अविनाशराव तुम्ही बरचं काही लिहु शकता असे मला नेहमी वाटते,पण तुम्ही एक ओळींचेच धागे काढता याचे नवल वाटते...
तुमचे अनुभव्,तुम्ही केलेला एकादा आठवणीत राहणारा प्रवास्...यावर लिहा की जरा...
हे मी तुमच्या खव मधे लिहणार होतो...पण पुन्हा हा एक ओळीचा धागा आला आहे म्हणुन हे इथेच लिहतो.
उगाच एका ओळीच्या धाग्यावर टवाळी करुन तुम्हाला दुखावणे मला आवडणार नाही आता...बघा जरा विचार करुन्... ही विनंती आहे तुम्हाला...
मदनबाण.....
Hi IQ doesn't guarantee Happiness & Success in Life.
धन्यवाद सुचनेबद्दल..व मी तश्या कविता व लेख हि लिहिले आहे ..मान्य... प्रमाण थोडे कमी असेल..पण काहि प्रश्णांची ताकद व जिव एका ओळिइतकाच मर्यादित असतो..व तो प्रष्ण खरच छळत असतो अश्या वेळी काय करावे समजत नाहि...एखाद्या प्रष्णाचे उत्तर जर खरेच हवे असेल तर कसे लिहावे कळत नाहि...सदर घागा उडवण्यास माझि काहिच हरकत नाहि....
पूर्वीचे सुधारक हे समाजासाठी झटत होते. आपल्याप्रमाणेच समाजानेही रुढींचे ओझे दूर करुन डोळस व्हावे असे त्यांना मनापासून वाटे. पुरोगामी हे स्वतः प्रगत विचारांचे असतील पण समाजासाठी काही करतीलच असे नाही. त्यातून काही तथाकथित पुरोगामी तर तावातावाने अंधश्रध्देविरुध्द बोलतील पण स्वतचे घर घेताना वास्तुशास्त्राचा आधार घेतील आणि घरी सत्यनारायणसुध्दा घालतील.
पुरोगामी...! 22 May 2010 - 8:54 pm | इन्द्र्राज पवार
"....तथाकथित पुरोगामी तर तावातावाने अंधश्रध्देविरुध्द बोलतील पण स्वतचे घर घेताना वास्तुशास्त्राचा आधार घेतील आणि घरी सत्यनारायणसुध्दा घालतील...."
होय. ही बाब इतकी सत्य आहे की, इथे कोल्हापूरातदेखील अगदी विद्यापीठ माध्यमातून (रितसर मानधन, प्रवासखर्च, रजा घेऊन...) गावोगावी "अंधश्रध्दे" विरूद्ध रान उटवून, नियतकालिकातून कुलगुरूंच्या समवेत फोटो काढून स्वतःला पुरोगाम्यांचा पुढारी म्हणवणारा हा गब्रू एकदा आम्हा मित्रांना अचानक रविवारच्या बाजारात लगबगीने खरेदी करताना "रेड हँड" सापडला. आम्हा तिघांना पाहून तो थोडा चपापलादेखील. त्यामुळे आम्ही त्याच्या हातातच असलेल्या उघड्या बॅगेत पाहिले तर वर्तमानपत्रात गुंडाळी केलेली "काळी बाहुली". उपनगरात बंगल्याचे बांधकाम चालू होते व दोन दिवसात स्लॅब पडणार होता. इतपर ठीक होते, पण ..."पूजेच्या वेळी "गुरुजी"नी सांगीतले म्हणून बांधकामावर लावण्यासाठी मी ही बाहुली घेतली हो...तसा माझा काय विश्वास नाही असल्या गोष्टीवर, पण आई म्हणाली... कशाला गुरुजीना दुखवायचे...हॅ हॅ हॅ..."
आणि आमच्या चेहर्याकडे पाहून वर... "पण मी एकच दिवस लावणार आहे हं ... लगेच काढुन टाकणार आहे.....चलू या !"
असले हे सरड्यासारखे झरझर रंग बदलणारे "पुरोगामी" विचारवंत !
------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
प्रतिक्रिया
21 May 2010 - 9:23 pm | मदनबाण
अविनाशराव तुम्ही बरचं काही लिहु शकता असे मला नेहमी वाटते,पण तुम्ही एक ओळींचेच धागे काढता याचे नवल वाटते...
तुमचे अनुभव्,तुम्ही केलेला एकादा आठवणीत राहणारा प्रवास्...यावर लिहा की जरा...
हे मी तुमच्या खव मधे लिहणार होतो...पण पुन्हा हा एक ओळीचा धागा आला आहे म्हणुन हे इथेच लिहतो.
उगाच एका ओळीच्या धाग्यावर टवाळी करुन तुम्हाला दुखावणे मला आवडणार नाही आता...बघा जरा विचार करुन्... ही विनंती आहे तुम्हाला...
मदनबाण.....
Hi IQ doesn't guarantee Happiness & Success in Life.
21 May 2010 - 10:12 pm | अविनाशकुलकर्णी
धन्यवाद सुचनेबद्दल..व मी तश्या कविता व लेख हि लिहिले आहे ..मान्य... प्रमाण थोडे कमी असेल..पण काहि प्रश्णांची ताकद व जिव एका ओळिइतकाच मर्यादित असतो..व तो प्रष्ण खरच छळत असतो अश्या वेळी काय करावे समजत नाहि...एखाद्या प्रष्णाचे उत्तर जर खरेच हवे असेल तर कसे लिहावे कळत नाहि...सदर घागा उडवण्यास माझि काहिच हरकत नाहि....
22 May 2010 - 2:31 am | मिसळभोक्ता
हा आमचा टॉम्या. ह्याला ब्याकवर्ड कोण आणि फारवर्ड कोण (दोन्ही ड पूर्ण) सगळे कळते.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
22 May 2010 - 2:09 pm | हेरंब
पूर्वीचे सुधारक हे समाजासाठी झटत होते. आपल्याप्रमाणेच समाजानेही रुढींचे ओझे दूर करुन डोळस व्हावे असे त्यांना मनापासून वाटे. पुरोगामी हे स्वतः प्रगत विचारांचे असतील पण समाजासाठी काही करतीलच असे नाही. त्यातून काही तथाकथित पुरोगामी तर तावातावाने अंधश्रध्देविरुध्द बोलतील पण स्वतचे घर घेताना वास्तुशास्त्राचा आधार घेतील आणि घरी सत्यनारायणसुध्दा घालतील.
22 May 2010 - 8:54 pm | इन्द्र्राज पवार
"....तथाकथित पुरोगामी तर तावातावाने अंधश्रध्देविरुध्द बोलतील पण स्वतचे घर घेताना वास्तुशास्त्राचा आधार घेतील आणि घरी सत्यनारायणसुध्दा घालतील...."
होय. ही बाब इतकी सत्य आहे की, इथे कोल्हापूरातदेखील अगदी विद्यापीठ माध्यमातून (रितसर मानधन, प्रवासखर्च, रजा घेऊन...) गावोगावी "अंधश्रध्दे" विरूद्ध रान उटवून, नियतकालिकातून कुलगुरूंच्या समवेत फोटो काढून स्वतःला पुरोगाम्यांचा पुढारी म्हणवणारा हा गब्रू एकदा आम्हा मित्रांना अचानक रविवारच्या बाजारात लगबगीने खरेदी करताना "रेड हँड" सापडला. आम्हा तिघांना पाहून तो थोडा चपापलादेखील. त्यामुळे आम्ही त्याच्या हातातच असलेल्या उघड्या बॅगेत पाहिले तर वर्तमानपत्रात गुंडाळी केलेली "काळी बाहुली". उपनगरात बंगल्याचे बांधकाम चालू होते व दोन दिवसात स्लॅब पडणार होता. इतपर ठीक होते, पण ..."पूजेच्या वेळी "गुरुजी"नी सांगीतले म्हणून बांधकामावर लावण्यासाठी मी ही बाहुली घेतली हो...तसा माझा काय विश्वास नाही असल्या गोष्टीवर, पण आई म्हणाली... कशाला गुरुजीना दुखवायचे...हॅ हॅ हॅ..."
आणि आमच्या चेहर्याकडे पाहून वर... "पण मी एकच दिवस लावणार आहे हं ... लगेच काढुन टाकणार आहे.....चलू या !"
असले हे सरड्यासारखे झरझर रंग बदलणारे "पुरोगामी" विचारवंत !
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
22 May 2010 - 9:19 pm | फटू
काही तथाकथित पुरोगामी तर तावातावाने अंधश्रध्देविरुध्द बोलतील पण स्वतचे घर घेताना वास्तुशास्त्राचा आधार घेतील आणि घरी सत्यनारायणसुध्दा घालतील.
लोका सांगे ब्रम्ह्ज्ञान, स्वत: कोरडे पाषाण असाच प्रकार असतो हा.
- फटू