पुणे पोलिस गुन्हेगारांची पाठराखण करत आहेत का?

अरुंधती's picture
अरुंधती in काथ्याकूट
12 May 2010 - 7:23 pm
गाभा: 

आजच दैनिक सकाळमध्ये एक अस्वस्थ करणारी बातमी वाचली. ज्या ५० सराईत गुंडांना तडीपार केले गेले व नंतर त्यांची तडीपारी गृहमंत्रालयातून रद्द करण्यात आली त्यांची नावे देण्यासाठी, व त्यांची तडीपारी रद्द करण्यामागे कोणत्या राजकारण्यांची शिफारस होती हे सांगण्यासाठी सकाळचे प्रतिनिधी गेले दोन-तीन दिवस पुणे पोलिसांचा पिच्छा पुरवत आहेत, परंतु पोलिसांकडून उत्तरे देण्यास टाळाटाळ केली जात आहे.

याविषयीची बातमी येथे वाचा :
http://www.esakal.com/esakal/20100511/5008723703094993514.htm

गेल्या दोन महिन्यांत ह्या तडीपारी रद्द केल्या गेलेल्या गुंडांकडून अनेक गंभीर गुन्हे केले जात आहेत. बलात्कार, खून, प्राणघातक हल्ले, दिवसाढवळ्या भरवस्तीत पोलिसचौकीजवळ टोळीयुध्द व बेछूट गोळीबार हे त्यांचे वरवर दिसणारे स्वरूप होय. ह्या गुंडांच्या तडीपारी रद्द करण्यामागे राजकीय नेतृत्वाचा हस्तक्षेप आहे हे उघड आहे. पण आता तर पोलिसही त्यांची पाठराखण करत आहेत असे दृश्य दिसत आहे.

माहिती अधिकाराखाली सजग नागरी मंचचे विवेक वेलणकर यांनी पोलिसांच्या वेबसाईटवर तडीपार केलेले गुंड, तडीपारी रद्द केलेले गुंड व रद्द करण्याची कारणे यांची माहिती द्यावी असे सुचवले होते. परंतु अर्धवट माहिती देऊन जणू पोलिसांनी आपली असहायता, दुबळेपणा, गुन्हेगारीची पाठराखण किंवा राजकीय अनुनय करण्याची प्रवृत्तीच दाखवून दिली काय?

त्याचबरोबर आजच्याच इंडियन एक्स्प्रेसच्या पुणे न्यूजलाईनमध्ये बरोबर ह्याउलट बातमी छापली आहे : काही राजकारणी व नागरी संघटना मिळून पुणे पोलिसांची प्रतिमा खराब करण्याच्या प्रयत्नात आहेत असे सिटी बेस्ड पब्लिक कन्सर्न फॉर गव्हर्नन्स ट्रस्ट [ PCGT] चे म्हणणे आहे.
लिंकः http://www.expressindia.com/latest-news/politicos-orchestrating-propagan...

ह्यातील नक्की खरे काय व खोटे काय? की नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी केलेली ही दिशाभूल आहे काय? पोलिसांचे हात बांधले असले तरी इतकी महत्त्वाची माहिती दडवण्यामागे त्यांचा काय उद्देश असेल?

आपल्याला काय वाटते?

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

12 May 2010 - 7:46 pm | मदनबाण

फार लांब कशाला जाता ताई...
जरा हे वाचा की...
बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीची तडीपारी गृहसचिवांनी रद्द केली
http://alturl.com/dk8y

हे सुद्धा वाचा :---
तडीपारी रद्द करण्यासाठी मंत्रालयात पॅकेज’?
http://alturl.com/nuwc

आपल्या राज्याला ५० वर्ष पूर्ण झाली आहेत ना...मग अशी प्रगती झालीच पाहिजे. प्रत्येक चौका चौकात शिवाजी महाराजांचे पुतळे बसवतात... आणि राज्यात मात्र तडीपार बलात्कार करतच राहतात.

मदनबाण.....

When you are in Love you can't fall asleep because reality is better than your dreams.
Dr Seuss

अरुंधती's picture

12 May 2010 - 7:51 pm | अरुंधती

गृहखातेच जिथे गुंडांची पाठराखण करत आहे तिथे कायदा, सुव्यवस्था वगैरे अपेक्षाच फोल ठरतात. ही गुंड मंडळी तडीपारी रद्द करण्यासाठी आपल्यासोबत राजकीय नेत्यांना घेऊन जातात असेही वाचले. तसेच अनेक राजकीय नेते ह्यासाठी शिफारसही करतात. गुन्हेगारी, पोलिसयंत्रणा व राजकारण यांचे हे संगनमत दिवसेंदिवस जास्तच धोक्याचे सिध्द होत आहे!

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

मदनबाण's picture

12 May 2010 - 7:56 pm | मदनबाण

आपल्या देशावर परकियांनी आक्रमण केले आणि जे मिळेल ते लुटुन नेले, आता फक्त स्वकीय ते काम करत आहेत.

मदनबाण.....

When you are in Love you can't fall asleep because reality is better than your dreams.
Dr Seuss

तुकाम्हणे's picture

14 May 2010 - 2:14 am | तुकाम्हणे

हे कळत नाही की खुनी, बलात्कारीला तडीपारी ही कशी शिक्षा? हे तर जेल मधे पाहीजेत ना?

तुषार

विश्व जालावरील मराठी जग

अरुंधती's picture

12 May 2010 - 7:42 pm | अरुंधती

बातमीत गृहमंत्री म्हणतात :
<< भोसले याच्यावर एकूण ११ गुन्हे दाखल असून यातील सहा गुन्हे हे अदखलपात्र आहेत. एका गुन्ह्यात तो निर्दोष सुटला असून त्याच्यावर तडीपारीचा आदेश बजाविण्यात आला होता. मात्र तत्कालीन गृहसचिवांनी तो रद्द केला.
मात्र तत्कालीन गृहसचिवांनी तो रद्द केला. हे आदेश रद्द का करण्यात आले, याची माहिती घेऊन उद्या निवेदन करण्याचे आश्वासन गृहमंत्र्यांनी दिले. मात्र अशा प्रकारच्या प्रवृत्तीना जरब बसेल, अशी कारवाई करण्याचे आदेश आपण पोलिसांना दिल्याचे ते म्हणाले. >>

पण ते आश्वासन त्यांनी पूर्ण केले का?

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

मदनबाण's picture

12 May 2010 - 7:50 pm | मदनबाण

ख्या ख्या ख्या... ताई लयं भोळ्या तुमी...अव हिथली जनता गुंगी,मुकी आणि बहिरी हाय... त्यांना प्रश्न इचारणे जमतच नाय बघा...
आता या नेते मंडळींनी म्हाडाची घरे सुद्धा लाटली !!!
आता सांगा चोर कोन अन् पोलिस कोन ?

मदनबाण.....

When you are in Love you can't fall asleep because reality is better than your dreams.
Dr Seuss

llपुण्याचे पेशवेll's picture

12 May 2010 - 7:48 pm | llपुण्याचे पेशवेll

पोलीस नाही सरकार, पर्यायाने भ्र्ष्ट नेते म्हणजेच त्यांची पाठीराखी जनताच त्यांना पाठीशी घालत आहे.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix

समंजस's picture

13 May 2010 - 10:58 am | समंजस

सहमत!

माझं व्यक्तीगत मत आहे की पोलिस हे फक्त साधन आहे गुन्हेगारांना मदत करायला.
आणि असले प्रकार फक्त पुण्यातच नाही तर ईतर शहरात/गावांत सुद्धा होतात.

पोलिसांकडून ही असली कामे करून घेतली जातात ती राज्यकर्त्यांकडून(सत्ताधार्‍यांकडून), कारण एखाद वेळेस कुठल्यातरी निवडणूकीत किंवा एखाद्या आर्थिक व्यवहारात ह्या गुन्हेगार्‍यांकडून मदत मिळवलेली असते. त्याची परतफेड केल्या जाते ती अश्याप्रकारे!

काही वेळेस हे गुन्हेगार गैरकायदेशीर व्यवहार करणार्‍या व्यक्तींचे मदतनीस/नोकर असतात, आणि अशा व्यक्तींचे सत्ताधार्‍यांसोबत खुप जवळीकेचे संबंध असतात(का? हे सांगण्याची आवश्यकता नसावी :> )
ह्या सगळ्या परस्पर सोईच्या असलेल्या संबंधामुळे गुन्हेगारांना मदत करण्याचे असे प्रकार नेहमीच होतात. कदाचीत नजीकच्या काळात हे प्रमाण वाढलं असावं.

तरी सुद्धा मुळ दोष हा पोलीस/सत्ताधार्‍यांकडे न जाता, जनते कडे जातो.
कारण गुन्हेगारांवर पोलीसांचा धाक असायला हवा, पोलीसांवर सत्ताधार्‍यांचा धाक असायला आणि सत्ताधार्‍यांवर जनतेचा धाक असायला हवा.

हे होत नाहीय. सत्ताधार्‍यांना माहित आहे की काहीही केलं किंवा नाही केलं तरी जनता परत त्यानांच निवडून देणार. कशाला जनतेची काळजी करायची. निवडणूकी पुरतं जनतेसमोर हात जोडायचे, निवडूणका संपल्यावर जनतेला हात दाखवायचा....चालायचचं.....चालत राहणार... :|

शेवटी सत्ताधारी आणि जनता हे एकाच समाजाचा भाग आहे.
आणि लोकशाही असलेल्या देशात सत्ताधारी कोण होणार हे एखादा राजा/राणी/हुकुमशाह नाही ठरवत तर आपण जनताच ठरवतो.

आपण जनतेला जर निष्क्रिय/गुन्हेगारांना पाठीशी घालणार्‍या नेत्यांचीच निवड करायची आहे तर का म्हणून पोलीसांना किंवा सत्ताधार्‍यांना दोष द्यावा????????

क्रिकेटचं उदाहरणच बघा, एखादा खेळाडू सतत खराब खेळत असेल आणि तरी सुद्धा निवडमंडळ त्याला डच्चू देत नसेल आणि परत परत त्या खेळाडूला संधी देत असेल तर आपण फक्त त्या खेळाडूलाच दोष न देता निवडमंडळाला सुद्धा दोष देतोच ना??? का??????

(वरील उल्लेखलेले प्रकार हे माझ्या कल्पनेतून किंवा अंदाजानी नाही लिहीलेत. असले बरेचसे प्रकार मी स्वतः जवळून अनुभवले/बघितले आहेत..)

llपुण्याचे पेशवेll's picture

13 May 2010 - 2:43 pm | llपुण्याचे पेशवेll

(वरील उल्लेखलेले प्रकार हे माझ्या कल्पनेतून किंवा अंदाजानी नाही लिहीलेत. असले बरेचसे प्रकार मी स्वतः जवळून अनुभवले/बघितले आहेत..)
याबाबत काहीच दुमत नाहीये. बहुतेकांनी असे प्रकार अनुभवले किंवा आसपास घडताना पाहीले असतील.

पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix

Pain's picture

14 May 2010 - 2:14 pm | Pain


तरी सुद्धा मुळ दोष हा पोलीस/सत्ताधार्‍यांकडे न जाता, जनते कडे जातो

आणि लोकशाही असलेल्या देशात सत्ताधारी कोण होणार हे एखादा राजा/राणी/हुकुमशाह नाही ठरवत तर आपण जनताच ठरवतो.

आपण जनतेला जर निष्क्रिय/गुन्हेगारांना पाठीशी घालणार्‍या नेत्यांचीच निवड करायची आहे तर का म्हणून पोलीसांना किंवा सत्ताधार्‍यांना दोष द्यावा

चांगला पर्याय उपलब्ध नसतो आणि "सर्व उमेदवार नालायक" हा फोर्मसुद्धा.

BTW
सत्ताधार्‍यांवर जनतेचा धाक असायला हवा

हेहेहे =))

अरुंधती's picture

12 May 2010 - 7:55 pm | अरुंधती

पोलिस व गृहखात्याने आपले नाव बदलून ते आता गुन्हेगारी संरक्षण खाते असे ठेवावे काय? :?

किमानपक्षी सामान्यांचा गैरसमज तरी होणार नाही की येथे गुन्ह्यांना शासन मिळते वगैरे वगैरे.....

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

चिरोटा's picture

12 May 2010 - 7:59 pm | चिरोटा

पोलिसांचे हात बांधले असले तरी इतकी महत्त्वाची माहिती दडवण्यामागे त्यांचा काय उद्देश असेल?

पैसे खाणे.
हात बांधले जाणे वगैरे बर्‍याच वेळा थापा असतात.गुन्हेगाराला सोडवा म्हणून मंत्री दडपण आणतो आणि त्या दडपणाखाली 'बिचारे प्रामाणिक ' पोलिस गुन्हेगाराला सोडतात हे शक्य नसते.मंत्री भ्रष्ट आहेतेच पण ह्यांच्या सहकार्याशिवाय भ्रष्टाचार पूर्ण होवू शकत नाही.थोडक्यात अधिकारी प्रामाणिक असतील तर मंत्री पैसे खावू शकत नाही.अगदी पंतप्रधान पण नाही.
अवांतर्-महिन्याच्या पगाराच्या दहा पट रोकड महिन्याला मिळत असेल तर ती नाकारणारे भारतिय किती असतील?
भेंडी
P = NP

अरुंधती's picture

12 May 2010 - 7:57 pm | अरुंधती

ते तर आहेच, शिवाय त्यांच्या बदलीची, प्रमोशनची व पुरस्कारांची शेंडीपण असते ना गृहखात्याच्या हातात! मग पोलिस काय वेगळे वागणार?

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

चिरोटा's picture

12 May 2010 - 8:03 pm | चिरोटा

हम्म्.थोडे फार सहमत्.रस्त्यावरच्या चिरीमिरी पोलिसांना सोडून देवू.पण आय्.पी.एस. अधिकार्‍यांना ही कामे नाईलाजाने करावी लागतात ह्यावर विश्वास नाही बसत.असो. लोखंडी चौकटीत काम करणारा कोणी मिपाकर असेल त्याने अधिक प्रकाश टाकावा!!
P = NP

मदनबाण's picture

12 May 2010 - 8:06 pm | मदनबाण

ख्या ख्या ख्या...जे प्रामाणिकपणे वागतात ते अतिरेक्यांच्या गोळ्यांनी मारले जातात (शहिद हा शब्द आपल्या देशात फार स्वस्त झाला आहे.)
कारण बुलेट्प्रुफ जॅकेट दर्जाहीन होते, का ? कसाबवर मात्र कोट्यावधी रुपये खर्च करणारा आपलाच देश्,आपलेच राज्य.
कुठे गेले ते जॅकेट लागला का पत्ता ? अहो मुंबई पोलीस ज्यांच्या नावाचा एव्हढा बोलबाला होता त्यांच्या अधिकार्‍याचे जॅकेट इथे हरवते तर... सामान्य माणुस आहे कोण ?

मदनबाण.....

When you are in Love you can't fall asleep because reality is better than your dreams.
Dr Seuss

अक्षय पुर्णपात्रे's picture

12 May 2010 - 8:10 pm | अक्षय पुर्णपात्रे

मी पुण्यात राहत नाही. मला या प्रकाराचा त्रास होण्याची सूतराम शक्यता नाही. तडिपार झालेले लोक, राजकारणी प्रौढ आणि सज्ञान आहेत. पुण्यातील मतदारही सज्ञान आहेत. त्यांनी निर्णय घ्यावा. या प्रकरणाचा संबंध व्यवस्था, समजातील व्यापक नैतिक मूल्ये यांच्याशी कृपया लावला जाऊ नये.

अरुंधती's picture

12 May 2010 - 8:19 pm | अरुंधती

अक्षय, पुण्याबाहेरच्या लोकांनाही ह्या तडीपारी रद्द झालेल्या गुंडांच्या गुन्हेगारीचा भरपूर उपद्रव होत आहे. नगरमध्ये, बीड रस्त्यावर घडलेले गुन्हेच ह्याची साक्ष आहेत. मतदारांनी कोणाला निवडून दिले ह्यापेक्षाही गृहखात्याचा व पोलिसांचा गुन्हेगारांवर कोणताच वचक राहिलेला नाही हे स्पष्ट होत आहे. अशा गृहखात्याच्या अखत्यारीत महाराष्ट्रातील इतर जनता तरी सुरक्षित आहे काय?

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

चांगला प्रश्न... येत्या काही आठवड्यात जर वर्तमान पत्रात बलात्कार इ. बातम्या छापुन आल्या नाहीत तर समजेल की आपण सुरक्षित आहोत की नाही ते.

मदनबाण.....

When you are in Love you can't fall asleep because reality is better than your dreams.
Dr Seuss

अरुंधती's picture

12 May 2010 - 8:38 pm | अरुंधती

फक्त बलात्कारच नव्हे, तर खून, दरोडे, हल्ले व टोळीयुध्द अशी बरीच यादी आहे!!!

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

अक्षय पुर्णपात्रे's picture

12 May 2010 - 8:51 pm | अक्षय पुर्णपात्रे

शेजारील जिल्ह्यातील लोकांना त्रास झाला असेल. गृहखाते, राजकारणी, पोलिस, मतदार, गुंड समाजात वावरत आहेत. एखाद्या गुंडाने मला त्रास दिला नाही पण इतरांना दिला असेल तर ते लोक सक्षम नाहीत का? मी त्यावर भाष्य का करावे? वृत्तपत्रांनी नसत्या उठाठेवी करण्याची गरजच काय? ज्यांची नावे पोलिसांनी प्रसिद्ध केली आहेत. इमान इतबारे तीच नावे लोकांपर्यंत पोचवावीत.

अशा गृहखात्याच्या अखत्यारीत महाराष्ट्रातील इतर जनता तरी सुरक्षित आहे काय?

नसेलही. पण मी महाराष्ट्रातही राहत नाही. तेव्हा मला या विषयावर बोलण्याचा नैतिक अधिकार राहीलेला नाही. हा नवीन खाक्या मला आजकालच समजला आहे.

अरुंधती's picture

12 May 2010 - 9:51 pm | अरुंधती

कसला नैतिक अधिकार घेऊन बसलात राव?!!!! :-)
इथे सगळी अनीतीच अनीती चालू आहे!

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

विकास's picture

13 May 2010 - 1:23 am | विकास

हे प्रकरण नक्की कोणी बाहेर काढले? त्यात अडकलेल्यांनी, पोलीसांनी का पत्रकारांनी? वास्तवीक यात ज्यांच्याकडे चोर्‍या झाल्या, ज्या स्त्रीयांवर बलात्कार झालेत अशांनी पुढे येऊन ह्या लोकांबद्दल जाहीर सांगितले पाहीजे. तसे नाही केले तर त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार रहाणार नाही.

-------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

अरुंधती's picture

13 May 2010 - 1:46 am | अरुंधती

विकाससाहेब, जेव्हा भर दिवसा गर्दीच्या रस्त्यात, गजबजाटाच्या वस्तीत, पोलिस चौकीच्या जवळ राजरोस टोळीयुध्द, बेछूट गोळीबार होतो तेव्हा त्या परिसरात वावरणार्‍या प्रत्येकाचे भवितव्य व सुरक्षा धोक्यात येते. अशा वेळी कोण प्रकरण बाहेर काढतंय, त्यात कोणाचे काय हितसंबंध गुंतले आहेत हे गौण ठरते आणि उरतो तो फक्त गुन्हेगारीपासून सुरक्षेचा प्रश्न.

माझ्या मते आज प्रत्येक पुणेकराला हा प्रश्न पुण्याच्या पोलिसांना व गृहखात्याला विचारायचा अधिकार आहे. नागरी संघटना व प्रसारमाध्यमे ह्यात पुढाकार घेऊन काम करत असतील तर चांगलेच आहे! पण पुणेकरांनीही फक्त नाक्या नाक्यावर याबद्दल फक्त बोलबच्चनगिरी करण्याऐवजी आपल्याजवळ असलेल्या व शक्य असलेल्या विविध माध्यमांतून यांचा प्रतिकार करणे, निषेध व्यक्त करणे आवश्यक आहे....हे माझे वैयक्तिक मत आहे. कारण मतदारांच्या रोषाची धग जाणवल्याशिवाय राजकारणी आणि नागरिकांच्या असंतोषाची धग जाणवल्याशिवाय पोलिस ह्या परिस्थितीत फार बदल घडवून आणतील असे सध्याच्या चित्रावरून तरी वाटत नाही!!!

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

Dhananjay Borgaonkar's picture

12 May 2010 - 8:11 pm | Dhananjay Borgaonkar

मला देखील हेच वाटतं.पोलिसांच्या हातात नावाला अधिकार आहेत.
यांनी गुंडांना पकडायच आणि वरुन एखाद्या बड्या रा़जकारणीचा फोन आला की गुमान सोडुन द्यायच..अथवा कारवाई रद्द करायची.

परवा जे टोळी युद्ध झाल त्याचा म्होरक्या कोण होता हे आता शेंबड्या पोराला सुद्धा माहित आहे तरीसुद्धा अजुन काहीही कारवाई नाही.

सत्यपाल सिंगांनी सुत्र हातात घेतल्यावर मोठ्या गाजावाजात म्ह्टले होते चोरांना काठ्या आणि गुंडांना गोळ्या..
बहुतेक यांच्या कडच्या गोळ्या संपलेल्या दिसत आहेत.

सगळे एकमेकांना सामील आहेत. तु मारल्यासारख कर मी रडल्यासारख करतो...

डावखुरा's picture

12 May 2010 - 10:09 pm | डावखुरा

ताई फारच चांगल्या विषयाच्या चर्चेला तोंड फोडलेत....
पण हे काही नवे राहीले नाहीये... :$

आपणही फक्त " तु मारल्यासारख कर मी रडल्यासारख करतो.." =)) धणंजय रावांशी सहमती दर्शवन्यापलीकडे काय बी करयाची एपत ठेवत नाही....

(पण मला याबद्दल तरी अभिमान आहे कि मी माझ्या बाबतीत तरी कुठे भ्रष्टाचाराला साथ दिली नाहीये..) :)

अवांतरः(अफजल्च्या अपयशावर काही दिवस दु:ख केले होते..कारण देशद्रोही असुनही त्याने एक तरी चांगले काम करयाचा प्रयत्ना केला होता...)
----------------------------------------------------------------------

"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

इनोबा म्हणे's picture

13 May 2010 - 12:47 am | इनोबा म्हणे

इथे प्रतिसाद दिलेल्या बहूतेक लेकांना या गुन्हेगारीचा चटका बसलेला दिसत नाही. अन्यथा त्यांनी पोलीसांकडून अथवा राजकीय नेत्यांकडून फारशा अपेक्षा ठेवल्याच नसत्या.

Pain's picture

13 May 2010 - 3:38 am | Pain

पोलिस गुन्हेगारांची पाठराखण करत आहेत का?

Perfect example of rhetorical question~

कोदरकर's picture

13 May 2010 - 1:35 pm | कोदरकर

एकंदरित समाज सुरक्षित राहण्यासाठी काही काळजी घेणे आवश्यक आहे
१) रात्रि-अपरात्री विनाकारण फिरणे टाळावे
२) रात्री प्रवास करणे गरजेचेच असेल तर सार्वजानिक वाहतुक व्यवस्था वापरावी.
३) धाबा - टपरी अशा ठिकाणी स्त्रियांनी थांबणे टाळावे
४) शिक्षण आणि पैसा खेळु लागला म्हणजे सामाजिक मानसिकता सुधारली असा समज करून घेवु नये

शासनाने देखिल स्त्रियांना स्वःसंरक्षणा साठी शस्त्र परवाने द्यावेत जेणे करून वा़कडी नजर त्यांच्यावर पडणार नाही.

तिमा's picture

13 May 2010 - 3:13 pm | तिमा

सर्व स्त्रियांना पिस्तुले द्यावीत, व त्यांच्यावर हल्ला झाल्यास त्यांनी ती बिनदिक्कत वापरायला कायद्याचे संरक्षण मिळावे. अशा एक दोन बलात्कार्‍यांना उडवले की बघा गुन्हे कमी होतील.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

अरुंधती's picture

13 May 2010 - 2:36 pm | अरुंधती

आजचा तिसरा दिवस आहे की पोलिसांनी तडीपारी रद्द केलेल्या गुंडांची यादी व तडीपारी का रद्द केली त्याची कारणे देण्याचे टाळले. परंतु एका इसमाने माहिती अधिकारा अंतर्गत मागवलेल्या माहितीतून पोलिस करत असलेली विधाने, देत असलेली आकडेवारी/ कारणे व माहिती अधिकारातून मिळालेली माहिती यांच्यात खूपच विसंगती आहे हे पुढे आले आहे. हे अजून एक उदाहरण अंधेर नगरी आणि येथील आंधळ्या जनतेचे!

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

मदनबाण's picture

13 May 2010 - 3:06 pm | मदनबाण

जरा ही नवी माहिती तर बघा...

महाराष्ट्राच्या गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या विरोधात तब्बल 19 गुन्हे दाखल आहेत...
http://www.starmajha.com/TopStoryLanding.aspx?NewsID=11443

मदनबाण.....

When you are in Love you can't fall asleep because reality is better than your dreams.
Dr Seuss

llपुण्याचे पेशवेll's picture

13 May 2010 - 3:09 pm | llपुण्याचे पेशवेll

ओ त्या दीपक मानकरचं काय झालं हो पुढं? त्यावरून काय तो अंदाज बांधता येईल.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix

अरुंधती's picture

13 May 2010 - 3:29 pm | अरुंधती

दीपक मानकरला पक्षात पुन्हा सन्मानाने घेण्यात आले आणि त्या लॅन्ड माफिया प्रकरणाचा तपास, कारवाई त्यानंतर पुन्हा रेंगाळलाय म्हणे! मानकरसाहेब पूर्वीप्रमाणेच ''जनतेची सेवा'' करत असल्याचे ऐकिवात आहे!!!

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

अरुंधती's picture

13 May 2010 - 3:23 pm | अरुंधती

बाप रे! :O मला तर ही असली काही कल्पनाच नव्हती! नो वंडर, त्यांच्यात आणि पुणे पोलिसांत शीतयुध्द चालू आहे! निवडणुकीच्या आधी उमेदवारावर काही गुन्हे दाखल आहेत का याबद्दल वर्तमानपत्रांत विवरण येते. पण ह्या माणसाबद्दल कोठे ह्याआधी अशी माहिती वाचल्याचे स्मरणात नाही.

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

Dhananjay Borgaonkar's picture

13 May 2010 - 3:31 pm | Dhananjay Borgaonkar

काहीही होणार नाही त्याला. जो पर्यंत सरकार मधे पॉवर आहे तो पर्यंत त्याला अभय आहे. आता अजुन एखादी नातुबाग शोधत फिरत असेल.

अरुंधती's picture

13 May 2010 - 3:53 pm | अरुंधती

ते मानकरांचे अभय प्रकरण व पुन्हा पक्षप्रवेश झाल्यावरच त्यांच्या केसालाही आता धक्का लागणार नाही हे लक्षात आले होते! अश्या राजकारण्यांच्या हातातलं बाहुलं बनतात पोलिस, त्यांना साथ असते इतर गुंडांची आणि धनदांडग्या व्यावसायिकांची! असेच चालू राहिले तर पुण्याची ओळख पुढे ''माफिया शहर'' म्हणून करून द्यावी लागेल. किंबहुना त्याच नावाने ते ओळखले जाईल. मग कागदांची घोडी नाचवून पुण्यातील गुन्हेगारी किती लक्षणीय रीतीने कमी झाली आहे हे दाखवायचे प्रयत्न होतील.

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

Dhananjay Borgaonkar's picture

13 May 2010 - 4:32 pm | Dhananjay Borgaonkar

ताई आहो पुणेच काय सर्व भारतात हीच परीस्थीती आहे.
तरी मी म्हणतो महाराष्र्ट त्यात बरा. उत्तरेकडेल राज्यात याहुनही वाईट हालत आहे. लोकांना कायदा काय हे माहितच नाहिये.
कायदा टांगुन हे सगळे लोक बिनधास्त गुन्हे करत असतात.
कारण एकच्..राजकारणी लोकांचा वरदहस्त.

सत्तेपुढे शहाणपण नाही ही म्हण अगदी चपखल बसते आपल्या भारतात.
अरुण भाटीया, चंद्र्शेखर यासारखी अगदीच बोटावर मोजण्याएवढी माणस शिल्लक राहीली आहेत.

समंजस's picture

13 May 2010 - 3:07 pm | समंजस

हे अजून एक उदाहरण अंधेर नगरी आणि येथील आंधळ्या जनतेचे!

ही एक धोकादायक उदासीनता आहे जनतेची. मी आणि माझं कुटुंब सुरक्षीत आहोत ना?? झालं तर......कशाला इतर भानगडीत पडायचं?
(इसापनीती मधल्या गोष्टी ह्या लहानग्यांना सांगायला फक्त असतात ) :)

कोदरकर's picture

14 May 2010 - 11:18 am | कोदरकर

लोकसत्ता मध्ये राजकारण्यांची नावे आहेत .. ज्यांच्या शिफारशी मुळे तडीपारी रद्द झाली...

...योको
लोकांना धाकात ठेवणारी...लोकशाही...

अरुंधती's picture

16 May 2010 - 8:11 pm | अरुंधती

ही आत्ताच वाचलेली बातमी!!!!
http://www.esakal.com/esakal/20100515/5153129415482313977.htm

जिल्ह्यातील १०० पैकी फक्त १३ गुंड तडीपार
सकाळ वृत्तसेवा
Saturday, May 15, 2010 AT 01:05 AM (IST)

पुणे - पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून शंभरहून अधिक गुन्हेगारांना तडीपार करण्याच्या पोलिसांच्या प्रयत्नांना खीळ बसली असून, केवळ 13 गुन्हेगार आतापर्यंत तडीपार झाले आहेत. राजकीय गुंड, लॅंड माफिया, सॅंड माफिया, औद्योगिक क्षेत्रातील गुन्हेगार यांच्यावरील तडीपारीची कारवाई कागदावरच राहिली असून, अनेक राजकीय गुंडांनी तडीपारीच्या प्रस्तावातून आपली सोडवणूक करून घेतली आहे.

पुणे जिल्ह्यातील गुंडगिरीला आळा घालण्यासाठी तडीपारीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. तत्कालीन पोलिस अधीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी तसा प्रस्तावही दिला होता. जिल्हा परिषदेचा एक माजी अध्यक्ष, एक विद्यमान जिल्हा परिषद सदस्य, तळेगाव दाभाडेचा माजी नगराध्यक्ष यांचा या यादीत समावेश होता. जवळपास शंभरहून अधिक गुंडांना जिल्ह्याबाहेर पाठविण्यासाठी पोलिस प्रयत्नशील होते. ग्रामीण भागातील गुंडांवर तडीपारीचा अंतिम आदेश महसूल खात्याचे उपविभागीय अधिकारी बजावतात. त्यासाठी त्यांच्यासमोर सुनावणी होते. या दरम्यानच अनेक "व्हीआयपी' नावे वगळली गेल्याचे सांगण्यात आले. तडीपारीच्या यादीत असलेल्या दोन गुंडांनी अनुक्रमे शिरूर व मावळमधून राजकीय पक्षाच्या चिन्हावर विधानसभेची निवडणूकही लढविली होती.

माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या खुनानंतर गुंडावरील कारवाईची प्रक्रिया जलद करण्याची विनंती पोलिसांनी जिल्हा प्रशासनाला केली. त्यातून केवळ 13 गुंड आता जिल्ह्याबाहेर गेले आहेत. सत्तरहून अधिक गुन्हेगारांबाबत अद्याप सुनावणीच सुरू आहे. याबाबत महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलिसांच्या प्रस्तावात त्रुटी असल्यामुळे तडीपारीची कारवाई काही जणांबाबत प्रत्यक्षात आली नाही. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, महसूल प्रशासनाने याबाबत कडक भूमिका न घेतल्याने काही जण कारवाईपासून बचावले.

जिल्ह्यातून गेल्या दोन महिन्यांत केवळ 13 जणांवर तडीपारीचा आदेश बजावण्यात आला आहे. त्यापैकी एकाचीही तडीपारी गृह मंत्रालयातून रद्द झाली नसल्याचे सांगण्यात आले. अर्थात या पैकी किती जणांच्या अपिलावर अद्याप निर्णय झालेला नाही, ही माहिती उपलब्ध झाली नाही.

तडीपार झालेल्या गुंडांची नावे पुढीलप्रमाणे ः भरत मारुती वांजळे (रा. अहिरे, ता. हवेली), मुन्ना ऊर्फ फिरोज दिलदार पठाण (रा. लोणी स्टेशन, लोणी काळभोर), इम्तियाज खाजा खान पठाण (रा. लोणी स्टेशन), राजा अमृता टिळेकर (रा. कोंढवा, ता. हवेली), समीर महंमद शेख (रा. राजगुरुनगर, ता. खेड), विशाल वैद्यनाथ सोनवणे (रा. चाकण, ता. खेड), प्रमोद प्रभाकर भुमकर (रा. नाणेकरवाडी, ता. चाकण), विठ्ठल बबन पामनंद (रा. शिंदे वासुली, ता. खेड), संदीप पोपट भागवत (रा. कुरकुंभ, ता. दौंड), दत्तू धर्मा जाधव (रा. कुरकुंभ, ता. दौंड), अजय बाळू राऊत (रा. कुरकुंभ, ता. दौंड), विजय मारुती निघोल (रा. सासवड, ता. पुरंदर), सचिन दिलीप रणवरे (रा. सासवड, ता. पुरंदर)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

मदनबाण's picture

19 May 2010 - 9:20 pm | मदनबाण

उस्मानाबादेत सेक्स स्कँडलचा पर्दाफाश
http://www.starmajha.com/TopStoryLanding.aspx?NewsID=11562

वरती तिरशिंगरावांनी जी मागणी केली आहे ती स्त्रियांसाठी होती,,,इथे तर राजकारणी शाळेतल्या मुलींची अब्रू लुटण्यासही मागे-पुढे पाहत नाहीत !!!
महाराष्ट्राचे ५० वर्ष पूर्ण झाली ना...उत्सव साजरा झाला ना !!! होऊ द्या कोणाला इथल्या जनतेची पडली आहे ??? जे मिळेल ते लुटा,,,मग कोवळ्या मुलींची अब्रू लुटली गेली तर काय विशेष !!!
बोला जय महाराष्ट्र !!! :(

मदनबाण.....

“control oil and you control nations; control food and you control the people”.
Henry Kissinger

अरुंधती's picture

19 May 2010 - 9:35 pm | अरुंधती

सत्तेने मदांध झालेल्या, मुजोरी करून नराधमाच्या पातळीला पोचलेल्या या लोकांना काय द्याल ते शासन कमीच! किती नीचपणा असावा अंगात? यांच्या आयाबहिणींबाबत कोणी असं वागलं तर? हे कसले राज्यकर्ते? हे तर लुटारू दरोडेखोर - जनतेच्या मढ्यावरचं लोणी खाणारे! X(

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

मदनबाण's picture

19 May 2010 - 9:50 pm | मदनबाण

भारताची लोकशाही किती दिवस तग धरू शकेल?
http://www.misalpav.com/node/12373
या धाग्यावर बाळकराम यांचा प्रतिसाद वाचला तेव्हा मनात विचार केला,ज्या देशावर आत्ता पर्यंत अनेक आक्रमणे झाली आणि सोमनाथाच्या मंदीरापासुन (http://mr.upakram.org/node/226 ) देशातील स्त्रियांच्या अब्रू पर्यत सर्व काही लुटारूंनी लुटले, त्या देशात आज लोकशाही असुन देखील चित्र काही बदलेलं नाही !!!
मेरा भारत महान हा नारा देण्या इतका आपला देश महान राहिला आहे का?
मला परत तेच वाटते :---
ज्या देशातील लोकांची मानसिकता गुलामी सहन करण्याचीच झाली आहे ते विरोध तरी कशाचा करणार ?
हे नेते आपल्याच समाजातुन निवडुन येतात !!! त्यांना निवडुन देणारा आपलाच समाज !!! मग दोष कोणाचा धरावा ?

मदनबाण.....

“control oil and you control nations; control food and you control the people”.
Henry Kissinger

अरुंधती's picture

20 May 2010 - 1:10 am | अरुंधती

वासरात लंगडी गाय शहाणी ही म्हण कितपत लागू होईल ह्या स्थितीला माहीत नाही. पण जे उमेदवार ''उपलब्ध'' असतात, निवडणुकीला उभे असतात, त्यांची जी काही कारकीर्द - कार्यक्षमता व बलाबल लोकांसमोर येते त्या आधारावर लोक नेते निवडून देतात. अर्थात अनेक ठिकाणी हा ''व्यवहार'' असतो, देवघेव असते हेही मान्य. पण जर चांगले, कार्यक्षम लोक निवडणुकीसाठी तुल्यबळ पार्टीकडून उभे राहिले तर त्यांना का नाही लोक मते देणार? पण गोची येथेही असते ना.... निवडणुकीचे तिकीट तुमची जात, आर्थिक-राजकीय स्थिती, पाठिंबा, वट पाहून दिली जाते... राजकीय पक्षांमध्येही त्या बाबतीत भरपूर अर्थपूर्ण व्यवहार चालतात.... अशा वेळी त्यातून चांगले पीक उपजावे तरी कसे?

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/