कसं शोधायचं?

माधवी's picture
माधवी in काथ्याकूट
1 Oct 2007 - 2:45 pm
गाभा: 

आपण आपल्या संगणकावरून ज्या ज्या वेगळ्या वेगळ्या वेबसाईट्स पाहतो, कधी मित्र मैत्रिणींशी वेगवेगळ्या माध्यमाद्वारे चॅट करतो. या सगळ्या गोष्टींचा विदा (डेटा) संगणकावर साठवला जातो. हा डेटा कसा शोधता येतो? याची माहिती कोणी संगणक शास्त्री येथे असतील तर देतील का?

प्रतिक्रिया

प्रमोद देव's picture

1 Oct 2007 - 2:48 pm | प्रमोद देव

हवा तो शब्द/चित्र /संकेतस्थळ इत्यादि गुगलच्या खिडकीत भरा आणि शोधा.

माधवी's picture

1 Oct 2007 - 3:00 pm | माधवी

गुगलून पाहिलय. पण मला मी ज्या ज्या साईट्सला भेट देते त्या त्या साईट्स ची माहिती सापडते. पण जो लॉग तयार होतो त्या लॉगला कसं शोधायचं आणि डिकोड करायचं याची माहिती हवी आहे.

दिगम्भा's picture

1 Oct 2007 - 3:36 pm | दिगम्भा

हा लॉग "हिस्टरी" नावाच्या प्रकाराच्या सहाय्याने पहाता येतो.
आपण इंटरनेट एक्स्प्लोरर वापरत असल्यास कंट्रोल्+एच दाबा (किंवा मेनूमधून व्ह्यू - एक्स्प्लोरर बार - हिस्टरी) , म्हणजे हिस्टरी शीर्षकाचा उभा रकाना डावीकडे उघडेल त्यामध्ये आपल्या संगणकावरील हा अहवाल दिसतो. याचा वापर करून एक तर आपण लहान मुले जालावरची कुठली कुठली पाने पहात आहेत ते पाहू शकता किंवा आपण कुठली पाने पाहिली ते इतर कोणी पाहू शकते.
अर्थात या नोंदी खोडून टाकण्याची सोयदेखील आहे. त्यासाठी टूल्स - इंटरनेट - ऑप्शन्स - जनरल येथे जाऊन हिस्टरी किंवा तात्पुरत्या बनलेल्या फाइल्स काढून टाकता येतात.
सर्व सोयी आहेत, उपयोग किंवा दुरुपयोग करणे आपल्यावर आहे.
- दिगम्भा

प्रकाश घाटपांडे's picture

1 Oct 2007 - 6:27 pm | प्रकाश घाटपांडे

'मला उत्तर हवय ' या मोहन आपटे लिखित साखळीतील संगणक हा विषय असलेले पुस्तक घ्या. उपयुक्त माहिती आहे.
प्रकाश घाटपांडे

विसोबा खेचर's picture

2 Oct 2007 - 7:58 am | विसोबा खेचर

'मला उत्तर हवय ' या मोहन आपटे लिखित साखळीतील संगणक हा विषय असलेले पुस्तक घ्या. उपयुक्त माहिती आहे.

थोडक्यात काय, तर 'दमड्या खर्च करा म्हणजे बरीच उत्तरं मिळतील!' असं प्रकाशरावांना सुचवायचं आहे बरं का माधवीजी! :)

तात्या.

प्रकाश घाटपांडे's picture

1 Oct 2007 - 6:33 pm | प्रकाश घाटपांडे

मराठीत या विषयावर दिपक शिकारपूर, अच्यूत गोडबोले, माधव शिरवळकर यांची पुस्तके उपयुक्त आहेत इथे पण माधव शिरवळ्कर प्रश्नोत्तर रुपात भेटतील.
प्रकाश घाटपांडे

यन्ना _रास्कला's picture

8 Jun 2009 - 9:43 am | यन्ना _रास्कला

दिली म्हनुन घाट्पान्डे सायबाला धन्य्वाद.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि?

पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?

गुंडोपंत's picture

2 Oct 2007 - 9:00 am | गुंडोपंत

पुर्वी विन९८ मध्ये आय इ (इन्टरनेट एक्सप्लोरर) सी ड्राईव्ह वर सिस्टीम्स की प्रोग्राम्स फोल्डर मध्ये एक टेम्प नावाचे फोल्डर बनवत असे. त्यातल्या अगम्य नावांच्या इतर फोल्डर्स मध्ये हे सेव्ह होत असे.

आजही एक्स पी मध्ये ते टेम्प फोल्डर बनते पण ते आता जास्त लपवलेले आहे असे वाटते.
चटकन सापडत नाही. मला तरी नाही सापडले.
पण शांतपणे शोध घेतल्यास या फाईल्स नक्की सापडू शकतात. गुगल च्या प्रॉडक्टस वर विश्वास असेल तर,
गुगल डेस्कटॉप सर्च वापरूनही या फाईल्स शोधता येवू शकतील असे वाटते.

इतरही अशी सर्च टूल्स नेटवर शोध्ल्यास सापडतील असे वाटते.

आशा आहे या माहीतीचा उपयोग होईल.

आपला
गुंडोपंत