मातृ दिना निमित्त अजुन एक

वैदेहीजी's picture
वैदेहीजी in काथ्याकूट
8 May 2010 - 2:05 pm
गाभा: 

आज मातृ दिन
मातृ दिन पण आपण ज्याप्रमाणे आपल्या आई चा आदर करण्याचा दिवस आहे हे बर्याच मात् भक्त पुत्रांच्या ध्यानात असते तेव्हा बाकिच्या बायका पण कोणाच्य तरि आई असतात याचा सहज विसर पडलेला आसतो. आज हि ट्रेन मधिल मध्ल्या लेडिज डब्यांमधे शिरताना अनेक बायकांना विचार करावा लागतो. ज्या चढतात त्यांना "निर्लज्ज" म्हणायला उरलेल्या तयार असतात.

आज भारताच्या सर्वोच्च पदावर एक महिला आहे. देशाची सत्ता ज्या पक्षाच्या हातात आहे त्या पक्षाची सर्वोसर्वा एक स्त्री आहे . ..पण तरीही ....अजूनही २१ व्या शतकात सुद्धा तस्लिमा नसरीन सारख्या लेखिकेला लपत-छपत फिरायला का लागतं आहे? तिचा अपराध काय .. तर एक स्त्री असूनही तिने अन्याय्य समाजपद्धती बद्दल लिहिण्याचे धाडस केले. तिला कुलटा .... तीन तीन लग्न करुन शेवटि एकटि च रहिलि ना म्हणुन खिजवणार्या हि बायकाच

धरती की तरह हर दु:ख सहले, सूरज की तरह तू ढलती जा..
सिंदूर की आज निभाने को चूपचाप तू आग मे जलती जा..
यहि हे नारि जाति कि कहानी

अजूनही रुपकॅवर सारख्या कोवळ्या मुली सती जातातच . अजूनही रोज किती बायकांचे पदर पेटतात आणि किती मुली शाळेचा रस्ता सोडून चुलीसमोर बसतात? हे तर गावातले झाले . पुण्याला एका उच्च शिक्षित महिलेच्या बाबतीत दिवसा ढवळ्या काय प्रसंग येतो हे सगळयांनाच माहित आहे. पण तरिहि तिने लिफ़्ट मागा यची रिस्क घ्यायचिच कशाला ? असा उघड सवाल करणार्या हि बायकाच ! पण सात आठ वर्शान्च्या अबोध बालिकां मधेहि "स्त्री" च बघणार्या डोळ्यांचे काय कर णार ?

अजूनही मुलगी झाली तर तीच्या जन्मदात्रीला अपराधी वाटत आणि मुलगा होण्यासाठी नवस बोलले जातात. पुरूषाच्या मनासारखं जेव्हा स्त्री वागते तेव्हा ती, कौतुकाची धनी असते मग ते तिच्या मनाविरूद्ध का असेना! पण जेव्हा ती तिच्या मनासारखी वागते तेव्हा ती शिव्यांची धनी असते. आणि त्यामध्ये ८० % बायकाच असतात

पुराण काळा पासुनच अग्निपरिक्षा देऊनसुद्धा सीतेला पुरूषी अहंकारा पुढे धरणीच्या पोटीच परत जावं लागलं.. जिथे तथाकथित पुरूषोत्तम राम असा वागू शकतो.. तिथे सर्वसाधारण माणसंकडुन काय अपेक्षा करणार!! तसे पण रामायण आणि महाभारत घडाय ला एक स्त्री च कारणि भुत ठरली असे म्हण्ट्ले जाते . रामाला चौदा वर्षे वनवासाला जावे लागले ते त्याच्या सावत्र आई कैकयी मुळे. कैकयीच्या मनात विष कालावणारी मंथरा हिच्या मुळेच रामायण घडले. द्रोपदी ने दुर्योधनाला छेडले नसते तर कदाचित तिच्या वरचा वाईट प्रसंग टाळला असता. त्यामुळे तसे बघायला गेले तर स्त्री हीच स्त्रीच्या विकासाची मारक आहे. अशीहि प्रतिक्रिया मीळाली मला काहि माणसांकडुन... आता या विष यावर आपली मते अपेक्षित आहेत.

प्रतिक्रिया

ईन्टरफेल's picture

8 May 2010 - 9:25 pm | ईन्टरफेल

मॅडम आपल्याला कलियुगाबद्दल सांगायचे आहे का सत्य युगा बद्दल सांगायचे आहे कारन आपन दोन्हि हि संदर्भ दिले आहेत आता राम राज्यात {सत्य युगात} काय झाले हे आंम्हाला नाहि सांगता येनार पन कलियुगा बाबत बोलायचे झाले तर ...........आपल्या शहरातच त्याचि पाळ मुळ सापडतिल आमच्या {माफ करा} खेड्यात आसले प्रकार क्वचितच होतात कारन आमच्या शेजारि कुनाचि थोडि जरि कुरकुर झालि तरि आंम्हि विचारायला जातो शेरातले लोक जातात का? नाहि ना? कारन त्यांच्या शेजारि कोन राहतय ते त्यांना माहित सुधा नसते अजूनही रोज किती बायकांचे पदर पेटतात आणि किती मुली शाळेचा रस्ता सोडून चुलीसमोर बसतात? हे तर गावातले झाले . .........आमच्या गावा बद्दल लिहिल्याबद्दल धन्यवाद! एक शेतिऊपयोगि मानुस न मिळाल्यामिळे शेति करित नसलेला शेतकरि.......

नितिन थत्ते's picture

8 May 2010 - 9:31 pm | नितिन थत्ते

>>खिजवणार्या हि बायकाच
>>लिफ़्ट मागा यची रिस्क घ्यायचिच कशाला ? असा उघड सवाल करणार्या हि बायकाच

अशा विधानांवर एकदा खराटा चालवायला पायजेल. :?

नितिन थत्ते

पक्या's picture

9 May 2010 - 12:00 am | पक्या

लेख फार भावूक होऊन लिहीलेला दिसतोय. अजिबात पटला नाही. बर्‍याच ठिकाणी अतिरंजीत वाटला.

>>अजूनही रुपकॅवर सारख्या कोवळ्या मुली सती जातातच - ?

>>तरिहि तिने लिफ़्ट मागा यची रिस्क घ्यायचिच कशाला ? असा उघड सवाल करणार्या हि बायकाच - बरोबरच आहे , अनोळखीच काय लांबची ओळख असलेल्या माणसाकडूनही कधीही लिफ्ट घेऊ नये. बायकांनीच नव्हे तर पुरषांनी सुध्दा. सवाल करणार्‍या बायकांचे काही चुकले असे वाटत नाही.

>>द्रोपदी ने दुर्योधनाला छेडले नसते तर कदाचित तिच्या वरचा वाईट प्रसंग टाळला असता. - कैच्या कैच.
दुर्योधन पडल्यावर द्रौपदी हसली म्हणून तिचे वस्त्रहरण झाले असे म्हणायचे आहे का तुम्हाला. हे निमित्त असू शकते. पण मूळात दूर्योधन चांगल्या स्वभावाचा होता का? धर्माने वागणारा होता का?

>>त्यामुळे तसे बघायला गेले तर स्त्री हीच स्त्रीच्या विकासाची मारक आहे.- हे विधान अतिशयोक्तीचे उत्तम उदाहरण वाटते. असं सरसकट नसतं हो.
जय महाराष्ट्र , जय मराठी !

इंटरनेटस्नेही's picture

9 May 2010 - 2:26 pm | इंटरनेटस्नेही

--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

डॉ.श्रीराम दिवटे's picture

9 May 2010 - 8:03 am | डॉ.श्रीराम दिवटे

मातेची थोरवी गा मित्रांनो...
आज मात्रुदिन आहे तेव्हा आई बद्दल बोलाल तर बरे.
बायका, स्त्रिया या शब्दांना आजच्या दिवस तरी सुट्टीच द्यावी.

मनीषा's picture

9 May 2010 - 12:24 pm | मनीषा

तुमच्या लेखातील काही वाक्यं httpcolor;">://misalpav.com/node/6340 इथे वाचल्या सारखी वाटताहेत ...

पक्या's picture

9 May 2010 - 2:14 pm | पक्या

तुम्ही दिलेला दुवा नीट चालत नाहीये..हा घ्या सुधारित दुवा http://www.misalpav.com/node/6340

जय महाराष्ट्र , जय मराठी !

हि सर्व चर्चा मी आणि माझ्या ग्रुप मधे Google buzz वर झाली होती . आमहा ४-५ व्यक्तिंची मते एकत्र करुन इथे मांडण्याचा प्रयत्न केला. माझ्या या चर्चेला मिपा वरिल माननीय सदस्यांचा कितपत आणि कसा प्रतिसाद मिळतो याचा प्रत्यय घ्यायचा होता.
पुन्हा एकदा सर्वांच्या प्रतिक्रियां बद्दल धन्यवाद

वैदेही
गवसला नाहीच मजला, चेहरा माझा कधी
मी कशी होते मलाही आठवावे लागले
भोगले जे दुःख त्याला, सुख म्हणावे लागले