नचिकेताचे उपाख्यान कोणी सांगेल का?

सागर's picture
सागर in काथ्याकूट
11 Apr 2008 - 5:04 pm
गाभा: 

नचिकेताचे उपाख्यान कोणाला माहीत आहे काय?
असेल तर कृपया सांगावे ही विनंती.

एखादा यावर लेख कोणी लिहिला तर आनंदच वाटेल.

एकदा दान देताना नचिकेताच्या पित्याने नचिकेताला रागात सांगितले की मी तुला यमाला दान केले आहे.
त्यानंतर नचिकेत आणि यम यांचा संवाद ते नचिकेताचे उपाख्यान.
यात यमलोकाचे वर्णन नचिकेताने केलेले आहे.

मला नचिकेताची अशी फक्त ढोबळ अशी गोष्ट माहित आहे. पण मला सविस्तर जाणून घ्यायचे आहे.
कोणी सांगेल का?

(वेदोपनिषदप्रेमी) सागर

प्रतिक्रिया

तात्या विंचू's picture

11 Apr 2008 - 5:12 pm | तात्या विंचू

मला लहान असताना वाचलेले एक पुस्तक आठवत...नाव होत..."सामर्थ्य कोणाचे गर्व कोणाला"
लेखक नाही माहीत.....पण त्या पुस्तकात सर्व उपनिषदातल्या गोष्टी दिल्या होत्या........
सुरेख पुस्तक होत ते एकदम...

नचिकेताने यमाला मृत्यु चे रहस्य विचारले. त्यावर यमाने त्याला निरनिराळी प्रलोभने दाखविली.
नचिकेत बधला नाही शेवटी यमाने त्याला रहस्य सांगितले

हा आताशा थोडेसे आठवले बुवा...

मला वाटते नचिकेताला एका प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायचे होतआहे?""त्याचा मृत्यू केव्हा आहे?"
त्याने आधी यमाला विचारले - यम म्हणाला याचे उत्तर मृत्यू देऊ शकतो.
मृत्यूला विचारले तो म्हणाला भगवान शंकरांना (की विष्णू)विचारावे लागेल
ते सगळे भगवान शंकरांकडे गेले. भगवान शंकरांनी नचिकेताकडे पाहिले आणि नचिकेत मरुन पडला.

यम-मृत्यू आणि शंकर (विष्णू) हे तिघे एकत्र आले की नचिकेताचे मरण लिहिले होते...

कदाचित हा विनोदही असेन पण ही कथा मात्र आठवली...

अवलिया's picture

11 Apr 2008 - 5:16 pm | अवलिया

(वेदोपनिषदप्रेमी) सागर

कठ उपनिषद वाचा ज्ञान मिळेल

नाना

अहो नाना,

इकडे बंगळूरात आता कठोपनिषद कोठून आणणार मी?

नचिकेताचे उपाख्यान मी लहानपणी वाचले होते. पण आत्ता कप्पाळ आठवत नाही... म्हणून हा चर्चाप्रपंच.
आताशा कठोपनिषद इंटरनेटवर मराठीत कोठे मिळाले तर सोन्याहून पिवळे...

पण कठोपनिषद वाचण्याआधी नचिकेताची कथा माहीत असणे अधिक चांगले असे मला वाटते...
अगदीच कोरी पाटी नको कठोपनिषद वाचताना काय?

(नचिकेताच्या आणि यमाच्याही शोधात)सागर

व्यंकट's picture

11 Apr 2008 - 6:50 pm | व्यंकट

ऑनलाईन आहेत. मला वाटतं संस्कृत डॉक्युमेंट्स की अशी काही साईट आहे.

व्यंकट

सागर's picture

11 Apr 2008 - 7:44 pm | सागर

व्यंकटराव,

मदतीबद्दल आभार. हो मला ती व काही साईटस माहीत आहेत
http://www.sanskritweb.org/
http://sanskritdocuments.org/
http://sanskrit.safire.com/Sanskrit.html

पण मला मराठीतून माहिती हवी आहे
धन्यवाद
सागर

झकासराव's picture

11 Apr 2008 - 5:31 pm | झकासराव

बर्‍याच वर्षापुर्वी कथा वाचली होती.
बहुतेक चांदोबात असेल.
नचिकेताला त्याच्या वडिलाने तस बोलल्यावर त्याने यमाकडे जाण्याचा निर्णय घेतला.
तो जात राहिला सगळी संकटाना तोंड देवुन.
पण यमलोकाच्या दरवाज्या पाशी त्याला तीन दिवस उपाशी पोटीच झोपावे लागले / वाट पहावी लागली.
ह्या गोष्टीच पातक नको म्हणून मग यमाने त्याला वर दिला (की तीन वर दिले??)
त्यात काहिही माग अस बोलताच त्याने शेवटच्या वरासाठी "ज्ञान" मागितले. (बहुतेक मृत्युच रहस्य वर मनापासुन यानी लिहिल्याप्रमाणे असेल मला नक्कि आठवत नाही) त्यावर यमाने त्याला बरेच पराव्रुत्त केले आणि त्याला निरनिराळी प्रलोभने दाखवली पण त्याने यमाला ते ज्ञान द्यायलाच लावले.
ही कथा बर्‍याच वर्षापुर्वी (बहुतेक मी शाळेत असताना) वाचली असेल.
खात्री करुन घ्या.

सागर's picture

11 Apr 2008 - 7:48 pm | सागर

झकासराव,

बरोबर... नचिकेताने ज्ञान मागितले होते आणि त्याचा मृत्यु कसा होणार आहे हे देखील जाणून घ्यायची इच्छा व्यक्त केली होती. कदाचित यमाने ही सगळी प्रलोभने त्याला परावृत्त करण्यासाठी दाखविली असावीत.
नचिकेताच्या मृत्युबाबत मी सांगितलेली गोष्ट खरी आहे की काय?
( नचिकेताच्या शोधात) सागर

धनश्रीदिनेश's picture

11 Apr 2008 - 5:44 pm | धनश्रीदिनेश

माझ्याकडे एक पुस्तक आहे ज्यात नचिकेतचि गोष्ट आहे , उद्या वाचुन तुम्हाला नक्की सान्गेन [श्राद्ध ] हे पुस्तक प. पुज्य पान्डुरन्ग शास्त्रि ह्यानी लिहिले आहे

सागर's picture

11 Apr 2008 - 7:52 pm | सागर

धन्यवाद धनश्री,

वाट पाहीन :)
(नचिकेताच्या चाहूलीने प्रफुल्लीत झालेला)-सागर

धनश्रीदिनेश's picture

18 Apr 2008 - 12:44 am | धनश्रीदिनेश

सॉरी उत्तर द्यायला थोडा उशिर झाल्यबद्द्ल, पुस्तक दुसर्याने वाचयला घेतल होत,

सागर's picture

18 Apr 2008 - 1:39 pm | सागर

हरकत नाही धनश्री,

येथे बरीच चर्चा जरी झाली असली तरी पण तुमचे मत तुम्ही दिलेत तर मला खूप आवडेल.
प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा असतो. तेव्हा तुम्ही जे वाचले , अभ्यासले आहे त्यातून काही ज्ञानकण येथे पसरले तर अजून चर्चेला मजा येईन
नचिकेताचे उपाख्यान हा तसेही गहन विषय आहे. त्यामुळे तुमचे विचार एक वेगळी दिशा देतील असे वाटते

सागर

धनश्रीदिनेश's picture

18 Apr 2008 - 2:38 pm | धनश्रीदिनेश

ह्याचे उत्तर मी टणट्।णपाळ ह्यांच्या लेखात दिलेले आहे

मनापासुन's picture

11 Apr 2008 - 5:48 pm | मनापासुन

खात्री करुन घ्या.
कशाची खात्री करुन घ्या? तुम्ही शाळेत होतात याची की तुम्हाला शाळेत असताना वाचता येत होते याची? की तुम्ही तेंव्हा काय शिकलात ते तुम्हाला आठवत नाही याची ? की तुम्हाला ज्याने शाळेत पास केले त्यानी न कंताळता पेपर तपासला होता याची?
की तुम्ही बर्‍याच वर्षापुर्वी कथा वाचली होती की वाचलेली कथा नक्की नचिकेताचीच होती की नचीकेत शाळेत जात होता याची.
हे मला मनापसुन पडलेले प्रश्न

झकासराव's picture

11 Apr 2008 - 6:48 pm | झकासराव

मजेशीर प्रतिसाद दिलात.
चेहर्‍यावर हसु फुलल :)
नचिकेताला यमाने काय दिले ह्या बाबत खात्री करुन घ्या.
बाकीच्या माझ्या शाळेच म्हणाल तर मला खात्री आहे बर. :)

प्रेमसाई's picture

11 Apr 2008 - 5:48 pm | प्रेमसाई

यावर उपाय एकच
उपनिषद
जवळ जवळ २६ आहेत
शोधा म्हणजे सापडेल
जमल्यास मि तुम्हाला मद्त करेन

http://www.dvaita.org/shaastra/upanishad.html#intro
हया साईटवर जा

सागर's picture

11 Apr 2008 - 7:55 pm | सागर

प्रेमसाई,

मनापासून धन्यवाद. ही माहिती इंग्रजीतून आहे. आणि मला मराठीतून माहीती हवी आहे
सागर

झकासराव's picture

11 Apr 2008 - 6:53 pm | झकासराव

http://en.wikipedia.org/wiki/Nachiketa
मनापासुन शोधल दुवा मिळाला :)

सागर's picture

11 Apr 2008 - 7:56 pm | सागर

झकासराव,

मनापासून धन्यवाद. ही माहिती इंग्रजीतून आहे. आणि मला मराठीतून माहीती हवी आहे
सागर

परीचा परा's picture

11 Apr 2008 - 7:35 pm | परीचा परा

हे नचिकेताचे काय गौडबंगाल आहे बुवा?
आप्ल्याला तर काय बी माहित नाय...

{परीच्या प्रतिक्षेत} परा ....

सागर's picture

11 Apr 2008 - 7:57 pm | सागर

अहो मीच नचिकेताच्या शोधात आहे तर तुम्हाला काय सांगू?

अवांतरः {परीच्या प्रतिक्षेत} परा .... हे आवडलं.... कोण आहे ती परी? :)

विसोबा खेचर's picture

13 Apr 2008 - 9:17 am | विसोबा खेचर

मला मुळात हा नचिकेत कोण हेच माहीत नाही, आणि नचिकेतालाही तात्या कोण हे माहीत नाही! ;)

तात्या.

हा हा ... तात्या... छान विनोद केलात.
नचिकेताचे माहित नाही... पण आम्हा सगळ्यांना रोखठोक तात्या नक्कीच चांगले माहित आहेत.....

ह्या नचिकेताला यमाने जे ज्ञान दिले त्यात यमलोकाचे वर्णन आले आहे.
ते ज्ञात करुन घेण्यासाठी हा चर्चाप्रपंच केला आहे

सागर

कठोपनिषदात "कथा" अशी ८-९ श्लोकांत संपते. त्याचा तुम्ही सारांश चांगला दिलेला आहे:
"एकदा दान देताना नचिकेताच्या पित्याने नचिकेताला रागात सांगितले की मी तुला यमाला दान केले आहे."

वाजश्रवा गौतम, हे उद्दालक आरुणींचे पुत्र. त्यांचा पुत्र नचिकेता. एकदा ते सर्व मालमत्ता दान करत होते. बकाल मरायला टेकलेल्या गाईही दान करत होते. त्याने दान मिळणार्‍याला काही फायदा होणार नव्हता असा नचिकेताने विचार केला... त्याने एकदा दोनदा नव्हे तीनदा वडलांना विचारले "मला तुम्ही कोणाला दान म्हणून देणार?" वडील शेवटी रागावून म्हणाले - "तुला मृत्यूला दान करतो." वडलांचे ऐकून नचिकेता यमाच्या घरी जातो. यम घरी नसल्यामुळे तीन दिवस बाहेर उपाशी ताटकळत राहातो. यम परततो तेव्हा पाहुण्याच्या या अवमानाबद्दल त्याला फार वाईट वाटते.

त्यानंतर यमाचा नचिकेताशी संवाद सुरू होतो. तो बाकी पूर्ण उपनिषद व्यापतो.
यम नचिकेताला तीन वर देतो. नचिकेत तीन वर मागतो ते असे.
१. माझ्या वडलांची काळजी दूर होऊन मला परत बघून त्यांना आनंद व्हावा - तथास्तु (२ श्लोक)
२. यज्ञातल्या अग्निबद्दल ज्ञान नचिकेता मागतो. (२ श्लोक) यम त्याला माहिती देतो, असे सांगणारे २ श्लोक(पण नेमकी माहिती उपनिषदात नाही). त्या अग्नीलाच "नचिकेता" हे नाव प्रसिद्ध होईल असे यम म्हणतो. त्या अग्नीपासून मिळणारे फायदे, पुण्य सांगतो (४ श्लोक)
३. हा तिसरा मोठा प्रश्न आहे - "मृत्यूनंतर शंका येते, की मनुष्याचे काय असते? कोणी म्हणते काही असते, तर कोणी म्हणते काही नसते. तू मला शिकव, म्हणजे मला कळेल - हा माझा तिसरा वर." (१ श्लोक)
यम "नको-नको दुसरे काही माग" असे म्हणतो. नचिकेता हटत नाही. (आणखी १० श्लोक)

यमाला पटते की नचिकेता या ज्ञानास पात्र आहे.
यम नचिकेताला "श्रेय-प्रेय" आणि "आत्मा-परमात्मा" यांबद्दल सांगतो. (९१ श्लोक) हा प्रकार जाणकारालाही समजवून सांगण्यास थोडे कठिणच जाऊ शकेल. पण मला समजले नाही तरी काव्य म्हणून फार सुंदर आहे, प्रेरणादायी आहे.
(हाच उपनिषदाचा उर्वरित भाग आहे.)

त्यामुळे या उपनिषदात यमलोकाचे वर्णन फारसे आलेले नाही, असे वाटते. पण बाकी कथा तुम्ही सांगितल्यासारखीच आहे.

नंदन's picture

15 Apr 2008 - 5:55 am | नंदन

विस्तृत माहितीबद्दल आभार. एक बाळबोध शंका अशी की, याला नचिकेताचे आख्यान म्हणण्याऐवजी उपाख्यान का म्हणतात? तिन्ही प्रश्नांची उत्तरे हे आख्यान आणि त्यातल्या तिसर्‍या मोठ्या प्रश्नाचे उत्तर (ते ९१ श्लोक) म्हणजे उपाख्यान असे आहे की कठोपनिषद हे पूर्ण आणि नचिकेताचे तीन प्रश्न हे उपाख्यान अशी विभागणी आहे?

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

धनंजय,

सविस्तर माहितीबद्दल मनापासून धन्यवाद. तुमच्या विस्तृत माहितीने माझ्या आठवणींची काही दारे नक्कीच उघडली व आठवू लागले आहे.
एकूणच यम आणि नचिकेत याचा संवाद खूप महत्त्वाचा आहे.

मला नुकतेच मायाजालावर कठोपनिषद मराठीतून ध्वनि स्वरुपात सापडले आहे.
जिज्ञासूंनी ऐकावे. ११ भाग आहेत http://www.esnips.com/web/Adhyatma
अजून मी ऐकले नाहीत.
पण नुकताच हा खजिना सापडल्यामुळे वाटले की माझ्यासारख्या इतरही अनेक नचिकेतप्रेमींना ह्या प्रवचनात रस असेन

बाकी नंदन यांना पडलेला प्रश्न मलाही आहेच, याला उपाख्यान असे का म्हणतात?
कदाचित कठ 'उप'निषदाचा भाग असल्यामुळे या आख्यानाला 'उपा'ख्यान असे म्हणत असावेत.

(नचिकेतमय झालेला) सागर

मदनबाण's picture

14 Feb 2015 - 9:36 pm | मदनबाण

आज तू-नळीवर Kathopanishad वर व्हिडीयो शोधत होतो... तेव्हा खालील व्हिडीयो मिळाला {जो मी पाहिला } तसेच एक जुना प्रतिसाद आठवला आणि जालावर शोधा शोध केली असता हा धागा सापडला. तसेच लोकसत्ताचा एक लेख देखील वाचनात आला { साल २०१२ } त्यामुळे व्हिडीयो आणि लिंक इथे देतो आहे.

Katha Upanishad
आर्थिक अस्थिरता आणि कर्मयोगशास्त्र

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मुझसे मुहब्बत का इजहार... ;) { Hum Hain Rahi Pyar Ke }

शशिकांत ओक's picture

16 Feb 2015 - 3:22 pm | शशिकांत ओक

मित्रांनो, काही काळापुर्वी अहमदाबाद मधील अक्षर धाम मंदिर संकुलात जल विद्युत चलित नाट्यातून नचिकेतसची कहाणी सादर केलेली अनुभवली. प्रा अद्वयानंद गळतगे सरांनी यावर लेखन केले आहे. त्याचा धागा सादर करेन.

उपनिषद गंगा नावाची मालिका आहे त्याचे सर्व भाग इथे पहावयास मिळतील :-
https://www.youtube.com/user/upanishadganga/videos
मी काही भाग पाहिले आणि ते आवडले देखील. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल जिगर नझर क्या है... { Dil Ka Kya Kasoor }