म्हातारी इतुकी न अवघे ७८ वयमान!

विकास's picture
विकास in काथ्याकूट
28 Sep 2007 - 3:38 pm
गाभा: 

६६ वर्षे सतत गात चित्रपट सॄष्टीत स्वतःचे नाव कायम ठेवलेली कदाचीत एकमेव व्यकी ठरणार्‍या लता मंगेशकर यांना आज ७८ वर्षे पूर्ण झाली. आता तीच्या आवाजातील (नवीन) गाणे आवडते का नाही हा एक वेगळाच मुद्दा होत असला तरी त्यामुळे त्यांचे महत्व कमी होत नाही. तेंव्हा खर्‍या अर्थाने जीवेत शरदः शतम असे लतादिदींना म्हणतो!

प्रतिक्रिया

स्वाती दिनेश's picture

28 Sep 2007 - 3:58 pm | स्वाती दिनेश

सुंदर चित्रे ! लता ७८ वर्षांची झाली हे खरंच वाटत नाही!
स्वाती

कोंबडी's picture

28 Sep 2007 - 5:52 pm | कोंबडी

चित्रे सुंदरच (छायाचित्र कृष्णधवल असलं की अर्ध आधीच आवडलेलं असतं).

अवांतर : विकासराव, बॉस्टनातील आमच्या घरासमोरील वाय.एम.सी.ए. ची पाच मैलाची शर्यत एका ७८ वर्षाच्या तरुणीने "सरासरी" वेळेत पूर्ण केली होती, त्याची आठवण झाली. आम्ही आपले कॉफी पीतपीत घरातूनच गम्मत पाहत होतो. सप्टेंबरात थंडी सुरू होते हो! का उगाच बाहेर पडा :) ?

- कोंबडी

मनिष's picture

28 Sep 2007 - 6:05 pm | मनिष

पण तिचा आजचा आवाज ऐकवत नाही.

प्रकाश घाटपांडे's picture

28 Sep 2007 - 7:03 pm | प्रकाश घाटपांडे

पण तिचा आजचा आवाज ऐकवत नाही.

आता वयोमानाप्रमाणे काहीतरी फरक पडणारच ना! निसर्ग आहे शेवटी. प्रेमापोटी काही फरक पडला नाही अग्द्दि पुर्वीसारखा आहे असे म्हणणारे देखील आहेत. पण तेवढ चालायचचं!

प्रकाश घाटपांडे

विसोबा खेचर's picture

29 Sep 2007 - 9:45 am | विसोबा खेचर

दिदीला अनेक शुभेच्छा...

विकासराव, चित्रे छानच आहेत..

आपला,
(दिदीप्रेमी) तात्या.

नंदन's picture

30 Sep 2007 - 3:17 am | नंदन

छायाचित्रे. लताबाईंची काही गाणी या दुव्यावर ऐकता येतील -- http://www.indianscreen.com/Lata.htm

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

प्राजु's picture

30 Sep 2007 - 3:37 am | प्राजु

ही चित्रे खूप छान आहेत. इथे प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद.
- प्राजु.

रमेश भिडे's picture

16 Dec 2014 - 5:57 pm | रमेश भिडे

लताजीना वन्दन