मित्रानो.आम्हाला आता तुमच्या येउन चांगली ६ पेक्षा जास्तवर्षे झाली.
तुमच्यातलेच होउन आम्ही आलो.तुमच्या जिवनाचा एक भाग झालो. तुमचे बरेचसे कार्यक्रम आमच्या वर अवलंबुन असतात हे ठौक आहे आम्हाला.
मनोरन्जन आणि ऍडीक्षन यातली सीमा रेषा अस्पष्ट आहे हे ओळखून आम्ही सुरुवात केली.एका घरातल्या कहाणीने.
त्याला जोड मिळाली सासुबाईची. सून बाई आता सासु झाली हे ओळखुन ती वागु लागली पण आमचे कुतुहल तसेच राहीले.
तुम्ही केवळ आमचे फ्यान उरला नाही त्तर तुम्हाला आमची ऍडीक्षन झाली आहे.
हे सगळे होत असताना आमच्यावर काय काय प्रसंग आले...सासुची लग्ने झाली....आज्या नटमोगर्या होउन नाचु लागल्या....पोटच्या पोराचा गोळी घालुन खून करनारी आय उर्फ मदर ईंन्डीया बी भेटली.....
सख्ख्या बायकोला पत्त्याच्या डावावर लावणारा पोरगा बी भेटला........
सासुबाईचा सूड घ्यायचा म्हणुन पोरगी पटवणारा जावई पाह्यला.....
त्या जावयाला पण हाकलला
सासरा वकिलीण बायच्या प्रेमात पडला......सूनेने त्याला त्यात मदत केली
सगळे सासरे गपचिप राह्यले........
नवरा बेपत्ता झाला( त्याला काढुन टाकल्यामुळे...ईर्षाद) नवा पती हा जुन्या पतीचा खूनी आहे हे कळताच त्याचा काटा काढला
आयुष्यात हे असे घडायचेच की असे समजुन आम्ही गपचीप राह्यलो..........
बिझनेस्स च्या पार्ट्या तर न्हेमीच जोरात आण जब्बर्दस्त होतात
आम्हाला कुणी दिकुन विचारले नाय पण या सगळ्यात आमचे आमालाच एक गूढ वाटुन राह्यलय........
आमची मदत करता का जरा............
जरा आमच्या धन्यांचा बिझनेस्स नक्की काय ? ते नक्की काय करतात हे सांगता का. ( सदान कदा घरातच पडीक असतात..)
कळावे आपल्या केकता कपूरच्या सिरीयल मध्ये केकाटणार्या
..................तुळसाबाई ( भ्र्.मिहीर्भौ) विराणी आन पार्वतीबाय अगरवाळ
.............एक गूढ
गाभा:
प्रतिक्रिया
2 Apr 2008 - 2:21 pm | विजुभाऊ
काय सुट्तय का कोडे?
2 Apr 2008 - 2:28 pm | मनस्वी
काहीही उद्योग असला तरी तो उल्हासनगरमध्येच असावा असा दाट संशय आहे.
2 Apr 2008 - 2:30 pm | धमाल मुलगा
हे काहीतरी केकता कपूरच॑ झे॑गट दिसतय.
आपण असल॑ अश्लील, बिभत्स, चावट, काहीही बघत नसल्यामुळे....
पास...
2 Apr 2008 - 2:42 pm | मनस्वी
तरी तुझा अंदाज काय आहे.. काहीतरी सांगितलंच पाहिजे.. सामोश्याची गाडी, कुल्फीची हातगाडी, फालुद्याची टपरी..
तू त्या सिरिअल्स बघतोस की नाही ह्याच्याशी काही एक कर्तव्य नाही. तुला काय वाटतंय काय असावा त्यांचा उद्योग.
अवांतर : अशीच एक अंगावर येणारी - या दु:खांनो या
(भयंकर आणि जीवघेण्या मालिका न बघणारी) मनस्वी
2 Apr 2008 - 4:35 pm | सृष्टीलावण्या
प्रपंच, श्री. गंगाधर टिपरे किंवा झोका या सारख्या मालिकाच लोकप्रियतेच्या शिखरावर असताना बंद केल्या जातात मात्र अश्या मालिका फार थोड्या.
इतर मात्र तेच ते दळण वर्षानुवर्षे दळत राहातात. त्यांना वैतागलेल्या प्रेक्षकांनी त्यांची ठेवलेली नवी नावे -
या सुखांनो या =या दु:खांनो या
अवन्तिका = अजून्तिका (मालिका चालूच आहे?)
ह्या गोजिरवाण्या घरात = ह्या फाजील लोकांच्या घरात
आभाळमाया = ढाळमाया
चार दिवस सासूचे = चाळीस क्षण छळाचे
नशीब त्या जस्सी मालिकेत अखेर सुरवंटाचे फूलपाखरू झाले नाहीतर तो जस्सी नावाचा ढापणा सुरवंट अजून किती वर्ष पाहावा लागला असता कोण जाणे?
असो. मूळ मुद्दा - मालिकेचा नायक काय करतो? (नाहीतर तात्या रागावतील ना..)
उत्तर - मी फार पूर्वी अश्वी बु. ला गेले होते तिथे एक मोठे जमीनदार, त्यांचे म्हातारे वडिल अखंड शेतात राबायचे आणि त्यांचा लहान भाऊ दिवसभर घरात छान, छान कपडे घालून असायचा.
मी एकदा कुतुहलाने विचारले की तो भाऊ घरी काय करतो त्यावर ते जमीनदार उत्तरले, तो ना, तो देण्या-घेण्याचा व्यवसाय करतो. मी बुचकळ्यात की हा कुठला व्यवसाय...
माझ्या चेहर्यावर प्रश्नचिन्ह पाहून ते शांतपणे म्हणाले, तो जांभया देतो आणि झोपा घेतो.
>
>
मधून मेघ हे नभास ग्रासती, मधेच ह्या विजा भयाण हासती, दहा दिशांतूनी तूफान व्हायचे..
2 Apr 2008 - 5:28 pm | मनस्वी
ह्या गोजिरवाण्या घरात = ह्या लाजिरवाण्या घरात
चार दिवस सासूचे = फार दिवस सासूचे
2 Apr 2008 - 11:39 pm | भाग्यश्री
अवन्तिका --> शोकांतिका... (अंत होता होत नव्हता.. झाला तरी कसला फालतू.. इतकी वर्ष दळण लावलं की ती अवंतिका नक्की कुणाशी लग्न करेल, पण शेवट नुस्ताच संदिग्ध ठेवला... )
ती वादळवाट पण अशीच... शेवट सगळा प्रेक्षकांवर सोडुन दिला.. अरे याला काय अर्थ !
पण वादळवाट तशी जरा तरी बरी होती.. बाकीचे प्रकार असह्य आहेत्/होते...
मला कळत नाही, टिपरे,४०५ आनंदवन,प्रपंच्,पिंपळपान,... आणि अशा बर्याच सिरियल्स लवकर अथवा अर्ध्यावर संपतात्..आणि तद्दन भिकार सिरियल्स वर्षानुवर्ष का चालत राहतात... :((
3 Apr 2008 - 10:07 am | धमाल मुलगा
४०५ आन॑दवन तर एकदम मस्त होती. मला खूप आवडायची.
पण आता वाटत॑ ह्या सगळ्या चा॑गल्या मालिका लवकर ब॑द झाल्या तेच बर॑ झाल॑. नाहीतर उगाच वाढवत न्यायची म्हणून 'पहिल्या प॑क्तीला श्रीख॑ड, आणि पाणी घाल-घालून शेवटल्या प॑क्तिला त्या॑चीच बासु॑दी' असल॑ झाल॑ असत॑ तर जास्त वाईट वाटल॑ असत॑.
- (४०५ आन॑दवनातल्या बॉबीचा मित्र) ध मा ल.
3 Apr 2008 - 10:20 am | मनापासुन
बासुन्दी नाय रे पियुष............ श्रीखंडाचे पातेले घ्यावे..ते चांगले स्वच्छ धुवावे. धुतलेले पाणी भांद्यात घ्यावे.त्यात थोदे बर्फ / वेलदोडे टाकावे/ आवडत असल्यास वर मस्त पैकी गुलाबाच्या पाकळ्या टाकाव्यात आणि पाहुण्याना द्यावे( घरचे श्रीखंड खाउन कंटाळलेले असतात्.त्याना या पदार्थाचे कौतुक अज्याबात नसते)
बासुन्दी दुधाची असते......उगाच कैच्याकै वदु नको......इथले खवैये रागवतील अन उगाच नवा पदार्थाचा शोध लागेल.
........काय वाट्टॅल ते करुन बघुया अगदी..... मनापासुन
3 Apr 2008 - 10:55 am | मनस्वी
तुम्ही तुमच्याकडे आलेल्या पाहुण्यांची सरबराई मनापासून अशी करता तर!
3 Apr 2008 - 11:02 am | मनापासुन
पाहुणे म्हणुन येउन बघा.......
आम्ही तुमची मनापासुन सरबराई करु
पण खरच पियुष ची पाकक्रुती ही अशीच आहे .
श्रीखंड किंचीत आंबट झालेले असते. त्यात वेलदोडे ,बर्फ , वाळ्याचा इसेन्स खरेच जान आणतात त्यात्...अगदी मनापासुन
4 Apr 2008 - 3:08 am | भाग्यश्री
ह्म्म.. लवकर संपल्या म्हणून चांगल्या मालिका म्हणायचं, दुसरं काय...
पण ४०५ कधी बंदच होऊ नये असं वाटायचं... :(
असो.. विषयांतर होतय.. या सिरियल मधल्या लोकांचा उद्द्योग सांगणं महाकठीण काम आहे!
आणि त्या सिरियल्स पाहणार्या लोकांचं टीव्ही पाहणं, कमी करणं हे सुद्धा!! :(((
(इडीयट बॉक्स च्या इडीयट सिरियल्स न पाहणारी) भाग्यश्री....
2 Apr 2008 - 3:39 pm | धमाल मुलगा
म्हणजे काय, तर एकूण आमच्या अकलेचे तारे तोडल्याशिवाय गत्य॑तर नाही!
एकूण ह्या॑च॑ राहणीमान पाहता बक्कळ पैसेवाले असावेत. आता भरपूर पैसा कमवायचा तर कामही तेव्हढ॑च करण॑ क्रमप्राप्त आहे. पण ही समस्त जमात घरीच पडीक दिसते.ह्यावरुन माझा असा अ॑दाज आहे की...
१.कर्ता पुरुष उर्फ बाबूजी:
बेकायदा हातभट्ट्या आणि गावठी दारुचे गुत्ते.
(त्याशिवाय का एव्हढा पैसा जमतो? माझ्या ओळखीतला असाच एक भट्टीवाला आहे जो अगदी डिट्टो ह्या शिरियल्समध्ये दाखवतात तसल॑ लाईफस्टाईलमध्ये जगतो. वर मला म्हणतो, "काय पाटील, काय ठिवल॑य त्या क्या॑पुटरच्या नोकरीत? आपल्या लाईनीत पैसा टाका आन् निस्त॑ बसा खुर्ची टाकून माळावर. पोत्यान॑ पैसा येतोय बगा घरी.")
२.थोरले चिर॑जीवः
शेट्टीबरोबर भागीदारीत डान्सबार. भागीदारी आसल्यामुळे रात्री किती गल्ला जमलाय हे बघायला एखादी चक्कर पुरेशी! बाकीची उस्तवारी बघेल शेट्टी.
३.दुसरे चिर॑जीवः
सट्टेबाज. देशातल्या अव्वल बुकीजमध्ये ह्या॑च॑ नाव अग्रणी. एक दोन लॅपटॉप आणि दहा प॑धरा मोबाईल असले की झाल॑ ह्या॑च॑ हापिस तयार. मग हाटीलात बसा, नायतर घरी स॑डासात. रे॑ज मिळाल्याशी कारण! त्यामुळे हे देखील घरीच.
४.तिसरे चिर॑जीवः
वरीलपैकी कोणत्याही क्षेत्रात कौशल्य नाही, पि॑ड सात्वीकतेकडे झुकणारा असल्याने बेरोजगार...म्हणून हे देखील घरी. आता बाकीचे खोर्याने ओढताहेत म्हणल्यावर नाही बबड्यान॑ काम केल॑ तर काय बिघडल॑?
५.कन्या:
गर्भश्रिम॑ता॑च्या पोरा॑ना आपल्या नादी लावणे. ह्यामुळे तिची वैयक्तिक कमाई दोन्ही दादा॑च्या एकूण कमाईपेक्षा काकणभर जास्त.
(आत्ता मला कळल॑ कर्ता पुरुष "कर्तबगार" असण॑ म्हणजे काय!)
-(ऍनालिस्ट) ध मा ल.
2 Apr 2008 - 4:35 pm | छोटा डॉन
आता धम्याने सुरवात केली आहे तर आमचेही काही [नसलेल्या] अकलेचे तारे जमीन पर ....
१.कर्ता पुरुष उर्फ बाबूजी अथवा चिरंजीव :
पेशा :
राजकारणी - बाबा यासारखा फुकटचा पैसा दुसर्या कुठल्याही क्षेत्रात नाही. फक्त थोडी निर्लज्जता, थोडी गेंड्याची कातडी व प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याची वॄत्ती असली की झाले. जिंदगानीच्या सुरवातीला "दुसर्यांच्या वाढदिवसाचे फलक लावले, थोडी दगडफेक केली, कुणाला काळे फासले/घेराव घातला, कुणाचा पुतळा जाळला" की मग बाकी जिंदगी फक्त "फोन" करून "पेट्या गोळा" करायचीच ...
फक्त घरात पडीक असणं तसे अवघड ....
विजय मल्यासारखे मद्यसम्राट : आता वर धमुने सांगितले आहेच "दारूतल्या पैशाबद्दल", ही फक्त त्याची फॅशनेबल आवॄत्ती. काम तर नसतेच , पैसा ५० पिढ्यांना पुरल एवढा मग काय काढा विमानकंपन्या, फॉर्म्युला वन रेस कार टीम, लावा घोड्यावर पैसे, हिंडा नव्यानव्या हिरॉईनीला बरोबर घेऊन. आता एवढे सगळे असल्यावर बिझनेस्स च्या पार्ट्या तर न्हेमीच जोरात आण जब्बर्दस्त होतात.
[ व्यक्तीशा माझी विजय मल्याबद्दल अशी मते नाहीत ...]
साखरसंम्राट / शिक्षणसम्राट :
काहीही काम नसते, फक्त घरात पडून राहायचे व येणाजाणार्यांवर गुरकत बसायचे. मधन अधन कुणाला तरी फोन करून दम द्यायचा, जमल्यास चौकीत जाऊन पोलीसाच्या विनाकारण कानफाटात हाणायची.
कधी मधी मूड आल्यास " डेंगळ्या माझे जॅकेट काढ, माझी जीप काढ " म्हणून मौहोल करायचा व कुढे तरी जाऊन दादागिरी करायची...
शिक्षणसम्राट असल्यास "स्वताची पोरं" शिकत नाहीतच त्यामुळे पोरं पुढे बापाच्याच पावलावर पाऊल टाकतात ...
कन्या: माझ्या मताप्रमाणे [ व बुद्धीच्या कुवतीप्रमाणे] "राखी सावंत" सारखी आयटेम गर्ल. "अंगच्या" काही गुणामुळे प्रसिद्धी / पैसा मिळतोच, झालचं तर काही सिनेमे मिळून "पेज थ्री" वर झळकता येते, पार्ट्यातून तोंड वर करून हिंडता येते. यातले काहीच नसेल तर [आधीच अक्कल नसल्याने] मुर्खासारखी विधाने करून प्रसिद्धी मिळते, त्याबरोबर पैसाही मिळतो....
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
3 Apr 2008 - 10:12 am | मनापासुन
काल सग्ळ्या चॅनेल वर ब्रेकिंग न्युज होती.तुळसी परत येतेय्...(तात्या परत येतोय सारखेच की हे)
तदमाताय आपल्या लोकाना काय ब्रेकिंग वाटेल त्याचा काय नेम नाय.
य लोकांचा म्हणजे सिरीयल मधल्या व्यवसाय मला वाटते विराणी चा उद्योग धान्याचे गोडाउन
"एक चिमणी आली दाणा घेतला भुर्रर्रर्रर्र उडुन गेली............."
हे वीराणी लोक बाकी जब्बरच्.त्यांच्या घरात नोकर पण दीसत नाहीत्...त्यांचे कपडे कोण धुते कोण जाणे ?धान्य कोण आणते?
( य प्रश्नाला "अले च्चा बिच्चाला....शोले तल्या ठाकुल चे *** कोण धुते? याच्याशी तुलना होते)
त्यांच्या घरात नळ गळताना दिसत नाहीत.मोर्या तुम्बत नाहीत / हे लोक झोपताना पट्ट्यापट्ट्याची लुंगी वापरतात का?
असो.....मला वाटते वरील सर्व कामे म्हणजे गळके नळ दुरुस्त करणे ,मोर्या मोकळ्या करणे धान्य आणणे ही कामे करत असावीत.
अमिताभ भौ प्रमाणे त्यानी अगोदरच स्वतःला शेतकरी डीक्लेर केल्यामुळे जब्बर कर्ज काढुन त्यावर माफी घेतली असेल
अगरवाळ फ्यामीली कधीतरी त्यांच्या मील वर दाखवली होती....(कसलीहोती कोण जाणे. फ्लोअर मील?).ती पण जळुन गेली त्यामुळे इन्शुरन्स चे पैसे मिळाले असतील.दर महीन्याचे बाजुला ठेउन / वाण्याची अन दुधाची उधारी भागवुन राहीलेले पैषे अन रक्कम पोष्टाच्या खात्यात टाकुन दीली असेल.
बाकी सगळे व्यवहार देण्या घेण्याचेच्......म्हणजे जांभई देण्याचे अन झोप घेण्याचे........
खरे तर अगदी गुप्त खबर्............फार कोणाला सांगु नका
सिरीयल मधल्या बाया ईतक्या साड्या नेसतात की काय सांगु नका.ही सगळी बाप्ये मंडळी त्या साड्यांच्या घड्या करतात.
त्यामुळे बाकी काही करायला वेळच मिळत नाही त्याना
मिपा वर हे कळले तर काय खैर नाय्......व्यायसायीक गुपीत फोडल्या बद्दल
गुप्त नसणारा मनापासुन गुप्तहेर.
3 Apr 2008 - 10:31 am | मनस्वी
त्यांचे मोठ्या मोठ्या मॉल्सचे फ्रॅन्चायझी असावेत. फूड मॉल, कपड्यांचा मॉल, दागिन्यांचा मॉल, मल्टी-युटीलिटी मॉल, मल्टीप्लेक्स इ. म्हणजे तिकडे २०-५० मॅनेजरस् ना लावून स्वतः चकाट्या पिटायला मोकळे.
3 Apr 2008 - 1:45 pm | आर्य
आ हा हा .........कय अठवण करुन दिलीत - टिपरे,४ ०५ आनंदवन, प्रपंच् काय मलीका होत्या. सह कुटुंब बघण्याजोग्या ....यातच सुरभी हि आवडत (शेजार्यांची नाही - बाकी काकू फार लक्ष ठेऊन आसतात हल्ली असो..) तर दुरदर्शन वाली..........
बाकी मालीका म्हणजे सकाळ्च्या..............विधी वाल्या
मेघ दाटले = ................
वादळवाट = .................शेवट पळवाट
झालेमोकळे आकाष =......... आनंदी आनंद..........
साखरसंम्राट / शिक्षणसम्राट या पश्चिम महाराष्ट्रात दखवतो ऐक पेक्षा ऐक ऊदाहरण......डिक्टो फिल्मी
3 Apr 2008 - 4:59 pm | मनापासुन
सारे कळतनकळतच घडते सारे कळतनकळतच घडते सारे कळतनकळतच घडते सारे कळतनकळतच घडते
हे गाणे मराठीला एक नवा जोडशब्द देउन गेले.......
मला तर मराठी मालीकेमधली टायटल चीगाणीच ऐकायला आवडतात
अगदी अवन्तिका / वादळ्वाट / अधुरी एक कहाणी / मस्तच होती ही गाणी
यांची सी डी मिळेल का कुठे?
3 Apr 2008 - 5:26 pm | सृष्टीलावण्या
श्रीयुत गंगाधर टिपरे या सारख्या सर्व मराठी मालिकांची शीर्षक गीते कूलटोड वर डाऊनलोड करता येतात.
>
>
बा आनंदी पक्ष्या देई, प्रसाद अपुला मजला काही, जेणे मन हे गुंगून जाई प्रेमाच्या डोई...
3 Apr 2008 - 5:04 pm | चतुरंग
हे मालिकेचे शीर्षकगीत आहे ह्यावर विश्वासच बसत नाही. (बहुदा 'श्वेतांबरा'चे शीर्षकगीत होते)
गंगाधर टिपरे तर इतकी छान मालिका आहे की आमचा ६ वर्षाचा मुलगाही आवडीने पाहतो.
ह्या मालिकेचे काही भाग इथे बघता येतील.
चतुरंग
3 Apr 2008 - 8:21 pm | llपुण्याचे पेशवेll
पुण्याचे पेशवे
4 Apr 2008 - 12:18 am | मनापासुन
मूळ प्रश्न बाजुलच रहातोआहे
मला तर वाटते ही धनी ( घरधनी या अर्थाने) मंडळी फावल्या वेळेत सकाळी उगाचच नमस्ते सदा वत्स* किंवा दक्ष : आरम" असे काही तरी आरडा ओरडा करत असतील्.....त्या शिवाय का एवढा वेळ मिळतो. साड्यांच्या घड्या तरी किती वेळ घालणार्? मग हाउसेखातर ते वेळ मिळताक्षणी जेवण वगैरे करत असतील.
त्यांची दिन चर्या अशी असेल
१) सकाळी उठणे ( याला ही काही लोक कामाचा भाग समजतात) ही वेळ साधारण १२:३० पर्यन्त धरणे( जर्सी गाई गोठ्यातुन बाहेर जात नाहीत त्यामुळे गोरज मूहूर्त गाईनाचमाहीत नसतात)
२) हा कार्यभाग( हा शब्द नेहमी वेगळ्या अर्थाने च का वापरतात? उदा: त्याने वसुधेला आपला कार्यभाग साधुब झाल्यावर तसेच सोडुन दिले) तर हा कार्य भाग झाल्यावर दात / तोन्ड खसा खसा धुणे आणि पुसणे ( हे ही कामच आहे)
३) नन्तर प्रातः कालीन पेय पिण्यासाठी बसणे व पिउन उठणे ( हे ही कामच आहे)
४) टी व्ही वर बातम्या बघणे....( हे ही कामच आहे)
५)पेपर उलगडुन ठेवणे
६) कपडे बदलणे व कालचे कपडे जागा मिळेल तिथे भिरकाउन देणे
७) आंघोळ करणे ( हे ही कामच आहे)
८) कपडे घालणे
९) बायको म्हणजे सिरीअल मधे त्यावेळी जी हजर असेल ती स्त्री जातीची व्यक्ती शी बोलणे. सगळ्या सिरीअल्स मधे कपडे आणि रोल सारखेच असतात त्यामुळे कोण कोठे असले तरी फरक पडत नाही
१०)डायलॉग पण इकडचे तिकडे झाले तरी फरक पडत नाही
११) पार्टीला जायची तयारी करणे
१२) पार्टीला जाणे
१३) तिथे कोणाशी तरी भांडण उकरुन काढने...बरोबर स्त्री जातीचे कपडे घातलेली व्यक्ती असेल तर हा प्रश्न त्या व्यक्तीवर सोपौन मोकळे होता येते.
१४)प्रत्यक्ष भांडणे
१५) रागारागात गाडीत बसणे
१६) गाडी चालवताना कोणालातरी ऊडवणे ( हे ही कामच आहे)
२७) वकिलाला फोन करणे
२८) थोडा वेळ जेलमधे जाणे( हे ही कामच आहे)
२९) कोर्टात विटनेस बॉक्स मधे उभे रहाणे
३०) तो पर्यन्त सन्ध्याकाळ होते...कोर्ट ऍड्जॉर्न...
या पुढचे बाकी सीरिअल च्या पुढच्या भागा साठी ...........( गोट्या सीरिअल चालु होती तेंव्हा...मध्यन्तरानन्तर म्हणजे ब्रेक नन्तर निवेदक म्हणायचा "आता पहा गोट्याचा पुढील भाग...........")
असो....आता मला सांगा या सगळ्या गडबडीत पाठीवर मारा पोटावर मारु नका असे कसे अन केंव्हा म्हणणार?
4 Apr 2008 - 11:22 am | विजुभाऊ
वा बराच अभ्यास दिसतो तुमचा......अगदी स्टेपवाईज लिहीलेय
4 Apr 2008 - 9:53 am | विजुभाऊ
...........( गोट्या सीरिअल चालु होती तेंव्हा...मध्यन्तरानन्तर म्हणजे ब्रेक नन्तर निवेदक म्हणायचा "आता पहा गोट्याचा पुढील भाग...........")