मनीषा एक कॉलेज तरुणी अचानक एकाच्या तरुणाच्या मोहजालात फसली. अखेर तिला गर्भपात करून घ्यावा लागला. अन् दुसऱ्याच कोणाशीतरी तिचे लग्न लावून देण्यात आले! त्यानंतरही पूर्वीचा आशिक तिला भेटतो, तीही त्याची वाट पाहते.. हे कुणाच्याही लक्षात न येत चालूच आहे...
चीन्तोपंतांच्या चिंता सोसून वैतागलेली राधाबाई तिच्याच ऑफिसातील हर्शल बरोबर फिरत असते. तो तिला हसवतो, खेळवतो. ती खुश आहे... तोही!
ही नमुनेदाखलची उदाहरणे सत्यकथा आहेत.(नावे बदलली आहेत.)
नवरा बाहेरख्याली झाला त्याचे कारण घरातच कुठेतरी सापडते. घरच्या व्यक्ती त्याची ख्याली खुशाली ओळखीत नाहीत म्हटल्यावर तो बाहेर डोकावणार हे ठरलेलेच...
मर्दानगी गाजवण्यासाठीही काही महाभाग बाहेर हुंदडतात.
एकूण काय तर लैंगिक भूक भागली तरच इतर भूका सुचतात, जाणवतात. जीवनात अन्न वस्त्र निवारा या मुलभूत गरजांबरोबरच मैथुन सुद्धा अत्यावश्यक असते. मनोलैगिंक व्यापारामध्ये या गोष्टीला खूप महत्त्व आहे.
व्यभिचार हाही एक आचारच! परंतु तो समाजमान्य नाही इतकेच. सध्या अनेक नामांकित व्यक्ती (नेते/अभिनेते/बुवाबाबाही) कपडे बदलावेत तसे आपले जोडीदार बदलत असतात. पूर्वीही अनेक राजे/बादशहा बहुपत्नीत्व स्वीकारीत. काहींची कारकीर्द ‘अंगवस्त्र’ राखल्यानेच गाजली. ही झाली मोठ्यांची प्रकरणे. जनसामान्यांच्या तर चोरून चोरून कितीतरी भानगडी होत असतात. त्या ना नवऱ्याला समजतात ना बायकोला. घरचे तर या प्रकरणापासून अलिप्त असतात किंवा खुशाल डोळेझाक करतात. लग्नबंधन असा घट्ट धागा आहे की तुटता तुटत नाही किंवा त्याची गाठ सुटता सुटत नाही. समाज काय म्हणेल अशी भीती कायम घर करून राहते.म्हणून असे संबंध अंधारातच राहतात.
लिव्ह इन रिलेशनशिप सारखी संकल्पना त्यामुळेच भाव खाऊन जाते. नको ती बंधने अन् नको तो सामाजिक जाच असा विचार करून पुढील पिढी जर खुलेआम एकत्र राहू लागली तर ते उद्याच्या समाजाला स्वीकारावेच लागेल.
जिथे नैतिकताच नाही तिथे अनैतिकतेचा प्रश्न येईलच कसा? शरीर उपभोगण्याचा हा साधासोपा मार्ग उद्याची पिढी निवडणार नाही कशावरून? तेव्हा मग व्यभिचाराचा अर्थ कोण कोणाला पटवून देणार हा खरा सामाजिक प्रश्न असेल.
मुळात पाप-पुण्याच्या गोष्टी ही मानण्या न मानण्याची संकल्पना असल्याने किंवा तिला शास्त्रीय आधार नसल्याने किती महत्त्व द्यावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मुख्यत्वे ही संकल्पना धार्मिकतेशी जास्त करून जोडली जात असते. त्यामुळे पापभिरू लोकच तिचा डंका पिटताना दिसतात. बरेचसे लोक धार्मिकतेच्या नावाखाली ‘पापे’ करतांना (बुवाबाजी) रंगेहात सापडतात.
परंतु उपरोक्त उदाहरणे लक्षात घेता व्यभिचार किंवा बाहेरख्यालीपणा हा काही आपल्या घरापासून फार दूर राहिलेला नसल्याचे दिसून येते. आजच्या तणावपूर्ण जीवनशैलीत सुखाचा शिडकावा शोधणे, समाधानाचा आसरा पाहणे हा काही पापाचा नमुना ठरू शकत नाही. शरीराला आवश्यक असलेलं ते भोजन आहे. याला पाश्चात्य धोरण म्हणा किंवा लंपटपणा म्हणा आजच्या धावपळीच्या युगातील तो एक सुख समाधान प्राप्त करण्याचा मार्ग बनू पाहतो आहे.. इ. इ.
हे पचनी पडायला जरा अवघड वाटत असेल परंतु यात अल्पसे का होईना तथ्य आहे हे नक्की...
व्यभिचार- पाप आणि पुण्य???
गाभा:
प्रतिक्रिया
23 May 2010 - 5:01 pm | jaypal
वादग्रस्त विषयाला हात घातलात.

आता काही जण तुम्ही व्यभिचाराला पाठिबा/समर्थन देत आह्त असेही म्हणतील पण त्यानी तुम्ही म्हणता "ती" परीस्थीती बदलणार नाही. मी देखिल अशी कीती तरी जोडपी पाहीलेली आहेत की जी एकमेकांच्या वागण्याकडे (व्यभिचार हा शब्द मुद्दम टाळला आहे. तो मला नकारात्मक किंवा पुर्वग्र्हदुषित वाटतो) सोयीस्कर दुर्लक्ष करुन मजेत जगत आहेत.
खालील मुद्दे १०१ % पटले. आपले देव सुद्धा या गुंत्यात आडकले होते.(सत्यनाकारुन कस चलेल ?)
१. घरच्या व्यक्ती त्याची ख्याली खुशाली ओळखीत नाहीत म्हटल्यावर तो बाहेर डोकावणार हे ठरलेलेच...
२.जीवनात अन्न वस्त्र निवारा या मुलभूत गरजांबरोबरच मैथुन सुद्धा अत्यावश्यक असते. मनोलैगिंक व्यापारामध्ये या गोष्टीला खूप महत्त्व आहे.
३.व्यभिचार हाही एक आचारच! परंतु तो समाजमान्य नाही इतकेच.
४.मुळात पाप-पुण्याच्या गोष्टी ही मानण्या न मानण्याची संकल्पना असल्याने किंवा तिला शास्त्रीय आधार नसल्याने किती महत्त्व द्यावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
५.जीवनशैलीत सुखाचा शिडकावा शोधणे, समाधानाचा आसरा पाहणे हा काही पापाचा नमुना ठरू शकत नाही.
जरी हे सत्य अस्ल तरी पण आप्ल्यावर जन्मापासुन झालेले पाप/पुण्यचे संस्कार ते पटवुन घेत नाही. कळतय पण (मुद्दाम) वळत नाही किंवा झोपेचे सोंग घेतलेल्या माणसाला उठवायच कस ? असो.
निसर्ग दोनच नाती जाणतो नर आणि मादी. निसर्ग चक्र थाबणार नाही
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
24 May 2010 - 12:51 pm | टारझन
हाहाहा ... रोचक विषय आहे ;) बाही पाप-पुण्य हा एक चांगला कण्सेप्ट आपले पुर्वज देऊन गेलेत .. त्यामुळे आपली माणसं कंट्रोल मधे आहेत ;)
बाकी सब राजीखुषीचा मामला असेल तर ऑब्जेक्ट करण्यासारखं काही नाही ... पण चिटिंग फार घाणेरडी गोष्ट आहे ;)
बाकी चाण्स घ्यायला सगळे उत्सुक असतात , कोणाला चाण्स मिळतो , कोणाला मिळत नाही , कोणी प्रयत्न करत नाही , तर कोणी प्रयत्न करुन करुन फ्रस्ट्रेट होतो ;)
- टारझन
Virginity is not a dignity , Its a lack of an opportunity
24 May 2010 - 2:33 pm | मृगनयनी
तर कोणी प्रयत्न करुन करुन फ्रस्ट्रेट होतो
=)) =)) ह्या वाक्यामुळे (कुणाचे तरी प्रयत्न आठवून )डोळे अम्मळ पाणावले.... =)) =))
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
24 May 2010 - 2:41 pm | शैलेन्द्र
+१
24 May 2010 - 5:37 pm | छोटा डॉन
१००% सहमत.
ह्याहुन अधिक काही बोलण्यासारखे नाही.
विषय संपला !
------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
25 May 2010 - 7:31 am | मुक्तसुनीत
विवाहबाह्य संबंध आजचेच आहेत असा काहीसा सूर यात आहे. हे कितपत सत्याच्या जवळ जाणारे आहे ?
(हा प्रतिसाद मूळ लेखाला. )
1 Jun 2010 - 9:28 am | मिसळभोक्ता
मनीषा एक कॉलेज तरुणी अचानक एकाच्या तरुणाच्या मोहजालात फसली. अखेर तिला गर्भपात करून घ्यावा लागला.
वरील वाक्यातील "अचानक" ह्या शब्दाविषयी साशंक आहे.
मोहजालात फसणे, आणि गर्भपात "करून घ्यावा" लागणे, ह्या शब्दांवरून, मोहजालाचा अर्थ म्हणजे "संभोग" करणे असा होतो.
आता मनीषाने असा अचानक संभोग कसा केला बॉ ? मनीषा बहुधा काही विवक्षित द्रव्यांचा वापर करत होती, आणि त्यामुळे मनावर ताबा राहिला नाही, आणि संभोग केल्यानंतर तो "अचानक केला", असे तिला वाटले असणार.
दिवटे डाक्टर, अचानक संभोग कसा होतो, ते कृपया स्पष्ट करावे.
धन्यवाद.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
1 Jun 2010 - 9:11 pm | टारझन
आहो , अचाणक म्हणजे अचाणक ... आता बघा , ते पाणीपुरी खायला एखाद्या ठेल्यावर थांबले असतील, आणि अचाणक चौथ्या पुरीला त्यांच्या प्रेमाला पुर आला असेल :) आणि पुर आल्यावर पुरेपुर झालं असेल ... ह्या केस मधे अचानक संभोग संभवण्याची संभावणा दाट आहे , असे वाट्टे ,
- (तर्काशात्री) अचानक डॉन
2 Jun 2010 - 7:37 pm | मी-सौरभ
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
-----
सौरभ :)
23 May 2010 - 5:28 pm | राजेश घासकडवी
व्यभिचार या शब्दालाच एक काळी प्रतिमा आहे. तुमचे मुद्दे पूर्णपणे पटतात, पण मुळात 'विवाहबाह्य संबंध' असं म्हणून त्याला समाजात व्यभिचार म्हणून हिणवलं जातं असं म्हणणं जास्त उचित झालं असतं असं वाटलं. अर्थात हा थोडा गौण मुद्दा झाला.
नीतीमत्ता ही बऱ्याच वेळा लैंगिक जीवनावर, विशेषत: स्त्रियांच्या लैंगिक जीवनावर समाजाने घातलेली बंधनं, या स्वरूपात प्रकट होते. गुप्तरोग व नको असलेली गर्भधारणा टाळणं ही त्यामागची प्रमुख कारणं होती. (रा. धों. कर्वे यांनी स्त्रियांचं कामजीवन मुक्त व्हावं यासाठी गर्भप्रतिबंधकांचा प्रसार केला तो याच कारणांना शह देत) स्त्रियांना काहीच अधिकार नसल्याने या दोहोंची समाजाला विशेष गरज वाटत असे. (या भूमिकेमागे काही जैविक कारणांचा पायाही असू शकेल...) ही सर्वच कारणं हळुहळू खिळखिळी होत आहेत त्यामुळे विवाहव्यवस्था बदलली तर आश्चर्य वाटू नये.
राजेश
23 May 2010 - 6:12 pm | शुचि
लग्नामधे बरेचदा प्रेम रहातं बाजूला प्रेमाच्या नावाखाली - पझेसिव्हनेस, जेलसी, एकमेकांवर हावी होणे (डॉमिनेटींग), एकमेकांचा कॅलक्युलेटेड वापर याच गोष्टी बोकाळतात. रसिकपणा, प्रेम, हळूवारता, मैत्री, आपलेपणा हे निर्माणही होत नाहीत. मग अशावेळी लोढणं उगीच ओढत रहायचं का? बरं डिव्होर्स घेण्याची ही परिस्थिती नसते काही कारणांमुळे - आर्थिक म्हणा, सामाजीक म्हणा. पण डिव्होर्स घ्यायची इच्छा तर असते. आई-वडीलांचा आधार सुटलेला असतो. मानसिक स्थिती नाजूक असते अशा वेळी कोणी आवडलं तर त्यात कसलं आलय पाप-पुण्य?
पण हे सगळं एक प्रकारचं मृगजळ आहे हे खरं.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
23 May 2010 - 6:43 pm | वेताळ
पण इतका बदलु नये म्हणजे झाले
पुढे मागे मिपावर काम तृप्ती साठी जोडीदार हवा असा काथ्याकुट दिसला नाही म्हणजे मिळवले डाक्टर. (|:
वेताळ
23 May 2010 - 7:36 pm | डॉ.श्रीराम दिवटे
लंपटपणाचे उदात्तीकरण करण्याचा लेखाचा हेतू नाहीये. पुरुषांचं दुटप्पी वागणं, स्वतःच्या सुखासाठी पाप पुण्याची चौकट मोडतांना आपल्या स्त्री भोवती शालीनतेचं वर्तुळ आखणं, याचा पुरस्कार कशासाठी? तुम्ही पुरुष लोक जसे स्वच्छंद वागता तसे स्त्रियांनी वागल्यास त्यात गैर ते काय? असा सवाल मांडायचा आहे.
23 May 2010 - 8:16 pm | इन्द्र्राज पवार
"....आजच्या तणावपूर्ण जीवनशैलीत सुखाचा शिडकावा शोधणे, समाधानाचा आसरा पाहणे हा काही पापाचा नमुना ठरू शकत नाही. ....."
...असे मानणारे जे कोणी आहेत त्यातील एक जोडी मला माहित आहे....आणि या घटकेपर्यन्त एकमेकांना प्रत्यक्ष भेटून (तिच्या पतीच्यासमवेत असो... माहेर्/सासरच्या नातेवाईंकांच्या गर्दीत असो.... नोकरीच्या ठिकाणी असो ~ ती क्लास वन ऑफिसर आहे ~~ रिसर्च सेंटर असो....वा अगदी एकांतात असो...) देखील त्यांनी शरीरसंबंध येऊ दिलेला नाही. याला मी "वा... काय कंट्रोल केलाय..." असे अजिबात म्हणणार नाही....कारण जर का मनी 'ती' भावना जरी येत असली तरीदेखील एकप्रकारे "तो" भोग घेतला असेच मानावे लागेल... पण स्थिती अशी आहे की, ज्या कारणासाठी (लेखात डॉक्टरांनी म्हटल्यानुसार "जीवनशैलीत सुखाचा शिडकावा शोधणे, समाधानाचा आसरा पाहणे ...") ते दोघे एकत्र आले तेच कारण त्या दोघांना इतके समाधान देत आहे की, त्यापुढे अन्य संबंध दुय्यम ठरत आहेत.
अर्थात समाज (जो वैवाहिक चालिरिती आणि पवित्र परंपरेला मानतो...तो) त्या दोघांच्या अशा पध्द्तीच्या जीवनशैलीला रोखठोक (क्रूड...) भाषेत सरळसरळ "व्यभिचार"च म्हणणार.... कारण रात्री दहाअकरा वाजेपर्यंत लौकिक अर्थाने एक अत्यंत सुखीसमृध्द वैवाहिक जीवन जगणारी स्त्री एका अविवाहित युवकासमवेत फिरते ती काय "शेली/किट्स्/बायरन" यांच्या कवितावर चर्चा करत असते असे कुणीही मानणार नाही.
तरीदेखील त्या दोघांना या घडीला तर याची दखल घ्यावी असे वाटत नाही... कारण? त्यांच्या दृष्टीने.... (विशेषतः 'तिच्या..') ते करत असलेला व्यवहार हा व्यभिचार नसून उघड्या डोळ्यांनी स्वीकारलेला मध्यम मार्ग आहे... जो त्यांना निश्चितच, मर्यादित का होईना समाधान देत असेल.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
23 May 2010 - 8:33 pm | शिल्पा ब
हे "व्यभिचार" वगैरे प्रकार लग्न झालेल्या जोडप्यातच आढळतात...कारण सामाजिक चौकट...कधी कधी निर्णय चुकतो किंवा तसे वाटावे अशी परिस्थिती निर्माण होते...तेव्हा जर दुसरा कोणी जोडीदार भेटला तर काय हरकत आहे "त्या" नात्याला...बर्याचदा लग्न हे मुलांसाठीच टिकवले जाते...प्रेम बीम भानगडी खूप कमी काळ टिकतात...इथे कोणीही स्त्री वा पुरुष यांनी लंपटपणा करावा असे नाही....किंवा स्वच्छंद वागावे असे नाही तर प्रयत्न करूनही आपल्या जोडीदाराशी नाही पटले तर choice असावा...कारण काही अपवाद सोडले तर बहुतेकजण आपापल्या जोडीदाराशी एकनिष्ठ असतात...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
24 May 2010 - 7:14 am | बेसनलाडू
विभक्तीचा कायदेशीर 'चॉइस' उपलब्ध आहेच. निवडायचा की नाही, हे ज्याचे/जिचे त्याने/तिने ठरवायचे. हा वगळता तुम्हांला इतर कोणता चॉइस अपेक्षित आहे?
(निवडक)बेसनलाडू
24 May 2010 - 7:49 am | शिल्पा ब
घटस्फोटाने सगळेच संबंध तुटतात...जर फक्त दोघेच असतील तर हा पर्याय ठीक आहे...पण मुल असेल तर त्याचा विचार मुख्य असतो...त्याला आई आणि बाबा दोघांची गरज असते...अशा वेळी जर पटत नसेल (कोणत्याही कारणाने ) तर आपापला जोडीदार शोधावा, कोणाची फक्त भावनिक गरज असते तर कोणाची शारीरिक...कोणतीही असो...लेकराला समज येईपर्यंत एकत्र राहून या गोष्टींची काळजी घेता येत असेल तर काय हरकत आहे? जे काही करायचे ते विचार करून कारण सारखा सारखा जोडीदार बदलणे हे सुद्धा योग्य नाही.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
24 May 2010 - 8:00 am | बेसनलाडू
सारखा सारखा जोडीदार बदलणे हे सुद्धा योग्य नाही.
का बरे? समजा क्ष चे य शी पटत नाही. क्ष-य ना मूल आहे. क्ष ने भावनिक आणि/किंवा शारीरिक गरजांच्या पूर्ततेसाठी अ चा आधार घेतला. आता क्ष-य एकत्र राहतात मुलासाठी पण एकमेकांसाठी नाही. काही गरजांसाठी क्ष साठी अ आहे. पण काही गरजा अजूनही भागलेल्या नाहीत, ज्या ब कडून भागतील. मग क्ष चे संबंध (भावनिक आणि/किंवा शारीरिक आणि/किंवा सामाजिक) य, अ आणि ब शी आहेत. ही यादी गरजांनुरूप वाढेल/कमी होईल. मग गरजा भागवणे या मूळ उद्देशाच्या पूर्ततेसाठी अनेक जोडीदार लघु किंवा दीर्घ मुदतीसाठी आवश्यक असतील, तर सारखा सारखा जोडीदार बदलणे योग्य नाही, हे तुम्ही का म्हणता?
(जिज्ञासू)बेसनलाडू
24 May 2010 - 8:24 am | शिल्पा ब
लग्नानंतर लगेचच फारसे कोणी इतके टोकाला जात नाही...मधल्या काळात आपल्याला स्वतःचा अंदाज येतो कि आपण कोणत्या स्वभावाच्या व्यक्तीबरोबर राहू शकू...त्यानुसार जोडीदार निवडावा...तडजोड तर करावीच लागते कारण १००% मनासारखं (कोणाच्याच) होत नाही...सारखाच जोडीदार बदलायची गरज भासेल असं नाही...अर्थात सगळ्या गोष्टीना अपवाद असतातच...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
24 May 2010 - 1:18 pm | बेसनलाडू
माफ करा पण तुमचे म्हणणे मला मूलभूत दृष्ट्याच चुकीचे वाटते आहे. माझे म्हणणे आणि त्याचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे -
१. मुळात विवाहबाह्य संबंध ठेवण्याची तथाकथित गरज ही भावनिक आणि/किंवा शारीरिक समजू. सध्याच्या जगात तरी अशी गरज 'सामाजिक' असणे मला शक्य वाटत नाही. तसे असल्यास अशी गरज लग्नानंतर एक वर्षानी, पाच वर्षांनी की दहा वर्षांनी निर्माण होईल, या विचाराला काडीचाही अर्थ नाही. त्यामुळे तुम्ही म्हणताय तसे लग्नानंतर लगेचच कोणी टोकाला जात नाही, हे मला पटत नाही. आपल्या जोडीदाराचा अंदाज किती काळाने यावा, हे तुम्हीआम्ही ठरवणारे कोण? मला माझ्या जोडीदाराचा अंदाज वर्षाने काय आठेक महिन्यातच आला आणि मी ठरवले मी दुसरा जोडीदार पाहीन; आणि दुसर्या कोणाला असा अंदाज यायला दहा-बारा वर्षे लागली, आणि मग त्याने/तिने ठरवले की दुसरा जोडीदार निवडावा, तर त्यात तुमचे म्हणणे (मला) असे दिसते की माझी (पहिल्या व्यक्तीची) चूक आहे पण दुसरीची नाही (तुमचे असे म्हणणे नसेल, तर ते समजण्यात माझी चूक झाली आहे. माझा हा मुद्दा येथेच सोडून द्यावा). कारण पहिली व्यक्ती लग्नानंतर 'लगेचच' टोकाला गेली. तर दुसरी व्यक्ती बरेच वर्षांनी. आता कोणाला आपल्या जोडीदाराचा अंदाज किती 'लवकर' यावा, हे तुम्हीआम्ही ठरवू शकत नाही. अशी कित्येक उदाहरणे आहेत ज्यात लग्नानंतर 'लगेचच' - पक्षी काही महिन्यातच - विवाहसंबंध संपुष्टात आले.
२. आता असा जो काही अंदाज आलाय, त्याला जोडून तुमचा तडजोडीचा मुद्दा घेऊ. केवळ तडजोड म्हणून किंवा आपल्या सध्याच्या जोडीदाराला वेळ देण्याच्या दृष्टीने सध्याचे विवाहसंबंध 'रेटणे' श्रेयस्कर का मानले जाऊ नये? प्रयत्नांती जर यश आलेच नाही, तर विवाहबंधनात अडकून न राहता कायदेशीररित्या विभक्त का होऊ नये? विवाहबाह्य संबंध हे विवाहसंबंध संपुष्टात आणण्याचे साधन असण्यालाच माझा तीव्र आक्षेप आहे. जर विवाहसंस्थेनेच आणि कायद्यानेच 'जाचक' - पक्षी 'आउट ऑफ कम्पल्शन' किंवा 'ऑब्लिगेटरी/मॅन्डेटरी' पण मनाला न पटणारे, जीव न रमणारे, सहन न होणारे इ. इ. इ. - वाटणारे विवाहसंबंध संपुष्टात आणण्याची तरतूद करून ठेवली आहे, तर तिचा वापर न करण्याचे एक तरी सयुक्तिक कारण देता येईल का? किंवा असे न करता विवाहबाह्य संबंध ठेवून, त्या माध्यमातून सध्याचे विवाहसंबंध संपुष्टात आणण्याची गरज काय, हे सांगू शकाल काय? समाजात होणारी बेअब्रू इ. कारणे देण्यात हशील नाही, कारण विवाहबाह्य संबंध येनकेनप्रकारेण उघडकीस आल्यावर ती व्हायची आहेच. त्यामुळे कायद्याने, सन्मानाने विभक्त होणे आणि विवाहबाह्य संबंध ठेवून कायदेशीररित्या नाही तर मनाने, परस्परसंमतीने विभक्त होणे या दोन्हीला असणारी 'सोशल टाबू' म्हणून असलेली किंमत कमीजास्त नसावी, असे वाटते. चू.भू.द्या.घ्या. झालेच तर 'घटस्फोट घेतल्यास वडील जायदाद से बेदखल कर देंगे' वगैरे फिल्मी कारणे असतील, तर मग बोलणेच खुंटले. आणि असे जरी असले, तरी वडील वगैरे जे कोणी असतील, त्यांच्या पश्चात कायद्याने, सन्मानाने विभक्त होण्याचा मार्ग असतोच की!
तडजोड छोट्यात छोट्या गोष्टीपासून ते मोठ्यात मोठ्या गोष्टींत कधी ना कधी करावी लागतेच. तडजोड मीच का करायची, अशा परिस्थितीत आल्यावर विभक्तीच्या दिशेने वाटचाल चालू होते, असे वाटते. अशी परिस्थिती येण्याला ना नाही, पण स्वतःचे आयुष्य, जोडीदाराचे आयुष्य, मुले असल्यास त्यांचे आयुष्य (पक्षी विवाहसंबंध संपुष्टात आल्यानंतर त्यांच्यावर होणारे मानसिक, सामाजिक इ. स्वरूपाचे परिणाम) यांच्यातील तौलनिक अभ्यासातून विभक्त होणे श्रेयस्कर की सततची तडजोड चालू ठेवणे श्रेयस्कर याचा निर्णय व्यक्तिगत असावा, असे वाटते. मुद्दा इतकाच की काही काळापर्यंत तडजोड केली, पण आता शक्य नाही आणि म्हणूनच विभक्त व्हायचे आहे, इथवर मनाची तयारी झाली असेल, तर त्यासाठी विवाहबाह्य संबंधांचे माध्यम साधन म्हणून वापरू नये. वापरायचे असेल तर का याचे सयुक्तिक स्पष्टीकरण द्यावे. 'तुम्ही विचारणारे कोण', 'मेरी मर्जी' अशा उत्तरांना आक्षेप नाही; मात्र अशी उत्तरे या प्रकाराचे समर्थन करण्यास किती तोकडी पडतात, याचा जरूर विचार करावा.
अवांतर -
१. संख्याशास्त्रीय किंवा मानसशास्त्रदृष्ट्या काय प्रकाशात आले आहे, याची कल्पना नाही; मात्र किती विवाहबाह्य संबंध हे मानसिक आधार वगैरे गरजांतून निर्माण होतात आणि किती शारीरिक - पक्षी लैंगिक - गरजांतून निर्माण होतात, हे पाहणे रोचक ठरेल. सध्याच्या भारतीय जनमानसात अशा संबंधांकडे लैंगिक दृष्टिकोनातून अधिक पाहिले जात असावे, जो काही 'सोशल टाबू' त्यांना चिकटतो तो याच कारणामुळे असावा नि त्याच गरजेतून ते निर्माण होत असावेत, असे वाटते. चू. भू. द्या. घ्या. मानसिक आधाराच्या, भावनिक गरजांमधून निर्माण झालेले विवाहबाह्य संबंध अशी गरज संपल्यावर नष्ट होऊन क्षणभंगुर, अल्पजीवी किंवा तात्कालिक का ठरत नाहीत? की अशी गरज कधी संपतच नाही? आणि ती तशी संपत नसेल, तर मग कायदेशीर विभक्ती पत्करण्यात अडचण ती काय?
२. शारीरिक जवळीक आणि मानसिक जवळीक एकमेकांत किती घट्ट गुंफल्या आहेत, हे पाहणेही रोचक ठरावे. मनाने अतिशय जवळ असणार्यांसाठी शारीरिक जवळीक सर्वाधिक आनंददायी ठरते, असे अनेक नामांकित सेक्सॉलॉजिस्टही छातीठोकपणे सांगत असतात. याउलट केवळ शारीरिक सुखासाठी अल्पकाळ एकत्र येणार्यांमध्ये भावनिक जवळीक निर्माण झालेली असण्याची शक्यता कमीच असावी, असे वाटते. एखाद्या व्यक्तीशी दीर्घकालीन भावनिक जवळीक शारीरिक संबंधांच्या माध्यमातून चालू होत असेलसे वाटत नाही. मात्र पराकोटीची भावनिक गुंतवणूक आपसूक शरीरसुखाच्या वाटेवर नेऊन सोडण्यास प्रत्यवाय नसावा, असे वाटते.
(सुखलोलूप)बेसनलाडू
24 May 2010 - 9:05 am | पंगा
... लगता है कि हम और आप काफ़ी पुराने ख़यालात वाले लोग हैं| ज़माना काफ़ी तेज़ी से बदल रहा है|
यावरून "आपली शिरापुरी खाऊनसुद्धा शिल्लक ठेवण्याची" (संदर्भः मारी आंत्वानेत आणि इतिहासाचे मराठी पाठ्यपुस्तक) आठवण झाली.
- पंडित गागाभट्ट
24 May 2010 - 9:18 am | पंगा
ही शुद्ध सोयिस्कर पळवाटवजा मखलाशी आहे. "मुलाला आई आणि बाबा दोघांचीही गरज असते" वगैरे तितकेसे खरे नाही. म्हणजे असल्यास उत्तमच, पण नसल्याने फार बिघडते अशातला भाग नाही. आणि कधीकधी कौटुंबिक वातावरण फारच खराब असले, तर आईबापांपैकी वातावरण खराब करणारा/री पालक असण्यापेक्षा नसलेला/ली बरा/री, अशीही परिस्थिती होऊ शकते. अशा परिस्थितीत मुलाला घेऊन विभक्त होऊन स्वतंत्रपणे आणि यशस्वीपणे, मुलावर कोणताही दूरगामी आघात वगैरे होऊ न देता, वाढवणार्या "एकट्या पालकां"चीही उदाहरणे पाहिलेली आहेत.
दुसरी गोष्ट म्हणजे, समजा घरचे वातावरण मुलाला घातक ठरण्याइतकेही दूषित नसले, आणि म्हणून मुलाची "मानसिक गरज" असलेले आई आणि बाबा दोघेही "संसारात" असले, तरी "मला मम्मा आणि पप्पा दोघेही आहेत, आणि पप्पाची गर्लफ्रेंड / मम्माचा बॉयफ्रेंडसुद्धा आहे" हे मुलाची "मानसिक गरज" थोडी जास्तच पुरवते असे वाटत नाही काय?
तिसरे म्हणजे, जर मुलाच्या "मानसिक गरजे"साठी पप्पाला आणि मम्माला जर "कमिटेड" राहणे (म्हणजे एका घरात आणि कागदोपत्री संसारात) राहणे गरजेचे वाटत असेल, तर त्यापेक्षा मग हे लग्न मोडून पप्पा आपल्या गर्लफ्रेंडबरोबर (किंवा मम्मा आपल्या बॉयफ्रेंडबरोबर) लग्न करून (किंवा लग्न न करता एकत्र राहून) मुलाला आपल्या जवळ ठेवून जबाबदारीने का बरे वाढवू शकत नाहीत? मुलाला जर मम्मा आणि पप्पा दोघांचीही ओढ असेल, तर ते मूल नेहमी मम्माबरोबर राहत असेल तर पप्पाकडे (किंवा नेहमी पप्पाबरोबर राहत असेल तर मम्माकडे) काही दिवस भेटायलाराहायला का जाऊ शकणार नाही? जे मूल पप्पाच्या गर्लफ्रेंडचा (किंवा मम्माच्या बॉयफ्रेंडचा) स्वीकार करू शकते, ते "टेंपररी व्हिजिटेशन" स्वीकारू शकणार नाही का? मुलाच्या "मानसिक गरजे"चा विचार करताना मुळात "मम्मा असताना पप्पाची गर्लफ्रेंड/पप्पा असताना मम्माचा बॉयफ्रेंड" हा प्रकार मुलावर लादण्यापूर्वी त्याची मते विचारात घेतली होती काय? नसल्यास मग विभक्त होण्या-न होण्याचा विचार करतानाच का त्याची आठवण व्हावी?
का यामागचे खरे कारण काही वेगळेच आहे? पप्पाची गर्लफ्रेंड / मम्माचा बॉयफ्रेंड लग्न करण्याइतकी/का "कमिटेड" (किंवा विश्वासार्ह) नाहीये का? आयत्या मुलाची जबाबदारी स्वीकारण्याची तिची/त्याची इच्छा नाहीये का? तसे असल्यास तसे स्पष्टपणे का म्हणू नये? उगाच "मुलाच्या मानसिक गरजां"चे कारण का पुढे करावे?
माझ्या मते यत्किंचितही प्रेमाशिवाय विवाहात (किंवा कोणत्याही नात्यात) अडकून राहणे हा व्यभिचार आहे. प्रेमाने प्रश्न आपापसात सोडवण्याचा शक्य तोवर प्रयत्न करावा, शक्य नसल्यास किंवा प्रेम उरले नसल्यास बाहेर पडावे. मुलाची एवढीच काळजी असल्यास मुलाला घेऊन बाहेर पडावे आणि स्वतःच्या धमकीवर आणि स्वतःच्या जबाबदारीवर वाढवावे. एकदा बाहेर पडल्यावर आणि दुसरा (गरजा पुरवू शकणारा आणि मुलाची जबाबदारी घेऊ इच्छिणारा) जोडीदार उपलब्ध असल्यास त्या जोडीदाराबरोबर वाटले तर विवाहबंधनात पडावे किंवा वाटले तर विवाहबंधनाशिवायही राहावे, किंवा वाटले तर जोडीदार न शोधता एकटे राहावे आणि मुलाला स्वतःच्या हिमतीवर मोठे करावे. तो ज्याचात्याचा / जिचातिचा प्रश्न. मात्र "दोन्ही दरडींवर हात ठेवणे" या प्रकाराबद्दल यत्किंचितही आदर नाही.
- पंडित गागाभट्ट
24 May 2010 - 6:26 pm | कवितानागेश
माझ्या मते यत्किंचितही प्रेमाशिवाय विवाहात (किंवा कोणत्याही नात्यात) अडकून राहणे हा व्यभिचार आहे.
>>>>>
योग्य विचार!
मूळात लग्न करतानाच नीट ओळख झाली, तर नन्तर संसार सुरळीत चालतो!
स्वप्नळू वयात लग्न करुच नये, म्हणजे नेम चुकत नाही, आणी दुसरे 'टार्गेट' शोधायची वेळ येत नाही!
============
माउ
24 May 2010 - 7:58 am | पंगा
शब्द-न-शब्दाशी सहमत.
- पंडित गागाभट्ट
24 May 2010 - 1:31 am | शैलेन्द्र
छान विषय..
"लवचिक अंतर जरी निरंतर,हळवे आपुले नाते ख़ास,
जवळ येईना दूर जाईना, तरी सुखावे खोटा भास.
भासामागे धावत जाता, मनात हीरवळ पायी आग,
बेधुंदित ना दाह जाणवे, स्वप्नी राहो नकोच जाग!"
24 May 2010 - 6:58 am | डॉ.श्रीराम दिवटे
अपवादच आता पदोपदी आढळू लागले आहेत. अर्थात त्या नजरेतून पाहिले तरच खरे सत्य जाणता येते. दोन्ही दगडांवर हात ठेऊन चालणारे अनेक नवरे/बायका आढळतील.
24 May 2010 - 7:35 am | धनंजय
रोचक चर्चा काळजीपूर्वक वाचत आहे.
("रोचक" शब्द नेहमीच्या/सामान्य अर्थानेच वपरलेला आहे.)
24 May 2010 - 7:43 am | स्पंदना
डॉक्टर +१
व्यभिचार ठरवणारे कोण? बर् याच वेळा एकमेकाशी कुठेही ताळेबन्द नसलेली जोडपी मनात शल्य ठेवत जगत रहातात. जगरहाटी...समाज धारणा आणि दोन्ही कडील वडिल धारे या सारया ..मला नक्की मराठी त सान्गता येइना...dominant factors ..ना न दुखवता ही एक प्रकारची तडजोड ...जी मुख्यत्वे..स्वतःशी केली जाते.......म्हणा. जोडीदार अगदीच भावनिक वा शारिरिक सहवासास कमी पडत असेल ( some body has said ...if once in a week meets altarnate days person ..assuers a disaster...) हेच तत्व मनाच्या भावनिक गरजेला ही लागु होत. जोडप्यान्च बन्धन वा एक मेकाशी गुम्फण ही वेग वेगळ्या पातळीवर ..बॅलन्स.. होत रहाते. कधी कामाच्या नावाखाली स्त्री त्याला नाकारते तर नुसत 'ह्यॅ' म्हणुन उडवुन लावत पुरुष नाकरतो.....अश्या वेळी चौकट राखत स्वतः थोड त्रूप्त होण्...मी तरी व्यभिचार मानत नाही...
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
24 May 2010 - 7:56 am | पंगा
जर इंग्रजीत लिहायचेच असेल, तर मेहेरबानी करून जरा बर्या इंग्रजीत लिहिणे जमत असल्यास बघता येईल काय? वर दिलेल्या वाक्यात स्पेलिंगच्या आणि व्याकरणाच्या पदोपदी झालेल्या चुका तर सोडाच, पण त्यातून काही अर्थबोधही होत नाही हो! लई डोस्केफोड करून पाहिली, पण कायबी सुधरले न्हाई बगा! (काय मिसळपाववाल्यांनु, मी म्हणतो ती बात सच्ची की न्हाई?)
बाकी मराठीबद्दल तर काही बोलायलाच नको. यापुढे याहून बरी मराठी वाचायला मिळण्याची अपेक्षा कधीच सोडून दिलेली आहे.
- पंडित गागाभट्ट.
24 May 2010 - 8:12 am | Manoj Katwe
some body has said ...if once in a week meets altarnate days person ..assuers a disaster...
aparna akshay यांना नम्र विनंती, कृपया ह्याचा व्यवस्थित मराठी अर्थ सांगावा. मी डोकं फोडून फोडून बेजार झालो आहे.
24 May 2010 - 9:53 am | स्पंदना
स्पेल्लिन्ग गडबडीत जरी ( फक्त alternate) चुकल असल तरी ( वर जाउन ऑप्शन निवडे पर्यन्त काय लिहायच ते डोक्यातुन जात) अर्थ ....प्रत्येकाची मानसिक वा शरिरिक भुक वेगळी असु शकते...थोडीफार तफावत चालवुन घेता येते...पण जी व्यक्ती once in a week या शारिरिक गरजेची आहे त्या व्यक्ती ची altarnate days person शी जर गाठ बान्धली गेली तर दोन्ही कडे असन्तोषा शिवाय काहिही दिसणार नाही. सेम वे ... एकत्र रहाण्याच्या वेगवेग्ळ्या सन्कल्पना असणार्या दोन व्यक्ती ही अश्याच सफर होत रहातात. उदा. काहिही सुन्दर वाचल की ते शेअर करावस वाटणार्या व्यक्तीला जर फक्त नावपुरती भाषा माहीत अस्णारा जोडीदार मिळाला तर त्याने वा तिने मनाची ही बाजु कोणत्या तर्हेने सन्तुष्ट करावी?
अश्याविषयान वर बोलताना जी विचार करण्याची प्रोसेस असते त्यात आणि मराठी टाईप करताना होणारा गोन्धळ
या दोन्ही मुळे थोडी फार चुक होउ शकते...विचार नवा आहे काय म्हनायच आहे हे कळल नसे ल तर बोलत बोलत सान्गायला आवडेल
बाय द वे मिस्टर पन्गा...वाक्यात फक्त एक स्पेल्लिन्ग चुक होती...व्याकरणात नव्हती.. इन्ग्लिश बद्दल फार बोलु नका. इट हॅज बिन पुट राइटलि.इट दिनोटस थॉटस; द वे इट हॅज बिन पुट.
ऑफ्कोर्स तुमच नाव च भान्डखोर आहे नाही का?
व्यक्ती समोर दिसत नाही म्हणुन बोलताना ताळ नका सोडु....बट दोज आर मॅनर्स.........
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
24 May 2010 - 10:48 am | पंगा
- alternate
- assures
- somebody (एक शब्द. दोन शब्द नव्हेत.)
- एकंदरीत, व्याकरणशुद्ध वाक्य काहीसे असे झाले असते:
As somebody has said, "If a once-in-a-week person meets an alternate-days person, it assures a disaster."
किंवा:
As somebody has said, "If a once-in-a-week person meets an alternate-days person, a disaster is assured."
पण हे वर जे काही लिहिलेले आहे, ते केवळ भयंकर आहे. ('मोकलाया दाहि दिशा'पेक्षासुद्धा!)
बाकी अर्थबोधाबद्दल बोलायचे झाले, तर खाली दिवटेसाहेबांच्या प्रतिसादात दिल्याप्रमाणे त्यांना समजलेला अर्थ आणि तुम्हाला अभिप्रेत असलेला अर्थ यांच्यातली तफावत पाहिली, तर यातून कितपत अर्थबोध होऊ शकतो, याचा अंदाज यावा.
ठीक आहे, नाही बोलत. बोलून काही उपयोग नाहीच आहे म्हणा!
डिट्टो.
कोकाटेसर इंग्रजीबरोबर मॅनर्ससुद्धा फाडायला शिकवू लागले काय हल्ली? =))
- पंडित गागाभट्ट.
25 May 2010 - 3:57 am | रामपुरी
कोकाटेसर इंग्रजीबरोबर मॅनर्ससुद्धा फाडायला शिकवू लागले काय हल्ली?
=)) =))
अहो पंडित, त्यांना जरा मराठी वर्डस् रिमेंबर करायला डिफिकल्ट जात आहे. का उगीच त्यांना खिजवताय? कुठेतरी परदेशी रहात असतील.
25 May 2010 - 8:43 am | गोगोल
राह्यलो ना राव.
24 May 2010 - 12:47 pm | शैलेन्द्र
"some body has said ...if once in a week meets alternate days person ..assures a disaster..."
अतिशय खरं वाक्य...
लग्नात इतर सगंळ ठरवलं जात, पण सगळ्यातं महत्वाच्या या मुद्दावर चर्चा होतच नाही, ब्लड ग्रूप मॅचच्या पुढे जायची वेळ आली आहे, कारण जर आपण ही गोष्ट बोललो नाही तर जी लग्न पुर्वी समाजाच्या भितीने टिकायची ती आता एकतर टीकणार नाही किंवा सतत संशयाच्या भोवर्यात राहतील.
24 May 2010 - 1:40 pm | बेसनलाडू
अश्या वेळी चौकट राखत स्वतः थोड त्रूप्त होण्...मी तरी व्यभिचार मानत नाही...
यावरून काही प्रश्न पडले आहेत. याची उत्तरे तुम्हाला देता येत नसतील, तर कृपया ज्यांना माहीत असतील त्यांनी द्यावीत किंवा अशा ज्ञानस्त्रोतांचे दुवे द्यावेत.
१. तृप्त = भावनिक दृष्ट्या की शारीरिक दृष्ट्या?
२. शरीरसंबंधांतून मिळणारे सुख अनुभवण्यासाठी विवाहबंधनात अडकायची गरज आहे का? माझ्या मते नसावी.
३. नसल्यास काही कारणांमुळे (कौटुंबिक दबाव इ.) विवाहबंधनात अडकायची पाळी आलीच आणि वैवाहिक जोडीदाराकडून अपेक्षित शरीरसुख मिळाले नाही, तर असे सुख मिळवण्यासाठी वेश्यागमन श्रेयस्कर की विवाहबाह्य संबंध ठेवणे श्रेयस्कर? सामाजिकदृष्ट्या? भावनिकदृष्ट्या? झालंच तर आर्थिकदृष्ट्या?
४. वेश्यागमनातून अपेक्षित भावनिक ओलावा मिळत नसेल, तर विवाहबाह्य संबंधांकडे पर्याय म्हणून पहावे का? विवाहबाह्य संबंधांतून भावनिक आणि शारीरिक दोन्ही अपूर्ण गरजांची पूर्तता अपेक्षित असते की दोहोंपैकी एकाच गरजेची? दोन्हीची असल्यास एकाच विवाहबाह्य जोडीदाराकडून ती तशी होते की शारीरिक गरजांच्या पूर्ततेसाठी एक किंवा अनेक आणि भावनिक गरजांच्या पूर्ततेसाठी एक किंवा अनेक जोडीदार निवडावेत?
५. गिवन अ चॉइस, कायदेशीर विभक्ती श्रेयस्कर की विवाहबाह्य संबंध ठेवून सध्याचे विवाहसंबंध रेटून गपगुमान जगणे श्रेयस्कर?
६. जोडीदारकडून असलेल्या शरीरसुखाबद्दलच्या अपेक्षांची पूर्तता होत नाही, हे जोडीदाराला सांगावे
की नाही? मला वाटते सांगावे. आपली शरीरसुखाबद्दलची स्वप्ने (फॅन्टसीज) आणि जोडीदाराकडून अपेक्षित असलेला प्रतिसाद (रिस्पॉन्स), त्या स्वप्नांच्या पूर्ततेत जोडीदाराचा सहभाग (पार्टिसिपेशन) हे सगळे जोडीदारासोबत वाटून घ्यावे की नाही? माझ्या मते घ्यावे. हे सगळे झाल्यावरही जोडीदार त्या अपेक्षा पूर्ण करू न शकल्यास ते सबळ कारण पुढे करून विभक्तीचा प्रस्ताव जोडीदारापुढे मांडावा की नाही? माझ्यामते मांडावा. जोडीदार सुजाण असेल, तर तो ताणून, अडवून धरायचा नाही, असे वाटते. चू. भू. द्या. घ्या.
७. चौकट राखत तृप्त होण्यामधली चौकट म्हणजे नेमके काय? मांजराने डोळे मिटून दूध पिणे किंवा तेरी भी चुप मेरी भी चुप स्वरूपाचे काहीतरी का? चौकटीचा अर्थ नेमका समजला तर पुढचे प्रश्न विचारणे, अनेक प्रश्नांची उत्तरे शोधणे, इतर जाणकारांना विचारणे इ. मध्ये मदत होईलसे वाटते. अशा तृप्तीमधून तुम्हांला मिळणार्या आनंदात जोडीदाराने, मुलांनी (अपत्यांनी) वाटेकरी व्हावे की नाही? किंवा यातून त्यांना तसेच इतर कुणी संबंधितांना होणार्या मानसिक क्लेषाची, गेलाबाजार सामाजिक बेअब्रूची जबाबदारी विवाहबाह्य संबंध ठेवणार्या व्यक्तीने स्वीकारावी की नाही? नसल्यास का नाही?
या प्रश्नांची साधकबाधक, समाधानकारक चर्चा झाल्यास, उत्तरे मिळाल्यास त्या अनुषंगाने पुढील प्रश्नोत्तरे, चर्चा इत्यादी इत्यादी..
(चर्चेकरी)बेसनलाडू
24 May 2010 - 9:33 am | डॉ.श्रीराम दिवटे
चवी-चवीने खावं असं त्यांना म्हणायचं असावं.
आठवड्यातून एकदा साजरा होणारा उत्सव जर दिवसाआड घडू लागला तर त्याची जत्रा होईल, त्याच त्याच स्पर्शाँचा वीट येईल, नाविन्य उरणार नाही. असं सांगायचं असावं त्यांना.!
24 May 2010 - 10:03 am | स्पंदना
नाही प्रत्येक व्यक्ती वेगळी असते पण हे वेगळे पण टोकाच असेल तर्र् दिझास्टर.....असा अर्थ आहे..
डॉक्टर इथ लम्पट ( अनुस्वार कसा द्यायचा हो?) आणि व्यभिचार यान्ची गल्लत झालीय अस नाही का वाटत तुम्हाला? माझ्या मते व्यभिचारात दोन्ही बाजु समाविष्ट असतात . आणि लम्पट म्हणजे जे येता जाता धक्के मारतात ..ज्याना फक्त ..कस लिहायच्?म्हणजे दुसरी व्यक्ती दुखावली जाते त्या सेक्स्चुअल वर्तनाला लम्पट म्हणता येइल का?
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
24 May 2010 - 10:22 am | इन्द्र्राज पवार
"...( अनुस्वार कसा द्यायचा हो?) ...
"लम्पट" हा शब्द "लंपट" असा टाईप करण्यासाठी खालील कीज् वापरा :
स्मॉल एल्+ए+ शिफ्ट एम = लं
तसेच एका ओळी तुम्ही "बर्यापैकी.." हा शब्द घेतला आहे... त्यातील "र" साठी खालील :
स्मॉल बी+ए+शिफ्ट आर+वाय्+ए = बर्या
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
24 May 2010 - 10:30 am | स्पंदना
थॅन्क्स इन्द्राजदा!!
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
24 May 2010 - 12:23 pm | llपुण्याचे पेशवेll
वाहवा. रंगतदार चर्चा आहे. भारतीय विवाहसंस्थेतला आर्षकाळ परत बघायला मिळणार तर.
(आर्षकाळ गमनोत्सुक)पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix
24 May 2010 - 1:29 pm | परिकथेतील राजकुमार
वा वा वा !
शुद्धलेखन आणी व्याकरणावरची चर्चा आवडली.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
24 May 2010 - 2:03 pm | इन्द्र्राज पवार
श्री. बेसनलाडू यांच्या अभ्यासपूर्ण विवेचनातील शेवटची दोन वाक्ये :
१. एखाद्या व्यक्तीशी दीर्घकालीन भावनिक जवळीक शारीरिक संबंधांच्या माध्यमातून चालू होत असेलसे वाटत नाही.
~~ या विचाराशी सहमत, कारण जवळकीचे कारण शारीरिक संबंध असेल तर त्यामध्ये "भावनिक संबंध" दुय्यम ठरतात आणि कालांतराने शारीरिक ओढही क्षीण होत जाते.
२. मात्र पराकोटीची भावनिक गुंतवणूक आपसूक शरीरसुखाच्या वाटेवर नेऊन सोडण्यास प्रत्यवाय नसावा, असे वाटते.
~~ नाही. इथे सहमत होणे कठीण वाटते. भावनिक गुंतवणुकीचे कारण जर शरीरसुख नसेल तर या "आपसूक" फ्लॅगला काय अर्थ? तसेच "ती" दोघे त्यांच्या विवाहबाह्य संबंधाला "तो" अर्थ आणणार नसतील तर मग शरीरसुखाकडेच अंती ती वाट जाते (किंवा सोडावी...) असे म्हणणे धाडसाचे ठरेल.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
24 May 2010 - 2:09 pm | बेसनलाडू
आपसूक म्हणण्यातून मला जे म्हणायचे आहे ते हे -
भावनिक जवळीक तीव्र असेल - किंवा सोप्या शब्दात सांगायचे झाले तर परस्परांवर अपार प्रेम असेल, एकमेकांबद्दल आदर असेल आणि एकमेकांत सुसंवाद असेल - तर शरीरसंबंध ही त्या भावनिक गुंतवणुकीची अभिव्यक्ती आहे. आणि ती अभिव्यक्ती घडून येणे सोपे (आपसूक म्हणजे हेच!) आहे, विशेष श्रम न घेता होणारी अशी ती अभिव्यक्ती आहे. 'मनात बरेच काही आहे, पण सांगता येत नाही' अशी अवस्था शरीरसंबंधांच्या बाबतीत व्हायची नाही. आणि तसे झाले, तर शरीरसुखापासून वंचित किंवा अतृप्त राहण्याची पाळी यायची नाही. चू. भू. द्या. घ्या.
कदाचित मी आपसूक हा चुकीचा शब्द वापरल्याने गैरसमज झाला असावा. क्षमस्व.
(स्पष्टीकारक)बेसनलाडू
24 May 2010 - 4:15 pm | मनीषा
पाप, पुण्य , नीती , अनिती या शब्दांचे अर्थ फार सोयीस्कर रित्या लावले जातात. आपल्या मुलीचे मित्र खुशाल स्विकारणारे आई-वडिल सुनेच्या मित्राकडे, अथवा तिच्या संपर्कात येणार्या प्रत्येक पुरुषाकडे संशयाने बघतात.
अनेक वेळा स्त्री , पुरुष चारित्र्य संपन्न असतात कारण त्यांचे चारित्र्य अथवा नैतिकता कसाला लागेल असे काही त्यांच्या आयुष्यात घडलेच नसते.
व्याभिचार या शब्दाची व्याख्या सुद्धा फक्त "विवाहबाह्य शारिरीक संबंध " इतकीच मर्यादित स्वरुपात केली जाते. मला वाटतं व्याभिचार मानसिक सुद्धा असू शकतो. कुठल्याही अनोळखी स्त्री ला पाहून अतिशय असभ्य, घृणास्पद भाषेत बोलणे, गर्दीचा किंवा स्त्रीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेणे हा ब्याभिचार नाही का?
अशा अनेक व्यक्ती असतील कि ते आपल्या जोडीदाराशी एकनिष्ठ असतील कारण केवळ समाजाची भिती अथवा न मिळालेली संधी ...
पण दोन विवाहित व्यक्तिंमधे मैत्री किंवा त्यापेक्षा वेगळं असं भावनिक नातं असेल तर तो व्याभिचार म्हणायचा का?
काही वेळा पति पत्निंमधे काही कारणांनी तणाव असतो, किंवा त्यांची मतं, आवडी निवडी वेगळ्या असतात, काही वेळा आपल्या जोडीदाराला गृहीत धरले जाते , ल्ग्नाआधी आणी लग्नांनतरच्या काळात जेव्हढे एकमेकांना महत्व दिले जाते ते थोडे कमी होते, त्याचे कारण प्रेम कमी असणे किंवा तिरस्कार अथवा नावड नसून अतिपरिचयात अवज्ञा असे असते, किंवा जबाबदार्या वाढल्याने दोघांनाही एकेमेकांसाठी पुरेसा वेळ नसतो आणी तो मुद्दाम द्यावा अशी गरजही वाटत नाही , अशावेळेला कोणाबद्दल आकर्षण वाटू शकते.. पण म्हणुन याला कोणी विवाहबाह्य संबंधाचे लेबल लावू नये असे वाटते.
24 May 2010 - 6:18 pm | चित्रा
कुठल्याही अनोळखी स्त्री ला पाहून अतिशय असभ्य, घृणास्पद भाषेत बोलणे, गर्दीचा किंवा स्त्रीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेणे हा ब्याभिचार नाही का?
मला वाटते थोडी गल्लत होते आहे. हा चर्चेचा विषय नाही. असे धक्के मारणारे लोक हे गैरफायदा घेत आहेत. तेथे एकनिष्ठतेचा प्रश्नच येत नाही.
अशा अनेक व्यक्ती असतील कि ते आपल्या जोडीदाराशी एकनिष्ठ असतील कारण केवळ समाजाची भिती अथवा न मिळालेली संधी ...
एकनिष्ठता ही मानसिक आणि शारिरीक पातळीवर दोन्हीवर असली पाहिजे. संधी मिळाली नाही म्हणूनच केवळ इतर कोणाशी संबंध न ठेवू शकलेले लोक हे एकनिष्ठ म्हणता येणार नाहीत.
पण दोन विवाहित व्यक्तिंमधे मैत्री किंवा त्यापेक्षा वेगळं असं भावनिक नातं असेल तर तो व्याभिचार म्हणायचा का?
असे नसावे. पण भावनिक पातळीवर नवर्याला किंवा पत्नीला खात्री असणे की आपली पत्नी/नवरा हे आपल्यात जसे आणि जेवढे मन:पूर्वक गुंतलेले आहेत,- तसे कोणा तिसर्या बाहेरच्या व्यक्तीत गुंतलेले नाहीत, हे महत्त्वाचे वाटत असू शकते. तसे नसल्यास तो व्यभिचार कदाचित म्हणता येणार नाही, पण एकमेकांपासून मनाने दूर होण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे असे समजता येईल असे वाटते.
24 May 2010 - 6:44 pm | कवितानागेश
मला वाटते, मुळातच, काहीतरी गफलत होतेय..
लग्न करून मिळालेला जोडीदार हा आपल्या वेगवेगळ्या भुका भागवण्यासाठी वापरण्याची वस्तू आहे, असा समज कुठून आला?
सेक्स कडे 'sharing' म्हणून ना बघता, 'need', म्हणून बघितल्याने हे घोळ निर्माण झालेत असे वाटते.
============
माउ
25 May 2010 - 8:47 am | गोगोल
खरचं?
24 May 2010 - 7:55 pm | स्पंदना
लग्न संस्था ही मुळात स्त्री पुरुष संबंधावर आधारित आहे. नाहीतर आपण ज्या त्या वयात लग्न झाल पाहिजे असा आग्रह का धरतो?मुळात शारिरिक भुक भागविण्यासाठी समाजाने दिलेली मान्यता म्हणजे लग्न. आता प्रश्न असा आहे की समाजासमोर स्विकारलेला जोडीदार आपल्या इच्छा आकांक्षा पुरवु शकत नसेल तर काय?
एक उदाहरण देते. डोळ्यासमोर घडलेल. बाजुच्या घरातल एक लग्न बंधित जोडप. या घरातली स्त्री मला कळायला लागल्या पासुन कायम आजारी. खोकत खंगत कशी बशी घर कामे आवरणारी. पण कधी भांडण तंटा नाही. घरात एक सासु, नणंद आणि तश्याही अवस्थेत झालेली तिन मुले. खुप वर्षानंतर मुल मोठी झाल्यावर या ग्रुहस्ताचे एका धडधा़कट बाई बरोबर संबंध सुरु झाले. त्या बाईला अॅक्चुअली एक मुलगा झाला. तरीही या घरात या गोष्टी वरुन असा वाद झाल्याचे ऐकिवात सुद्धा नाही. एक दोन वर्षात या ग्रुहस्ताने आत्महत्या केली . कारण माहिती नाही. दोन वर्षापुर्वी गावी गेले आणि जन्मभर आजारी त्या स्त्री ला मी पहिल्यांदा आरोग्यवान पाहिली. अगदी धडधाकट. काय जाणवते? फरफट. दोघांचीही. अगदी त्यातला एक जण मरेपर्यंत.
वरील अनेक वेळा स्त्री , पुरुष चारित्र्य संपन्न असतात कारण त्यांचे चारित्र्य अथवा नैतिकता कसाला लागेल असे काही त्यांच्या आयुष्यात घडलेच नसते.हे मनिषा चे वाक्य हेच दर्शवुन जाते.
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
24 May 2010 - 9:03 pm | टारझन
बहुतेक ह्या माणसाला मी ओळखतोय म्हणजे ... तो एड्स ने खपला होता :)
आमच्या घरापासुन वायव्येकडे काही फर्लांगावर , पिंपळाच्या झाडाखाली त्याचे घर होते.
25 May 2010 - 7:01 am | स्पंदना
नाही रे बाळा.. एडस नव्हता झाला त्याला...मी सांगते ना...आणि पिंपळा जवळ नाही रे माझ्या घराशेजारी रहायचा. आता तु मला मुंजा समजत असशील तर गोष्ट वेगळी...
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
25 May 2010 - 11:18 am | टारझन
बाळा हा शब्द हृदयाला भिडला मौषी :)
अरे बापरे ? :ऑ :ऑ :ऑ =)) =)) =)) =))
आहो मी "बहुतेक" हा शब्द वापरला आहे , कळावे.
का म्हणे ? आहो होतंच आमच्या घराच्या वायव्येला एक पिंपळाचं झाड , त्याचा अर्थ तुम्ही "मुंजा" कशा ? आणि मुंजा तर मेल असतो ना ?
- बाळा गबाळा
24 May 2010 - 9:55 pm | नितिन थत्ते
>>मुळात शारिरिक भुक भागविण्यासाठी समाजाने दिलेली मान्यता म्हणजे लग्न.
शारीरिक भूक भागवणे हा लग्न संस्थेचा दुय्यम हेतू आहे. त्यासाठी लग्नसंस्थेची आवश्यकता समाज मानीत नाही. एकमेकाविषयी असणारे प्रेम वगैरे साहित्यिक गोष्टी समाजाच्या खिजगणतीत नसतात.
लग्नसंस्थेचा खरा उद्देश मालमत्तेचा वारसा हक्क कोणत्या व्यक्तींकडे जाऊ शकेल आणि कोणत्या व्यक्तींकडे जाऊ शकणार नाही याचा निर्णय करणे हाच आहे.
इतर कोणत्याही गोष्टींसाठी समाज लग्न हे आवश्यक मानीत नाही.
व्याभिचारास समाजाचा विरोध असण्याचे कारण मालमत्तेचा वारस ठरवण्याच्या कामात या संबंधामुळे अडथळा निर्माण होतो.
नितिन थत्ते
1 Jun 2010 - 11:08 am | Manoj Katwe
माला ह्या लेखाचि आठ्वन झालि.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=731...
24 May 2010 - 8:45 pm | तिमा
नैतिकता = संधीचा अभाव
या एका व्याख्येतच सर्व काही आले.
24 May 2010 - 9:43 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
व्याख्या अमान्य! अर्थात एका व्यक्तीला संधी "दिसेल" तर कदाचित दुसरीला ती "समजणारच" नाही!
बेसनलाडूंचे प्रतिसाद पटले/आवडले.
अदिती
25 May 2010 - 1:20 pm | तिमा
समस्त स्त्री वर्गाची या व्याख्येसंदर्भात माफी मागतो. ही व्याख्या फक्त पुरुषांनाच (तेही बहुतांशी) लागू आहे.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
24 May 2010 - 9:40 pm | शिल्पा ब
"संधी" मिळूनसुद्धा आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक राहणारे लोक आहेत...अर्थात आपली व्याख्या अमान्य.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
24 May 2010 - 9:57 pm | शिल्पा ब
इथे लग्न हे फक्त शारीरिक भूक भागविन्यासाठीच आहे असा सूर येत आहे....विवाहबाह्यसंबंध हे सहसा मानसिक गरजेतून निर्माण होतात...साथीदाराचे आपल्याकडे लक्ष नाही, अपमानकारक वागणूक देणे अशा वेळेस हे संबंध शक्यतो येतात...जर कोणी व्यक्ती फक्त शारीरिक गरजेसाठीच असे संबंध ठेवत असेल तर ते पूर्णपणे चुकीचे आहे...जरी आपल्या fantasy प्रमाणे साथीदाराचे "वागणे " नसेल तरी केवळ त्या कारणासाठी कोणी आपला संसार उधळेल असे वाटत नाही...म्हणजे शारीरिक संबंध आहेत पण ते त्या व्यक्तीच्या fantasy प्रमाणे नाहीत असे गृहीत धरले आहे...
ज्यावेळी शारीरिक आणि मानसिक, भावनिक घुसमट होते तेव्हा असे संबंध निर्माण होण्याची शक्यता असते. अशा वेळेस पती-पत्नी या नात्यात आधीच दुरावा असतो, विश्वास नसतो.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
24 May 2010 - 11:01 pm | बेसनलाडू
जर कोणी व्यक्ती फक्त शारीरिक गरजेसाठीच असे संबंध ठेवत असेल तर ते पूर्णपणे चुकीचे आहे.
का बरे? ती सुद्धा एक प्रकारची गरजच नाही का? शारीरिक गरज ही भावनिक गरजेपेक्षा कमी महत्त्वाची का आणि कशी? अशी गरज वैवाहिक संबंधांतून भागत नसेल, तर भुकेल्या व्यक्तीची भावनिक घुसमट व्हायची नाही, तिला मानसिक क्लेष व्हायचे नाहीत, असे तुम्हाला वाटते का? भावनिक वि. शारीरिक अशा फरकावर आधारीत विवाहबाह्य संबंधांचे समर्थन करता येऊ शकते किंवा आले पाहिजे, असे तुम्हाला वाटते का? तसे असल्यास अर्थातच ते चुकीचे आहे. तुमच्या म्हणण्याचा अर्थ असा व्यक्त होतोय की भावनिक गरजेतून निर्माण होणारे विवाहबाह्य संबंध समाजमान्य व्हावेत, शारीरिक गरजेतून होणारे नाहीत. असो.
माझ्या मागील एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे शारीरिक संबंध आणि भावनिक जवळीक यांची बव्हंशी घट्ट वीण असते. त्यामुळे विवाहबाह्य संबंधांची "गरज" भावनिक, शारीरिक किंवा दोन्ही स्वरूपाची असू शकते. आणि माझा मूलभूत विरोध अशा संबंधांकडे गरजेचे निमित्त करून वैवाहिक संबंध संपुष्टात आणायचे सोद्देश साधन म्हणून बघण्याकडे आहे.
(गरजू)बेसनलाडू
24 May 2010 - 11:08 pm | टारझन
बिंगो ...
-(सहमत) गरजलाडू
24 May 2010 - 11:15 pm | शिल्पा ब
माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे कि भावनिक गरज फाट्यावर मारून फक्त शरीरसुखासाठी कोणी असे संबंध ठेवत असेल तर ते चुकिचे...म्हणजे इथे जरी आपल्या fantasy प्रमाणे साथीदाराचे "वागणे " नसेल तरी केवळ त्या कारणासाठी कोणी आपला संसार उधळेल असे वाटत नाही...म्हणजे शारीरिक संबंध आहेत पण ते त्या व्यक्तीच्या fantasy प्रमाणे नाहीत असे गृहीत धरले आहे... शारीरिक संबंध आणि भावनिक जवळीक यांची बव्हंशी घट्ट वीण असते. त्यामुळे विवाहबाह्य संबंधांची "गरज" भावनिक, शारीरिक किंवा दोन्ही स्वरूपाची असू शकते. - सहमत.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
24 May 2010 - 11:30 pm | बेसनलाडू
तुमचे म्हणणे समजले. पण केवळ शारीरिक गरजेपोटी ठेवलेले संबंध चूक का आणि कसे याचे सयुक्तिक, पटण्याजोगे कारण तुम्ही अजूनही दिलेले नाहीत. त्यामुळे ते चूक मानण्याशी मी असहमत आहे.
(असहमत)बेसनलाडू
24 May 2010 - 11:52 pm | शिल्पा ब
घरी मिळत असून बाहेर बदलाकरता जातात हे चूक असे माझे म्हणणे आहे...कारण हा विश्वासघात करणे आहे असे मला वाटते...तरीही याच करणे दोघेही बाहेर जातात आणि त्यांचे एकमेकांशी संबंध चांगले आहेत अशी जोडपी (भारतीय आणि भारतात राहत असलेली ) मला माहिती आहेत...अशा वेळेस आपण का नाक खुपसायचे ...जेव्हा केवळ भावनिक गरज असते तेव्हा ती मैत्री या सदरात मोडते पण मनावर ताबा नसेल शारीरिक संबंधसुद्धा येऊ शकतात,त्याला विवाहबाह्य नाते म्हणू...या बाबतीत अजून फारसे मला काही लिहिता येईल असे सध्यातरी वाटत नाही...तुमचे अभ्यासपूर्ण प्रतिसाद वाचत आहे...बाकी लोकांना जे करायचे ते करणारच, चोरून किंवा उघड...आपल्या चर्चेने काय फरक पडणार आहे? :D
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
25 May 2010 - 12:01 am | टारझन
=)) आहो , पण ह्या ब्रम्हज्ञानाची प्राप्ती जर मराठी संस्थळावरच्यांना झाली , तर संस्थळं ओस पडतील हो ;)
बाय द वे ह्या प्रकारच्या चर्चेला "वांझोटी चर्चा" असा संस्थळीय शब्द प्रचलित आहे :)
-चर्चिल
25 May 2010 - 12:05 am | शिल्पा ब
मस्तच टारबा!!! =)) =)) =)) =))
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
25 May 2010 - 8:37 am | llपुण्याचे पेशवेll
टारूशी सहमत. ज्याला शेण खायचंय तो खाणारंच त्याला आपल्या चर्चेने काय फरक पडतो?
जसं
मनीषा एक कॉलेज तरुणी अचानक एकाच्या तरुणाच्या मोहजालात फसली. अखेर तिला गर्भपात करून घ्यावा लागला. अन् दुसऱ्याच कोणाशीतरी तिचे लग्न लावून देण्यात आले! त्यानंतरही पूर्वीचा आशिक तिला भेटतो, तीही त्याची वाट पाहते.. हे कुणाच्याही लक्षात न येत चालूच आहे...
आता या उदाहरणात तिच्या आशिकाने तिची फसवणूक केली आहे हे लेखक उघडपणे म्हणतो. आणि तरीही परत ती मुलगी तिच्या आशिकाशी परत संबंध ठेवते. म्हणजे तिच्याशी लग्नं करणार्याची तिने फसवणूकच केली नाही का? मग त्याचे समर्थन कसे होऊ शकते?
कदाचित साईझ मॅटर्स असेल. पण तरीही ही फसवणूकच आहे.
त्यामुळे पापभिरू लोकच तिचा डंका पिटताना दिसतात
ही तर साधीच गोष्ट आहे. ते लोक ते पाप करत नाहीत म्हणूनच तसे करू नका असा डंका पिटणार ना. तसे नसले तर लोक त्याला 'आपण हसे लोकाला अन् शेंबूड आपल्या नाकाला' असे नाही का म्हणणार?
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix
25 May 2010 - 7:13 am | स्पंदना
बे. ला. शी सहमत. ईस्टेटी साठी तुम्ही दत्तक विधी करु शकता!! विवाह हा समाजाच्या नैतिक मुल्यांवर आधारित शरिर संबंधांसाठी प्रस्थापित केला गेला आहे.
एक वेगळा द्रुष्टीकोण....९८ माणस धडधाकट आहेत. उरलेली दोन अपंग्....काय करता तुम्ही? अपंगांसाठी सोय्...पण हेच अपंगत्व जर ९८ विवाहात नाही म्हणुन उरलेले दोन विवाह तसेच फरफटावयाचे...???
इथे व्यभिचार (कुणी फोड करेल का या शब्दाची? ) हा चान्स मारु लोकांसाठी मी चर्चीत नाही आहे. घरात सर्व सुख असेल तर बाहेर जाणारी व्यक्ती कायमच दोषी असेल पण कारण मिमांसा न करता जर फक्त ...व्वाईट्टच ....या द्रुष्टी न तुम्ही पहात असाल तर .. ते न्याय्य नाही.
विवाहाला फक्त शारिरिक सुख म्हणुन न बघता...म्हणनारे ...शारिरिक सुखाशिवाय विवाह बंधनात आहेत अस म्हणायच का?
वर मनिषा न जे म्हंटलय ते १००% खर आहे. त्या परिस्थीतीला सामोरे जावे लागणार्या व्यक्तीला हा निकष लागु पडतो जिथे तीचा कस लागतो. साधारणतः सर्व साधारण व्यक्ती समाजाचे कायदे कानुन उल्लंघुन नविन काही करताना दिसत नाही पण अचानक आपण ज्याला काल पर्वा पर्यंत एक चांगली व्यक्ती म्हणुन ओळखत असतो तिलातिची ही बाजु समोर आल्यावर ,कलुषीत नजरेने पहाण्या आधी किंवा तेव्हढ्या एका निकषावर मुल्य मापन करण्या आधी.....आम्ही फक्त त्यांच्या कडे बघायचा द्रुष्टी कोण बदलायचा यत्न करतो आहोत. नाही तरी कुठल्याच समाजात हा विषय उघड उघड बोलला जात नाही.
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
24 May 2010 - 11:33 pm | अविनाशकुलकर्णी
समलिंगी संबंधा मधे व्यभिचार असतो का? व असेल तर त्याला व्यभिचार मानायचा का?
24 May 2010 - 11:35 pm | पंगा
नसण्याचे किंवा न मानण्याचे तत्त्वतः काही कारण दिसत नाही.
अनुभवींनी खुलासा करावा.
- पंडित गागाभट्ट
24 May 2010 - 11:39 pm | टारझन
व्वा !! बायक्युरियस दिसता साहेब =))
25 May 2010 - 12:09 am | आवशीचो घोव्
:lol:
25 May 2010 - 12:09 am | आवशीचो घोव्
:lol:
24 May 2010 - 11:55 pm | कवितानागेश
जी गोष्ट आत्यंतिक भावनिक जवळीकीची, शारीरिक अभिव्यक्ती असते, तिला केवळ शारीरिक गरज समजणे चूकीचे आहे.
============
माउ
25 May 2010 - 6:56 am | स्पंदना
बे. ला. शी सहमत. ईस्टेटी साठी तुम्ही दत्तक विधी करु शकता!! विवाह हा समाजाच्या नैतिक मुल्यांवर आधारित शरिर संबंधांसाठी प्रस्थापित केला गेला आहे.
एक वेगळा द्रुष्टीकोण....९८ माणस धडधाकट आहेत. उरलेली दोन अपंग्....काय करता तुम्ही? अपंगांसाठी सोय्...पण हेच अपंगत्व जर ९८ विवाहात नाही म्हणुन उरलेले दोन विवाह तसेच फरफटावयाचे...???
इथे व्यभिचार (कुणी फोड करेल का या शब्दाची? ) हा चान्स मारु लोकांसाठी मी चर्चीत नाही आहे. घरात सर्व सुख असेल तर बाहेर जाणारी व्यक्ती कायमच दोषी असेल पण कारण मिमांसा न करता जर फक्त ...व्वाईट्टच ....या द्रुष्टी न तुम्ही पहात असाल तर .. ते न्याय्य नाही.
विवाहाला फक्त शारिरिक सुख म्हणुन न बघता...म्हणनारे ...शारिरिक सुखाशिवाय विवाह बंधनात आहेत अस म्हणायच का?
वर मनिषा न जे म्हंटलय ते १००% खर आहे. त्या परिस्थीतीला सामोरे जावे लागणार्या व्यक्तीला हा निकष लागु पडतो जिथे तीचा कस लागतो. साधारणतः सर्व साधारण व्यक्ती समाजाचे कायदे कानुन उल्लंघुन नविन काही करताना दिसत नाही पण अचानक आपण ज्याला काल पर्वा पर्यंत एक चांगली व्यक्ती म्हणुन ओळखत असतो तिलातिची ही बाजु समोर आल्यावर ,कलुषीत नजरेने पहाण्या आधी किंवा तेव्हढ्या एका निकषावर मुल्य मापन करण्या आधी.....आम्ही फक्त त्यांच्या कडे बघायचा द्रुष्टी कोण बदलायचा यत्न करतो आहोत. नाही तरी कुठल्याच समाजात हा विषय उघड उघड बोलला जात नाही.
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
25 May 2010 - 2:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विवाह हा समाजाच्या नैतिक मुल्यांवर आधारित शरिर संबंधांसाठी प्रस्थापित केला गेला आहे.
करेक्ट...!
अमर्यादित व स्वैर वर्तन सामाजिक हिताला घातक ठरते. म्हणून सामाजात काही मूल्ये, नीती तत्त्व, सामाजिक नियमने आदिंची व्यवस्था सामाजिक संस्था करीत असतात. विवाहसंस्थेंच्या उद्देशापैकी व्यक्तीच्या अफाट कामवासनेवर नियंत्रण ठेवण्याचाही उद्देश असावा. स्त्री-पुरुषांच्या वैषयिक संबंधावर नियंत्रण ही समाजाच्या दृष्टीने आवश्यक बाब होती. आणि म्हणूनच विवाह म्हणजे 'वैषयिक संबंध' प्रस्थापित करण्याचा समाजमान्य मार्ग म्हटल्या जातो.
बाकी, चर्चा चांगली चालू आहे. लगे रहो.
-दिलीप बिरुटे
25 May 2010 - 9:41 am | डॉ.श्रीराम दिवटे
चर्चेत सर्वाँनीच(पुरुष/स्त्रियांनी) हिरीरीने सहभाग घेऊन या गहन विषयावर मुद्देसुद विवेचन केले त्याबद्दल आभार!
25 May 2010 - 1:40 pm | वैदेहीजी
एक मुलगी .... जन्मापासूनच आर्थिक सुबत्ता असूनही विक्षिप्त वादळामुळे अनेक सामान्य सुखानही पारखी झालेली . शाळे पासूनच घराच्या बंदिवासा मुले जवळचे कोणीही मित्रं मैत्रीण नाही . सतत सावटाखाली जगल्यामुळे कोणाशी बोलण्याचा आत्म विश्वास नसलेली . कोलेज मध्ये घाबरून राहणारी
पण आईच्या मजबूत पाठींब्या मुले योग्य ते शिक्षण घेतल्यावर नोकरीच्या रूपाने नवीन पंख लाभलेली ती. नंतर मात्र ४० -५० लोका समोर हि आत्मविश्वासा ने बोलू शकणारी उत्तरो उतार प्रगतीच करत जाणारी ती . तिच्या सकारात्मक दृष्टी कोनाने तिच्या मित्र परिवार ची मोठी होत जाणारी जाणारी यादी. "छु लो सितारो को अब दूर नाही ही मंझील " गाण्याचा शब्द शब्द जीवनात जगणारी ती .
आता तिला गरज वाटू लागते आपल्या विचाराशी जुळणार्या , मनावर लहान पणापासून झालेल्या असंख्य जखमा वर मायेची फुंकर घाला णार्या साथीदाराची . तिला वाटते ओढ स्व कष्टाने प्रतिकूल परिस्थितही ठामपणे उभे राहिलेल्या पायांना कधी थकले तर कोणाच्या तरी प्रेमळ बाहुमाध्य विश्वासाने विसावण्याची. बाकी काही अपेक्षा हि नसते पोकळ डाम डौलाची किंवा विलासाची ... त्यातला भंपक पणा अमुभावाला असतो जन्मा पासूनच
पण तसे कोणी मिळ न्याआधीच आई च्या इच्छे नुसार केलेलं लग्न ... नवीन नात.... एक जीवनाला किनारा मिळवून देणारा जीवनसाथी ... ती हरखून जाते आता पर्यंत साठ वून ठेवलेले सगळे प्रेम या व्यक्ती वर उधळून टाकण्याची तिने तयारी केलेली . पण कोणाचा तरी आधार शोधात असलेली ती आपणच त्याचा आधार बनते . अरे हा पण माझ्या सारखा च ! चला याचे हि आयुष्य आपल्या सारखे घडवू या ... ती जीव तोडून प्रयत्न करत राहते . पण तो काहीशा अंतर राखून दूर राहतो . निसर्ग नियमाने दोघे शरीराने एकत्र येतात २ वर्षांनी मुलगी हि होते पण मनाने ते दुरावत जातात . लोकार्थाने ते उत्तम वैवाहिक जीवना जगात असतात तो हि आपल्या जगामध्ये आनंदी असतो. त्याला गरज असेल तेव्हा "बायको" मिळत असते ती च्या मानसिक परिस्थितीची त्याचे काही देणे घेणे नसते
ती एकटी पडत जाते . लग्ना आधी जेवढी एकटी असते त्यापक्षा किती तरी पटीने जास्त . मुलगी मोठी होत असते. परिस्थिती च्या उलट सुलट थपडा नि बेजार झालेली ती ३ वर्षांनी पुन्हा भानावर येते . पुन्हा सुरु होतो परीस्थीतीवर मात करण्याचा संघर्ष . पण यावेळी असते मुलीलाही घडवण्याची जिद्द . पुन्हा एकदा नोकरीच्या रूपाने नशीब अजमाव याचा प्रयत्न . ... कलायटस ... पैसे ...बँक अकौंट मध्ये भर ..... ती स्वत:ला बुडवून घेते मग मन गुंतवण्यासाठी बाहेर पिकनिक ... फिरणे ... अशाच फिरण्या मधून कधी तरी जन्माला आलेली निखळ मैत्री ... त्याच्या नजरेतून वेळो वेळी झळकणारी आत्मीयता ... तिने न सांगता जीवाच्या आकांताने केलेली मदत ... तिच्या बाळाची त्याच्या नजरेतून सतत व्यक्त होणारी काळजी ... तिची लहान सहान टेन्शन्स हि मोठ्या जबाब दारी ने दूर करण्याची त्याने केलेली प्रयत्नांची पराका ष्ठा .
तो हि तसाच .... परिस्थिती नुसार आत मधून दगड होत गेलेला .. पण माणूस कीचा झरा जिवंत ठेवणारा पण "खरा खुरा" माणूस . 15 वर्षांच्या वैवाहिक आयुष्यात "शरीरिक सुख आणि मुले जन्माला घालणे " एवढेच असलेले नाते .....रोज रात्री "नकोसे संबंध" डिमांड करणारी त्याची बायको
आणि आता त्यांची स्वत च्या वैवाहिक आयुष्यात हि ना होवू शकलेली मानसिक जवळीक . त्याने तिने एक मेकांकडे मोकळे केलेलं मन. आणि अशाच एका अलगद क्षणी खांद्यावर डोक ठेवून मन मुक्त रडताना एकमेकांचे होवून गेलेले ते दोन जीव ...
या नात्याला तुम्ही काय म्हणाल ??
रानफुल
31 May 2010 - 6:18 am | Pain
उत्तरः व्यभिचार (अपुर्या माहिती आणि व्याख्येनुसार)
तुमची मैत्रिण असल्याने तिची बाजू कळली. "त्या" च्या बाजूचे काय ?
तिची आणि त्या उतारवयातील माणसाची मैत्री निखळ वाटत नाही.
[ त्याला ती हवी होती, नवर्याला अगोदरच मिळालेली होती.
Of course दोघांच्या वागण्यात फरक असणार ;) ]
पहिल प्रेम, स्वप्नातला जोडीदार वगैरे गोष्टी चित्रपट, कथा कादंबर्यातून सतत मारा केल्याने हव्याहव्याशा वाटतात. वास्तव जग वेगळे असते.
25 May 2010 - 1:58 pm | Dipankar
हि कुठल्या चित्रपटाची कथा आहे?
आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो
25 May 2010 - 3:27 pm | वैदेहीजी
हि आमच्या ट्रेन मधल्या ग्रुप मधिल मैत्रीणिच्या आयुष्यात घडलेली खरीखुरी घटना आहे
रानफुल