गुजरातच्या निवडणूकांतून जनतेचा कौल

विकास's picture
विकास in काथ्याकूट
13 Oct 2010 - 8:53 pm
गाभा: 

कालच (ऑक्टोबर १२) ला गुजरात मधील अहमदाबाद, वडोदरा, राजकोट, सुरत, भावनगर, आणि जामनगर येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ५५५ जागांपैकी दोन तृतियांश जागा ह्या "मोदीं"च्या भाजपाला मिळाल्या. "मोदीं"च्या म्हणण्याचे कारण असे की भाजपात अंतर्गत भांडणे (मोदींविरुद्ध देखील) चालू होती, माध्यमे आणि काही स्वयंघोषित सेक्यूलर संस्था / व्यक्ती यांनी मोदींच्या विरुद्ध सततच आगपखड केली आहे, त्यांच्या विरुद्ध मला वाटते दंगलींसंदर्भात (व्यक्तीगतपण) खटले चालू आहेत. असे असताना, ह्या निवडणूकीत त्यांनी सर्वत्र प्रचार केलाच, पण जे काही वाचले ऐकले आहे त्याप्रमाणे गेल्या नऊ वर्षात त्यांनी गुजरातमधे खूप बदल घडवून आणले, गुजरातमधे विकास घडवला, खूप पैसा आला आणि वीजपण...

कालच्या निवडणुकांची बातमी कोण देते यावर मथळे आणि शब्द जरी ठरत असले तरी मोदींचे खालील म्हणणे सर्वत्र येत होते:

"I have succeeded to deliver my message that politics of vote bank or politics of appeasement would not do any good, but the politics of development would do," claimed Modi while celebrating his victory.

Criticising UPA government, Modi stated, "Congress leaders got surprised to see that members of the Muslim community is casting their votes for BJP."

He continued, "A victory by 80 percent clarifies it that more than 30 percent vote has come from the Muslim community."

तर मला काही प्रश्न पडले आहेतः

  1. हे मतदान खरेच राजकारणापेक्षा विकासासाठी (प्रोडेव्हलपमेंट) झाले आहे का?
  2. तसे असले तर खरेच गुजरातमधे गेल्या नऊ वर्षात इतका विकास घडला आहे का?
  3. भाजपाला पडलेली मते ही खरेच सर्वधर्मिय आहेत का?
  4. हा विश्वास भाजपावरचा आहे का मोदींवरचा आहे का काँग्रेसवरचा अविश्वास आहे?
  5. असा प्रोडेव्हलपमेंट पॅटर्न इतरत्र यशस्वी का होऊ शकला नसेल?

प्रतिक्रिया

कालच माझ्या नणदेच्या सासूशी बोलणं झालं त्या भारतात जाऊन आल्या आहेत आंखो देखा हाल हा आहे की - अहमदाबाद इतकं म्हणजे इतकं बदललं आहे. ३ दा कॅन यु बिलीव्ह? ३ दा रस्ते धुतात, कचरा नावाला नाही - मोदींचे आभार. याउलट मुंबई नुसती कचरपट्टी झाली आहे. नुसता घाण वास आणि कचरा. जो येतो तो मुंबईत वसतो.

क्लिंटन's picture

14 Oct 2010 - 3:13 am | क्लिंटन

अहमदाबाद इतकं म्हणजे इतकं बदललं आहे. ३ दा कॅन यु बिलीव्ह? ३ दा रस्ते धुतात, कचरा नावाला नाही

अहमदाबादच्या नक्की कोणत्या भागात दिवसातून तीनदा रस्ते धुतात?मी गेल्या सव्वा वर्षापासून अहमदाबादमध्ये आहे आणि मी तरी एकदाही रस्ते धुताना किंवा (पाऊस सोडून इतर कारणाने) ओलेपण बघितलेले नाहीत.शहरातील सॅटेलाईट, सरखेज-गांधीनगर हायवे सारखे भाग खरोखरच चांगले आहेत.पण त्याचबरोबर रेल्वे स्टेशनजवळचे जुने शहर तितकेच बकाल आहे. शहरातील चांगल्या भागातही जरा पाऊस पडल्यानंतर पाणी साचलेले मी स्वत: बघितलेले आहे.मोदींनी ई-गव्हर्नन्स राबवून लोकांचे व्यवहार सुटसुटीत बनविले, विविध उद्योगांना आमंत्रित करून नवे रोजगार निर्माण केले, वीजेचा प्रश्न सोडविला (गेल्या सव्वा वर्षात अहमदाबादमध्ये एकदाही लाईट गेलेले मी तरी बघितले नाहीत. मुंबईचा अपवाद सोडून महाराष्ट्राच्या किती भागांत अशी परिस्थिती आहे?) अशी कामे मोदींनी नक्कीच केली आहेत आणि त्यामुळेच लोकांची मते मोदींनाच मिळतात.तसेच मोदींना सर्व नोकरशाही वचकून असते आणि त्यांच्यापुढे कामचुकारपणा अजिबात चालत नाही या सगळ्या गोष्टी मान्य. पण दिवसातून रस्ते तीनदा धुणे ही जरा अतिशयोक्ती वाटते. असो.

१.हे मतदान खरेच राजकारणापेक्षा विकासासाठी (प्रोडेव्हलपमेंट) झाले आहे का?
असे नक्कीच वाटते.आज गुजरात दंगली हा विषय तितका महत्वाचा राहिला आहे असे वाटत नाही आणि त्या कारणावरून वर्षानुवर्षे निवडणुका जिंकणे नक्कीच शक्य नाही. २००० साली महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाला होता. पण २००५ मध्ये सर्व नगरपालिका आणि बऱ्याचशा जिल्हा परिषदा भाजपने जिंकल्या. २००२ च्या निवडणुकांना दंगलीची पार्श्वभूमी होती हे मान्य पण २००७ मध्येही १८२ पैकी ११८ जागा भाजपनेच जिंकल्या. आज अहमदाबादमध्ये १८९ पैकी १४९ म्हणजे जवळपास चार-पंचमांश बहुमत, सुरतमध्ये ११४ पैकी ९८ म्हणजे पाच-षष्ठांश बहुमत असे एकामागोमाग एक विजय मिळवले.

असे विजय मिळविण्यासाठी नेत्याने एकतर स्वत: चांगले काम केलेले असले पाहिजे (शीला दिक्षित, रमण सिंह, नवीन पटनाईक) किंवा नेत्यामागे एखादे जबरदस्त वलय हवे (एम.जी.रामचन्द्रन) नाहीतर चांगले काम केल्याचा आभास तरी निर्माण केला पाहिजे (ज्योती बसू, लालू). मोदींची लोकप्रियता नक्कीच आहे पण त्यांच्याकडे एम.जी.रामचन्द्रन, एन.टी.रामाराव यांच्यासारखे वलय नक्कीच नाही.हिंदुत्वाचे वलय इतकी वर्षे टिकेल असे मला तरी अजिबात वाटत नाही. तसेच मोदींनी चांगले काम केले आहे असे प्रशस्तीपत्र रतन टाटा, अंबानी या उद्योजकांबरोबरच सोनिया गांधी अध्यक्षा असलेल्या राजीव गांधी फाऊंडेशननेही दिले आहे असे वाचल्याचे आठवते. तेव्हा मतदान हे विकासाच्या मुद्द्यावर झाले असे म्हणायला हरकत नाही.

२.तसे असले तर खरेच गुजरातमधे गेल्या नऊ वर्षात इतका विकास घडला आहे का?
याविषयी योगप्रभूंनी चांगले मुद्दे इथे मांडले आहेत.

३. भाजपाला पडलेली मते ही खरेच सर्वधर्मिय आहेत का?
हे खात्रीने सांगता येणार नाही. पण गेल्या महिन्यात कथलाल या बरेच मुस्लिम असलेल्या विधानसभा मतदारसंघातून भाजपला पोटनिवडणुकीत विजय मिळाला तेव्हा मोदींनी मुस्लिमांनीही भाजपला मते दिली असे म्हटले होते.

४. हा विश्वास भाजपावरचा आहे का मोदींवरचा आहे का काँग्रेसवरचा अविश्वास आहे?
मला वाटते हा विश्वास मोदींवरचा आहे. आज मोदी गुजरातमध्ये भाजपपेक्षाही मोठे झाले आहेत.मोदींनी केशुभाई पटेल, सुरेश मेहता, काशीराम राणा यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना बाजूला केले.तसेच २००७ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये आणि आताच्या महापालिका निवडणुकांमध्ये आपल्या पसंतीच्या उमेदवारांनाच उभे केले आणि निवडुनही आणले. तेव्हा हे भाजपापेक्षाही मोदींचे यश आहे असे वाटते. त्याचप्रमाणे एकामागोमाग एक पराभवाचे तडाखे बसल्याने कॉंग्रेस पक्ष आता ढेपाळला आहे. १९९० पासून सलग ५ विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाचा पराभव झाला आहे. तसेच एक वाघेला सोडले तर दुसरा त्यातल्या त्यात शक्तीमान नेता पक्षाकडे नाही. (स्वत: वाघेलांचाही २००९ मध्ये पराभवच झाला). अशा परिस्थितीत आणि महापालिका निवडणुकांमध्ये स्थानिक मुद्द्यांचा परामर्श होत असल्याने (जिथे मोदींना तोड नाही) कॉंग्रेसवर अविश्वास दाखवावा इतकाही resistence कॉंग्रेस पक्ष निर्माण करू शकला नाही.

५.असा प्रोडेव्हलपमेंट पॅटर्न इतरत्र यशस्वी का होऊ शकला नसेल?
यासाठी नेत्याकडे दूरदृष्टी लागते तसे नेते सगळीकडे नाहीत.

असेल मग त्यांनीही अतिशयोक्तीच केली असेल :(

बिहारच्या निकालांच्या पार्श्वभुमीवर आपला हा पोस्ट पुन्हा लिहावा ही विनंती.

खरे मत मांडाल ही अपेक्षा आहे.

गुजराथ म्हणजे "गुड गव्हरनन्स ". ( 3G ) असे म्हटले जाते. ते परत खरे झले तर ?

१. हे मतदान खरेच राजकारणापेक्षा विकासासाठी (प्रोडेव्हलपमेंट) झाले आहे का?
नुसता विकास नही तर चांगले प्रशासन हा माझ्यामते महत्त्वाचा मुद्दा.
२.तसे असले तर खरेच गुजरातमधे गेल्या नऊ वर्षात इतका विकास घडला आहे का?
मला तरी तसे वाट्ते .( rate of development is reduced than it was earlier in 2004-2008 but still it is much berret than any other state of India. )
3.भाजपाला पडलेली मते ही खरेच सर्वधर्मिय आहेत का?
असा प्रश्न का पडावा ? आपली जी काही लोकशाही आहे त्या मध्ये असे प्रश्न एकाच बाजुने विचार्ले जतात.
४ .हा विश्वास भाजपावरचा आहे का मोदींवरचा आहे का काँग्रेसवरचा अविश्वास आहे?
हा विश्वास मोदींवरचा आहे . थोडा सकारात्मक म्हणावा असा.
५असा प्रोडेव्हलपमेंट पॅटर्न इतरत्र यशस्वी का होऊ शकला नसेल?
नक्की होवू शकेल. जो पर्यत " institutional corruption "तो पर्यंत हे मात्र शक्य नाही .

ऋषिकेश's picture

13 Oct 2010 - 10:58 pm | ऋषिकेश

1. हे मतदान खरेच राजकारणापेक्षा विकासासाठी (प्रोडेव्हलपमेंट) झाले आहे का?

प्रत्यक्ष गुजरात मधे नसलो तरी तिथल्या ओळखीच्यआंशी होत असलेल्या बोलण्यावरून विकास हेच मुख कारण आहे. तरी एकमेव कारण नाही. "गुजरातची अस्मिता" या छत्रीखाली झालेल्या पोलरायझेशनचाही त्यात वाटा आहे.

2. तसे असले तर खरेच गुजरातमधे गेल्या नऊ वर्षात इतका विकास घडला आहे का?

होय. सर्वांगिण नसला तरी बर्‍याच क्षेत्रात माझ्यामते विकास घडला आहे.

3. भाजपाला पडलेली मते ही खरेच सर्वधर्मिय आहेत का?

कल्पना नाही

4. हा विश्वास भाजपावरचा आहे का मोदींवरचा आहे का काँग्रेसवरचा अविश्वास आहे?

माझ्या मते हा मोदींवरचा विश्वास आहे. ही व्यक्ती गुजरातमधे पक्षाच्या पुढे गेली आहे.

5. असा प्रोडेव्हलपमेंट पॅटर्न इतरत्र यशस्वी का होऊ शकला नसेल?

इतर ठिकाणी असा पॅटर्न यशस्वी झाला आहे. मध्यप्रदेशमधेही चांगली कामे झाली व सरकार पुन्हा निवडून आले. तीच गत ओरीसाची. आता बिहारातही पुनरावृत्ती होऊ शकते.
महाराष्ट्रापुरते बोलायचे तर एवढ्यात कोणी डोळ्यात भरेल अशी डेव्हलपमेंट करूनच दाखवलेली नाही त्यामुळे प्रोडेव्हलपमेंट पॅटर्नला संधी मिळालेली नाही :)

सुनील's picture

13 Oct 2010 - 11:27 pm | सुनील

बहुतांशी सहमत.

स्थानिक निवडणूकांत सहसा स्थानिक प्रश्न जास्त महत्त्वाची भूमिका बजवतात. त्यामुळे विकासाच्या प्रश्नावर मतदन झाले असेल तर, ते योग्यच म्हणावे लागेल.

याखेरीज, विरोधी पक्षांचे (येथे काँग्रेस) संघटना म्हणून न जाणवणारे अस्तित्व हेदेखिल कारण असू शकेल.

मतदान धर्माधारीत झाले नसावे. हे खरे असेल तर, तो सगळ्याच पक्षांसाठी धडा ठरावा.

योगप्रभू's picture

14 Oct 2010 - 12:03 am | योगप्रभू

भाजप, हिंदुत्त्ववाद आणि जातीय राजकारण हे काही माझ्या आवडीचे विषय नसल्याने मी फक्त गुजरातचा झालेला विकास याबाबत माझे मत मांडतो. आजच माझी या विषयावर एका ज्येष्ठ मित्राशी चर्चा झाली. त्यातून मिळालेली माहिती...

नक्कीच गेल्या दहा वर्षांत गुजरातचा डोळ्यात भरावा इतका विकास झाला आहे. मोदींनी खूप सुंदर प्रशासनाची घडी बसवली आहे. एकतर प्रशासनातील बाबूगिरी मोदींनी संपुष्टात आणली आहे. बाहेरच्या उद्योगांना गुजरातमध्ये जागा हवी असेल तर फक्त आणि फक्त मोदींशी बोलावे लागते. त्यांनी एकदा फाईल क्लिअर केली की कुठल्याही देवापुढे खडीसाखर ठेवावी लागत नाही. मोदी हा हुशार माणूस आहे. त्याने गुजरातमधल्या जमिनी उद्योगांना विकलेल्या नाहीत तर दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्याने (लीज) दिल्या आहेत. वीज, रस्ते, पाणी आणि बंदराजवळची जमीन अशा पायाभूत सुविधा मोदींनी विकसित करुन दिल्या आहेत. तेथे उभारल्या जाणार्‍या प्रकल्पात गुजराती स्थानिकांना रोजगार मिळाला आहेच, पण गरज असल्याने बाहेरुनही मनुष्यबळ येत आहे.

मोदी सरकारची ही दुसरी की तिसरी टर्म? असो पण त्यांनी पाच वर्षांच्या अंतराने आपल्याला काय साध्य करायचे आहे, याचे निश्चित नियोजन केले. त्यानुसार पहिल्यांदा मुबलक वीजनिर्मिती, पाणी आणि रस्ते या गोष्टींवर भर दिला. गुजरातमधील महामार्ग सहा पदरी आणि आरामदायी आहेत. मुख्य शहरांजवळ हे महामार्ग वरुन थेट पुढे नेल्याने मालवाहतूक करणारे ट्र्क शहराला टाळून पुढे जाऊ शकतात. म्हणजेच शहराकडे जाणार्‍या वाहतुकीशी संबंध न आल्याने कोंडी होत नाही. टोल आहे, पण जो वेळ वाचतो त्यामुळे कुणाची कुरकुर नाही. रस्त्यांवर खड्डे नाहीत. राज्याच्या अंतर्भागातील रस्तेही छान बांधले आहेत.

गुजरातमध्ये भारनियमन नाही. त्यांनी सातत्याने वीज उत्पादनात भर घातली आहे. मुंद्रा, पीपावाव, जामनगर अशी बंदरे खासगी उद्योगांकडून विकसित करुन घेतल्याने गुजरात सागरी मालवाहतुकीत या दहा वर्षांत जबरदस्त पुढे जाणार, हे दिसत आहे. पाच वर्षांपूर्वी जामनगरला रिलायन्सने विकसित केलेले बंदर आणि तेथील अत्याधुनिक सुविधा तेथील पोर्ट मास्टरच्या तोंडून आणि प्रत्यक्ष नजरेने बघताना मी स्तिमित झालो होतो.

परवा पुण्यात एक स्नेही भेटले. ते गुजराती समाजातील ज्येष्ठ नागरिक आहेत आणि अनेक पिढ्यांपासून महाराष्ट्राचेच रहिवासी आहेत. त्यांनी मला एक गंमत दाखवली. खिशातून एक पॅनकार्डसारखे इलेक्ट्रॉनिक कार्ड काढून दाखवले. म्हणाले, 'हे बघा नरेंद्रभाईचे उद्योग. याला एनआरजी कार्ड म्हणतात. म्हणजे नॉन रेसिडेंट गुजराती कार्ड. गुजराती समाजातील जे लोक इतर राज्यांत स्थाईक झाले आहेत त्यांना हे कार्ड दिले आहे. त्याचा फायदा म्हणजे हे लोक जेव्हा गुजरातमध्ये जातात तेव्हा त्यांना हे कार्ड दाखवल्यावर प्रशासनाचे उत्तम सहकार्य मिळते. कार्ड स्कॅन केल्यावर त्या व्यक्तीची सर्व माहिती संगणकावर दिसते. अशा व्यक्तींना गुजरातची कीर्ती बाहेर जाऊन वाढवल्याबद्दल आदराने वागवतात. एखाद्याची मालमत्ता अजुनही गुजरातमध्ये असेल तर त्याचीही नीट देखभाल केली जाते. विक्री अथवा भाड्याने द्यायची असल्यास सरकारी मदतीची गरज आहे का, असे विचारले जाते. तंटा असेल तर तो मिटवण्यासाठी मदत केली जाते. त्या मालमत्तेला स्थानिक गुंडांचा/शेजार्‍याचा उपद्रव होऊ दिला जात नाही किंवा उतार्‍यांमध्ये परस्पर फेरफारही होऊ दिला जात नाही.

आता एक गंमतीचा किस्सा सांगतो. (ऐकीव आहे त्यामुळे खरेपणाची खात्री देत नाही) चार वर्षांपूर्वी परदेशाचे एक व्यापारी शिष्ट मंडळ (बहुधा चीन की जपानचे) गुंतवणूक करण्यासाठी महाराष्ट्र व गुजरातच्या दौर्‍यावर आले होते. मुंबईत आपले प्रेझेंटेशन पाहिल्यावर ते गुजरातला गेले आणि नंतर त्यांनी तेथे मोठी गुंतवणूक केली. त्याचे गुपित असे होते, की गुजरात सरकारनेही त्यांचे प्रेझेंटेशन इंग्रजीतच सादर केले होते, परंतु त्याला सबटायटल्स त्या देशाच्या चित्रलिपीतील दिली होती. आपल्या भाषेतील शब्द बघून ते शिष्टमंडळ भारावून गेले. नॅनो प्रकल्प नरेंद्रभाईने कसा गुजरातकडे वळवला, हे सगळ्यांना माहीत आहे.

सुंदर प्रतिसाद. मस्तच आढावा घेतला आहे. मोदींचं कार्य कौतुकास्पदच दिसत आहे.

चिंतामणी's picture

14 Oct 2010 - 8:28 am | चिंतामणी

विकासभाउ भाजप/नमो यांना मते कशी पडतात याची अजून शंका आहे?????? Negative voting किती काळ होणार? किंवा असे म्हणु की Negative votingचा फायदा किती काळ मिळणार.

सातत्याने भाजप/नमो यांना गुजराथेत मिळणारे यश हे नक्कीच चांगल्या कामाची पावती आहे. गुजराथमघील इंडस्ट्रीची वाढ, पाणि आणि विजेची उपलब्धता, उत्तमरस्ते या बद्दल तुम्ही एकदा अभ्यास करून यावे असे वाटते.

गेल्या विधानसभा निवड्णुकीचे वेळी मिडीया, नुसती भारतातील नव्हे जागतीक पातळीवरची मिडीया, काँग्रेस पक्ष इत्यादिनी असे चित्र निर्माण केले होती की "नमो" आता संपले. पण निकाल काय बाहेर आला हे सर्वांनीच पाहीला आहे.

आता तिसरी टर्म चालु आहे नमो यांच्या सरकारची. पुढची टर्मसुध्दा त्यांचीच असणार यात शंका नाही.

अप्पा जोगळेकर's picture

14 Oct 2010 - 9:17 am | अप्पा जोगळेकर

हा विश्वास मोदींवरचा आहे हे निश्चित. असे आणखी दहा मोदी भारतास मिळतील तर जगावरही राज्य करता येईल असे स्वप्नरंजन करण्याचा मोह आवरत नाही. गुजरातेत कधी गेलो नाही परंतु जे काही ऐकतो, वाचतो आणि पाहतो त्यावरुन असे कन्क्ल्यूजन काढणे क्रमप्राप्त आहे. वर प्रत्यक्ष गुजरातेत मुक्काम केलेल्यांचे अनुभव आहेतच. ते वाचून या मताला पुष्टी मिळत आहे.

पाषाणभेद's picture

14 Oct 2010 - 10:02 am | पाषाणभेद

गुजरात च्या मोठ्या शहरांत सुरत सोडले तर गेलेलो नाही. ग्रामीण भागच जास्त बधितलेला आहे. पण डोळ्यात भरेल इतका विकास निश्वीतच झालेला आहे. नोकर्‍या, कारखाने, आरोग्य, शिक्षण आदिंबाबत प्रगती आहे.

गुजराती जनताही तुलनेने शिक्षीत, शांत असते, विचार करून निर्णय घेणारी असते.

राजकारण गजकरण सोडून द्या. त्यामुळे जो काय निकाल आहे तो योग्यच आहे असे समजणे भाग आहे.

सर्वधर्मीय लोकांनी विकास बघणे हेच महत्वाचे आहे. धर्माने केवळे लढाया करायला शिकवले आहे. इतिहासापसून काहीतरी शिकले पाहीजे.

नितिन थत्ते's picture

14 Oct 2010 - 10:29 am | नितिन थत्ते

विकास झाला म्हणून विकास घडवणार्‍यांना मते हा पॅटर्न पूर्वीही दिसत असणार. पश्चिम महाराष्ट्रात असणारे काँग्रेस*चे वर्चस्व ही याच गोष्टीची पावती असे म्हणता येईल. जे खूप वर्षांपासून अस्तित्वात आहे. परंतु विकासाला मते ही कन्सेप्ट राजकीय विश्लेषकांमध्ये पूर्वी नसावी. त्यामुळे काँग्रेसच्या त्या यशाला स्वातंत्र्यलढ्यातील पुण्याई, जनतेचा अशिक्षितपणा, जातींचे राजकारण अशी वेगवेगळी लेबले लावली गेली. (ठाण्यात शिवसेनेची असलेली घट्ट पकड ही सुद्धा याच विकासाच्या कारणाने असावी. सतीश प्रधान यांच्या कारकीर्दीतला विकास).

पश्चिम महाराष्ट्रातले यश मराठवाड्यात/कोकणात काँग्रेसला टिकवता आले नाही याचे कारण बहुधा विकास नसणे हेच असावे. परंतु जेव्हा दुसरे सरकार आले तेव्हा मराठवाडा/कोकण/विदर्भ यांना विकासाचे काही विशेष फळ चाखायला मिळाले नाही. त्यामुळे मोदींना (शीला दीक्षित, नवीन पटनाईक यांनाही) जो कॉन्ट्रास्ट दाखवता आला तो युती शासनाला दाखवता आला नाही. [नितिन गडकरी हे विदर्भातले मंत्री बराच विकास करून गेले पण त्यांनी लक्षणीय विकास मुंबई-पुणे पट्ट्यातच केला- विदर्भात नाही]. त्यामुळे विदर्भ मराठवाड्याला तो कॉन्ट्रास्ट दिसला नाही. दुसरीकडे साखरकारखाने हे काँग्रेसचे शक्तीस्थल असे समजून त्यांच्या खच्चीकरणाचे प्रयत्न झाले म्हणून पश्चिम महाराष्ट्र दूरच राहिला.

*काँग्रेस म्हणजे काँग्रेस अ ते काँग्रेस ज्ञ पर्यंत सगळे.

इन्द्र्राज पवार's picture

14 Oct 2010 - 11:10 am | इन्द्र्राज पवार

निकालावरून एक बाब ठळकपणे पुढे आली आहे, ती म्हणजे गुजरातच्या वाढत्या 'शहरीकरणा' कडे श्री.नरेन्द्र मोदी यांनी कधीही नकारार्थी नजरेने पाहिलेले नाही. मुख्यमंत्री पदाचे त्यांचे हे दहावे वर्ष चालू आहे, आणि नेमक्या याच काळात सर्व प्रमुख शहरामध्ये झालेल्या विकासकामांची जंत्री, वाढलेला रोजगार, नोकरी-व्यवसायाच्या नवनवीन संधी, प्राथमिक ते विद्यापीठीय शिक्षणातील सोयीसुविधा, सरकारी कार्यालयातील कामाचा वेगाने होणारा निपटारा, वीजेचे भारनियमन शून्यावर आणणे, (श्री.क्लिंटन यांनी वरील प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे जरी दिवसातून तीन तीन वेळा रस्ते स्वच्छता नसली तरी एकूणच प्रसन्न वाटणारी सार्वजनिक स्वच्छतेची जाणीव बडोदा आणि सूरत या दोन शहरात तरी दिसून येतेच. मी अहमदाबादला गेल्या चार वर्षात गेलो नसल्याने तिथल्या स्थितीविषयी अधिकारवाणीने बोलता येत नाही, पण ऐकीव बातम्या या प्रभाव दर्शविणार्‍याच आहेत.) आणि सर्वात महत्वाचे म्हणजे खुद्द नरेन्द्र मोदी या व्यक्तिमत्वाविषयी लोकात असणारा एक कमालीचा विश्वास....या बाबींचे सकारात्मक प्रतिबिंब परवाच्या नगरनिगम निवडणुकीत दिसले आहे आणि या महिनाअखेर होणार्‍या पंचायत समितीचे निकालदेखील वेगळे असणार नाहीत.

संपूर्ण देशभरात शहरी लोकसंख्येचा आकडा ३० टक्के असताना एकट्या गुजरातमध्ये तो ४२ टक्के झाला आहे, याला कारण 'येईल त्याला सामावून घेतले जाईल...' अशी आश्वासक भूमिका घेऊन त्या धर्तीनेच मोदी कॅबिनेटने शहरीकरणाच्या मोहिमा राबविलेल्या दिसून येत आहेत. खेड्यातील वैद्यकिय सुविधा सुधारण्यासाठी माओने चीनमध्ये ६० च्या दशकात यशस्वी राबविलेली 'बेअरफूट डॉक्टर्स' ही योजना आता मोदी राज्यात राबवित आहेत आणि तिचे निश्चितच चांगले परिणाम येत्या एकदोन वर्षात दिसून येतील अशीच चिन्हे दिसत आहेत.

ज्यावेळी मोदीनी प्रथम (२००१ मध्ये) मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली त्यावेळी ते ५० वर्षाचे होते.. (आपले अशोक चव्हाणही त्याच वयाचे होते....पण कामाच्या झपाट्याबाबतीत ते मोदीना कधी गाठू शकतील?); अन् त्या दिवसापासून आजतागायत त्यांच्या कार्यप्रणालीवर भ्रष्टाचाराचा डाग लागलेला नाही. 'नेपोटिझम' ला सचिवालयात जागा नाही. अविवाहित राहिले असले तरी त्यांच्या नात्याचा कुणीही 'अजित, उद्धव, राज, निलेश, वा सुप्रिया' पुतण्या, भाचा, भाची इ.इ. त्यांच्या नावाचे कार्ड घेऊन मंत्र्याच्या केबिनमध्ये मुजोरपणे शिरत नाही. ही बाब गुजरात प्रशासनामध्ये अभिनंदनीय मानली जात आहे. धडाडीचे नेतृत्व, कामाचा झपाटा, स्वतः १२-१२ तास कार्यालयात हजर, भाषेवर विलक्षण प्रभुत्व, सदैव हसतमुख आणि मुख्य म्हणजे मुस्लिम समाजातदेखील होत असलेले मतपरिवर्तन ह्या आणि अन्य कित्येक बाबी 'नरेन्द्र मोदी' हे भावी पंतप्रधान ही प्रतिमा आणखीन उजळ करण्यास मदत करीत आहे.

अंबानी ग्रुपचा तर मोदीना सातत्याने पाठिंबा आहेच, पण मागे एकदा भारती एअर टेलच्या सुनिल मित्तलने उघडपणे काढलेले "जर आपल्या देशाला एक 'चीफ एक्झेक्युटिव्ह ऑफिसर' हवा असेल तर तो आहे नरेन्द्र मोदी" हे उदगार नक्कीच त्यांच्या कार्यप्रणालीला मिळालेली पावती म्हणावी लागेल.

निकालानंतर टाईम्स ऑफ इंडियाने कधी नव्हे तो चांगला मथळा दिला होता :

Its 'Modi'fication...! ~~ यातच सर्वकाही आले.

इन्द्रा

मी गुजरात ५ वर्षांपुर्वीही बघितला होता अन अगदी अलिकडचाही बघितला आहे.. फरक तर जाणवतोच, पण काही वृत्तपत्रे व काही व्यक्ती अतिशयोक्ती करून गुजरातचे वर्णन करतात.. गुजरात पुर्वीच्या मानाने खूप सुधरलाय पण अजूनही सुधारणेला खूप वाव आहे.. गुजरातचे रस्ते चांगले चांगले असे बरेच जण म्हणताना दिसतात, मी गुजरातच्या रस्त्यांना "बकवास " म्हणतो, कारण गुजरातमध्ये राष्ट्रीय व महत्त्वाचे राज्य महामार्गच फक्त सुस्थितीत आहे. ईतर रस्ते खरोखर दयनीय आहेत. (अगदी आपल्या महाराष्ट्राच्या तुलनेतही ). पण नरेंद्र मोदींच्या कार्याकडे दुर्लक्ष नक्किच करता येणार नाही. आज त्यांना गुजरातमध्ये स्वप्नातही पर्याय नाही, अगदी पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून बघितल्यास मोदींना भारतातही पर्याय नाही हे मान्य करावेच लागेल.

विकास's picture

15 Oct 2010 - 12:45 am | विकास

सर्व माहीतीपूर्ण प्रतिसादांबद्दल तसेच वाचकांचे आभार!

शुचींच्या नात्यातील व्यक्तीकडून जरी स्वच्छ रस्त्यांचे कौतूक झाले असले तरी क्लिंटन म्हणलेले आणि म्हणून भावार्थ म्हणून ते योग्य वाटले.

एकूण सर्वच प्रतिसाद वाचताना आणि त्यातही अनुभवाधारीत क्लिंटन, योगप्रभू, नितीन थत्ते, पाषाणभेद, अनिल २७ यांचे प्रतिसाद वाचताना जाणवते की गुजरात मधे प्रगती झाली असावी. (मी पाहीलेली नसल्याने, "असावी" म्हणत आहे).

नितीन यांनी दिलेल्या प. महाराष्ट्र आणि ठाण्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीसंदर्भात अंशतः सहमत. प. महाराष्ट्रात परत परत काँग्रेस येण्यास मधल्या काळात तेथील विकासाचा नक्कीच हातभार होता पण नंतर मात्र तो बालेकिल्ला झाला तसेच त्या भागात प्रबळ विरोधक कधीच तयार झाले नाहीत... जनसंघ/भाजपा/जनता पार्टी/प्रजासमाजवादी किंवा अगदी शेकाप. नितीन यांनी गडकरी यांचे उदाहरण दिले आहे, पण गंमत बघा त्या भागात पण विकास न करता काँग्रेसच काय त्याच भागातला एकच मुख्यमंत्री (वसंतराव नाईक) सर्वाधिक सलग वर्षे राज्य करू शकला आहे! आज तेथे (प. महाराष्ट्रात) वीज नाही, नद्यांचे प्रचंड प्रदुषण, साखर कारखाने धड चालत नाहीत आणि तरी देखील मते आहेत तशीच... तेंव्हा थोडक्यात प. महाराष्ट्राला विकासासाठीची मते म्हणणे तितकेसे सोपे नाही. दिल्लीत शीला दिक्षीत यांचे उदाहरण मात्र विकासासाठी मते या संदर्भात, ऐकीव माहीतीवर पटते.

ठाण्यात सतीश प्रधानांनी नक्कीच तत्कालीन शोभतील अशी कामे केली होती ज्यामुळे जनसंघाला / भाजपाला पण स्थानिक पातळीवर पटकन शिरकाव करता आला नाही (राज्य-राष्ट्र पातळीवर तेंव्हा शिवसेना नव्हती). मात्र नंतरच्या काळात शिवसेनेची म्हणून व्होटबँक तयार झाली त्याचा अजूनही उपयोग होतो.

पाषाणभेदांचा अनुभवावरून असे दिसते की विकासाची फळे सर्वत्र पोचलेली आहेत - केवळ, "गुजरात शायनिंग नाही!" ;)

मोदींच्या बाबतीत अशी व्होट बँक तयार होण्यापेक्षा त्यांच्या अख्त्यारीत झालेले काम असावे. कारण थोडे जरी चुकले तर माध्यमे आणि (पक्षातले आणि बाहेरचे) ढिगभर विरोधक तयार आहेत! संपूर्ण गुजरातचा विकास झाला असेल असे वाटत नाही. मात्र एकूण विकासाचा वेग आणि येणार्‍या उद्योगांमुळे रोजगार उपलब्ध झालेला असावा ज्याने योग्य दिशा वाटत असेल. अर्थातच राजकारणाबरोबरच अर्थकारणाचे पण नियोजन होत आहे, जसे वास्तवीक सर्वच नेत्यांकडूनच अपेक्षित ठेवायला हवे.

मोदींच्या वाक्यात त्यांना मुस्लीम समाजाकडूनही भरघोस मते मिळाली असे म्हणले गेले आहे. तर्री म्हणतात तसे असा "प्रश्न का विचारावा?". असा प्रश्न मला देखील आवडत नाही. पण एकतर तेच म्हणाले म्हणून विचारला आणि मोदींच्या बाबतीत माध्यमे बाय डिफॉल्ट धार्मिक चष्म्यातून बघतातच. म्हणून तर त्यांच्या नेतॄत्वाखाली भाजपा जिंकले म्हणताना एकच मुस्लीम उमेदवार जिंकला या कडे पण लक्ष वेधले जाते. असो. मोदींचे विधान खरे का नाही हे प्रसिद्धी माध्यमात कोणीच विशेष बोलत नाही. एकतर ते खरे असावे म्हणून अथवा कोणाला अभ्यास करायचा नाही म्हणून... मात्र सुनील म्हणतात तसे, "मतदान धर्माधारीत झाले नसावे. हे खरे असेल तर, तो सगळ्याच पक्षांसाठी धडा ठरावा."

अप्पा जोगळेकर आणि चिंतामणींच्या भावना मी येथे (आत्ता नाही पण आधी) येथील विशेष करून गुजराती समाजातून ऐकलेल्या आहेत.

सर्वात शेवटी इन्द्रराज पवारांचा माहीतीपूर्ण आणि वैचारीक प्रतिसादः बराचसा सहमत. मात्र या विषयाला अवांतर ठरेल असा एकच मुद्दा - शहरीकरण होणे हे ध्येय असले पाहीजे का शहर-गाव अधुनिक होणे हे ध्येय हवे? मोदींबद्दल: मुळचे संघ प्रचारक असल्याने ब्रम्हचारी राहीले आणि आजही त्याचे पालन करत कुटूंब नाही. भावाचे चहाचे दुकान आजही असे ऐकून आहे, खरे-खोटे माहीत नाही, पण तसे असले तर आश्चर्य वाटणार नाही. कलामांकडील कुटूंबियपण साधे राहीले होते हे आठवले आणि अर्थातच लाल बहाद्दूर शास्त्रींचे उदाहरण... पण तुम्ही म्हणता तसे "नेपोटीझमला" जागा नसणे जेंव्हा सर्वत्र होईल तेंव्हा खूपच फरक दिसेल. मात्र या सर्वत्र मधे केवळ सरकारच नाही तर खाजगी उद्योग पण येतात... (एकदम "रॉकेटसिंग"ची आठवण झाली!). अजून तरी दिसताना त्यांचे या संदर्भात पाय जमिनीवरच दिसत आहेत...

असा "प्रो-डेव्हलपमेंट" पॅटर्न इतरत्र होणे अर्थातच शक्य आहे. पण ते जनतेला देखील गरजेचे वाटले पाहीजे. कॉर्पोरेशनमधील सिईओ ला सगळ्या पॉवर्स असतात, पैसा मिळतो वगैरे वगैरे, पण जर का स्टेकहोल्डर्सनी फायदा-तोटा बघून ठरवले तर त्याला जावे देखील लागू शकते आणि तसे होते देखील....

प्रिया देशपांडे's picture

15 Oct 2010 - 12:44 pm | प्रिया देशपांडे

आपले मरहट्टा राजकारणी काही बोध घेणार की नाहीत यातून? की मिश्यांना पीळ देत ब्राम्हण-मराठा वाद निर्माण करत स्वतःची तुंबडी भरून घेणार?ईतिहासात रममाण होणे आणि दर आठवड्याला शिवाजी,आंबेडकर,फुले ह्यांच्या पुतळ्यांना हार घालणे आता कमी करुन विकासाकडे लक्ष द्या