..!

अजुन फोटो येउद्यात....

मस्त फोटो आहेत.
गोल गुम्बझ नि:संशय सुन्दर वास्तू , स्थापत्यशास्त्राचा अप्रतिम नमुना आहे. त्याचे फोटोज पण टाकिनच.
टाका लवकर... आम्ही वाट बघतोय.

- सूर्य.

प्राजु's picture

18 Oct 2010 - 7:02 pm | प्राजु

सु रे ख!

सुंदर फोटो आहेत. ही वास्तु इतक्या चांगल्या प्रकारे सांभाळल्याचं बघून बरं वाटलं.

किल्लेदार's picture

18 Oct 2010 - 9:35 pm | किल्लेदार

प्रतिक्रीयांबद्दल आभार...................

बाकीचे पण फोटोज सवडीने टाकीन.

मिसळभोक्ता's picture

18 Oct 2010 - 10:51 pm | मिसळभोक्ता

इस्लामी भारताचा सुवर्णकाळ जपायला हवा !