अरेरे सांबा ;-(

हुप्प्या's picture
हुप्प्या in जनातलं, मनातलं
11 May 2010 - 12:41 am

शोलेमधील लहानशा पण अत्यंत गाजलेल्या सांबाच्या भूमिकेचे सोने करणारा मॅकमोहन ऊर्फ मोहन माखिजा आज देवाघरी गेला.
माझी त्याला श्रद्धांजली.
शोलेच्या यशात ह्याचाही खारीचा वाटा होता असे मला वाटते. मला असे आठवते की शोले बनत असताना मॅकमोहनने रमेश सिप्पीकडे तक्रार केली होती की मला अगदीच मामूली रोल दिला आहे. रमेश सिप्पीने त्याची समजूत घातली की रोल छोटा असला तरी तुझे नाव प्रसिद्ध होणार ह्याची खात्री बाळग आणि तसेच झाले. "अरे ओ सांबा" हा डायलॉग तमाम चाहत्यांना तोंडपाठ झाला होता.

जीवनमानबातमी

प्रतिक्रिया

--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

पांथस्थ's picture

11 May 2010 - 8:24 am | पांथस्थ

"काला पत्थर" मधला राणा चा रोलहि त्यांनी छान केला होता...

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

चिरोटा's picture

11 May 2010 - 9:10 am | चिरोटा

आदरपूर्वक श्रद्धांजली
मॅकमोहन ह्यांनी शोलेच्या आधीही भूमिका केल्या होत्या.विशेषकरून १९६४/६५ चा गाजलेला 'हकीकत' चित्रपट्.बाकी बहुतांशी हिंदी चित्रपटांचे कथानक नायक्/नायिकांभोवतीच घुटमळत असल्याने महत्वाच्या भूमिका त्यांना कधी मिळाल्या नसाव्यात्.पण तरीही डॉन्,काला पत्थर..७०च्या दशकातल्या चाललेल्या चित्रपटांत त्यांचे अस्तित्व जाणवायचे.
भेंडी
P = NP

कानडाऊ योगेशु's picture

11 May 2010 - 11:32 am | कानडाऊ योगेशु

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती व सद्गती देवो.
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.