मराठी मुलगी- मिस युनिवर्स २०१० ..??

अक्स's picture
अक्स in काथ्याकूट
25 May 2010 - 11:00 am
गाभा: 

मराठी मुलगी- मिस युनिवर्स २०१० ..??
मुंबईची आरोही कदम हिला आय एम शी ह्या मिस युनिवर्सच्या पूर्वस्पर्धेत विजयी करा ..भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तिला मिस युनिवर्स २०१० मध्ये पाठवा.. तिला मिस युनिवर्स २०१० बनवा.. मराठी झेंडा फडकावत ठेवा...

तिच्या प्रोफाईल ला भेट द्या...तिच्यासाठी फेसबुक,ट्विटर,mobile द्वारा वोट करा

http://www.iam-she.com/contestantsdetails.php aarohi kadam

type IAMSHE 05 send to 54646

marathi pawul padti pudhe....

last date 26th may 2010..please vote or support her on facebook,twitter..

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

25 May 2010 - 11:17 am | चिरोटा

माझे मत http://www.iam-she.com/contestantsdetails.php?id=28 हिला. कारण तिचे आडनाव "मिसळ" आहे.
भेंडी पाव.
P = NP

मनिष's picture

25 May 2010 - 11:35 am | मनिष

ही आमची पुजा, हिच्यावर आमचा.... ;)
http://www.iam-she.com/contestantsdetails.php?id=38

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 May 2010 - 11:39 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

चकणी वाटते हो ती या फोटोत!

अदिती

मनिष's picture

25 May 2010 - 11:53 am | मनिष

...her eyes are very attractive, they attract each other! :p

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 May 2010 - 11:56 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

तिचा डावा डोळा एवढा सुंदर आहे की उजवा डोळाही त्याच्याकडे पहाणं थांबवू शकत नाही.

अदिती
अवांतरः मला मधुबालेच्या डोळ्यांच्या सौंदर्यात अशीच एसिमेट्री दिसते.

श्रावण मोडक's picture

25 May 2010 - 12:02 pm | श्रावण मोडक

अवांतर? डेअरिंग वाढलं बघा. मधुबालेविषयी काहीही लिहू लागले लोक आता. ;) मधुबालाविषयी काहीही (खरं तर फक्त कौतुक करणारंच लिहिलं पाहिजे, पण तरीही) लिहिलं तरी ते अवांतर कसं होऊ शकतं?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 May 2010 - 12:05 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आधीही लिहीलं असतं, पण उगाच का फट म्हणता मनुष्यहत्येचं पातक मिपाच्या माथी लावून द्यायचं! ;-)

अहो श्रामो, मधुबाला असेल सुंदर ... तुम्ही म्हणत असाल, पण पुरावा दाखवा. उगाच कोण, कुठले स्वामी, बाबा, महर्षी म्हणतात म्हणून काय लगेच काय ते खरं मानायचं का? ती कुठे मिस युनिव्हर्स झाली होती!

(युनिव्हर्सल 'वाद'वादी) अदिती

श्रावण मोडक's picture

25 May 2010 - 12:11 pm | श्रावण मोडक

उगाच कोण, कुठले स्वामी, बाबा, महर्षी म्हणतात म्हणून काय लगेच काय ते खरं मानायचं का?

अगायायाया...
स्वामी, बाबा, महर्षीच यात तरबेज असतात. म्हणूनच म्हणतात, 'साधू-संत येती घरा, दारे-खिडक्या बंद करा'!
स्वामी, बाबा, महर्षींना ब्रह्मचारी म्हणण्याची, आणि मानण्याचीही, चूक सारेच करतात. पण तसं नसतं. विचार वाटल्यास जालिंदरबाबांना. ते सांगतील.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 May 2010 - 12:15 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

=)) =)) =)) =)) =))

अदिती

श्रावण मोडक's picture

25 May 2010 - 12:29 pm | श्रावण मोडक

जरा खुलासा करा ना...

स्वामी, बाबा, महर्षीच यात तरबेज असतात.

या वाक्यावर लोटपोट होताहात? मला वाटतं यावरच. आणि ते खूपच नेमकं आहे. हो की नाही?

'साधू-संत येती घरा, दारे-खिडक्या बंद करा'!

या वाक्यावर लोटपोट होताहात? हे ठीक. नोन आहे. तसं जनरल आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 May 2010 - 12:48 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अर्थातच 'साधू-संत येती घरा, दारे-खिडक्या बंद करा' यामधे विनोदाची परमावधी आहे. बाबा, महर्षि, साधू वगैरे वगैरे धूळफेक करण्यात तरबेज असतात यात काय नवीन? या दशकातल्या एका विक्षिप्त विडंबनात म्हटलं आहेचः

धूळफेक एक भोंदू करणार। भक्तगणांचा त्याला "अर्थ" आधार।
अजाणतेपणी जाहिरात होणार। लोटपोट होणे निश्चित॥

आणि तुम्ही म्हणता ते खरं आहे, हे विधान जनरल असलं तरीही विडंबनामुळे जास्त मजा येते. उदा: गाढवापुढे वाचली गीता, वाचणाराच गाढव होता.

अदिती

देव पण कृपादृष्टी त्याचे सगळे कार्य आटपल्यावरच देतो.लगीन करुन पोरबाळ झाली कि म्हाराज व्ह्यायला रिकामा झाला.

म्हणतात ना करुन करुन भागल,अन देपपुजेला लागल.

नवीन म्हण अशी आहे
साधु संत येती घरा लेकी सुना आत दडवा.
वेताळ

फटू's picture

25 May 2010 - 12:10 pm | फटू

धर्मभ्रष्ट केला की राव. चक्क विंग्रेजीत लिव्हलं.

हे वाक्य असंही लिहिता आलं असतं ना: ...तिचे डोळे आकर्षक आहेत, ते एकमेकांना आकर्षित करतात. :D

बाकी त्ये विंग्रेजी वाक्य येगदम भारी हाये. चारचौगात यिंप्रेश्यन मारायला येगदम ब्येष्ट.

- फटू

परिकथेतील राजकुमार's picture

25 May 2010 - 1:42 pm | परिकथेतील राजकुमार

http://www.iam-she.com/contestantsdetails.php?id=29

इ हमार मिश्राजीकी लडकी है ! वोट इसकोही देना.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

भारद्वाज's picture

25 May 2010 - 4:32 pm | भारद्वाज

कुणी काहीही केले तरी हीच जिंकणार !!! =))
http://www.iam-she.com/contestantsdetails.php?id=2

परिकथेतील राजकुमार's picture

25 May 2010 - 5:00 pm | परिकथेतील राजकुमार

आईच्या गावात !!! हे मिस युनिव्हर्स आहे का मिस हॉरीबल आहे ?

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 May 2010 - 5:01 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

नाही, ती मिस दंताळे आहे! ;-)

अदिती

टारझन's picture

25 May 2010 - 5:23 pm | टारझन

आईच्या गावात !!! हे मिस युनिव्हर्स आहे का मिस हॉरीबल आहे ?

एका "वेगळ्याच" सौंदर्याचं असा अपमान केल्याचं पाहुन डोळा पाणावला पर्‍या !!!
काय चिक्कणी दिसत्ये ती .. आणि हॉरिबल म्हणतोस तिला ? :) तिच्या पेक्षा १००० पट हॉरिबल गोष्टी तुला दाखवु शकतो हा भाग अलहिदा =))

- टारझन
जिथे कमी ,तिथे आम्ही :)

परिकथेतील राजकुमार's picture

25 May 2010 - 5:28 pm | परिकथेतील राजकुमार

एका "वेगळ्याच" सौंदर्याचं असा अपमान केल्याचं पाहुन डोळा पाणावला पर्‍या !!!

तुझ्याच डोळ्यांनी एकदा आस्वाद घेउन बघितला पाहिजे ह्या सौंदर्याचा.

साला उभ्याला खाली बसवेल असले सौंदर्य आहे हे =))

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

टारझन's picture

25 May 2010 - 11:01 pm | टारझन

साला उभ्याला खाली बसवेल असले सौंदर्य आहे हे

म्हणुनंच म्हंटलो पर्‍या .. एका "वेगळ्याच" सौंदर्याचा असा अपमान ? :)

तुझ्याच डोळ्यांनी एकदा आस्वाद घेउन बघितला पाहिजे ह्या सौंदर्याचा.

एकवचन रे ...एकवचनी शब्द हवा !!

-केळवन
केळ्याने होत आहे रे ... आधी केळेची पाहीजे

Pain's picture

26 May 2010 - 12:50 am | Pain

साला उभ्याला खाली बसवेल असले सौंदर्य आहे हे

=)) =)) =)) =)) =))

भारद्वाज's picture

25 May 2010 - 5:12 pm | भारद्वाज

आपण हिच्या charming smile वर फिदा झालोय मात्र...
http://www.iam-she.com/contestantsdetails.php?id=30

निखिल देशपांडे's picture

25 May 2010 - 5:23 pm | निखिल देशपांडे

ही नवी स्पर्धा आहे का???
या आधी मिस ईंडिया मधुन स्पर्धकाची निवड केली जाते होती असे वाटते. ही नवी स्पर्धा भरवण्यामागचे कारण कळले नाही!!!
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

अनामिक's picture

25 May 2010 - 6:05 pm | अनामिक

सगळे फोटू पाहिल्यावर "सौंदर्य याला म्हणतात होय" असं वाटल्या शिवाय राहवलं नाही. काही चेहरे भितीदायक वाटले, तर काही जणींचे सुतकी चेहरे बघुन वाईट वाटलं.

-अनामिक

पक्या's picture

25 May 2010 - 10:43 pm | पक्या

सौंदर्यस्पर्धांमध्ये फक्त चेहरा सुंदर असून चालत नाही. फिगर (शरिर सौष्ठव) , नितळ कांती, उंची , सुंदर दंतपंक्ति वगैरे बाबी पण बघितल्या जातात.
चेहर्‍याने सुंदर पण शरीर बेढब अशा स्त्रीला सौंदर्यस्पर्धांमध्ये स्थान निश्चितच मिळणार नाही.
मला प्रियांका मिसाळ ही चांगली वाटली.
जय महाराष्ट्र , जय मराठी !

अनामिक's picture

25 May 2010 - 10:55 pm | अनामिक

मान्य... पण दिलेल्या फोटूंमधे फक्तं चेहराच दिसतोय. त्यावरच कॉमेंट केली होती.

-अनामिक

पक्या's picture

25 May 2010 - 11:11 pm | पक्या

नाही हो , बाजूला पूर्णाकृती (फूल फिगर :)) फोटू पण आहेत ना.
उदा. हा बघा http://www.iam-she.com/photo_play.php#
जय महाराष्ट्र , जय मराठी !

Pain's picture

26 May 2010 - 1:02 am | Pain

तिचा तर चेहराही चांगला नाहीये. मराठी म्हणुन कोणालापण.... ?

( सगळे लोक तुमच्यासारखे असते तर किती बर झाल असत :> )

Pain's picture

26 May 2010 - 1:05 am | Pain

जर परीक्षेत सौन्दर्याला महत्व देत नसतील तर सौन्दर्यस्पर्धेत बुद्धी का तपासतात ?

भय्या's picture

26 May 2010 - 8:00 am | भय्या

अहो परिक्षेत काय बुद्धी तपासतात?

शोधा म्हन्जे सापडेल's picture

29 May 2010 - 3:44 pm | शोधा म्हन्जे सापडेल

मी येका विंग्रजी पेप्रात वाच्लं कि त्यातल्या येका मुलीला येका डोल्यानी दिसत न्हाय म्हनून. तरीसुद्दा या ईस्वावर राज्य करन्याची तिचि विछा आहे, आनी तिच्या ह्या आत्मईस्वासापायीच तिला या स्परदेत भाग घेऊ दिला. कदाचित त्या ह्याच अनुराधा नायडू बाई आसतीन, कुनास ठावं ???

पीस इज, नौट व्हेन देअर इज नो व्हायलन्स ,बट् व्हेन फ्लावर्स ब्लूम.............