गाभा:
नुकताच तु-नळी वर "मराठी रॅप" बघायला मिळाला. Colors चॅनल वर "India's Got Talent" मधे प्रदिप काशीकर हा
पोरगा लय भारी मराठी रॅप गातो.
http://www.youtube.com/results?search_query=pradip+kashikar&aq=f
सोनाली, साजिद (जज्ज) यांना त्याचा परफॉर्मन्स खूप अवडला.
आता चर्चेचा मुद्दा:
पण किरण खेर (तिसरी जज्ज) ने मात्र त्याच्या "भाषेवर" टीका केली. तिच्या प्रमाणे, प्रदीप ने मुंबईय्या-हिन्दि भाषेत रॅप केला असता तर "आम्हाला पण" कळला असता. आम्ही म्हणजे साजिद आणि ती !! (साजिद खान ला मराठी कळते ..)
तुमच काय म्हणणे आहे ? प्रदीप ने लोकांना कळावे म्हणून आपली भाषा बदलावी ? त्याने त्याचे नुकसान होण्याची शक्यता आहे? "ईंडिया" च्या टॅलंट मधे फक्त हिंदीच असली पाहिजे का ?
प्रतिक्रिया
28 Sep 2010 - 11:12 pm | प्रियाली
कार्यक्रम हिंदी चॅनेलवर असेल तर स्पर्धकांनी हिंदीतून भाग घेणे योग्य वाटते. तुम्ही काय करता हे परिक्षकांना कळायला हवे परंतु कधीकधी भाषेचे बंध तोडूनसुद्धा कार्यक्रम सादर केला जातो; तसा प्रदीपचा रॅपचा प्रयोग साजिद, सोनाली आणि प्रेक्षकांना आवडला आणि त्यांनी उचलून धरला यातच सर्व आले.
एखाद्या मराठी चॅनेलवरील कार्यक्रमात कोणी तमिळ/ मल्याळी संवाद/गाणी म्हटले आणि परिक्षकांनी "तुम्हाला काय सांगायचे हे कळले नाही." असे सांगितले तर काय चुकीचे आहे?
29 Sep 2010 - 12:58 am | विश्वनाथ मेहेंदळे
२००४ साली वीरझारा नावाचा एक चित्रपट आला होता. थेटरात जाऊन पहिला होता. अर्धा सिनेमा पंजाबीत होता. किरण खेर ला मराठी ऐकण्याचे पैसे तरी मिळत होते, इथे माझे पैसे फुकट गेले. हिंदी सिनेमात अनेक गाणी पूर्ण पंजाबीत असतात. ऐकतो ना आम्ही ती? मग खेर बाईंनी एकदा जरा मराठी ऐकले तर काय भोके पडतात का अंगाला? त्यातून तो काय बोलत होता ते मलाही कळत नव्हते, हिंदीत असते तरी तिला नसते कळले.
याच बाईंनी अनेक चित्रपटात पंजाबी भूमिका केली आहेत. तेव्हा अनेकदा काही काही संवाद पंजाबीत म्हटले असतील की, ते ही चालवून घेतले ना आम्ही. साधारण १० वर्षांपूर्वी गुलजार ने हुतुतू नावाचा चित्रपट काढला होता. त्यात मराठी लहेजा वापरला होता. उत्तर भारतात तो अजिबात चालला नाही त्याचे कारण काही जणांनी लोकांना भाषा आपलीशी वाटली नाही असे दिले होते. अर्थात तो चित्रपट इथे पण नाही चालला म्हणा. पण मुद्दा हा राहतोच की आपण इतरांना चालवून घेतो तसे ते आपल्याला करत नाहीत.
आणि, खेर बाईंना इतकी वर्षे इथे राहून मराठी कळत नाही? थोबाड वर करून सांगायला लाज पण वाटत नाही, कारण आपण मराठी लोक मूर्ख आहोत.
29 Sep 2010 - 1:00 am | शिल्पा ब
+१
29 Sep 2010 - 3:27 am | इंटरनेटस्नेही
(मराठी)
29 Sep 2010 - 6:11 pm | बिपिन कार्यकर्ते
+३
हे पंजाबीचं लोण फार वाढलंय. कधी कधी तर कळत नाही काय बोलत आहेत. आणि हेच लोक मराठी अंगाने जाणार्या हिंदीला हसतात.
29 Sep 2010 - 9:25 pm | सविता
+४
29 Sep 2010 - 11:22 pm | शुचि
>> आणि हेच लोक मराठी अंगाने जाणार्या हिंदीला हसतात. >>
+५
गुरमीतचा मित्र यायचा मला विचारायचा "कैसे हो?" मी आपली मराठीचं हिंदी भाषांतर करून म्हणायचे - "मझेमें" :P
लगेच दोघं फिदी फिदी हसायचे. मला कळायचं नाही का ते. मग एके दिवशी मी त्याला विचारलं "आप कैसे है?" तो म्हणाला "बढीया जी आप सुनाइये" मग मला कळलं "कैसे है" ला "बढीया" हा सही जवाब असतो :(
29 Sep 2010 - 1:03 am | प्रियाली
मी पूर्ण विडिओ आता पुन्हा बारकाईने पाहिला. बाईंच्या अंगविक्षेपांवरून शंका घेण्यास जागा आहे खरी.
तसेच, कार्यक्रमाच्या नावात 'इंडिया' हा शब्द भारतभरच्या लोकांना आमंत्रित करतो हा मुद्दाही मान्य.
बाकी खेरबाईंना मराठी का कळत नाही वगैरे प्रश्नांची उत्तरे त्याच देतील. :) मी कोणत्याही अंगाने किरण खेर नाही. ;)
29 Sep 2010 - 4:55 am | बेसनलाडू
पूर्ण पटला. सध्या बॉलिवूडचे जे पंजाबायझेशन चालले आहे, त्या आमच्या नि काही मित्रांच्या निरीक्षणाशी/निष्कर्षाशी पूर्ण जुळणारा प्रतिसाद! म्हणजे चित्रपटाचा नायक अगदी खन्ना, कपूर, कोहली, अरोरा वगैरे; आणि ड्रायवर, घरातील नोकर, कामवाली बाई, पोलीस हवालदार हे सगळे 'डाउनमार्केट रोल्स' (?) हटकून (अनेकदा) मराठी आडनावांचे :)
गाण्यांमध्येही सजदा, रब, विच, हुड, मौजा, मैनु-तेनु असे काय काय असते, ते वेगळेच! आमच्या एका जवळच्या मित्राने याचा इतका धसका घेतलाय की गाण्यात कधीही 'हुड' ऐकले की हाड-हुड्च करत सुटतो. चालायचंच :)
(समविचारी)बेसनलाडू
29 Sep 2010 - 7:05 am | विश्वनाथ मेहेंदळे
>> सध्या बॉलिवूडचे जे पंजाबायझेशन चालले आहे
पंजाबायझेशन हे सध्या चालू नसून ते गेली अनेक वर्षे चालू आहे. सध्या त्याला उत आला आहे इतकेच.
वीरझारा बघून बाहेर पडल्यावर आमची याच विषयावर तक्रार चालू होती की हिंदी चित्रपटात भारतीय संस्कृती=पंजाबी संस्कृती असे समीकरण मांडण्यात येते. यावर आमच्या एका पंजाबी मैत्रिणीने (जी बरीचशी अग्रेसिव आणि अंमळ ढिली होती) दिलेले स्पष्टीकरण "That's because punjabi culture is the richest culture in the world" असे होते. आणि त्यावर आमच्यातील एका एकारान्ती ची प्रतिक्रिया "No, that's because all the ****ing producers and directors are punjabi" अशी होती (पण उघड नाही, केवळ २-३ जणांसमोर. नाहीतर ती महामाया चालून आली असती याच्या अंगावर)
असा माज आपण कधी दाखवणार? इथे आपण सगळ्या गोष्टींचा न्यूनगंड घेऊन चालत असतो.
29 Sep 2010 - 7:19 am | शुचि
directors are not only punjabi but narrow minded punjabi.
इतर एखादा डायरेक्टर असता त्याने इतर संस्कृती एक्स्प्लोर केली असती पण हे पडले माठ पन्जु.
दाक्षीणात्य संस्कृती खूप रिच आहे तशीच आहे मराठी, बंगाली, ओरीया देखील असावी.
पण कलात्म दृष्टीने पहाणारे लोक हवेत. झापड लावून बल्ले बल्ले करणारे माठ पन्जु नकोत.
"आपकी खातीर" पाहीला. ती खन्ना, अरोरा, मेहेरा नावं आली की तिडीकच जाते.
एक प्रकारे बरय म्हणा देशपांडे, मोकाशी, कुलकर्णी नावं घेऊन ती शर्ट फाडत नाचणारी सुपरफिशीअल ध्यानं तरी दाखवत नाहीत ते.
29 Sep 2010 - 1:57 pm | विश्वनाथ मेहेंदळे
>>एक प्रकारे बरय म्हणा देशपांडे, मोकाशी, कुलकर्णी नावं घेऊन ती शर्ट फाडत नाचणारी सुपरफिशीअल ध्यानं तरी दाखवत नाहीत ते
किस्मत कनेक्शन नावाचा एक अतिभंगार चित्रपट पहिला होता. त्यात शाहीद कपूर (गरीबांचा शारूक) एका बाहुल्याला मजेने पटवर्धन असे नाव देतो. आम्ही गडबडा लोळलो होतो थेटरात. आमच्या apartment मध्ये एक पटवर्धन राहायचे, तेच डोळ्यासमोर येत होते सारखे.
29 Sep 2010 - 6:18 pm | प्रियाली
मराठी माणसांनी चित्रपट काढावा, त्यासाठी लागणारा ब्लॅक-व्हाईट मनी आणावा, गरज पडल्यास डी-गँग किंवा तत्सम गँगची मदत घ्यावी, आयटेम साँगवगैरे ठेवावे आणि पात्रांना एकारान्ती किंवा 'कर'करीत आडनावे द्यावीत. ;)
त्या के-गँगला (केकता, करण आणि केकेश कोशन*) त्यांची जागा दाखवून देता येईल. ;)
* यांत किरण खेरही शोभून दिसते.
29 Sep 2010 - 10:37 pm | मिसळभोक्ता
मधुर भांडारकर ह्यासाठीच मला आवडतो.
29 Sep 2010 - 10:48 pm | शेखर
महेश मांजरेकर ला विसरलात..
30 Sep 2010 - 1:38 am | मिसळभोक्ता
त्याचे केस मला आवडत नाहीत.
29 Sep 2010 - 10:50 pm | प्रियाली
तेथे __/\__ माझे जुळती.
29 Sep 2010 - 11:10 pm | रेवती
श्रेयस तळपदे हा निर्माता आहे असं ऐकलय.
बाकी हिंदी शिनेमामध्ये गाणी लिहिणे, संगीत देणे, संवाद लेखन वगैरे कामांमध्ये आहेत मराठी माणसे.
पण एकंदरीतच सिनेमासाठी लागणारा बक्कळ पैसा ओतणं कितीजणांना जमेल हा प्रश्नच आहे.
29 Sep 2010 - 11:12 pm | शिल्पा ब
अय्या!!! कित्ती हँडसम आहे नै तो !!
बाकी त्या मांजरेकर, भांडारकराकडे बक्कल पैसा असेलच कि? का नाही दाखवत मराठी संस्कृती?
30 Sep 2010 - 1:40 am | मिसळभोक्ता
संस्कृती दाखवणे म्हणजे काय ?
इंगा दाखवणे सारखे काही आहे का ?
30 Sep 2010 - 5:19 am | शिल्पा ब
इंगा दाखवणे हीसुद्धा मराठी संस्कृतीच आहे.
30 Sep 2010 - 6:22 am | विश्वनाथ मेहेंदळे
तो आपण बाहेरच्यांना कुठे दावतो? एकमेकांना हिरीरीने दाखवतो.
29 Sep 2010 - 11:15 pm | रेवती
तो हँडसम आहे किंवा नाही यापेक्षा किती चांगले सिनेमे काढतो ते बघुयात.
आणि आपला आणखी एक तो लगानवाला, जोधा अकबर वाला माणूस्.....नाव विसरले.
29 Sep 2010 - 11:24 pm | शेखर
आशुतोष गोवारीकर
30 Sep 2010 - 7:58 am | शिल्पा ब
सिनेमेही बघू अन त्यालाहि बघू...काय हरकत आहे?
30 Sep 2010 - 12:10 am | रुपी
बरोबर आहे. हे निर्माते - दिग्दर्शक वर्षानुवर्षे पंजाबातून बाहेर आलेले नाहीत. पण एकच मसाला ते तरी किती दिवस विकणार? कदाचित त्यामुळेच 'यशराज' चे बरेच चित्रपट सध्या आपटले आहेत.
बाकी 'राज' भीतीने किंवा अजून कुठल्या कारणाने सध्या काही जण मराठी पात्रे टाकतात, पण तसले प्रकार पाहिल्यावर त्यापेक्षा नसलेलेच बरे असं वाटतं (उदा. मध्यंतरी आलेला अक्षय कुमारचा खट्टा मीठा). टिचकुले आडनाव असलेला हा नायक स्वतःच 'टिच्यकुले' असा हिंदीसारखा उच्चारतो.
30 Sep 2010 - 1:41 am | मिसळभोक्ता
हेराफेरीत परेश रावल ला बाबूराव आपटे हे नाव अगदी शोभून दिसत होते, हे विसरलात !
आणि उत्पल दत्तचे "धुरंधर भाटवडेकर" !
30 Sep 2010 - 2:01 am | विश्वनाथ मेहेंदळे
बघा, झाला की नाही मराठी लोकांचा सन्मान, गेल्या ३० वर्षातील चित्रपटांत मिळून तब्बत ३ मराठी पात्रे आठवली की आपल्याला !!! कोण गळे काढतो आहे रे तिथे, मराठी लोकांना दुय्यम दर्शवतात म्हणून ????
30 Sep 2010 - 2:20 am | मिसळभोक्ता
आणखी खूप आठवतात, पण लिहिले नाही.
हिंदी सिनेमातील मराठी पात्रे अधिक की मराठी सिनेमांत हिंदी पात्रे अधीक, ह्याचा शोधा घ्या रे कुणी तरी !
30 Sep 2010 - 2:48 am | शुचि
नका ना ठेऊ मराठी पात्रं अजीबात पण मग मोलकरणी, हवालदार, झाडूवाले देखील पंजाबीच दाखवा ना. ती का गंगूबाई, पांडू हवालदार लागतात यांना. आपल्याला कळायला नको त्यांचा कावा. (कावा शब्दावर प्लीज कोटी नको. )
30 Sep 2010 - 3:16 am | सुप्परमॅन
तुमच्या घरी कधी पंजाबी नोकर होता का? तुमच्या सासरच्या घरी कधी होता का ते पण विचारून घ्या. तुमच्या मोहल्ल्यात पंजाबी नोकर किती त्याची लिस्ट काढा मग आपण पुढे बोलूया.
30 Sep 2010 - 8:32 am | मिसळभोक्ता
अगदी अगदी.
मुंबईत राहणारे निर्माते, दिग्दर्शक, कथा-पटकथालेखक, मोलकरणींची नावे मराठी ठेवणार नाहीत तर मग काय ठेवणार ? प्रियंका गांधी ? बरखा दत्त ? की जयवंतीबेन मेहता ?
शांताराम कादंबरीत रॉबर्ट्स ला ड्रग पुरवणारा गाईड म्हणून प्रभाकर खरे हे नाव वाचले आणि धन्य झालो !
30 Sep 2010 - 12:11 pm | मस्त कलंदर
मला आख्य्ख्या पुस्तकात कुठे त्याचे आडनांव नाही दिसलं.... :(
30 Sep 2010 - 11:38 pm | मिसळभोक्ता
खर्रे असे स्पेलिंग आहे. नीट वाचा पुन्हा.
30 Sep 2010 - 3:04 am | प्रियाली
करन जोगलेकर - अक्षय कुमार - मैं खिलाडी तू अनाडी
डॉ. कुलकर्णी आणि त्यांची बायको - रमेश देव/ सीमा - आनंद
सुभाष नागरे - अमिताभ बच्चन - सरकार/ सरकार राज
शंकर नागरे- अभिषेक बच्चन - सरकार राज
मिली जोशी* - उर्मीला मातोंडकर - रंगीला
सध्या चटकन वरचे आठवले.
* जोशी हे आडनाव उत्तर भारतीयांपासून दक्षिण भारतीयांत असल्याने 'बेनेफिट ऑफ डाउट' द्यावा.
30 Sep 2010 - 10:03 am | नंदन
सिद्धार्थ मराठे - गुलाम (आमिर खान)
30 Sep 2010 - 12:11 pm | मस्त कलंदर
नाना पाटेकरची सगळ्या चित्रपटातली नांवे.
खुरजुवेकर-ख्वाहिशमधली मल्लिका. मी पाहिलेल्या प्रसंगात ती तिच्या आडनावाचा अगदी व्यवस्थित उच्चार करून इतरांनाही त्यांचा उच्चार चुकतोय हे सांगत होती.
बाकी, एक व्यक्तिगत मत म्हणून पिक्चरमधली पंजाबी-तत्सम धाटणीची नांवे आपल्या पोरांना देणार्या आईबाबांची पण मला जाम कीव येते.
उदा. श्रीदेवी पाटिल, समीरा साळुंखे, खुशी जगदाळे. ही नावे माझ्या परिचयातल्या मुलींची आहेत. मुलांची उदा. पटकन आठवली नाहीत म्हणून लिहिली नाहीत
30 Sep 2010 - 11:46 pm | प्रियाली
रघुनाथ नामदेव शिवलकर - संजय दत्त - वास्तव
राजाराम जोशी* -नसिरुद्दिन शहा - कथा
संध्या सबनीस - दिप्ती नवल - कथा
इ. साधू आगाशे - नाना - अबतक छप्पन
आणि मांजरेकरच्या अस्तित्वमधली पात्रं.
* हे जोशी नक्की मराठी.
29 Sep 2010 - 1:19 pm | परिकथेतील राजकुमार
हहपु.
मराठी लोक हिंदी चॅनेलवरचे कार्यक्रम, हिंदी सिनेमे बघतात आणि मग तिथे मराठीला नावे ठेवली म्हणुन गळे काढतात =))
वरतीच एका काकांनी पंजाबी संवादमुळे पैसे फुकट गेल्याचे दु:ख जगजाहीर केले आहे. तसेच दु:ख बहुदा किरण खेरला वेळ वाया गेल्याचे झाले असेल. अब आपका खून खून और किरण खेर का पानी ?
आता इतके वर्षे हिंदी चित्रपट बघुनसुद्धा कित्ती कित्ती लोकांना हिंदी येत नाही, येवढी गाणी ऐकुन पंजाबी सुद्धा येत नाही. त्यांना वाटते का लाज ? मग किरण खेरला कशाला वाटावी ?
बर त्यात वर कोणितरी म्हणालय की "त्यातून तो काय बोलत होता ते मलाही कळत नव्हते, हिंदीत असते तरी तिला नसते कळले."
बघा तुमच्या मातृभाषेत असुन तुम्हाला कळत न्हवते मग परिक्षक म्हणुन तिला कळले नाही तर तिने तक्रारपण करायची नाही ?
असो..
आम्ही मराठी आहोत पण मुर्ख नाहीत त्यामुळे लेखनसीमा.
29 Sep 2010 - 3:13 pm | विश्वनाथ मेहेंदळे
>>आम्ही मराठी आहोत पण मुर्ख नाहीत
अवांतर आणि व्यक्तिगत शेरेबाजीला फाट्यावर मारण्यात आले आहे.
बाकी वादासाठी वाद घालण्यात काडीमात्र रस नसल्याने आमचीही लेखनसीमा.
29 Sep 2010 - 3:57 pm | परिकथेतील राजकुमार
अर्रे ? काका तुम्ही कुठला शब्द व्यक्तिगत घेतलात ? मराठी का मुर्ख ?
जली को आग कहते है बुझी को राख कहते है.... ;)
28 Sep 2010 - 11:25 pm | शुचि
कधी कधी आपण बोलतो एक वाक्य पण ते अशा रीतीने बोलतो की सूर अगदी वाक्याच्या विपरीत निघतो.
मला वाटतं बट्ट्याबोळ यांना असं म्हणायचं आहे की ती बोलली हे साधं वाक्य "आम्हाला समजलं नाही" पण सूर टीकेचा लावला होता, नाउमेद करणारा होता म्हणा, मराठी विरोधी होता.
तसं असता कामा नये.
"इंडीया हॅज टॅलेंट" मधे स्पर्धेचेदेखील नियम असतीलच ना.
ते स्पर्धकांना तसच परीक्षकांनादेखील माहीत पाहीजेत.
असे "on the fly" जर परीक्षक नियम बनवत असतील तर ते चूकीचं आहे.
3 Oct 2010 - 12:53 pm | विश्वनाथ मेहेंदळे
दुटप्पी पण कशाला म्हणतात बघायचे असेल तर हे पहा
http://www.youtube.com/watch?v=L25tcwrla6w&feature=related
अगदी योगायोगाने आज मिळाले हे. किरण खेर चा चेहरा पहा हे ऐकताना. महाभारतातील प्रसिद्ध वाक्य आठवले. "तेव्हा कोठे गेला होता राधासुता तुझा धर्म?" अगदी असेच विचारले पाहिजे या खेरला.
28 Sep 2010 - 11:46 pm | बट्ट्याबोळ
शुची ताई शी सहमत ... किरण खेर च्या बोलण्यातली तक्रार खटकली.
@प्रियाली .. जेव्हा मराठी वाहिनी वर कार्यक्रम असतो तेव्हा त्याला "ईंडिया" चे लेबल लावलेलं नसतं.
इथे "ईंडिया" - टॅलंट सर्च आहे ... मला बाकीच्या भाषांचं माहीत नाही, पण मराठी ला तिथे वाव मिळावा :)
आणि जर मराठी नको होती तर आधिच्या फेर्यांमधेच त्याला बाद करायला पाहिजे होतं.
असो, प्रदिप ला शुभेच्छा...
29 Sep 2010 - 2:13 am | रुपी
मला वाटते आधीच्या आणि आताच्या फेर्यांमध्ये फरक आहे. आता स्पर्धा वाढल्यामुळे बारीक सारीक गोष्टींवरून एखादा बाद होऊ शकतो. त्याचे रॅप खरच चांगले असेल तर ते जास्त लोकांपर्यंत पोहचले तर चांगलेच आहे.
@ विश्वनाथ : किरण खेर यांच्यावर एवढा राग का? जेव्हा मराठी वाहिन्या विनाकारण कार्यक्रमात "Lil champs" सारखे शब्द जोडतात आणि बहुतेकांची आवडती निवेदिका पल्लवी जोशी उगीचच मध्ये मध्ये इंग्रजी वाक्ये टाकू शकते ते आपण खपवून घेतोच ना? निदान पंजाबी, हिंदी या भारतीय भाषा तरी आहेत!
29 Sep 2010 - 3:07 pm | विश्वनाथ मेहेंदळे
राग किरण खेर वर नाही. पण समजा याच मंचावर पंजाबी लोककला(किंवा काहीही पंजाबी) सादर झाली असती तर त्या असे म्हणाल्या असत्या का?
बाकी पल्लवी जोशीचे म्हणाल तर मला ती उगीच इंग्लिश फाडायला लागली की दोन ठेऊन द्याव्याश्या वाटतात. तीच गत फु बाई फु मधील स्वप्नील जोशीची. (अवांतर :- हा जोशी आडनावाचा परिणाम असेल काय? समस्त जोश्यांनी हलके घ्यावे)
व्यक्तिश: मला मराठी बोलताना अनावश्यक इंग्रजी शब्द वापरलेले आवडत नाही. जिथे शक्य असेल तिथे मराठीच वापरतो. आणि इंग्लिश वापरून गेलो तरी लगेच विचार करतो की हा शद्ब टाळता आला असता का? पण इतरांच्या तोंडावर माझी सत्ता नाही चालत ना.
29 Sep 2010 - 3:12 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
आम्ही घेतलंच लाईटली (काल डॉक्टरपण सांगत होती, लाईटच फूड घ्यायला), पण या शब्दशः ट्रान्सलेट झालेल्या फ्रेजेसचं काय हो करायचं?
एक डब्बल ब्यारल जोशी.
29 Sep 2010 - 6:30 pm | अनामिक
आणि इंग्लिश वापरून गेलो तरी लगेच विचार करतो असं नाही हो "इंग्रजी वापरून गेलो तरी..." असं म्हणा!
29 Sep 2010 - 11:53 pm | रुपी
हेच म्हणणार होते!
30 Sep 2010 - 12:27 am | विश्वनाथ मेहेंदळे
चूक दाखवल्याबद्दल आभारी आहे. (वरीलच प्रतिसादात एका ठिकाणी इंग्रजी हा शब्द वापरला आहे.)
आणि तसेही मी काही अगदी चुपके चुपके मधला धर्मेंद्र नाही हो. अगदी धेडगुजरी भाषा बोलू नये असे माझे मत आहे. नेहमीच्या बोलण्यात शर्टाला सदरा आणि टेबलाला मेज नाही म्हणत (बोललो तर बऱ्याच लोकांनाच कळणार नाही), पण सफरचंदाला Apple म्हणणे टाळतो. काही महिन्यांपूर्वी माझ्या मित्राने मला खालील वाक्य ऐकवले होते. "आता मी every alternate wednesday इथे येणार". याला मराठी म्हणावे का?? असो हे सगळेच अवांतर आहे, त्यामुळे पुढील चर्चा खव मध्ये करू किंवा वेगळा धागा काढू.
30 Sep 2010 - 8:34 am | मिसळभोक्ता
भाषेच्या शुद्धतेच्या नादात जातीवाचक लिहिले तर चालते का काका ?
30 Sep 2010 - 11:15 am | विश्वनाथ मेहेंदळे
धेडगुजरी हा शब्द जातीवाचक नाही. हा घ्या पुरावा
मुळात गुजरी हा जातीवाचक शब्द आहे हा जावईशोध तुम्ही लावला आहे. जे गुजरांचे ते गुजरी. जसे गुजराथी, बंगाली, कर्नाटकी तसे. माझा एक गुजर मित्र बोलताना गुजरी जेवण, गुजरी प्रथा असे शब्द सर्रास वापरतो. वरील दुव्यानुसार इथे गुजरी भाषेचा संदर्भ आहे असे वाटते. (गुजर म्हणजे कोण ते माहित आहे? की ते पण सांगू?)
हा शब्द जातीवाचक नाही हे माझ्या मते तुमच्या सारख्या उच्चशिक्षित व्यक्तीला माहित असणार. नसेल माहित तर एकदा गुगल केले असते तरी हा अर्थ कळला असता. मुद्दाम विषयाला फाटे फोडू पाहत आहात का? उत्तर देण्यास मी समर्थ आहे. खरे तर मी यावर अजून काही लिहिणार नव्हतो पण तुम्ही जातीवाचक उल्लेखाचा आरोप केलात म्हणून बोलावे लागले. असले आरोप करण्यापूर्वी १० दा विचार करत जा असा अनाहूत सल्ला आहे.
30 Sep 2010 - 11:53 am | सविता
टाळ्या....टाळ्या....टाळ्या....
30 Sep 2010 - 11:41 pm | मिसळभोक्ता
धेड म्हणजे काय ?
ह्यासाठी खानदेशी मराठीच्या डिक्शनरीत गुगलावे लागेल तुम्हाला.
5 Oct 2010 - 1:07 am | विश्वनाथ मेहेंदळे
धेडगुजरी या शब्दाचा शब्दकोषाप्रमाणे काय अर्थ होतो ते आधीच सांगितले आहे. आता तुम्ही म्हणालात त्यानुसार धेड या शब्दाचा अर्थ पाहू. धेड हा शब्द जात दर्शवतो हे खरे आहे. पण म्हणून धेडगुजरी हा शब्द जातीवाचक आहे असे म्हणू शकत नाही. भाषाशास्त्रात अर्थपरीवर्तन नावाचा एक प्रकार (phenomenon) असतो. एखाद्या शब्दाचा मूळ अर्थ किंवा संदर्भ न राहता त्याला वेगळाच अर्थ जेव्हा प्राप्त होतो त्याला अर्थपरीवर्तन असे म्हणतात (अत्यंत प्रसिद्ध उदाहरण म्हणजे अपरोक्ष हा शब्द). केवळ मराठीच नाही तर सर्व भाषांत अशी उदाहरणे असतात. पाहिजे तर हा त्याचा नमुना समजा. त्यातून हा शब्द केवळ भाषेसंदर्भात वापरला जातो, इतर ठिकाणी नाही. त्यामुळे त्याला जातीय रंग नक्कीच नाही.
आता धेडगुजरी या शब्दाकडे वळूया. जालावर शोधताना एक मला माहित नसलेली माहिती मिळाली ती म्हणजे खानदेशी भाषेचे दुसरे नाव धेडगुजरी आहे असे या ठिकाणी पुढील अर्थाचे वाक्य सापडते. "१९९७ मध्ये केलेल्या सर्वे(मराठी?) नुसार, १५७९००० लोक खानदेशी भाषा बोलतात. याच भाषेला धेडगुजरी असेही म्हटले जाते." या ठिकाणी पण हिच माहिती आहे.()
२००७ साली सनातन प्रभात च्या संपादकांवर (श्री हजारे) हा शब्द वापरल्याबद्दल खटला दाखल करण्यात आला होता. कॉंग्रेस चे सरकार सनातन प्रभात वर तत्परतेणे खटला भरते या मागे केवळ भाषिक मतभेत नक्कीच नाहीत. तेव्हा उठलेल्या गदारोळातील काही मते खाली देत आहे. असाच खटला सामना वर पण दाखल केला आहे म्हणे(पक्की माहिती नाही) संदर्भ -इथे आहे भाषांतर करताना घोळ होऊ नये म्हणून मूळ इंग्रजी मजकूर देत आहे. संपूर्ण वृतांत वरील दुव्यावर वाचता येईल.
Adv. Nitin Kanitkar :- The Government pleader "Although the word has no controversial meaning in the dictionary,....."
Adv. Balasaheb Deshpande, pleading the case of Shri. Hazare :- "The word 'dhedgujari' is not against any caste. It was also used by Shri. Hatkanagalekar, the president of Marathi literary meet and question of hurting anyone's feelings does not arise. All information and address of Gurudev Dr. Kateswamiji from whose article the excerpts were taken has already been furnished to the police even before arrest of Shri. Hazare."
Shri. Sagar Javadekar, the chief reporter, Dainik Tarun Bharat :- "'Dhedgujari' is not an abuse and is used in general sense of the term."
Senior journalist Arvind Vitthal Kulkarni :- "In the 'Vyutpatti Kosha' compiled by famous linguist late K. P. Kulkarni, the word 'Dhedgujari' has been explained in the following manner "language used by people belonging to 'Mahaar'caste. It is a combination of different languages. This word is therefore, used for any combination (of languages) or for any inconsistent thing." It may be observed from the above that the word 'dhedgujarai' describes the condition of something and is not scandalous or disparaging. 'Dhed' means person from 'Mahaar' community. The language they speak is 'dhedgujari'. As the language is a mixture of many languages, any distortion or mixture/ combination is termed as 'dhedgujari'. One should be determined that the language used by him is not 'dhedgujarai' but an improved version. It is in fact, objectionable to find an excuse for accusing person for a trivial cause and spoil the harmony among people. Dr. Ambedkar, who drafted Indian Constitution, was of the view that it is not proper to create unnecessary bitterness among people. Therefore, finding fault in the usage of the word 'dhedgujari' is against the principles advocated by Dr. Ambedkar. There are proverbs or sayings in Marathi based on Brahmins or other castes; but people from the concerned castes do not seem to mind such usage. One has to see the basic purpose. In the said article, it is not the intention of Dr. Kate to belittle people from 'dhed' community but to show drawbacks of the Constitution and there is no need for any kind of criticism on the said word. "
S. G. Shevade, national 'Pravachankaar' :- " 'Dhedgujari' is a figure of speech and should not be misrepresented. It suggests a combination of words taken from different languages. There is no 'Dhed' and no 'gujar' as such and it does not point to any particular community. Therefore, it is not right to take objection to this article."
Famous historian Pandurang Balkawade :- "'Dhedgujari' word does not point at any community"
अजून काही मते :-
'Dhedgujari' word is used quite often in Marathi language; but it is not directed at any particular caste or community. It implies a combination, something that is not perfect/ correct. It is not proper to use it for political gains and nobody has, so far, broken and interpreted this word in such manner.
"The meaning of the word 'dhedgujarai' has been given in a book titled 'Shabda Ratnakar' as a combination of words used from two languages. In the 81st Marathi literary meet, Shri. M. D. Hatkanangalekar, the president of the conference had said in his speech that the most effective medium for propagation of any language is daily newspapers. These newspapers are, however, using tainted/ dhedgujari language and responsible for its ominous condition. He said further that all of us should protest against such distortion of language."
चला, इतके पुरेसे असावे. दोन जालिय शब्दकोष, व्युत्पत्ती कोश, शब्दरत्नाकर, अनेक पत्रकार, प्रवचनकार, इतिहासकार, वकील, घटनाकार आंबेडकर या सगळ्यांचा संदर्भ पुरेसा असावा. तरीही पटले नाही, तर मोठमोठ्या साहित्त्यीकांची पुस्तके वाचत रहा (हे तुम्ही करत असणारच), अनेक ठिकाणी हा शब्द सापडेल. वरील परीच्छेदांपैकी के.पी.कुलकर्णी यांचा संदर्भ असलेला परिच्छेद पुन्हा वाचा. त्यात असे आक्षेप घेणे हाच सामाजिक एकात्मतेला धक्का पोहोचवणे असे प्रतिपादन केले आहे. त्यामुळे तुम्ही माझ्यावर केलात तोच आरोप तुमच्यावर येऊ शकतो.
वाद घालावा तितका थोडा आहे. माझा या धाग्यावर, या विषयावर हा शेवटचा प्रतिसाद.
5 Oct 2010 - 3:13 am | मिसळभोक्ता
मेहंदळे काका,
आपण ह्या प्रतिसादाचा एक स्वतंत्र लेख बनवावा, अशी नम्र विनंती.
(बघा, सगळीकडे विरजण घालत नाही हल्ली आम्ही ;-)
5 Oct 2010 - 5:26 am | शिल्पा ब
<<बघा, सगळीकडे विरजण घालत नाही हल्ली आम्ही
डोमकावळा म्हंटल्यामुळे का?
- गव्हाळ चिचुंद्री
30 Sep 2010 - 11:58 am | विश्वनाथ मेहेंदळे
तरीही त्या शब्दात काही चुकीचे असेल तर आधीच माफी मागतो. उगाच नंतर गोंधळ नको. पण हा शब्द सर्रास वापरला जातोच की मराठीत. (मूळ प्रतिसादात हे लिहायचे राहून गेले, आणि आता लिहिता येत नाही म्हणून वेगळा प्रतिसाद)
30 Sep 2010 - 11:59 am | विश्वनाथ मेहेंदळे
चुकून दोनदा प्रतिसाद गेला, म्हणून एक काढून टाकत आहे.
29 Sep 2010 - 12:45 am | गोरिला
हातर मराठी भाषेचा अंड त्या कलाकाराचा अपमान आहे वास्तविक त्या प्रोग्राम मध्ये एक मराठी जूरी पण आहे
ती नि पण काही प्रतिक्रिया नाही दिली ह्या बद्दल खूप वाईट वाटते .
अहो त्या मराठी माणूस वाल्यांना काल्वूया
बह्गु ते काही तोडगा काढतात का ते ?
29 Sep 2010 - 3:16 pm | भाऊ पाटील
>>हातर मराठी भाषेचा अंड त्या कलाकाराचा अपमान आहे वास्तविक त्या प्रोग्राम मध्ये एक मराठी जूरी पण आहे
>>अहो त्या मराठी माणूस वाल्यांना काल्वूया
>>बह्गु ते काही तोडगा काढतात का ते ?
अहो त्यांचं ठीक आहे. तुम्ही का रेप करताय पण मराठी भाषेवर?
29 Sep 2010 - 11:22 am | चिगो
मला खरं तर प्रदीप चा ह्या वेळचा रॅप तितकासा आवडला नाही.. बाकी "बाहेरच्यांना महाराष्ट्रात राहून मराठी न येणे" हा चावून आणि वापरुनही चोथा झालेला विषय आहे. हिंदी चित्रपटसृष्टीवर पंजाबी आणि इतर लोक राज्य करतात हे सत्य आहे, आणि त्यांच्याकडे नोकर, काम करणारे मराठी असतात म्हणून ते तसं दाखवतात.. उद्या सुदैवाने (आणि कर्तुत्वाने) मराठी लोकांनी त्यावर ताबा मिळवला तर चित्र बदलेलही... आणि "आम्ही खपवून घेतो, मग त्यांना काय होते तसे करायला?" हा युक्तिवाद मलातरी मान्य नाही. अहो, आपण खपवून घेतो म्हणून तर माज करताहेत ना.. असो..
प्रदीपला शुभेच्छा..
29 Sep 2010 - 11:54 am | वारा
बट्ट्याबोळ रावांचा बट्ट्याबोळ असो (सॉरी विजय असो) :)
आणि पद्या काशीकराच्या नावान चांगभल.....
29 Sep 2010 - 1:07 pm | संजयशिवाजीरावगडगे
महाराष्ट्रात जे बाहेरील लोक राहातात ( बाहेरुन पोट भरण्यासाठी येतात किरण खेर सारखे ) त्यांना मराठी हि यायलाच हवी. (कमीत कमी समजयला हवी.) साजिद खान ला मराठी कळते ..????? कळलीच पाहीजे !
मला हेवा वाटतो त्या तमिळ भाषेचा (तामिळनाडू) जेथील लोकांना त्यांच्या भाषेचा कडवा अभिमान आहे. आणि आपण ??? (तमिळ लोक हिंदीला कमी लेखतात ! )
महाराष्ट्र हे भारतातील सर्वात विकसित राज्य आहे. मुंबई, देशातील सर्वात मोठे शहर, हे महाराष्ट्राच्या राजधानीचे शहर आहे. आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या महाराष्ट्र भारताचे अग्रणी राज्य आहे.
मग मराठी भाषेचा अभिमान असलाच पाहिजे !!!
29 Sep 2010 - 7:13 pm | रेवती
चेनैमध्ये गेल्यावर लई फजिती होते राव!
असं म्हणतात कि त्यांना विंग्रजी कळतं किंवा तमिळ!
आमच्या टॅक्सी आणि रिक्शावाल्याला फक्त तमिळ येत असल्याने नुसते एकमेकांकडे टकमक बघत बसायला लागले.
माझी जाउ घरातून बाहेर येउन तिने जेंव्हा ड्रायव्हरशी हुज्जत घातली तेंव्हा आम्हाला भारतवारीचा खरा आनंद मिळाला.;)
बाकी मुद्दा राहिला तो इतर भाषांचा!
जोपर्यंत लोकल भाषा न वापरता भरपूर पैसा मिळवता येतो आहे तोपर्यंत कश्याला शिकतील ते मराठी?
त्यांचे वर्तुळ सोडून त्यांना तसेही फारसे कुणामधे मिसळायला लागत नाही. अशी कोणी जबरदस्ती करून भाषा कशी शिकता येइल? त्या शिकण्या न शिकण्यानं खिशावर परिणाम व्हायला हवा, मग बघा!;)
29 Sep 2010 - 8:43 pm | संजयशिवाजीरावगडगे
चेन्नईमध्ये गेल्यावर लई फजिती होते राव! ?!
तुमचा व माझा अनुभव सारखाच आहे म्हणायचा !
जोपर्यंत लोकल भाषा न वापरता भरपूर पैसा मिळवता येतो आहे तोपर्यंत कश्याला शिकतील ते मराठी?
त्या शिकण्या न शिकण्यानं खिशावर परिणाम व्हायला हवा, मग बघा!
हा तुमचा विचार पटला !@!
29 Sep 2010 - 4:26 pm | स्वैर परी
माझाहि हातभार :
जर मराठी रॅप चालत नाही शोमधे, तर हे आधीच नियमावलिमधे दाखल करायला हवे होते, नन्तर बोम्बा मारुन काय उप्योग! आणि बाकि महाराष्ट्राबद्दल म्हणत असाल, तर लोकाना महाराष्ट्र म्हणजे मुम्बई असे वाटते. जे काहि अन्शी बरोबर देखील आहे. शिवाय महाराष्ट्रासार्खेच आणखीहि काहि राज्य आहेत जी प्रगत आहेत.
29 Sep 2010 - 6:49 pm | धमाल मुलगा
ते बाकीचं मरु द्या तिच्यायला!
आपल्याला तर मराठी रॅप ऐकायला एकदम मजा आली. :)
फक्त त्यानं ते 'भॉव्व भॉव्व भॉव्व' कमी तरी करायला पाहिजे नाहीतर नीट 'भाऊ भाऊ भाऊ' तरी म्हणायला पाहिजे :)
29 Sep 2010 - 6:54 pm | बिपिन कार्यकर्ते
मी त्यातले पहिले दोन व्हिडो बघितले. किरण खेरने काय म्हणले ते दिसलेच नाही. :(
29 Sep 2010 - 7:10 pm | शुचि
+१ =))
29 Sep 2010 - 7:17 pm | परिकथेतील राजकुमार
का दिसले नाही ह्याचे एक अतिशय योग्य कारण तुम्हाला सांगणार होतो पण खाली अजुन एक +१ आलेला बघुन गप्प बसतोय.
29 Sep 2010 - 7:21 pm | शेखर
-१ टाकुन सांग रे.
29 Sep 2010 - 7:23 pm | धमाल मुलगा
'समाज किती प्रगत झालाय, नै?' (श्रेयअव्हेरःमिभोकाका.)
29 Sep 2010 - 8:59 pm | आमोद शिंदे
बॉलिवूड चित्रपट नावाच्या निर्बुद्ध प्रकारावर पंजाब्यांनी मक्तेदारी सांगीतली तर मराठी म्हणून मला बरंच वाटलं.
29 Sep 2010 - 9:13 pm | अनामिक
ह्म्म्म! त्या किरण खेरचं सोडा पहिले प्रदिप काशीकर ह्या माणसाने मराठी असून "रॅप" हा प्रकार हाताळायलाच नको होता. आपण मराठी आहोत, मग असं इंग्रजी संगीताच अनुकरण करूच कसं शकतो? बरं त्यानं ते केलं तर बाकी मराठी लोक ते खपवून कसं घेतात? त्याला बोलायचं सोडून बिचार्या किरण खेरला नावं ठेवताहेत लोक!
29 Sep 2010 - 9:35 pm | सविता
ब्वॉर..ब्वॉर..ब्वॉर..
30 Sep 2010 - 6:46 am | Nile
त्या त्याच्या रॅपपेक्षाही (कानाला) काय बोचलं तर त्याचं, "पोवाडा म्हणजे रॅप" हे विधान
साला आपल्या समृद्ध परंपरेला पाश्चात्य गोष्टींची नावं जोडल्याशिवाय विकता येतच नाहीत का? च्यायला इथे पोवाडे गायले तर ऐकायला कीती गोळा होतात काय माहित.
6 Oct 2010 - 9:19 am | बट्ट्याबोळ
सुरेश भटांनी गझल हा काव्यप्रकार मराठीमधे आणला त्याला देखील तुम्ही हेच म्हणणार का??
6 Oct 2010 - 10:22 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
'उपरोध' हा प्रकार मराठीत कोणी आणला, जोडे हाणा त्यांना!!
30 Sep 2010 - 1:35 am | शिल्पा ब
दोन वर्षापूर्वी मी सीबीडी तल्या MGM हॉस्पीटलातल्या डीन का कोण असतो त्याला "मराठी" या विषयावर बोलले होते...
त्याचं काय झालं, मी तिथल्याच एका स्त्री डॉक्टरला भेटले होते...मी मराठीत बोलत असताना सुद्धा ती सौथ इंडिअन काळूंद्री इंग्रजीत चालू होती...
मग नंतर मी त्यांच्या मुख्य जो डीन का काय त्याला भेटून सांगितले कि तुम्ही इथे येत, पैसे कमावता अन तुम्हाला इथली भाषा बोलता येत नाही? का? वगैरे ..
तर त्याचे म्हणणे असे होते कि आमची दर ३-५ वर्षांनी भारतात कुठेही बदली होते मग कसे काय सगळ्याच भाषा शिकणार? तरीपण मी स्वतः बर्यापैकी मराठी बोलतो ...अजून तिथे कोणीतरी कशाचेतरी पेढे द्यायला आला होता त्याला विचारून म्हणे - मी जमेल तसे जमेल तितके मराठी बोलतो कि नाही? तो "हो" म्हणाला....म्हणणारच..खालच्या rank चा होता..असो.
तर मुद्दा हा कि तुम्हाला राग येईल तिथे तो constructive पद्धतीने व्यक्त करा...त्यांना समजू द्या कि साधारण लोक सुद्धा जागृत झाले आहेत...केवळ राज ठाकरे नाही..
आपणच आपल्या भाषेचा अभिमान नाही बाळगला तर दुसरं कोण बाळगणार?
30 Sep 2010 - 7:22 am | सहज
सीबीडी, MGM, हॉस्पीटल,डीन,सौथ इंडिअन, rank .... जमेल तसे जमेल तितके मराठी....
तर मुद्दा हा कि तुम्हाला राग येईल तिथे तो constructive पद्धतीने व्यक्त करा..
'कंस्ट्रक्टीव्ह' प्रतिसाद अतिशय आवडला!
30 Sep 2010 - 8:36 am | मिसळभोक्ता
ती सौथ इंडिअन काळूंद्री
मराठीची भलामण करताना आपण वंशभेदी / वर्णभेदी झाल्या आहात का ?
30 Sep 2010 - 8:46 am | शिल्पा ब
सौथ इंडिअन हा वेगळा वंश आहे हे दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद.
आणि गोर्याला गोरा म्हण्टलेलं चालतं तर काळ्याला काळा का नाही म्हणायचं?
30 Sep 2010 - 9:15 am | मिसळभोक्ता
गव्हाळ ? करड्या ? की आणखी काही ?
तुमचा उल्लेख करताना "मराठी गव्हाळ चिचुंद्री" असा केला तर चालेल का ?
पण, माझा मूळ मुद्दा बाजूला टाकताहात.
(आणि हो, द्रविड हा वेगळा वंश आहे. आर्यांपेक्षा जुना.)
30 Sep 2010 - 9:26 am | शिल्पा ब
तुम्ही म्हणताय का " मराठी गव्हाळ चिचुंद्री" मला ?
आणि तुम्हाला काय माहिती मी आर्य का द्रविड ते? माझेच ज्ञान वाढेल म्हणुन विचारले?
आणि आताच्या काळात भारतात कोणी आर्य - द्रविड मानत असेल असे वाटत नाही.
30 Sep 2010 - 9:45 am | मिसळभोक्ता
आणि आताच्या काळात भारतात कोणी आर्य - द्रविड मानत असेल असे वाटत नाही.
एक वेळ अर्वाचीन भारतात स्त्री-पुरुष भेद मानणार नाहीत, पण आर्य-द्रवीड भेद नक्कीच मानतील.
30 Sep 2010 - 9:47 am | शिल्पा ब
पुरावा?
बाकी आर्य द्रविड हा भेद मानतात हे वाचुन बरीच करमणुक झाली.
30 Sep 2010 - 9:50 am | मिसळभोक्ता
*मानतील* हा भविष्य काळ. भविष्य काळाचा पुरावा मागणार्या तुम्ही अजबच दिसताय.
बाकी आपली करमणूक तथ्यांनी होते, हे वाचून आमची करमणूक झाली.
30 Sep 2010 - 9:54 am | शिल्पा ब
म्हणण्याचा अर्थ असा कि कशावरून हा भेद मानतील? कशावरून ओळखणार कोण द्रविड अन कोण आर्य ते?
तथ्य म्हणण्याजोगे काही वाटत नाही.
30 Sep 2010 - 9:58 am | मिसळभोक्ता
म्हणण्याचा अर्थ असा कि कशावरून हा भेद मानतील? कशावरून ओळखणार कोण द्रविड अन कोण आर्य ते?
आपल्या मतानुसार जे काळुंद्रे ते द्रविड.
एक्स्टेंशनः जे पांढरुंद्रे ते आर्य, आणि गव्हाळ चिचुंद्र्या = मिक्श्चर.
असो, पण सीरियसली:
वस्त्रप्रावरणांमुळे, स्वयंपाक करणे-न करणे ह्यामुळे, स्त्री पुरुषांतला भेद कमी होतोय. बर्याच लोकांना ओळखू देखील येत नाहीत स्त्री कोण आणि पुरुष कोण ते.
पण उडदामाजी काळे गोरे निवडणारे उदंड आहेत.
उदा. "काळुंद्री" हा शब्द.
30 Sep 2010 - 9:36 am | सविता
"मराठी गव्हाळ चिचुंद्री"
ह. ह. पु. वा.
30 Sep 2010 - 9:45 am | शिल्पा ब
*मी मनातल्या मनात मिभोंना काळा कावळा म्हणून घेतले...अन विरजण घालणारे असल्याने डोमकावळा..*
त्यांना सांगू नका.
30 Sep 2010 - 9:47 am | मिसळभोक्ता
ह्या पितृपक्षात आपण मला कावळ्याचा दर्जा दिला, त्याबद्दल धन्यवाद.
आपल्या पितरांच्या काय अतृप्त इच्छा होत्या त्याही कळवाव्यात. पूर्ण करेन ;-)
30 Sep 2010 - 9:48 am | शिल्पा ब
पितर आम्ही मानतच नाही...पण आमच्या इच्छा अपुऱ्या राहिल्या तर नक्की सांगू..
30 Sep 2010 - 9:52 am | मिसळभोक्ता
अहो, आम्ही तुमच्या पितरांसारखे. त्यांच्या इच्छा पूर्ण करू.
तुमच्या अपुर्या इच्छा पूर्ण करण्यास कुणी तुम्च्या पीढीचे लोक शोधा ;-)
30 Sep 2010 - 10:50 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
"आई गं" म्हणावं का "बाप रे" असा प्रश्न पडला आहे.
असो. तुमच्या पिढीचे लोक शोधा का कावळे शोधा?
अवांतरः आमच्या घरात कोणत्याही पिढीतल्या कोणाच्याही कसल्याही इच्छा अपूर्ण नाहीत हे आधीच जाहीर करते. नाहीतर मिभोकाका माझंही रॅगिंग घ्यायचे.
30 Sep 2010 - 12:49 pm | परिकथेतील राजकुमार
ह्या काकुपण बोर्डात आल्या होत्या का काय ?
30 Sep 2010 - 12:14 pm | वेताळ
द्रविड मुन्नेत्र कळघम हा पक्ष गेली २० वर्षे आलटुन पालटुन पालटुन तामिलनाडुत राज्य करत आहे. तो फक्त द्राविडी लोकांच्या पाठिंब्यावर राजकारण करतो.
मला वाटते महाराष्ट्रात देखिल आर्यांपेक्षा द्राविडी लोकाची संख्या जास्त आहे.
5 Oct 2010 - 1:24 am | धनंजय
छानच आहे
5 Oct 2010 - 8:56 pm | निखिलेश
जोपर्यंत लोकल भाषा न वापरता भरपूर पैसा मिळवता येतो आहे तोपर्यंत कश्याला शिकतील ते मराठी?
त्या शिकण्या न शिकण्यानं खिशावर परिणाम व्हायला हवा, मग बघा!
हा विचार पटला.
सोबतच जरा आमच्या विदर्भात डोकाऊन बघा. काय हिन्दी आणि काय मराठी ..