मला स्वयपाकघरात बर्याचशा गोष्टी घेताना कळत नाही काय घ्यावं इथं अमेरीकेत सुमीत चा मिक्सर मिळत नाही (म्हणजे मिळतो पण फारच महाग)आणि बाकीचे साधे मिक्सर जाम रद्दड असतात. अगदी साध्या सुरीत सुद्धा इतके प्रकार असतात की समजत नाही काय घ्याव. मी मेसीज मधून मस्त ४ सुर्यांचा सेट आणला आणि तो एवढा घाण आहे १ महिन्यानंतर आता कांदा कापायलाही त्रास होतो. ह्या विकेंडला जाऊन परत द्यावा लागेल. तुम्ही कुठुन कुठल्या ब्रँडची उअपकरणे घेता हे इथे सांगाल का? आणि मग ही कुठलीही उपकरणे असतील अगदी स्क्रू ड्राईव्हर आणि तत्स्म गोष्टी असल्या तरी चालेल. सुरुवात करु कॉफी मेकर आणि मिक्सरने. हे घेताना काय पाहून घ्यायचं आणि तुम्ही ब्रँड कुठला वापरता ते सांगाल का?
प्रतिक्रिया
10 Apr 2008 - 5:35 pm | प्रशांतकवळे
कॉफी मेकर आणि मिक्सर... अजून नाही घेतले..
इलेक्ट्रिक कूकर - पॅनासोनीक चांगला, पण भांडे "नॉन स्टिक" घ्या..
मी भारतातच घेतला होता व येताना "अरबांच्या देशात" घेऊन आलो
प्रशांत
10 Apr 2008 - 5:41 pm | मदनबाण
मिक्सर घ्यायचा असेल तर बजाज चा घ्यावा.
मिक्सर च्या भांड्यातील ब्लेड पाहुन घ्यावी.
(हा आता तो अमेरीकेत मिळतो की नाही ते मला माहित नाही.)
(हमारा बजाज म्हणणारा)
मदनबाण
10 Apr 2008 - 5:41 pm | विसोबा खेचर
बाई गं वरदा,
तू बिचार्या आमच्या जावयांना दोन टाईम नीट जेवायला वाढतेस ना, याची आता अलिकडे मला काळजी वाटू लागली आहे! :))
(ह घ्या)
'आता लेक इथे भारतात येईल तेव्हा तिला सगळा भातुकलीचा सेट नव्याने घेऊन द्या!' असं आजच फोन करून तुझ्या मातोश्रींना सांगणार आहे! :)
तात्या.
10 Apr 2008 - 5:42 pm | वरदा
म्हणजे भारतात स्लो कुकर मिळतो? ह्या वेळी गेले की तिथे आईला घेऊन देता येईल्....खूप खूप धन्यवाद्...तुम्ही डाळ शिजवून पाहिली का त्यात साधारण किती वेळ लागतो?
10 Apr 2008 - 5:45 pm | वरदा
तात्या
तू बिचार्या आमच्या जावयांना दोन टाईम नीट जेवायला वाढतेस ना, याची आता अलिकडे मला काळजी वाटू लागली आहे! :))
तुमचे जावई आहेत बारामतीचे...त्यांना लागते फक्त पोळी, भाकरी आणि कुठलीही भाजी आणि तिळकूट्..तिळकूट भारतातून करुनच आणते दरवर्षी कारण इथल्या मिक्सर वर होत नाही....बाकी करायला मिक्सर आणि कॉफीमेकर दोन्ही लागत नाही....:))
10 Apr 2008 - 5:46 pm | वरदा
मी तरी नाही पाहीला इथे बजाज बाकी तज्ञ सांगतीलच....
10 Apr 2008 - 6:27 pm | मीनल
१]http://www.blackanddeckerappliances.com/product-79.html
ब्लॅक & डेकर चा हा चॉपर चांगला आहे.
छोटासा आहे.डिश वॉशर सेफ. १ ट्च्.पाहिजे तस चोप करता येते.जाड किंवा बारिक्.सॅलेड साठी उत्तम.
अमेरिकेत ब्रँड स्मार्ट पासून वॉलमार्ट पर्यंत कुठेही मिळेल.
नाताळ्च्या वेळी वॉलमार्टमधे $३ ला मिळत होता.
मी फार उशीरा $६ ला घेतला.
२] सुमित मिक्सर अमेरिकेसाठी दादर (पू)ला मिळतो.स्व्स्त आहे असे ऐकले.
३]http://www.lnt.com/product/index.jsp?productId=2542808&cp&sr=1&origkw=vi...
लिनेन & थिंग्ज चा Vidalia Chop Wizard मला उपयोगी वाटतो.$ २०.
२ टाईप्सने चॉप होते.धुताना जरा त्रास दायक आहे.पण त्यांच्या ब्रश ने काम होते.
मी रोज वापरते.पण काहींना ते मॅन्युअल प्रेशर जास्त आहे असे वाटते.शिवाय थोडेसे कापून मगच बारिक चॉप होते.पण पटकन काम होते असे माझ मत आहे.
मीनल.
10 Apr 2008 - 6:48 pm | वरदा
मीनल ह्या दोन्ही पैकी चटणी कशात छान होते..माझ्याकडे blackanddecker चा फूड प्रोसेसर आहे पण त्यात चटणी खूप छान नाही होत..आणि खूप वेळ लागतो...
10 Apr 2008 - 7:33 pm | मीनल
हे चॉपर्स आहेत.क्रश/पेस्ट होत नाही.चटणी होणार नाही .
सॅलडसाठी चांगले आहेत.
ब्लॅक डेकर मधे कणिक मळून होते ( ४ पोळयांची)
मीनल.
10 Apr 2008 - 7:18 pm | स्वाती राजेश
कॉफी मेकर घेताना तुम्हाला कोणत्या प्रकारची कॉफी आवडते त्यावर अवलंबून आहे.
१.साधी आवडत असेल तर बाजारात खूप ब्रँड आहेत.
२.एक्स्प्रेसो हवी असेल तर तो वेगळा असतो. त्यात तुम्हाला कपोचिनो, मोचा ,लॅटे इत्यादी प्रकार एकाच मशिन मधे करता येतात. तसेच मुलांसाठी चॉकलेट ड्रिंक, हॉट मिल्क चॉकलेट इत्यादे करता येतात.
यामधे दुधाचे प्रमाण कमी-जास्त करून तसेच वेगवेगळे कॉफीचे ब्रँड वापरता येतात.
घेताना शक्यतो १० ते १५ बार असलेले घ्यावे म्हणजे एक्स्प्रेसो चा इफेक्ट छान येतो.
३.काही मशीन ही त्याच कॉफी च्याब्रँड करता बनलेली असतात. त्याच मशीनला त्यांच्याच कंपनीची कॉफी घ्यावी लागते. तेव्हा घेताना ते पाहून घ्यावे.
४.काही मशीन मधेफक्त ग्राउंड कॉफी(पावडर) वापरता येते. ग्रॅन्युअल चालत नाही किंवा बोर्नव्हीटा चालत नाही.
५. काही मशीनमधे सेल्फ क्लिनींग ची सोय असते ते पाहून घ्यावे.
स्लो कुकर चे नंतर लिहीन माझ्याकडे आहे. चांगला चालतो, उपयोगी आहे.
10 Apr 2008 - 7:28 pm | प्राजु
मिक्सर आहे तो, हॅमिल्टन बीच चा अहे. त्यात सगळे नीट बारिक होते. चटणीही होते पण कमी प्रमाणात असेल तर नाही होत. मी पुदीना किंवा कोथिंबीरीची चटणी एकदम करून ठेवते भरपूर आणि फ्रोजन करून ठेवते. हवी तेव्हा घेता येते. इडली, डोसा पीठ अगदी छान होतात. पण कोरड्या चटण्या किंवा, दाण्याचे कूट म्हणावे तसे छान होत नाही. बरेच दाणे अख्खेच राहतात. मग त्यासाठी फूड प्रोसेसर लागतो.
चाकू म्हणशील तर, मी भारतातूनच अंजली चा सुर्यांचा सेट घेऊन आले आहे. खूप छान आहे. प्रेशर कुकरहि मिस मेरी (भारतीय), मात्र नॉनस्टीक कुकिंग सेट मात्र फेबर वेअरचा आहे ४०$ ला मिळतो बहुतेक.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
10 Apr 2008 - 7:40 pm | प्रभाकर पेठकर
सुमितचा मिक्सर घरच्या वापरासाठी चांगला आहे.
मिक्सरची निवड त्याचा वापर किती होणार आहे त्यावर ठरवावे. साध्या कामांसाठी मॉलिनेक्सचा मिक्सर चांगला. (मात्र त्याचा ड्राय ग्राइंडर भारतातून भारतीय बनावटीचा घ्यावा.) मोटर १५० वॉट्सची असते.
वापर जास्त असेल (मसाल्यच्या वस्तूमानाच्या दृष्टीकोनातून किंवा वापरण्याच्या वारंवारीतेच्या दृष्टीकोनातून) तर मात्र मिक्सरची मोटर ६०० वॉट्स किंवा त्याहून जास्त वॉट्सची आहे हे पाहून घ्यावे. सुमित, ब्लॅक अँड डेकर असे किंवा त्या लेव्हलचे मिक्सर पाहून त्यातुन निवडावा.
माझ्या घरी गेली कित्येक वर्षे मी सुमित वापरतो आहे. अजून काही तक्रार नाही.
सुरी..
सुरी जीतकी धारदार तितकी सुरक्षित.
सुरी कार्बन स्टील, ब्रँड TRIMONTINA मेड इन ब्राझिल चांगली आहे. ह्याची मुठ पांढर्यारंगाची असते.
सुरीचे पाते १ ते १-१/२ इंच रुंद असावे.सुरी वजनाला शक्य तितकी हलकी असावी. सुरी घेताना (एकदाच) त्या बरोबर धार लावायला गोल काणस मिळते ती घ्यावी. कामाला सुरूवात करताना ड्रॉवर मधून दोन्ही वस्तु बाहेर काढाव्यात (सुरी आणि काणस) आणि प्रत्येक वेळी धार लावूनच सुरी वापरावी.
भारतात हॅक्-सॉ ब्लेडला धार लावून सुरी प्रमाणे वापरतात. त्याची धारही बरेच दिवस टीकते.
एवढी काळजी घेऊनही चांगली सुरी मिळायला भाग्यच लागतं. ५ - ६ वेगवेगळ्या सुर्या खरेदी केल्यावर एखादी चांगली सुरी मिळते.
पुर्वी प्रेस्टीज च्या सुर्या हमखास चांगल्या मिळायच्या पण हल्ली त्यांचे रेप्युटेशनही (सुर्यांच्या बाबतीत) म्हणावे तसे राहिलेले नाही.
भाज्यांसाठी आणि नॉनव्हेज साठी सुर्या वेगवेगळ्या असाव्यात.
नॉनव्हेजात सुद्धा चिकनसाठी आणि मटणाचे जॉइंट्स तोडण्यासाठी सुरी आणि चॉपर अशी व्यवस्था असावी. मटणाचे जॉइंट्स साठी जरी चॉपर लागत असला तरी बोनलेस मटणाचे हव्या त्या आकाराचे तुकडे करण्यासाठी सुरीची गरज पडते. चॉपर स्वच्छ धुवून त्याचा मागचा भाग (धार नसलेला, विरुद्ध बाजूचा) नारळ फोडण्यासाठी वापरता येतो.
मासे हे अत्यंत नाजूक कसतात. मासे स्वच्छ करायला किचनची कात्री आणि पातळ पण अत्यंत धारदार सुरी लागते. त्याने माशांचे मांस न विस्कटता एकाच आकाराचे छान पातळ तुकडे करता येतात.
फळांसाठी आणि फुड कार्व्हींगसाठी अशीच टोकदार आणि धारदार, चार इंच पातं असलेली छोटी सुरी लागते.
पाव कापायला करवतीच्या प्रकारातली सुरी लागते. त्यातही दोन प्रकार येतात १) मोठे दातवाली आणि २) सूक्ष्म दातवाली. मोठे दातवाली कडक क्रेस्ट असलेल्या पावाच्या लोफचे स्लाईस करायला वापरतात आणि सूक्ष्म दातवाली सँडविचच्या कडा कापण्यासाठी वापरतात.
टेबलवर काटा-सुरी प्रकारातली सुरी जेवताना मोठ्या पदार्थांचे खाणेबल तुकडे करण्यासाठी, काट्याला साहाय्य म्हणून तसेच पावाला लोणी लावायला वापरतात. (तसे, बटर, आयसिंग स्प्रेडर नांवाचे वेगळे उपकरण मिळते पण ते सुरी ह्या वर्गात मोडत नाही).
दुकानांत मांडून ठेवलेले सुर्यांचे सेट दिसायला फार मोहक आणि लगेच घ्यावेसे वाटतात. पण त्या मोहात कधी पडू नये. त्यातील सुर्या फारच 'कामचुकार' असतात. त्या पेक्षा गरजांप्रमाणे सुर्या वेगवेगळ्याच घ्याव्यात.
10 Apr 2008 - 10:23 pm | एक
कॉफी ग्राईंडर वापरून बघ..
आम्ही खसखस, वेलदोडा, मिरी , यांची पुड करण्यासाठी तोच वापरतो.. मोठ्या ब्लेंडर मधे ते काम होत नाही .
10 Apr 2008 - 10:28 pm | ठणठणपाळ
अमेरिकेत चांगल्या सुर्यासुद्धा मिळत नाहीत? तद् मातरस्य!
मग त्यापेक्षा आमचा भारत बरा.
10 Apr 2008 - 11:22 pm | वरदा
पेठकरकाका मस्त सांगितलत्..
दुकानांत मांडून ठेवलेले सुर्यांचे सेट दिसायला फार मोहक आणि लगेच घ्यावेसे वाटतात. पण त्या मोहात कधी पडू नये. त्यातील सुर्या फारच 'कामचुकार' असतात.
अगदी अगदी असच झालं माझं...TRIMONTINA शोधतेच कशी..
सुमित, ब्लॅक अँड डेकर असे किंवा त्या लेव्हलचे मिक्सर पाहून त्यातुन निवडावा.
ह्म्म आहे तर माझ्याकडे ब्लॅक अँड डेकर पण फूड्प्रोसेसर आहे आणि प्राजु म्हणते तसं खूप चटणी असेल तर जास्त बारीक होते पण मी नारळ घालून चटणी करते मग एवढी जास्त कशी करणार? प्राजु कोथंबिरीच्या चटणीत नारळ वगळून बाकी सगळं तेच घालतेस का? मीही करून ठेवेन म्हणते.
कॉफी ग्राईंडर वापरून बघ..
एक हे बरं सांगितलत्.. नवीन सेल लागलाय ह्या विकेंडला जाणारे शोधतेच काही स्वस्त डील दिसतय का....
प्राजु चाकू म्हणशील तर, मी भारतातूनच अंजली चा सुर्यांचा सेट घेऊन आले आहे.
आता इथे शोधुन नाही मिळाल्या तर हेच करणार....
स्वाती खूप छान सांगितलस्...मला एक्स्प्रेसो बनवता येईल असा घ्यायचाय्..मी एकटीच मेंबर आहे प्यायला म्हणून टाळतेय्..पण आता स्ट्डी करते आणि कुठे डील दिसतय का पहाते...खूप महाग आहेत सगळे एक्स्प्रेसो मेकर....
स्लो कुकर चे नंतर लिहीन माझ्याकडे आहे. चांगला चालतो, उपयोगी आहे.
वाट पहाते मी....
नॉनस्टीक कुकिंग सेट वरुन आठवलं मी 'सर्क्युलॉन २' चा घेतला एकदम सही आहे....माझ्याकडे सिरॅमिक कुकटॉप आहे त्यामुळे खूप सेट आणून परत केले कुणी घेणार असाल तर नक्की घ्या सर्क्युलॉन
10 Apr 2008 - 11:43 pm | प्रियाली
अमेरिकेत सहसा मिक्सर मिळत नाही कारण ते आपल्यासारखे मसाले वाटत नाहीत. इथे ब्लेंडर्स मिळातात ते मिल्कशेक किंवा ज्यूस करण्याच्या उपयोगाचे. मिक्सर हवा असेल आणि पैसे खर्च करायचे नसतील तर ऑस्टेरायझरच्या मिक्सरला फिक्स होणारे चटणीचे भांडे बर्याच इंडियन स्टोर्समध्ये मिळते. यात ओली, सुकी चटणी किंवा आलं-लसणीची पेस्ट चांगली होते.
डोसे, इडली, वडे यांचे पीठ वाटायचे असेल तर मात्र वेट ग्राईंडर घेतलेला बरा. हा कोणत्याही मोठ्या शहरातल्या इंडियन स्ट्रीटवर दिड-दोनशे डॉलर्सपर्यंत पडतो.
सुर्यांचा सेट घ्यायचा झाला तर ब्रँड पहावा. चांगले सेट्स ४०० डॉ.पर्यंत किंवा त्याहून महागाचेही मिळतात. जे.ए. हेन्कल्स किंवा कॅफलॉनच्या सुर्या उत्तम असतात यांची धार जात नाही. तसेच या सेट बरोबर धार काढण्याचा वेगळा दांडा (बार) मिळतो. वर पेठकरांनी सांगितल्याप्रमाणे सुर्यांचे अनेक प्रकार या सेटमध्ये मिळतात.
चांगले ब्रँड्स क्रुप्स, किचनएड, क्विझीन आर्ट इ. हे फॅक्टरी आऊटलेटस, मॉल किंवा बेड बाथ बियॉंड आणि लिनन अँड थिंग्ज सारख्या दुकानांतून मिळतात.
10 Apr 2008 - 11:58 pm | वरदा
डोसे, इडली पीठ होतं माझं ४० डॉ. च्या फूड प्रोसेसर मधे..पण ही ऑस्टेरायझरची आयडीया नवीन दिसते...बघते इंडीयन शॉप्स मधे जाऊन्.....अगं मी नॉनव्हेज नाहि खात मग एवढ्या सुर्यांचा मला काय उपयोग मला हव्यात भाजी चिरायला त्यासाठी एवढ्या सगळ्या घायला नको वाट्ट गं
11 Apr 2008 - 12:15 am | चतुरंग
इकडून परत जाणार्या एका भारतीय कुटुंबाकडून घेतला.
कोईंबतूरचा आहे. मेड इन इंडिया - यूजेबल इन यू.एस्.ए.. झकास चालतो. २ वर्ष दर आठवड्याला एकदा असा वापरतोय.
त्यात पीठ जसे वाटले जाते तसे मिक्सरमधे होत नाही.
इडलीचा पोत असा काही लुसलुशीत निघतो की बास! एकदम उडप्याच्यात जाऊन खाल्ल्यासारखंच!;))
न्यू जर्सीत एडिसन मधे इंडियन स्टोअरला नक्की मिळेल.
चतुरंग
11 Apr 2008 - 5:17 am | पुणेरी
दोन वर्षापूर्वी माझ्या बायकोने पुण्यातून BOSS चा मिक्सर (१२० व्होल्ट्स) रू. १८०० /- ला घेतला. ३ भांडी आहेत. अजुन तरी एकदम झकास चालतो आहे.
11 Apr 2008 - 12:33 pm | स्वाती दिनेश
सुर्यांचे अनेक विध प्रकार वापरून पाहिले पण मला हॅक सॉ चीच सुरी भाज्या चिरायला आवडते.एकदम बारीक चिरायचे असेल तर ही एकदम बेस्ट! बाकी पेठकरांनी वरती एक्सपर्ट डीटेल्स दिले आहेतच.
कॉफी मेकर मला ब्राऊन आणि तासिमोचा आवडला.ब्राऊनचा कॉफीमेकर साध्या रोजच्या कॉफी साठी. आणि तासिमो मध्ये ७/८ प्रकार करता येतात.नॉर्मल कॉफी,कापुचिनो,एस्प्रेसो,काफे लाट्टं, काफे क्रिम,ग्रीन टी इ. इ.
स्वाती
15 Apr 2008 - 12:00 am | llपुण्याचे पेशवेll
तसा मी मांसाहारी नसल्यामुळे मांसछेदनासाठी सुरी लागत नाही. पण कांदा, बटाटा, पालेभाज्या, आलं असे विविध पदार्थ चिरण्यासाठी सुरी पाहीजे. पण सारखी धार लावायला लगणारी सुरी नको आहे. जर करवती धारेची असेल आणि ती धार दीर्घकाळ टीकणारी असेल तर उत्तम. सध्या आमच्या कंपनीच्या कॉर्पोरेट गेस्ट हाऊसमधे एक चांगला नाईफ सेट आहे. त्यातल्या सुर्या खरेतर फार चांगल्या आहेत. पण त्यावर कोणत्याही कंपनीचे नाव नाही. फक्त 'मेड इन चायना' इतके लिहीले आहे.
कोणी जर याबद्दल मार्गदर्शन केले तर फार बरे होईल.
पुण्याचे पेशवे
11 Apr 2008 - 7:33 pm | वरदा
मग मी पण ट्राय करुन पाहीन हॅक सॉ. हो मला साध्या भाज्याच चिरायच्या असतात पण बारीक्....जर कांद्याचा मोठा तुकडा लागला तर जेवावसं नाही वाटत पुढे...
11 Apr 2008 - 8:22 pm | राजेन्द्र
मॉलिनेक्सचा मिक्सर (कॉफी ग्राईंडर च्या साईझ्चा) बहुतेक सर्व इन्दिअन दुकानात मीलतो ($१५). त्याचि पाती तलाला लागुन असतात त्यामुले चटणी चान्गली होते.
जे.ए. हेन्कल्स सुर्या सर्वात उत्तम असतात यांची धार जात नाही. त्यान्ची शेफ नाईफ सुमारे $७० ला मीलते. त्यात दोन प्रकार असतात. दोन मानसान्ची चित्रे असलेल्या सुर्या जास्त चान्गल्या असतात.
12 Apr 2008 - 11:51 am | ऋषिकेश
वा वरदाताई, मस्त विषय सुरु केलाय. वाचनखुणांमधे साठवला आहे. वेळ पडली की खूप उपयोग होईल आभार!
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
12 Apr 2008 - 2:59 pm | विदेश
खलबत्ता,पाटा-वरवंटा,उखळ-पहार इ. उपकरणे स्वस्त नि मस्त ! जेवणाबद्दल कधी तक्रार करण्याचे कारणच पडत नाही.
12 Apr 2008 - 3:43 pm | विसोबा खेचर
खलबत्त्यात कुटलेल्या पदार्थाची, आणि पाटावरवंट्यावर वाटलेल्या पदार्थाची चवच वेगळी! ती खुमारी तुमच्या मिक्सरमध्ये नाही!
आमच्याकडे आजही पाट्यावरवंट्याच्याच वापर जास्तीत जास्त केला जातो. अगदीच जर एखादवेळेला काही कामाची घाई असेल तरच आम्ही मिक्सर वापरतो. पण मिक्सरच्या चवीत आणि पाट्यावरवंट्याच्या चवीत खूप फरक पडतो. पाटा वरवंट्याची दगडी चव पदार्थामध्ये जान आणते!
फक्त अलिकडे पाट्या वरवंट्याला टाकी लावणार्या बाया अभावानेच दिसतात, त्यामुळे त्यांना अक्षरश: शोधावं लागतं! परंतु आम्ही अद्याप तरी त्या बाबतीत सुदैवी आहोत. फार पूर्वी गजाबाई नावाची एक बया पाटीला टाकी.... असं ओरडत रस्त्याने फिरयाची. मला सांगायला कौतुक वाटतं की आजही नव्वदीच्या घरातली गजाबाई आमच्याकडे पाट्यावरवंट्याला टाकी लावायला येते!
अलिकडच्या काळात पाट्यावरवंट्याच्या तुलनेत मिक्सरच्या या बेचव जमान्यात ही टाकी लावणारी जमात खूप कमी होत चालली आहे हे आमच्यासारख्या खवैय्यांचं दुर्दैव!
कालाय तस्मै नम:! दुसरं काय?
आपला,
(पाट्यावरवंट्यातला) तात्या.
14 Apr 2008 - 11:47 pm | चतुरंग
कालौघात मागे पडत गेलेल्या काही गोष्टींपैकी खल्-बत्ता, पाटा-वरवंटा सुध्दा आहेत हे खरे!
खलबत्त्यात कुटलेली दाण्याची, लसणाची चटणी त्याची चव काही वेगळीच. पाट्यावर वाटलेली मिर्ची-खोबर्याची ओली चटणीही औरच.
पण हे होणारच. सगळेच चांगले आपल्याला मुठीत धरुन ठेवता येत नाही. काहींवर काळाचा वरवंटा फिरतोच!
त्याचबरोबर नवीनही काही येत असते. जसे वेट ग्राईंडर - ह्यामधे जात्याचेच दगड वापरलेले असतात त्यामुळे चव तशीच अप्रतीम पण विजेवर चलणारे असल्याने कष्ट कमी;)
तेव्हा असे दु:खी होऊ नका नव्या चांगल्याचे स्वागत करा आणि पुढे चला.;))
चतुरंग
22 Apr 2008 - 1:07 pm | प्रभाकर पेठकर
श्री. तात्या,
ही टाकी लावणारी जमात खूप कमी होत चालली आहे हे आमच्यासारख्या खवैय्यांचं दुर्दैव!
कुणाही उडप्याला विचारलेत तर टाकी लावणारी माणसे सहज उपलब्ध होऊ शकतात. त्यांच्याकडे इडली-डोश्याच्या वेट ग्राइंडरला टाकी लावायला नियमितपणे कारागिर येत असतात. मला अगदी मस्कत मध्येही टाकी लावणारा मलबारी मिळाला होता. काळजी करू नये.
14 Apr 2008 - 10:07 pm | वरदा
खरं आहे तात्या पण वेळ आणि मेहेनत हे दोन्ही झालं पाहिजे ना...आईलाही पाय, पाठ यांचा त्रास त्यामुळे तिने लहानपणीच सोडलं पाट्यावर वाटणं मग आम्ही कधी शिकलोच नाही. आणि अमेरिकेत कुठुन मिळणार गजाबाई. मी फक्त गावाला १-२ वेळा खाल्लेय पाटा वरवंट्यावरची चटणी खरोखरच खूप सुंदर लागते.
थँक्यू ऋषीकेश हो मी त्याच हेतूने चालू केला की आताच नाहि तर कधीही रेफर करता येईल सगळ्यांना..
23 Apr 2008 - 4:09 pm | स्वाती राजेश
स्लो कुकर हा वन पॉट कुकींग साठी उपयोगी होतो. यामधे सुप्स, स्ट्यु, पुडींग, कॅसेरॉल, राईस, केक, नॉनव्हेज पदार्थ फार चांगले होतात.
नोकरी करणार्यांना याचा उपयोग होतो, ऑफिसला जाताना यामधे पदार्थ ठेवला तर घरी येइपर्यंत तो झालेला असतो.
बिलाची काळजी करू नका कारण हा फक्त एका बल्बपेक्षाही कमी इलेक्ट्रीसिटी वापरतो.
यामधे पदार्थ करपत नाही.तसेच इव्हॅपोरेशन कमी होते त्यामुळे पदार्थाची पौष्टीकता कायम राहते.घरभर पदार्थाचा वास येत नाही.
नेहमीचा ओव्हन, पदार्थ करायला जर १ ते २ तास घेत असेल तर कुकर हाय वर ठेवला तर ३-४ तास, लो वर ७-८ तास घेतो.नंतर पदार्थ वॉर्म वर जातो म्हणजे सारखा सारखा गरम करावा लागत नाही. जरी तुम्ही एकदा जेवला नंतर २ तासाने जरी तुमचा पार्टनर जेवायला बसला तरी त्याला तुमच्या इतकेच ताजे, पौष्टीक व चवदार जेवण मिळते.
स्लो कुकर घेताना आतील पॉट काढायला-घालायला येइल असे घ्यावे म्हणजे पास्ता,लसाने केला तर चीज ला ब्राउनींग इफेक्ट येण्यासाठी त्याच भांड्याचा उपयोग ग्रील साठी करून शकतो. तसेच टेबल वर डायरेक्ट युज करू शकतो.
काही कुकर ला तीन स्वीच असतात. (हाय्,लो,ऑफ) काही चार असतात त्यात अटोमेटीक हे एस्ट्रा स्वीच असते.
शक्यतो इंडिकेटर असणारा घ्यावा. म्हणजे कुकिंग चालू आहे कि नाही ते कळते.
काही कुकर ना प्रीहीट ची गरज असते. ते पाहून (मॅन्युअल) घ्यावे.
कुकर वेगवेगळ्या आकारात मिळतात तसेच किती मोठा पाहीजे हे जरूरीनुसार ठरवावे.
तसेच यात केक सुद्धा छान होतात, त्यात मावतील त्या आकाराचे केकटीन आणावे लागतात.
23 Apr 2008 - 5:42 pm | वरदा
स्वाती मस्त माहीती दिलीस गं कुणी संध्याकाळी येणार असेल तर भात वगैरे लावायला छान आहे म्हणजे गार व्हायला नको...पण इंडियात याचा फारसा उपयोग होईल असं वाटत नाही एवढा वेळ लाईट कुठे असतात तिथे:(
इथे घेईन म्हणते....केक करायला तर खूपच आवडतो मला उपयोग होईल..
तुला एक प्रश्न विचारु का? तु हसशील मला. मायक्रोवेव्ह च्या सगळ्या पुस्तकात असतं की दूध तापवता येते उतू जात नाही...पण माझ्या घरी ऑफिसमधे हॉटेल मधे सगळ्या मायक्रोवेव्ह मधे मी प्रयत्न केला दूध उतू जातच्...असे काही वेगळे मायक्रोवेव्ह असतात का? खूप स्वस्त पासून खूप महाग मायक्रोवेव्ह मधे काय फरक असतो?
(अज्ञानी) वरदा
23 Apr 2008 - 7:02 pm | स्वाती राजेश
दुधात जर साखर घातली असशील तर ते उतू जाते. दुधाचा कप मोठा घे व तसेच टायमिंग कमी जास्त करून पाहा.असे २-३ प्रयोग केलेस तर तुला कळेलच किती वेळ लागतो ते. कारण तु घेतलेल्या दुधाच्या प्रमाणावर सुद्धा वेळ कमी जास्त लागतो.तसेच मायक्रोव्हेव च्या पॉवर वर सुद्धा अवलंबून असतो,कमी पॉवर वर ठेऊन बघ.
मी एका कपाला ८५० वर १ मिनिट ठेवते
जर १०००w चा असेल तर हाय वर ६ मि.१ लिटर दुधाला उकळी येते.
तुला बासुंदी साठी दुध आटवायचे असेल तर मोठया पसरट भांड्यात ठेव.
मायक्रोव्हेव मधे ग्रील आणि कन्व्हेक्शन अशा दोन प्रकारच्या सुविधा असतात.
१.मायक्रोवेव्हज चा उपयोग पदार्थ शिजवण्यासाठी
२.ग्रीलचा उपयोग पदार्थाला खरपूस पणा येण्यासाठी,
३.कन्वेक्शनचा उपयोग बेकरी पदार्थ करण्यासाठी.
कन्व्हेक्शन चे थोडे महाग असतात कारण वर आणि खाली असे दोन हिटर्स असतात.पदार्थ एकाच स्टेपमधे होतो.उदा.केक इत्यादी
ग्रील चा घेतलास तर तुला बेकरीचे पदार्थ करताना २ स्टेप मधे करावे लागतात्.सर्व ठिकाणी बाउनींग होत नाही.
महाग व स्वस्त हे त्याच्या ब्रॅडवर असते. बेसिकली तू त्याचा उपयोग कसा करतेस त्यावर अवलंबून आहे. तुला केक आवडत असतील तर माझ्या मते कन्व्हेक्शन उत्तम. कारण सारखे सारखे पाहावे लागत नाही. इंडियामधे माझ्याकडे एल्.जी.कन्व्हेक्शनचा आहे ३० लिटरचा.छान आहे.
24 Apr 2008 - 1:36 am | वरदा
कन्व्हेक्शन चे ओव्हन गॅस शेगडी बरोबरच असतात त्यामुळे तो एकदम मोठ्ठा आहे माझ्याकडे साध्या मायक्रोवेव्ह मधेहि ३०-४० डॉ पासून ३००-४०० पर्यंत मिळतात. आणि मी साधं दूध साखर पण न घालता, दुधाची कॉफी, चहा सगळे प्रकार टाकून पाहीले मला विंडो मधून पहात बसावं लागतं दिसलं वर येताना की कर बंद आणि जरा लक्ष चुकलं की गेलं......बर्याच रेसिपी बुक्स मधे आहे की मायक्रोवेव्ह मधे उतू जात नाही म्हणून मी गोंधळले गं.....