आचार्य विनोबा भावे एक ऋषि

भय्या's picture
भय्या in काथ्याकूट
3 Jun 2010 - 3:38 am
गाभा: 

घरगुती सावरकर या धाग्यावर महत्वाची माहिती मिळत गेली.(जरी आणि विषयांतर खुप झाले तरी)एका महत्वाच्या व्यक्ती बद्दल काही तरी लिहावे असे वाटून गेले.म्हणून हा प्रपंच.
महात्मा गांधी यांचे दोन वारसदार. पैकी राजकिय वारसा पं. नेहरूंकडे गेला आणि अध्यात्मिक वारसा विनोबा भावे यांचेकडे आला.

आचार्य विनोबा भावे

१)ग्लोबलायझेशन बद्द्ल फार पूर्वी त्यांनी विचार मांडले होते. सर्व पत्रांच्या
शेवटी ते जय जगत असे लिहीत असत.

२)गीताई सारखा उत्तम ग्रंथ त्यांनी लिहीला. हा ग्रंथ हा एक भाषअंतराचा उत्तम नमुना आहे. या पुस्तकाच्यपाठी त्यां नी या ग्रंथाची तुलना प्रत्यक्ष आईशी केली आहे.
गीताई माउली माझी तीचा मी बाळ नेणता
पडता रडता घेई उचलुन कडे वरी ||

३) त्यांनी पण (स्वा.वीर सावरकरां सारखेच ) भाषएसाठी खुप प्रयोग केले. मराठी भाषएतील लिखाणावर पण त्यांनी खुप मोलाचे विचार मांड्ले आहेत.

४) सर्व वेदावरचे त्यांचे विचारधन खुप मोलाचे आहे.अषटाद्शी एक उत्तम ग्रंथ आहे. शिवाय कुराण आणि बायबलचा त्यंचा उत्तम अभ्यास होता.

५) भूदान चळवळी मध्ये त्यांनी प्रत्यक्ष सहभाग होता.

६) हिंदू धर्माबद्दाल त्यांचे विचार खुप प्रगत होते. प्रत्यक्ष आपल्या गुरू म्हणजे महात्मा गांधी यांच्या पेक्षा ते जास्त प्रगत होते.( एका चर्चेत एखादा हरीजन पंतप्रधान झाला तर भारत प्रगत होईल असे महात्म्याचे मत होते, तर विनोबा असे मानत की जेंव्हा हरिजन व्यक्ती शंकराचार्य होईल तेंव्हा ती खरी प्रगती समजावी.)

७) अखेरीस त्यांनी प्रायोपवेशन केले. म्हणजे अन्य त्याग आणि जाणीवपूर्वक मरणाला सामोरे जाणे. (या विनायका प्रमाणेच आणखी एक प्रायोपवेशन करणारा ''विनायक" म्हणजे स्वा.वीर सावरकर )

८) त्यांनी फारसे राज कारण केले नाही पण जयप्रकाश नारायण यांच्या बरोबरचे त्यांचे संबंध गूढ होते.

९) आणीबाणी च्यावेळी स्व. इंदिरा गांधी यानी चतुराईने त्यांनी वापरलेला "अनुशासन पर्व" हा शब्दसमुह वापरून आपला राजकीय फायदा करून घेतला. त्यामुळे त्यांना " राजकीय संत " म्हणून हिणवले गेले.

अशा या ऋषि तुल्य व्यक्तीमत्वास माझा सलाम!!

प्रतिक्रिया

विकास's picture

3 Jun 2010 - 4:29 am | विकास

चांगले संकलन. असेच इतर अनेक मराठी व्यक्तींचे संकलन येथे होत गेले (वेगवेग़ळ्या धाग्यात!) तर खूप चांगले होईल. प्रत्येकाचे प्रत्येक विचार पटलेच पाहीजेत असे नाही. पण उगाच कोणी मोठे होत नसते. त्यांच्यात नक्की काय होते हे जसे जाहीर गोष्टींमधून समजते तसेच लहानसहान व्यक्तिगत गोष्टींमधूनही असे वाटते.

भूदान चळवळी मध्ये त्यांनी प्रत्यक्ष सहभाग होता.

भूदान चळवळीत नुसता प्रत्यक्ष भागच घेतला नव्हता तर भूदान चळवळीचे ते प्रणेते होते. त्यावेळेस ६०+ वर्षाचे विनोबा भारतभर पायी हिंडले होते. त्या चळवळीला यश आले त्या पेक्षा अपयश जास्त आले असे नंतर जाणवले. म्हणून त्याचे महत्व कमी होत नाही. कारण त्यांना जे समाजाच्या फायद्याचे ठरू शकेल असे वाटले ते त्यांनी करायचा प्रामाणिक प्रयत्न केला.

गीताई सारखा उत्तम ग्रंथ त्यांनी लिहीला.

इतके उत्तम शब्दांतर आणि भाषांतर इतर भाषेत झाले आहे का या बद्दल मी साशंक आहे. आईला संस्कृत कळत नाही म्हणून तिने गीता समजून सांगायला सांगितली तर या पठ्ठ्याने गीताईच लिहून काढली! तसेच त्यांचे इशावास्योपनिषद या १३ श्लोकांच्या तत्वज्ञानावरील पुस्तक पण खूप चांगले आहे. तशीच अजून इतर, अगदी मुलांसाठीपण चांगली पुस्तके लिहीली आहेत.

त्यांनी फारसे राज कारण केले नाही पण जयप्रकाश नारायण यांच्या बरोबरचे त्यांचे संबंध गूढ होते. ...आणीबाणी च्यावेळी स्व. इंदिरा गांधी यानी चतुराईने त्यांनी वापरलेला "अनुशासन पर्व" हा शब्दसमुह वापरून आपला राजकीय फायदा करून घेतला. त्यामुळे त्यांना " राजकीय संत " म्हणून हिणवले गेले.

त्यांनी संयुक्त महाराष्ट्रनिर्मितस देखील विरोध दर्शवला होता. त्या वेळेस "विनोबा की वानरोबा" म्हणून आचार्य अत्र्यांचा लेख प्रसिद्ध झाला होता. त्यांच्यावर जाहीर विडंबनही झाले होते. मात्र ते येथे देणे जरी त्यात कुठलेही असंसदीय शब्द नसले तरी अनादर करणारे वाटत असल्याने येथे देत नाही.

आणिबाणीच्या वेळेस त्यांचे मौनव्रत, टाळ्या वाजवणे आणि अनुशासन पर्व या गोष्टींमुळे तसेच स्पष्टपणे अन्यायाच्या विरुद्ध न बोलण्याने त्यांचे नाव खराब झाले होते.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

प्रदीप's picture

6 Jun 2010 - 8:27 am | प्रदीप

अत्यंत चांगला व नेहमीप्रमाणेच संयमित प्रतिसाद.

प्रत्येकाचे प्रत्येक विचार पटलेच पाहीजेत असे नाही. पण उगाच कोणी मोठे होत नसते. त्यांच्यात नक्की काय होते हे जसे जाहीर गोष्टींमधून समजते तसेच लहानसहान व्यक्तिगत गोष्टींमधूनही असे वाटते

१००% सहमत.

[भूदान]चळवळीला यश आले त्या पेक्षा अपयश जास्त आले असे नंतर जाणवले. म्हणून त्याचे महत्व कमी होत नाही. कारण त्यांना जे समाजाच्या फायद्याचे ठरू शकेल असे वाटले ते त्यांनी करायचा प्रामाणिक प्रयत्न केला.

महत्व कमी होत नाही, हे अगदी खरे. ही चळवळ पुढे चालू का शकली नाही, ह्याविषयी कुणी जाणकाराने इथे लिहावे. विनोबांनी त्यांच्या कार्यास पुढे घेऊन जाईल असे समर्थ व्यक्तिमत्व जोपासले नाही का?

*** मूळ लेखातील 'ग्लोबलायझेशन' विषयीच्या मुद्द्यावर मात्र मतभेद आहे. ते 'जय जगत' लिहीत त्याचा त्यांना अभिप्रेत असलेला अर्थ वेगळ्याच स्तरावर आहे. व्यापार व तत्सम देवाणघेवाणीशी त्याचा सुतराम संबंध नाही.

विकास's picture

6 Jun 2010 - 6:26 pm | विकास

भूदान चळवळीच्या संदर्भात विनोबांचे स्बह्द त्यांच्या "ज्ञान मी सांगतो पुन्हा" नामक पुस्तकात अगदी थोडक्यात वाचले आहे. त्याचा देखील सारांश करून सांगायचे झाले तर असे म्हणता येईल की त्यांनी हा संकल्प इश्वरी प्रेरणेने केला आणि वयाच्या ५५ व्या वर्षापासून ते ६८ वर्षाचे होईपर्यंत चालले. हे कार्य चालू केले तेंव्हा त्यांच्या डोक्यात यशाबद्दल संभ्रम होता पण नंतर तो दूर झाला.

मात्र नंतर "वटवृक्षाखाली काहीच वाढत नाही"अशी अवस्था नवीन नेतृत्व निर्मितीच्या संदर्भात झाली. फॉरेस्ट गंप मधे जो पर्यंत टॉम हँक्स पळत असतो तो पर्यंत "पब्लीक" मागे पळत जाते. त्यांना तो ध्येयवादी वाटतो, कुठल्यातरी कारणाने पळतोय असे वाटते. त्याचा मूड जातो आणि तो थांबतो तर तेच इतरांचे होते कारण त्याच्याकडून त्याच्या पळण्याचे उद्दीष्ट लोकांपर्यंत पोचलेच नसते... असेच काहीसे झाले.

सरते शेवटी काही ऐकीव म्हणजे, काही ठिकाणी जरी यश आले तरी काही ठिकाणी नापिक जमिनीच दिल्या गेल्या... हा विनोबांचा दोष नव्हता. पण लोकांना न समजता, म्हणले तर फारच भाबडे विचार केले की काय असे वाटते. (आपण आदर्श असू पण म्हणून समोरचा चोर नसेलच असे नाही हे श्रीकृष्ण आयुष्यभर आचरणात आणून जगला आणि मग गीता सांगितली. पण आपण गीताई कडे केवळ तत्वज्ञान केले आणि कशासाठी ती सांगितली गेली आणि सांगणार्‍या-ऐकणार्‍याला नंतरच्या १८ दिवसांत काय काय करावे लागले, हे अभ्यासायचे हे विसरून गेलो... )

मूळ लेखातील 'ग्लोबलायझेशन' विषयीच्या मुद्द्यावर मात्र मतभेद आहे.

अगदी असेच म्हणायचे होते. नाहीतर असेच ज्ञानेश्वरांच्या "विश्व स्वधर्मसुर्ये पाहो" मधून काय सांगितले यावर ग्लोबलायझेशन नंतरचे "कॉर्पोरेट टेकओव्हर" वगैरे अर्थ काढू शकतो. :)

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

रमेश आठवले's picture

27 Jun 2015 - 6:08 am | रमेश आठवले

विनोबांचे मौनव्रता बद्दल वाचले होते. एकदा पवनार आश्रमात रांगेत उभा राहून त्यांना मी भेटलो असताना असेच सांगण्यात आले होते. पण नागपूर वर्ध्यातुन निवडून आलेले आणि बरेच वेळा मंत्री झालेले श्री वसंत साठे यांचे Memoirs of a Rationalist हे आत्मचरित्र नुकतेच वाचले . त्यात विनोबा ठार बहिरे झाले असल्याने त्याना लिहून प्रश्न विचारावे लागत आणि ते लिहूनच उत्तर देत असा उल्लेख आहे .

होबासराव's picture

7 Jul 2015 - 8:06 pm | होबासराव

श्री वसंत साठे यांचे Memoirs of a Rationalist हे आत्मचरित्र ह्यात काहि तरी घोळ आहे.. खालील लिंक चेक करता का
http://www.arvindguptatoys.com/arvindgupta/justicej.pdf

रमेश आठवले's picture

7 Jul 2015 - 9:52 pm | रमेश आठवले

रावसाहेब
आपण दिलेलेल्या संदर्भात १९० पाने आहेत आणि वेगवेगळ्या ३४ विषयावर लेख आहेत. त्यापैकी कोणत्या लेखात विनोबांच्या मौन व्रताविषयी माहिती आहे ते सांगाल का ? मी भावे अथवा विनोबा भावे असे लिहून कंट्रोल+ फ करून बघितले पण मला काही सापडले नाही.
मला एक गोष्ट समजत नाही ती अशी की विनोबांचे मौनव्रत असताना त्याना भेटणार्या सर्व व्यक्तीना आपले प्रश्न तोंडी न विचारता लिहूनच का विचारावे लागत ? अगदी इंदिरा गांधी यांनाही असेच करावयास लागले होते. असे का ?

मिसळभोक्ता's picture

3 Jun 2010 - 4:50 am | मिसळभोक्ता

विनोबांनी त्या काळात, चाराण्याचा आहार म्हणून उकडलेला पालक आणि दही ह्याचे स्तोम माजवले होते. त्यापेक्षा प्रायोपवेशन परवडले, असे माझे सपष्ट मत आहे.

हे सगळे महात्मे चांगल्या खाण्यापिण्यावर असे खार का खातात ? चांगले खाऊनपिऊन समाजसेवा करता येत नाही का ?

असो.

ता. क. विनोबा पवनारचे, म्हणजे वैदर्भिय, म्हणून मला त्यांच्याविषयी जवळीक वाटते. पण आणिबाणीच्या वेळेस त्यांनी शेपूट घातली (असांसदीय शब्दांबदल क्षमस्व) म्हणून तिटकारा देखील येतो.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

पाषाणभेद's picture

3 Jun 2010 - 7:11 am | पाषाणभेद

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या वेळीही त्यांची अशीच भुमीका होती. मराठी जनता संयुक्त राज्यात राहिली तर काय फरक पडतो असे ते म्हणत.

बाकी ऋषितुल्य असल्याने आदर आहेच. (पण "जो महाराष्ट्राच्या आड त्याला खड्यात पाड" असे आपल्याला वाटते.)
The universal symbol for diabetes
मधुमेहा विरुद्ध लढा

माझी जालवही

अडाणि's picture

6 Jun 2010 - 9:26 am | अडाणि

मराठी जनता संयुक्त राज्यात राहिली तर काय फरक पडतो असे ते म्हणत.

ह्यात चुक काय आहे? संयुक्त महाराष्ट्र झाल्याने काय विषेश फरक झाला आहे ? किंवा अदरवाईज काय तोटा झाला असता ?

भाषावार प्रांतरचना चुकिची आहे असेही काही मान्यवरांचे त्यावेळि मत होतेच...

-
अफाट जगातील एक अडाणि.

अविनाशकुलकर्णी's picture

3 Jun 2010 - 7:39 am | अविनाशकुलकर्णी

दादा कोंडके नेहमी म्हणत..तिन गोष्टी पासुन सावधान..रंडीबाजी,बुवाबाजी,व विनोबाजी...

शिल्पा ब's picture

3 Jun 2010 - 12:05 pm | शिल्पा ब

दादा कोंडके नेहमी म्हणत..तिन गोष्टी पासुन सावधान..रंडीबाजी,बुवाबाजी,व विनोबाजी...

दादा असे म्हणत असतीलही पण ते असंसदीय आहे...विनोबा भावे हि व्यक्ती खरोखरच ऋषितुल्य होती...चुका सगळ्यांच्याच हातून होतात.

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

मिसळभोक्ता's picture

3 Jun 2010 - 12:31 pm | मिसळभोक्ता

दादा कोंडके ह्या विदूषका च्या हातून अघोर चूक झाली, असे कबूल करणे समजा "द मोस्ट करेजियस टास्क ऑफ शिल्पा ब" असेल तर जबरा ! जियो !

अरे, कुठे दादा कोंडके, आणि कुठे विनोबा भावे ?

शिल्पा ब इज यूसलेस !

कोण रे तो भाड्या, विनोबांविषयी लेख वाचताना त्याला/तिला/तेला दादा कोंडके आठवलं ?

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

शिल्पा ब's picture

6 Jun 2010 - 8:14 am | शिल्पा ब

काय हो मिभो, जर कोणी एखाद्या आदरणीय व्यक्तीबद्दल चुकीच काही बोललं तर ती चूक दाखवून देण्यात कसलं युजलेसपणा आहे ? का तुमच्यासारखा *ड्या, श्री, सौ, कु., असा म्हणून लिहिलं तरच योग्य आहे?

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

मिसळभोक्ता's picture

3 Jun 2010 - 12:35 pm | मिसळभोक्ता

श्री/सौ/कु अविनाशकुलकर्णी

तुला विनोबांविषयी लेख वाचताना दादा कोंडक्यांची पांचट कोटी आठवत असेल॑, तर तू पूर्णपणे यूसलेस आहेस, हे स्पष्ट होते.

मी आजवर तुला मेंदू असलेला मानव समजत होतो, परंतु तू आता पूर्ण खुलासा केलास, तेव्हा,

धन्यवाद.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

नितीनमहाजन's picture

3 Jun 2010 - 10:04 am | नितीनमहाजन

सर्व चर्चेवरून पु. ल.देशपांडे यांचे दोन लेख आठवले. पहिला विनोबांच्या भूदान चळवळीची माहिती देणारा व दुसरा "आम्ही शून्यात जातो" - आणिबाणीच्या काळातील.

नितीन

स्वाती२'s picture

3 Jun 2010 - 5:15 pm | स्वाती२

+१
सहमत! 'मला दिसलेले विनोबा' चे या मुळे पुन्हा एकदा पारायण झाले.

शेखर जोग's picture

3 Jun 2010 - 5:47 pm | शेखर जोग

विनोबा भावे एक वैज्ञानिक संत होते असे मला वाटते
१८ भाषात पारंगत, अतिउच्च विचार यामुळे आपल्याविषयी कोणाला काय वाटेल याची त्यानी कधीही पर्वा केली नाही.
अशा या संताला माझे शतशः प्रणाम

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Jun 2010 - 6:28 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कसलाही मोह नसल्यामुळे विनोबांनी त्यांची सर्व प्रमाणपत्र जाळून टाकली होती अशी गोष्ट मी ऐकली आहे.

अदिती

हो अशीच काहीशी कथा मीही लहानपणी वाचल्याचे आठवते. तपशील आता फारसा आठवत नाही पण प्रमाणपत्रे जाळण्याचे कारण कसलाही मोह नसणे वगैरे नसून ती प्रमाणपत्रे निरुपयोगी (याकरिता 'यूसलेस' हा शब्द भयंकर आवडला!) आहेत असे मत होते असे वाटते. (बहुधा 'पुढील कार्याकरिता निरुपयोगी' असा अर्थ असावा काय?)

अर्थात लहानपणी अर्धवट वाचून त्यातूनही अर्धवट लक्षात राहिलेल्याच्या आधारावर लिहितोय (अभ्यासाचा कोणताही दावा नाही), त्यामुळे आमचा प्रतिसाद, आणि पर्यायाने आम्ही, पूर्णपणे यूसलेस आहोत हे अध्याहृत आहेच. त्यामुळे तपशिलाच्या जिथे चुका असतील तिथे जाणकार विद्वान (त्यांना वेळ असल्यास) या भाड्याची पुरेपूर वसुलि करतीलच, या खात्रीने निर्धास्त होऊन हा प्रतिसाद मी आवरता घेतो.

- पंडित गागाभट्ट.

अविनाशकुलकर्णी's picture

4 Jun 2010 - 4:57 pm | अविनाशकुलकर्णी

मिसळभोक्ता ..आपल्या विनोबा बद्दलच्या आदराच्या भावनेस धक्का लागल्याने मी व्यथित होवुन आपली क्षमा याचना करतो..विछ्या माझी मधे हा विनोद एकल्याने व आठवल्या ने हे दु:साहस केले..

विसोबा खेचर's picture

7 Jun 2010 - 12:21 pm | विसोबा खेचर

आमच्या भाईकाकांनी 'तुझे आहे तुजपाशी' या नाटकात 'आचार्य पोफळे गुरुजी' हे डब्बल ब्यारलवालं पात्र विनोबांवरूनच निर्माण केलं होतं..! :)

खा लेको.. बायाबापड्यांना तर्रास देऊन गाईचं तुप खा, मध खा आणि हातसडीचे तांदूळ खा! :)

तात्याभैय्या देवासकर.
देवासकरांची कोठी, इंदौर.

सुधीर's picture

26 Jun 2015 - 8:34 pm | सुधीर

शोधता शोधता सापडला. विकास यांचे प्रतिसाद आवडले.

श्रीनिवास टिळक's picture

27 Jun 2015 - 6:39 am | श्रीनिवास टिळक

विनोबाजींच्या भूदान यज्ञ या विषयावर मी १९७९ साली MA करता प्रबंध लिहिला होता. पुढे तो Myth of Sarvodaya: A study in Vinoba's concept (Delhi: Breakthrough Communications, १९८४) या नावाने प्रसिद्ध झाला(टीप येथे myth हा शब्द खोटे किंवा अवास्तव या अर्थाने वापरलेला नसून कहाणी हा अर्थ अभिप्रेत आहे). १९८२ साली माणूस या साप्ताहिकात 'कहाणी विनोबाप्रणीत भूदान यज्ञाची'असा लेख मी या विषयावर लिहिला होता. भूदानगंगा या नावाखाली आठ भाग वर्ध्याहून प्रसिद्ध झाले आहेत (मूळ हिंदीमध्ये). त्यात धर्म, संस्कृती आदि विषयांवर प्रगल्भ विचार भूदान या विषयाच्या संदर्भात विनोबांनी मांडले आहेत म्हणून मी ते अजूनही मधून मधून चाळत असतो.

माहितगार's picture

7 Jul 2015 - 8:36 pm | माहितगार

सम्राट अशोक ते विनोबा अशा लोकांनी काम केलेला तो बिहार आज असा का झाला असेल ?

अवांतरासाठी क्षमस्व

श्रीरंग_जोशी's picture

7 Jul 2015 - 8:47 pm | श्रीरंग_जोशी

अवांतर असला तरी हा प्रश्न पटला नाही.

इतिहासातील कर्तृत्वावान माणसांची नावे घेऊन हाच प्रश्न आपल्या राज्याबद्दलही अन इतर कुठल्याही राज्याबद्द्ल वा देशाबद्द्ल विचारता येईल.

होबासराव's picture

7 Jul 2015 - 8:45 pm | होबासराव

सम्राट अशोक ते विनोबा अशा लोकांनी काम केलेला तो बिहार आज असा का झाला असेल ?

आता तो आणखि बकाल होणार आहे, राजकारण कुठल्या स्तराला जाउ शकत हे आपल्याला ह्या वर्षि होणार्‍या बिहार विधानसभा निवडणुकां मध्ये / नंतर दिसेलच.