गाभा:
मित्रांनो आजकाल गाजलेल्या इंग्रजी चित्रपटांवर अधारीत (म्हणजेच कॉपी मारलेले) चित्रपट काढायची टूम हिंदीतून मराठीमध्ये पण आली आहे. व्हॉट विमेन वॉन्ट आणि माय कझिन विनी ह्या दोन इंग्रजी चित्रपटांवर आधारीत अग बाई अरेच्च्या आणि कायद्याच बोला हे दोन चित्रपट बरेच गाजले. ह्या नविन लाटेविषयी आपल्याला काय वाटते? मराठी शिणेमांचा दर्जा सुधारण्यासाठी हे गरजेचे आहे का?
-अघळ पघळ
प्रतिक्रिया
13 Apr 2008 - 1:14 am | भडकमकर मास्तर
अगं बाई अरेच्च्या...... केदार शिन्देने अप्रतिम कॊपी केली होती...फ़ार आवडला सिनेमा....
फ़क्त ओरिजिनल सिनेमाच्या गोष्टीला जे काही मूर्ख उपकथानक ( ते बॉम्ब स्फोट करणार्या बाईचे कथानक)जोडले होते ते भयंकर होते... म्हणजे ओरिजिनॅलिटी दाखवली पण आवडली नाहीच..
मात्र जत्रा नावाच्या भयंकर ओरिजिनल कथानकापेक्षा ही कॉपी बरी होती....
वाईट ओरिजिनल पेक्षा बरी कॉपी बरी.....
अवांतर.....आमच्याकडे पैसे आले ना की बिडॆझल्ड ( तोच तो लिझ हर्ली बाईंचा)वर सुद्धा आम्ही एक मराठी सिनेमा काढणार आहोत....
.... स्क्रीनप्ले डायलॊग रेडी आहेत....
... हाय का कोन प्रोडुसर??
15 Apr 2008 - 12:07 pm | धमाल मुलगा
जबरान् !
मस्त पिक्चर..आणि मस्त आयडिया.
ओ भडकमकर शेठ, मला पण एखादा रोल द्या ना तुमच्या "भंजाळलेला" मध्ये.
आपला,
(बोलट) ध मा ल.