गाभा:
पाळीव प्राणी.....
ब~याच लोकांना प्राणी पाळण्याची हौस असते..कुत्रे..मांजरी..पोपट..कबुतर..काकाकुआ..लॅव्ह बर्ड..कासव..ससा..एक ना अनेक असे अनेक प्राणी पाळणारे महाभाग आपणास माहित असतिल...
काहि लोकांचे तर या प्राण्यावर इतके प्रेम असते कि तो त्यांच्या परीवाराचा एक सदस्य झालेला असतो..त्याची अंघोळ..शी..शु ते सारे आवडीने करीत असतात...
घरी आलेल्या पाहुण्या समोर त्याचे किति लाड व कौतुक करु असे त्यांना होत असते....
एकदा चितळे बंधु [डेक्कन शाखा] च्या दुकानात श्रीखंड खरेदी करणारा मित्र भेटला..आज काय वहिनिचा वाढदिवस दिसतोय..हातातला डबा पहात त्याला विचारले..नाहि रे टॉमीला श्रीखंड फार आवडते...आठवड्यातुन एकदा तरी त्याला खावु घालावे लागते...नाहितर रुसुन बसतो.....
काय बोलणार?..आपले काय अनुभव आहेत?
प्रतिक्रिया
3 Aug 2010 - 1:14 pm | नितिन थत्ते
अविनाशकुलकर्णी यांनी तीन ओळींचा थ्रेशोल्ड ओलांडला त्याबद्दल अभिनंदन. नव्या लेखकांच्या लेखनामुळेच हे घडले असावे. :)
3 Aug 2010 - 7:35 pm | प्रभो
हेच म्हणतो...२ मिनीट डोळ्यावर विश्वास बसेना... :)
3 Aug 2010 - 1:38 pm | मृत्युन्जय
आता पुढच्या वेळेस मित्राच्या हातात कुत्राच्या बिस्किटांचा पुडा दिसल्यावर "काय वहिनींसाठी का?" असे विचारुन बघा.
3 Aug 2010 - 6:16 pm | कवितानागेश
" काय बोलणार?...."
अशी दुखि: कष्टी प्रतिक्रिया का?
कुत्र्याला रुसायचा अधिकार नाही का?
श्रीखंड काय फक्त माणसानीच चापायचे?
त्याची भूक/ आवड-निवड, आणी आपली भूक आनी आवडनिवड यात फरक का?
त्याला मन नाही का?
.....शेवटी कुत्रा पण एक माणूसच आहे!!!!!!!
*****************************************************
(प्राणीप्रेंमी-मनुष्यद्वेष्टी) माउ
4 Aug 2010 - 2:37 am | पुष्करिणी
>>>....शेवटी कुत्रा पण एक माणूसच आहे!!!!!!!
का??
4 Aug 2010 - 8:10 am | चिन्मना
>> शेवटी कुत्रा पण एक माणूसच आहे....
बर्याच लोकांना यात तथ्यांश वाटत असावा. कुत्र्याला कुत्रा म्हणलेलं त्यांना आवडत नाही. माझ्या मामेभावाकडून मी बर्याच वेळेला - "ए, त्याला कुत्रा काय म्हणतोस? त्याचं नाव टॉमी आहे" असं ऐकून घेतलेलं आहे.
काही वर्षांपूर्वी आमच्या समोर एक डॉक्टर राहायला आले. त्यांचा भलादांडगा अल्सेशियन कुत्रा होता. डॉक्टर दररोज सकाळी त्याला फिरवायला घेऊन जात. माझे बाबाही तेव्हाच फिरायला जात असत. एकदा फिरून परत आल्यावर आमचे तीर्थरुप म्हणाले, "डॉक्टर त्यांच्या कुत्र्याला अगदी मुलासारखं समजतात नाही? नावही अगदी कसं छान वेगळं ठेवलंय - श्रीधर!"
मी (दचकून): "श्रीधर? कुत्र्याचं नाव?"
बाबा: " हो तर! मी त्यांना हाक मारताना ऐकलं."
मी: "असेल बुवा, मग खरोखरच मुलासारखा असेल त्यांच्या."
दोन दिवसांनी मला दस्तुरखुद्द डॉक्टरच त्यांच्या या मानसपुत्राबरोबर भेटले. मी आपले शिरस्त्याप्रमाणे त्याचे वा! काय ऐटबाज आहे वगैरे कौतुक केले. (कुत्रा खरोखरच छान होता).
मी डॉक्टरांना म्हणालो, " काय हो डॉक्टर, इतका छान दांडगा कुत्रा; आणि तुम्ही त्याचं नाव असं श्रीधर असं का ठेवलंत?"
आता दचकण्याची पाळी बहुधा डॉक्टरांची होती.
पांचट चेहरा करून ते म्हणाले," श्रीधर?? अरे त्याचे नाव सीझर आहे सीझर! ज्युलीयस सीझर !!"
नंतर बरेच दिवस तो सीझर (का श्रीधर)मी दिसलो की रागावून जोरजोरात का भुंकतो हे काही मला कळले नाही. :-)
3 Aug 2010 - 8:17 pm | अविनाशकुलकर्णी
बापरे..चांगलच ओचकारल ...
3 Aug 2010 - 8:34 pm | तिमा
माझ्या मुलीच्या प्रोफेसरने अमेरिकेत एक मांजर पाळले होते. आणि त्या मांजराला डायाबिटिस झाला होता म्हणे. जेंव्हा जेंव्हा ती प्रोफेसर दुसर्या गांवी जायची तेंव्हा ती तिच्या विद्यार्थिनींना आपल्या घरी रहायला सांगायची. मग ह्या मुलींना त्या मांजरीचे सर्व करायला लागायचे. अगदी डायबिटिसचे इंन्श्युलिनचे इंजेक्शन देण्यापर्यंत!!!
3 Aug 2010 - 8:47 pm | रेवती
एकदा प्राणी पाळले कि घरातले एक सदस्य होवून जातात हे खरेच!
मग आपल्या टॉमीला बाहेरच्या कोणी कुत्रा म्हटलेले चालत नाही.;)
3 Aug 2010 - 9:01 pm | मीनल
माझ्या भावाकडे कुत्रा आहे. त्याचे नाव ` टमटम`.
तो ब-याच गुरवारी उपास करतो. उपास म्हणजे काही खात नाही. दूघ / भात /पोळी/ अंड काही नाही. टमटमला मांसाहार कधी दिलाच नाही आहे. घरात /बाहेरही कुणी खात नाही. त्या कुत्र्याला कोण घालणार?
टमटम मधेच इतर वारी ही काही खात नाही.
मग माझा भाउ त्याला म्हणतो की " अरे, खा आता. आज गुरवार नाहीये."
टमटमवर काहीही परिणाम होत नाही.
एवढे उपास करून टमटम चांगलाच ट्मटमित आहे.
पण ट्मट्मला गुरवारी किंवा कधीही पेढा दिला तर मात्र आवडीने खातो.
4 Aug 2010 - 1:26 am | शिल्पा ब
टमटम हे नाम मनात घर करून बसले ...
3 Aug 2010 - 10:25 pm | मृत्युन्जय
मला एकदम पुलंच्या पुस्तकातल दुष्यंत आठवला.
3 Aug 2010 - 10:25 pm | मृत्युन्जय
मला एकदम पुलंच्या पुस्तकातल दुष्यंत आठवला.
3 Aug 2010 - 10:35 pm | शानबा५१२
कधी मनापासुन जीव लावुन बघा मुक्या प्राण्यांवर मग कळेल.
पोरीसाठी नखरे करता ना सर्वजण!
3 Aug 2010 - 10:54 pm | मराठमोळा
सोसायटीत राहुन प्राणी पाळणारे डोक्यात जातात. चायला स्वतः वीकांताला बाहेर फिरायला निघतात कुत्र्याला घरात कोंडुन आणी ते कुत्र भुंकुन भुंकुन डोक्याचा भुगा करुन टाकतं.
एकदा त्याच्यात्याबरोबर त्य मित्राच्या घरी गेलो, गेटमधुनच त्याला म्हणालो, "अरे तुझा कुत्रा चावरा नाही ना?" बिचारा धावत आमच्याजवळ येऊन म्हणाला, "कुत्रा म्हणुन नकोस त्याला, नाहीतर माझी आई तुम्हाला घरात घेणार नाही."
आधी रहात होतो तिथे एका बाईचा कुत्रा मेला तर नवरा मेल्यासारखं रडत होती दिवसभर (कुत्र्याला स्वयंपाक येत नव्ह्ता. ;) ) ब्राम्हणाला बोलवुन हिंदु पद्धतीने अंत्यसम्स्कार केले त्याच्यावर. (स्माईलींच काहीतरी करा राव..)
बेंगलोरात तर हैदोस घातलाय भटक्या कुत्र्यांनी रात्री १० ला सुद्धा बाहेर निघु द्यायचे नाही, टोळके करुन प्रत्येक चौकात वाट बघत उभे हरामखोर.. ;)
असो, कधी कधी मुके प्राणी म्हणुन दया पण येते. मुंबैला असताना चहाच्या टपरीवर जायचो तेव्हा तिथ्ल्या कुत्र्यांना रोज बिस्कीट खाउ घालायचो. :)
3 Aug 2010 - 10:55 pm | ज्ञानेश...
मी खूप लहान असतांना बालसुलभ हट्ट करून आमच्याकडे एक पोपट आणला होता. त्याला काहीबाही बोलायला शिकवण्याचाही प्रयत्न केला. दुर्दैवाने त्याने महिन्याभरातच मान टाकली. (त्याची कबर अजून आमच्या जुन्या वाड्यात आहे.) त्या प्रसंगापासून मी कुठलाही प्राणी पाळण्याचा प्रयत्न केला नाही. कारण भीती- ’पुन्हा पोपट व्हायचा.’ ;)
मात्र एक प्राणी नंतर मजेशीररित्या पाळला गेला. मांजर. हीचे नावच होते ’मांजर!’ किटी वगैरे भानगड नाही. (हे नाव आता इतके अंगवळणी पडले आहे की दुसर्या कोणत्याही मांजराला ’मांजर’ म्हणावे वाटत नाही.) तर हे असे मांजर आम्ही पाळले आहे, हा दावा आमच्या कॉलनीतले किमान दहा कुटुंब करू शकतात. या मांजराचे निरीक्षण करता करता मला कधी हा प्राणी आवडू लागला, ते कळलेच नाही. (यापुढील वर्णन माझ्या मांजराचे असले, तरी ते सर्व मांजरांना सारखेच लागू पडत असावे, असा माझा कयास आहे.)
आमच्या या प्राण्याचे एकंदर व्यक्तिमत्व हे घरातल्या एखाद्या बिघडलेल्या मुलीसारखे असते. केव्हाही वेळीअवेळी घरात येणार. घरातली यच्चयावत माणसे आपल्याकडे पाहत आहेत याची पूर्ण जाणीव असूनसुद्धा खुशाल दुर्लक्ष करून आपल्या आवडत्या जागेवर जाऊन बसणार. दिवसातून दहा वेळा आपले अंग चाटुनपुसून साफ करणार. गल्लीतल्या उनाड बोक्यांना विनाकारण नादी लावणार इत्यादि. सकाळी आणि संध्याकाळी बरोबर चहाची वेळ झाली, म्हणजे मांजर अंगाला आळोखेपिळोखे देत घरात हजर. त्यानंतर जो कुणी उभा असेल, किंवा खुर्चीवर बसला असेल त्याच्या पायाशी लाडीक चाळे, मधूनच एखादे मंजूळ "म्यांव" वगैरे. ही सगळी लाडीगोडी दुधासाठी आहे, हे आपल्याला कळत असूनही आपण उगाच त्याच्या डोक्यावर हात फिरवायचा. कारण एवढी एकच वेळ असते जेव्हा मांजर निवांतपणे आपल्याला डोक्यावर हात फिरवू देते. (मांजराचे डोके विलक्षण मऊ असते. एकदा आईने दुधाची ताटली पुढे केली, की त्याचा आपला संबंध संपला. नंतर डोळे मिटून दुधावर ताव मारायचा, एकदा मस्तपैकी मिशीवर जीभ फिरवायची आणि मजेत चालू लागायचे. पोट भरलेल्या मांजराचे लाड करणे केवळ अशक्य. तुम्ही तिच्या नुसते जवळ गेलात तरी 'Mind your own business' असा एक तुच्छ कटाक्ष टाकून मांजर चालू पडते.
खरं तर अजून एक दुसरी वेळ असते. हिवाळ्याच्या दिवसात सकाळी आठ वाजता ’गोव्याच्या बीचवर सनबाथ घेत पहुडलेल्या विदेशी ललनेप्रमाणे’ मांजर घराच्या मागच्या ओट्यावर ऊन खात बसलेली असते. अशा वेळी मांजर आपल्या अंगाचे असे काही मुटकुळे करते की तिचा एकही पंजा बाहेर दिसत नाही. आपण तिच्याजवळ जायचे. तिला हे फारसे पसंत पडत नाही, पण उठून दुसरीकडे जाण्याचा अंमळ कंटाळा आल्याने ती आपल्याला हात लावू देते. आपण डोक्यावर हात फिरवावा. ती डोळे बंद करते. आपण मानेवर, पाठीवर हात फिरवल्यावर ती कंठातून ’गर्रर्रर्र....’ असा काहीसा आवाज काढते. हा आवाज पसंतादर्शक असतो की नापसंतीदर्शक, ते मला आजवर कळलेले नाही.थोड्या वेळाने मांजरालाही आपला उबदार हात आवडू लागतो. मग मांजर उगाच मान तिरपी करून "आता इकडे जरा खाजव, कानाच्या मागे.. आता जरा गळ्याला.." असे सिग्नल्स देते. कालांतराने आपल्याला न्हावी असल्याचे फिलींग येऊ लागते !
मांजर प्रचंड स्वार्थी प्राणी आहे. एकदम कामापुरता मामा. पण एवढ्या एकाच गोष्टीसाठी मला मांजर फार आवडते ! मांजर आपल्या नैसर्गिक प्रेरणांशी प्रामाणिक असते. त्याने आपली Dignity सोडलेली नाही. कुत्रा जसा माणसाच्या आहारी गेला आहे, तसे मांजर गेलेले नाही. कुत्र्याच्या डोळ्यात असंख्य वेळा दिसतात, तसे आशाळभूत भाव मांजराच्या डोळ्यात मला कधीच दिसलेले नाहीत. खरं तर मराठी भाषेत ’आशाळभूत’ हा शब्द आपले अस्तित्व टिकवून आहे, तो केवळ ’कुत्रा’ या प्राण्यामुळे ! मांजराने रस्त्यात येणे अशुभ मानले जाते. पण मांजराला जीवे मारले तर फार मोठे पाप लागते, अशी समजूत आहे. खरं तर मांजराचा कुठल्याही देवाकडे वशीला नाही. मांजर कुठल्या देवाचे वाहन नाही. पुराणकथांमधे त्याचे फार उल्लेख वगैरे नाहीत. तरीही मांजराला मारण्याचा आपल्याकडे इतका बाऊ का करतात, हे मला अजून कळलेले नाही.
कारण काहीही असो, मांजराला मारता येत नाही हे किती चांगले आहे; नाही?
4 Aug 2010 - 12:38 am | मीनल
मस्त आणि अगदी खरे खुरे लिहिले आहे मांजराबद्दल. आवडले.
4 Aug 2010 - 2:12 am | बेसनलाडू
फार आवडला.
(श्वानप्रेमी)बेसनलाडू
ड्यांबिस (पिवळा नव्हे!) हा इंग्रजी शब्द अस्तित्त्वात येण्यासही मांजरच प्रेरणा असावी, असे वाटते.
(अंदाजपंचे)बेसनलाडू
3 Aug 2010 - 11:14 pm | पांथस्थ
च्यामारी माणसाने वाट्टेल त्या इच्छा पुर्ण कराव्या...मग प्राण्यांनी काय घोडे मारले आहे.
आम्ही एक कुत्री पाळली होती - लिली. आमच्या घरातल्या सगळ्यांचा तिच्यावर खुप जीव होता आणि तिचा पण सगळ्यांवर खुप जीव होता. आजीने फोन केला तर ती आधी लिलीची विचारपुस करायची. असो.
एकदा घरी मलई बर्फी आणली होती. बराच वेळ लिली दिसेना म्हणुन शोधायला गेलो तर बाईसाहेब स्वयंपाकघरात ओट्यावर चढुन मस्त पैकी बर्फी खात होत्या. हे पाहुन आम्हाला सगळ्यांना फार हसु आले. इतर वेळी घरात काहि खास बनवले असेल किंवा आणले असेल तर ती हक्काने मागुन घ्यायची. आता कसे मागायची ई.ई. प्रश्न विचारु नका.
प्राणी पाळुन बघा मग कळेल ते कीती लळा लावतात ते.
4 Aug 2010 - 1:09 am | पक्या
आमच्या मामाकडचा कुत्रा घरात मामी शिर्यासाठी रवा भाजत असली की असेल तिथून धावत येतो. त्याला रव्याचा भाजतानचा वास खूप आवडतो. शिराही आवडतो.
जेवायची वेळ झाली की त्याला तव्यावरची गरम पोळी लागते. मामी पण त्याला गरम गरमच पोळ्या करुन देते.