इराण, इस्लाम आणि दगडाने ठेचून मारण्याची कायदेशीर शिक्षा

हुप्प्या's picture
हुप्प्या in काथ्याकूट
9 Jul 2010 - 6:39 pm
गाभा: 

इराणमधे सकिने मोहम्मदी अश्तियानी (मराठी उच्चाराबद्दल संभ्रमित) ह्या चाळिशीच्या महिलेला दगडांनी ठेचून मारण्याची शिक्षा तिथल्या न्यायालयाने दिली होती. मानवाधिकारवाल्या लोकांनी जगभर रान उठवल्यामुळे ती शिक्षा रद्द झाली. ह्या बाईंना व्यभिचारी म्हणून ही शिक्षा दिली गेली. तिला ९९ फटक्यांची शिक्षा आधीच देऊन झाली आहे. संबंधित प्रकारात दुसरी व्यक्ती (बहुधा पुरुष) हिला काय शिक्षा मिळाली ते कळत नाही.

मराठी वृत्तपत्रात याविषयी फारसे काही आलेले आढळले नाही.

माझे मतः ह्या रानटी, कालबाह्य, क्रूर शिक्षेला कुठला सुसंस्कृत देश थारा देणार नाही. पण अस्सल इस्लमी कायदा जिथे लागू असतो तिथे हा प्रकार राजेरोस होतो. कुराणात ह्या प्रकारच्या "गुन्ह्याला" (इथे उभयता प्रगल्भ होते का, हे संबंध उभयतांच्या संमतीने झाले का वगैरे गोष्टी विचारात घेतल्या जात नाहीत) ही शिक्षा असल्याचे स्पष्टपणे लिहिले आहे. (चूभूद्याघ्या). त्यामुळे ते चुकीचे वगैरे म्हणणेही पाप आहे.

भारतातील मुस्लिमांचे ह्याविषयीचे मत काय आहे हे जाणून घ्यायला आवडेल. ह्या बाबतीत कुराणात लिहिलेले कालबाह्य आहे असे कुणी उघड म्हणेल का इथेही फतव्याची भीती आहे?

दुसरे असे की, आपले काय मत? प्रत्येक देशाला ह्या बाबतीत हवे ते करण्याची मुभा असावी की का शिक्षेचे काही प्रकार हे निर्विवादपणे रानटी समजले जावेत आणि त्याविरुध्द निषेधाचा आवाज उठवलाच जायला हवा?

मला वाटते इराणवर पाश्चिमात्यांचा विशेष राग आहे म्हणून इतका गदारोळ पण सौदी अरेबियात ह्या शिक्षा वरचेवर दिल्या जातच असतात. पण ते प्रकार बहुधा दाबले जातात. पैशाच प्रभाव

प्रतिक्रिया

अर्धवट's picture

9 Jul 2010 - 6:44 pm | अर्धवट

खरच की काय.. भयानक.. मी असलं काही पाहिल नाही.. अर्थात तेच बरं झालं..

अवलिया's picture

9 Jul 2010 - 6:53 pm | अवलिया

या धाग्यावर "विचारवंतांची" मतं नक्कीच वाचनीय असतील. वाचत आहे.

llपुण्याचे पेशवेll's picture

9 Jul 2010 - 6:54 pm | llपुण्याचे पेशवेll

शिक्षा ही जर तिथल्या समाजाने ठरवलेल्या नियमांना अनुसरुन ठरवली असेल आणि तिथले राज्यकर्ते, पैसेवाले व्यापारी इ. सर्वाना समान न्याय असेल तर ती शिक्षा अयोग्य ठरवणारे आपण कोण. दहशतवाद्यांना जरासा त्रास दिला कि मानवाधिकार आयोगाला मानवी हक्क वगैरे आठवतात मग जेव्हा अनेक निष्पाप लोकांचा बेसिक जगण्याचा मानवाधिकार या नराधमांनी हिरावून घेतला हे दिसत नाही का? असो विषयांतर झाले.
तर मूळ मुद्दा कायदे, नियम हे स्थळकाळ सापेक्ष असतात. मग तिथल्या समाजाने (भले इस्लामला अनुसरुन असेल) जर व्यभिचार हा गुन्हा ठरवला असेल व त्याला कडक शिक्षा दिली असेल तर त्याला चूक बरोबर ठरवणारे आपण कोण. आपण फक्त शिक्षा अपराधाच्या मानाने जास्त कडक असेल तर त्यावर भाष्य करू शकतो.
वर लिहीलेल्या प्रसंगात फक्त बाईलाच शिक्षा दिली आणि पुरुषाला नाही दिली (किंवा जरी त्याला कमी शिक्षा दिली) तर मात्र अन्याय होतो आहे असे म्हणता येईल.
शेवटी नियम कायदे कितीही केले तरी ते कसे वठवले जातात किंवा समाजाला अनुकूल होऊन कितपत उपयोगी पडतात हे त्या समाजाच्या धारणेवरच अवलंबून असते.
पुण्याचे पेशवे
हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.

क्लिंटन's picture

9 Jul 2010 - 6:58 pm | क्लिंटन

खरोखरच भयानक. मागे ई-मेलवर एका ढकलपत्रात इराणमधील अजून एक भयानक प्रकार दाखवला होता.एका लहान मुलाने (वय वर्ष ७-८ असेल) अनवधनाने डिपार्टमेन्टल स्टोअरमधला ब्रेड बाहेर नेला तर त्याने चोरी केली म्हणून त्याच्या हातावरून ट्रक नेऊन त्याचा हात तोडायची शिक्षा फर्मावली गेली.अशाच प्रवृत्तीच्या लोकांनी कारगील युध्दादरम्यान आमच्या सौरभ कालिया आणि इतर ५ जवानांना कशा यातना देऊन ठार मारले हे वाचून अंगावर अगदी शहारा आला होता. कुराणात काहीही लिहिले असले तरी त्यांना स्वत:ची सद्सद्विवेकबुध्दी नाही का? मनुस्मृतीमध्येही वेद वाचल्यास शूद्रांच्या कानात खिळे ठोकावे असे लिहिले आहे असे एका लेखात वाचल्याचे आठवते. पण सध्याच्या काळात असे कधी आणि किती खिळे ठोकले जातात? असे लोक भूतलावर आहेत तोपर्यंत ’हे विश्वची माझे घर’ ही संकल्पना कदापि सत्यात उतरणार नाही.

क्लिंटन

क्लिंटन's picture

9 Jul 2010 - 7:00 pm | क्लिंटन

आणि त्याचबरोबर हरियाणातील खाप पंचायतींचा सुध्दा निषेध. ते भले दगडाने ठेचून मारत नसतील पण ’दुसऱ्या जातीतील’ व्यक्तीशी प्रेमात पडायचा ’गुन्हा’ केल्याबद्दल ठार मारणे ही प्रवृत्ती सुध्दा तितकीच घातक. अशा प्रवृत्तींचाही बंदोबस्त करणे गरजेचे आहे.

llपुण्याचे पेशवेll's picture

9 Jul 2010 - 7:25 pm | llपुण्याचे पेशवेll

खाप पंचायत दुसृया जातीच्या मुलीशी / मुलाशी प्रेम केले म्हणून शिक्षा देत नाही तर एकच गोत्र ( जात) असलेल्या मुला मुलींनी प्रेम केले तर शिक्षा देते ( एक गोत्र म्हणजे ते भाऊ बहिण होतात )

याचा अर्थ खाप पंचायतीचे समर्थन करायचे आहे असा नाही.

पुण्याचे पेशवे
हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.

पुष्करिणी's picture

9 Jul 2010 - 9:13 pm | पुष्करिणी

खाप पंचायत आणि तत्सम खून हे देशाचे किंवा राज्याचे कायदे नाहीत
त्यामुळे न्याययंत्रणा -पोलिस - राज्यकर्ते इत्यादींनी नीट काम केलं तर हे सगळं मोडीत काढणं अवघड नाही..

पण एखाद्या सार्वभौम देशाचा कायदाच जर असा असेल तर अवघड आहे ...जीवन आणि मरणही

पुष्करिणी

मेघवेडा's picture

10 Jul 2010 - 6:19 am | मेघवेडा

>> खाप पंचायत आणि तत्सम खून हे देशाचे किंवा राज्याचे कायदे नाहीत.
त्यामुळे न्याययंत्रणा -पोलिस - राज्यकर्ते इत्यादींनी नीट काम केलं तर हे सगळं मोडीत काढणं अवघड नाही.

पहिल्या वाक्याशी सहमत. मुळात या पंचायती कायदामान्य नसून पारंपरिक आहेत आणि त्यात महिला, दलित तसेच युवकांनाही बोलण्याचा अधिकार नाही. ('स्वदेस' चित्रपटातील पंचायत आठवा. ती खाप पंचायत नाही पण ग्रामीण भागातील सर्व पारंपरिक पंचायती सारख्याच.) या पंचायती संवेदनाशील आणि भावुक मुद्दे ऐरणीवर आणून सांस्कृतिक मूल्ये जपणार्‍या ग्रामीण जनमानसाचं समर्थन प्राप्त करतात. उरला मुद्दा त्या कठोर निर्णयांचा तर हे निर्णय 'मुखिया'ने घेतलेले असल्याने त्याच्याविरुद्ध आवाज उठवायला कुणीच तयार होत नाही.

पुन्हा न्याययंत्रणा-पोलिसांचं म्हणाल तर ग्रामपातळीवर असलेल्या न्याययंत्रणेत, पोलिस यंत्रणेत तेच लोक बसले आहेत जे याच समाजात वाढलेले आहेत. सामाजिक मूल्यांना विरोध ते सहसा करणार नाहीत. आणि त्यामुळे हे लोक या गोष्टींपासून दूर राहतात. हां आता सार्वभौम न्याययंत्रणेच्या ताब्यात हे प्रकरण सोपवल्यास एखादा मार्ग निघणे अवघड नाही. पण त्यासाठी महत्त्वाचा मधला दुवा आहेत ते त्या त्या प्रदेशांतील प्रादेशिक राजकारणी. इथे विचारात घेण्यासारखा मुद्दा असा की आज ग्रामीण क्षेत्रांच्याही आर्थिक परिस्थितीत लक्षणीय परिवर्तन घडलेले आहे. त्यात राष्ट्रीय पातळीवर जातीयतावादी राजकारणाचा विस्तार आणि वाढ झाल्याने त्या त्या प्रदेशांतील या 'खापां'कडे व्होट बँक म्हणून बघितले जाते. आता कोणत्या राजकारण्याला आपली व्होट बँक गमावून बसायला आवडेल? यामुळे या खापांचा प्रादेशिक राजकारणावर प्रभावही वाढलाच आहे.
मनोज-बबली प्रकरणातील आरोपींना शिक्षा झाल्यावर समगोत्री विवाहांवर बंदी आणण्यासाठी 'हिंदु मॅरेज अ‍ॅक्ट' मध्ये बदल करण्यात आले**. आणि त्याचे सर्व प्रादेशिक राजकारण्यांनी समर्थन केले, यावरून या खापांचा प्रादेशिक राजकारणावरचा प्रभाव दिसून येतो.
त्यामुळे पोलिस-राज्यकर्त्यांच्या हस्तक्षेपानेही हे मोडीत काढणं वाटतं तितकं सोपं नसावं कदाचित.

** संदर्भ : बीबीसी हिंदी.
असो, विषयांतराबद्दल क्षमस्व.

संतोषएकांडे's picture

10 Jul 2010 - 2:19 am | संतोषएकांडे

बरोबर
पण इतर जातीच्या मुला/मुलीशी लग्न केल्यावर शिक्षा करत नाही हे मात्र खरं नाही. शिक्षा करतात, त्याला ऑनर किलींग (वटविच्छेद)
म्हणतात.

आण्णा चिंबोरी's picture

10 Jul 2010 - 1:24 pm | आण्णा चिंबोरी

कुराणात काहीही लिहिले असले तरी त्यांना स्वत:ची सद्सद्विवेकबुध्दी नाही का?

खैरलांजीमध्ये काही वर्षांपूर्वी हिंदूंनी बौद्धांना कसे मारले होते याचीही या निमित्ताने आठवण झाली.

क्लिंटन's picture

10 Jul 2010 - 1:55 pm | क्लिंटन

अशा प्रकारांचे ते हिंदूंनी केले म्हणून अजिबात समर्थन नाही. असे प्रकार करणाऱ्यांना कडक शिक्षा करण्यात यावी.

मन's picture

9 Jul 2010 - 7:01 pm | मन

"दगडाने ठेचुन मारतात" म्हणजे एकच मोट्ठ दगड्/शिळा टाळक्यात हाणुन जीव घेतला असं होत नाही.
आधी गळ्यापर्यंत पुरतात तुम्हाला मातीत(शक्यतो वाळवंटात्/रेतीत)
आणि मग एका मागोमाग एक दगड मारणं सुरु होतं.
जोवर व्यक्तीचा जीव जात नाही, निदान तोवर तरी हे सुरुच असत.
इराण आणि सौदी सोडा हो. काही वर्षांपुर्वी सर्वाधिक पुढारलेला आणी मुस्लिम देशांमधील एक्मेव "धर्मनिरपेक्ष" देश असणार्‍या तुर्कस्थान (हा मुस्लिम देश असला तरीही युरोपमधील एक अग्रगण्य,स्थिर आणि सामाजिक सुधारणा घडलेला आणि पाश्चात्त्य राहणीमानाप्रमाणे असणारा देश म्हणून ओळखला जातो.)मध्येही असलीच शिक्षा दिली होती.लिंक सध्या सापडत नाहिये.

थोडं अवांतरः- असल्या शिक्षांना आपण दीड एक हजार जुन्या (मध्य युगीन)समजतो, इस्लाम काळात उदय पावलेल्या.पण ह्या बहुतांशी सर्वच ज्यु धर्मातून जशाच्या तशा उचलल्यात्. ज्यु जीवनपद्धती ही निदान ५-७ हजार वर्ष जुनी समजली जाते.म्हणजे ह्या शिक्षा माणुस नुकताच "नागर"संस्कृतीत प्रवेश करत होता, तेव्हाच्या, ताम्रपाषाण युगातल्या आणी अधिकच जुन्या आणी कालबाह्य आहेत.

आपलाच,
मनोबा

शानबा५१२'s picture

9 Jul 2010 - 7:03 pm | शानबा५१२

सार्वजनिकरीत्या गोळ्या घालणे(वाट्टेल तेवढ्या) व फाशी देणे हे दोन प्रकार माझ्या मते सर्व जगभर पाळले तर हरकत नसेल/गेले पाहीजेत.
दगड मारुन मारुन पहील जखमांच्या वेदना नंतर त्या असह्य होउन म्रुत्युला गवसणी ह्या स्टेजेस मधुन स्वःताला जाताना कल्पुन अस वाटत की शत्रुला ही अस मरण ना मिळो.
महाराष्ट्रातल्या एका ''पुरमधे 'त्या' गुंड्याला कोर्टात नेताना लोकांनी दगड मारायला सुरवात केली पोलिस ही घाबरुन त्याला सोडुन पळाले.व तो हतखडी सकट पळत एक रुममधे गेला,लोकांनी त्या रुमच दार मोडल व त्याला मरेपर्यंत जखमी करत करत वेदनेने पुरेपुर भरलेल मरण दील!!!
वॉट अ जस्टीस नो?इट्स हीज जस्टीस.
तो ***** गुंड कोणत्याही स्त्रीला घरातुन उचलुन तिअचा बलात्कार करत असे व विचारायला गेलेल्या एकाची हत्या व काहींना गंभीर जखमी केल होत.........त्यामुळे त्याला जाब विचारायला सर्व घाबरत.वरुन सर्व सेट्टींग असल्याने व साक्षीदर पुढे येत नसल्याने त्याने कायदा वगैरे चांगलाच पायाखाली तुडवला होता.
त्याकडुन झालेल्या हत्या शुल्लक कारणावरुन पण निर्घुण अशा होत्या.अशा कोणाला दगडाणे ठेचुन ठेचुन मराव लागल ह्याचा मला व्ययक्तीक पातळीवर फार आनंद झाला व मी तिथे बघायला असतो तर 'काम' आटोपल्यावर फटाकेही फोडले असते....
अशी शिक्षा होते माहीती असताना इकडे तिकडे तिकडे नको ते करत(कायद्याला नको ते करत ) फीरणा-या मुर्ख स्त्रीला अस मरण आल तर नवल नाही.
_________________________________________________
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे

वाहीदा's picture

9 Jul 2010 - 8:23 pm | वाहीदा

इकडे तिकडे तिकडे नको ते करत(कायद्याला नको ते करत ) फीरणा-या मुर्ख स्त्रीला अस मरण आल तर नवल नाही
अन अश्या पुरुषांच्या बद्धल तुम्हास काय म्हणायचे आहे ?? X( X( X(

~ वाहीदा

संदीप चित्रे's picture

10 Jul 2010 - 7:05 am | संदीप चित्रे

>> अन अश्या पुरुषांच्या बद्धल तुम्हास काय म्हणायचे आहे ??
मलाही हाच प्रश्न विचारायचा आहे.

अंतु बर्वा's picture

9 Jul 2010 - 7:12 pm | अंतु बर्वा

"दि स्टोनिंग ऑफ सोराया एम" या चित्रपटात हा न्याय कसा होतो आणी एका हतबल स्त्रीला कशा प्रकारे ठेचुन मारले जाते हे पाहुन अंगावर अक्षरशः काटा आला होता...

घाटावरचे भट's picture

9 Jul 2010 - 7:13 pm | घाटावरचे भट

हे त्याचे काही फोटो...

दगडाने ठेचून मारणे

वि.सू. - कृपया फोटो स्वतःच्या जबाबदारीवर बघावेत.

शिल्पा ब's picture

9 Jul 2010 - 11:17 pm | शिल्पा ब

कसले क्रूर लोक आहेत हे मुस्लीम....भयानक फोटो...मानवतेला काळिमा फासणे म्हणजे काय ते कळले...बाकी इस्लामी शिक्षांबाबत हेच विचार.

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

वेताळ's picture

9 Jul 2010 - 7:13 pm | वेताळ

अशी शिक्षा होते माहीती असताना इकडे तिकडे तिकडे नको ते करत(कायद्याला नको ते करत ) फीरणा-या मुर्ख स्त्रीला अस मरण आल तर नवल नाही.

ती व्याभिचार करताना एकटी करत होती का? तिच्या बरोबर दुसरा पुरुष पण तिच्या इतकाच दोषी आहे ना.
बर व्याभिचार केला म्हणुन इतकी कडक शिक्षा देण्याची गरज नाही. त्याच्या वर बहिष्कार टाका. पण दगडाने ठेचुन मारणे रानटीपणाचे लक्षण आहे.
तसेच तिला का व्याभिचार करावा लागला ते कारण शोधणे पण गरजेचे आहे.शानबा शारिरीक साधनशुचिता फक्त बायानी पाळली पाहिजे आणी पुरुषाने कुठेही उंडारले तरी चालते, हा विचार देखिल शुध्द मुर्खपणा आहे. न्याय सर्वाना समान हवा.पण असला रानटी नको.

वेताळ

llपुण्याचे पेशवेll's picture

9 Jul 2010 - 7:20 pm | llपुण्याचे पेशवेll

वेताळाशी सहमत आहे. न्याय सर्वाना समान पाहीजे.
पुण्याचे पेशवे
हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.

राजेश घासकडवी's picture

9 Jul 2010 - 7:28 pm | राजेश घासकडवी

समाज दोन कायद्याने सज्ञान व्यक्तींचं वर्तन, केवळ आपल्याला आवडत नाही म्हणून काबूत ठेवण्यासाठी किती निर्घृण होऊ शकतो हे पाहून वाईट वाटतं.

एकंदरीतच इस्लामी कायदा स्त्रियांना पददलित ठेवण्यासाठी केला गेला असावा असं वाटतं. बाहेर जाताना पती, भाऊ अगर वडील यांच्याच बरोबर गेलं पाहिजे, बलात्कार झाला आहे हे सिद्ध करण्यासाठी चार का पाच साक्षीदार लागतात, वगैरे ऐकलं आहे.

अल्ला तेरो नाम, ईश्वर तेरो नाम
सब को सन्मती दे भगवान

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Jul 2010 - 11:06 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

राजेशशी सहमत.
अतिशय घृणास्पद आहे अशा शिक्षा करणं. पण हे आपण बोलून काय फायदा? मुसलमान विद्वानांनी, आणि तेही इराणमधल्या, या विरूद्ध आवाज उठवला पाहिजे. आपल्याकडेही काही लोकांना स्वतःच्या धर्मातल्या गोष्टी चुकीच्या वाटतात आणि त्याविरोधात ते काही बोलले तरी आपण ते ऐकून घ्यायला तयार नसतो. तर इतर धर्मातल्या, देशाच्या नागरीकांनी काही बोललं तर कोण आणि का ऐकून घेणार?
सबब, या धाग्याचं प्रयोजन नीटसं समजलं नाही. आपल्या देशाततरी शरिया कायदा लागू नाही.

अदिती

हुप्प्या's picture

10 Jul 2010 - 8:11 am | हुप्प्या

आज भारतात शरिया लागू नाही पण उद्या नसेलच असे नाही. इंग्लंडमधे मुस्लिमांची संख्या वाढल्यामुळे त्यांच्या करता शरियावर आधारित वेगळी कोर्टे बनवावीत अशी मागणी मूळ धरते आहे.
हा लेख वाचा
http://www.guardian.co.uk/law/2010/jul/05/sharia-law-religious-courts

मुस्लिमांची संख्या जिथे वाढती आहे तिथे अशा मागण्या सुरु होतात. भारतात हे राजेरोस घडते आहे. आणि आपले पुढारी व्होटाकरता आयाबहिणी विकू शकतात तिथे शरियाची मागणी किस पेड की पत्ती? वेळ पडल्यास भाजपही हे करायला कमी करणार नाही.

तेव्हा सामान्य माणसाने ह्याबद्दल माहिती बाळगली पाहिजे. सुरवातीला धार्मिक स्वातंत्र्य वगैरे गोडवे गात हळूहळू अशा रानटीपणाकडे वाटचाल होते हे माहित असले पाहिजे मग त्या निसरड्या उतारावर पाऊल भक्कम ठेवले जाईल.

आण्णा चिंबोरी's picture

10 Jul 2010 - 8:59 am | आण्णा चिंबोरी

महाशय हुप्प्या लिहितातः
आपले पुढारी व्होटाकरता आयाबहिणी विकू शकतात.

कोणत्या पुढा-याने व्होटाकरता आपली आई किंवा बहीण यांना विकले आहे ते सांगावे. कारण सामान्य माणसाने ह्याबद्दल माहिती बाळगली पाहिजे. सुरवातीला वैयक्तिक स्वातंत्र्य वगैरे गोडवे गात हळूहळू अशा रानटीपणाकडे वाटचाल होते हे माहित असले पाहिजे मग त्या निसरड्या उतारावर पाऊल भक्कम ठेवले जाईल.

(प्रश्नांकित) आण्णा चिंबोरी

हुप्प्या's picture

10 Jul 2010 - 10:59 am | हुप्प्या

देश ही आई आहे असे बरेच भारतीय मानतात. मीही. व्होटाकरता तिच्या अब्रूचा विचार न करता वाट्टेल ते करणारे नेते आहेत. बांग्लादेशातून आलेले अवैध नागरिक यांना रेशनकार्ड देणे, त्यातून मते मिळवणे हे चालते. मग त्यातले अतिरेकी असले तरी चालेल. हे माझ्या मते आईला विकण्यासारखे आहे. सत्ता मिळते आहे ना मग फाळणी झाली तरी चालेल असे म्हणणारे नेतेही याच प्रकारातले असे मी मानतो.
आपले राजकीय वजन वाढावे म्हणून मुलीला वा बहिणीला कुण्या राजकारण्याशी लग्न करायला लावणे हेही चालते.
असो. कळायला अवघड वाटत असेल तर आलंकारिक अर्थाने असे समज की नेते लोक मताकरता वाट्टेल त्या थराला जाऊ शकतात.

आण्णा चिंबोरी's picture

10 Jul 2010 - 12:06 pm | आण्णा चिंबोरी

>>सत्ता मिळते आहे ना मग फाळणी झाली तरी चालेल असे म्हणणारे नेतेही याच प्रकारातले असे मी मानतो.
<<

नेते कशाला, आपले भगवे धोरण राबविण्यासाठी भारतातील हिंदू मुसलमानांध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न अनेक लोक जालावर करताना दिसतात. मुसलमानांचा बागूलबुवा उभा करुन 'ते' कसे क्रूर आहेत हे ठसविण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्यांच्याविषयी तू बोलत असावास असे वाटते.

>>
आपले राजकीय वजन वाढावे म्हणून मुलीला वा बहिणीला कुण्या राजकारण्याशी लग्न करायला लावणे हेही चालते.<<

अशी लग्ने पुराणकाळापासून ऐतिहासिक काळापर्यंत चालत आलेली आहेत. शिवाजी आणि संभाजीचा इतिहास सोप्या मराठीत वाचायला मिळाला तर तुला कळेल.

llपुण्याचे पेशवेll's picture

10 Jul 2010 - 3:23 pm | llपुण्याचे पेशवेll

ओक्के ओक्के. म्हणजे वरती चिकटवलेल्या लिंकेतले फोटोही कुण्या भगव्या फोटोग्राफरनेच भारतातील हिंदू- मुसलमानांच्यात फूट पाडण्या करता काढले असतील ना.. नाही नाही. कदाचित ते सोमाली मुसलमान भगव्या हिंदूत्ववाद्यांना सामिल असतिल. व भगव्या हिंदूत्ववाद्यांनी फोटो काढून क्रूरपणाचा प्रचार करावा म्हणूनच त्यांनी त्या माणसाला ठेचून मारले असेल.

पुण्याचे पेशवे
हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.

आण्णा चिंबोरी's picture

11 Jul 2010 - 3:24 pm | आण्णा चिंबोरी

पेशवे, 'बार्किंग ऍट द राँंग ट्री' करु नका.

इराणमध्ये कशी शिक्षा देतात हे सांगून आम्हा भारतीयांना घाबरवण्याचे काय कारण आहे? एक तर हुप्प्या परदेशात राहतो. आम्ही भारतीय काय ते बघून घेऊ ना. उगीच आमच्याआमच्यात काड्या घालण्याचे धंदे कशाला? भारतात शरियत कायदा लागू होणार आहे का? त्यासंबंधाने काही हालचाली चालू आहेत का? मिसळपाववर काथ्याकूट करुन इराणमधली ही शिक्षापद्धत बंद होणार आहे का? मग उगीच मुसलमानांवर गरळ ओकण्याचे काय कारण?

उत्तरपेशवाईमधले हिंदू अत्याचाराचे प्रकार शोधा, मग तुम्ही नाव बदलाल याची ग्यारंटी देतो.

llपुण्याचे पेशवेll's picture

12 Jul 2010 - 10:01 am | llपुण्याचे पेशवेll

पेशवे, 'बार्किंग ऍट द राँंग ट्री' करु नका.
धन्यवाद. बाकी 'बार्किंग ऍट द राँंग ट्री' असं तुम्हीच म्हणताय आणि स्वतः काय करताय? असो.
इराणमध्ये कशी शिक्षा देतात हे सांगून आम्हा भारतीयांना घाबरवण्याचे काय कारण आहे?
बाकी तिकडे काय शिक्षा देतात हे सांगून घाबरण्या इतके तुम्ही घाबरट आहात का?
एक तर हुप्प्या परदेशात राहतो.
मग त्याचा इथे कुठे संबंध येतो? का तेवढंच कारण आहे?
आम्ही भारतीय काय ते बघून घेऊ ना. उगीच आमच्याआमच्यात काड्या घालण्याचे धंदे कशाला?
तुम्हीच एकटे काय ते भारतीय बाकी सगळे अभारतीय काय?
भारतात शरियत कायदा लागू होणार आहे का? त्यासंबंधाने काही हालचाली चालू आहेत का?
डोळे उघडे ठेऊन पाहीलेत तर शेदारी असलेले पाकीस्तान अफगाणिस्तानादी देश आणि तिथली परीस्थिती पाहता भारत त्यांच्या आक्रमणापासून दूर नाही हे नक्की कळते आहे.

मिसळपाववर काथ्याकूट करुन इराणमधली ही शिक्षापद्धत बंद होणार आहे का? मग उगीच मुसलमानांवर गरळ ओकण्याचे काय कारण?
मग काय करून बदलेल? भांडारकर इन्स्टीट्यूट फोडून? शनिवारवाडा पाडून?
यात गरळ कुठे ओकली आहे ते कळेल का? तुम्ही उगाच रामविलास पासवान असल्यासारखे का वागत आहात.

उत्तरपेशवाईमधले हिंदू अत्याचाराचे प्रकार शोधा, मग तुम्ही नाव बदलाल याची ग्यारंटी देतो.
माझ्या नाव बदलाशी काय संबंध आहे? आणि ते अन्याय पेशव्यांनी केले होते का? तसे म्हणत असाल तर त्या काळात प्रत्येक जातीनं आपल्या खालच्या समजल्या जाणार्‍या जातीवर केलेले अन्याय दाखवतो. उदा. मांगाने ढोराच्या घरात आपली मुलगी न देणे.

बाकी सुमैय्याचे काय झाले हो?

तुम्हाला चर्चेत भाग घ्यायचा नसेल तर घेऊ नका
पुण्याचे पेशवे
हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.

शिल्पा ब's picture

12 Jul 2010 - 10:19 pm | शिल्पा ब

सुमैय्या कोण?

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Jul 2010 - 1:12 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

इंग्लंडमधे मुस्लिमांची संख्या वाढल्यामुळे त्यांच्या करता शरियावर आधारित वेगळी कोर्टे बनवावीत अशी मागणी मूळ धरते आहे.

त्यावर ब्रिटीश सरकारचं अधिकृत मत, उत्तर काय?

मुस्लिमांची संख्या जिथे वाढती आहे तिथे अशा मागण्या सुरु होतात. भारतात हे राजेरोस घडते आहे.

खरंच? भारतात कधी आणि किती 'जोरात' अशी मागणी झाली?

आणि आपले पुढारी व्होटाकरता आयाबहिणी विकू शकतात तिथे शरियाची मागणी किस पेड की पत्ती?

म्हणजे ही चूक कोणाची? धर्म आणि कडव्या लोकांच्या नादी लागून मागणी करणार्‍या सामान्य, धर्म जपणार्‍या जनतेची का या सामान्य लोकांना मुख्य प्रवाहात न आणू शकणार्‍या नेत्यांची?

आणि मुळात मुसलमानांसाठी वेगळा सिव्हील कायदा आणणाची चूक कोणाची, मुसलमानांची का नेत्यांची?

माझ्या ओळखीचे काही मराठी, अमराठी, भारतीय, अभारतीय मुसलमान आहेत. त्यांच्यापैकी कोणीही, कधीही शंभर फटके मारणे, दगड मारून एखाद्याचा "खून" करणे, पुरूषांसाठी चार लग्नं मान्य असणे इ.इ. गोष्टींना जाहीर अथवा खासगीत पाठिंबा दर्शवलेला नाही.

अदिती

आण्णा चिंबोरी's picture

10 Jul 2010 - 1:15 pm | आण्णा चिंबोरी

३_१४ विक्षिप्त अदिती यांस,

चर्चाप्रस्तावाचा उद्देश, मुसलमान हे आधुनिक जगात जगायला कसे नालायक आहेत आणि त्यांच्यापासून आधुनिक जगाला व भारताला काय (खराखोटा) धोका उत्पन्न होऊ शकतो, हे अधोरेखित करण्याचा आहे.

हे जर ध्यानात घेतले तर इतके स्पष्टीकरण द्यावे लागणार नाही.

चर्चाप्रस्तावकाची वाटचाल पाहिल्यास हे त्वरित लक्षात येईल.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Jul 2010 - 2:14 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

:-(

आज साल २०१० मधेसुद्धा आपण **** राजकारण्यांच्या खोट्या प्रचाराला कसे बळी पडू शकतो आणि लौकीकार्थाने उच्चशिक्षित असूनही आपण सारासार विचार करू शकत नाही हे पाहून खेद वाटला.
पण त्यातही काही लोकमात्र सुजाण आहेत आणि ते स्पष्टपणे आपले विचार मांडतात हे सुद्धा दिसलं. असे समविचारी लोक पाहून आनंद झाला.

अदिती

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Jul 2010 - 2:15 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

:-(

आज साल २०१० मधेसुद्धा आपण **** राजकारण्यांच्या खोट्या प्रचाराला कसे बळी पडू शकतो आणि लौकीकार्थाने उच्चशिक्षित असूनही आपण सारासार विचार करू शकत नाही हे पाहून खेद वाटला.
पण त्यातही काही लोकमात्र सुजाण आहेत आणि ते स्पष्टपणे आपले विचार मांडतात हे सुद्धा दिसलं. असे समविचारी लोक पाहून आनंद झाला.

अदिती

सनविवि's picture

10 Jul 2010 - 5:59 pm | सनविवि

// मुसलमान हे आधुनिक जगात जगायला कसे नालायक आहेत //
या विधानाचा निषेध. असं जर तुम्ही मनापासून मानत असलात तर धन्य आहे.

आण्णा चिंबोरी's picture

11 Jul 2010 - 3:28 pm | आण्णा चिंबोरी

असे मी मानत नाही. चर्चाप्रस्तावामध्ये हुप्प्याचा तसा उद्देश अध्याहृत आहे. त्याशिवाय इराण वरुन चर्चा शरियत-कुराण-हदीथ-ब्रिटनमध्ये मूळ धरणे आणि भारतातही असे होऊ शकते या मार्गाने आलीच नसती.

माझे काही मित्र हिंदू व काही मुसलमान आहेत. त्यापैकी बहुसंख्य हिंदुंना दगडाने ठेचण्याची शिक्षा योग्य वाटते. (त्यामुळे जरब बसेल असे त्यांचे मत असते.) आणि भारतातही असेच असावे असे त्यांना वाटते.

वाहीदा's picture

9 Jul 2010 - 7:50 pm | वाहीदा

http://muslimislam.blog.co.uk/2009/02/07/is-stoning-to-death-for-adulter...

Who the hell are These Maulavis to give the Barbaric Punishment when Holy Quran does not Mention such Capital Punishment ?? X(

'दगडाने ठेचून मारणे' कुराणात असे कुठे ही लिहले ले नाही
पण हे मुल्ला मौलवी कुठल्या स्तरापर्यंत वाट्टेल तसा इस्लामचा गैरवापर करत आहेत यालाही सीमा नाही ?? मला तर या सगळ्या xxxxxxxx xxxxxxxx xxxxxxxx मौलवींनाच ठेचून मारावसे वाटते X( X(

How can a Jewish punishment be declared Islamic when it is not mentioned in the Quran ???
Is there a question of knowledge? Do these mullahs not know what is written in the Quran about adultery? If they know then why are they not listening to the word of Allah and what is written in the Quran?
In the Quran, the punishment is humane, merciful, futuristic and considerate. The emphasis is on forgiveness, future building and merciful.
There is no mention of killing women, in this scenario or any other, except when a woman deliberately kills another. Murder is a capital crime and the punishment is death, unless there is a pardon from the relatives of the victim. Forgiveness is the preferred option recommended by God. Even for murder, the capital crime, Quran prefers forgiveness and advises mercy over punishment.

~ वाहीदा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Jul 2010 - 7:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>'दगडाने ठेचून मारणे' कुराणात असे कुठे ही लिहले ले नाही

शंभर फटके मारा आणि त्यानंतरची सुधारीत आवृत्ती म्हणजे ठेचून मारावे असे झाले असावे, असे वाटते...!

दिव्य कुराण काय म्हणते पाहा...!

-दिलीप बिरुटे

llपुण्याचे पेशवेll's picture

9 Jul 2010 - 8:09 pm | llपुण्याचे पेशवेll

धन्यवाद बिरुटे सर.
पुण्याचे पेशवे
हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.

हे भाषांतर कुणाचे आहे माहीत नाही. पण कीव करू नका असे कुराण कधीच सांगत नाही .

प्राध्यापक अहो,आमच्या इथे घडलेला किस्सा आहे. त्या बाईचे असेच झाले होते शेवटी ज्या पुरुषा बरोबर संबध होते त्याच्याशी निकाह लावून देण्यात आला अन आधीच्या लग्नाने झालेली मुले त्या बाई बरोबर च राहतात. पण एक झाले सर्व जमाती समोर तिला जाब विचारण्यात आला which it self was embarassing पण फटके कोणीही दिले नाहीत .
~ वाहीदा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Jul 2010 - 11:11 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

'दिव्य कुराण' यातल्या 'दिव्य' शब्दावर आक्षेप! धार्मिक मुसलमानांमधे 'पवित्र कुराण' (नाहीतर फक्त 'कुराण') म्हणण्याची पद्धत आहे.

अदिती

पुष्करिणी's picture

10 Jul 2010 - 4:49 pm | पुष्करिणी

का आक्षेप?

'दिव्य कुराण' हे इस्लामिक पब्लिकेशनच पुस्तक ( मूळ अरेबिक कुराणाच स्थानिक भाषेतल भाषांतर ) आहे.
कन्नड आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये कुराणाच्या भाषांतराला 'दिव्य कुराण' असच संबोधल आहे.
याच्या सीडी, ऑडिओ कॅसेट्सही मिळतात

dq

पुष्करिणी

रम्या's picture

12 Jul 2010 - 9:58 am | रम्या

>>शंभर फटके मारा आणि त्यानंतरची सुधारीत आवृत्ती म्हणजे ठेचून मारावे असे झाले असावे, असे वाटते...! <<

व्यभिचारी स्त्री व व्यभिचारी पुरुष दोहोंपैकी प्रत्येकास शंभर फटके मारा.[2]’

संदर्भ [२] मध्ये दिलेली माहीती खालील प्रमाणे

व्यभिचारा’संबंधी प्राथमिक आज्ञा सूरह निसा आयत क्र. १५ मध्ये येऊन गेली आहे. आता ही त्याची निश्चित स्वरूपी शिक्षा ठरविली आहे. ही शिक्षा अशा स्थितीसाठी आहे जेव्हा की व्यभिचारी पुरुष अविवाहित अथवा व्यभिचारी स्त्री अविवाहित असेल. दिव्य कुरआनातदेखील अशा स्वरूपासंबंधी संकेत मौजूद आहे. जसे की सूरह निसा आयत क्र. २५ वरून कळते. तसेच अनेक हदीसी, पैगंबर (स.) आणि सन्मार्गी खलिफांची कृती परंपरा आणि मुस्लिम लोकसमूहाचे मतैक्य (इज्मा) याद्वारे देखील, विवाहित असल्याच्या स्थितीत व्यभिचाराची शिक्षा ’रज्म’ - दगडांनी ठेचून मारणे असे सिद्ध आहे.

आता बोला!

मौलवींनाच ठेचून मारावसे वाटते

>>>>>>
धर्माच्या जाचक बंधनाची पहिली बळी स्त्री ठरते. इस्लामचे पुनरुज्जीवन करू पाहणाऱ्यांनी तर मुस्लिम महिलांची पुरती
कोंडी केली आहे. विवाहित मुस्लिम महिलेस तिचा पती कधीही तीन वेळा 'तलाक' शब्द उच्चारून घटस्फोट देऊ शकतो. या नियमाचा इतका अतिरेक झाला की शेवटी मुस्लिम पर्सनल बोर्डाला त्याचा गंभीरपणे विचार करावा लागला. त्यांनी यापुढे कोणालाही तोंडी तलाक देता येणार नाही, त्यासाठी निकाहनाम्याच्या धतीर्वर लिखित तलाकनामा शरियत कोर्टापुढे सादर करावा लागेल, असा नियम जारी करण्याचे ठरवले आहे. तरीही मुळात जिथे स्त्रीलाच गौण लेखले जाते, तिथे तिच्यासाठी कायदा कितीही सैल केला तरी तो राबविणाऱ्यांची मानसिकता जोवर बदलत नाही, तोवर तो जाचकच ठरणार. पण यदाकदाचित स्त्रियांनी खमकेपणा दाखवला आणि कायद्याला आव्हान दिले तर यात मोठा बदल घडू शकेल. याची चुणूक दाखवणारी घटना नुकतीच लखनौमध्ये घडली. तीन मुस्लिम महिलांनी खोटा तलाकनामा बनवणाऱ्या जुन्या लखनौमधील सुल्तानुल मदारीसच्या तीन मौलवींना चोप दिला. निशात फातिमा या मध्यमवयीन महिलेला आपला नवरा अली कमाल हा आपल्याला तलाक देणार असल्याची कुणकुण लागली. तिने अधिक चौकशी केल्यावर त्यात तथ्य असल्याचे तिच्या लक्षात आले. त्याने आपल्या प्रेयसीशी लग्न करण्याची तयारी चालवली होती आणि मौलवींना अडीच हजार रुपयांची लाच देऊन एकतफीर् तलाकनामा बनवून घेतला होता. शिया पंथीयांमध्ये तलाक देताना पत्नीलाही तिची बाजू मांडण्याची पूर्ण संधी दिली जाते. परंतु इथे सगळा मामला निशातला अंधारात ठेवून गुपचूप उरकला जाणार होता. आपल्या पाच वर्षांच्या मुलीसह आपल्याला नवऱ्याने बाहेर फेकण्याची तयारी चालवली असल्याचे लक्षात येताच निशात फातिमा खवळली. तिने सरळ सुल्तानुल मदारीस गाठले आणि तिथल्या तीन मौलवींना यथेच्छ बदडले. याका मी तिने असाच प्रसंग येऊ घातलेल्या हीना आणि आशीर् या दोन महिलांना हाताशी घेतले. त्या दोघी बहिणी होत्या. आशीर् टेक्निकल कोर्स करत होती. तिलाही आपला नवरा आपल्याला फसवून तलाक घेणार असल्याचा दाट संशय होता. या तिघींनी मुसा रिझवी, असगर आणि सादिक या मौलानांना अक्षरश: पायताणाने बदडून काढले. त्यांच्या झिंज्या उपटल्या. त्यानंतर त्या इतक्या खुश झाल्या की निशात म्हणाली, 'दिल को कितना सुकून मिलता है इन लागों को पीटकर, बता नही सकती हूं.' या घटनेनंतर असंख्य मुस्लिम महिलांचे निशातला, आम्हालाही सल्ला द्या, असे फोन येऊ लागले आहेत.

प्रत्येक शिक्षा अमंलात आणताना तिथे श्रध्दावंत लोकाचा एक समुह उपस्थित असला पाहिजे असा स्पष्ट उल्लेख कुराणात आहे.
मुळात आता प्रश्न उरतो असे किती श्रध्दावंत मुस्लिम समाजात शिल्लक आहेत त्याचा.आताच्या काळात तर ह्याचे उत्तर नाही असेच आहे. त्यामुळे ही शिक्षा कालबाह्य आहे असे माझे मत आहे.

वेताळ

शानबा५१२'s picture

9 Jul 2010 - 9:38 pm | शानबा५१२

वहीदा व वेताळ,
मी फक्त स्त्रीबद्दल लिहल कारण फक्त स्त्रीचा उल्लेख लेखात होता.मी पुरुषांबद्दल नाही लिहल ह्याचा अर्थ पुरुषांना शिक्षा नाही झाली तर हरकत नाही अस नाही.
तुम्हाला 'अस' कस वाटल की मला 'तस' बोलायच आहे म्हणुन? नवल आहे.

_________________________________________________
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे

इंटरनेटस्नेही's picture

10 Jul 2010 - 1:24 am | इंटरनेटस्नेही

स्त्रियांच्याकडे वाईट नजरेन पाहणाऱ्या, बलात्कार व तत्सम अपराध हे अशाच शिक्षेस पात्र आहेत.

--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

शानबा५१२'s picture

10 Jul 2010 - 1:29 am | शानबा५१२

स्त्रियांच्याकडे वाईट नजरेन पाहणाऱ्या.......

अरे बापरे!!
सर आपली परवानगी असेल तर पुरुषांसाठी बुरखा घालायचा प्रस्ताव मांडु का?

नो कमेन्ट्स!

_________________________________________________
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे

पुष्करिणी's picture

10 Jul 2010 - 3:44 am | पुष्करिणी

ह्या बाईंना अगोदरच ( ५ वर्षांपूर्वी ) ९९ फट्क्यांची शिक्षा देउन झाली आहे ( त्यांच्या १७ वर्षांच्या मुलासमोर हे फट्के मारण्यात आले ).

नंतर परत त्यांना त्याच गुन्ह्यासाठी अटक केली आणि न्यायाधिशांनी ही शिक्षा सुनावली. या बाई असं काहीही केल्याचं साफ नाकारतात.

त्यांच्या २२ वर्षांच्या मुलानं इराण मधल्या राजकीय, धार्मिक सगळ्या लोकांचे दरवाजे या अन्यायाविरूध्द ठोठावले आणि कुठेही उत्तर न मिळाल्यामुळं त्यानं जगातल्या सर्व लोकांना उद्देशून एक जाहीर पत्र मानवाधिकार संस्थेला लिहिलं , ' तुम्ही कुणीही असा, कोठेही असा पण आमच्या आईवर हा अन्याय होउ देउ नका, इराण मध्ये न्याय नावाची चीजच अस्तित्वात नाही' या पत्राबरोबर त्या मुलान त्यान आत्तापर्यंत देशांतर्गत केलेल्या सगळ्या पत्ररूप विनंत्याही जोडल्या आहेत. हे सगळं करताना त्याच्या स्वतःच्या आणि १७ वर्ष वयाच्या बहिणीच्या जीवाला खूप धोकाही आहे .
या मुलाचा मुख्य मुद्दा असा आहे की जर त्याच्या आईला एका गुन्ह्यासाठी एकदा शिक्षा देउन झालीय तर परत कशी शिक्षा देता, हे कोणत्याही कायद्याविरूद्ध आहे.

त्याच्या या पत्राला उत्तर म्हणून जगभरातून मानवाधिकार संस्थेकडे खूप प्रतिसाद आले आणि शेवटी इराणनं ही शिक्षा रद्द केली, पण देहांताची शिक्षा कायम असून ती आता दुसर्‍या पद्धतीनं देण्यात येइल....

या मुलानं पत्र लिहिल्यामुळं निदान ही बातमी इअराण्च्या बाहेर तरी आली. हे इतक्या पोटतिडिकेनं, असाहय्य्तेनं लिहिलेलं वाचून आपण अगदीच अलिप्त राहू शकत नाही ( आपल्या कोणत्याही प्रतिक्रियेनं काहीही फरक पडत नसला तरी ).

पुष्करिणी

धनंजय's picture

10 Jul 2010 - 3:54 am | धनंजय

शिक्षा क्रूर (आणि कालबाह्य) आहे.

असे म्हणणारे मुसलमान लोक माझ्या ओळखीचे आहेत. (मात्र मिपाचे सदस्य नाहीत.)

हुप्प्या's picture

10 Jul 2010 - 4:30 am | हुप्प्या

नक्की उच्चार माहित नाही. पण हदीथ हेही इस्लाममधे आदरणीय मानले जातात ना? त्यातील अनेक दगडाने ठेचून मारण्याची शिफारस करतात.

हे बघा
http://www.faithfreedom.org/op-ed/hadiths-on-stoning-in-islam/

आता ही उदाहरणे चुकीची आहेत का? त्यातले कित्येक खुद्द महंमद वा आयेषाच्या तोंडची वाक्ये उद्धृत करतात ज्यात ह्या दंडाचा स्वच्छ उल्लेख आहे.

अविनाशकुलकर्णी's picture

10 Jul 2010 - 8:09 am | अविनाशकुलकर्णी

मक्केस पण असे दगड मारायची प्रथा आहे..सैतानाला दगड मारतात..असे वाचल्याचे स्मरते..

विजुभाऊ's picture

10 Jul 2010 - 10:13 am | विजुभाऊ

गुन्हेगारांना जरब रहावी यासाठी कडक शिक्षा आणि त्या शिक्षा अमलात आणणारा प्रभावी व्यवस्था आस्तित्वात असावी.
अर्थात गुन्ह्यची व्याख्या ही सापेक्ष असते. एका देशाचा शहीद हा दुसर्‍या देशासाठी अतीरेकी असू शकतो. स्वातन्त्र्यसैनीक आणि नक्षलवादी हे दोघेही एका अर्थाने सारखे असू शकतात
अर्थात खली जिब्रान म्हणतो त्याप्रमाणे... एकासाठी न्याय हा दुसर्‍यासाठी अन्याय होत असतो. वकीलांना कायद्यातील पळवाटा शोधून कायदा निष्प्रभ कसा होईल यातच अत्यानन्द मिळत असतो.

कवितानागेश's picture

10 Jul 2010 - 11:08 am | कवितानागेश

'व्याभिचार' य शब्दाचा अर्थ मल अजुन तरी कळला नहिये?
हा डीफाईन कसा करतात, आणी कोण करतात?
आणी त्याबद्दल 'शिक्शा' वगरै करण्याचा अधिकार कोणालाही कसा काय मिळतो?
कोणीही (+१८) व्यक्तिगत पातळीवर काय करायचे, ह्यात आपण फार नाक खुपसू नये... हे 'सभ्यपणाचे' लक्षण नाही.
माझ्या मते एखाद्यानी नुसती चोरी जरी केली, तरी त्याला तिथले सरकार आणी अक्खा समाज जबाबदार आहे,
...कारण तो समाज त्या 'चोराला' अन्न/ वस्तू/ संस्कार हे काहीही पुरवू शकला नाही!
शिवाय कुठल्याही गुन्ह्याला 'जीव घेणे' ही शिक्शा योग्य नाही असे मला वाटते....
अवांतरः च्यायला, खरा 'क्श' कसा लिहायचा, कुणीतरी सांगा हो!
============
( स्वातंत्र्यप्रिय) माउ

विजुभाऊ's picture

10 Jul 2010 - 11:20 am | विजुभाऊ

तुला क्श ल्ह्यायचाय की क्ष....
x = क्ष आणि k+s+h = क्श

कवितानागेश's picture

10 Jul 2010 - 11:35 am | कवितानागेश

लक्ष लक्ष धन्यवाद!
'क्षोप्पच' आहे क्ष लिहिणे!
मी जीमेलवरुन लिहित होते एकीकडे...म्हणून गोंधळ होतोय टंकायचा..
============
माउ

आण्णा चिंबोरी's picture

10 Jul 2010 - 12:09 pm | आण्णा चिंबोरी

या दोघा अतिरेक्यांना गळ्याभोवती फास बांधून श्वासावरोध करुन मारण्याची क्रूर कायदेशीर शिक्षा देण्याबाबत मिपाकरांचे आणि हुप्प्याचे मत वाचायला आवडेल.

हुप्प्या's picture

10 Jul 2010 - 12:27 pm | हुप्प्या

परक्या देशात लपून छपून शिरून बेछूट गोळीबार करून अनेक निरपराध, ओळख पाळख नसलेल्या, लोकांना यमसदनी पाठवणे, कित्येकांची आयुष्ये उध्वस्त करणे आणि उभय संमतीने केलेला तथाकथित व्यभिचार यांना एकाच पारड्यात तोलण्यामागे काय गहन विचार आहे हे जाणून घ्यायला आवडेल.

१४०० वर्षापूर्वी लिहिलेल्या पुस्तकातील (ज्यात काडीचाही बदल सहन केला जात नाही) वचनांना प्रमाण मानून तशी शिक्षा देणे आणि आधुनिक काळात, आधुनिक मूल्यांचा विचार करून अभ्यासपूर्वक लिहिलेल्या भारतीय कायद्याप्रमाणे (ज्यात लोकमताने बदल होऊ शकतात) ठरवलेली शिक्षा देणे याची तुलना होऊ शकते असे का वाटते याबद्दल जाणून घ्यायला आवडेल.

तुरुंगात, प्रशिक्षित डोम्बाने फासावर लटकवणे आणि जाहीरपणे तमाम प्रजेला कुठल्या तरी आरोपीला मरेपर्यंत दगड मारायला उद्युक्त करणे, त्यांच्या संवेदना बधीर करणे हे एकाच मापाने मोजण्यामागे काय तर्कट आहे ह्याची कारणमीमांसा जाणून घ्यायला आवडेल.

आण्णा चिंबोरी's picture

10 Jul 2010 - 1:05 pm | आण्णा चिंबोरी

तुझ्या चर्चाप्रस्तावात केवळ शिक्षेबाबत टिप्पणी आहे. गुन्ह्यांच्या वेगवेगळ्या स्वरुपांचे तौलनिक विवेचन त्यात नाही. त्यामुळे आयुष्ये उद्ध्वस्त करणे आणि व्यभिचार हा नवा पैलू चर्चेत आणायचे कारण नाही.

तुझ्या मूळ चर्चाप्रस्तावातले वाक्य खालीलप्रमाणे आहे.

ह्या रानटी, कालबाह्य, क्रूर शिक्षेला कुठला सुसंस्कृत देश थारा देणार नाही. पण अस्सल इस्लमी कायदा जिथे लागू असतो तिथे हा प्रकार राजेरोस होतो. कुराणात ह्या प्रकारच्या "गुन्ह्याला" (इथे उभयता प्रगल्भ होते का, हे संबंध उभयतांच्या संमतीने झाले का वगैरे गोष्टी विचारात घेतल्या जात नाहीत) ही शिक्षा असल्याचे स्पष्टपणे लिहिले आहे. (चूभूद्याघ्या). त्यामुळे ते चुकीचे वगैरे म्हणणेही पाप आहे.

उद्या तमाम प्रजेपैकी काही जणांना डोंबासारखे, दगड मारण्यात प्रशिक्षित करुन, या प्रजेपैकीच काही जणांनी दगड मारुन शिक्षेची अंमलबजावणी करावी हे कमी क्रूर आहे असे तुला वाटते का? एखाद्या गुन्ह्यासाठी जीव घेणे ही शिक्षा क्रूर आहे का? तशी शिक्षा देणारे भारत, अमेरिका हे देश इराणच्या तुलनेत सुसंस्कृत कसे ठरतात? अमेरिकेने सद्दाम हुसेनच्या देहांत प्रायश्चित्ताचे प्रक्षेपणही करवले होते. दगडाने ठेचल्यास जास्त वेदना होतात व फाशीच्या दोराने कमी वेदना होतात हे कोणी ठरवले? प्रशिक्षित डोंबाच्या संवेदना बधीर केल्या जातात की नाही याबाबत मला काही माहिती नाही. ती माहिती तुला आहे का? जर एखाद्या गुन्ह्यासाठी जीव घेणे ही शिक्षा योग्य आहे असे तुझे मत असेल तर हा जीव कसा घेतला जातो याच्याशी देणेघेणे असण्याचे काय कारण आहे?

उगाच कुराण, हदीथ वगैरे शब्द आणून मुसलमानांविरोधात काहीही बरळू नकोस.

बाय द वे. वारंवार मुसलमानांविरोधी भावना भडकावण्याचे तुझे मिपावरील चर्चाप्रस्ताव सुपरिचित आहे. तुझ्यासारख्यांच्या विचारसरणीशी मी परिचित आहे. त्यातीलच काही जण इराण, इराकमध्ये कसाब/किंवा गुरु प्रकरण घडले असते तर त्यांना दगडाने ठेचून तत्काळ शिक्षा झाली असती असे समर्थन करतात याची या चर्चाप्रस्तावाच्या अनुषंगाने गंमत वाटली.

मिपावर जातीधर्मामध्ये विद्वेष पसरवणारे लिखाण चालत नाही असे ऐकिवात होते. हुप्प्याचे चर्चाप्रस्ताव कसे चालवून घेतले जातात हे समजत नाही. हुप्प्या संपादक मंडळींपैकी कोणाशी संबंधित आहे का?

तुझे विवेचन वाचणे आवडेल आपल्याला.
वेताळ

कवितानागेश's picture

12 Jul 2010 - 12:09 pm | कवितानागेश

कुराणाबद्दल / विरोधात काहीही बोलले तर ते 'मुसलमानांविरुद्ध ' कसे काय होते बरे??
'माणुसकी' विरुद्ध असलेल्या कोणत्याही गोष्टी कुठल्याही धर्माच्या/ देवाच्या नावाखाली खपवल्या जाउ नयेत, असे मला वाटते..
लेखाचा उद्द्येश देखिल तोच असावा असे मला वाटतय.
सध्या जगात धर्माच्या नावाखली सर्वात जास्त गळ्चेपी होत असलेला समाज, तोच आहे. विशेषत। स्त्रिया....
मला वाटते विषय स्त्रीपुरुष संबंध, समाजमान्यता, धर्मिक अनुष्ठान आणी देशाचे कायदे याबद्दल आहे.
हे 'जातीधर्मामध्ये विद्वेष पसरवणारे लिखाण'' नाही.
.============
माउ

मृत्युन्जय's picture

12 Jul 2010 - 2:06 pm | मृत्युन्जय

शिक्षा क्रुर आहे नक्की. आणि अपराधाच्या मानाने कठोर आहे हे पण नक्की (अपराध असलाच तर. मला तर मुळात अपराधच वाटत नाही). पण मुळात हा त्यांचा कायदा आहे. कित्येक देशात मुळात म्रुत्युदंडच क्रुर मानतात. आपल्या देशात ते क्रुर मानत नाही आपण. त्यामुळे शिक्षा क्रुर आहे की नाही हे आपण ठरवु शकत नाही.

आपल्याकडे बलात्कारासाठी फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणील जोर आहे आणि त्याला आपली समाजरचना आणि आपली विशिष्ट विचार संस्क्रुति कारणिभूत आहे. परदेशात (म्हणजे युरोप अमेरिका) तसे नाही. त्यांच्यामते बलात्कार हा खुप मोठा गुन्हाच नाही.

त्या लोकांच्या मते आपण फाशीच्या शिक्षेचा पुरस्कार करतो म्हणजे आपण रानटी असु शकतो.

दगडाने ठेचुन मारणे ही शिक्षा क्रुर असु शकेल - आपल्या मते. पण तरीही कसाब ला काय शिक्षा व्हावी असे तुम्हाला वाटते. भर चौकात दगडाने ठेचुन मारा त्याला असेच म्हणतो ना आपण? आपण फक्त म्हणतो - इच्छा करतो, ते प्रत्यक्षात आणतात एवढाच फरक आहे.

शिल्पा ब's picture

12 Jul 2010 - 10:26 pm | शिल्पा ब

परदेशात (म्हणजे युरोप अमेरिका) तसे नाही. त्यांच्यामते बलात्कार हा खुप मोठा गुन्हाच नाही.

काही पुरावा आहे का या statement ला?

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

पुष्करिणी's picture

12 Jul 2010 - 10:57 pm | पुष्करिणी

+१

युरोपात खून केला / केले तरी देहदंडाची शिक्षा नाही. पण बलात्काराला मोठा गुन्हा मानत नाहीत हे नविनच ऐकतेय. काही संदर्भ असल्यास देता का?

पुष्करिणी

मृत्युन्जय's picture

15 Jul 2010 - 12:10 pm | मृत्युन्जय

कदाचित मी माझे म्हणणे व्यवस्थत मांडले नाही. आपल्याकडे सामाजिक - सांस्कृतिक दबावामुळे, समाजभावनेमुळे बलात्कार हा खुप मोठा अपराध मानला गेला आहे. तिकडे तो वैयक्तिक स्वातंत्रावर घाला म्हणुन गुन्हा मानला जातो. कारण वेगळे असले तरीही थोड्याफार फरकाने गुन्ह्याची तीव्रता मान्य केली जाते.

फरक असा आहे की. आपण हा गुन्हा खुपच जास्त सेन्सिटिवली घेतो. त्यामुळे बलात्कारासाठी फाशीच्या शिक्षेची मागणी वाढते आहे (जरी अजुन कायदा तसा नसला तरी) आणि ती बर्‍याच जणांनी उचलुन धरली आहे. अमेरिकेत मात्र आता या गुन्ह्यासाठी फाशी होत नाही. पुर्वी व्हायची. म्हणजे त्यांच्या द्रुष्टीने या गुन्ह्याची तीव्रता आता पुर्वीसारखी उरली नाही. आपल्यासाठी मात्र हा गुन्हा पुर्वीपेक्षा जास्त तीव्र होत चालला आहे.

मुळात फाशीची शिक्षाच अमेरिकेच्या बर्‍याच राज्यांमध्ये क्रुर मानली जाते. अगदी "दुर्मिळात दुर्मिळ" अपराधांसाठी पण ती काही राज्यांमध्ये बर्‍याच वर्षात दिली गेलेली नाही.

माझे मत कायद्याने दिली जाणारी शिक्षा या निकषावर आधारित होते.

पुष्करिणी's picture

15 Jul 2010 - 1:28 pm | पुष्करिणी

काही आकडेवारी

१९७६ नंतर अमेरिकेत देहांताची शिक्षेची अंमलबजावणी : १२१९
सध्या देहदंडाची शिक्षा सुनावलेले गुन्हेगार, अंमलबजावणीच्या प्रतिक्षेत : ३२०० +

१९४७ नंतर भारतातील देहांताची शिक्षेची अंमलबजावणी : ५२
सध्या देहदंडाची शिक्षा सुनावलेले गुन्हेगार, अंमलबजावणीच्या प्रतिक्षेत : २९

माझ्यामते देहांताची शिक्षा ही अमेरिकेत तितकी 'रेअरेस्ट ऑफ रेअर ' वाटत नाहीये...

पुष्करिणी

मृत्युन्जय's picture

15 Jul 2010 - 2:19 pm | मृत्युन्जय

आकडेवारी बद्दल धन्यवाद. संपुर्ण अमेरिकेत अजुन म्रुत्युदंड हद्दपार झालेला नाही हे नक्कीच. परंतु काही राज्यांमध्ये म्रुत्युदंड अयोग्य मानला गेलेला आहे. तिकडे प्रत्येक राज्याचा या बाबतित वेगळा कायदा असतो. त्याप्रमाणे काही राज्यांमध्ये हि शिक्षा नाही. इतर ठिकाणी आहे आणी पुर्विदेखील होती.

काही राज्यांमध्ये पुर्वी बलात्कारासाठी सुद्धा म्रुत्युदंड देण्यात आला आहे. आता तो काढुन टाकला आहे किंवा दिला जात नाही. आपण मात्र त्यासाठी फाशीची मागणी करत आहोत.

थोडक्यात जे आपल्यासाठी क्रुर आहे ते इतरांसाठी असेलच असे नाही आणि जे इतरांना क्रुर वाटते ते आपल्याला वाटेलच असे नाही.