आमचा पण एक स्टण्ट (प्रेरणा - मदनबाण)

युयुत्सु's picture
युयुत्सु in कलादालन
9 Aug 2010 - 6:10 pm

कॅमेरा - canon sx 200 is
s/w - gimp
प्रेरणा - मदनबाणांची सफरचंदे
फुल - जास्वंद
बाग - आमचीच ;)

कला

प्रतिक्रिया

मस्त कलंदर's picture

9 Aug 2010 - 7:43 pm | मस्त कलंदर

मस्तच फोटो....
असले उद्योग आम्हाला नाहीत जमत म्हणून चान चान नाही, खरोखर छान छान!!

तुम्हाला स्त्रीजातीचे वावडे आहे.. त्यांच्या प्रतिक्रियांचे नाही ना??? :)

मदनबाण's picture

9 Aug 2010 - 8:25 pm | मदनबाण

वा... छान :)

गणपती ही वैदिक देवता नसल्याने आमच्या घरात त्याला कोणी विचारत नाही.

गणपती ही वैदिक देवता नसल्याने आमच्या घरात त्याला कोणी विचारत नाही.
ज्यांच्या घरात या देवतेची पूजा होते त्यांच्यासाठी आहे... आपण मानत नसाल तर या विषयावर विचार करु नका.

फोटो आवडला पण त्यात स्टंट काय ते कळलं नाही...

अजून एक : गणपती वैदिक नाही ? शंकर वैदिक आहे का? आणि वैदिक म्हणजे आर्य नाही ते असेच का?

ऋग्वेदात शंकर रुद्र म्हणून येतो. वैदिक देवता म्हणजे ज्या ऋग्वेदात आहेत फक्त त्या. मूळ वेद फक्त तीनच मानतात. 'अथर्ववेदा'ला विद्वान वेद मानत नाहीत.

ऋग्वेदात शंकर रुद्र म्हणून येतो. वैदिक देवता म्हणजे ज्या ऋग्वेदात आहेत फक्त त्या. मूळ वेद फक्त तीनच मानतात. 'अथर्ववेदा'ला विद्वान वेद मानत नाहीत.
याच ऋग्वेदात खालील ऋचा आहे :---

गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कविनामुपमश्रवस्तमम्।
ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आ नः शृ्ण्वन्नूतिभिः सीद सादनम् ।।
(ऋग्वेद २।२३।१)

संदर्भ :--- http://veda-vidya.com/mangla.php
ब्रम्हा, विष्णू,महेश, सूर्य आणि शक्ती या पंच देवां पेक्षा गणपती हा श्रेष्ठ आहे...
शंकराच्या लग्नात देखील गणेश पुजन झाले होते.
देवांना नाद भाषा समजते असे कुठेतरी वाचनात आले होते,त्यात गणपतीला नाद भाषा ऐकु येण्याची शक्ती सर्वात जास्त आहे,आपण मंदीरात गेल्यावर घंटा नाद करतो त्या मागे हाच उद्देश आहे.
तबला ह्या वाद्यचे निर्माण गणपतीनेच केल्याचे ऐकले आहे... असो या धाग्यावर आता माझा हा शेवटचा प्रतिसाद कारण मूळ विषया पासुन अवांतर होत आहे.

युयुत्सु's picture

10 Aug 2010 - 11:01 am | युयुत्सु

असे विनोद शतकानुशतके आपल्या कडे पूजापाठात चालू आहेत. आपण सांगितलेल्या ऋचेत 'गणपती' शब्द आहे म्हणून ती गणपतीच्या पूजेत येऊन बसली. समूहाचा नायक अशा अर्थाने तो मूळ ब्रह्मणस्पती सूक्तात आहे.

बाकी शंकराच्या लग्नात गणेश पूजन हा विनोदच आहे. म्हणजे मुलं झाल्यावर दोघांचे लग्न झाले का?

असे विनोद शतकानुशतके आपल्या कडे पूजापाठात चालू आहेत. आपण सांगितलेल्या ऋचेत 'गणपती' शब्द आहे म्हणून ती गणपतीच्या पूजेत येऊन बसली.
हा आपला तर्कच एक जोक वाटला...

बाकी शंकराच्या लग्नात गणेश पूजन हा विनोदच आहे. म्हणजे मुलं झाल्यावर दोघांचे लग्न झाले का?
ब्रम्ह पुत्र दक्षाने शक्तीची १०० वर्ष उपासना ( तप) केली त्यावर ती प्रसना झाली त्यावर दक्षाने तिच्याकडे वर मागितला त्यात त्याने देवीला स्वतःची(दक्षाची) पुत्री व्हावी असे वचन मागितले.
तीच सती या रुपाने जन्माला आली आणि दक्ष यज्ञात स्वत:च्या प्राणाची आहुती दिली,तिचा दुसरा जन्म हिमालयाची सूता पार्वती या रुपाने झाला.
शंकर /पार्वती यांनी तप आचरुन गजाननाकडे तू आमचा पुत्र म्हणुन यावा असा वर मागितला, (आणि म्हणुनच गणपतीची पूजा शंकर पार्वतीच्या लग्नात झाली हे चूक ठरत नाही.)त्यामुळेच सर्वांना शंकर-पार्वतीचा पुत्र म्हणुनच गणपतीची ओळख माहित आहे...
गणपतीच्या ८ अवतारांपैकी हा एक अवतार असावा बहुतेक...
(संदर्भ :--- मुदगल पुराण)

युयुत्सु's picture

10 Aug 2010 - 12:17 pm | युयुत्सु

तुमच्या लेखी परीकथा (पुराणे) म्हणजे इतिहास का? मी माझ्या मनचे सांगत नाही. संस्कृत विद्वानानी बीए ला वर्गात जे शिकवले तेच सांगतो.

आंबोळी's picture

10 Aug 2010 - 11:56 am | आंबोळी

युयुत्सु शेठ ,
फोटो मस्तच....

अवांतरः ते बाणाचे आणि तुमचे वरती गणपती वर जे प्रातिसादिक आदानप्रदान झाले त्या विषयी जरा विस्ताराने लेख टाका ना... आमच्या सारख्या अल्पमाहिती लोकांना उपयोग होइल...

कुठे तरी वाचलय की नॉर्थची लोकं महाराष्ट्रीयांना म्हणतात की "तुम्ही मुळ देवांची (शंकर , विष्णू, ब्रह्मा ) पुजा करायची सोडून त्याम्च्या नोकरांची ( मारुती, गणपती) का पुजा करता?"

गणपती विषयी जरा सविस्तर लेख टाकाच....

llपुण्याचे पेशवेll's picture

10 Aug 2010 - 10:25 am | llपुण्याचे पेशवेll

तुमची जास्वंदा छान.

गणपती वैदिक देवता आहे म्हणून आमच्या घरात तिला स्थान आहे. :)

युयुत्सु's picture

10 Aug 2010 - 12:19 pm | युयुत्सु

म्हणजे तुम्ही अनार्य दिसता... ;)

आता आर्य अनार्य असं वाजणार कि काय?

मितभाषी's picture

10 Aug 2010 - 10:29 am | मितभाषी

वा ! झक्कास.

लै भारी.
हे संस्कार कसे केले तेपण सांगा कि राव.

भावश्या.