पालेभाजी - अंबाडी

जागु's picture
जागु in पाककृती
17 Jul 2010 - 10:26 pm

लागणारे साहित्य:
१ जुडी अंबाडीची पाने धुवुन चिरुन
पाव वाटी तांदळाची कणी
पाव वाटी तुरडाळ
१ गड्डा लसुण ठेचुन
३-४ लाल मिरच्या
राई, जिर, हिंग, हळद
मिरचीपुड १ चमचा
चविपुरते मिठ
थोडा गुळ
तेल

पाककृती:
कुकरमध्ये तेलावर लसणाची फोडणी देउन त्यात लाल मिरची, राई, जिर, हिंग, हळद घालुन त्यावर कणी, तुरडाळ व चिरलेली भाजी घालावी मग गरजेपेक्षा थोडे जास्त पाणी घालावे. त्यात मिरची पुड, मिठ, गुळ घालावा. आणि कुकरला २ ते ३ शिट्ट्या द्यायच्या. झाली तयार अंबाडीची आमटी

आंबोळी यांच्या मागणीवरुन.

प्रतिक्रिया

रेवती's picture

18 Jul 2010 - 2:24 am | रेवती

माझी आवडती भाजी!
भाकरीबरोबर भन्नाट लागते!
जागुतै, तुझी भाजी करण्याची पद्धत वेगळी आणि आमटीच्या अंगाने जाणारी दिसते. मला ती नविनच समजली.
मी जी करते ती साधारण गोळा भाजीच्या जवळ जाणारी आहे.
भाजी उकडून घेतल्यावर अतोनात आंबट असेल तर थोडी पिळून घावी लागते. थोडे बेसन लावून मग शिजलेली कणी घालते बाकी कृती सेम!
पानात वाढून घेतल्यावर त्यावर जास्तीची लसणीची फोडणी करून घालते. एवढ्यात ही भाजी मिळाली तर बघते. करायलाच हवी! :)

रेवती

शिल्पा ब's picture

18 Jul 2010 - 2:39 am | शिल्पा ब

रेवतीताई तुम्ही पण तुमची कृती इथेच डिटेलमध्ये लिहा म्हणजे दोन्ही प्रकारे भाजी करून बघता येईल.

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

सहज's picture

18 Jul 2010 - 10:50 am | सहज

रेवतीताई म्हणतात तशी बेसन, गुळ असलेली अंबाडीची गोळा भाजी माहीत आहे. पण ही आमटी पण छान पौष्टीक वाटते आहे.

धन्यु!

प्रभो's picture

18 Jul 2010 - 9:40 pm | प्रभो

येस्स.....माझी आई पण अशीच बनवते.....

माझी आवडती भाजी.....

आशिष सुर्वे's picture

18 Jul 2010 - 10:42 am | आशिष सुर्वे

गावी गेल्यावर माझी आजी ही भाजी करून खाऊ घालायची..
एकच फरक होता, लाल मिरच्यांऐवजी ती हिरव्या मिरच्या टाकायची.. तांदळाच्या भाकरीबरोबर्र एकदम सरस लागते ही भाजी.
मी लसूण खायला टाळाटाळ करायचो तेव्हा आजी म्हणायची.. ''खा बावा, लसनीने हाडं मजबूत होतात..''

======================
कोकणी फणस

आम्ही पन ब्लॉगतो बर्र का!
http://ashishsurve.blogspot.com/

जागु's picture

19 Jul 2010 - 11:06 am | जागु

रेवती खरच तुमची रेसिपीही टाका.
सहज, शिल्पा धन्यवाद.
प्रभो बर झाल तुम्ही लिहीलत की तुमची आई पण अशिच बनवते. नाहीतर म्हटल मी काय वेगळच केल की काय. कारण आमच्याकडे मी ही भाजी पहिलांदाच बनवली.
आशिष लसूण ह्या आमटीत, लसणाची चटणी छान लागते.

आंबोळी's picture

19 Jul 2010 - 11:15 am | आंबोळी

मस्तच....

आंबोळी

गणपा's picture

19 Jul 2010 - 1:22 pm | गणपा

तुम्ही सांगीतलेली अंबाडीची भाजी पाहिली आहे पण कधी चाखली नाही.

आमच्या घरा समोर एक झाड होतं, सधारण आवळ्याच्या झाडा एवढ. त्याला हिरव्या रंगाची, लहान लिंबाच्या आकाराची, काहीशी लांबट फळं यायची. त्याला पण अंबाडिचं म्हणायचे लोक.
ती फळं खुप आंबट असायची. आई त्यांचे लोणचे करायची आणि खारात टाकायची.

रामदास's picture

19 Jul 2010 - 9:09 pm | रामदास

प्रभू मास्तरांना मस्का मारणे.
ते थोडासा मस्का घरी नेतील. नंतर काही दिवसांनी सँक्शन आलं की आंबाड्याची भाजी ,सोबत उकड काढून केलेली तांदळाची भाकरी .
झालंच तर बटाट्याचे स्वांग .
डाळीचे तोंय आणि भात.
मग पोटात विठ्ठल विठ्ठल.

रेवती's picture

20 Jul 2010 - 2:06 am | रेवती

आठवलं हो आठवलं!
ग्रेटच चव आहे काकूंच्या हाताला!
मी मुंबईत रहात असते तर त्यांच्याकडेच स्वयंपाक शिकण्यासाठी गेले असते.

रेवती

जागु's picture

19 Jul 2010 - 2:09 pm | जागु

गणपा हे आंबाडे आहेत. हे पिकल्यावरही छान लागतात. ह्याचे लोणचे करतात. सध्या बाजारत भरपुर येत आहेत. मलाही घालायचे आहेत लोणचे.

jaypal's picture

19 Jul 2010 - 9:11 pm | jaypal

आणि शिळी ज्वारीची भाकरी + कांदा =P~ =P~ =P~
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

पर्नल नेने मराठे's picture

24 Jul 2010 - 4:48 pm | पर्नल नेने मराठे

मला आज अंबाडी मिळालिये.
आज भाजी करेन.
पण मी तुरडाळ न घालता तान्दळाच्या कण्या काढुन करणार आहे.
लाल मिरच्या व लसणाची फोडणी देइन वरुन..
भाकरी नाहि जमत ... खबुसाबरोबर खाइन.

वरिल हिरवी फळे भोकरं आहेत का?

चुचु