नेहेमी प्रमाणे यावेळी देखील पुण्यात गेल्यावर अप्पा बळवंत चौकात भटकुन आलो (बायकोला माहेरी सोडायला आणी पुस्तक खरेदि करायला). यावेळी मनाला जरा आवर घालुन निवडक खरेदि केली. कारण दर वेळी २/३ डझन पुस्तकं घेउन येतो आणि नंतर वाचायला वेळच मिळत नाहि. असो.
यावेळी एक छान पुस्तक हाती लागले आहे. साधारण पणे ६/७ वर्षापुर्वी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या हवाई छायाचित्रणाचे प्रदर्शन बालगंधर्व मधे पाहिले होते. आपल्या आवडत्या किल्ल्यांची, मंदिरांची, सागरकिनार्यांची भिंत भिंत लांबी ऊंचीची स्थिरचित्रे बघुन मी तर थक्क झालो होतो. छाताडात धडकी भरवणारा कोकण कडा, आव्हान देणारा तेलबैला, जहाजा सारखा आकार असलेला उंदेरी, लांबच लांब पसरलेली अजिंठ्याची लेणी, एकांडी उभी कुलाब्याची दांडी ह्यांचे खरेखुरे भव्य स्वरुप त्यातुन सार्थकपणे व्यक्त होत होते. महाराष्ट्राचे सौंदर्य नव्याने कळुन आले. त्याचा रांगडेपणा, राकटता, भक्तीस्थानं, वस्तीप्रदेश, माणसं पाहुन (पुन्हा एकदा) विनम्र झालो. अस वाटलं की गोविंदाग्रजांचे महाराष्ट्र गीत दृष्यस्वरुपात समोर आले आहे. भारावलेल्या अवस्थेत बाहेर येतांना अभिप्राय वहित हे सगळं पुस्तकाच्या स्वरुपात उपलब्ध व्हावे असे लिहुन आलो. अशीच प्रतिक्रिया अनेक जणांनी आधीच लिहुन ठेवली होती. पुढे बरेच दिवस काहि कानावर आले नाहि.
पण यावेळी मात्र हि सगळि छायाचित्रे असेलेले पुस्तक हाती लागले आहे - उद्धव ठाकरे यांचे "महाराष्ट्र देशा". अलभ्य लाभ! पानांवर क्रमांक नाहित पण साधारण पणे १००-१५० पाने असावीत. पुस्तकाची मांडणी आकर्षक आहे. पुस्तकासाठी वापरलेला कागद आणि छपाई उत्कृष्ठ दर्जाची आहे. किंमत नाममात्र १००/- ठेवण्यात आली आहे. प्रत्येक (माझ्या मते!) मराठी माणसाच्या संग्रहात हवे असे हे पुस्तक आहे.
म.टा. बातमी: http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5866015.cms
सकाळ बातमी: http://72.78.249.124/esakal/20100428/5285395004349812569.htm
जय महाराष्ट्र!
प्रतिक्रिया
11 May 2010 - 9:32 am | विकास
ह्या पुस्तकाच्या प्रति त्यांनी येथील बृहनमहाराष्ट्र मंडळाच्या आधिवेशनात वाटल्या होत्या. मी गेलेलो नसल्याने माझ्याकडे नाही पण मित्राकडे पाहीले. खूपच सुंदर फोटो आहेत. पुस्तक संग्राह्य आहे. घरच्यांना घेऊन ठेवायला सांगितले आहे.
असे ही ऐकले की हेलीकॉप्टरमधे, उद्धव पट्टा न बांधता, उघड्या दरवाजातून छायाचित्रे काढत होते. इतके ऐकल्यावर मला त्यांच्यापेक्षा अधिक त्या पायलटचीच काळजी वाटली. ;)
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
16 May 2010 - 8:47 am | प्रदीप
वाटल्या होत्या? ऊड्या पडल्या असतील नाही त्यांच्यावर?
16 May 2010 - 10:18 am | विकास
मला वाटते कदाचीत त्या रजिस्ट्रेशनबरोबर, एका कुटूंबाला एक वगैरे पद्धतीने दिल्या असाव्यात. कारण माझ्या मित्राच्या चौघांच्या कुटूंबाकडे एकच पुस्तक होते. नाहीतर, बीएमएमला न जाता, आत्तापर्यंत माझ्याकडे देखील त्याची प्रत असती...
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
11 May 2010 - 10:28 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुंदर फोटोंसाठी पुस्तक विकत घेईन.
प्रकाशकाचा पत्ता द्या ना राव !
-दिलीप बिरुटे
11 May 2010 - 10:32 am | टारझन
उद्धव ठाकरेंनी "छायाचित्रण" क्षेत्रात करियर करावं !! छाण फोटूग्राफर आहेत ते. ;)
-(माजी शिवसैणिक) टारासाहेब ठाकरे
11 May 2010 - 10:41 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उद्धव ठाकरेंनी "छायाचित्रण" क्षेत्रात करियर करावं !!
टारझन यांच्याशी सहमत. :)
- दिलीप बिरुटे
11 May 2010 - 10:51 am | मदनबाण
ह्म्म्म...पुस्तक पहायला हवे...
जाता जाता :--- रक्ताची नाती यावर पीएचडी करता येईल का ? कारण...
http://bit.ly/9E7Iqt
मदनबाण.....
देशात जातीनिहाय जनगणना व्हावी -रामदास आठवले
http://bit.ly/aP8kZG
मला पडलेला प्रश्नः--- मुंबईत जर भय्या लोकांची संख्या जास्त आढळली तर मराठी लोकांना आरक्षण मिळणार का ?
11 May 2010 - 11:01 am | झकासराव
किंमत नाममात्र १००/- ठेवण्यात आली आहे.>>
खुपच कमी आहे ही किंमत.
अशा फोटो असलेल्या पुस्तकांची किंमत जास्त असते.
नक्की घेइन.
11 May 2010 - 12:15 pm | सन्जोप राव
नुकतेच हे पुस्तक मला माझ्या एका नाठाळ विद्यार्थ्याने भेट दिले. मान खाली घालून तो 'सॉरी सर' म्हणाला.
पुस्तक सुरेखच आहे. उद्धव ठाकरेंनी फक्त हेच करत राहायला पाहिजे होते.
सन्जोप राव
'मजरुह' लिख रहे हैं वो अहले वफा का नाम
हम भी खडे हुए हैं गुनहगार की तरह
11 May 2010 - 2:17 pm | नंदन
पुस्तकपरिचयाबद्दल धन्यवाद. धागा वाचनखूण म्हणून साठवला आहे, आता पुस्तकाची यादीत भर घालतो.
--- क्या बात है!
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
16 May 2010 - 5:33 am | शुचि
+१
>> त्याचा रांगडेपणा, राकटता, भक्तीस्थानं, वस्तीप्रदेश, माणसं पाहुन (पुन्हा एकदा) विनम्र झालो. अस वाटलं की गोविंदाग्रजांचे महाराष्ट्र गीत दृष्यस्वरुपात समोर आले आहे. >>
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||