एप्रिल महिन्यातलं मेळघाटचं जंगल... जंगलभर एकच वास... कसला? तर मोहाच्या फुलांचा... फुलं चविला अतीशय गोड... वास पण तितकाच गोड...
(मोहाच झाड)
(झाडाखाली पडलेला फुलांचा सडा)
(मोहाची फुलं)
फुलं इतकी गोड असतात की एका वेळेस ५-६ पेक्षा जास्त खाऊच शकत नाही... आणि जास्त वेळ वास घेतला तर नुसत्या वासानेच थोडी झिंग चढल्या सारखं वाटतं...
गावकरी ही फुलं जमवतात आणि सुकवून साठवतात... मग गरज पडेल तशी ह्या फुलांपासून दारु बनवून प्यायची... ह्या फुलांपासून खीर, गोड रोट, अन लापशी पण बनवतात...
विमुक्त
प्रतिक्रिया
1 Jun 2010 - 11:26 am | महेश हतोळकर
तिथे पण गेलास का? माणूस आहेस का कोण?
1 Jun 2010 - 11:34 am | मनिष
__/\__
ह्या माणसाचा जितका हेवा वाटतो तितका कोणाचाच वाटला नव्हता... :)
1 Jun 2010 - 11:59 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
धन्यवाद रे विमुक्ता!!
अदिती
4 Jun 2010 - 12:18 am | बेसनलाडू
_/\_
(सहमत)बेसनलाडू
1 Jun 2010 - 11:52 am | मदनबाण
कधी मोहाचे झाड आणि त्याची फुले पहायला मिळतील असे वाटले नव्हते,पण आज तुमच्यामुळे हे झाड पहायला मिळाले.
धन्यवाद... :)
मदनबाण.....
Laughing at our mistakes can lengthen our own life. Laughing at someone else’s can shorten it.
Cullen Hightower
1 Jun 2010 - 12:16 pm | आंबोळी
कधी मोहाचे झाड आणि त्याची फुले पहायला मिळतील असे वाटले नव्हते,पण आज तुमच्यामुळे हे झाड पहायला मिळाले.
असेच म्हणतो....
तसेच तुमच्यामुळे त्या मोहाच्या फुलांची प्यायचाही योग लवकरच जुळून यावा....
आंबोळी
1 Jun 2010 - 5:32 pm | अनिल हटेला
कधी मोहाचे झाड आणि त्याची फुले पहायला मिळतील असे वाटले नव्हते,पण आज तुमच्यामुळे हे झाड पहायला मिळाले.
मीही असेच म्हणतो....
तसेच तुमच्यामुळे त्या मोहाच्या फुलांची प्यायचाही योग पून्हा एकदा
लवकरच जुळून यावा....
(महुवाप्रेमी)
बैलोबा चायनीजकर !!!उर्फ..
АНИЛ ХАТЕЛА :D
3 Jun 2010 - 3:37 am | प्रियाली
+१
-१ ;)
1 Jun 2010 - 12:29 pm | श्रावण मोडक
>>जास्त वेळ वास घेतला तर नुसत्या वासानेच थोडी झिंग चढल्या सारखं वाटतं...
हे ठीक हो. अनुभव काय आहे तो लिहा की... की अशी झिंग येण्याआधीच सारं काही बेतशीरपणे आटोपून निघाला होता? तसं असेल तर मात्र तू ('हाय कंबख्त...'च्या चालीवर) मोहाचा अनुभवच घेतला नाहीस.
1 Jun 2010 - 2:00 pm | डावखुरा
छान माहिती आणि छायाचित्रे पण......
----------------------------------------------------------------------
"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"
1 Jun 2010 - 5:26 pm | स्वाती२
धन्यवाद विमुक्त.
माझ्या मित्राच्या वडिलांनी आणली होती मोहाची फुले एकदा. मी आणि माझ्या मित्राने चोरुन खाल्ली १०-१२ फुलं आणि नंतर दोन्ही घरी भरपूर ओरडाही.
2 Jun 2010 - 12:00 am | पांथस्थ
आमच्या पिताश्रींनी मागच्याच महिन्यात सातपुड्यातील जंगलांमधुन मोहाची सुकवलेली फुले आणली होती. खाउन पाहिली गोड होती. पण लय भारी नाही वाटली :(
जाता जाता: मोहाची दारु आणली असती तर ....
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
1 Jun 2010 - 5:46 pm | manjiri puntambekar
मोहची फुले हे शिर्शक वाचुन गो. नि दान (शी! अनुस्वार कसा द्यायचाबुवा) च्या " दुर्ग दर्शन " पुस्तकाची आठवण झाली. कर्नाळा भेटीचे वर्णन करताना कर्नाळ्याच्या जन्गलातील वर्णन!
तुझी भटकन्ति वाचुन नेहमीच य पुस्तकची आठवण येते.
1 Jun 2010 - 8:28 pm | प्राजु
मस्त!!
प्रचंड हेवा वाटतो तुझा. :)
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
2 Jun 2010 - 3:04 am | चित्रा
सुंदर फोटो.
2 Jun 2010 - 8:29 pm | चतुरंग
('मोह'क)चतुरंग
3 Jun 2010 - 3:29 am | शुचि
बंगाली -> महुवा
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
3 Jun 2010 - 3:33 am | धनंजय
गोड फुले, कडक दारू!
3 Jun 2010 - 4:11 am | सहज
हे मोहाचे झाड (?) घराच्या बागेमधे लावायला बंदी वगैरे आहे का?
नसल्यास बी / रोप कुठे मिळेल?
3 Jun 2010 - 7:25 am | मिसळभोक्ता
भारतात बंदी नाही. (असे आमचा वार्ताहर कळवतो.)
माझ्या माहितीप्रमाणे (हॅहॅहॅ) बी चालत नाही. रोप हवे.
रोपे मुबलक प्रमाणात मोहाच्या झाडाखाली मिळतात.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
3 Jun 2010 - 8:14 am | II विकास II
अजुन काही संबधित माहीती
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अन् कीर्तनकार ह.भ.प. बबनराव पाचपुते यांनी आदिवासी विकास खात्याचा कार्यभार सांभाळल्यानंतर शंभर दिवसाच्या ‘टारगेट’मध्ये अगदी सुरुवातीलाच ‘मोह’ अनावर झाला अन् उसाच्या कंट्री लिकरपेक्षा मोहाच्या फुलापासून तयार केल्या जाणाऱ्या दारूला ‘हर्बल लिकर’ म्हणून बाजारात आणण्याचा निर्णय घेवून टाकला आहे.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=238...
-----
ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.
3 Jun 2010 - 8:15 am | II विकास II
भांग जशी देवाला चालते, तशी मोहाची दारु कोणत्या देवाला चालते का?
-----
ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.
3 Jun 2010 - 8:31 pm | ब्रिटिश
ज्यायला कालजाला हात घातला बोल.
मवाची दारु पीवाला न जवला झे रं चाकन्याला
बाकी झाड बगुनच टाईट झालो बग.
लै भारी र बाला
मिथुन काशिनाथ भोईर
अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ
26 Nov 2019 - 9:34 am | रुस्तम
हे सुद्धा मिपावर आहे माहीत नव्हतं.