कृत्रिम जिवाणू

मराठे's picture
मराठे in जनातलं, मनातलं
21 May 2010 - 1:00 am

आजच्या मुख्य बातम्यांमधे ह्या बातमीनं माझं लक्ष वेधून घेतलं... थोडं आणखी वाचल्यावर ह्या शोधाने बरीच खळबळ माजवली असल्याचं जाणवलं. डॉ. क्रेग वेन्टर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली जवळ जवळ १५ वर्ष हा प्रयोग चालू होता.
ह्याविषयावर शास्त्रीय आणी अशास्त्रीय वर्तुळात बरीच चर्चा चालू आहे. ह्या प्रयोगाच्या जनकांच्या मते ह्या प्रयोगाची तुलना औद्योगीक क्रांतीशी करता येइल.अशा कृत्रिम जिवाणूंचा उपयोग कितितरी वेगवेगळ्या क्षेत्रात होउ शकतो. इंधना पासून ते वातावरणातील कार्बन-डायऑक्साईड शोषून घेण्यापर्यंत...
डॉ. वेन्टर आणि त्यांचे सहकारी औषधं बनवणार्‍या आणि तेल-वायु कंपन्यांबरोबर काम करून नव्या नव्या प्रकारचे क्रोमोसोम बनवण्याचे प्रयोग करत आहेत. त्यांचा उपयोग इतर उपयुक्त इंधन आणि लसी / औषधं बनवण्यासाठी होइल.
दुसरीकडे लोकं ह्या प्रयोगांकडे अत्यंत साशंकपणे बघत आहेत. अशा कृत्रिम जिवांना वातावरणात मुक्त सोडल्याने त्याचे काय दुष्परीणाम होउ शकतात? ह्याबाबत काय काय टेस्ट्स झाल्या आहेत? हे प्रमुख प्रश्न उभे राहतात. त्याचप्रमाणे ह्या प्रयोगांचा दुरुपयोग लष्कर किन्वा दहशतवादी करू शकतील अशीही भिती व्यक्त केली आहे.
इथे त्याविषयी वाचता येइल.

विज्ञानबातमी

प्रतिक्रिया

विकास's picture

21 May 2010 - 1:46 am | विकास

आत्ताच हे एनपीआर ऐकले - ऐकत आहे. येणार्‍या काळासाठी, हा फार महत्वाचा विषय ठरणार आहे. डॉ. क्रेग वेन्टर यांच्या कंपनीचे हे संकेतस्थळ आहे.

कुठल्याही नवीन वैज्ञानिक शोधाप्रमाणे हा शाप की वरदान हे येणार्‍या काळात ठरेल. कारण जसे यातून पेट्रोकेमिकल्स ऐवजी बायोकेमिकल्स तयार होऊन मानवजातीस उपयुक्त ठरू शकतात. तसेच त्यातून नवीन बायॉलॉजिकल वॉरफेअर पण तयार होऊ शकते...

त्यामुळे जरी यश हे संशोधकांचे असले तरी यातून फायदा तीन पेशांचा फायदा नक्की आहे (and the winners are): उद्योजक, राजकारणी आणि वकील!

अवांतरः या दुव्यावरील ह्या प्रतिक्रीयेचे स्वप्न इतक्या लवकर साकार होण्याच्या (किमान) मार्गाला लागेल असे वाटले नव्हते. ;)

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

बहुगुणी's picture

21 May 2010 - 2:22 am | बहुगुणी

फारच महत्वाचा टप्पा आहे हा जैवतंत्रज्ञानातील प्रगतीचा.

फक्त एक छोटंसं correction आहे: हा पूर्णपणे कृत्रिम जिवाणू (synthetic cell) नाही म्हणता येणार, कारण Mycoplasma mycoides या पेशींमधील रंगसूत्राचा chemically तयार केलेला sequence जरी 'कृत्रिम' (automated synthesizer वापरून तयार केलेला असला), तरी तो sequence ज्या Mycoplasma capricolum या पेशीत (खरं तर 'रिकाम्या' - रंगसूत्र काढून टाकलेल्या पेशीत) टाकला, ती पेशी नैसर्गिकच आहे. कृत्रिम रंगसूत्र तयार करणं जितकं complicated आहे, तितकंच अशी पेशी-पोकळी (empty cell) तयार करणं कठीण असणार आहे, पण जे. क्रेग. व्हेन्टर आणि त्यांचे सहकारी ही पुढची प्रक्रियाही लवकरच पूर्ण करण्याच्या मागे नक्कीच लागले असणार.

Interestingly, या वृत्ताविषयी आधिक वाचलं तर खालील माहिती मिळाली:

...To set this novel bacterium—and all its descendants—apart from any natural creation, Dr. Venter and his colleagues wrote their names into the creature's chemical DNA code, along with three apt quotations. The scientists also encoded an email address and the name of a website, so that anyone who successfully deciphered the quotations hidden in the genome could notify the scientists.

More importantly, these genetic watermarks allow the researchers to pick out their cells from among more natural varieties and, eventually, to assert ownership.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 May 2010 - 9:30 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

Interesting!

आत्ता गडबडीत आहे, पण धाग्याची वाचनखूण साठवली आहे.

अदिती