कट्टा!

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in काथ्याकूट
26 Jul 2010 - 9:17 pm
गाभा: 

‘ग्रंथ माझे गुरु, ग्रंथ मायबाप, निवविती ताप, हृदयाचा’ ... एका ओळीत वाचनसंस्कृतीचं माहात्म्य वर्णन करणारं हे वचन ग्रंथांचं महत्त्व सिद्ध करतं, तेव्हा ग्रंथप्रेमींना कृतकृत्य वाटत असेल. पुस्तकांच्या किंमतीचा विचारही न करता ती मिळवण्यासाठी वणवण करणारे पुस्तकभक्त पाहिले, की ‘वाचनापायी वाट्टेल ते’ करायची तयारी असलेल्या पुस्तकवेड्यांच्या वाचनभुकेला दाद द्यावीशी वाटते. एखाद्याकडे अमुक एक पुस्तक आहे, असं कळलं, की झपाटल्यासारखं होणारे पुस्तकप्रेमी पुस्तकविश्ववर दिसतात, तेव्हा वाचनसंस्कृतीच्या या पुजा-यांच्या पंक्तीत आपण खूप शेवटच्या पानावर आहोत, याची जाणीव होते. पण इथे वाचनभक्तीला आलेला महापूर पाहून ऊर भरून होते.. मग रिंगणात उतरावंसंही वाटू लागलं, आणि कदाचित, कळत नकळत खेचला गेलो. तरीही, पुस्तकांचा उभ्याउभ्या फडशा पाडावा, अशी मानसिकता कधी होईलसे मला वाटत नाही. पण कधी एखादे चांगले पुस्तक वाचावे, ते इतरांशी शेअर करावे, ही इथली कल्पना आणखी कशी विस्तारता येईल, यावर विचार व्हावासे वाटते. गावोगावी, वेगवेगळ्या शहरांत पसरलेल्या पुस्तकप्रेमींसाठी काही करता येईल का... संगणकाच्या पडद्यावर पुस्तक वाचण्यापेक्षा, हाताला होणारा पुस्तकांचा स्पर्श अधिक सुखावणारा असतो. तो अनुभव घेता यावा, असं काहीतरी इथे उभं राहावं, अशी अपेक्षा आहे. हाईड पार्कच्या धर्तीवर मुंबईत सुरु झालेल्या ‘अत्रे कट्ट्या’नं आता चांगलं मूळ धरलंय... नवनव्या विशयांवर चर्चा, भाषणं, वैचारिक देवाणघेवाण आणि कधी, पुस्तकं, संदर्भग्रंथांची देवाणघेवाणही होते. पुस्तकवेड्यांचा असा एखादा ‘कट्टा’ ठिकठिकाणी उभा राहिला तर?...
कल्पना कशी वाटते? कसा करता येईल हा कट्टा? काय असावं त्याचं स्वरूप? कोण चालवेल तो सातत्यानं? आपलं आणि कट्ट्याचं नातं काय असाव?...
चर्चा शक्य आहे. कदाचित आणखी एखादा चांगला उपक्रम उभा राहील.
... तुम्हाला काय वाटतं?

प्रतिक्रिया

पारुबाई's picture

27 Jul 2010 - 1:25 am | पारुबाई

कल्पना सुरेख आहे.

अत्रे कट्टा म्हणजे काय ? ते सान्गाल का ?

प्रकाश घाटपांडे's picture

27 Jul 2010 - 8:35 am | प्रकाश घाटपांडे

पुर्वी पारावर च्या गप्पा गावात होत असत. त्यात माहिती ची देवाण घेवाण, सुख दु:खाचे वाटप यातुन नाती दृढ होत असत. हल्ली अड्डा नावाच्या कल्पनेतुन ही तस होत असत. झालर फक्त वेगळी.
मिपा हा देखील कट्टाच आहे की!