दिनांक २४ सप्टेंबर २०१०

उग्रसेन's picture
उग्रसेन in काथ्याकूट
21 Sep 2010 - 6:24 pm
गाभा: 

रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादाचा निर्णय दिनांक २४ सप्टेंबर २०१० ला लागणार हाय. बातमी दुवा महाराष्ट्र टाइम्स निकाल काय लागेल त्यो लागेल. पण दोन समाजामधील द्वेष आन् राजकारण्यांना एक आयतं कोलीत मिळणार हाय. पब्लीक रस्त्यावर यायचं भेव वाटून राह्यलं.
”आपल्याला विश्वासात घेतले गेले नसल्याचा दावा अलाहाबाद हायकोर्टाच्या एका न्यायाधीशाने केला आहे”’
च्यामारी, या स्टेटमेंटमुळं इषय अजून सेन्सेटीव्ह झाला. रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादाचा निर्णय कोर्टाबाहेर व्हावा ही गोष्टबी खरीच व्हती. च्यामारी, जाती-जातीचा द्वेष फैलावणारा एक निकाल म्हणून या दिसाकडं पाहावे लागू नये असं एक नागरिक म्हणून वाट्टं. काय म्हणतेत मिपाकर.

संपादक महोदय आन मिपाकर बांधवांनो, विषय गंभीर हाय. तव्हा मिपा अडचनीत येणार नाय एवढी काळजी घेऊन काथ्याकूट करावा अशी पाय धरुन इनंती.

प्रतिक्रिया

सुनील's picture

21 Sep 2010 - 6:35 pm | सुनील

२६/११ झाल्यानंतर मिपावर अनेक धागे आले. त्यातील काही प्रतिसाद मिपाला कायदेशीरदृष्ट्या अडचणीचे ठरू शकतील असे वाटल्याने, ते सगळे धागे नंतर अप्रकाशित केले गेले होते.

माझी ही विनंती आहे की, हा धागा आताच अप्रकाशित केला जावा.

उग्रसेन's picture

21 Sep 2010 - 6:46 pm | उग्रसेन

द्वेष फैलावणारे प्रतिसाद टाळले तर धाग्याला काय
धोका नाय. आन धाग्यापासून मिपाला

मा.कोर्ट बोललं वरच्या इषयावर.
म्या तर पॉझीटीव्ह इचार मांडा म्हणलं.
आन समजा धागा उडला तरीबी
च्योवीस तारीख उजाडायची थामनार थोडी.

बाबुराव :)

गांधीवादी's picture

21 Sep 2010 - 7:04 pm | गांधीवादी

जाऊ द्या ना साहेब,
त्या मंदिर आणि मस्जिद ने कोणाचेहि पोट भरत नाही.
त्या ऐवजी रहीम-राम वा राम-रहीम असे इस्पितळ काढावे तिथे, अशी मनोमन इच्छा आहे.
खर्च करणार असतील तर पहिली ५०० ची पावती मीच फाडीन. (जास्त नाय देऊ शकणार , आपली तेवढीच ऐपत आहे )

आणि माननीय संपादकांना सुद्धा नम्र विनंती, सगळे संवेदनशील धागे (तात्पुरते का होईना) अप्रकाशित करावेत.

राष्ट्रकुल स्पर्धा होतील कि नाही हा प्रश्न गंभीर वाटतो आहे.आताच हाती आलेल्या बातमीनुसार एक दिल्लीतला एक नवा पुल कोसळला आणि त्यात २४ कामगार जखमी झालेत .आता असे जर कलमाडी व कॉग्रेस बांधकाम करणार असेल तर वाट लागलीच हे लक्षात येते. त्यामानाने भाजपा व शिवसेनेच्या काळातील कामे उच्च दर्जाची होती हे म्हणावे लागते.राणीबाय व युवराज काय करतात ते आता बघुया.

राष्ट्रकुल स्पर्धा होतील कि नाही हा प्रश्न गंभीर वाटतो आहे.आताच हाती आलेल्या बातमीनुसार एक दिल्लीतला एक नवा पुल कोसळला आणि त्यात २४ कामगार जखमी झालेत .आता असे जर कलमाडी व कॉग्रेस बांधकाम करणार असेल तर वाट लागलीच हे लक्षात येते. त्यामानाने भाजपा व शिवसेनेच्या काळातील कामे उच्च दर्जाची होती हे म्हणावे लागते.राणीबाय व युवराज काय करतात ते आता बघुया.

वेताळा राष्ट्रकुल स्पर्धा अनेक गोष्टी घेउन येतय...
सध्या cwg ****** असे गुगलल्यावर बर्‍याच "तसल्या" साईट्स मिळतील ज्यात सध्या बुकींग करायला बसले आहेत.
http://www.youtube.com/watch?v=fcPbBTsajOw
अनेक हाटिलात अनेक "ती" मशिन्स बसवली जात आहेत...इं.

निकालचं म्हणाल तर आता २४ तारखेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे...

अवांतर :--- २४ तारिख... तारिख म्हंटले की च्यामारी फक्त सनी देओलच आठवतो... ;) कसा ?
असा... ;)
http://www.youtube.com/watch?v=7EwH444882c

उग्रसेन's picture

22 Sep 2010 - 10:23 am | उग्रसेन

निकाल म्होरं ढकलायची याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर व्हती का नाय
कोणास ठाव. पर कंच्या तरी गटाला आनंद व्हईन आन कंच्या गटाला
दु:ख. मुख्यमंत्र्यानं धर्मगुरु-राजकारण्यांच्या मिटिंगा घ्यायला
सुरुवात केलीच हाय.

काय डिसीजन व्हईन काय अंदाज लागना. रामाला जागा सोडावी लागती ?

बाबुराव :)