शाकाहारी विरुद्ध मांसाहारी
शाकाहारी विरुद्ध मांसाहारी असा वाद पेटला तेव्हा त्यातून उपवाद निर्माण झाला तो शाकाहार श्रेष्ठ की मांसाहार श्रेष्ठ असा. आणि उप उपवाद निर्माण असा झालाय कि माणूस निसर्गत: शाकाहारी की मांसाहारी असा. माणूस निसर्गत: शाकाहारीच आहे,
मानवाच्या सुरुवातीच्या उत्क्रांतीच्या काळात तो द्विपाद व वानरसदृश असताना झाडावर राहणारा व मुख्यत: झाडांची पाने व फळे खाणारा होता. माझ्या मते भूतदयेचा संबंध मांसाहाराशी जोडणे चुकीचे ठरेल ; सोवळं पाळण्यासाठी माणसांचा द्वेष करून पशुपक्ष्यांवर प्रेम दाखविणाऱ्या शाकाहारींपेक्षा , सर्वांशी मिळून-मिसळून वागून पाळीव प्राण्यांवर जिवापाड प्रेम करणाऱ्या व्यक्तींची ' भूतदया ' च अधिक श्रेयस्कर ठरेल. माझ्या मते मांसाहारी व्यक्ती हिंसेला लवकर प्रवृत्त होऊ शकेल. हे विधान कुठल्या हि एका संप्रदायाला अनुसरून नाही तर शास्त्रीयदृष्ट्या योग्य व सिद्ध आहे.
प्राचीन काळात चातुर्वर्णाप्रमाणे समाजाची रचना होती. आता शाकाहारी विरुद्ध मांसाहारी असा वेगळा जातीयवाद निर्माण होऊ पाहतोय. मांसाहार ठीक आहे पण त्याचे अधिक सेवन फायदेशीर नाही. शारीरिक व मानसिक दृष्ट्या हि....
just take a look through-
No deficiencies. There is no nutrient necessary for optimal human functioning which cannot be obtained from plant food.
High fat plus cholesterol. Animal foods are higher in fat than most plant foods, particularly saturated fats. Plants do not contain cholesterol.
"Carb" deficient. Meat is deficient in carbohydrates, particularly the starches which are so essential to proper health.
Vitamin deficient. Except for the b-complex, meat is largely deficient in vitamins.
Agricultural Chemicals. Being higher on the food chain, animal foods contain far higher concentrations of agricultural chemicals than plant foods, including pesticides, herbicides, etc.
Disease Inducing. The correlation between meat consumption and a wide range of degenerative diseases is well founded and includes.....
Osteoporosis
Kidney Stones and Gallstones
Diabetes
Multiple Sclerosis
Arthritis
Gum disease
Acne. Aggravated by animal food.
Obesity. Studies confirm that vegetarians tend to be thinner than meat eaters.
Obesity is considered by doctors to be a disease within itself.
Intestinal Toxemia. The condition of the intestinal flora is critical to overall health.
Animal products putrefy the colon.
Transit time. Wholesome food travels quickly through the "G.I" tract, leaving little time to spoil and incite disease within the body.
Fiber deficient. Fiber absorbs unwanted, excess fats; cleans the intestines; provides bulk and aids in peristalsis. Plant food is high in fiber content; meat, poultry and dairy products have none.
Body wastes. Food from animals contain their waste, including adrenaline, uric and lactic acid, etc., Before adding ketchup, the biggest contributors to the "flavor profile" of a hamburger are the leftover blood and urine.
प्रतिक्रिया
8 Aug 2010 - 10:38 pm | मीनल
माझ्या घरी ( माहेरी, सासरी) सर्व शुध्द शाकाहारी. अंडे नावालाच किंवा नाहीच म्हणायचे.
त्यामुळे कधीही मांसाहार केला नाही. त्या चवीची आवडच निर्माण झाली नाही. आता इच्छा ही नाही.
माझा मुलगा हा आता पर्यंत शुध्द शाकाहारी. परंतु अमेरिकेतल्या कॉलेज डॉर्ममधे रोज रोज सॅलेड किंवा मर्यादित शाकहारी तेच तेच पदार्थ खायचे म्हणजे आव्हान. त्याने मांसाहार सुरू केला. मांसाहार म्हणजे चिकन. अजून इतर काही ही नाही. आम्ही त्याला मांसाहाराचे तोटे सांगितले. सोय सांगितली. निर्णय त्याच्यावर सोडला. प्रोत्साहन दिले नाही किंवा खाऊ नकोसच असे ही सांगितले नाही.
मांसाहार घरात आणण्यास मात्र माझी बंदी आहे.
8 Aug 2010 - 10:57 pm | नावातकायआहे
ह्यो विषय शाकाहार ईरुध्द मांसाहार असा हाय का मराठी ईरुध्द विंग्रजि ?
आय शप्पत काय झेपल नाय आनि विंग्रजित्ले मांसाहाराचे फायदे कळाले नायत तरि जानकारांनि प्रकाश टाकावा
मांसाहाराचे फायदे असत्याल पन महागाईमुळे अंडि परवडना तित चि़कन आन मटन कुठन परवडायला...
8 Aug 2010 - 10:57 pm | sandeepn
आपन तर प्युअर वेज बुवा .....
पन मांसाहारी लोक शाकाहारी लोकांना काय घास फुस खाता असे म्हनता ते पटत नाही.
च्यायला तुम्ही लोक मांसाहारी आहे म्हनुन लै भारी झाले का रे ?
बाकी मांसाहारी असण्याला आपलाला काही अड्चन नाही.
तो ज्याचा प्रश्न आहे.
8 Aug 2010 - 10:59 pm | चिरोटा
सहमत आहे. आहार कोणताही असला तरी कसे आणि किती प्रमाणात त्याचे सेवन केले जाते याला महत्व आहे.बरेचसे विकार (भारतात) जडतात त्यामागे मसाले/मीठ/साखर ह्यांचा सिंहाचा वाटा असतो असे मला वाटते. मांसाहारात मीठ्/मसाल्याचे प्रमाण जास्त असावे.
---
8 Aug 2010 - 11:00 pm | अविनाशकुलकर्णी
हत्ती शाकाहारी असतो..तर सिंह मांसाहारी.....सिंह हत्तीला घाबरतो....यातुन बोध घ्यावा
8 Aug 2010 - 11:14 pm | Dhananjay Borgaonkar
हा युक्तीवाद चुकीचा आहे अस मला वाटत.
हरीण शाकाहारी आहे आणि सिंह मांसाहारी.
हरीण सिंहाला घाबरत.
9 Aug 2010 - 4:34 pm | पांथस्थ
काय पकडलय हरणाला :) लय भारी
16 Sep 2010 - 4:26 pm | संताजी धनाजी
सोडु नका अजिबात!
8 Aug 2010 - 11:07 pm | मृत्युन्जय
सगळेच लोक शाकाहारी झाले तर अन्नधान्याचा प्रश्न अजुनच बोकाळेल. त्यापेक्षा काही लोक मांसाहरी आहेत हेच उत्तम. शिवाय मांसंहारी लोकांची जगात कुठेही खाण्यापिण्याच्या बाबतित गैररसोय होणार नाही. प्रमाणात मांसाहार सुद्धा योग्यच की. शाकाहारातुन आवश्यक ती सर्व पोषणतत्वे मिळतात हे मान्य. पण मांसाहारात ती मिळत नाहीत असे थोडेच आहे? त्यातुनही आवश्यक ति प्रथिने मिळतातच. थोडक्यात काय जे आवडेल ते खावे (माणुस सोडुन. तो खायला बंदी आहे)
8 Aug 2010 - 11:51 pm | Pain
सगळेच लोक शाकाहारी झाले तर अन्नधान्याचा प्रश्न अजुनच बोकाळेल. त्यापेक्षा काही लोक मांसाहरी आहेत हेच उत्तम.
साफ चूक
मांसाहारी लोक जे मांस खातात, ते सर्व प्राणी शाकाहारी असून कित्येक टन शाकाहार केल्यानंतर ते कापण्याएवढे बनतात. त्यापेक्षा ते सर्व अन्नधान्य डायरेक्ट माणसांना देणे अधिक एफिशियंट आहे. मध्यंतरी अमुक एक किलो वजनाचा प्राणी वाढवायला त्याच्या वजनाच्या किती पट धान्य लागते हे वाचनात आले होते. आता तो आकडा आठवत नाही पण सारासार विवेक वापरला तरी पुरे.
9 Aug 2010 - 12:09 pm | मृत्युन्जय
जनावरांनी खाण्याचा गहू आणि माणसांनी खाण्याचा याच्यात फरक असतो म्हणे. खरे खोटे अमेरिकन सरकार जाणो.
आणि जनावरांनी धान्य खाऊ नये म्हणुन त्यांना जन्मल्याजन्मल्या मारणार की काय आणि? मारायचेच असेल तर चांगले खाऊ पिऊ घालुन मारा की. उपयोग तरी होइल. ;)
9 Aug 2010 - 11:59 am | llपुण्याचे पेशवेll
मृत्यूंजय यांच्याशी असहमत.
अहो सगळे शाकाहारी झालेतर दरवर्षी हजारो टन सडणारा गहू खाऊन संपेल. ;) शेतकर्यांना भाव वाढवून मिळेल धान्याचा. सगळे कसे गुडी गुडी होईल. त्यामुळे 'इट व्हेज फिल गुड'
-(अडवाणी )पेशवे
9 Aug 2010 - 12:00 pm | नितिन थत्ते
नाय बॉ. तो गहू आत्ताच लोकांना स्वस्तात देण्यास कोणी आडकाठी केली नाही. कदाचित भाववाढीलाही आळा बसू शकला असता.
9 Aug 2010 - 12:05 pm | मृत्युन्जय
अहो पण मग दारु कशापासुन बनवणार? गहू सडला कारण त्याच्या नशिबी दारुची सेवा लिहिली होती. खाणारे नसल्यामुळे गहू सडला असा गैरसमज झाला आहे की काय आपला?
9 Aug 2010 - 1:59 pm | सुहास..
सरसकट
8 Aug 2010 - 11:11 pm | बहुगुणी
उद्धृत केलेली बरीचशी "माहिती" ही इ-मेल मधून फॉरवर्ड केली जाते तशी, 'अशास्त्रीय' आहे. मी प्रत्येक मुद्द्याचा इथे पाठपुरावा करू शकणार नाही (इच्छा असली तरीही तेवढा वेळ नाही म्हणून), पण चुकीची माहिती देत असेल तर चांगल्या उद्देशाचा लेख दुर्लक्षित केला जाऊ शकतो. तो तसा जाऊ नये म्हणून एक
उदाहरण: Plants do not contain cholesterol हे खरं नाही; हे , आणि हे वाचा.
दोन विनंत्या:
१) तुमच्या लिखाणाचा उद्देश मराठी वाचकांपर्यंत एक महत्वाचा विषय घेऊन जाणं हा आहे असं समजतो, तेंव्हा शक्य असेल तेंव्हा कृपया मराठी वाक्यं वापरा,
२) शास्त्रीय मुद्दे असतील तर संदर्भ (scientific references) देणं नक्कीच आवश्यक आहे.
तळटीपः मी काही काळ मांसाहार करत असे, तो शास्त्रीय (आणि भावनिकही) कारणांसाठी बंद करून शाकाहाराकडे परतलो आहे, त्यामुळे तुम्ही 'शाकाहार आधिक बरा' असं मत मांडू इच्छित असाल तर मी त्याला पाठिंबा देईन, पण कारणमीमांसा शक्य तेवढी अचूक दिली तर(च) मुद्दे पटू शकतात असा अनुभव आहे म्हणून हा प्रतिक्रियेचा प्रपंच, समजूल घ्याल ही अपेक्षा.
8 Jun 2015 - 1:13 am | सामान्यनागरिक
माणसाचा आहार सभोवतालची परिस्थीती,पदार्थांची उपलब्धता,हवामान यावरही अवलंबुन असतो. अमुक एकच योग्य असे काही नाही.
8 Jun 2015 - 1:13 am | सामान्यनागरिक
माणसाचा आहार सभोवतालची परिस्थीती,पदार्थांची उपलब्धता,हवामान यावरही अवलंबुन असतो. अमुक एकच योग्य असे काही नाही.
8 Aug 2010 - 11:14 pm | शैलेन्द्र
चालुद्या.....
"हत्ती शाकाहारी असतो..तर सिंह मांसाहारी.....सिंह हत्तीला घाबरतो....यातुन बोध घ्यावा"
घेतला...
8 Aug 2010 - 11:16 pm | Dhananjay Borgaonkar
ज्याला जे आवडत ते त्याने खाव.
8 Aug 2010 - 11:52 pm | धनंजय
असाच काही लेख पूर्वी त्रिशतकी आजोबांनी लिहिला होता, त्याचा दुवा कोणी देऊ शकेल का?
9 Aug 2010 - 1:23 am | Nile
हीच का?
http://www.misalpav.com/node/2459
8 Aug 2010 - 11:59 pm | प्रियाली
लेख गंमतीदार असे धनंजय म्हणतात त्याच्याशी सहमत.
विषय तोच जुना. प्रतिसादही तसेच जुने तरी १०० प्रतिसाद जमतीलच.
9 Aug 2010 - 12:06 am | हुप्प्या
आम्ची कुलदेवता काळूबाई हाय. तिच्यासमोर चार पायाचा निवद द्यावा लागतु. तो दिल्यावर त्याची फुडची येवस्ता करन्याकरता आमी त्या बोकडाचं कालवन आनि भाकरी खातू. त्यो आमच्या देवीचा परसाद हाय. त्यो खान्यात कायसुदिक पाप न्हाय. परसाद खाल्लेल्या भक्तान्ना देवी वर्शभर सुखी ठेवती. झालंच तर म्हसुबा, खंडूबा, जरीआई, मरीआई, ज्योतिबा, अंबाबाई या समद्या देवास्नी असलाच निवद लागतू.
आमचे मुस्लिम भाई बकरी इदला ह्येच करत्यात. त्या दिसी कापलेलं जनावर थेट अल्लापर्यंत पोचतं आनि त्याची दुवा समद्या बंद्याना भेटते.
जर मास खाने वाईट असते तर देवाने तसे खाय्ला सांगितलं नस्तं.
तवा मांसाहार जिंदाबाद!
9 Aug 2010 - 8:57 am | प्यारे१
>>>झालंच तर म्हसुबा, खंडूबा, जरीआई, मरीआई, ज्योतिबा, अंबाबाई या समद्या देवास्नी असलाच निवद लागतू.
ए सुक्काळीच्या, कुनी दिली ही म्हायती.........???
*ड्या, म्हाईत नसलं तर बोल्तो कशाला बे........??? आम्च्या देवांची नावं घ्याचं काम न्हाय आदीच सांगतु. बाकी काय *शी करायची ती कर जा........
9 Aug 2010 - 12:16 pm | मृत्युन्जय
अंबाबाईला सामिष भोजन चालते म्हणे. फक्त हा नैवेद्य शाहु महाराजांचे खाजगी मंदीर आहे तिथे दाखवला जातो म्हणे. खरेखोटे अंबाबाई जाणे
9 Aug 2010 - 12:16 pm | मृत्युन्जय
अंबाबाईला सामिष भोजन चालते म्हणे. फक्त हा नैवेद्य शाहु महाराजांचे खाजगी मंदीर आहे तिथे दाखवला जातो म्हणे. खरेखोटे अंबाबाई जाणे
9 Aug 2010 - 12:44 pm | llपुण्याचे पेशवेll
भोसल्यांची कुलदेवता भवानी होती अंबाबाई नाही. म्हणून वाड्यावर कापला जाणारा बकरा भवानी साठी कापतात अंबाबाई साठी नाही असे ऐकले होते एका कोल्हापूरकर मित्राकडून. बाकी अधिक माहीती नाही.
9 Aug 2010 - 12:48 pm | नितिन थत्ते
सर्वदेवनमस्कार: केशवम् प्रतिगच्छति |
भवानी काय आणि अंबाबाई काय. औरंगजेबाने म्हटलेच आहे 'नावात काय आहे'.
9 Aug 2010 - 5:00 pm | पांथस्थ
=))
शेक्सपिअरः या अल्लाह हि तर माझी वचने आहेत...थत्तेसाब जनाब ये आपने क्या कर डाला
10 Aug 2010 - 2:23 pm | नितिन थत्ते
=))
बकरा नं. @@@
जर नावात काहीच नाहीये तर शेक्सपिअर म्हटले काय आणि औरंगजेब म्हटले काय !!!!
;)
9 Aug 2010 - 1:55 pm | इन्द्र्राज पवार
"वाड्यावर कापला जाणारा बकरा भवानी साठी कापतात"
खरंय. मी कोल्हापुरचा असल्याने भवानी मंडपात वर्षानुवर्षी चालत आलेली ही प्रथा मला माहित आहे (दसर्याच्या सुमारास... नवरात्री महोत्सव); एक दोनवेळा प्रत्यक्ष पाहिलीही आहे. अंबाबाईचे मंदिर मंडपापासून चारच पावलावर आहे. काही धार्मिक आचार आणि विचार तसेच या प्रथेविरुद्ध बोलणे कित्येकाना पसंत पडत नाही, पण तो प्रकार (बकर्याचे शीर एका घावात धडावेगळे करणे, आणि तेही सार्वजनिकरित्या, नंतर त्यातील रक्ताचा शिडकावा भवानीच्या देवळाच्या प्रथम पायरीवर करणे, इ.) बघवत नाही. असे मी बोलतो म्हणून समवयस्क मित्राकडून "च्यायला, कसला ह्यो आम्चा मराठा गडी !" असले शेलके टोमणेही खाल्ले आहेत. असो.
पु.पे.म्हणतात ती माहिती योग्य आहे. "अंबाबाई" ला असल नैवेद्य दिला जात नाही, पण "भवानी" ही दुर्गारुपातील छत्रपतींची देवता मानली जात असल्याने त्या घराण्यात "बळी" देण्याची प्रथा आहे. रोज एक दिवस याप्रमाणे नवरात्रीचे नऊ बळी ठरलेले असतात. त्या बकर्यांचे छोटे छोटे वाटे करून तो 'भवानी'चा प्रसाद म्हणून देवळाच्या सेवेत असलेल्या कामगारात वाटले जातात.
9 Aug 2010 - 12:08 am | जाई अस्सल कोल्हापुरी
कुठे तरी ऐकलेला विनोद आठ्वला.
रामभाऊ : काय तात्या शनिवारी कोंबडीचा बेत केला व्हय्?...आमचा उपास अस्तु नव्हं का!
शामराव : त्यात काय झालं..आमिबी उपासाला चालतिल अशा कोंबड्या तयार केला हायती.
रामभाउ: म्हंजी?
शामरावः आमी कोंबड्यांना जनम्ल्यापासून फकस्त साबुदाने आनि राजगिरा खाउनच वाढवल्या हाय्त. झाल्या का न्हाय उपासाच्या कोंबड्या?
:) ;) :) ;)
jokes apart!
पण कुठेतरी वाचल्याचे आठवते.माणसाच्या दातांची रचना शाकाहारासाठी आहे.कारण ते गाय म्हैस्..घोडा उंट यांच्या दातांसारखे आहेत आणि हे सारे प्राणी शाकाहारी आहेत.
वाघ ,सिंह्..किंवा इतर कोणताही मांसाहारी प्राणी घ्या.त्याच्या दातांची रचना पहा. मांस तोडण्यासाठी,फाडण्यासाठी आवश्यक असलेले टोकदार सुळे हेच आढळतील.
आपण कच्चे मांस खाऊ शकतो का? नाही. ते शिजवून मऊ करुन चावण्यायोग्य करुनच आपण खातो.
त्यामुळे मला हे पटते कि मानव हा शाकाहारी असावा.
(पण्..पण पणहे पटतं म्हणुन तंदूरी खायचे सोडावे असे मला कधी वाटले नाही.)
पण हा ज्याच्या त्याच्या आवडीचा भाग आहे.
9 Aug 2010 - 12:22 am | हुप्प्या
माणसाला सुळे आहेत. निव्वळ पटाशीचे दात नाहीत. पूर्ण शाकाहारी प्राणी, जसे गाय, म्हैस यांना सुळे नसतात. निव्वळ पटाशीचे दात असतात. तेव्हा माणूस मिश्राहारी आहे. पण ज्या प्रमाणात सुळे विकसित आहेत ते पहाता मानवाच्या आहारात शाकाहार जास्त प्रमाणात आहे.
दुसरा मुद्दा हा की दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे शाकाहारी समजायचे का? का?
वासराकरता बनलेले दूध माणसाने आपल्या रोजच्या वापराकरता घ्यायचे हे योग्य आहे का? गवळी त्याकरता वासराला उपाशी ठेवत असेल, त्याचे दूध तोडत असेल तर ते मांसाहाराइतकेच क्रूर नाही का?
9 Aug 2010 - 12:27 am | जाई अस्सल कोल्हापुरी
हु.भाऊ..
आपल्याला सुळ्याचेही दात आहेत हे पुर्ण विसरलेच होते...
आत्तापासुन मतपरिवर्तन : माणुस हा मिश्राहारी असावा.
धन्यवाद...!
9 Aug 2010 - 12:38 am | राजेश घासकडवी
या बहुगुणींच्या मताशी सहमत. 'माझ्या मते मांसाहारी व्यक्ती हिंसेला लवकर प्रवृत्त होऊ शकेल.' असं स्वतःचं मत मांडून वर हे शास्त्रीय सत्य आहे हे कुठल्या आधारावर म्हटलेलं आहे?
माणसाच्या शरीररचनेवरून शाकाहार की मांसाहार ठरवणाऱ्यांशी असहमत. शरीररचना बघायची तर निव्वळ दात वा आतडं का बघावं? हत्यारं बनवू शकणारी बोटांची रचना, क्लुप्तिने प्राण्यांना मारू शकणारा, व मांस शिजवून खाण्याचं तंत्रज्ञान विकसित करणारा मेंदू - या सर्व त्याच शरीररचनेचा भाग आहेत.
क्षुल्लक उदाहरणं दाखवून शाकाहार चांगला की मांसाहार चांगला हे म्हणणाऱ्यांशी असहमत. आता भारतात मोठ्या प्रमाणावर शाकाहार होतो, अमेरिकेत मांसाहार अधिक प्रमाणात होतो. मग ऑलिंपिकच्या गोल्ड मेडल्सवरून शाकाहार किती वाईट हे ठरेलच का? असल्या उदाहरणांना आहारापलिकडे अनेक कारणं असतात.
चर्चा व्हावी तर योग्य की अयोग्य या काळ्यापांढऱ्या विचाराऐवजी मांसाहार कितपत केला तर उपयुक्त, किती केला तर अतिरेक; शाकाहाराचे फायदे काय; व मांसातून जी प्रथिनं वगैरे मिळतात तीच शाकाहारातून मिळवण्यासाठी काय पदार्थ अधिक खावेत - या विषयांवर व्हावी. नाहीतर पॉपकॉर्न घेऊन झाडावर बसून करमणुक होण्यापलिकडे निष्पन्न काही होणार नाही.
9 Aug 2010 - 1:38 am | हुप्प्या
माणसाची विचारशक्ती अफाट आहे. बुद्धी अफाट आहे. त्याने अनेक शोध लावले आहेत. त्यामुळे त्याची नैसर्गिक प्रवृत्ती काय हे कधीकधी चटकन कळत नाही. कित्येकदा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. उदा. आज धान्य, दूध, मांस अफाट प्रमाणात बनते. वाहतूकीतील प्रगतीमुळे, वातानुकुलन माहित असल्यामुळे दूरदेशातील अन्न आपल्याला मिळू शकते. ही क्रांती काही शतकात झाली आहे. मात्र मानवी शरीर हे लाखो वर्षे उत्क्रांत होत आहे. ही प्रक्रिया अत्यंत हळू आहे.
केवळ वैज्ञानिक प्रगतीमुळे अफाट अन्न बनवू शकलो तरी शरीराला ते पचवायची सवय नाही. केवळ गेली काही शतके आपण ह्या समृद्धीच्या सान्निध्यात आलो असलो तरी त्याहून कितीतरी जास्त वेळ मानवी जात ही अविकसित होती. आणि शरीराची रचना अजूनही त्या परिस्थितीकरताच योग्य आहे. उदा. मानव हा मुळात निशाचर नाही. दृष्टी, गंध, श्रवण ही इंद्रिये दिवसा वावरण्याकरताच योग्य आहेत. केवळ वीज, विजेर्या, दिवे, नाईट व्हिजन गॉगल वगैरे शोधले म्हणून मानव नैसर्गिक निशाचर बनणार नाही. बहुसंख्य मानव हे रात्रीच झोपणार आणि दिवसा नित्य व्यवहार करणार.
त्यामुळे शरीराच्या मर्यादा लक्षात घेऊन आहार ठरवला पाहिजे. साखरेचे अफाट उत्पादन झाले म्हणून लगेच मानवी शरीराचे स्वादुपिंड प्रचंड प्रमाणात साखर पचवू शकत नाही. मानवाने विचारपूर्वक साखरेचे आहारातील प्रमाण नियंत्रणात ठेवावे. तसेच मांसाहाराचे आहे. अजून एक मुद्द म्हणजे विविध भागातील वंश हे वेगळ्या आहारावर वाढले आहेत. सगळ्यांची शरीराची शक्ती सारखी नसते. त्यामुळे कुणी किती मांसाहार करावा हे ठरवताना आपण मुळात कुठले आहोत हेही विचारात घ्यावे.
9 Aug 2010 - 2:43 am | राजेश घासकडवी
काही बंधनं मानवी शरीररचनेमुळे पडतात हे आपल्या निशाचरपणाच्या उदाहरणावरून स्पष्ट होतं. नैसर्गिक बंधनं, मर्यादा लक्षात घेऊन त्यानुसार खाणं हा चांगला विचार आहे. शेवटी योग्य समतोल साधण्यासाठी मुळात गरजा काय आहेत हे पाहाणं रास्त.
मात्र कधी कधी नैसर्गिक प्रवृत्ती हा शब्द खूप ढिसाळपणे वापरला जातो. नैसर्गिक प्रवृत्ती शोधण्यात काहीतरी 'ठेविले अनंते तैसेचि राहावे' अशा विचारसरणीचा वास येतो. त्यातून मग मांसाहार मानवासाठी नैसर्गिक की शाकाहार नैसर्गिक असले पाया नसलेले वाद सुरू होतात. कच्चं मांस खूप खाण्यासाठी मानवी शरीर आदर्श नसेल. पण कच्च्याऐवजी शिजवलेलं मांस असताना ती चर्चा अर्थहीन होते.
9 Aug 2010 - 12:38 am | जाई अस्सल कोल्हापुरी
हं.. ही पटले... चर्चेचा रोख बदलावा..असे नाही का वाटत?
8 Jun 2015 - 1:17 am | सामान्यनागरिक
वाद नाही जमला की चर्चेचा रोख बदला...
वा रे वा !
9 Aug 2010 - 1:24 am | प्रियाली
आधी शाकाहारी आणि मांसाहारी हे एकमेकांच्या विरुद्ध का असावेत? समान संधीसाठी जेव्हा स्पर्धा निर्माण होते तेव्हा माणूस एकमेकाला विरोध करू लागतो पण इथे तर खाद्य असमान आहे म्हणजे शाकाहारी वि. मांसाहारी ही स्पर्धा माणूस, त्याची पचनशक्ती आणि आहार याबाबत नसून शाकाहारी श्रेष्ठ की मांसाहारी श्रेष्ठ याबाबत आहे.
चर्चेत एक एक गंमतीशीर मते आहेत.
म्हणजे तो गवतपाल्याचा शाकाहार माणूस करत होता का? माणसाने शाकाहाराच्या नावाखाली वीड, डँडेलायन, काँग्रेस गवत खायला सुरुवात करावी. माझ्या फ्रंट आणि बॅकयार्डातले वीड मारण्यापेक्षा मी ते फार्मर्स मार्केटमध्ये विकायला बसेन. माणूस शाकाहार करतो म्हणजे उपलब्ध असलेली सर्व भाजी-पाला खातो असे नव्हे.
मग बिघडले कुठे? माणसाचे मूल सुमारे वर्षभरापर्यंत चालत नाही त्याला बाबागाडीत घालायला माणूस सक्षम आहे. काही माणसांना नीट दिसत नाही. ते चष्मा लावून नीट पाहू शकतात. काहींना ऐकू येत नाही ते श्रवणयंत्र लावतात. त्याचप्रमाणे एखादे अन्न माणूस पचवू शकत नाही ते तो मऊ करून शिजवून खातो आणि यात मांसाहार आणि शाकाहार दोन्हींचा समावेश आहे. कच्चे मासे, अंडी खाणारे लोकही जगात आहेतच.
माणसाला सुळे असतात तसे सुळे हत्तीलाही असतात पण हत्ती तर शाकाहारी आहे. आता त्याचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे पण त्याला सुळे आहेत. ;)
गलेलट्ठपणा हा शाकाहार किंवा मांसाहाराचा प्रश्न नसून आवश्यकतेपेक्षा जास्त खाणे, ते खाण्याची संधी उपलब्ध असणे, ते खाण्यासाठी उद्युक्त करणारी मार्केटींग-मॅन्युफॅक्चरींग व्यवस्था असणे हे आहे. थोडे थांबा! भारतात पेव फुटलेल्या मॉलसंस्कृती सोबत जाडेपणाही येईलच.
एकंदरीत चर्चा आणि त्यातले प्रतिसाद गंमतीशीर आहेत यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब.
9 Aug 2010 - 3:23 am | हुप्प्या
>>
माणसाला सुळे असतात तसे सुळे हत्तीलाही असतात पण हत्ती तर शाकाहारी आहे. आता त्याचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे पण त्याला सुळे आहेत
<<
हत्तीच्या दाताला सुळे म्हणणे आणि कुत्र्याच्या आणि माणसाच्या तोंडातील टोकदार दातांनाही सुळे म्हणणे हे मराठीच्या मर्यादित शब्दसंपदेमुळे होते. इंग्रजीत ह्या दोन्ही प्रकारांना अगदी वेगळे शब्द आहेत. टस्क म्हणजे हत्तीचे सुळे आणि कॅनाईन्स किंवा फँग्ज म्हणजे तोंडातील सुळे. विनोदाचा भाग सोडला तरी हत्तीचे दिसणारे सुळे आणि तोंडातले टोकदार सुळे ह्यांचे कार्य फारच वेगळे आहे. त्यांची उत्क्रांतीही फार वेगळ्या प्रकारे झाली आहे त्यामुळे त्यांची तुलना होत नाही असे मला वाटते.
(तीच गोष्ट प्राण्यंच्या शरीरावरील केसांची आणि डोक्यावरील केसांची. मराठीत दोन्हीला केस म्हणतात. इंग्रजीत डोक्यावरील केसांना हेअर म्हणतात तर शरीरावरील केसाला फर म्हणतात.
मांजराच्या वा वाघसिंहांच्या मिशांना व्हिस्कर्स आणि माणसांच्या मिशांना मूस्टॅश. मराठीत मात्र दोन्हीकरता मिशाच. अगदी झुरळाच्या अँटेनाही मराठीत मिशाच! खरेतर हे सगळे अगदी वेगवेगळे अवयव आहेत. ).
गवत वगैरे प्रकार माणूस खात नाही. पण किलोभर मांस बनवायला जितकी नैसर्गिक संसाधने वापरली त्यापेक्षा कितीतरी कमी संसाधने वापरून किलोभर डाळ किंवा किलोभर गहू बनतात.
अगदी कॅलरीजच्या हिशेबात बघितले तरी अमूक एक कॅलरीज् मिळतील इतके मांस बनवायला जितका खर्च येतो त्यापेक्षा कमी खर्चात तितकयाच कॅलरिज मिळवून देणारे वनस्पतीजन्य उत्पादन बनते (धान्य, डाळ वा भाजी). हे खरे आहे. पण तरी शरीराला काय आवश्यक आहे तेही बघितले पाहिजे.
10 Aug 2010 - 12:46 pm | राजेश घासकडवी
तुमच्या राज्यात वीड वाढवायलाच नव्हे तर ते उघड उघड फार्मर्स मार्केटमध्ये विकायची परवानगी आहे? हम्म्म्म... आता काही गोष्टींचा उलगडा होतोयसं वाटतंय.
टारझन खायचा. अर्थात ती काल्पनिक व्यक्तिरेखा होती. पण मी स्वतः केवळ लिंबाच्या रसात 'शिजवलेले' (उष्णता न देता, केवळ मुरवलेले - त्यामुळे शिजल्यासारखे झालेले) मासे खाल्लेले आहेत. खूप वेळा कच्चे मासेही खाल्लेले आहेत. साल्मन काय लागतो... अहाहा.
मला एक प्रश्न पडतो. शाकाहारी लोक सर्व भाज्या कच्च्या का खात नाहीत?
10 Aug 2010 - 4:56 pm | प्रियाली
आम्ही बापडे कोण वाढवणार. ते आम्हाला न जुमानता वाढतं. वीडचा चुकीचा अर्थ घेताय का? डँडेलायन वगैरे खाणारे लोक आहेत असे ऐकते. तसे विकताना पाहिलेले नाही पण आता मांसाहार सोडून सर्वांनी शाकाहार केला तर वीड खावे लागेल अशी आपली माझी समजूत.
कच्चे मासे, अंडी खाणारे लोकही जगात आहेतच असे वर म्हटले आहेच.
वाट्टेल ते प्रश्न विचारू नका बॉ! ;) उद्या विचाराल, शाकाहारी लोक वड, पिंपळ, आंब्याची पाने वगैरेंची भाजी का नाही करत?
10 Aug 2010 - 6:27 pm | पंगा
साल्मन???
मॅकरेल!!! (म्हणजे बांगडाच ना? जाऊदे... xxची भटे आम्ही, काही माहीत नसते ते नसते पण तरीही सगळे महाग करून ठेवतो झाले.)
बाय द वे, कच्चे खाणे हे सैपाकात रस नसण्याचे लक्षण असावे काय?
टार्या काल्पनिक???
9 Aug 2010 - 5:24 am | पंगा
Utterly irrelevant. मध्यंतरीच्या काळात (नक्की कधी ते माहीत नाही, पण) कधीतरी टोळ्यांनी शिकारही करून खाऊ लागला असे वाटते. नंतर जे काही लोक (पुन्हा) शाकाहारी झाले, ते (उत्क्रांतिपूर्व) पूर्वजांच्या प्रथांकडे परतावे ("Getting back to one's roots") म्हणून झाले, असे वाटत नाही.
(पूर्वजांच्या प्रथांकडेच जर परतायचे झाले, तर आदिमानव उत्क्रांत होत असताना बहुधा वल्कले, झाडांच्या साली वगैरे घालून हिंडत असावा. पण त्याही अगोदर, उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या काळात, द्विपाद व वानरसदृश असताना काही काळ तो वानरांप्रमाणे विवस्त्रही भटकत असावा. या सर्वात आदिम प्रथेकडे परतण्यास व्यक्तिशः माझी काही हरकत नाही; पण रस्त्यातून हिंडताना मी तिचे पालन करू लागल्यास आपल्याला आणि/किंवा समाजाला ते चालेल काय?)
याबद्दल साशंक आहे, पण again, utterly irrelevant. आपलाच पुढील दावा उचलायचा झाल्यास मनुष्य निसर्गतः झाडावर राहणारा आहे. पण म्हणून त्याने झाडावर राहिलेच पाहिजे किंवा झाडावरच राहिले पाहिजे, असे मी तरी म्हणणार नाही.
(तसेही, पुरुष आदिमानवाच्या, आपल्याला आवडलेल्या स्त्रीच्या टाळक्यात बडगा - clubचे सुयोग्य मराठी भाषांतर आयत्या वेळी सुचले नाही - घालण्याच्या प्रणयाराधनाच्या प्रथेसही हाच न्याय लावता यावा काय? या प्रथेमागील instinctही आदिमानवात नैसर्गिक असावा. या कारणास्तव याही प्रथेचे पुनरुज्जीवन करावे काय?)
सहमत.
शाकाहाराचा सोवळ्याशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध (मांसाहारी पदार्थ शिजवलेली भांडीसुद्धा न चालणे वगैरे) काही (परंतु सर्वच नव्हे) शाकाहारींमध्ये जितक्या प्रमाणात पाळला जातो, आणि मांसाहार म्हणजे काहीतरी "घाण" ही कल्पना काही (पण सर्वच नव्हे) शाकाहारींमध्ये जितक्या प्रमाणात आढळते, तितक्या प्रमाणात (हिंदू शाकाहारी समाजातील) शाकाहारी कल्पनेचे मूळ (पण चालू आचारांबद्दल हे निश्चितपणे म्हणता येईलच, असे नाही.) हे सोवळ्याओवळ्याच्या, उच्चनीचतेच्या, कदाचित अस्पृश्यतेच्याही कल्पनेशी निगडित असणे हे अशक्य नाही. परंतु अशा प्रकारची संकल्पना जोपर्यंत या समीकरणात येत नाही, तोपर्यंत एक व्यक्तिगत निवड म्हणून शाकाहारात काहीच गैर नसावे. (अशा प्रकारच्या संकल्पना सर्वच शाकाहारींच्या बाबतीत - विशेषतः आजच्या जमान्यात - येत असाव्यात असे वाटत नाही. आज अनेक शाकाहारी हे निव्वळ परंपरेने किंवा सवयीने शाकाहारी असू शकतात, किंवा शाकाहार हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय असू शकतो. यात मांसाहारींबद्दल किंवा मांसाहाराबद्दल तिटकारा ही भावना असतेच, असे म्हणता येणार नाही. तसेच काहीजण हे पूर्णतया शाकाहारी नसले, तरी शक्य तोवर मांसाहार टाळण्याकडे त्यांचा कल असू शकतो. यात मला काही गैर दिसत नाही.)
बाकी उच्चनीचत्वाच्या, श्रेष्ठत्वाच्या भावनांबद्दल बोलायचे झाले, तर त्या दोन्ही बाजूंनी दिसू शकतात. स्वतःला श्रेष्ठ समजण्यासाठी दुसर्याला हीन लेखणे (आणि त्यासाठी काय वाटेल ते कारण वापरणे) ही बहुधा सर्वसाधारण मानवी प्रवृत्ती असावी. मांसाहारींकडून शाकाहारींना हिणवले जाण्याचे प्रकार (संबंधित शाकाहारी व्यक्तीने काहीही खोडी काढलेली नसली तरी) होत नाहीत असे वाटत नाही.
हे विधान तर्कास धरून वाटत नाही. आहाराचा आणि हिंसाप्रवृत्तीचा काहीही संबंध नसावा. ओढूनताणून लावायचाच झाला, तर उलट्या बाजूने, (शिकार करून मांसाहार करणार्या) मांसाहारी व्यक्तीची हिंसाप्रवृत्ती ही खाण्यासाठी हिंसा केल्याने अगोदरच तृप्त झालेली असल्यामुळे, त्यामुळे तो विनाकारण विनाफायदा अधिक हिंसा करण्यास प्रवृत्त होणार नाही, तर शाकाहारी मनुष्याची हिंसाप्रवृत्ती ही अशा रीतीने तृप्त झालेली नसल्याने, किंबहुना दबलेली असल्याने, कधीही उफाळून येऊ शकते, असाही दावा करता येईल. अर्थात, अशा दाव्यांना काहीही अर्थ नाही.
नक्की खात्री नाही, पण फ्लोरा फाउंटनसमोरील निदर्शनांवर गोळीबार करण्याचा आदेश देणारे मोरारजीभाई हे शाकाहारी होते, असे वाटते.
चातुर्वर्ण्याचा (विशेषतः त्यातील स्तराच्या उच्चनीचतेच्या संकल्पनेचा) आणि आहाराचा अर्थाअर्थी काही संबंध असावा असे वाटत नाही. असलाच, तर तो नंतरच्या काळात आला असावा आणि अतिशय मर्यादित प्रमाणात लागू असावा, असे वाटते. चातुर्वर्ण्याच्या सुरुवातीच्या काळात ब्राह्मण शाकाहारी नसत (अगदी गोमांसभक्षकसुद्धा असत), असे ऐकलेले आहे. म्हणजेच, बहुतांश ब्राह्मण पोटजातींमधील आज (किंवा कालपरवापर्यंत) दिसणारी शाकाहाराची परंपरा ही नंतरची घडामोड असावी. (कारणे काहीही असू शकतील. मला कल्पना नाही.) तसेच, अनेक वैश्य जातींमध्येही आज शाकाहाराची परंपरा असते. याचा अर्थ, चातुर्वर्ण्याच्या उतरंडीमध्ये शाकाहारी ब्राह्मण हे शाकाहारी वैश्यांना आपल्या बरोबरीचे समजत किंवा शाकाहारी वैश्यांचे उतरंडीतले स्थान हे (बहुतांशी) मांसाहारी क्षत्रियांच्या स्थानापेक्षा वरचढ असे, असा जर कोणी काढला, तर तो विपर्यास ठरावा.
थोडक्यात, ज्या कोणत्याही एका गटाला स्वतःला दुसर्या कोणत्याही एका गटापेक्षा श्रेष्ठ मानण्याची प्रस्थापित समाजरचनेत टाप असे, तो गट संबंधित दुसर्या गटापेक्षा स्वतःस वरचढ समजे (शाकाहार ऑर नो शाकाहार), असे वाटते. (चूभूद्याघ्या.)
अतिसेवन कशाचेच फायदेशीर नसावे. यात मांसाहाराला वेगळे काढण्याचे प्रयोजन कळत नाही.
सदा साखरेचेच खाणार त्याला देव मधुमेहच देणार.
हे खरे असल्यास (आणि बहुधा असावेही) ते 'शाकाहार वाईट नाही' याचे समर्थन होऊ शकेल. (त्याला काहीच आक्षेप नाही.) पण 'मांसाहार टाळावा' किंवा 'शाकाहारच करावा' याचे हे समर्थन होऊ शकत नाही.
संतृप्त मेदांचा (saturated fats) मुद्दा पटण्यासारखा आहे, पण प्रमाणातील मांसाहाराने फारसा फरक पडावा असे वाटत नाही. तसेही भारतीय पद्धतीच्या शाकाहारात दूध, दही, लोणी, तूप चालते. यात संतृप्त मेद आलेच. दूध, दही मेदविरहित खाणे शक्य आहे, पण भारतात हे कितीसे जण करतात / किती जणांना शक्य किंवा उपलब्ध आहे याबद्दल साशंक आहे. लोणी, तूप मेदविरहित करणे शक्य नसावे. भारतात पूर्ण व्हेगन पद्धत रुजेल काय? किती शाकाहारी भारतीयसुद्धा ही पद्धत स्वीकारतील? आणि व्हेगन होऊनसुद्धा जर डालडा वापरला, तर पुन्हा संपृक्त मेद आलेच ना?
Plants do not contain cholesterol हे जरी खरे असले, तरी it is ultimately not so much the cholesterol that you eat but the cholesterol that your body produces that matters, as far as blood cholesterol levels and heart disease are concerned. यात अनेक घटक येऊ शकतात. Heredity / Geneticsचा एक मोठा भाग असतो. आहारातील संपृक्त मेदांचे प्रमाण हाही एक घटक असतो. शरीराचे वजन हाही एक घटक असू शकतो. Sedentary lifestyle असल्यास त्याने काही प्रमाणात फरक पडावा. मधुमेहासारखे आजार असल्यास त्यानेही फरक पडावा. आणि if I am not very much mistaken, it is also intricately related to your levels of carbohydrate consumption and the levels of insulin secreted into your bloodstream thereby. (Or is it the level of fat deposits, and thereby obesity, that I am thinking about, which have a correlation with levels of carbohydrate intake? In any case, that could ultimately contribute towards cholesterol-related issues as well, or so do I suppose.) त्यात पुन्हा carbohydratesमध्येसुद्धा complex carbohydrates आणि fibersचे प्रमाण जास्त असल्यास धोका कमी, वगैरे वगैरे.
थोडक्यात, शाकाहार ही (त्यातील भारतीय शाकाहारातल्या दूधदुभत्याच्या पदार्थांना वगळल्यास इतर पदार्थांत कोलेस्टेरॉल नसले, तरीही) कोलेस्टेरॉलचा त्रास न होण्याची ग्यारंटी नव्हे.
As far as I have observed, a meat diet is usually supplemented with some form of food containing carbohydrates, be it bread, potatoes or rice.
"शुद्ध मांसाहार" करताना आजवर कोणाला बघितलेले नाही. "बाजूच्या पदार्थां"मधून जीवनसत्त्वे मिळवणे हे नेहमीच शक्य असते.
And, pray, where do the agricultural chemicals in the food chain originate from? Plant foods, which are treated with these, I suppose?
ठीक. एकएक बघू.
याला टाळण्याकरिता कॅल्शियम कोठून मिळवाल? दुग्धजन्य आहारातून? म्हणजेच प्राणिजन्य आहार; "शुद्ध शाकाहार" (व्हेगनिझम) नव्हे?
हे शाकाहारींना होत नसावेत असे वाटत नाही. पण अधिक माहितीअभावी पास.
Levels of carbohydrate intake is a key factor. (Others could be heredity, obesity and so on.) Carbohydrates are essentially of plant origin.
अधिक माहितीअभावी पास.
याचा मांसाहारापेक्षा मेदाशी संबंध असावा काय? तेलातून मेद येऊ शकावेत.
नुसते बटाटे आणि साबूदाणे खाऊन लठ्ठ होणे शक्य आहे. सबब, अमान्य.
Not sure why a meat diet should affect the condition of intestinal flora.
साशंक. पण अधिक माहितीअभावी पास.
Define "wholesome foods". तरीही, पचनाचा वेळ (काही तास. काही दिवस किंवा काही महिने नव्हेत.) लक्षात घेता कितपत फरक पडेल याबाबत साशंक.
"शुद्ध मांसाहार" करताना आजवर कोणाला बघितलेले नाही. "बाजूच्या पदार्थां"मधून fiber मिळवणे हे नेहमीच शक्य असते.
हा processed foods चा किंवा घाऊक भावात तयार विकल्या जाणार्या पदार्थांचा दोष असू शकतो; मांसाहाराचा नव्हे. हे असे झालेच पाहिजे असे नसावे. (महाराष्ट्रातला एक प्रथितयश पापड कोठे आणि कसा बनतो, हे पाहिलेले आहे काय? मी पाहिलेले नाही, पण जे काही ऐकलेले आहे - खरेखोटे देव जाणे - ते फारसे उत्साहवर्धक नाही. असो.)
थोडक्यात, मुद्दे पटले नाहीत.
सारांश, कोणीही हवी ती, पटेल ती आहारपद्धती आचरावी. इतरांच्या आहारपद्धतींपेक्षा आपलीच आहारपद्धती कशी चांगली, याचा विचार करू नये. ते दुसर्यावर ठसवूही नये. आणि ते ठसवण्याकरिता चित्रविचित्र क्लृप्त्या लढवू नयेत. दुसर्याच्या वैयक्तिक आहारपद्धतीवरून / पारंपरिक सामाजिक आहारपद्धतीवरून दुसर्याला हिणवू नये. बाकी, हवे ते खावे, हवे ते प्यावे आणि सर्वांनी सुखी रहावे.
9 Aug 2010 - 2:02 am | पुष्करिणी
माझ्यामते शरीराचा, वातावरणाचा, उपलब्धतेचा आणि आवडीचा समतोल साधला जाइल असा आहार असावा.
इंडस्ट्रीअल स्केल वर मांसाहारासाठी वापरल्या जाणार्या प्राण्यांच उत्पादन करण्यासाठी जंगलं साफ करावी लागत असावीत; पण शाकाहारींसाठी शेतजमिन तयार करण्यासाठीही असंच कराव लागत असेल. १ एकर कुरणात चरणार्या शेळ्या / मेंढ्या / गायी आणि १ एकरात उत्पन्न होणारा गहू/तांदूळ्/मका किती लोकांना पुरेसा होइल याचा तुलनात्मक विदा मला माहित नाही.
१८% ग्रीन हाउस गॅस हा ह्या पशूंची करामत आहे असं कुठसं वाचल होतं. या पशूंना कमीत कमी वेळात गलेलठ्ठ करण्यासाठी बर्याच घातक गोष्टींचा वापर केला जातो ( अर्थातच धान्य पिकवण्यासाठीही किटकनाशकं, खतं यांचाही बेसुमार वापर होतो ).
सध्या इकडे क्लोन केलेल्या गायींचं दूध बाजारात आहे आणि नुकतीच बातमी फुटल्यामुळे त्यासंबंधात बरीच गरम चर्चा सुरू आहे.
मला स्वतःला भावनात्मक दॄष्ट्या म्हणायच झालं तर मांसाहारापेक्षा दुग्धजन्य पदार्थ खाणं जास्त क्रूर वाटतं, Veal हा त्यादृष्टीनं मोठा भावनिक प्रश्न आहे .
9 Aug 2010 - 2:27 am | गणपा
किती वेळा या विषयावर चर्वण करणार कळत नाही.
तेच तेच मुद्दे दोन्ही पक्षां कडुन मांडले जातात.
तर तिसरी फळी दोन्ही बाजुने मत मांडणारी.
उगाच आपली मतं एक-दुसर्यावर थोपवण्याचा अट्टाहास का?
साधी गोष्ट आहे.
ज्याला जे पचत/उपलब्ध आहे ते त्यानं खाव. (आता एस्किमो रोज कुठुन भाजी-पाला आणेल?)
जे काही खायचय ते प्रमाणात खा. स्वस्थ रहा. शेवटी अती तेथे माती.
9 Aug 2010 - 4:00 am | धनंजय
ही चौथी फळी (खा पण त्याबद्दल एकमेकांचे मतपरिवर्तन करू नका!) सुद्धा नेहमीचीच बरे का...
ह. घ्या. हे. सां. न. ल.
लेखाच्या निमित्ताने आज मी शुद्ध शाकाहार करणार आहे. फ्रीजमध्ये शाकाहार सोडून आज काहीही नाही, हे तपासून बघूनच इतके छातीठोकपणे सांगतो आहे.
बाकी फळ्या मोजणारी ही माझी फळी क्र. ५ सुद्धा नेहमीचीच हे. सां. न. ल.
9 Aug 2010 - 1:08 pm | Nile
ह्या सगळ्या फळ्यांच्यावर जाउन बसलेली आमची ७ वी (झाडावरची) फळी. ;-) (ह्या वाक्यातील चुक दाखवणारी ६ वी (-; )
9 Aug 2010 - 4:18 am | सुनील
एका हातात पॉपकॉर्न आणि दुसर्या हातात विन्ग्स घेऊन झाडावर.....
चालू द्या....
बाकी पंगा यांचा मुद्देसूद समाचार आवडला.
सुनील मिश्रा(हारी)
9 Aug 2010 - 8:18 am | नितिन थत्ते
माणसाची शरीररचना शाकाहारी प्राण्याप्रमाणे आहे हे खरे.
मला वाटते "आपण मांसाहारही करू शकतो" हा शोध मानव समूहांना कोणत्यातरी काळी लागला असावा. या शोधामुळे माणसाचे सर्व्हायव्हल सुकर झाले असावे आणि तो बर्याच अडचणींतून टिकून राहिला असावा.
दुष्काळ वगैरे आपत्तीत मांसाहारी प्राणी अधिक काळ जिवंत राहण्याची शक्यता असते. शाकाहारी प्राण्याला अन्नाची कमतरता आधी होणार. शाकाहारी प्राण्यांची उपासमार होऊन त्यांची संख्या कमी झाल्यावर मांसाहारी प्राण्यांना टंचाई जाणवणार.
वर कोणीतरी आपण कच्चे मांस खाऊ शकत नाही असे लिहिले आहे. पण तसे आपण शाकाहारी अन्नही कच्चे खाऊ शकत नाही. शाकाहारी अन्नातले जे कच्चे खाऊ शकतो- फळे आणि कंदमुळे- ती एवढ्या मोठ्या प्रमाणात पिकू शकत नाहीत. शेती म्हणून जे उत्पादन होते ते आपन कच्चे खाऊ शकत नाही.
9 Aug 2010 - 8:33 am | गंगाधर मुटे
मांसाहार जिंदाबाद ...!!
सोने गं सोने, रांधल्या का तुने
बेडूकाच्या खुला
खेकड्याची आमटी
अन गांडूळाच्या शेवया...!!
गोचीडाची खिचडी
टमगिर्याचं भरीतं
डासाचा अर्क घे
घुबडाच्या तर्रीतं
जरासा सुरवंट, थोडेसे ढेकून
घे पुरणात भराया .....!!
गोमाश्याचा लाडू कर
त्याला सरड्याचा रंग दे
ऊंवा-टोळ पिळूनी
सापा-विंचवाचा पाक घे
उंदराची चटणी, पालीची सलाद
घे तोंडास लावाया ....!!
कोंबडी नी बकरी
निरुपद्रवी जनावर
तुझ्या जीभेचे चोचले
उठती त्यांच्या जीवावर
गरीबाला सूळी, शत्रूला अभय
का करीशी अन्याया?....!!
गंगाधर मुटे
............................................
माझा मुख्य मुद्दा असा की पृथ्वीवरील सर्वात बुद्धीमान/शक्तीमान मनुष्यप्राणी असा का वागतो?
नेमका दुर्बळाच्या/सात्विकाच्या जीवावरच का उठतो?
पुर्वीच्या काळातही शिकार करणारेही नेमके हरिणाच्याच मागे लागायचे. का? तो निरुपद्रवी आणि स्वभावाने गरीब म्हणुनच ना? वाघसिंहावर मर्दुमकी गाजवायची इच्छाशक्ती मानवात नाहीच असा अर्थ घ्यायचा का?
http://gangadharmutespoem.blogspot.com/2010/05/blog-post_25.html
9 Aug 2010 - 7:04 pm | स्वप्निल..
>>पुर्वीच्या काळातही शिकार करणारेही नेमके हरिणाच्याच मागे लागायचे. का? तो निरुपद्रवी आणि स्वभावाने गरीब म्हणुनच ना?
हे हरणांच्या संखेवर ठरत असेल अस वाटते
>>वाघसिंहावर मर्दुमकी गाजवायची इच्छाशक्ती मानवात नाहीच असा अर्थ घ्यायचा का?
हे हास्यास्पद आहे .. असं जर असतं तर वाघसिंहाना वाचवायची आज वेळच आली नसती .. भलेही त्यांची शिकार खाण्यासाठी होत नसेल
बाकी या धाग्याच्या विषयाबद्दल आम्ही नायल्यासोबत :)
9 Aug 2010 - 8:47 am | देवदत्त
सध्या तरी एकच प्रश्नः
मांसाहार करणार्यांना होणार्या व्याधींची यादी दिलीत ती फक्त शाकाहार करणार्यांना होतच नाही का?
9 Aug 2010 - 10:11 am | वेताळ
माणूस निसर्गत: शाकाहारीच आहे,
मानवाच्या सुरुवातीच्या उत्क्रांतीच्या काळात तो द्विपाद व वानरसदृश असताना झाडावर राहणारा व मुख्यत: झाडांची पाने व फळे खाणारा होता. माझ्या मते भूतदयेचा संबंध मांसाहाराशी जोडणे चुकीचे ठरेल
आपण हे संशोधन कधी केले आहे?
मग शेकडो वर्षापासुन माकडे अजुन माकडेच का राहिली?
9 Aug 2010 - 11:41 am | अविनाशकुलकर्णी
हा युक्तीवाद चुकीचा आहे अस मला वाटत.
हरीण शाकाहारी आहे आणि सिंह मांसाहारी.
हरीण सिंहाला घाबरत.......
हरीण शाकाहारी आहे ..मांजर मांसाहारी आहे..
मांजर हरिणाला घाबरते.
9 Aug 2010 - 2:25 pm | चिरोटा
लादेनांचा ओसामा काय खातो?त्यालापण अनेक जण घाबरतात्.ओबामांच्या बराकचा खुराक काय? त्यालाही अनेक देश घाबरतात.
--
9 Aug 2010 - 12:42 pm | भारतीय
ज्याला जे खायचयं तो ते खाईल.. लेखिकेचा या धाग्यामागील उद्देश कळला नाही.. त्यांना मिपाकरांची फक्त मते तपासायची आहेत का? कि शाकाहार किंवा मांसाहाराचा प्रचार करायचा आहे? कि फक्त दिली काडी पेटवून, बसा लढत! असे काहीसे आहे का? कि हा फक्त माहीतीपट आहे?
9 Aug 2010 - 2:10 pm | मितभाषी
खाण्यायोग्य प्राणी, पक्षी उदा. कोंबड्या, बकर्या, बेडुक, झुरळे, साप इ. इ. कापुन खाल्या नाहीतर त्यांची संख्या भरमसाठ होवुन पॄथ्वीवरील सर्व अन्न ते फस्त करुन टाकतील. म्हणुन पॄथ्वीतलावरील अन्नसाखळी शाबुत ठेवण्यासाठी मांसाहार अत्यंत आवश्यक आहे.
अर्थात कुणाला काय आवडेल उदा. प्राणी पक्षी, घास गवत कडबा, भाजीपाला इ इ ज्याचे त्याचे मगदुराप्रमाणे सेवित जावे.
आमच्याकडे एक म्हण आहे. "बामणांनी मटनं महाग केले".
खाटखुट भावश्या.
9 Aug 2010 - 4:30 pm | पंगा
आयला, हे बरे आहे! म्हणजे खाल्ले नाही, तर 'च्यायची कढी वरनभात खानारी भटुरडी' म्हणायचे, आणि खाल्ले तर 'बामणांनी मटन महाग केले' म्हणायचे...
आमच्याकडे एक म्हण आहे: "लोक तोंडानेही बोलतात, आणि *डीनेही बोलतात."
9 Aug 2010 - 4:41 pm | मितभाषी
मिरच्या झोंबल्या का?????
9 Aug 2010 - 4:45 pm | पंगा
सवय आहे. (मिरच्यांची.)
याहून वेगळी अपेक्षा नाही.
धन्यवाद.
9 Aug 2010 - 4:47 pm | मितभाषी
शुभं भवतु!
भावश्या.
9 Aug 2010 - 7:09 pm | धमाल मुलगा
>>आमच्याकडे एक म्हण आहे. "बामणांनी मटनं महाग केले".
ह्यावरुन आमच्या एका दोस्ताशी झालेला आमचा प्रेमळ संवाद आठवला...
दोस्तः बामणांनी मटनं महाग केले
आम्ही: आग्रह नाही! परवडत नसेल तर गटाराकडेची डुकरं पकडुन खायला कोणी अडवलं नाही.
दोस्तः चुकलो भाड्या! गिळ आता गप. :D
9 Aug 2010 - 1:15 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
.. हे खाऊ का ते खाऊ...कोण करणार कोण खाणार्...खादी शिवाय काही सुचतच नाहीये का मिपा कराना?
सारखी मेली खा खा खा.....काय खाई खाई सुटलीए का?
का भस्म्या झाला आहे?... एक खादी ची गोष्ट संपली की दुसरी....
मुदी शिवाय एक दिवस नाहि ढकलला जात...
खा लेको...
माझ्या हातात पण पॉप्कॉर्न च पॅकेट आणि मी पण झाडावर...
तुमचं चालु द्या...
9 Aug 2010 - 4:18 pm | विजुभाऊ
बरेच देव हे मांसाहारी आहेत.
शाकाहारी लोकांचे देव हे शाकाहारी आणि मांसाहारी लोकांचे देव मांसाहारी आहेत.
बहुधा आर्थीक दृष्ट्या सधन्/वरच्या वर्गातील लोकांचे देव शाकाहारी आहेत.
राम मांसाहारी होता. हे पटायला जड जाते .
एका प्रश्नाचे उत्तर कोणी देईल का
दूध हा शाकाहार की मांसाहार?
हत्ती शाकाहारी असतो..तर सिंह मांसाहारी.....सिंह हत्तीला घाबरतो....यातुन बोध घ्यावा
कुत्रे मांसाहारी आहे माणूस शाकाहारी आहे. माणूस कुत्र्याला घाबरतो ....यातुन बोध घ्यावा
हरीण शाकाहारी आहे ..मांजर मांसाहारी आहे..
मांजर हरिणाला घाबरते.
या विधानाला आधार काय?
हरीण आणि मांजर हे गोष्टीत सुद्धा कधी एकत्र आल्याचे ऐकिवात नाही बॉ
माणूस मूलतः शाकाहारी असला पाहिजे कारण त्याच्या शारीरीक मर्यादा.
मांसाहार मिळवायला ताकद आणि बुद्धीची गरज पडते. ( मिळवायला प्रयास करायला लागतात) शाकाहार सहज उपलब्ध होता.
ज्या मानवांकडे या दोन्ही गोष्टी होत्या ते मांसाहार करायला लागले. जे अशक्त होते ते शाकाहारावरच राहीले असा एक कयास आहे.
9 Aug 2010 - 4:54 pm | शानबा५१२
मी स्वःता मांसाहारी आहे(आठ्वड्यातुन दोनदा)
पण माझ्यामते शाकाहार श्रेष्ट.
9 Aug 2010 - 7:08 pm | तर्री
मांसाहा क करु नये याची विज्ञाना च्या द्रृष्टिकोनातून३ प्रमुख कारणे :
१.प्राण्यांना मारताना त्यांच्या ग्रंथी मधून "अॅडरिनॅलिन " रक्तात मोठ्या प्रमाणात सोड्ले जाते . हे अॅडरिनॅलिन रक्तदाब आदी रोगांचे मूळ कारण आहे.
२. मांसाहार पचवणे हे पचन संस्थेला सहज शक्य नाही. कर्बोदके पचवणे सगळ्यात सोप्पे , प्रथिने व मेद पचवणे त्याहून कठिन.
३. मांसाहार हा सामन्य पणे अतिरिक्त "तेल" व "तिखट " ह्यांच्या जोडीने केला जातो. हे मानवी शरिरास "मांसाहारा" पेक्षा घातक आहे.
माझा अनुभव :
माझ्यामते शाकाहारी मांसाहाराला (सामान्यपणे!) कमी लेखून रहातात.
मांसाहारी (सामान्यपणे!) मांसाहारचे "ऊदत्तीकरण" करतात.
शाकाहार व मांसाहाराची सीमारेषा खूप "धुसर" आहे.
माझे मत :
हिंदू व जैन ह्या धर्माना अभीप्रेत "शाकाहारी " सध्याचा जगात सापड्णे अशक्य. औषधे / सौंदर्य प्रसाधने व तयार अन्न पदर्थ जर तुम्ही वपरत असाल तर तुम्ही शाकाहारी असू शकत नाही.
लसीकरणात दिलेले औषध हे ९० % प्राणी जन्य असते.
10 Aug 2010 - 12:22 pm | स्वतन्त्र
मासाहार हा फक्त जिभेचे चोचले पुरविण्यासाठी काढलेला आहार आहे.
त्यमुळे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे तो करायचा का नाही,बाकी शाकाहारी पण मासाहारी च्या तोडीचाच असता हे नक्की !
आणि ज्यांना वाटत कि मास्साहारच चांगला तर त्यांनी एक महिना रोज फक्त मासाहार खाऊन दाखवणे. मगच शाकाहाराची किंमत कळेल.
वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे !
10 Aug 2010 - 6:02 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
शाकाहारी विरुद्ध मांसाहारी असं भांडण आहे का शाकाहार विरूद्ध मांसाहार अशी चर्चा हवी आहे?
10 Aug 2010 - 6:10 pm | पंगा
या दोहोंमध्ये (म्हणजे या दोन प्रकारच्या चर्चांमध्ये. शाकाहार आणि मांसाहार किंवा शाकाहारी आणि मांसाहारी यांच्यात नव्हे. ते वेगळ्या चर्चांचे विषय होऊ शकतील. ही आणखी एक काडी किंवा अग्निशामक यांपैकी काहीही मानण्यास माझी हरकत नाही.) नेमका काय फरक आहे, ते कृपया समजावून सांगू शकाल काय?
10 Aug 2010 - 10:41 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
शाकाहारी आणि मांसाहारी हे माणूस आणि इतर प्राण्यांचं विशेषण असतं; शाकाहार आणि मांसाहार हे आहाराचं!
चर्चा आहार चांगला याबद्दल करायची आहे का कोणत्या प्रकारची माणसं अथवा प्राणी चांगले यावर? चांगला/ले या शब्दांचे अर्थ श्रेयस्कर, सोयीचे, इ.इ. लावण्यास हरकत नाही.
आता (निष्कारण) माझं वरातीमागून घोडं:
शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारच्या माणसांशी माझी चांगली मैत्री आहे. चांगली (आणि वाईटही) माणसं दोन्ही (शाकाहारी आणि मांसाहारी) प्रकारची असू शकतात. क्लिशे उदाहरण म्हणजे अॅडॉल्फ हिटलर शाकाहारी होता, आणि बर्ट्रांड रसल मांसाहारी!
मी स्वतः शक्यतोवर शाकाहारी आहे. वयाच्या १६-१७व्या वर्षी कोंबडी, मासे खाऊन पाहिले, आवडले नाहीत, माझ्यासाठी हा प्रयोग शिक्षणापुरताच मर्यादित राहिला. लहानपणापासून अंडं खाल्ल्यामुळे ते मात्र चालतं. अगदीच काही मिळालं नाही तेव्हा बीफबर्गर, बेकन सँडविच, इ. खाऊन क्षुधाशांती करून झालेली आहे. उपाशी मरण्यापेक्षा खाऊन मेलेलं बरं .. अर्थात बीफ, पोर्क आणि सॅल्मन खाऊन मी मेले नाही हा आणखी एक (वादाचा!) मुद्दा!
माझ्या लेखी सध्याच्या जगात शाकाहार उत्तम, कारण समान ऊर्जा मिळण्यासाठी शाकाहारी जिन्नस उगवण्यासाठी कमी पाणी (+जमीन+काळ) पुरतात. अर्थात मांसाहारापेक्षा शाकाहार पाणी, जमीन आणि वेळ या बाबतीत जास्त एफिशियण्ट (मराठी शब्द?) आहे. एका दिवसांत सगळे मांसाहारी शाकाहाराकडे वळले तर तात्पुरता प्रश्न उद्भवू शकेल पण कालांतराने बरेच मांसाहारी शाकाहाराकडे वळले तर अन्नासाठी लागणारा पाणी हा मौल्यवान घटक वाचेल.
11 Aug 2010 - 4:25 am | राजेश घासकडवी
हा शाकाहार जगासाठी चांगला की तो स्वीकारणाऱ्यांसाठी? 'चांगला'ची व्याख्या इथे अन्नधान्याचा तुटवडा टाळण्यासाठी चांगला, एफिशियंट, कमी संसाधनं वापरणारा अशी वाटते.
हा युक्तीवाद वरवर बरोबर वाटला तरी तो एकांगी आहे. म्हणजे उदाहरणार्थ, जेवण (इथे जेवण हे रूपक म्हणून वापरतो आहे, आहारविषयक चर्चा म्हणून नाही) तयार करताना प्रत्येक किलो गव्हाला जितका खर्च येतो त्यापेक्षा किती तरी अधिक खर्च प्रत्येक किलो तुपाला येतो. म्हणून पोळीला थोडंसं तूप लावून खाण्यापेक्षा त्या सर्व पैशाचं गव्हाचं पीठ घेऊन, फारतर मीठ घालून पोळी करून खावी. त्याबरोबर भाज्या मसाले न घालता नुसत्या उकडून घ्याव्यात... वगैरे वगैरे. सांगायचा मुद्दा असा की एक चलन (व्हेरिएबल) ऑप्टिमाइज करणाऱ्या योजना, या कठोर, कर्मठ वाटतात.
आहाराचा विचार करताना सध्या अस्तित्वात असलेल्या संसाधनांचा वापर करून किती लोकांचं पोट भरता येईल असा एकच प्रश्न नसतो. पोट भरण्याबरोबर जिभेचे चोचले पुरवणं, खाल्ल्याचं समाधान मिळवणं, जेवण मित्रांबरोबर, कुटुंबाबरोबर घेऊन त्यातून आनंद मिळवणं, नवनवीन कृती करून त्या कलेचा विकास करणं... या सगळ्यांचा विचार केला तर मांसाहार अनिवार्य ठरतो. त्यापोटीच अधिक संसाधनं वापरणारं व त्यामुळे अधिक किंमत असलेलं मांस विकत घेऊन खाणारे लोक आहेत. जर प्रत्येकानेच फक्त पोट भरायचा विचार केला असता तर ही जास्तीची किंमत कोणी दिली नसती.
11 Aug 2010 - 5:34 am | पंगा
अनिवार्य नेमका कोणासाठी?
जिभेचे चोचले पुरवण्यासाठीसुद्धा मांसाहाराची गरज नसणारे असू शकतात.
मला ष्टेक, सॉसेज आणि सुशी भले आवडत असतील. आणखी कोणाला गोगलगायी आवडत असतील. (एस्कार्गो हा प्रकार चवीला अतिशय रुचकर लागू शकतो. खिशाला अतिशय जडही लागू शकतो ही गोष्ट वेगळी.) तिसर्याला बेडकाची तंगडी आवडत असतील. पण म्हणून हे पदार्थ अनिवार्य म्हणता येतील काय?
उद्या मला ष्टेक, सॉसेज, सुशी किंवा एस्कार्गो जर मिळालेच नाहीत - किंवा जर हे पदार्थ मी कधी खाल्लेलेच नसतील - तर माझे अडू नक्कीच काही नये. (बेडकाची तंगडी मला प्रयोगाअंती आवडलेली नसल्याने त्यांचा मी विचार करत नाही.) जिभेचे चोचले पुरवायला मला इतर हजारो गोष्टी मिळू शकतात. अमेरिकेत अण्णा बेडेकराची मिसळ आणि पुण्यात चांगली सुशी, इटालियन किंवा मेक्सिकन पद्धतीचे जेवण न मिळाल्याने मला हळहळावेसे वाटत नाही. कारण अमेरिकेत काय किंवा पुण्यात काय, मला माझ्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी इतर अनेक चांगले आणि स्थानिकरीत्या उपलब्ध पर्याय मिळू शकतात.
(अवांतरः सुशीचे माहीत नाही, पण पुण्यामुंबईत इटालियन किंवा मेक्सिकनच्या नावाखाली खपवलेले काहीतरी मिळू शकते असे वाटते. एकदा मी पुण्यात भरमसाट नूडल्स घातलेले मिनेस्ट्रोनी सूप आणि पार्ल्यात पनीर घातलेली काहीतरी तथाकथित मेक्सिकन डिश खाल्लेली आहे. उलटपक्षी अटलांटातील एका बांग्लादेशी लोकांनी चालवलेल्या तथाकथित भारतीय रेष्टॉरंटात पनीर टिक्का मसाल्याच्या नावाखाली जे काही खाल्लेले आहे, तेच जर मला त्याने साबूदाण्याची खिचडी किंवा पुरणपोळी म्हणून खपवले असते, तरीही चालले असते. मुंबईला मात्र खारच्या बाजूला एकदा एक थाई रेष्टारंट बरे सापडले होते. अकरा वर्षांपूर्वी. असो.)
एखाद्या एस्किमोला जर पुरणपोळी खाऊ घातली, तर त्याला ती आवडेलच, असे नाही. चुकून आवडलीच, तर एखादे दिवशी न मिळाल्याने त्याला कसेनुसे होईल, असेही वाटत नाही. त्याच्याकरिता ती अनिवार्य होणार नाही. उलटपक्षी तो जे काही खातो ते तुम्हाआम्हाला जरी आवडले, तरी अनिवार्य होईलच, असे सांगता येणार नाही.
(आणखी एक अवांतरः एक जुना अनुभव आहे. फारा वर्षांपूर्वी पुण्यात आमचा एक जपानी भाषा शिकू पाहणार्यांचा - किंवा जपानी भाषा शिकण्याच्या नावाखाली टवाळक्या करू पाहणार्यांचा - एक ग्रूप होता. सर्वांनी एका रविवारी सिंहगडावर जायचे ठरवले. नेमक्या त्याच वेळी जपानी विद्यार्थिनींचा एक ग्रूप पुण्यात आलेला असल्याची कोणालातरी खबर लागली. काहीतरी करून त्यांनाही सामील करून घेतले. वरती चढून गेल्यावर जेवायचा प्लान वगैरे. जेवणाचा प्लान कोणी आणि कसा आणि काय ठरवला होता ते आता आठवत नाही, पण त्यात एकाच वेळी श्रीखंडपुरी आणि ब्रेड या दोन्ही चिजा होत्या असे आठवते. बहुधा ब्रेडबरोबर काही भाजी, कोंबडी वगैरे असावे. या सगळ्या जपानी पोरींनी ते श्रीखंड ब्रेडच्या स्लाईसला फासून सँडविचसारखे खाल्ले. अर्थातच एकीलाही ते आवडले नाही. असो.)
शिवाय, माणसाच्या चवी, आवडीनिवडी कालपरत्वे किंवा परिस्थितीनुसार बदलू शकतात, हा आणखी एक मुद्दा आहेच.
तर सांगण्याचा मुद्दा, जिभेचे चोचले पुरवण्यासाठीसुद्धा कोणतीही एक गोष्ट पूर्णपणे अनिवार्य आहेच, असे वाटत नाही. जगात खाण्याच्या लायकीच्या इतक्या गोष्टी आहेत, की त्यातली एखादी जरी अनुपलब्ध झाली, तरी हजारो इतर सापडतील. जिभेचे चोचले पुरवण्यासाठीसुद्धा. जे जे काही उपलब्ध आहे त्याच्याशी प्रयोग करून पाहण्याची - आणि त्यात मजा करण्याची - तयारी मात्र पाहिजे. किंवा थोडक्यात, मजा करण्याची तयारी पाहिजे. मग काहीही चालते. मग कशानेही जिभेचे चोचले पुरवता येतात.
अर्थात, बिघडत नाही म्हणून कोणताही एक पर्याय जाणूनबुजून अनुपलब्ध करावा असे माझे म्हणणे नाही. केवळ, जिभेचे चोचले पुरवण्यासाठीसुद्धा सगळे पर्याय अनिवार्य आहेतच, असे वाटत नाही, एवढेच मांडण्याचा उद्देश.
(किंबहुना, समोर मांडून आलेल्या बफेमध्ये नको तितके अधिक पर्याय आले तरी जमणार नाही असे वाटते.)
11 Aug 2010 - 8:59 am | राजेश घासकडवी
व्यक्तिगत दृष्टीकोनातून काय अनिवार्य व काय निवार्य या प्रश्नाचं उत्तर कसं देणार? मुळात अदितीचा युक्तीवाद होता तो समाजाच्या गरजांविषयी. त्यात तिनेही मांसाहार वर्ज्य केल्यावर प्रत्येकाने हुबेहुब सारखंच खाल्लं पाहिजे असं म्हटलं नसावं. मनुष्यसमाजाची अन्नाची (विशिष्ट क्यालऱ्या मिळवण्याची) जशी भूक आहे तशीच जिभेला आवडेल असं खाण्याची भूक आहे, खाण्याचा उपयोग आनंद घेण्यासाठी वापरण्याचीही भूक आहे. यातली एकच भूक (क्यालऱ्यांची) भागवायची असेल तर शाकाहार जास्त एफिशियंट, याबद्दल वाद नाही. मात्र इतर भुका भागवायच्या असतील तर मांसाहार अनिवार्य होतो असा माझा युक्तीवाद आहे.
मांसाहार ही कोबी किंवा घेवडा यांसारखी 'एक वस्तू' नाही. जगभरच्या खाद्यसंस्कृतींचं ते अत्यंत महत्त्वाचं अंग आहे. ते टाकून देण्यासाठी जितके कष्ट होतील, त्यापेक्षा कमी कष्टात सर्व लोकांना पुरेल इतकं मुबलक अन्न पिकवणं सहज शक्य आहे. (सध्या किती कमतरता आहे, सहा अब्जांपैकी किती लोक भूकबळी पडतात याचा विचार करा...)
या उदाहरणामागचं प्रयोजन कळलं नाही. मुळात त्याला ज्याबद्दल आसक्ती नाही असं अन्न द्यायचं, मग ते अनिवार्य होणार नाही हे सिद्ध करायचं...एस्किमोने मांस खायचं बंद केलं तर त्याच्यावर त्याला सवय नसलेल्या इतर गोष्टी - उदा. पुरणपोळी वगैरे खायची पाळी येईल.
हे वाक्य थोडंसं - आपलंच पोर कशाला पाहिजे, जगात इतकी पोरं आहेत, प्रेम करण्याची तयारी पाहिजे, मग मातृत्वभावना भरून काढता येते - असं म्हणण्यासारखं आहे. आपल्या विशिष्ट अन्नावर अगदी पोटच्या पोराइतकं नाही पण तत्सम प्रेम लोक करतात. म्हणूनच बहुधा तुमचा एस्किमो मांस टाकून पुरणपोळीच्या मागे जाणार नाही. दक्षिण भारतीय लोकांना इडली, सांबार, डोसे, उत्तप्पे व भात खायचा नाही असं सांगून बघा (हे शाकाहार की मांसाहार असं नसून निवार्य व अनिवार्य चं उदाहरण आहे) मग त्यातले जे 'मग आम्ही खायचं काय' विचारतील त्यांना त्यांच्या वर्षानुवर्षांच्या सवयी बदलण्यासाठी तुमचे इतर पर्याय सांगा. जगातल्या अब्जावधी लोकांची त्यांचं खाणं सोडून देण्याची त्यांची 'तयारी' नसेल तर हा त्यांचा दोष की तुमच्या गृहितकांमधली कमतरता?
11 Aug 2010 - 9:59 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
भद्रलोक, मी फक्त पुस्तकी व्याख्येचा विचार करून एफिशियन्सीबद्दल लिहीलं होतं. जेवणासंदर्भात पुस्तकी व्याख्या म्हणजे दिवसाला २२००/२५००* किलोकॅलरीज**.
पाण्याचे असमान वाटप, भारत या (आकार आणि लोकसंख्येने) प्रचंड मोठ्या देशात वर्षातले काही महिनेच काहीशे तासच पाऊस पडणं, जगभर येणारे पूर, इ.इ. अनेक कारणांंमुळे तिसरं महायुद्ध पाण्यावरूनही होऊ शकतं अशी शंका व्यक्त केली जाते. मी त्या संदर्भात पाण्याच्या एफिशियन्सीचा मुद्दा मांडला होता. पाण्याच्या बाबतीत श्रीमंत (भरपूर उपलब्धता आणि उत्तम व्यवस्थापन) असणार्या देशांना, भागांना या गोष्टीची गरज नसावी.
त्यातून पाण्याची एफिशियन्सी या आणि याच कारणासाठी जगातले किती मांसाहारी लोकं खरोखर शाकाहाराकडे वळतील?
* दिवसभर खुर्चीत बसून कीबोर्ड बडवणार्यांना दोन हजार कॅलरीजही पुरेशा असाव्यात. (स्वतःवरून जग पारखणे).
** या प्रतिसादात किलोकॅलरीज आणि कॅलरीज एकच आहेत. इंग्लीशमधे कॅपिटल सी लिहून किलो हा शब्द टाळता येतो.
10 Aug 2010 - 9:19 pm | क्रेमर
चर्चा.
11 Aug 2010 - 10:37 pm | अशक्त
आम्हि तब्येत सुधारण्यासाठि मांस खातो....फ्राइड क्यालामरि हा आमचा आवडता पदार्थ
15 Sep 2010 - 6:09 pm | Arun Powar
शाकाहारी विरुद्ध मांसाहारी??
निसर्गातील प्रत्येक जीव हा दुसर्या जिवावर अवलंबून असतो. 'जीवो जिवस्य जीवनम्".. प्राणी असो वा वनस्पती, दोन्हींमध्ये जीव असतो. त्यामुळे कोणताही सजीव खाल्ला तर तो मांसाहार समजायला हवा.
प्राण्यांना जशा भावना असतात, तशा वनस्पतींनाही असतात, हे विज्ञानाने सिद्ध करून दाखवले आहे. वनस्पती-शास्त्रज्ञ "बोस" यांनी ते सर्व जगासमोर प्रयोग करून सिद्ध देखील करून दाखवले आहे. प्राण्यांना चाकू कापल्यावर जशा वेदना होतात, अगदी तशाच वेदना फळे, भाजी ह्यांना देखील चाकू कापल्यावर होतात हा प्रयोग त्यांनी सर्व जगासमोर दाखवला होता. आता एवढे सर्व माहीत असून सुद्धा शाकाहारी लोकांना मांसाहार म्हणजे वेगळे असे का वाटते? दररोज स्वयंपाक करताना, भाज्यांना क्रूरपणे चिरताना, त्या भाज्यांना होणार्या वेदनांचा विचार करत का नाहीत हे शाकाहारी लोक?
15 Sep 2010 - 6:23 pm | मृत्युन्जय
भाज्यांना क्रूरपणे चिरताना, त्या भाज्यांना होणार्या वेदनांचा विचार करत का नाहीत हे शाकाहारी लोक?
त्याचे कारण कदाचित असे असु शकेल की भाज्या कापत असताना त्या कापणार्यासमोर फडफड तडफड करत नाहीत.
15 Sep 2010 - 6:41 pm | विकास
भाज्यांना क्रूरपणे चिरताना, त्या भाज्यांना होणार्या वेदनांचा विचार करत का नाहीत हे शाकाहारी लोक?
नॉटींग हील नामक ज्युलीया रॉबर्ट आणि ह्यू ग्रँटच्या चित्रपटातील एक अभिनेत्री स्वतःची ओळख, फ्रुटेरीयन म्हणून करून देते. म्हणजे केवळ झाडावरून पडलेली फळेच खाणार कारण ती आधीच मेलेली असतात. फळ तोडले तर तो खून! :-)
15 Sep 2010 - 6:42 pm | Arun Powar
माणसाची शरीररचना शाकाहारासाठी आहे हे मान्य, पण ज्यावेळी मानव उत्क्रांतीच्या मार्गावर होता, त्यावेळी तो मांसाहारकडे वळला होता. कारण दुष्काळ, अतिवृष्टी, शेतीविषयाचे अल्पज्ञान ह्यांसारख्या गोष्टींमुळे मांसाहार करणे गरजेचे बनले. त्यावेळच्या मानवाने, उपलब्ध असलेल्या प्राण्यांचा उपयोग अन्न म्हणून केला होता आणि मानव "मिश्राहारी" बनला. मिश्राहारी बनल्यामुळे जगण्यासाठी लागणारा अन्नाचा पुष्कळ साठा त्याला मिळाला. त्याकाळी जर माणूस मांसाहारी बनला नसता तर मानवजात निसर्गात जास्त काळ टिकली नसती. आणि आत्ताचा मानव 'शाकाहारी विरुद्ध मांसाहारी' असा वाद घालायला जन्मलाच नसता.
15 Sep 2010 - 7:03 pm | Arun Powar
जो जे पचवेल तो ते खावो, प्राणीजात||
15 Sep 2010 - 7:16 pm | गणपा
अरुणभौ लै फार्मात दिस्त्यात. :)
16 Sep 2010 - 12:05 am | विकास
आता ह्या धाग्याचा जिर्णोद्धार झालाच आहे तर हे देखील करमणूक म्हणून वाचून पहा. ;)
16 Sep 2010 - 9:33 am | प्रकाश घाटपांडे
दगडू लई भारी दिसतोय! किस्सा जाम आवडला.
16 Sep 2010 - 10:26 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
हॅ हॅ हॅ!
16 Sep 2010 - 10:35 am | राजेश घासकडवी
हा हा हा
16 Sep 2010 - 10:41 am | मृत्युन्जय
+ ४.
एकदम नवीन किस्सा. लै भारी.