णमस्कार्स लोक्स ,
हो , आहो भारत बंद आहे ना आज ? मंग ? आम्ही घरी पडिक :) (तसंही ऑफिसात असलो तरीही आम्ही पडीकंच असतो) एखाद्या पक्षाला एकदा का बहुमत मिळालं आणि त्याला काँपिटिशन मिळाली नाही , की तो कशी मनमानी करतोय, हे आपण प्रत्यक्ष बघतोय , नाही ? असो.. राजकिय मुद्द्यांवर वाद घालावा असा काही माझा इथे हेतु नाही. पण या सगळ्यात फायदा आहे तो ण्युज चॅणल वाल्यांचा हो !! पहा पहा , आपले ण्युज वाले आपल्याला घरबसल्या अपडेट्स मिळावे म्हणुन कसे ह्या सुटीच्या दिवशी बंदाचे अपडेट्स घेऊन येत आहेत :)
एक बाकी सत्य , एखादा ण्युज चॅणल असो वा वृत्तपत्र, राजकियस बायस्ड पणा त्यांत असतोच. आता आमच्या आजतक चंच घ्या ना ? आहो हसुन हसुन मुरकुंडी वळली =)) झालं काय ? सकाळ पासुन मी हा न तो ण्युज चॅणल चाळतोय, सगळीकडे बंद सफल झाल्याचं दिसतंय , कुठे जाळपोळ होतेय , कुठे बस,रिक्षा,कार्स च्या काचा फोडल्या जात आहेत , रोड ओस पडलेत ... तोच आमचे आजतक वाले "ये बंद फेल हुआ है ... " "बंद से यातायात बिल्कुल व्यस्त नही " इत्यादी बातमी देऊन थोडक्यात काँग्रेसचं लांगुलचालन (काय शब्द आहे हो हा ,च्यामारी) का काहीतरी चालल्यासारखं दिसतंय ... मग हे लोकं बंदाचा कसा "काहीच्च परिणाम झाला नाहिये" इत्यादी सांगण्याची धडपड मला त्या टेलेब्रांड च्या जाहिरातींसारखी वाटते. तिथे एखादा प्रॉडक्ट विकताना , कैच्याकै म्हणजे कैच्याकै गोष्टी बडबडल्या जातात. जसं "ये देखीये फोन के साथ आप को मिलते है ये हाय क्वालिटी इयरफोन्स .. ये इयरफोन्स की आप के कानोंपर ग्रीप एकदम मजबुत है ... जिस्से आप को बार बार इन्को निकालना नही पडता(????? नक्की इयरफोनच्याच ग्रीप विषयी बोलतोय ना ? ) " असो ह्या आजतकच्या रिपोर्टर ने चर्चगेटावर कोणत्यातरी माणसाला पकडलं (जो मला वाटतंय १००००% त्यांचाच माणुस होता) आणि त्याला अगदीच फालतु प्रश्न विचारायला सुरुवात केली ...
१. क्या आप पे बंद का कोई असर हुआ है ?
-> नही नही , बिल्कुल नही .. ये देखो मै तो बे रोकटोक आ जा रहा हूं .. रेल्वे टाईम पे चल रही है (इकडे मी =)) )
२. आप के दफ्तर को छुट्टी नही है ? क्यो नही है ?
-> नही हमारे "सरकारी" दफ्तर को छुट्टी नही है ...
३. आप घर से कितने बजे निकले ?
-> जी मै अपने नॉर्मल टाईम पे निकला हुं जी
बास .. ह्या तीन प्रश्नांत आजतक वाल्यांनी "ह्या बंदाचा कोणताच परिणाम झालेला नाही , सगळं कसं सुरळीत चालु आहे " म्हणुन ठोकुन दिलं आणि नंतर बॉम्ब टाकला "हाला के सडकों पे कोई नही है .. सडके ओस पडी है ... "
अरे ? =)) आत्ता तर म्हणत होता सगळं सुरळीत आहे म्हणुन ?
तोच दुसर्या एका चॅनल वर "बंद से पुरा जनजिवन प्रभावित .... नितीन गडकरी ने खुद को गिरफ्तार करवाया .. बहोत से बिजेपी वाले पोलीस स्टेशन मे " तर काही पोलिसांचा निर्दयी लाठीचार्ज दाखवत होते ...
मधेच एक न्युज चॅनलवर धोनीच्या लग्नाचा एपिसोड चालु होता... त्यात एक ८-१० सेकंदांचा एका घोडीचा फुटेज असा लुप मधे दाखवत होते, एक घोडेस्वार तिच्यावर बसुन इथुन तिथपर्यंत जाताना दाखवला ... हे रिपोर्टर भाऊ चालु .. " आप देख सकते है .. ये वो घोडी है जिसपे बैठ के माही अपनी दुल्हन को लेने आयेंगे " आणि त्यावर सुमारे १० मिनीटं तेच तेच वेगळ्या अँगलने सांगणं सुरु होतं ... मनात म्हंटलं यांना जर कुठेसं त्या घोडीचं लिद वगैरे पडलेलं दिसलं तर हे त्यावर सुद्धा ३० मिनीटांचा एक एपिसोड काढतील .. 'ये देखीये ये उस घोडी का लिद है जिसपे माहि बैठणे वाले है ... जब माहि घोडी पे बैठेंगे तब उसका स्वास्थ्य और मन शांत होणा जरुरी है... असो पुढचं इमॅजिन करा "
पुढचा चॅनल मराठी .... ह्यांचा ण्युज रिपोर्टर फ्रेशर असावा , ह्याच्यात आणि आमच्या पिं-चिं-वार्ताहार चॅनल च्या ण्युज रिपोर्टर मधे काह्ही एक फरक नाही ... रखडत- अडखळत तो बिचारा बंदाच्या बातम्या देतो ... आणि फुल्टु मनोरंजन होतं !!
कधी कधी वाटतं , ह्या ण्युजचॅनल्स ची कॅटॅगरी बदलुन "एंटरटेनमेंट चॅनल" करायला हवी.
जेंव्हा जेंव्हा मेजर घटणा घटतात , तेंव्हा तेंव्हा हे ण्युजवाले एक्स्क्लुझिविटी आणि ब्रेकिंग ण्युज बनवण्याच्या नादात बातमी कमी आणि मनोरंजन जास्त करतात.
क्यामेरा म्यान परा के साथ मै टारझन चौरासिया , न्युज टीएनेन,भाजीवाला मार्केट .
प्रतिक्रिया
5 Jul 2010 - 12:03 pm | शेखर
ह्या बंद चा अजुन एक फायदा... तुझा लेख वाचायला मिळाला...
प्रथेप्रमाणे : छान लेख...
5 Jul 2010 - 12:04 pm | अवलिया
छान !
--अवलिया
लेख प्रतिक्रिया लिहिणार | खाडकन डिलीट होणार ||
"ते" सखेद फाट्यावर मारणार | निश्चितच ||
5 Jul 2010 - 1:55 pm | विजुभाऊ
ये वो घोडी है जिसपे बैठ के माही अपनी दुल्हन को लेने आयेंगे "
आणि त्यानन्तर घोडीची मुलाखत.
न्यूज चॅ: (घोडीला) आपको कैसा लगेगा जब माही आपपे सवार होगे?
घोडी: वैसाच लगेगा जैसे हर वक्त लगता है
न्यूज चॅ: क्या आपने इस शादी के लिये कुछ् खास मेकप किया है?
घोडी : हा... मेरे आगे के दो दात नये लगाये है और पुंछ मे सात गंगावन लगे है. पैरोंके चारो नाल को नया पॉलीश किया है
न्यूज चॅ: माही जब सवार होगे तो आप क्या करोगी:
घोडी: ही ही ही ही ही ही ही ही...
न्यूज चॅ: प्रेक्षकाना: यहां पर सब तरफ खुशी का माहौल है घोडी भी खुशी से हिनहीना रही है.
7 Jul 2010 - 8:50 pm | मी-सौरभ
=))
-----
सौरभ :)
5 Jul 2010 - 12:07 pm | सहज
पब्लीक बातम्या ऐवजी शीरियल बघतात, आजतक ऐवजी बीबीशी बघत्यात.. व जालावर टार्यालाच वाचायला येतात
;-)
5 Jul 2010 - 12:08 pm | मराठमोळा
न्युज चॅनेल म्हणजे दुसरं तिसरं काही नसुन केवळ मनोरंजनाचं साधन आहे. मला आजही दुरदर्शन चॅनेल आवडतो. ते बातमी बातमीप्रमाणे दाखवतात. उगाच तीची सिरियल्/सिनेमा करत नाहीत.
ईंडीया टीवी तर खासच.
डीडी न्युज इज बेस्ट. आयबीएन७, एनडीटीवी सुद्धा बरा आहे.
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
5 Jul 2010 - 12:09 pm | छोटा डॉन
आत्ताच चहा घेऊन टीव्हीसमोर बसलो आहे.
आता फटाफट पुढच्या बातम्या सांगा बरं ;)
------
(प्रेक्षक)छोटा डॉन
5 Jul 2010 - 12:49 pm | तिमा
काँग्रेस वाईट आहेच हो, ते आपण कधीचं भोगतो आहोत. पण बंद पुकारुन महागाई कशी कमी होणार ते कळलं नाही. सर्व बंद पुकारणार्या पक्षांनी एकदा तरी ऐच्छिक बंद ठेवून पहावा. मग कळेल तुमची खरी ताकद किती आहे ते.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
5 Jul 2010 - 2:05 pm | विजुभाऊ
काँग्रेस वाईट आहेच हो,
भाजपचे मात्र खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. पेट्रोलियमच्या किमतीवरील वरील सरकारी नियंत्रणे उठवावीत , त्यांच्या किमती मार्केट नुसार असाव्यात या मागणी ची सुरवात भाजप ने केली. सत्तेत असताना हाच भाजप पेट्रोलियम पदार्थांवरील दरवाढीचे समर्थन करत असतो. काँग्रेस च्या कालावधीत पेट्रोलियम पदार्थांच्या किम्मत नियन्त्रणामुळे सरकारला किती तोटा सहन करावा लागला याची आकडेवारी देखील सादर केली जाते. महागाईचे मूळ कारण असणार्या कमोडीटी मार्केटची भलावण भाजप करते.
खासदार आमदारांच्या पगारवाढीमुळे सरकार वर पडणार्या बोजाचे कोणीच प्रतिपादन करत नाही
6 Jul 2010 - 10:51 am | समंजस
सहमत!
[त्यामुळेच मला पडलेला प्रश्न हा की, भाजपाचं सरकार पुढील निवडणूकीत पडलं ते या कारणांमुळे की (कथित)जातीयवादी असल्याच्या कारणामुळे] :?
5 Jul 2010 - 1:18 pm | शानबा५१२
गेल्या वर्षी पाउस पडला तेव्हा त्याच्या आद्ल्या वर्षीचे फुटेज दाखवत होते,ही बाब कोणीतरी लक्षात आणुन देताच त्यावर सारवासारव केली गेली होती
_________________________________________________
![]()
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे
5 Jul 2010 - 1:24 pm | डोमकावळा
>> यांना जर कुठेसं त्या घोडीचं लिद वगैरे पडलेलं दिसलं तर हे त्यावर सुद्धा ३० मिनीटांचा एक एपिसोड काढतील
=))
खरय... हे बिनडोक कुठल्या बातमीवर किती वेळ घालतील हे सांगताच येत नाही....
मध्यंतरी इंडिया टीव्ही वाल्यांनी 'नाग नागीन का प्रणय' वगैरेवर जवळ जवळ १ तास डोक्याची वाट लावली होती.
खरच बातम्या पहाव्यात तर दूरदर्शनच्या...
बाकी टारझन एक्स्कुझिव झकासच....
ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान.
5 Jul 2010 - 1:39 pm | गणपा
हा हा हा
न्यु(सं)स च्यानल्स् चा णाद आम्ही लै पुर्वी पासुन सोडला. जेव्हा अंमळ बोर होतो तेव्हा २ घटका करमणुकीसाठी कुठलाही बातम्यांचा चॅणल लावुन बसतो.
5 Jul 2010 - 1:46 pm | इंटरनेटस्नेही
टारझन तुम्ही ग्रेट आहात!
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
5 Jul 2010 - 1:50 pm | नितिन थत्ते
_/\_
नितिन थत्ते
5 Jul 2010 - 1:59 pm | परिकथेतील राजकुमार
टार्या पुन्हा एकदा षटकार रे !
बाकी सुट्टी असताना आणि समोर लेपटॉप असताना देखील तु आज-तक का बघत आहेस बाबा ?? गम्माडी-गंमत साईट चालु आहेत की त्या काही भारतबंद मध्ये सामील नाहियेत ;)
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
5 Jul 2010 - 2:13 pm | बिपिन कार्यकर्ते
मस्त रे टार्या... आवडला लेख. या न्युजवाल्यांचा अस्थिदंत विमा का नाही काढत तू?
बिपिन कार्यकर्ते
5 Jul 2010 - 8:26 pm | सर्वर डाऊन
ह्या ले़खाचा प्रिमीअर अथवा प्रिव्हयु टार्या भाउंनी पिंपरित दाखवला होता वेळ संध्याकाळ ७.३० मि. रविवार ४ जुलै.
5 Jul 2010 - 10:14 pm | टारझन
च्यामायला ... आज तु लॉगिन ? :) वेळात वेळ काढुन प्रतिक्रीयवल्या बद्दल आभारी आहे मालक :)
-
5 Jul 2010 - 8:56 pm | अरुंधती
चॅनलवाल्यांनी आज मनोरंजनाचा तर कहरच केला! तसा तो कालपासूनच चालू होता. धोणीच्या लग्नाला त्यांनी धू धू धुतले. आज बंदवरुन आपले तारे तोडले! एक तो कॅमेरा जवळ असल्यावर आता रस्त्यावरचा कोणीही ऐरागैरा बिनडोक माणूसही मस्त बातमीदार बनू शकतो हेच वारंवार सिध्द होते!
आणि अशा बातम्या फार्फार सीरियसली घेणारे? ;-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
5 Jul 2010 - 10:33 pm | शैलेन्द्र
लय भारी..
"३. आप घर से कितने बजे निकले ?
-> जी मै अपने नॉर्मल टाईम पे निकला हुं जी"
हा हाजी हाजी करणारा कुठुन शोधलेला कुणास ठावुक?
6 Jul 2010 - 5:42 am | अंतु बर्वा
हा पहा असाच एक रीपोर्टर... :-)
6 Jul 2010 - 10:44 am | शिल्पा ब
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
कराची में.....कराची में ...करा करा कराची में...काय तरी ध्यान ए =)) =)) =)) =)) =))
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com
6 Jul 2010 - 10:46 am | समंजस
मस्त!! सहमत!! :)
काय करणार बिचारे, त्यांना सुद्धा वाढत्या महागाईला तोंड द्यायचयं म्हणून शक्य होईल तेव्हढी बडबड(असंबंध्द का असेना) करून आपापल्या चॅनल्सचा टिआरपी वाढवण्याचा प्रयत्न(केवीलवाणा) करावा लागतो :)
7 Jul 2010 - 10:47 am | स्पंदना
नेहमी सारखाच, प्रासंगिक अन म्हणुनच पटकन भावुन जाणारा!
अम्हाला बंद नसतो...हा... पण भारतात कस सणादिवशी शनिवार रवीवार असेल तर ती सुट्टी बुडते तस नाही इथे..ती सुट्टी येणार्या मन्डे ला मिळते.
मला वाटल होत बंद , बंद झालेत म्हणुन. अजुन सुरु आहेत तर!!
करा मजा करा..
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते