बेस्ट OF फाईव्ह. विद्याथ्याचा दृष्टीकोन.

Bhushan Kulkarni's picture
Bhushan Kulkarni in काथ्याकूट
3 Aug 2010 - 10:27 pm
गाभा: 

नमस्कार!
टिप-(पहिलाच लेख आहे त्यामुळे काही चुका आहेत कृपया समजुन घ्यावे.हा एक ट्रायल लेख)

मी 10वी शिकत आहे.सध्या गाजत असलेल्या BEST OF 5 या राज्य सरकार च्या निर्णया बद्दल मी माझे वैयक्तीक मत मांडणार आहे.या निर्णयांबाबत आमच्या विद्यार्थाँमध्ये जी चर्चा चालते ती तुमच्या समोर मांडणार आहे.:

BEST OF 5 चा निर्णय चांगला आहे कारण आम्हा विद्यार्थ्याँचे सर्वात जास्त मार्कस हे मराठीत जातात.आणि BOF मुळे शक्यतो मराठी बाजुला पडते.तसे बघितले तर मराठी आपली मातृभाषा.तिच्यात जास्त मार्कस मिळायला हवेत पण मराठीच्या पेपरला हस्ताक्षर,शुद्धलेखणाच्या चुका,ईत्यादी निव्वळ लेखणाच्या चुकात गुण जातात.माझ्या मते जगात खुप लोकांना आपली मातृभाषा कुठलीही असो ती लिहायला नीट जमत नाही.
उदा. अमेरीकेच्या ENGLISH SPELING MASTER र्स्पधेच्या विजेतेपदी अनेक वेळा अमेरीकन नाही तर भारतीर अथवा आशियन मुलांचा समावेष आहे.
सध्या वर्तमान पत्रात खुप वेळा वाचले आहे की ENGLAND,US लिखापडीच्या कामांमध्ये भारतीर आणि आशियाई व्यक्तिँची नेमणुक जास्त केली जाते कारण त्यांच्याकडुन ENGLISH GRAMMAR च्या चुका ENGLISHलोकांपेक्षा कमी होतात.

S.S.C मध्ये बहुतांश मुलांचे मराठीचे गुण हे ईतर विषयांच्या गुणांपेक्षा कमी असतात.माझ्या मते 80% मुलांचे BEST OF हे विज्ञान.गणित,समाजशास्त्र,ईग्रजी आणि संस्कृत हे असणार आहेत कारण यात पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात.आणि 95%च्या आसपास सहज जाता येते.
त्यामुळे माझ्या मते B O F IS THE BEST.

प्रतिक्रिया

योगी९००'s picture

3 Aug 2010 - 11:04 pm | योगी९००

विचार चांगले आहेत..पण तोच पॅरेग्राफ परत लिहीला आहे.

कार्लोस's picture

3 Aug 2010 - 11:50 pm | कार्लोस

kahi lokana saral uttare deta yet nahi tyana hi vinanti aahe ki kahi matitarth kalat nasel tar ugach faate fodu naka.

योगी९००'s picture

4 Aug 2010 - 2:07 am | योगी९००

विचार चांगले आहेत..हे लिहीले आहे ते वाचले नाही काय? पण तोच पॅरेग्राफ परत लिहीला आहे... यात आणखी कसे सरळ लिहिणार ते सांगा...

सुचना किंवा विनंती करण्याआधी तुम्ही मराठीमध्ये टंकायला शिकला तर बरे वाटेल आम्हाला..!! जास्त अवघड नाही ते..थोडेसे कष्ट घेण्याची तयारी पाहिजे.

नवीन लेखक आहे. चु़कीने तोच परीच्छेद दोनदा प्रकाशित झाला असावा
स्वसंपादनाची सोय असल्यास लेखकाला दुसरा परीच्छेद काढता आला असता.

मुद्दा चांगला मांडला आहे . यावर पुढील चर्चा वाचण्यास उत्सुक.

दिनेश's picture

4 Aug 2010 - 2:16 am | दिनेश

पक्या यांच्या मताशी बाडीस.

दिनेश

मिहिर's picture

4 Aug 2010 - 11:32 pm | मिहिर

बेस्ट ऑफ ५ ला हरकत नाही. पण मराठीला खूप कमी गुण मिळतात हे विधान हल्लीचे मराठीचे गुण पाहिले असता फारसे पटत नाही.

असुर's picture

5 Aug 2010 - 12:05 am | असुर

सर्वप्रथम आपले अभिनंदन की आपण आल्यासारशी अश्या एका चांगल्या विषयाला हात घातलात जो विषय आपणाशी निगडीत आहे.

>>>तसे बघितले तर मराठी आपली मातृभाषा.तिच्यात जास्त मार्कस मिळायला हवेत पण मराठीच्या पेपरला हस्ताक्षर,शुद्धलेखणाच्या चुका,ईत्यादी निव्वळ लेखणाच्या चुकात गुण जातात <<<
मराठी शुद्ध लिहिता येण्याची सक्ती करण्यामागे हेतू हा असावा की किमान मातृभाषेत तरी कोणी दुसऱ्याने आपली लाज काढू नये. आणि भाषेचे वळण, लिखाण या गोष्टी मन:पूर्वक शिकल्या तर अवघड नाहीत. कोणीही जन्मजात भाषापंडित नसतो. सगळेच चुका करत आणि त्या दुरुस्त करतच मोठे झाले आहेत. त्यामुळे "चुका दाखवण्याची आणि दुरुस्त करण्याची प्रक्रिया म्हणजे परीक्षा" असे समजून परीक्षा दिलीत तर बऱ्याच गोष्टी सोप्या होतील.
तसेच ग्रामीण बाज वापरून लिहिणे, किंवा भाईगिरीच्या भाषेत लिहिणे हे बोलीभाषेचे प्रकार आहेत. 'शुद्ध मराठी'सुद्धा एक बोलीभाषा आहे जी अभ्यासक्रमाच्या मराठीमध्ये वापरली जाते. एवढा फरक ध्यानात घेतला तरी पुरेसा आहे.

>>>उदा. अमेरीकेच्या ENGLISH SPELING MASTER र्स्पधेच्या विजेतेपदी अनेक वेळा अमेरीकन नाही तर भारतीर अथवा आशियन मुलांचा समावेष आहे.
सध्या वर्तमान पत्रात खुप वेळा वाचले आहे की ENGLAND,US लिखापडीच्या कामांमध्ये भारतीर आणि आशियाई व्यक्तिँची नेमणुक जास्त केली जाते कारण त्यांच्याकडुन ENGLISH GRAMMAR च्या चुका ENGLISHलोकांपेक्षा कमी होतात. <<<
अमेरिकन किंवा ब्रिटीश लोकांना जमत नाही म्हणून आपल्यालासुद्धा भाषेच्या चुका करायची सूट आहे असा गैरसमज करून घ्यायचे कारण नाही. त्यांची लाज पदोपदी जातेच, पण मराठी नीट येत नाही म्हणून मराठी माणसाची लाज जाऊ नये असे वाटते.

>>>S.S.C मध्ये बहुतांश मुलांचे मराठीचे गुण हे ईतर विषयांच्या गुणांपेक्षा कमी असतात <<<
तसेही जास्त गुण मिळवण्यासाठी जी स्पर्धा होती ती बंद झालीच आहे. आणि चांगल्या कॉलेजला प्रवेश मिळवण्यासाठी चांगले गुण मिळणं हे अत्यावश्यक आहे. तुम्ही मिळावा अगर मिळवू नका, बाकीचे मिळवतीलच. त्यामुळे केवळ एखाद्या विषयाला बाद करून काही विशेष साध्य होणार नाहीये किंवा स्पर्धाही निकोप होणार नाहीये.

पुढे जाऊन जेव्हा व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेता, तेव्हा भाषा विषय सोडून देण्याची मुभा दिलेलीच आहे. त्यासाठी ती १०वी पासूनच सोडली पाहिजे असं नाही.

त्यामुळे हे BO5 प्रकरण मला तरी फारसे पटत नाही. अर्थातहे वैयक्तिक मत आहे.

असो!

--असुर

मिसळभोक्ता's picture

5 Aug 2010 - 2:28 am | मिसळभोक्ता

१० वीच्या मराठीच्या परीक्षेत निबंध लिहिण्याच्या सरावासाठी मिसळपावाचा उपयोग झालेला पाहून धन्य वाटले.

मला बेस्ट ऑफ फाईव्ह पटते. सगळ्यांनाच सगळेच यायलाच हवे असे नाही. दहा पैकी पाच आले तरी झाले.

ता.क. सुजय कुलकर्णी, सारंग कुलकर्णी, आणि आता भुषण कुलकर्णी ? कुलकर्ण्यांमध्ये मिसळपावाची लोकप्रियता वाढलेली पाहून छान वाटले. कुलकर्णि हे माझे फेवरिट आडनाव आहे. (जोशी अजीबात आवडत नाही.)

भाषा विषयांनी आपल्याला तर लै त्रास दिला ब्वॉ. साला ते व्याकरण अजुन कळत नाही. असो.

(यावरुन आठवले, शेक्सपिअरसुद्धा स्पेलिंग मिश्टेक काढण्यार्‍या लोकांची खिल्ली उडवायचा म्हणे, स्वत: "अशुद्ध"ही लिहायचा.)

बेस्ट ऑफ फाईव्ह कल्पना चांगली आहे पण याकरीता पुढील यंत्रणा तयार आहे का?
ह्या बेस्ट पाचात नसलेल्या विषयात एखाद्याने प्रवेशअर्ज भरला तर महाविद्यालयांना निर्णय घेताना कसे ठरवावे लागेल?
(उदा. एखाद्याला शास्त्र जमत नाही, पण बेस्ट ऑफ ५ मध्ये त्याने उत्तम गुण मिळवले व शास्त्र शाखेकरता अर्ज दिला तर काय? त्याच्या इतकेच पण शास्त्र घेउन गुण मिळालेलाच सरस नाही का? हे कसे ठरवायचे वगैरे. )

त्याशिवाय, नववी पास होताना साधारणत: पुढे आयुष्यात काय करावयाचे आहे हे विद्यार्थाला माहित नसते. बेस्ट ५ आल्यानंतर, आपल्या देशातल्या शिक्षण पद्धती बद्दल असलेल्या तुटपुंज्या अनुभवावरुन, इतर विषय (वैयक्तीकरीत्या) फक्त पास होण्याकरताच अभ्यासले जातील. अशा वेळी गणित अवघड जाते म्हणुन एखाद्याने सोडले तर इंजिनरींग ही शाखाच त्याला बंद होउ शकते! अशा अडचणीही आहेत.

नितिन थत्ते's picture

5 Aug 2010 - 8:16 am | नितिन थत्ते

>>अशा वेळी गणित अवघड जाते म्हणुन एखाद्याने सोडले तर इंजिनरींग ही शाखाच त्याला बंद होउ शकते!

गणित सोडले होते म्हणून शाखा बंद होणार की नाही हे माहिती नाही.

पण व्हायला हवीच. नववीचे गणित अवघड जात असेल तर इंजिनिअरिंगचे गणित कसे सोडवणार?