उपक्रमावर श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्या एका चर्चेत गुरफटलो होतो.
तेथे मला एका सदस्यानी
शोध निबंध वाचायला अनेक सायंटिफिक जर्नल्स उपलब्ध आहेत. त्यातले कुठलेही मान्यता प्राप्त जर्नल वाचून पाहा. संशोधन, प्रयोग वगैरे कसे करतात याची चिक्कार माहिती मिळेल.
असा सल्ला दिला. पण मला असे जर्नल्स मराठीमध्ये कुठेही मिळाले नाहीत.
मी डोळे फुटेस्तोवर शोधले, काहीही मिळाले नाही. जे आहे ते सगळे काही इंग्रजी भाषेत आहे.
मराठीत काहीच मिळाले नाही.
हे तर फार म्हंजे फार लांबची गोष्ट झाली!
मला साधे लहानमुलांना विज्ञानातील साध्या साध्या कल्पना समजावून सांगणारे
मराठी स्थळही मला दिसले नाही. आता बोला!
मराठी मध्ये फक्त फालतू श्रद्धा प्रतिसादरुपी कंदीलाचे कागदावर चित्र काढून देतात, आणि म्हणतात, 'घ्या!! आता पडेल प्रकाश!!!'.
हे ही नसेल तर विनोदाच्या नावाखाली फक्त टिंगल टवाळी!
तुम्ही मला सांगा, अश्या लोकांचे कोरडे सल्ले काय कामाचे हो?
या लोकांना याला त्याला कोरडी अक्कल शिकवण्यापेक्षा काही तरी करून दाखवण्याचे खुले आव्हान मी देतो.
मी म्हणतो, कॅच देम यंग - लहान मुले बुवा बाबाच्या नादी लागण्याआधीच त्यांना विज्ञानाच्या नादी लावा!
विज्ञानासाठी खरोखर काही करायचे असेल तर, मराठी भाषीक लहानांसाठी,
शालेय मुलांसाठी एक विज्ञान आणि गणित समजावून सांगणारे मराठी स्थळ या विज्ञानवाद्यांनी काढावे.
हे असे करता येईल -
- - हे एक सर्व शाळांना सामील होता येईल असे पोर्टल असावे
- - तेथे मुलांना आपले वाटावे म्हणून मराठी शाळा शाळांना त्यांचे पान द्यावे.
- - तसे त्या शाळांना कळवावे
- - या प्रकल्पाला वृत्तपत्रातून प्रसिद्धी द्यावी - ती नक्की मिळेलच
- - शालेय मुलांना मराठीमध्ये, सहजतेने एकमेकांना जोडू शकतील असे वैज्ञानिक प्रकल्प तेथे राबवावेत
- - मराठी माध्यमाच्या शाळातील संगणक विभागांशी संपर्कात येऊन, त्यांना मराठीतही वैज्ञानिक गोष्टी मिळतात याची जाणीव करून द्यावी.
- - मराठीचा संगणकावर सुयोग्य वापर कसा करावा यावर प्रयोगासहीत व्याख्याने आयोजित करावीत.
- - देण्यासाठी संगणकीय मराठी कशी वापरावी याची पत्रके छापून घ्या ती शाळा शाळांना द्या.
- - शिक्षकांना मराठी मराठीतून संगणक कसा वापरावा याचे प्रशिक्षण द्यावे
- - मराठीसाठी उपलब्ध असलेली गमभन ते ओपन ऑफिस मुक्तशब्दकोश एका सीडीवर मोफत उपलब्ध करून द्यावे
- - मराठी माध्यमाच्या शाळातील संगणक विभागांशी संपर्कात येउन मराठीतून शैक्षणिकरित्या देता येतील अशी संगणकाची एखादी शिक्षण पद्धती विकसित करून द्यावी
- - मराठी माध्यमाच्या शाळात आंतरजालिय जोडण्या देण्यासाठी साधने उभी करावीत.
- - या प्रकल्पासाठी उपयुक्तता पटावून देऊन पैसे उभे करावेत. विज्ञानवादी प्रकल्प म्हंटल्यावर याची अडचण होऊ नये!
बोला करताय? आहे हिम्मत प्रकल्प तडीस नेण्याची?
नाहीतर मराठी शाळेतली मुलांनी काय फक्त ट्रिपल एक्स साईट्सवरच आपली संगणकीय तहान भागवायची का?
तुम्ही नाही द्यायचे तर कोण देणार आहे हे हे प्रशिक्षण?
तुमच्यात हिम्मत असेल तर गुंडोपंत स्वतः मदतीला तयार आहेत.
काहीही विधायक मराठी मध्ये करत असाल,
तर मदतीला हजार हात तयार होतील याची मला खात्री आहे!
बोला घेताय हे खुल्लमखुल्ला आव्हान?
आपला
गुंडोपंत
प्रतिक्रिया
3 Jun 2010 - 10:06 am | सहज
उपक्रमींना अंधश्रद्धाविरोध, डॉकिन्स, अंभग, फोटो, संस्कृत, व्याकरण ह्याशिवाय इतर विषयांचे जबरा वावडे आहे असे दिसल्यावर असेच काहीसे एक सर्कीट नावाचे सदस्य होते त्यांनी उपक्रमाच्या सदस्यांना लिहले होते.
शशांक तुम्हारा चुक्याच लेख लिहायचे आव्हान कोण घेतयं?
3 Jun 2010 - 10:44 am | मिसळभोक्ता
असे जुने उपक्रमी नको तिथे नको त्या सदस्यांची नावे टाकतात. श्री/सौ/कु सर्किट सध्या अस्तित्त्वात असते, तर छाया/प्रकाश चित्रांतून मराठीची उन्नती आज होतेय, तेवढी झाली असती का ?
शशांक च्या नावाचा उल्लेख खटकला. "जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा" हे वाक्य ज्या स्थळाच्या मुखपृष्ठावर आहे, त्या संकेतस्थळाच्या चालकाला "की घेतले न व्रत हे अम्ही अंधतेने" हे ठावूक असावे, आणि तेथील सर्व कार्य अंधतेने चालू नसावे असे आम्ही मानतो.
मुख्य म्हणजे श्री शशांक ह्यांनी कुणाही कॅन्सरग्रस्त सदस्येसाठी निधी गोळा केला नाही, हे आम्ही महत्त्वाचे मानतो.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
4 Jun 2010 - 12:37 am | मुक्तसुनीत
प्रस्तावात सूचित होत असलेल्या अन्य-संस्थळ-संदर्भातल्या व्यक्तिगत मानापमानाना आणि हेव्यादाव्याना त्याज्य मानतो.
प्रस्तावात ज्याचा तळमळीने उल्लेख केल्याचे जाणवते त्या प्रबोधनाच्या आवाहनाबद्दल अभिनंदन करतो. त्यातल्या भावनांबद्दल सहमती दर्शवतो.
प्रस्तुत प्रकरणी प्रस्तावलेखकाकडे काही ठोस योजना असतील तर त्याविषयी ऐकायला आवडेल.या प्रकरणी काही मदत शक्य असेल तर करण्याची ग्वाही देतो. मात्र असल्या कुठल्याही योजनेशिवाय प्रस्तावलेखकाचा सगळा पवित्रा फार अर्थपूर्ण वाटत नाही असे सखेद नमूद करतो.
4 Jun 2010 - 1:25 am | गुंडोपंत
प्रस्तावात ज्याचा तळमळीने उल्लेख केल्याचे जाणवते त्या प्रबोधनाच्या आवाहनाबद्दल अभिनंदन करतो. त्यातल्या भावनांबद्दल सहमती दर्शवतो.
धन्यवाद! भावना पोचल्या
प्रस्तुत प्रकरणी प्रस्तावलेखकाकडे काही ठोस योजना असतील तर त्याविषयी ऐकायला आवडेल.या प्रकरणी काही मदत शक्य असेल तर करण्याची ग्वाही देतो.
विज्ञान आणि गणित विषयावर विद्यार्थ्यांसाठी स्थळ असले पाहिजे. हे ठोस आव्हान आहेच.
मात्र असल्या कुठल्याही योजनेशिवाय प्रस्तावलेखकाचा सगळा पवित्रा फार अर्थपूर्ण वाटत नाही असे सखेद नमूद करतो.
काय करणे अपेक्षित आहे ते दिले आहे.
हा आव्हान घेण्याचा भाग आहे.
घेताय का आव्हान?
आपला
गुंडोपंत
4 Jun 2010 - 1:49 am | मुक्तसुनीत
हा आव्हान घेण्याचा भाग आहे.
घेताय का आव्हान?
नाही. मी येथे पैलवानगिरी/युद्धखोरगिरी/कंडुशमन/खुमखुमीचे शमन या पैकी कशाकरताही आलेलो नाही. तेव्हा आव्हान देणे-घेणे असले व्हिक्टोरियन युगातले प्रकार यामध्ये काडीचाही इंटरेस्ट नाही.
मात्र तुमच्या लिखाणात विधायक कामाच्या काही खुणा आहेत. लिखाणाचे प्रॉमिस उच्चकोटीचे आहे. त्याची डिलिव्हरीही या उच्चकोटीला शोभावी असे वाटते.
4 Jun 2010 - 12:01 pm | अक्षय पुर्णपात्रे
असा उपक्रम सुरू करून तडीस नेण्यासाठी विज्ञानवाद्यांनीच पुढे व्हावे अशी अपेक्षा नसावी. विज्ञानवादी वगैरे संज्ञा वापरल्यास अनेक प्रश्न (उदा. विज्ञानवादी म्हणजे कोण? त्यांनीच हे करावे अशी अपेक्षा का ठेवावी? वगैरे) उद्भवतात. ते प्रश्न टाळल्यास उपक्रमाविषयी सर्व विचारांच्या लोकांना आत्मीयता वाटेल. विधायक उपक्रम आहे. सर्वांनी यथाशक्ती प्रयत्न करायला हवेत. या उपक्रमात शक्य तेवढी मदत करण्यास माझी पूर्ण तयारी आहे. उपक्रमाची व्यापकता सुरुवातीला मर्यादीत ठेवता येईल. येथे एक श्री आत्तार नावाचे सदस्य आहेत. त्यांनी त्यांच्या शाळेत अशा प्रकारचे उपक्रम राबवले आहेत. त्यांच्याशीही चर्चा करता येईल.
4 Jun 2010 - 12:20 pm | गुंडोपंत
तसा प्रस्ताव मांडला लगेच! :)
आपला
गुंडोपंत
3 Jun 2010 - 10:07 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
लेखातून व्यक्त होणारा उद्देश चांगला आहे पण भाषा आक्रस्ताळी वाटली.
या उपक्रमास भरघोस शुभेच्छांपलिकडे जास्त लिहायला सध्या वेळ नाही आहे, त्यामुळे क्षमस्व.
अदिती
3 Jun 2010 - 10:12 am | गुंडोपंत
पण भाषा आक्रस्ताळी वाटली.??
अहो आहेच!!!
हिम्मत असेल तर असे स्थळ उभे करूनच दाखवावे असे आव्हान आहे!
आपला
गुंडोपंत ठाकरे
3 Jun 2010 - 10:33 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
चालूद्यात तुमचा भांगडा ... मला त्यात काहीही रस नाही!
अदिती
3 Jun 2010 - 10:57 am | गुंडोपंत
भांगडा????
तुम्हाला हा तडम ताशा आणि हे लेझिम भांगडा वाटते??
अरेरे!!!
आपला
गुंडोपंत
3 Jun 2010 - 10:08 am | पाषाणभेद
चांगली कल्पना आहे गुंडोजीराव!
सहभाग घ्यायचा म्हणून दिलेले इंग्रजीतील सोर्स मॅटर (जास्तित जास्त) मराठी करण करून टंकन करून देवू शकतो.
कधीही कळवा.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
3 Jun 2010 - 10:21 am | गुंडोपंत
क्या बात है!
झकास!
पाहू या ना विज्ञानवादी काय म्हणतात आणि करतात ते...
आपला
गुंडोपंत
3 Jun 2010 - 10:09 am | आनंदयात्री
बरे झाले तिचायला आपण ते विज्ञानवादी की काय नाही ते !!
3 Jun 2010 - 10:15 am | गुंडोपंत
बच गया स्साला!
आपला
गुंडोपंत ठाकूर
3 Jun 2010 - 10:23 am | सहज
>बरे झाले तिचायला आपण ते विज्ञानवादी की काय नाही ते !!
हेच म्हणतो :-)
(आंद्याश्रीचा मित्र) सहज
3 Jun 2010 - 11:46 am | गुंडोपंत
ये भी बच गया!
गुंडोपंत ठाकूर
3 Jun 2010 - 6:52 pm | टारझन
संपादित
- भेळपुरीचा हात्गाडीकर्ता
3 Jun 2010 - 10:17 am | मिसळभोक्ता
उपक्रम ह्या वेगळ्या संकेतस्थळावर सदर आव्हान समजा कुणी घेणार नसेल, तर मिसळपाव ह्या संकेतस्थळावर सदर आव्हान घेण्याची शक्यता कमी वाटते.
उपक्रमावर आरागॉर्न नावाचे एक सदस्य आहेत. त्यांचे नाव राजेंद्र क्षीरसागर. ते आपण दिलेल्या सर्व आव्हान पूर्तीसाठी विवक्षीत बुद्धिमत्ता ठेवून आहेत.
परंतु, समजा ते जर हे आव्हान घेऊ शकणार नाहीत, तर त्या कारणांची मिमांसा व्हावी. आणि त्या कारणांची पूर्ती करण्यासाठी गुंडोपंत काय करताहेत, ह्याचा खुलासा व्हावा.
म्हणजे, मग मराठी संकेतस्थळांवरील सदस्य "गुंडोपंत" ह्या सदस्याची आव्हाने का स्वीकारत नाहीत, असे विषय चिघळण्याला येथील सर्व सदस्य मोकळे होतील.
माझ्या लक्षात एक आलेले आहे, की सर्व प्रकारचे ज्ञान मराठीत (आणि मराठीतच) उपलब्ध व्हावे, ह्याविषयी आपण बरेचदा लिहिता. त्यात असेही लिहिता, की इंग्रजीतले ज्ञान गुंडोपंतांना उपलब्ध नाही.
माझ्या मते, हे पूर्णपणे असत्य आहे. गुंडोपंत ह्या व्यक्तीशी मी प्रत्यक्ष बोललो आहे. आणि त्या संभाषणावरून असे वाटते, की गुंडोपंताला इंग्रजी व्यवस्थित कळते. मराठीचा आग्रह धरणे, हे मी समजू शकतो, परंतु त्यासाठी खोटे नाटे बोलणे मला पटत नाही.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
3 Jun 2010 - 10:19 am | आनंदयात्री
सगळ्याच प्रकारच्या गंमती जंमतींवर विरजण घालु नये ही विनंती !
:D
3 Jun 2010 - 10:27 am | गुंडोपंत
मी तुमच्याशी बोललो तेंव्हा मराठीतच बोललो! इंग्रजीत नाही!!!
नक्की कुणाशी बोलला?
की माझ्या नावावर भलतेच कुणी तुम्हाला फोन करते आहे?
बाकी,
इंग्रजी सोडा हो! मला तर मराठीही धड कळत नाही!!!
१६ वेळा वाचला अजूनपण धड समजले असे वाटत नाही!!
बाकी ज्यांना विज्ञानाची फार चाड आहे, त्यांना येऊ द्या पुढे.
आपला
गुंडोपंत नापास
3 Jun 2010 - 10:36 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
मग सोडून द्या की ... येवढं करण्यापेक्षा सगळ्यां लहान मुलांना इंग्लिश आणि मराठीही शिकवणं जास्त सोपं!! Catch them young to teach English too!
अदिती
3 Jun 2010 - 10:37 am | मिसळभोक्ता
गुंडोपंत,
आपण ज्या लेखाचा दुवा दिला आहे, तो मी पण वाचायचा बराच प्रयत्न केला.
पूर्ण सोबर असताना सकाळी प्रयत्न केला.
मग लक्षात आले, की उपक्रमावर वाचतोय, म्हणून थोडे फार सी२एच५ओएच टाकले (जास्त नाही, बरे का?) आणि मग पुन्हा वाचला. पण तरी कळेना.
अहो, एवढ्या सी२एच५ओएच लेव्हलवर मी भल्याभल्या सायंटिस्टच्या रीसर्च प्रपोझल्सचा (सॉरी, वैज्ञानिकांच्या संशोधन मसुद्यांचा) निकाल लावतो. हा साला धन्या वेगळ्याच झाडाची पत्ती निघाला.
जीवन कठीण आहे. आणि, जीवन मराठीत अधिकच कठीण आहे, हे नक्की.
असो. ह्या सर्व समस्या शैलेश खांडेकर सोडवेल, ह्या अपेक्षेत मी आहे.
डेटा ह्या कठिण संकल्पनेसाठी "विदा" हा सोपा प्रतिशब्द त्यानेच सुचवला, आणि मनोगतापासून महाराष्ट्र टाईम्स पर्यंत आज तो शब्द सगळे वापरतात. खरे की नाही ?
माझे मराठी संकेतस्थळ सदस्यांना म्हणणे एकच. गुंडोपंत राहू नका. शैलेश व्हा. प्रश्न विचारणे सोपे असते. उत्तर देणे शिका.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
3 Jun 2010 - 11:05 am | गुंडोपंत
आपले तुपले उपक्रमावरही जमले होते हो. पण मध्येच तुम्हाला ती फाशीची शिक्षा झाली अन खेळ आटोपला... :(
(सॉरी, वैज्ञानिकांच्या संशोधन मसुद्यांचा)
वा वा! आनंद झाला बरं का!
जीवन कठीण आहे. मनातले बोल्लात!
जीवन मराठीत अधिकच कठीण आहे, हे नक्की.
खरे आहे हो! अगदी काळजाला भिडले बर्का!
गुंडोपंत राहू नका. शैलेश व्हा. प्रश्न विचारणे सोपे असते. उत्तर देणे शिका.
वा वा! भव्य टाळ्यांचा गजर!!!
आपला
गुंडोपंत
3 Jun 2010 - 11:51 am | आनंदयात्री
>>पण मध्येच तुम्हाला ती फाशीची शिक्षा झाली अन खेळ आटोपला...
कोण कोण !! कोण तो गोडसे ?
4 Jun 2010 - 4:34 am | धनंजय
आत्त हा पूर्वीपासून उपलब्ध शब्द मला अधिक आवडू लागला आहे.
"विद्याला/विद्याचे" असे म्हणताना कठिण जायचे, त्याऐवजी "आत्ताला/आत्ताचे" वगैरे नियमित रूपे सोपी जातात.
आजकाल मी हा नवीन शिकलेला (पण मराठीत जुनाच, शब्दकोशांत सापडणारा) शब्द वापरतो.
कधीकधी एखाद्या विषयाबद्दल एका भाषेत वाचनाची ओळख मला नसते, तेव्हा वेगळ्या भाषेत वाचणे सोयीची जाते. भाषाविज्ञानाबद्दल तांत्रिक निबंध मला मराठीत वाचायला सोयीचे जाते, कारण या विषयावरचे माझे प्राथमिक वाचन मराठीत होते. वैद्यकीय संशोधनावरचे इंग्रजीत...
तत्त्वज्ञानातले तांत्रिक लेखन कोणाला इंग्रजीत वाचायची सोय असेल तर बर्ट्रंड रसेलचा तो निबंध इंग्रजीमध्ये येथे वाचता येईल (दुवा).
3 Jun 2010 - 10:28 am | महेश हतोळकर
मला साधे लहानमुलांना विज्ञानातील साध्या साध्या कल्पना समजावून सांगणारे
मराठी स्थळही मला दिसले नाही. आता बोला!
http://www.arvindguptatoys.com/ हे पहा. बाकी लेख फुरसतीत वाचेन.
3 Jun 2010 - 10:34 am | गुंडोपंत
हे माहिती आहे हो - इथे फक्त बुकं आहेत.
हे काही विज्ञानातील गंम्मत जम्मत समजावणारे स्थळ नाही.
त्यातून ते लहान मुलांना फार भारी वाटेल असेही दिसत नाही.
आपला
गुंडोपंत
3 Jun 2010 - 10:41 am | महेश हतोळकर
टॉईज सेक्शन पहा.
3 Jun 2010 - 10:51 am | आनंदयात्री
ओव्व हतोळकर साहेब ! तुम्ही विज्ञानवादी आहात का ?
नाही ना .. मग राहुंद्या तुमचे संस्थळ !
3 Jun 2010 - 11:09 am | गुंडोपंत
या विषयी मला आदरच आहे - त्याबद्दल वाद नसावा.
शिवाय सर्व काही इंग्रजीतच आहे हो तेथेही! खेळणी इंग्रजीतच आहेत. :(
पण माझ्या आव्हानाचा आवाका पाहा...
आपला
गुंडोपंत
3 Jun 2010 - 11:05 am | प्रदीप
ह्या टी. आय. एफ. आर. शी संलग्न असलेल्या संस्थेने काही पुस्तके काढलेली आहेत. त्यांची माहिती इथे मिळू शकेल.
पूर्वी म. टा. मध्ये 'कणाद विज्ञान प्रतिष्ठान' तर्फे विज्ञानावरील काही सुंदर लेख वाचल्याचे स्मरते. मुख्य म्हणजे ते लेख अगदी सोप्या मराठीतून लिहीलेले होते.
3 Jun 2010 - 11:06 am | रामदास
आमच्या प्रभू मास्तरांनी एक प्रयत्न केला होता. त्यांचे प्रभाव क्षेत्र बारावीचे शिक्षण असल्यामुळे त्या क्षेत्रात काही करावे विचार होता.
टेक -ऑफ घेण्याइतपत पैसे काही जमले नाहीत .प्रोजेक्ट संपला .असो .त्यांचे एक मुक्तक वाचा .
पुसाच्या थंडीनं कहर मांडला तवा
मास्तर मालकाची माडी चढला .
तवा
मालकाच्या सोबत बसल्याली फारेनर पाहुणी
विलायती गरमी गिलासात वतत हुती.
या मास्तर ,
हे मास्तर आमच्या साळंचे.
यांचा लई जीव पोरांवर
आणि आमचा जीव त्यांच्या आयांवर
मालक बोलले फारेनराला.आणि खिंकाळले जोरात.
पुसाच्या थंडीत आंग आखडून मास्तर बसला .
तवा मालक म्हणलं
घ्या मास्तर गिलासात गरमी भरून.
सलगीचं घोडं दामटत मास्तर म्हणलं
चार हिरव्या नोटा भेटल्या तर.....
दोनाचे चार करीन म्हणतो
धावीचे वर्ग.
आनी,
थोडा सोडा घाला की मालक.
लई सवकलास की मास्तरा.
थोडी गिलासातली बरुबरी दिली
तर सोडा मागतोस व्हय.?
मालक गिरमटून बोललं
तवा,दोन पाहुणं
चार हिरव्या नोटा चुरगळून मास्तराला देत
म्हणलं
या आता .
आमी जातो देशी तमाशाला .
जोराजोरी चनेके खेतमे.
*********
घरच्या रस्त्याला मास्तरला बोचत हुती थंडी
का चार हिरव्या नोटा
पन घसाशी आलेली दारु गिळून मास्तर
गप रायला
**********
पुसाच्या रात्री दरोडा पडला
तवा.
मालकाची म्हातारी अंधार चाचपत
घरभर फिरली .
एका बेरडाणं गुंडाळली तिला घोंगडीत
आंधळ्या म्हातारीला कळना काई
पण चिप गार बसली पहाट होईतो.
पाहुणं आलं सकाळी तवा
ट्रंका फोडलेल्या .
आनी मालकाच्या देव्हार्यातले
चांदीचे देव पण लुटलेले.
देव्हारा गळ्याशी बांधून
म्हातारी सकाळी उनात बसलेली
चांदीचे टाक आठवत.
***********
सकाळी म्हातारी हाडं शेकत
उनात बसली
तवा मास्तर आला.
म्हातारीचे पाय चेपत
पंचनाम्याचा कागुद वाचत
चुटपुटत र्हायला.
तवा
म्हातारी म्हणली
मला आंधळीला कळंत नायी काही
मास्तरा पन येवढं नक्की
त्या बेरडाचा हात मातुर वळखीचा वाटत होता .
डोळ्यातलं पानी पुसत मास्तर साळेत गेला .
पुसाच्या थंडीत डोळ्यात पाणी येतच म्हना की.
3 Jun 2010 - 11:20 am | मिसळभोक्ता
विप्र मास्तराचे ह्याविषयीचे विचार माहिती आहेत असे *मला तरी* वाटते.
मास्तरने नेहमी "मालक" बघितले, हे स्पष्ट आहे.
"मालक" राडे घालतो, हे देखील त्याला, मला, सर्वांना माहिती आहे.
मास्तराने "मित्र" बघितले आहेत का ? कळत नाही. मास्तर इज मास्तर, आफ्टर ऑल.
थोडक्यात. मला माहिती आहे मास्तर हा मास्तर का आहे. त्याने अगदी *थोडे* मन मोकळे केले, तर *मालक* नाही, *मित्र* मिळतील.
धन्यवाद.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
3 Jun 2010 - 11:09 am | नील_गंधार
पुण्यातील मराठी विज्ञान परिषद अशा प्रकारच्या उपक्रमात
सामिल होईल असे वाटते.
त्यांनी मराठीत लहान मुलांकरीता वि़ज्ञान विषयावरील बरीच पुस्तके काढल्याचे स्मरणात आहे.
नील.
3 Jun 2010 - 11:27 am | चिरोटा
उपक्रमाचा उद्देश चांगला आहे.
महाराष्ट्रात किती मराठी शाळा आहेत? किती शाळा संगणक वापरतात? सध्या विद्यार्थ्यांना संगणक/इंटरनेट किती सहज उपलब्ध होतात? ह्याची आकडेवारी कुठे मिळेल? नंतरच काही चर्चा करता येइल.
P = NP
3 Jun 2010 - 11:45 am | Nile
"गुंडोपतांना मराठी साईट काढायची आहे लोकहो मदत करा"
इतकं सोप्पं आहे. त्यासाठी इतकं कशाला लिहायचं राव?? तुम्ही साईट काढा आम्ही सदस्य होउच.
-Nile
3 Jun 2010 - 11:53 am | गुंडोपंत
च्यामारी! मी मलाच कशाला आव्हान देईन?
आणि मी काही विज्ञानवादी वगैरे वाटलो की काय तुम्हाला?
इतका काही खाली गेलो नाही अजून, मानवतेवर विश्वास आहे माझा.
आपला
गुंडोपंत
3 Jun 2010 - 11:59 am | Nile
गुंडोपंत, तुम्ही त्या पायाला चटके बसतात म्हणुन जगाला चामड्याचे आवरण घालायला निघालेल्या श्रीमंताच्या पोराची गोष्ट ऐकली आहे का हो?
-Nile
3 Jun 2010 - 12:15 pm | llपुण्याचे पेशवेll
आम्ही आणि विज्ञानवादी??? नाय बॉ? पण तुम्हाला मदत नक्की करू.
बाकी मराठीतून विज्ञान कल्पना आवडली. :) आपला फुल्ल सपोर्ट.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix
3 Jun 2010 - 11:52 am | अवलिया
मी विज्ञानवादी ?
अरे हाड... इतके दिवस फिरले नाय आपले !
बाकी गुंडोपंत... आमचा तुम्हाला पाठिंबा ! :)
--अवलिया
3 Jun 2010 - 12:29 pm | मन
Your efforts inspire us to achieve great things.
Wish you all the best for your try.
Let the blessings of Shri Satya S** Baba be with you and you all people get success in your task along with wisdom.
आपलाच,
(कॉर्पोरेट )मनोबा
जोक्स अपार्ट, आपल्या उपक्रमाला मनःपुर्वक शुभेच्छा.
कामातील व्यस्ततेमुळे फारसा पुढाकार घेण्यास समर्थ नाही.
तरीही कुणाची या संदर्भात concrete(आयला, मराठी गंडलं इथं ) योजना कळली तर यथाशक्ती मदत करण्यास तयार आहे.
आपलाच,
(मराठी )मनोबा
3 Jun 2010 - 12:56 pm | मिसळभोक्ता
आपले प्रयत्न आम्हाला उत्तुंग शिखरे गाठण्यासाठी उत्प्रेरक असतात.
आपल्या प्रयत्नांसाठी शुभेच्छा.
श्री सत्य साईबाबांचे आशीर्वाद आणि ज्ञान आपल्या पाठीशी असो, असे माझे आशीर्वाद.
(बाबा/सत्य/झाट इत्यादि लोकांना स्पष्ट इंग्रजी का येत नाही, हे मला खरच कळत नाही. उदा. सदर प्रतिसादाचे शीर्षक आहे: "We Appreciate your concern for Marathi." आता, यातला एप्रिशियेट मधला ए कॅपिटल का बॉ ? दुसरे:
"Baba be with you and you all people get success"
म्हणजे काय ?
यू अँड यू ऑल, म्हणजे "तू आणि तुम्ही सर्व" असा आहे का ?
असे असले, तर तू आणि तुम्ही सर्व मध्ये काय फरक ?
बाबा, तू आणि तुम्ही सर्व ह्यात विकल्प करतात काय ? कसा ? का ?
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
3 Jun 2010 - 4:48 pm | राजेश घासकडवी
ते टेक्सास कडच्या यॉल चं फसलेलं भाषांतर असावं.
मी चुकून S*** baba असं वाचलं...
3 Jun 2010 - 1:09 pm | शानबा५१२
तुम्ही काय काय करणार ते सांगा..मी फार तर विज्ञानपर(रसायनशास्त्र वर जास्त चांगला) लेख लिहु शकतो तुम्ही काढलेल्या साईट्वर.
आणि तुम्ही बोलताय ना ते प्रयत्न शाळेत व्हायला हवेत....राव ही अमेरीका नाही जिथे शाळेतली मुल इंटरनेट्वर आभ्यास करतात.
आणि शाळेतली मुल मराठीतच अडकुन न रहावी ही इच्छा.......कारण जेव्हा तुम्ही विज्ञान बोलता तेव्हा तुम्हाला परभाषेचे ज्ञान हे असावेच लागते..कारण जवळ्जवळ सर्वच उपयुक्त माहीती(विज्ञान संबधी) ही ईंग्लिश मधेच आहे.
मराठीचा अभिमान बोलायला बरा वाटतो हो.........पण हीच मुल आपल म्हणन उद्या जगाला कस पटवतिल,कसा आपला एखादा शोध,कल्पना जगाला समजावतिल???
बाकी आपला प्रयत्न प्रामाणिक असेल तर त्याला माझ्या खुप शुभेच्छा!
*************************************************
You want to cope with 'Global Warming'?
Then ban porn movies!!
3 Jun 2010 - 9:13 pm | रामपुरी
"मराठीचा अभिमान बोलायला बरा वाटतो हो.........पण हीच मुल आपल म्हणन उद्या जगाला कस पटवतिल,कसा आपला एखादा शोध,कल्पना जगाला समजावतिल???"
कारण जवळ्जवळ सर्वच उपयुक्त माहीती(विज्ञान संबधी) ही ईंग्लिश मधेच आहे.
हे रशियन, जपानी, जर्मन, फ्रेंच इत्यादी लोक किती मुर्ख आहेत. आपापल्या भाषेत संशोधन करतात. एवढा साधा मुद्दा त्यांच्या लक्षात कसा आला नाही? रशियन अमेरिकेच्या आधी अंतराळात गेले ते इंग्लिश शिकल्यामुळेच की काय? मोठे वस्ताद दिसतात. पत्ता लागू दिला नाही
3 Jun 2010 - 11:45 pm | शानबा५१२
माहीती बद्दल धन्यवाद.........
आता मला काय व का बोलायच होत ते वाचा.
आता त्या संशोधकाच नाव मला आठवत नाही व मला शोधायला कंटाळा आलाय......
'त्याने' आपले सर्व papers आपल्या भाषेत लिहले होते(कदाचित स्पॅनिश).त्यामुळे ते कोणाच्या वाचनात आले नाहीत...तेव्हा एका दुस-या संशोधकाने त्याचे इग्रजीत भाषांतर करुन ते जगापुढे मांडले...............तेव्हा त्याचे महत्व ईतरांना पटले पण तेव्हा 'तो' मरुन २० वर्ष झाली होती.
आता विज्ञान मराठीत आणून नंतर ते शिकण्यापेक्षा ते इंग्लिश मधे शिकलेले काय वाईट?
आणि हो रशिया वगैरेची उअदाहरण नका देउ........तिथे संगणकापासुन ते विमानतळावर त्यांची भाषा असते आणि आपल्या ईथे प्रधानमंत्री,राष्ट्रपती देशाला आवाहन करतात(DD national वरुन) तेसुद्धा इंग्लिश मधे......तेव्हा आपण त्या देशाबद्द्ल न बोललेले बरे.
आपण आपल्या ईथे काय लागु होते ते बघुन विचार करावा.
*************************************************
8 Jun 2010 - 1:06 am | रामपुरी
"तिथे संगणकापासुन ते विमानतळावर त्यांची भाषा असते "
तेच साध्य करायचा प्रयत्न इथे चालू आहे.
प्रधानमंत्री,राष्ट्रपती देशाला आवाहन करतात(DD national वरुन) तेसुद्धा इंग्लिश मधे
हे चित्र बदलावं असं किमान आपल्याला मनापासून वाटत पण नसेल तर इथे वेळ वाया घालवू नका (स्वत:चा आणि दुसर्यांचा)
ठळक अक्षरात लिहीले म्हणजे तुमचे म्हणणे खरे होत नाही. त्यामुळे फक्त तुम्हाला टॅग माहीती आहेत एवढेच कळते...
3 Jun 2010 - 1:51 pm | अरुंधती
मला आंतरजालावर हे आरोग्यविद्या विषयक मराठी संकेतस्थळ सापडले : http://arogyavidya.org/index.php?option=com_content&view=article&id=814:...
येथे शाळेतील मुलांना व मोठ्यांनाही बरीच उपयुक्त माहिती मिळू शकेल. मी अजून ते संकेतस्थळ पूर्ण पाहिले नाही, पण प्रथमदर्शनी तरी उपयोगी वाटले.
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
3 Jun 2010 - 1:55 pm | मी ऋचा
>> जेव्हा तुम्ही विज्ञान बोलता तेव्हा तुम्हाला परभाषेचे ज्ञान हे असावेच लागते..कारण जवळ्जवळ सर्वच उपयुक्त माहीती(विज्ञान संबधी) ही ईंग्लिश मधेच आहे.
भाषा लक्ष शिका। परि सतत द्या लक्ष स्वभाषेकडे ॥
मी ॠचा
र॑गुनी र॑गात सार्या र॑ग माझा वेगळा !!
3 Jun 2010 - 4:26 pm | आप्पा
गुंडोपंत विषय आवडला. मी सहकार्य करण्यास तयार आहे. आपण मा़झ्या साईटचा वापर करु शकतो. पण बाकीच्यांचे सहकार्य आवश्यक आहे. साईटचे स्वरुप पुर्ण बदलावे लागेल.
www.vishwasanchar.com
आप्पा
3 Jun 2010 - 4:31 pm | राजेश घासकडवी
ओक म्हणतात आम्ही नाड्या किती हेही सांगणार नाही, (पट्ट्यांचं अगम्य लिपीतलं भाषांतर करून त्याचं पोर्टल वगैरे करणं तर दूरच...) तेव्हा विज्ञानवादीहो, तुम्हीच अनुभव घेऊन पहा...
गुंडोपंत म्हणतात, आम्ही अज्ञानी आहोत व आम्हाला त्याचा अभिमान आहे. आम्ही प्रात्यक्षिक पुराव्यांकडे दुर्लक्ष करूच पण ज्या भाषेत ते लेखन आहे ती भाषाही शिकणार नाही. कोणी दिव्याचा 'सर्किट' डायाग्राम काढून दिला तरी त्यातून प्रकाश का पडत नाही ते विचारणार ... तेव्हा विज्ञानवादीहो, तुम्हीच मला ज्ञानाचे घास भरवा (मी इथेच पडून रहाणार...)
दोन्ही बाजूंनी जबाबदारी विज्ञानवाद्यांवर टाकून त्यांना चांगलंच कोंडीत पाडलंय की...
त्यापेक्षा मी काय म्हणतो गुंडोपंत, तुम्हीच जर अंधश्रद्धेवरच्या चर्चांपासून दूर राहिलात किंवा या विज्ञानवाद्यांना ते काय बोलतात हे माहीत आहे अशी श्रद्धा ठेवलीत तर?
3 Jun 2010 - 4:35 pm | महेश हतोळकर
कै च्या कै अपेक्षा ठेवता का राव?
3 Jun 2010 - 6:15 pm | गुंडोपंत
आम्ही अज्ञानी आहोत व आम्हाला त्याचा अभिमान आहे.
अज्ञानाचा अभिमान?
छे! मी कधी म्हंटले? आव्हान झेपले नसेल तर तसे कबूल करा ना. उगाच फेकाफाकी करू नका!~
काहीही खपवायचे नाही माझ्या नावावर!
ज्या भाषेत ते लेखन आहे ती भाषाही शिकणार नाही.
हे मी कुठे म्हणालो? उगाच मनाला येईल ते लिहू नका.
प्रयत्न जरूर करेन पण जी भाषा मला थोडीफार येते त्यातच मला ज्ञान मिळवणे सोपे वाटते.
मला वाटते की विज्ञानचे हे सर्व ज्ञान मराठीतही यावे. यात चुकीचे काय आहे?
वीस वर्षांपूर्वी चीनी भाषा काही ज्ञानभाषा नव्हती - आज आहे.
मराठी आज ज्ञानभाषा नसली तर काय झाले? उद्या होणारच नाही असला भंपक निराशावाद बाळगत नाही मी.
जगातली १७ सर्वात मोठी भाषा बोलतो मी. ती ग्रीक आणि इटालियन आणि तमीळ भाषेपेक्षा मोठी आहे. माझ्या भाषेमध्ये विश्वकोश आहे परिभाषा कोश आहेत.
त्यात महत्त्वाचे काही नवीन तंत्रज्ञानाच्या जोडणीने सर्व मराठी मुलांना योग्य वयात, योग्य वेळी मिळावे, अशी अपेक्षा गैर आहे?
कोरडे वैज्ञानिक सल्ले देणारे विज्ञानवादी पायलीला पन्नास पडले आहेत. तुम्ही त्यातले की नाही, हे ठरवून घ्या.
ही आपली आईची बोली आहे - आई साठी काही तरी करू या!
आई म्हातारी झाली किंवा आजारी झाली म्हणून सोडून देणार्यातले नाहीत मराठी माणसे!
आज इतकी मराठी जाण्णारी मुले आहेत. त्यांना शाळा म्हणा किंवा गरीबीची परिस्थिती असल्याने म्हणा, पण इंग्रजी धड समजत नाही. पण म्हणून त्यांना बाकी काही कळूच नये? का त्यांना त्यांच्या आईवडीलांनी मराठी माध्यमात घातले ही त्यांची चूक आहे?
खरोखर ज्ञानवादी असाल तर विधायक काही करण्यासाठी पुढाकार घ्या!
माझे म्हणणे सोपे आहे - हिम्मत असेल तर, सहज समजेल अश्या मराठी भाषेतले, शाळा शाळांना जोडणारे, गणित आणि विज्ञानावरचे स्थळ काढून दाखवा त्यात महाराष्ट्रातल्या मराठी शाळा जोडून दाखवा!
नाहीतर काय कामाचे हो तुमचे ते आय आय टी का फाय फाय टीचे वैज्ञानिक शिक्षण? पुंगळी करून...
आपला
गुंडोपंत
3 Jun 2010 - 6:31 pm | llपुण्याचे पेशवेll
मराठी आज ज्ञानभाषा नसली तर काय झाले? उद्या होणारच नाही असला भंपक निराशावाद बाळगत नाही मी.
याच्याशी सहमत आहे.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix
3 Jun 2010 - 6:58 pm | टारझन
गुंड्या नं चांगलाच टोलावलाय ... =))
वाक्यावाक्याय एकेका फुसक्या सल्लागार विज्ञान्या ला केळ्या सारखा सोललेला पाहुन डोळे पाणावले =))
-गुंडेश केळेसोलवी
3 Jun 2010 - 6:41 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
तुम्हाला चांगले भाषांतरकार हवे आहेत का विज्ञानवादी? विज्ञान आणि भाषेचा सहसा संबंध नसतो; कुठल्याही भाषेत लिहा E = m*c*c यातलं विज्ञान बदलत नाही का appleला सफरचंद म्हटलं म्हणून ते आकाशाकडे 'पडायला' सुरूवात होत नाही!
शिक्षणतज्ञ आणि विज्ञानवादी यांच्यातही फरक असतो. लहान मुलांना विज्ञानाकडे आकृष्ट करायचं असेल तर फक्त विज्ञानवाद्यांची आवश्यकता नसून चांगल्या शिक्षकांची गरज आहे.
साप सोडून भुई धोपाटणं वाटतं आहे हे कधीपासून आणि तेही उगा कालवा करत!
(मराठी माध्यमातली) अदिती
4 Jun 2010 - 11:21 am | llपुण्याचे पेशवेll
तुम्हाला चांगले भाषांतरकार हवे आहेत का विज्ञानवादी? विज्ञान आणि भाषेचा सहसा संबंध नसतो; कुठल्याही भाषेत लिहा E = m*c*c यातलं विज्ञान बदलत नाही का appleला सफरचंद म्हटलं म्हणून ते आकाशाकडे 'पडायला' सुरूवात होत नाही!
सहमत सहमत सहमत. म्हणूनच गुंडोपंत म्हणत असावेत अशी हज्जारो मुले आहे ज्यांना इंग्रजी येत नाही पण ते विज्ञानवादी किंवा विज्ञान अभ्यासेच्छु नाहीत असे नाही. त्यांच्यासाठी मराठीत सार्या (शक्य तेवढ्या) गोष्टी उपलब्ध करून द्या.
भाषांतरकार तर पैला पसाभर मिळतील. जगाला आपले संशोधन सांगायचं असेल तर असे दुभाषे सहज वापरता येतील नाही का?
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix
3 Jun 2010 - 6:44 pm | राजेश घासकडवी
मराठी ही ज्ञानभाषा व्हावी, व तुम्ही म्हणता तसं पोर्टल की फोर्टल व्हावं याबाबत तुमच्याशी सहमत आहे.
फक्त ती जबाबदारी कोणाची, एवढाच प्रश्न आहे. 'श्रद्धावादी' व 'विज्ञानवादी' यांच्या चर्चेत गाडं शेवटी 'विज्ञानवादी ची जबाबदारी' वर नेहेमीच अडकतं हे मी नमूद केलं..
शिवाय 'विज्ञानवादी' लोकांवर सरसकट हे काम टाकणं जगातल्या १७ व्या मोठ्या भाषेच्या हिताचं नाही, इतकंच. 'विज्ञानवादी' लोक विचार करतात व मांडतात. सायटी काढण्यासाठी वेगळी स्किलं लागतात...
आयायटीचं शिक्षण असलेल्यांना जरा जास्तच डोक्यावर चढवून ठेवलेलं आहे, असं काही 'विज्ञानवादी' च नुकतेच म्हटल्याचं स्मरतंय.
बाकी माझ्या शेवटच्या सूचनेवर तुम्ही काही विचार केलेला दिसत नाही. करून बघा, श्रद्धा पडते कधी कधी उपयोगी...
4 Jun 2010 - 1:16 am | गुंडोपंत
आव्हान झेपत नाही तर...
अर्र!! विज्ञानवादी पळाला? पोपट झाला?
शिवाय 'विज्ञानवादी' लोकांवर सरसकट हे काम टाकणं जगातल्या १७ व्या मोठ्या भाषेच्या हिताचं नाही
मग काय शालेय ज्योतिषाचे वर्ग काढू का नाडी शास्त्राचे?
काहीही!
त्यापेक्षा मी काय म्हणतो गुंडोपंत, तुम्हीच जर अंधश्रद्धेवरच्या चर्चांपासून दूर राहिलात किंवा या विज्ञानवाद्यांना ते काय बोलतात हे माहीत आहे अशी श्रद्धा ठेवलीत तर?
हेच म्हणतो ना, की हे लोक फुकाचे बोलतायेत. आव्हान घेउन करून दाखवा!
एकदा मला खरोखर शाळा जोडल्या जात आहेत मुले तेथे येउन वैज्ञानिक शैक्षणिक प्रकल्पातून काही तरी शिकत आहेत. गडचिरोलीचा मुलगा चंद्रपूरच्या मुलाशी गणितात स्पर्धा करतो आहे असे दिसले, की
मी अंधश्रद्धेच्या चर्चांपासून लगेच दूर जाईन!
ही माझी हमी!
सायटी काढायचे स्कील आवश्यक नाही येथे - येथे आवश्यकता आहे ती, काही तरी खरोखर करून दाखवण्याच्या धडाडीची, सायटींचे कौशल्य हाती असलेल्यांना एकत्र घेउन, प्रकल्प नियोजनाची आणि आपल्या विज्ञानवादी विचारांवर तुमचा स्वतःचा किती विश्वास आहे हे सिद्ध करण्याची.
काय पाण्चट पळपुटेपणा करताय? - घ्या ना आव्हान!
विज्ञानवाद्यांना शोभत नाही, कामाची वेळ आल्यावर पळून जाणे.
म्हणजे विज्ञानवादी कोरडे सल्ले देतात हेच खरे म्हणायचे?
आपला
गुंडोपंत
4 Jun 2010 - 10:04 am | राजेश घासकडवी
मुक्तसुनीत यांच्या तुमच्या लेखनाविषयीच्या विचारांशी सहमत...
बाकी तुमची आव्हान देण्याची व त्यातून 'विज्ञानवादी पळाला? पोपट झाला?' वगैरे निष्कर्ष काढण्याची पद्धत (मी आव्हान स्वीकारलं अथवा नाकारलं नसताना) गमतीदार वाटली.
तुम्ही जो प्रकल्प मांडला आहे त्यातला काही भाग पूर्ण करण्यासाठी पुढच्या वर्षाभरासाठी सुमारे वीस लाख रुपये खर्च येईल असा माझा प्राथमिक अंदाज आहे. तेवढे पैसे देत असाल तर मी आत्ता आव्हान स्वीकारतो. ते न देता तुम्हाला शालेय ज्योतिषाचे, नाडी शास्त्राचे वर्ग काढायचे असतील तर तुमची मर्जी.
दूर जाऊन बघा ही केवळ सूचना होती. नसेल जायचं तर र्हायलं. तुमची न्युईसन्स व्हॅल्यू इतकी काही नाही.
राजेश
3 Jun 2010 - 5:33 pm | प्रियाली
मिसळपावाची सदस्यसंख्या उपक्रमापेक्षा चारपट असली तरी विज्ञानवादी तेथेच अधिक आहेत असा माझा (गैर)समज आहे. ;)
तेव्हा हा लेख तेथेही टाकायचा होता.
की तुम्हीही "मऊ लागेल तिथे" हा बाणा अंगिकारला आहे? ;)
4 Jun 2010 - 12:58 am | गुंडोपंत
सदर आव्हान तेथे आधीच दिले आहे. त्यावर एकाचीही इतक्या दिवसात प्रतिक्रीया आली नाही.
तेव्हाच शैक्षणिक क्षेत्रात आयुष्य घालवलेल्या विवेकवादी विज्ञानवाद्यांची आणि अभियांत्रीकीत कौशल्ये असलेल्यांची हिम्मत कळली!
येथे सदर आव्हान 'नंतर' आले आहे.
आपला
गुंडोपंत
4 Jun 2010 - 1:02 am | प्रियाली
बाजूच्या चर्चेत गुंतलेले असल्याने दुर्लक्ष झाले. सॉरी!
हुश्श! मी अंगाला लावून घेत नाही हं! #o
3 Jun 2010 - 10:33 pm | ईन्टरफेल
आपुन तर आशि सिडि डिव्हिडि एम पि३ एम पि ४ एम पि ५ एम पि ६ एम पि ७ यातलि कुठलेहि साहित्त्य मिळाले तरि आपन सह्याद्रिच्या कड्या कपारात (जेथे इंटरनेट ........ तेथे )आक्षरःशा पायी कुठलाहि मोबदला न घेता प्रसार व प्रचार करु याचि आंम्हि ग्वाहि देतो येथे खुप सिकलेलि लोक आहात प्रयत्न करा एक वेधशाळेवर आधारित शेतकरी.......................आवांतर..................................आज दिवसभर आकाशात ढग दिसतिल पाऊस होन्यावि दाट श्यक्यता आहे क्रुपया शेतावर ......................................झोपु नये????????????????????????? =)) =)) ...............आपुन वि-ज्ञानि नाय बा
4 Jun 2010 - 5:04 am | धनंजय
असे स्थळ सुरू झाल्यास जमेल त्या प्रकारे मदत करण्यास मी तयार आहे, असा माझा प्रथम विचार आहे/होता. संकेतस्थळ चालू करण्यासाठी जे तंत्रकौशल्य लागते, चालवण्यासाठी जो वेळ लागतो तो माझ्यापाशी नाही. त्यामुळे मदत पुढे करून स्थापनेचे आह्वान नाकारणार होतो.
मग मदतीबाबतही अधिक विचार करायला घेतला.
"मानवतेवर विश्वास शिल्लक असल्यामुळे ते विज्ञानवादी नाहीत, स्वतः संकेतस्थळ काढू शकत नाहीत", असे गुंडोपंत म्हणतात. म्हणजे जे आह्वान दिले, ते "मानवतेवर विश्वास शिल्लक नसलेल्या विज्ञानवाद्याला" दिलेले आहे असे दिसते.
तांत्रिक कौशल्य असते, तरी आह्वान स्वीकारणार्याला गुंडोपंतांकडून "विज्ञानवादी=मानवतेवर विश्वास नसलेला" ही उपाधी मान्य असावी लागेल.
अशा विचित्र आह्वानाचे उत्तर म्हणून जन्मलेल्या कुठल्याही संकेतस्थळास मी मदत करणार नाही, असे विचाराअंती म्हणतो.
"दुष्ट लोकांसाठीच" असलेल्या या आह्वानाकडे दुर्लक्ष करून जर कोणी "सर्व लोकांसाठी" असे संकेतस्थळ सुरू केले, तर त्यासाठी मी जमेल तितकी मदत करेन.
- - -
वैज्ञानिक संशोधनपद्धतीच्या मराठीमधील आलेखांची बाब. भाषाविज्ञानाच्या शाखेत उत्तम संशोधनप्रक्रिया झालेले शोधनिबंध मी मराठीत छापील स्वरूपात वाचलेले आहेत. नरहर कुरुंदकरांनी मराठीत लिहिलेले शोधनिबंधही संशोधनपद्धतीच्या अंगाने दर्जेदार आहेत. ज्या मराठी वाचकांना छापील पुस्तके उपलब्ध आहेत, त्यांना शोधनिबंध आणि शोधपद्धतीचे आलेख सापडतील. अर्थात मराठी वाचकाला अधिकाधिक साधने मिळावी हा चांगला विचार आहे. (मात्र सध्या शून्य साधने आहेत आहेत हे म्हणण्याची आवश्यकता नाही.)
- - -
4 Jun 2010 - 7:34 am | गुंडोपंत
मानवतेवर विश्वास शिल्लक असल्यामुळे ते विज्ञानवादी नाहीत, स्वतः संकेतस्थळ काढू शकत नाहीत
मी स्वतः संकेतस्थळ काढू शकत नाही असे मी कुठे म्हणालो बॉ?
विज्ञानवादी=मानवतेवर विश्वास नसलेला
असेही काही नाही.
हवे तर 'त्या' अर्थाने मी आव्हानात बदल करायला तयार आहे.
कृपया चांगल्या अर्थाने घेणे हे आव्हान!
यातून काही विधायक झाले तर, किती भव्य उभे होइल असा विचार करून पाहिला तर?
मनापासून सांगतो की,
मी खरा वैतागलो आहे ते कोरडे सल्ले देणार्यांना.
अरे ही लोकं सामान्यांच्या मनाचा काही विचारच करत नाहीत, त्यांना काय सोई खरोखर उपलब्ध आहेत हे पाहातच नाहीत.
माणसावर विपरीत परिस्थिती येते, आधार सुटलेले असतात त्यांना काय आशा असते रे?
यातले कोणते विज्ञानवादी इस्पितळांच्या आय सी यू युनिट समोर बसलेल्या नातेवाईकांना 'वैज्ञानिक' धीर देण्याची हिम्मत ठेवतात?
अरे माझ्या सारख्या सामान्य माणसाला विपरीत परिस्थितीमध्ये जगात
देवच उरतो रे बाबा!
---
एक किस्सा सांगतो,
-----
एक माणूस एकदा पत्रीका घेउन आला. 'नोकरीचे काही दिसते का सांगा' असे म्हणाला. अधिक चौकशी अंती लक्षात आले की ओरिसा मधून मुंबै आणि तेथून नाशिक अशी नोकरी करत बायको आणि एक पहिलीत जाणारा मुलगा अशी कुटूंबासहीत भ्रमंती झाली.
घरी ओरिसामध्ये म्हातारे आईवडील आणि एक बहीण. उत्पन्नाचे साधन हा एकटाच, कॉमर्स पदवीधर.
याची दोन महिन्यांपूर्वी नोकरी गेली होती!
नोकरी मिळेल नोकरी मिळेल अशी आशा करत करत पैसे संपत आले होते. मुलाची शाळेची फी, घराचे भाडे आणि आईवडीलांना पाठवायचे पैसे अंगावर आले होते. तुटपुंज्या उत्पन्नामुळे बचताशी काही नव्हतीच.
मोठी गंभीर परिस्थिती होती.
त्याला सांगितले की, सायंकाळी परत ये, पत्रीका पाहून ठेवतो.
सायंकाळी आल्यावर सांगितले - नोकरी नक्की मिळणार आहे - पण परिक्षा पाहिल्यावरच - असे योगच आहेत. अजून थोडा प्रयत्न कर. ओळखीच्यातल्या लोकांना परत एकदा जाउन भेट.
सगळ्या एंप्लोयमेंटमधल्या लोकांना परत परत भेट.
येत्या २ आठवड्यात नोकरीची नक्की शक्यता आहे, पण संपूर्ण जोर लाव!
फार उज्ज्वल काळ पुढे आहे, देव तुझ्या पाठीशी नक्कीच आहे.
काळजी करू नको. असा धीर देणारा सल्ला दिला.
शिवाय, कधीही शंका वाटली, बोलावेसे वाटले, मदत लागली तर नक्की फोन कर, स्वतः बद्दल शंका बाळगू नकोस - तू फार धीराचा माणूस आहेस, असेही त्याला धीराचे चार शब्द सांगितले.
या सगळ्याचा परिणाम म्हणा किंवा योग म्हणा देवाची कृपा म्हणा,
पण तो माणूस उभारी घेउन खरोखर आठवडाभर प्रयत्न करीत फिरला. आणि त्याला दुसर्या आठवड्यात नोकरी मिळाली.
मग परत बायको मुलासोबत पेढे घेउन आला. आल्यावर म्हणाला, की फार निराश झालो होतो. माझी काही चूक नसतांना माझी नोकरी गेली होती. स्वतःवरचा आणि जगावरचा विश्वासच उडाला होता. काहीच दिशा दिसत नव्हती.
कुणाकडे जावे हे ही सुचत नव्हते. तुम्ही त्या दिवशी भेटला नसता तर मी जीवाचे काय केले असते मलाच माहिती नाही. त्याच्या आणि बायकोच्याही डोळ्यात पाणी होते.
ज्योतिष्याचे तर मला माहिती नाही, पण एक दैवी शक्ती आपल्या पाठीशी आहे. माझे चांगले होणार आहे, हा विश्वास विपरीत परिस्थितीत माणसाला किती बळ देउन जातो, याचा माझ्या अनुभवातला, माझ्या पुरता हा पुरावाच आहे.
मी काही विज्ञानविरोधी वगैरे नाही रे! इतके सामान्यज्ञान माझ्याकडेही आहे. पण यावेळी मी त्याला खुप विज्ञानवादी विचार सांगून काय झाले असते रे?
मानसोपचार तज्ञाकडे जाण्याचा सल्ला देण्यासाठी त्याच्याकडे पैसेच नव्हते!
ज्योतिषाच्या रुपाने म्हणा किंवा अजून काही नाव त्याला द्या, पण वेळेला आशेचे बळ मिळणेच महत्त्वाचे ठरते.
कोरड्या सल्ल्यांमध्ये हे बळ मला दिसत नाही.
कथन आवांतर आहे, पण आशा आहे की माझ्या कथनाचा आणि या आव्हानाचा सारांश लक्षात आला असेल!
-------------------------
इंग्रजी शिका म्हणणे सोपे आहे हो. पण त्या साठी लागणारी परिस्थिती तर त्या मुलांकडे हवी? मी मराठी मराठी म्हणतो म्हणजे इंग्रजीला विरोध करतो असे नाही हो!
पण काही कल्पना एका वया मध्ये आपल्या आजूबाजूला बोलल्या जाणार्या पहिल्या भाषेत सहजतेने समजतात.
इंग्रजी, गणित आणि विज्ञानात नापास होणारी मुले काय आनंदाने नापास होतात का? पण शिकण्याची संधी मिळण्याच्या आतच त्यांच्या बरोबरचे पुढे गेलेले असतात!
हे स्थळ खरोखर प्रत्यक्षात आले तर, किती मुलांना - परत मागे जाउन गेलेले भरून काढता येईल. कमीत कमी एक शक्यता तर तयार होईल?
हे नुसते स्थळ नाही होणार -हा त्या लहानांसाठी काढलेला आधार ठरेल!
घ्या रे माझे आव्हान, घ्या!!
कन्नड, तेलुगू, तमीळ, गुजराती, उडिया... सगळ्या देशी दुर्लक्षित लोकांच्या भाषांसाठी घ्या!
आपला
गुंडोपंत
4 Jun 2010 - 11:17 am | विशाल व्यास
थोडा घोळ होतोय असे वाटतय.
तुम्ही त्याला जो ज्योतिषाच्या नावाने ( खरे कि खोटे ही चर्चा अपेक्षित नाहिये ) सल्ला दिलात तो त्यच्या बायकोने (ज्योतिषाचे नाव न घेता) दिला असता, कि आम्हा सगळ्यान्चा तुमच्यावर विश्वास आहे प्रयत्न सोडू नका, तरी त्याला आशेचे बळ मीळाले असतेच की. (त्याचा घरच्यांवर , बायकोवर विश्वास नसेल आणी ज्योतिषावर असेल तर अवघड आहे.)
एख्यादाला मदत करणे म्हणजे त्याचे ओझे उचलणे नव्हे , तर त्याला त्याचा भार वाहण्याइतके सक्षम करणे.
आता घोळ प्रयत्नवादाचा आणि दैववादाचा होतोय.
विज्ञानवादी कुठे म्हणतात प्रयत्नवाद नको म्हणून.
आणि विज्ञानाचे मराठी संकेतस्थळ असण्याचा आणि लोक विज्ञानवादी असण्याचा काही संबंध नाही. (यालाच बादरायण म्हणत असतील का)
असो तुमच्या उपक्रमाला शुभेछ्छा. मदत करण्यास तयार.
( विज्ञानवादी आणि प्रयत्नवादी ) खुशाल.
4 Jun 2010 - 11:32 am | गुंडोपंत
परिस्थिती आल्यावर नाही सुचत, एक एक वेळ असते!
मागे वळून पाहिल्यावर कधी कधी आपल्याच आपण असे कसे वागलो असे आश्चर्य वाटते. होते की नाही तसे?
एखाद्यावेळी माणूस किंकर्तव्यमूढ होतो. कधी 'बाहेरून' आलेले चार'प्रोत्साहनपर शब्द बळ देतात. कधीकधी घरातल्या शब्दांना सांगावेसे वाटत असते पण कसे हे कळत नसते.
असो,
नसेल पटत तर हे आवांतर उदाहरण सोडून दे! पटलेच पाहिजे असा काहीही हट्ट नाही...
आपला
गुंडोपंत
4 Jun 2010 - 10:34 am | विनायक पाचलग
बरेच प्रतिसाद असल्याने सगळे वाचले नाहीत...
मी यात मदत अक्रु शक्तो
१. संकेतस्थळ निर्मिती
माझ्यापेक्षा याबाबत जास्त अक्कल असलेले लोक इथे आहेत हे माहित आहे ,तरी पण करु इच्छितो.
सध्या मराठी महाजालावरील ' कंटेंट एनरिचिंग " वर काम करत आहे ,त्यात भर
बाकी काय काय करु शकु ते सांगा
नाहीतर मग मी माझ्या काही कंसेप्टस मांडु इच्छितो.
धन्यवाद
विनायक पाचलग
वाँट टु टॉक
4 Jun 2010 - 11:13 am | गुंडोपंत
जरूर मांडा!
आपला
गुंडोपंत
4 Jun 2010 - 11:40 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विज्ञान, गणित, याविषयावर मराठी भाषेत लेखन व्हावे, असलेले मराठीत यावे. या विषयावर मराठी भाषेत संकेतस्थळे निर्माण व्हावीत. शाळेतील मुलांना त्यात सहभागी होता यावे, शिकता यावे, यासाठीची आपली तळमळ आणि उपक्रम योग्यच आहे. आपल्या उपक्रमात मला काही मदत करता येत असेल तर, खारीचा वाटा नक्कीच उचलेन...!
-दिलीप बिरुटे
[गुंडोपंताचा भक्त]
4 Jun 2010 - 5:16 pm | अविनाशकुलकर्णी
गेज व इन्स्ट्रुमेन्टस या विषयीच्या विज्ञान /ज्ञान या मधे आम्ही अधिकारवाणीने मदत करु शकतो.....
4 Jun 2010 - 8:33 pm | सुधीर कांदळकर
http://mavipamumbai.org/
इथें आपण मराठी विज्ञान परिषदेशीं संपर्क साधून या संस्थेंतून भरीव कार्य करूं शकाल अशी आशा आहे. फक्त कार्याच्या केंद्रस्थानीं स्वत: न राहातां स्वत:चा इगो वगैरे बाजूला ठेवून काम करावें लागेल.
कार्यासाठीं मनापासून शुभेच्छा.
सुधीर कांदळकर.
4 Jun 2010 - 8:40 pm | सुधीर कांदळकर
आहे
http://mavipamumbai.org/
या स्थळाला भेट देऊन त्यांच्याशीं संपर्क साधून आपण भरीव कार्य करूं शकाल. फक्त व्यक्तिगत इगो दूर ठेवावे लागतील आणि कार्याचें केंद्रस्थान मिळण्याची शक्यता कमी आहे.
भरीव कार्यासाठीं शुभेच्छा.
सुधीर कांदळकर.