(तिंगुलीने घात केला)

अवलिया's picture
अवलिया in जे न देखे रवी...
11 Aug 2010 - 3:03 pm

प्रेरणा - लै अभ्यास हवा. लै !

कसा तिंगुलीने असा घात केला
शीट* शोधण्यातच उभा जन्म गेला

असे वाटले की प्रवेश करतो मी
अकस्मात पास्वर्ड तिथे चुकलेला

विचारात होतो, अता झेप घ्यावी
तसा दिसु लागे कुणी घुसलेला

खुला एकही का, इथे आय्डी नाही
आधीच आय्डीत तु प्रवेश केलेला?

पटू संगणकाचा, तरी मार खाई
म्हणू का नये रे तुला झिंगलेला?

प्रवेश होईना, पास्वर्ड घेईना
कसा मी स्विकारू एक्सेल्शीटला?

"पाध्यांस" चेव आय्डी ब्लॉक कराया
असे साध्य व्हावे तुझ्या साधनेला

बोर्डावर कुठे
...................................................
(वृत्त-भणंगप्रयास)

* तिंगुलीकडे असलेले एक्सेल शीट

अद्भुतरसमौजमजा

प्रतिक्रिया

ब्रिटिश टिंग्या's picture

11 Aug 2010 - 3:06 pm | ब्रिटिश टिंग्या

पाध्ये पाध्ये कुठे आहात तुम्ही :)

llपुण्याचे पेशवेll's picture

11 Aug 2010 - 3:13 pm | llपुण्याचे पेशवेll

हा हा हा.
मस्तं.

छोटा डॉन's picture

11 Aug 2010 - 3:14 pm | छोटा डॉन

कोण तिंगुली ?
धन्यवाद !

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Aug 2010 - 6:18 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

काय तिंगुली, आम्हाला अंगुली माहित आहे. धन्यवाद. :-)

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Aug 2010 - 3:34 pm | बिपिन कार्यकर्ते

काही खास नाही. पुकशु.

केशवसुमार's picture

11 Aug 2010 - 6:31 pm | केशवसुमार

अवलियाशेठ,
एक भणंगप्रयास सोडले तर विडंबन सो सो.. फक्त लै अभ्यास असणार्‍यास साठीच आहे असे वाटले..
पाध्यांचा उल्लेक रोचक वाटला..
बाकी चालु दे..
(वाचक)केशवसुमार