मला पडणारे काही प्रश्न

एमी's picture
एमी in काथ्याकूट
29 Sep 2010 - 10:26 am
गाभा: 

रुढी/परंपरा पुरुषांना सोयिस्कर आहेत म्हणुन अजुनही पाळल्या जाव्यात का?
काही उदाहरणे

  1. मुलीने लग्न झाल्यावर मुलाच्या घरी/सासरी रहायला जाणे
    जर मुलगी (एकुलती एक असेल/फक्त बहिणी असतील तरीही) आपले घर सोडून येते तर मुलानेही त्याचे घर सोडले आणि दोघानी नविन संसार मांडाला तर एवढा गहजब का माजवला जातो. मी ऐकलेल्या काही प्रतिक्रिया "मुलीने घर तोडल", "मुलगा म्हातारया आई वडिला ना सोडुन गेला बायकोच्या मागे, आता ते बिचारे एकटेच राहतात", "या वयात किती हाल बिचारयांचे"
    हेच विचार मुलीच्या आई वडिला ना लागू होत नाहीत का?
  2. मुलगा म्हातारया आई वडिला सोबत रहतो तर तो कर्तव्यदक्ष, पण मुलगी तिच्या आई वडिला कडे लक्ष देत असेल तर "तीला अजुनही माहेरचेच कौतुक आता सासरी लक्ष द्यावे की थोडे"
  3. सासू-सासरे, मुलगा-सुन ला काहि सल्ला दिला तर "ते आपल्या अनुभवाचे फायदे देतात/ त्या घरातले संस्कार्/रुढी सांगतात." पण तेच मुली च्या आई वडिलानी काही सांगितले तर "ते यांच्या संसारात लुडबुड करतात"
  4. वानप्रस्थाश्र्म सोयिस्कर रित्या विसरला का जातो?
  5. मुलगा जन्माला आला म्हणजे "चला आता तुमच्या म्हातारपणा ची काठी झाली". मुल future investment म्हणुन जन्माला घालता का? की तुम्हाला पालकत्वा चा आनंद घ्यायचा आहे म्हणुन?
  6. लग्न केवळ एक परंपरा आहे म्हणुन चेकलिस्ट बनवून मुलगा/मुलगी शोधावी का? कि तुम्हाला कोणी आवडते आणि तुम्हाला त्या माणसा सोबत आयुष्य घालवायला आवडेल म्हणून?
  7. housewife = free of cost (maid+prostitute+surrogate mother)?
  8. मुली financially independant झाल्याने आजकाल प्रोब्लेम्स खुप वाढले? की आता पर्यन्त मुली ना समाज फुकट राबवून घेत होता?
  9. जावई मुलिला घरकामात मदत करतो तर तो चांगला. पण मुलाने सुनेला मदत केली तर तो "बायकोचा गुलाम्/हातातले बाहुले"?
  10. मुलगा ऑफिस मधुन दमुन येतो. पण सुनेने रात्रिचा स्वयंपाक तरी घरी बनवायलाच हवा?
  11. मुलगा खाण्यापिण्या चा षौकिन. पण बनवून देणार बायकोच?

प्रतिक्रिया

सदाची पहुणी's picture

29 Sep 2010 - 11:04 am | सदाची पहुणी

करुणा गोखले च बाईमाणूस हे पुस्तक वाचाव.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

29 Sep 2010 - 11:07 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

हे पुस्तक अजून पूर्ण वाचून झालेलं नाहीये, पण मलातरी हे पुस्तक बरंच आवडलं; विचार, मांडणी या सगळ्याच दृष्टीने!

बाकी या विषयावर चर्चा करावी अशी इच्छा झाली की झाडावरून उतरेन खाली!

प्राजु's picture

30 Sep 2010 - 5:35 am | प्राजु

अगदी हेच आलं मनात.
सध्या झाडावर चांगली फांदी मिळाली आहे.. बघूया कोणाच्या किती विकेट्स पडतात ते.. मग खाली यायचं का नाही ते ठरवेन.

सदाची पहुणी's picture

29 Sep 2010 - 11:07 am | सदाची पहुणी

करुणा गोखले च बाईमाणूस हे पुस्तक वाचाव.

विजुभाऊ's picture

29 Sep 2010 - 11:21 am | विजुभाऊ

सातवा मुद्दा जर्रा वेगळ्या लॉजीकने सुद्धा अ‍ॅप्लाय होतो
Husband for Housewife = Free Of Cost ( Breadwinner + हक्काचा Slipping Partner + Security + Income Source + Mentor for children + Driver etc)

पाहुणे साहेब तै. प्रत्येक गोष्टीच्या विपर्यास करता येतो.

अवांतर : नवरा असलेल्या पुरुषांला बायकोसाठी फ्री ऑफ कॉस्ट मेल प्रॉस्टिट्यूट म्हणाले तर कसे?

पक्या's picture

29 Sep 2010 - 1:12 pm | पक्या

माझ्या माहितीतील अनेक कुटूंबांमध्ये Mentor for children + Driver ही कामे पण हाऊस वाइफ करते.
नवरे ऑफिस कामामध्ये इतके बिझी असतात की मुले झोपल्यावरच घरी येतात नाहितर सारखे टूर वर असतात. त्यामुळे या बायकांच्या बाबतीत Security चा मुद्दा ही मोडीत निघतो. आणि टूर वर असल्याने हक्काचा स्लिपींग Partner ह्या गोष्टीला काही अर्थ रहात नाही,
इथे जवळच रहाणार्‍या एका कुटूंबातील नवरा १ महिना भारतात गेला आहे ऑफीसच्या कामासाठी.

आणि तसेही ओळखीतल्या इतर कुटूंबातील कमावत्या स्त्रीयां त्या हाऊस वाइफ नसूनही रोजचा रात्रीचा स्वयंपाक; मुलांचे , स्वतःचे आणि नवर्‍याचे डबे , नवर्‍याला भाजीपाल्यातले काही कळत नाही म्हणून बाजारहाट करणे, मुलांचा अभ्यास वगैरे कामे करतात.

स्वैर परी's picture

29 Sep 2010 - 5:48 pm | स्वैर परी

अगदी बरोबर म्हटले आहे.

मिसळभोक्ता's picture

29 Sep 2010 - 12:44 pm | मिसळभोक्ता

Slipping Partner

ही नवरे जमात असतेच स्लिपरी.

नवरा असलेल्या पुरुषांला

समाज किती प्रगत झालाय, नै ?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

29 Sep 2010 - 1:15 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मिभोकाका आले!

श्रावण मोडक's picture

29 Sep 2010 - 4:15 pm | श्रावण मोडक

+१

विनायक प्रभू's picture

29 Sep 2010 - 5:39 pm | विनायक प्रभू

तेथे पाहीजे जातीचे ते उगाच नै म्हणत.
सध्या विजुभौ काटेदार स्लिपर्स वापरतात म्हणे.

मिसळभोक्ता's picture

29 Sep 2010 - 9:41 pm | मिसळभोक्ता

त्यांनी काही वेगळीच अनुभूती येते का ?

आणि काटेदार ? तुम्हाला बहुतेक "रिब्ब्ड" म्हणायचे असावे. मॅग्नम कंपनीच्या रिब्ब्ड स्लिपर्स.

(स्लिपर्स - समथिंग यू स्लिप ऑन)

शिल्पा ब's picture

29 Sep 2010 - 11:24 am | शिल्पा ब

वरील काही प्रश्न मी माझ्या सासरच्यांना विचारले असता नुसती रडारड आणि माझ्या नावाने बोटं मोडणं एवढंच पदरी पडलं...

माझ्या नवर्याच्या आईचा जावई मुलीला सोडून राहिला तर "किती ताटातूट होते त्यांची" अन मला माझ्या नवर्यापासून दूरच राहायला पाहिजे म्हणून गोंधळ..
सामंजस्याने सुटत नाही तेव्हा सरळ भांडण केलेले परवडते..उगाच दुसर्याला दाखवायला म्हणून वरवर गोड कशाला वागायचे?

माझ्या नवर्याच्या आईचा जावई

कोण!!????

विश्वनाथ मेहेंदळे's picture

29 Sep 2010 - 1:22 pm | विश्वनाथ मेहेंदळे

त्यांच्या नणंदेचा नवरा. चौथीच्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेला गेल्यासारखे वाटले.

मिसळभोक्ता's picture

29 Sep 2010 - 1:26 pm | मिसळभोक्ता

बायकोच्या बहिणीच्या नवर्‍याला "साडू" असा विशिष्ट शब्द असताना, नवर्‍याच्या बहिणीच्या नवर्‍याला काहीच शब्द नसावा, ह्याबद्दल समस्त नवरेजातीकडून निषेध व्यक्त करतो.

आणि मराठीत "नाडू" हा नवीन शब्द दाखल करावा, ही विनंती करतो.

योगी९००'s picture

29 Sep 2010 - 2:47 pm | योगी९००

नाडू शब्द चांगला आहे..

"भाडू" किंवा "लाडू' सुद्धा चालेल..लाडू जास्त चांगला कारण बहिणीच्या नवर्‍याचे नेहमीच लाड होतात.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

29 Sep 2010 - 3:17 pm | विश्वनाथ मेहेंदळे

लाडू वाचून बेसनलाडू आठवले :-) आणि भाडू हे एका शिवीचे प्रेमळ व्हर्जन वाटते आहे.

सुहास..'s picture

29 Sep 2010 - 3:58 pm | सुहास..

हा हा हा

एक गाणे आठवले ...

'तुझा खर्च लागला वाढु '
'सांग किती ग कर्ज काढु '
'वर काल मेव्हणा आलाया भाडु'
'सांग कितीग कर्ज काढु'

धमाल मुलगा's picture

29 Sep 2010 - 6:56 pm | धमाल मुलगा

निषेधाशी सहमत.

नाडू शी असहमत. च्यायला, तो बिचारा स्वतःच नाडलेला असतो, त्तो कुणाला 'नाडू' शकेल?
कायतरीच हाँ काका तुमचं. ;)

विकास's picture

29 Sep 2010 - 7:30 pm | विकास

नाडू च्या ऐवजी "नडू" पण होऊ शकेल...

बाकी याच संदर्भात एक छान म्हण आहे: "जावई माझा भला, लेकीसोबत आला :-) आणि मुलगा माझा दिवटा सुनेपाठी गेला :( "

इतर प्रश्नांच्या संदर्भात मला वाटते मिपावर केवळ युयुत्सु हे एकच व्यक्तीमत्व अधिकारवाणीने उत्तरे देऊ शकेल...

धमाल मुलगा's picture

29 Sep 2010 - 7:33 pm | धमाल मुलगा

अहो विकासदादा,
ज्या बिचार्‍याला कुणाला नाडतासुध्दा येत नाही तो नडू कसा शकेल? नडने कु डेरिंग लगता भाय... ;)

विकास's picture

29 Sep 2010 - 7:45 pm | विकास

जर बारामतीकर असे म्हणायला लागले तर बोलणंच खुंटल... :( ;)

धमाल मुलगा's picture

29 Sep 2010 - 8:01 pm | धमाल मुलगा

अहो चालायचंच..जगरहाटी आहे. बिचार्‍या पुरुषांना काही किंमत आहे का? ;)
बाकीची मर्दुमकी बाहेर..घरात शिरलं की मिशी गप खाली!

नगरीनिरंजन's picture

29 Sep 2010 - 8:13 pm | नगरीनिरंजन

आजकाल नवर्‍याने मिशी ठेवलेलंच आवडत नाही बर्‍याच बायकांना तर खालीवर करायचा प्रश्नच नाही. :-)

विनायक प्रभू's picture

29 Sep 2010 - 8:15 pm | विनायक प्रभू

ची एक क्रिप्टीक प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

29 Sep 2010 - 8:51 pm | श्रावण मोडक

बाकीची मर्दुमकी बाहेर..घरात शिरलं की मिशी गप खाली!

काय रे? बाहेर उद्योग? ;)

श्रावण मोडक's picture

29 Sep 2010 - 8:51 pm | श्रावण मोडक

बारामतीकर = जे बोलतात त्याच्या नेमका उलटा अर्थ असतो.
काय विकासराव, तुम्ही हे विसरलात? :)

धमाल मुलगा's picture

29 Sep 2010 - 9:39 pm | धमाल मुलगा

>>बारामतीकर = जे बोलतात त्याच्या नेमका उलटा अर्थ असतो.
असं गृहित धरुन चाललं तर फसगत नक्की. ;)

विकास's picture

29 Sep 2010 - 11:15 pm | विकास

बारामतीकर = जे बोलतात त्याच्या नेमका उलटा अर्थ असतो.

एकदम बरोब्बर! पण कधी कधी कसे चुकून का होईना बाहेर येतच... आणि तुम्ही दाखवल्या परमान मग बाहेर असताना - घरात असल्यावर असले प्रतिसाद येतात. :-)

सहीच आहे ! ... आधी कधी ऐकली नव्हती, आणि आता कधी विसरणार नाही

नगरीनिरंजन's picture

29 Sep 2010 - 8:16 pm | नगरीनिरंजन

आणखी एक घ्या:
पोरी नेल्या चोरांनी आणि पोरं नेली घारींनी.

अश्विनीका's picture

29 Sep 2010 - 10:26 pm | अश्विनीका

तुम्हाला माहित नाही तो शब्द म्हणजे शब्दच नाही असे नाही.
नणंदेच्या नवर्‍याला नंदाई किंवा नंदोई म्हणतात.

मिसळभोक्ता's picture

29 Sep 2010 - 10:29 pm | मिसळभोक्ता

नंदोई हे हिंदीत. मराठीत काय म्हणतात ?

पण हिंदीत नणंदेला ननंद म्हणतात फक्त ण आणी न चा तर फरक आहे. मग नणंद हा शब्द मूळ हिंदी आहे काय?

हिंदीत नणंदेला ननंद म्हणतात तसेच मराठीत पण नंदाई / नंदोई हा शब्द वापरतात.
ह्यातला कोणता शब्द हिंदीतून मराठीत आला किंवा मराठीतून हिंदित गेला ते माहित नाही.
आमच्याकडे नातं सांगताना नंदाई हा शब्द वापरला जातो. आणि हाक मारताना जिजा हा शब्द वापरतो. जि़जीचा नवरा तो जिजा. नणंदेला जिजी म्हणतात म्हणून.

विजुभाऊ's picture

29 Sep 2010 - 11:12 pm | विजुभाऊ

नवर्‍याच्या बहिणीच्या नवर्‍याला काहीच शब्द नसावा,
त्याला गुजरातीत नंदोजी हा शब्द आहे
आत्याच्या नवर्‍याला फुवा हा शब्द आहे. ( मराठीत आतोबा हा शब्द आहे पण तो आयतोबा शी जरा जवळीक साधतो).

नितिन थत्ते's picture

29 Sep 2010 - 11:27 am | नितिन थत्ते

जागा राखीव.

अनिल २७'s picture

29 Sep 2010 - 12:58 pm | अनिल २७

टाकला बॉ रुमाल...

विकास's picture

29 Sep 2010 - 7:32 pm | विकास

जागा राखीव.

कुणाच्या बाजूने? नवर्‍याच्या का बायकोच्या?

पैसा's picture

29 Sep 2010 - 8:37 pm | पैसा

योग्य वेळ पाहून मारा उडी!

ब्रिटिश टिंग्या's picture

29 Sep 2010 - 11:43 am | ब्रिटिश टिंग्या

यावर युयुत्सुंचे अभ्यासपुर्वक मत जाणुन घेण्यास आवडेल ;)

अनिल २७'s picture

29 Sep 2010 - 1:00 pm | अनिल २७

प्रश्न फार आवडले.. काही काही काळजाला भिडले.. मन सुन्न झालं.. अजून येऊ द्यात...

पाषाणभेद's picture

29 Sep 2010 - 1:00 pm | पाषाणभेद

काय गोष्ट आहे. अजुन एक लाहीधागा*.

* पॉपकॉर्न

अब् क's picture

29 Sep 2010 - 1:04 pm | अब् क

१००+

अनिल २७'s picture

29 Sep 2010 - 1:08 pm | अनिल २७

कुणी आहे का तिकडे..? या पाहूणे ताईंना जरा ते आपले मागचे "आय्.टी., नवरे, स्वयंपाक " असल्या धाग्यांच्या लिंक्स द्या बरे.....

प्रियाली's picture

29 Sep 2010 - 5:37 pm | प्रियाली

योग्य उत्तरे युयुत्सूंना माहित असावीत असे वाटते. चू. भू. द्या. घ्या. ;)

स्वैर परी's picture

29 Sep 2010 - 5:58 pm | स्वैर परी

पाहुणे बाई, तुमचे प्रश्न अगदी बरोबर आहेत!
अवान्तरः माझ्या बहिणीच्या सासुने माझ्या बहिणीचे पहिले बाळन्तपण आणि पाचवी सासरीच करायला लावली. आणि स्वत:च्या मुलीचे बाळन्तपण मात्र तिच्या माहेरिच करवुन घेतले.
तात्पर्यः मुलीला सासरी फारशी किम्मत दिली जात नाहि. :(

मुलीला सासरी फारशी किम्मत दिली जात नाहि
असहमत.
मला मुलगी म्हणणार असाल तर एक गोष्ट सांगते.
तिकडे प्रभूमास्तरांच्या 'मुंजा' च्या धाग्यावर मला त्या गोष्टीतली गम्मत आधी कळली तरी कोण्णी शाबासकी दिली नाही. म्हणजे तिथेही किंमत शून्य झाली कि नाही?;)

तुम्हाला पडलेले प्रश्न कधी ना कधी, कोणत्या ना कोणत्या स्वरुपात, कमी अधिक प्रखरतेने अनेकांना पडतात ... तुम्ही इथे लिहून दाखवलंत इतकंच ... पण समाधानकारक उत्तर मिळतच नाही ना :)

समाधानकारक उत्तर मिळतच नाही
त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं द्यायला गेलं तर धागा शंभरी पार करेल. मला इनो घ्यायला लागेल त्याचं काय?;)

तू एखादा पाशवी धागा सुरू कर ग! मग बघ, आम्ही तुझ्या पाठीमागून आहोतच!

बाकी पाहुणे नी सगळ्या बायकांची व्यथा मांडली आहेच. त्याच्या विरुद्ध कोण काय लिहितो की काय तेवढं बघूयात!

पैसाताई, धन्यवाद!
तुम्ही ज्या पाशवी उत्साहाने माझ्यापाठी उभ्या राहता ते पाहून डोळे पाणावले.;)
चला येता का झाडावर? तुमच्यासाठी एका फांदीवर जागा व पॉपकॉर्न फ्री!

पैसा's picture

29 Sep 2010 - 7:00 pm | पैसा

आण कुठे ते! पायजे तर अख्ख्या पाशवी ग्यांगला बोलावते.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

29 Sep 2010 - 10:42 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मी पण आले.

रेवतीताई, हूल नको गं देऊस नुस्ती. एक दण्णका धागाच काढ तू!

निस्का's picture

29 Sep 2010 - 11:41 pm | निस्का

ए मी पण मी पण मी पण मी पण मी पण !!!! ;-)

पैसा's picture

29 Sep 2010 - 11:44 pm | पैसा

तुला पण झाडावर एक फांदी फ्री आणि पॉपकॉर्न लागू!

शेखर's picture

29 Sep 2010 - 11:45 pm | शेखर

एकाच झाडावर एवढे अत्याचार? वेगवेगळी झाडे शोधा की. ;)

निस्का's picture

29 Sep 2010 - 11:46 pm | निस्का

बेष्ट!!! कोला आणते मी!

शेखर's picture

29 Sep 2010 - 6:58 pm | शेखर

हॅ हॅ हॅ ... "पाशवी" अत्याचाराला स्वतः हुन कोण सामोरा जाणार ;)

पैसा's picture

29 Sep 2010 - 7:01 pm | पैसा

सगळेच तुमच्यासारखे समजदार नसतात हो!

शुचि's picture

29 Sep 2010 - 6:30 pm | शुचि

वनं नाहीशी झाली आहेत म्हणून वानप्रस्थाश्रम विसरला जातो. कुठे जाणार म्हातारे आई-बाप? तुम्ही त्याच्या वयाचे व्हाल तेव्हा कळेल.

बाकी प्रश्न उत्तम. मस्तानीशी सहमत.

योगी९००'s picture

29 Sep 2010 - 7:29 pm | योगी९००

मुलगा ऑफिस मधुन दमुन येतो. पण सुनेने रात्रिचा स्वयंपाक तरी घरी बनवायलाच हवा?

सुन जर घरीच टाईमपास करत असेल तर घरीच बनवावा..नाहीतर मुलगा ऑफिसमधून येईपर्यंत वाट पहावी आणि मुलगा आला की त्यालाच स्वयंपाक बनवायला सांगावे..नाहीतर त्याच्या आईवडीलांनी त्याला काहीच शिकवलेले नाही असे म्हणून त्याच्या समस्त कुळाचा उद्धार करावा.

बाकी तुमचे प्रश्न वाचाल्यावर एवढेच जाणवले की तुम्हाला सासरी खुप जाच झालेला दिसतोय..

बाकी तुमचे प्रश्न वाचाल्यावर एवढेच जाणवले की तुम्हाला सासरी खुप जाच झालेला दिसतोय..
तो जाच कमी करण्यासाठी त्याना अग्निहोत्र ही टीव्ही सिरीयल दाखवा म्हणजे सासूसासरे सूकत जाणार नाहीत

गणेशा's picture

29 Sep 2010 - 9:38 pm | गणेशा

रुढी/परंपरा पुरुषांना सोयिस्कर आहेत म्हणुन अजुनही पाळल्या जाव्यात का?
>>> नाही

१. मुलीने लग्न झाल्यावर मुलाच्या घरी/सासरी रहायला जाणे
जर मुलगी (एकुलती एक असेल/फक्त बहिणी असतील तरीही) आपले घर सोडून येते तर मुलानेही त्याचे घर सोडले आणि दोघानी नविन संसार मांडाला तर एवढा गहजब का माजवला जातो. मी ऐकलेल्या काही प्रतिक्रिया "मुलीने घर तोडल", "मुलगा म्हातारया आई वडिला ना सोडुन गेला बायकोच्या मागे, आता ते बिचारे एकटेच राहतात", "या वयात किती हाल बिचारयांचे"
हेच विचार मुलीच्या आई वडिला ना लागू होत नाहीत का?

>> होतात लागू, परंतु बर्याचदा मुलीच्या घरचेच मुलीला सासरी राहण्यास सांगतात . माझ्या पाहण्यात तर एकही घर नाही तेथे घरजावइ आहे. सगळे सिनेमात्च पाहिले आहे. आणि घर जावइ असला कोणी तर उलट प्रश्न पण समाज विचारलेच
बायकोच्या मागे जाउन वेगळे राहणे (वेगळा संसार मांडने) .. आणि मुलगी सासरी जाणे ह्या वेगळ्या गोश्टी आहेत.

२. मुलगा म्हातारया आई वडिला सोबत रहतो तर तो कर्तव्यदक्ष, पण मुलगी तिच्या आई वडिला कडे लक्ष देत असेल तर "तीला अजुनही माहेरचेच कौतुक आता सासरी लक्ष द्यावे की थोडे"

>>> सासरी लक्ष न देता असे होत असेन तर माहेरचे कौतुक आहे असे बरोबर आहे.
दोन्हीकडे लक्ष देवून संसार चालला असेन तर उलट संसाराच्या कसरती मध्ये ही आइ वडिलांना न विसरणारी सुन आहे ... आणि म्हणुन आम्हाला ही काही काळजी नाही असेच वाटले पाहिजे सासुअ- सासर्यांना.
(मात्र माहेरी भाउ असेल तर त्याने लक्ष दिले की काम होते असे वाटते)

३. सासू-सासरे, मुलगा-सुन ला काहि सल्ला दिला तर "ते आपल्या अनुभवाचे फायदे देतात/ त्या घरातले संस्कार्/रुढी सांगतात." पण तेच मुली च्या आई वडिलानी काही सांगितले तर "ते यांच्या संसारात लुडबुड करतात"

>> संस्कारांची शिदोरी मोठ्यांकडुन घेत जावेच. आणि कुठली गोष्ट केंव्हा आणि कसी सांगावी हे ही कळाले की ती लुडबुड न होता मदत ठरते.

४. वानप्रस्थाश्र्म सोयिस्कर रित्या विसरला का जातो?
>> वानप्र्स्थास्रम म्हनजे काय हे खरेच माहित नाही.

५. मुलगा जन्माला आला म्हणजे "चला आता तुमच्या म्हातारपणा ची काठी झाली". मुल future investment म्हणुन जन्माला घालता का? की तुम्हाला पालकत्वा चा आनंद घ्यायचा आहे म्हणुन?
>> माझ्या पाहणीतील जवळ जवळ सगळे जण मुलगी पाहिजे म्हणुन हट्ट धरताना पाहिले आहे. आणि माझे सुद्धा तसेच असेन असे वाटते. आणि सुशिक्षित घरी मुली- मुले असा फरक आता होत नाही. त्यामुले काठी वगैरे काही माणत नाही कोणी आता. आणि आजकालच्या बर्याच काठ्या परदेशात जातात म्हन्जे सासरीच गेलेत मुले असे समजावे त्यांनी ही.

६. लग्न केवळ एक परंपरा आहे म्हणुन चेकलिस्ट बनवून मुलगा/मुलगी शोधावी का? कि तुम्हाला कोणी आवडते आणि तुम्हाला त्या माणसा सोबत आयुष्य घालवायला आवडेल म्हणून?
>> ज्यांना चेकलिस्ट बनवुन लग्न करायचे असते ती मुले तुमच्या सातव्या प्रश्नासाठी तसे करतात. आणि त्या मुली विजु भावुंनी जे उत्तर दिले त्या साठी करतात

७. housewife = free of cost (maid+prostitute+surrogate mother)?

>>> चेकलिस्ट बनवणार्यांची हीच अपेक्षा असते. त्यामुळे आपण कोणाच्या चेकलिस्ट साठी बनलो नाही जे जानुन आपल्या स्वखुशीने .. पाहिजेन तसा योग्य जोडीदार निवडावा म, हे प्रश्न पडणार नाहीत

८ . मुली financially independant झाल्याने आजकाल प्रोब्लेम्स खुप वाढले? की आता पर्यन्त मुली ना समाज फुकट राबवून घेत होता?
>>> समाज मुलींना खुप राबवुन घेत होता अआणि आहे. प्रत्येक घराचे कर्तव्य आहे आपल्या बायकोला/सुनेला व्यवस्थीत समान वागनुक द्य्वावी. मग ती नोकरी करणारी असो वा नसो.

9. जावई मुलिला घरकामात मदत करतो तर तो चांगला. पण मुलाने सुनेला मदत केली तर तो "बायकोचा गुलाम्/हातातले बाहुले"?
>>> अजुन पर्यंत असे जास्त माझ्या पाहण्यात आले नाही. अआणि नवरे बायकोला मदत करु शकतात हे वरील वाक्याने ५० % तरी सिद्ध झाले हेच बरे वाटले. बाकी बाहुले वगैरे काही नसते .. प्रत्येक नवर्याने हातभार लावावा कामाला असे वाटते.

१० मुलगा ऑफिस मधुन दमुन येतो. पण सुनेने रात्रिचा स्वयंपाक तरी घरी बनवायलाच हवा?
मुलगा खाण्यापिण्या चा षौकिन. पण बनवून देणार बायकोच?

>>> स्वयपाकाला लागणारी मदत त्याने केल्यास उत्त्म,
पण सासु ही घरात मोकळॅए असेन तर तीच सुन येइ पर्यंत बरेच काम करते .. त्यामुळॅ सासु नसताना .. नवर्याने स्वयपाक जमला अनही तरी त्या साठीची सगळी मदत बायकोला करावी .

शिल्पा ब's picture

29 Sep 2010 - 11:05 pm | शिल्पा ब

<<<पण सासु ही घरात मोकळॅए असेन तर तीच सुन येइ पर्यंत बरेच काम करते .

आणि वेगळे रहात असतिल तर?

इंटरनेटस्नेही's picture

30 Sep 2010 - 2:03 am | इंटरनेटस्नेही

जो तो ज्याचं त्याचं बघुन घेईल. आपण कशाला विचार करायचा त्याचा. आणि विवाह समुपदेशक, वेड्यांची इस्पितळे, पोलिस, न्यायालय आहेतच ना.

(सुधारित व्यावहारिक) इंट्या.

शिल्पा ब's picture

30 Sep 2010 - 5:25 am | शिल्पा ब

तुला किती बायका रे एकुण?

इंटरनेटस्नेही's picture

30 Sep 2010 - 9:43 pm | इंटरनेटस्नेही

बायको नाही पण सध्या तीन उमेदवार आहेत, त्यापैकी जी योग्य वाटेल तिला बायको या पदावर पदोन्नती देण्यासंबंधी निर्णय घेईन.

क्रमांक एक - इंदिरा गांधी रा. मु. वै.
क्र. दोन - क्लासेस
क्र. तीन - माझी सोसायटी.

अगला सवाल? शिल्पा जी?

पैसा's picture

30 Sep 2010 - 9:51 pm | पैसा

क्र. १ - पुढच्या वर्षी कावळ्याबरोबर तुझा फोटु लावावा लागेल.
क्र. २ - तुझे विद्यार्थी पण पाणवठ्यावर जायला लागतील.
क्र. ३ - सोसायटीत एवढी भांडणं असतात, की भीक नको पण कुत्रा आवर म्हणायची वेळ येते.

(क्लासमधे कोण आहे, सोसायटीत कोण आहे, ही अवांतर माहिती दिलीस तर काहीतरी बोलू शकते.)

(ह.घे.)

बेसनलाडू's picture

30 Sep 2010 - 5:35 am | बेसनलाडू

पाहुणे, तुम्ही टाइम ट्रॅवल करून २०१०-११ मध्ये आलात तर यातील अनेक प्रश्न सुटलेले दिसतील. सुटलेले प्रश्न बाजूला टाकून मग नवीन प्रश्न घालून ही यादी अपडेट करता येईल. मग त्यावर चर्चा करता येईल.
(सुधारक)बेसनलाडू

छ्या! बेलाजींनी आमचं गुपित फोडलं!
चांगली गरमागरम चर्चा झडली असती.....
ती बघून झाडावर बसलेल्या आमच्यासारख्यांची करमणूक झाली असती....
फांद्या मोडून चार दोन जण जमिनीवर घसरले असते....

बेसनलाडू's picture

30 Sep 2010 - 6:23 am | बेसनलाडू

सध्याच्या यादीतील पाहुण्यांचे काही प्रश्न टाइम ट्रॅवल ने सुटले की मीच नवीन काही प्रश्न सुचवून यादीची सुधारीत आवृत्ती देतो. म्हणजे तर मग झाडावर चढायची शर्यतच लागेल ;)
(वृक्षवल्लीप्रेमी)बेसनलाडू

शेखर's picture

30 Sep 2010 - 7:02 am | शेखर

त्यांचे प्रश्न सुटो वा न सुटो , तुम्ही सुधारीत यादी द्याच ही विनंती.

कवितानागेश's picture

30 Sep 2010 - 11:08 am | कवितानागेश

हे टाइम ट्रॅवल कसे करतात हो? किती तिकिट असेल ?
मला माझ्या काही 'विशिष्ट' नातेवाईकांना पाठवायचे आहे !
त्याना जुना काळ वापरुन वापरुन 'ऑर्थोडोक्सोसिस' हा विकार झाला आहे.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

1 Oct 2010 - 1:47 am | विश्वनाथ मेहेंदळे

बेलाशेट, नक्की कुठले प्रश्न सुटले आहेत ते पण सांगा.

(यशस्वी)बेसनलाडू

तिमा's picture

1 Oct 2010 - 8:10 pm | तिमा

हे प्रश्न मध्ययुगीन वाटतात, प्रतिसाद म्हणजे खरडवही वाटते.

पुण्याचे वटवाघूळ's picture

9 Aug 2012 - 9:54 am | पुण्याचे वटवाघूळ

सगळेच प्रश्न विचार करण्यासारखे आहेत पाहुणेताई. त्यातही:

वानप्रस्थाश्र्म सोयिस्कर रित्या विसरला का जातो?

हा प्रश्न मला विशेष आवडला. "आपल्या" भारतीय संस्कृतीप्रमाणे मुलगा लग्न करून संसाराला लागला की पालकांनी वानप्रस्थाश्रमात जायचे असते. म्हणजे इतके वर्ष घरच्या जबाबदारीमुळे स्वतःच्या आवडीनिवडीच्या गोष्टी करता आल्या नसतील त्याकडे लक्ष देणे, घरातील प्रत्येक गोष्टीत स्वतःचे नाक न खुपसता विचारल्यासच सल्ला देणे इत्यादी गोष्टींचा समावेश होता. पण अनेकदा आपली इतक्या वर्षांपासूनची सत्ता जाईल या भितीने असे पालक मुलाचे लग्न झाले की अजूनच स्वतःचाच हेका लावतात. एकदा मुलाचे लग्न झाल्यानंतर तो मुलगा आणि घरचे स्वयंपाकघर या दोन्हींवर त्या मुलाच्या नव्या बायकोचाही हक्क असतो ही गोष्ट आया जितक्या लवकर समजतील तितके चांगले.

महिन्याचा पगार झाल्यानंतर तो माझ्या हातात द्यायला हवा ही पालकांची अपेक्षा असणे हा प्रकार फार जुना नाही (ही अपेक्षा माझ्याबद्दलही होती. पण आता सॅलरी अकाऊंटमध्ये पगार डायरेक्ट जमा होतो त्यामुळे हा प्रकार करता यायची शक्यता कमी झाली आहे) . म्हणजे काय की आपल्याला सोयीस्कर असेल तिथे भारतीय संस्कृतीचा उदो-उदो करायचा आणि अंगाशी आले की वानप्रस्थाश्रमासारख्या कल्पनांना पायदळी तुडवायचे आणि "आम्ही तुझ्या हितासाठी सांगत आहोत" चे प्रोटेक्शन कायम आहेच!!

वानप्रस्थाश्रम सोयीस्करपणे का विसरला जातो हा प्रश्न मलाही अनेकदा पडतो.

पाशवी धागे नेमके वर आणले की राहावत नाही हेच खरे ;)

(अर्धा माणूस अर्धा पशू) बॅटमॅन.

एमी's picture

9 Aug 2012 - 10:06 pm | एमी

हम्म... प्रश्न अजुनही अनुत्तरीतच आहेत...
भारतात लग्न सुरत, सीरत, दौलत, ताकत (power/position) पाहुन केले जाते. सेक्स, मुलं, आईवडीलांची सेवा, घरकाम इ उद्देश त्यामागे असतात. आणि पैसा, शारिरिक, मानसिक, सामाजिक गरज म्हणुन टिकवले जाते.
बिझनेस डिल प्रमाणेच असते ते पण उगाच परंपरा संस्कृती असा मुलामा चढवला जातो.
सध्यातरी त्यातल्यात्यात फक्त TomKat marriage contract रोचक वाटतेय.
करुणा गोखलेँचा एक लेख सापडला

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=593...

बाकी मुलगा/मुलगी कोणालाही future investment समजु नयेच आणि त्यांनीही पालकांकडुन मालमत्ता मिळण्याची अपेक्षा ठेउ नये...