एक विचित्र अनुभव ...

sagarparadkar's picture
sagarparadkar in काथ्याकूट
3 Jul 2010 - 5:01 pm
गाभा: 

नमस्कार मिपाकरांनो,

गेले अनेक दिवस मिपावर चाललेल्या वेगवेगळ्या चर्चा वाचत होतो. त्या अनुशंगाने मला आलेला एक विचित्र अनुभव शेअर करवासा वाटतो.

साधारण २००३-४ च्या सुमाराची गोष्ट आहे. मी आणि माझे काही मित्र अनेक रविवारी फर्ग्युसनमागील हनुमान टेकडीवर पहाटे पहाटे जायचो आणि नंतर एफ. सी. रोडवरील 'वैशाली' हॉटेल मधे नाश्ता करत असू. त्यावेळेस वैशाली हॉटेलमधे एक म्हातारा कन्नड भाषिक माणूस येत असे. बहुदा त्याची आर्थिक परिस्थिती फारशी बरी नसावी. कारण तो अनेकदा येणार्या जाणार्यांकडे ५-१० रुपये मागत असे, आणि नंतर हॉटेलमधे काहितरी खात असे.

माझा आणि माझ्या मित्रांपैकी कोणाचाही त्याच्याशी थोडादेखील परिचय नव्हता. शिवाय तो माणूस अनेकदा असंबद्ध बड्बडत असे, त्यामुळे कोणी सामान्य माणूस त्याच्याशी बोलायला देखील जात नसे.

एकदा रात्री मी एफ. सी. रोडवरील आय्.डी.बी.आय. च्या ए.टी.एममधऊन पैसे काढायला गेलो होतो. सालाबादप्रमाणे रस्यावरील दिवे गेलेलेच होते. पण ए.टी.एम आणि कोरिडॉर्मधे एक ट्यूब चालू होती.

कार अंधारातच उभी करायला लागली होती. पैसे काढून परत येतो तर तोच म्हातारा माणूस ५-१० रुपये मागू लागला. पण माझ्याकडे सुट्टे पैसे नसल्यामुळे (१०० आणि ५०० च्या नोटा) मी त्याच्याकडे दुर्लक्ष करून तसाच निघालो होतो. पण गम्मत म्हणजे त्याने मला माझ्या व माझ्या तीर्थरुपांच्या नावाने हाक मारून परस्पर सांगू लागला कि तुम्ही इन्ग्लंड अमेरीकेत जाल, असं कराल तसं कराल. थोड्क्यात माझं थोडंफार भविष्य सांगू लागला. व म्हणाला की भरपूर पैसे मिळवाल पण मला गरीबाला ५-१० रुपये तरी द्याच.

पण माझ्याकडे खरोखरीच सुट्टे पैसे नसल्यामुळे मी त्याला म्हणालो कि नंतर कधीतरी देतो. त्यावर तो म्हणाला की नंतर कधी आणि कुठे भेटणार, आताच द्या. तर मी त्याला सांगितले की मी तुम्हाला 'वैशाली'पाशी अनेअकदा पाहिले आहे. तेव्हा परत तिथे भेट्लात की देइन. त्यावर तोसुद्धा समजूत पटल्यासारखा गप्प बसला. आणि माझी एकदाची सुटका झाली.

त्यानंतर अनेकदा 'वैशाली'त जाणे झाले पण 'तो' काही भेटला नाही.

मला आणि त्यावेळी माझ्या बरोबर असणार्‍यांना एक दोन प्रश्न पडले, की ह्या माणसाचा परीचय देखील नसताना त्याला माझे नाव कसे समजले? बरं मित्रांनी हाका मारताना ऐकले असेल तर मग माझ्या तीर्थरुपांचं नाव त्याला कसं समजलं असावं? बरं मुद्दम्हून माहीती मिळवून लक्षात ठेवायचं म्हटलं तरी केवळ ५-१० रुपयांसाठी एव्हढे उपद्व्याप कोण करेल? शिवाय माझ्या कोणत्याच मित्राशी तो कधी बोलल्याचं ऐकलं नव्हतं. परत तो थोडासा वेडसर व असंबद्धं बड्बड करणारा असा असल्यानं त्याला फारसं कोणी एंटर्टेन करत नसे.

ज्यावेळी त्याने माझ्या अमेरीकेला जाण्याबद्दल भाकीत केलं त्यावेळी माझं करीयर आणि एकूण परिस्थिती अशी होती की ते ऐकून मला तर हसायलाच आलं होतं. पण नंतर खरोखरच अमेरीकेच्या तीन वार्‍या होवून गेल्या.

ह्याबद्दल काही परिचितांशी बोलल्यावर थोड्याशा अंधश्रद्धेच्या वाटतील अशा प्रतिक्रिया ऐकू येवू लागल्या, ज्याबद्दल मला फारसा विश्वास ठेवता येत नाही.

पण मग परत त्या प्रश्नांना काय उत्तरं देता येतील? इतर कोणत्या शक्यता असतील?

हा निव्वळ एक 'इल्लॉजिकल' अनुभव म्हणून शेअर करत आहे, कोण्त्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा स्वतःच महत्व वाढवण्याचा प्रयत्न समजू नये.

प्रतिक्रिया

पण एकतर त्यावेळी आपल्याला आपणा बद्दल खात्री नसल्यामुळे दुर्लक्ष होते. व जे सांगितले त्याप्रमाणे घडुन येते.
मागे अरुंधतीनी देखिल असे काही अनुभव लिहले आहेत मिपावर त्याबद्दल वाचा.
वेताळ

प्रकाश घाटपांडे's picture

3 Jul 2010 - 5:19 pm | प्रकाश घाटपांडे

आश्चर्यकारक असणारे बरेच योगायोग असतात.
अधिक माहिती साठी ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी.... मधील हा प्रश्न क्र ५५ वाचा
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

शानबा५१२'s picture

3 Jul 2010 - 9:04 pm | शानबा५१२

हे एवढ मोठ पुर्ण वाचुन जायच्या आधीच ज्योतिषी उठलेला असेल............एकतर आयुष्यातुन नाहीतर धंद्यातुन!!
:H ........... :D

_________________________________________________
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे

नितिन थत्ते's picture

3 Jul 2010 - 8:42 pm | नितिन थत्ते

असाच अनुभव आम्हालाही एकदा (त्याच भागात) आला होता.
एका रात्री उशीरा ;) आम्ही मित्र थोड्याश्या 'उंचावरून' फर्ग्युसन कॉलेज कडून संभाजी पार्ककडे जाणार्‍या रस्त्यावरून चाललो होतो. तेव्हा असेच 'खूप उंचावर' असलेले एक काका त्या रस्त्यावर आम्हाला भेटले. आमचे त्यांचे बोलणे कसे सुरू झाले ते आठवत नाही पन त्यांनी आमचे हात पाहून भविष्ये (पक्षी= स्वभाव वगैरे) सांगायला सुरुवात केली. थोड्याच काळात काहींना ते 'सगळे बरोब्बर' सांगत असल्याची खात्री पटू लागली. :)

माझा हात पाहून मी 'जीनिअस पार एक्सलन्स' =)) =)) असल्याचे सांगितल्यावर मलाही ताबडतोब पटले. ;)

त्यांचे नाव त्यांनी 'अनपट' असल्याचे सांगितले. नंतर केव्हातरी त्या रस्त्यावर अनपट नावाच्या व्यक्तीचा मोठा बंगला असल्याचे दिसले. ते आणि हे अनपट एकच का हे कळले नाही.

नितिन थत्ते

सहज's picture

3 Jul 2010 - 8:51 pm | सहज

हा हा अनुभव येण्याकरता माणसाला एक किमान उंची गाठावी लागते असे ऐकले होते खरे. त्याला दुजोरा देणारा थत्ते यांचा अनुभव.

सागर साहेब तुम्हाला भेटुण्यापुर्वी अगदी तोच संवाद त्या दिवशी त्या व्यक्तीने १० जणांशी केला असेल तर? बाकी आपल्या पिताश्रींचे नाव एका देवाचे नाव आहे काय?

शानबा५१२'s picture

3 Jul 2010 - 9:01 pm | शानबा५१२

तुम्ही तेव्हाच का नाही विचारले?
मी तेव्हा का नाही विचारल ह्याच उत्तर मला वाटल तुम्ही लेखात लिहाल म्हणुन वाचत राहीलो पण नाही वाचायला भेटल्/मिळाल्/सापडल म्हणुन निराश झालो.

असले प्रश्न 'निरुत्तर' राहीले की लेखाबद्दल गैरसमज होतात.तेव्हा क्रुपया 'उत्तर' द्यायचा त्रास घ्यावा,उस्तुक आहे.

कळावे.

_________________________________________________
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे

सर्वांचे आभार ...

पण मी स्वतः आणि त्यावेळी माझ्याबरोबर असणारे कोणीच कधीही 'उंची' वर जात नाही.

तेव्हाच न विचारण्याचं कारण वर म्ह्टल्याप्रमाणे तो असंबद्ध बड्बडत असे व थोडासा तरी विचित्र वर्तन करत असे. त्यामुळे मला आपले बोलणे त्याला कितपत आकलन होईल याबद्दल शंकाच होती. शिवाय त्यावेळी तरी मला असं वाटलं कि ह्याच्याशी फारसं काही बोलण्यात वेळ घालवू नये.

शानबा५१२'s picture

5 Jul 2010 - 9:34 am | शानबा५१२

अस आहे का,अच्छा.
पण तो तुम्हाला कधीच भेटला नाही?? आश्चर्य आहे......आपण त्या हॉटेल मधे कधी वडीलांबरोबर गेलेलात का??
आपला कुणी मित्र त्याच्याशी बोलायचा का??
तो आपण बोलत असताना त्याला एकु जाइल एवढ्या अंतरावर उभा रहायचा का??

घाबरु नका आपण शोधुन काढु काय भानगड आहे ती,मी फाइल्स मागवल्या आहेत.

_________________________________________________
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे

अप्पा जोगळेकर's picture

5 Jul 2010 - 9:22 am | अप्पा जोगळेकर

सागर,
वाला हा दुवा वाचा.
'पॉवर ऑफ कोइन्सिडन्स'
आपलं व्हॅलिडेशन सिलेक्टिव्ह असतं. म्हणून हे असे अनुभव येतात. बाकी, तुम्ही स्वतःच असं लिहिलंय की तुम्ही 'वैशाली' की कोणत्यातरी हॉटेलात जायचात तेंव्हा तो तिथे असायचा. त्याने तुमचं बोलणं ऐकलं असेल कधीतरी. आणी कळलं असेल तुमचं आणि तीर्थरुपांचं नाव.

अविनाशकुलकर्णी's picture

6 Jul 2010 - 12:09 am | अविनाशकुलकर्णी

होते असे कधि कधि...मला पण असे अनुभव आले आहेत

कवितानागेश's picture

9 Jul 2010 - 12:58 pm | कवितानागेश

माझ्याएका मैत्रीणीला असाच अनुभव आला होता.
(ती पक्की नास्तिक , कम्युनिस्ट, आणी अंधश्रद्धा निर्मूलन्वाली होती.)
तिला एका अनोळ्खी मुलानी तिच्याबद्दल्ची 'सग्गळ्ळी' माहिती सगळ्ळ्या नावांसकट सान्गितली.
ती अनेक दिवस गारठलेली होती....
.... मी मात्र तिला फिदीफिदी हसायचे!!
============
( दुष्ट चेटकीण)माउ

sagarparadkar's picture

9 Jul 2010 - 1:55 pm | sagarparadkar

अहो तो मुलगा तिच्याच आसपासच्या वयाचा होता का ?

तुमची मैत्रीण त्याचा हळवा कोपरा असेल तर मला तरी आश्चर्य वाटणार नाही.

शानबा,

पण तो तुम्हाला कधीच भेटला नाही?? आश्चर्य आहे......आपण त्या हॉटेल मधे कधी वडीलांबरोबर गेलेलात का??
नाही!

आपला कुणी मित्र त्याच्याशी बोलायचा का??
नाही!
तो आपण बोलत असताना त्याला एकु जाइल एवढ्या अंतरावर उभा रहायचा का??
नाही!

ह्या सर्व शक्यता मी ऑलरेडी पडताळून फेटाळून लावल्या आहेत ...

म्हणून तर मला हा अनुभव विचित्र वाटला.

अवांतरः मी कोणाचा हळवा कोपरा असू शकत नाही ... तीपण शक्यता आधीच फेटाळलेली बरी :)

शानबा५१२'s picture

9 Jul 2010 - 2:05 pm | शानबा५१२

ह्त च्यायला मग तर अनुभव जाम विचित्र आहे.आपण अजुन उत्तर शोधत असाल व आपल्याला काही कळल तर नक्की सांगा.
आपण उत्तर द्यायची तसदी घेतलीत त्याबद्दल आभार व आपणास सर्व शुभेच्छा!

_________________________________________________
see what Google thinks about me!
इथे