तात्यांना पाठींबा

इंटरनेटस्नेही's picture
इंटरनेटस्नेही in जनातलं, मनातलं
24 Apr 2010 - 4:12 am

तात्यांना पाठींबा

सध्या मिसळपाव वर जो आजची खादाडी या सदरावरून वाद सुरु आहे, तो मनाला अतिशय क्लेशकारक, आणि वेदनादायी वाटला. तात्या अभ्यंकर यांना मी व्यक्तीशः ओळखत नाही, मात्र गेल्या 3 वर्षाहून अधिक काळ मी त्यांचा वाचक आणि चाहता आहे.

मिसळपाव च्या रूपाने त्यांनी आपल्यासमोर हे एवढे मोठे कार्य उभे केले आहे, ते निशितच कौतुकास्पद आहे. मराठीत अनेक वेब साईटस आहेत; मात्र मिसळपाव ची सर कोणालाही नाही. यात सदस्यांचा वाटा मोलाचा आहेच, मात्र तात्यांनी उपलब्ध करून दिलेल्या व्यासपीठामुळेच आपण स्वताला इतक्या मुक्तपणे आणि मनमोकळेपणाने व्यक्त करू शकतो; आणि ही बाब आपण कदापि विसरता कामा नये.

आजची खादाडी सदरात तात्यांनी कोणते फोटो द्यावेत आणि कोणते नाही, हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. आणि स्त्रीमुक्ती आणि स्त्रियांचे सबलीकरण ह्या नावाखाली जे कोणी तात्यांवर तोंडसुख घेत आहेत - त्यांना मी याची नम्र पणे जाणीव करून देऊ इच्छितो, की अशा बेजाबदार आणि बालिश वर्तनामुळे मिसळपावला ग्रहण लागल्या सारखे वाटते. इतकं गंभीरपणे चर्चा करण्यासारखं 'आजची खादाडी' या सदरात काहीही प्रदर्शित झालेलं नाही . किंबहुना स्त्रियांच्या बाजूने शंख करणारे ह्या चर्चेचे रुपांतर 'स्त्री विरुद्ध पुरुष' असे भांडण करून त्याचा तमाशा बघण्यासाठी असे करतायत की काय असे वाटते.

असो.

मिसळपाव हा आपल्या सर्वांचा एक परिवार आहे. इथे अशा प्रकाच्या क्षुल्लक कारणांवरून वाद घालण्या ऐवजी आपल्या सहभागातून मिसळपाव अधिकाधिक समृध्द कसे होईल ते पाहवे आणि तसे वागावे अशी विनंती मी सर्वाना करतो.

--

इंटरनेट प्रेमी, मुंबई, इंडिया.

हे ठिकाण

प्रतिक्रिया

नेत्रेश's picture

24 Apr 2010 - 5:40 am | नेत्रेश

तात्यांच्या अंगणात त्यांनी कोणती फुलझाडे लावावित हा त्यांचा अधीकार आहे.

त्या 'फुलांची' अ‍ॅलर्जी असेल तर स्वतःहुन थोडे दुर रहाणे चांगले.

ज्यांना त्याची अ‍ॅलर्जी नाही ते त्या 'फुलांची' मजा घेतील :)

शुचि's picture

24 Apr 2010 - 5:48 am | शुचि

इंटरनेट्प्रेमी मला तरी वाटतं इथे सगळे "वादपटू आणि बुद्धीवंत" मंडळी येतात त्यामुळे क्षुल्लक कारणांवरूनही वाद रंगतात पण त्यात येवढं मनावर घेण्यासारखं काही नाही हो.
तात्या पण घेत नसतील मनावर. प्रत्येक धाग्यातून मस्त स्वभावांचे नमुने दिसतात ते बघायचे आणि सोडून द्यायचं.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Music and poetry only reach the ears
of those in anguish.

टारझन's picture

24 Apr 2010 - 8:53 am | टारझन

आपण तर भांडणाचा मनमुराद लुत्फ लुटला बॉ ... मजा आली :)
कधी कधी पेटवून देऊन मजा बघण्यातही एक वेगळीच मजा असते.
आता तुमचंच बघा ना :)

ती भांडणं मनावर घेऊन जर कोणी तेंव्हा दोन पोळ्या कमी खाल्ल्या असतील तर ... =)) =)) =)) धन्य !!

- इंटेरियरप्रेमी

विसोबा खेचर's picture

24 Apr 2010 - 7:52 am | विसोबा खेचर

धन्यवाद.. :)

सध्या आपला टाईम खराब आहे साहेब.. प्रत्यक्ष आणि व्हर्च्युअल जीवनात अनेक आरोप-प्रत्यारोप, टक्के-टोमणे खात जगत आहे..आर्थिक झळ/चोरीचे आरोप सर्व काही सहन करत आहे..मला समजून घेणारी काही भली माणसंही आहेत..म्हणूनच आजपर्यंत उभा आहे..

एनीवेज, तूर्तास तरी सगळं सहन करणं, सगळ्याला सामोरं जाणं एवढंच माझ्या हातात आहे..

असो, अधिक काही बोलत नाही..पण 'तात्या संपला!' असं जर कुणाला वाटत असेल तर ते मात्र चुकीचं असेल एवढंच नमूद करतो..

इं-प्रेमी, आपल्या ह्या धाग्यामुळे अचानक एक वाट मिळाली अन् मन मोकळं झालं!

तात्या.

सन्जोप राव's picture

24 Apr 2010 - 8:24 am | सन्जोप राव

एनीवे या क्रियाविशेषणाचा अर्थ 'असे असले तरी' असा आहे. वेबस्टरवर या शब्दाचा अर्थ 'पोटभाषेत एनीवेचा जो अर्थ आहे तोच' असा दिलेला असला तरी डिक्शनरी मध्ये बाकी हा शब्द 'नॉन स्टॅन्डर्ड' आहे असे म्हटले आहे. 'एनीवे' हा एकवचनी चांगला शब्द असताना त्याचे बहुवचन करावेसे का वाटत असावे, याविषयी कुतुहल आहे. मराठीत 'असो' हा अप्रतिम शब्द असताना 'एनीवेज' हा शब्द वापरावा असे का वाटत असावे याविषयी तर त्याहूनही अधिक कुतुहल आहे.
सन्जोप राव
इसे रोकिये महिंदरबाबू, क्या आप अपने तमाशे के लिये एक आदमी की जान ले लेंगे?
शेरसिंग, राजू आदमी नही, जोकर है. ये जियेगा भी यही, मरेगा भी यही. मरेगा भी यही, जियेगा भी यही.

टारझन's picture

24 Apr 2010 - 8:30 am | टारझन

=)) =)) =))

-(मेरा नाम जोकर्स) टारझन्स
च्यायला त्या उपक्रम-मनोगतावर जाऊन एकदा सुद्धलेखण्स कसं कराचं याचे धडे देउन धुमाकुळ घालुन येऊ म्हणतो.

या खराब टाईमातूनच पुढचा आणखी उज्ज्वल काळ जन्माला येईल... आम्हा सर्वांच्या हार्दिक शुभेच्छा...

तुम्ही आता परत ढवळायचा प्रयत्न करु नका. आताच कुठे सगळे तलवारी म्यान करुन शांत बसले आहेत.

वेताळ

प्रकाश घाटपांडे's picture

24 Apr 2010 - 8:10 am | प्रकाश घाटपांडे

इथे अशा प्रकाच्या क्षुल्लक कारणांवरून वाद घालण्या ऐवजी आपल्या सहभागातून मिसळपाव अधिकाधिक समृध्द कसे होईल ते पाहवे

या वादातुनच मिपा समृद्ध होत असते.
वाद नको म्हणुन संवादच नको अशी भुमिका घेण्याची वेळ क्वचितच येते पण येते. एखाद दुसरा अपवाद असणारच असा. सर्वांशीच जमल पाहिजे अशी भुमिका तर्क विसंगत असते. वाद असो वा संवाद त्यात दोन्ही बाजुंच परस्परांशी काहीतरी नात असत. जिथे हे नात च नसत तिथे वाद संवाद घडतच नाहीत. काय म्हणतोय्/तीय पेक्षा कोण म्हणतोय/तीय हे मह्त्वाच/दखलपात्र ठरत
मतभिन्नता-मतभेद-मनभेद-व्यक्तिभेद-व्यक्तिद्वेष मग पुढे कंपु -राजकारण हे आलच. शेवटी आपण कुठे थांबायच हे आपल्यालाच ठरवायला पाहिजे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

अक्षय पुर्णपात्रे's picture

24 Apr 2010 - 8:22 am | अक्षय पुर्णपात्रे

आम्ही संवाद साधतो म्हणूनच भांडतो. We fight because we communicate.

अरुण मनोहर's picture

24 Apr 2010 - 9:07 am | अरुण मनोहर

मुखपृष्ठ सजावटीविषयी तात्यांना पूर्ण पाठींबा.
सौंदर्याचे उपासक अशा चित्रांकडे "वाह मन कसे प्रसन्न झाले" म्हणून बघतात. पण कदाचित कोणी काही वाईट भावना मनात धरून बघत असतिल. कोणी हेव्याने बघत असतील, तर कोणी "स्त्रि जातीचा अपमान झाला" असा विचार करत असतील. हे सगळे विचार त्या त्या व्यक्तींचे खाजगी विचार आहेत. त्या खाजगी विचारांसाठी तात्यांना का जबाबदार ठरवावे?

प्रकाशित झालेली चित्रे जोवर अष्लील सदरात मोडणारी किंवा कायदा मोडणारी नाहीत, तोपर्यंत कोणालाही त्या विरुद्ध रान पेटवण्याचे काही कारण नाही.
मिपावरील चित्रे लेकी सुनांना बघण्यासारखी नाहीत असेही काही जण म्हणाले होते. अशा लेकी सुनांनी सगळीच मासिके, वर्तमानपत्रे आणि चित्रपट पहाणे सोडून दिले पाहिजे.

अनिल हटेला's picture

24 Apr 2010 - 6:10 pm | अनिल हटेला

अरुण साहेब अगदी पटलं.....
बाकी वादावादीत पडण्याची आपली इच्छा नाही..
मिपा जसं आहे तसं आवडतये,त्यात अजुन काही बदल होताहेत तर त्याचंही स्वागत..
मात्र अगदीच टोमणे मारणे वगैरे प्रकार नसावेत असं वाटतं...
राहता राहीला प्रश्न खादाडी सोबतच्या चित्रांचा ,तर त्याबद्दल अरुण साहेबांशी सहमत... :)

बैलोबा चायनीजकर !!!उर्फ..
тельца имени индиго :D

मुखपृष्ठ सजावटीविषयी तात्यांना पूर्ण पाठींबा.
सौंदर्याचे उपासक अशा चित्रांकडे "वाह मन कसे प्रसन्न झाले" म्हणून बघतात....


रेवती's picture

24 Apr 2010 - 11:33 pm | रेवती

चित्रगुप्त,
आपल्या वरच्या (एक छायाचित्र असलेल्या) व आताच्या (दोन छायाचित्र असलेल्या) प्रतिसादातून तात्यांना पाठिंबा देताय असे जरी वाटत असले तरी सध्या मिपावर चालू असलेल्या त्याविषयीचा वाद वाढायला कादाचित कारणीभूत ठरू शकता याची जाणीव ठेवावी. आपल्याकडून नवा वाद सुरु होइल असे वर्तन घडणार नाही याची काळजी आपण घ्याल अशी अपेक्षा आहे.

रेवती

आजच्या खादाडीत दिले आहे ते
आंबा आईस्क्रिम म्हणजे त्यात आंबा फ्लेव्हर वापरला जातो कि काय?
घरी आईस्क्रिम मिक्सचे आईस्क्रिम करताना त्यात बर्फ तयात होते,त्याला सॉफ्टनेस कसा आणावा? ह्या विषयी आपले मिपाकर काही मदत करु शकतील का?
वेताळ

परिकथेतील राजकुमार's picture

24 Apr 2010 - 12:31 pm | परिकथेतील राजकुमार

ओ इंटरनेटप्रेमी तुमचा वेळ जात नाहिये का ?

च्यायला तात्यानी काय लावावे ह्यातही आम्हाला रस नाही आणी काय लावु नये ह्यातही रस नाही. उद्या इथल्या सो-कॉल्ड सौंदर्योपासकांनी स्वतःच्या नात्यातील स्त्रीयांचे फोटो देखील खादाडीत लावायला दिले तरी आम्हाला देणे घेणे नाही. कशाला उगाच दंगा लावला आहे ?

वाद-विवाद वाले धागे टाळून पुढे जावे ठरवले तर, बघाव त्या धाग्यात कोणी ना कोणी खाजवुन खरुज काढलेली. तुमचा पाठींबा आहे ना ? मग तो मोठ्ठ्या अक्षरात ज्यांना पाठींबा आहे त्यांच्या खरडवहित जाउन द्या आणी स्वतःच्या खरडवहित देखील डकवा पण आमच्या डोक्यावर आदळू नका, असे सुचवावेसे वाटते.

बाबांनो तुमच्या पाठींब्यात / विरोधात / निषेधात / राजकारणात कशातही आम्हाला रस नाही ! आम्ही स्वतःच्या दोन घटका मजेत घालवायला आणी आमचे लेखन वाचणार्‍यांच्या दोन घटका बोर करायला येतो. तेंव्हा आम्हाला सुखाने जगु द्या मिपावर.

मिपावर येउन सतत वादविवाद राजकारण ह्यातच इंट्रेस्ट दाखवायचा आणी वर 'आम्हाला का नाही मिपाच्या भरभराटीतच आनंद आहे' म्हणुन स्वतःचे कौतुक करुन घ्यायचे.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

विसोबा खेचर's picture

24 Apr 2010 - 12:48 pm | विसोबा खेचर

ज्या खादाडीशी तुम्हाला काहीही घेणंदेणं नाही त्या खादाडीवरून जेव्हा काही माणसं इथे फुकाचा राडा माजवायचा प्रयत्न करत होती तेव्हा तुम्ही
कुठे होतात??

तात्या.

परिकथेतील राजकुमार's picture

24 Apr 2010 - 12:56 pm | परिकथेतील राजकुमार

हिच वाक्ये आपण अम्हाला खरड स्वरुपात टाकली असल्याने खरडवहितच उत्तर दिले आहे.

मुख्य म्हणजे ती काही माणसे "फुकाचा राडा"" माजवत होती, की आत्ता ही माणसे "फुकाचा राडा" माजवत आहेत ह्यात आम्हाला काडीचाही रस नाही. मुख्य पानाच्या धाग्यावर हे सगळे आल्याने प्रतिसात दिला होता. उद्या विरोधकांनी अथवा समर्थकांनी आपापल्या खरडवह्यात हा "फुकाचा राडा" घातला तर 'खाजगी चाळे' म्हणुन दुर्लक्ष करणे सोपे जाईल. तेंव्हा आम्ही निश्चीतच आमचे नाक खुपसायला येणार नाही.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

टारझन's picture

24 Apr 2010 - 1:39 pm | टारझन

काय "फुकाचा राडा" चाल्लाय रे इकडे ? =))

बाकी नितिन थत्तेंशी सहमत !! चाल्ले लगेच थत्त्यांचा प्रतिसाद शोधायला =))

- चौथीपाचवीतील राडाकुमार

शानबा५१२'s picture

24 Apr 2010 - 3:55 pm | शानबा५१२

काडीला रस असतो का?
बोंडाला असतो

आणि रस नाही रस नाही बोलुन सर्वात जास्त तुच बोललास ना यार?

-----------------------------------------------------------------------
I'll never compromise
No F***ing way!

मदनबाण's picture

24 Apr 2010 - 3:09 pm | मदनबाण

च्यामारी काय दंगा चाललाय हिथ ? ;)

आता आलोच आहे तर माझ्या ४ ओळींचे काही दाणे टाकुन जावे म्हणतो...

काड्या करण्यातच
काहींचा लोकांचा वेळ जातो...
चांगले लेखन वाचण्यातच
खर्‍या वाचकाचा वेळ जातो...

टिप :--- हे कोणत्याही एका व्यक्तीला नाही तर त्या प्रकारच्या वृत्तीला आहे.
====================

कधी कधी चांगला लेख असुन सुद्धा त्याला फारशा प्रतिक्रिया मिळत नाहीत...का ते मला अजुन कळाले नाही...

दाद देण्यासुद्धा
लोक कंजुषी का करतात ?
लेख चांगला असुन सुद्धा
लोक दुर्लक्ष का करतात ?

असो...अजुन ४ ओळ्यांचे दाणे जमा करावे म्हणतो... ;)

मदनबाण.....

There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama

शानबा५१२'s picture

24 Apr 2010 - 3:53 pm | शानबा५१२

...........My brain and my heart are my temples..............

bt u said thr is no temple?

nothng left 2 lose aftr losing u
- E.Eglesias

-----------------------------------------------------------------------
I'll never compromise
No F***ing way!

मदनबाण's picture

24 Apr 2010 - 4:02 pm | मदनबाण

मदनबाण.....

There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama

शानबा५१२'s picture

24 Apr 2010 - 4:08 pm | शानबा५१२

it was f*****g good!!

बाकी ते मी असच लिहल होत यार!plz don't mind
मला scientists लोकांची वाक्य आवडतात

-----------------------------------------------------------------------
I'll never compromise
No F***ing way!

मदनबाण's picture

24 Apr 2010 - 4:15 pm | मदनबाण

नाय हो भाऊ तुमची भावना कळली...तेव्हा काळजी नसावी !!! :)

मदनबाण.....

There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama

शानबा५१२'s picture

24 Apr 2010 - 4:03 pm | शानबा५१२

पाठींब्याच बोलाल तर..........
तात्यांनी कोणाला चुक वाटेल अस कधी लिहल नाही ना काही चित्र प्रकाशित केल.........
तात्या एका मराठी वेबसाईट्वर जसा moderator हवा त्यापेक्षा खुप चांगले आहेत...आदरणीय.......

बाकी एकदा त्यांनी 'बायकोचा भाउ आणि आं**वर फोड' अस स्पष्ट लिहल होत,ते नाही आवडल.

मग माझे काही लेखन का घालवलत तात्या?

हो........तुमची साईट आहे तुमची मर्जी..............

-----------------------------------------------------------------------
I'll never compromise
No F***ing way!

मदनबाण's picture

24 Apr 2010 - 4:20 pm | मदनबाण

त्यांनी 'बायकोचा भाउ आणि आं**वर फोड' अस स्पष्ट लिहल होत,ते नाही आवडल.
>>>

ह्म्म ... मलाही तेव्हा तसचं वाटल होत...
पण भाऊ
जरा
I'll never compromise
No F***ing way!
हे बदला की तुमच्या स्वाक्षरीतल...बरच काही उत्तम टाकु शकता तिथे तुम्ही...
ही विनंती आहे...जमल्यास बदल केलात तर आवडेल.

मदनबाण.....

There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama

शानबा५१२'s picture

24 Apr 2010 - 4:51 pm | शानबा५१२

मी जे लिहतो त्यात एक मलाच ठाउक असलेला(किंवा मला जे खुप जवळून ओळखतात त्यांना)असा अर्थ लपलेला असतो.
चालेल.......बदलल.......बाकी ते बदलायला कारणच हव होत

लगे रहो भाय,अच्छा लगा आपका स्वभाव :D

-----------------------------------------------------------------------
Dear....You come soon
or I will spoil everything again!
....not not coming
ok.......bang...bang

ऋषिकेश's picture

24 Apr 2010 - 4:33 pm | ऋषिकेश

हा लेख आहे? कोणत्या प्रकारचा? इथे विभाग "हे ठिकाण" निवडला आहे मात्र लेखात मिसळपाव संबंधी कोणतीही माहिती दिसत नाहि. इथे तर काहितरी वैय्यक्तिक पाठिंब्याची चर्चाच दिसते आहे. किंवा मग हा मिसळपाव वरील महत्त्वाच्या घडामोडींवर चर्चा विषय आहे असं तरी कसं समजावं? आता कोण्या सोम्यागोम्या अ या व्यक्तीचा दुसर्‍या एका ब या व्यक्तीला पाठींबा आहेत यात काय चर्चा करायची?

एरवी हा लेख कोणत्याही लेखावर प्रतिक्रीया स्वरूपात असता तर समजू शकत असतो.. केवळ कोण्या ब या व्यक्तीच्या मतावर सहमतीसाठी अख्खा धागा काढणे उथळपणाचे द्योतक वाटते

संपादकहो, ह्या असल्या निरर्थक धाग्यावर योग्य कार्यवाही होईल ही अपेक्षा

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

श्रावण मोडक's picture

24 Apr 2010 - 6:24 pm | श्रावण मोडक

सहमत. असो इतकेच म्हणतो.

टारझन's picture

24 Apr 2010 - 6:39 pm | टारझन

सहमत . ह्या मताची नोंद घेतल्या जावी. :)
शिवाय कोणाच्याही उगाच सहमतीचे किंवा विरोधाचे , केवळ वैयक्तिक आषयांचे धागे निघु नयेत. उगाच डोक्याला कल्हई नाय पायजेल !!

ह्या असल्या सेन्सलेस धाग्यांमुळे मी लिहीलेले लेख मागच्या पाणावर गेले , ते कोण भरून देणार ?

आनंदयात्री's picture

24 Apr 2010 - 10:58 pm | आनंदयात्री

सहमत.
संपादक मंडळाने या धाग्यावर कारवाई करायला हवी होती.

अविनाशकुलकर्णी's picture

24 Apr 2010 - 11:45 pm | अविनाशकुलकर्णी

तात्यांना पाठींबा

रेवती's picture

24 Apr 2010 - 11:45 pm | रेवती

सध्या माझा संगणक बंद आहे पण या धाग्यावर शक्य होइतोवर लक्ष आहे. आता वरील विषय फार चघळला गेला आहे. थोड्या प्रतिक्रिया वगळता हे लक्षात येइल इतपत प्रतिसाद आहेत. यावरून काय ते ओळखून विषय आवरता घ्यावा ही विनंती! ज्यांना मिपाची खरी काळजी आहे त्यांनी चांगल्या विषयांवर लेखन करून ती सिद्ध करावी अन्यथा संपादकांचे काम वाढवू नये हि विनंती!

रेवती

विसोबा खेचर's picture

24 Apr 2010 - 11:46 pm | विसोबा खेचर

सहमत..

तात्या.

इंटरनेटस्नेही's picture

25 Apr 2010 - 2:26 am | इंटरनेटस्नेही

रेवती ताई.. माझ्या कडून मिपाच्या धोरणात न बसणारे काही लिहीले गेले असल्यास, कृपया माफ करा.
मी केवळ तात्या आणि मिपावरील प्रेमापोटी हा धागा काढला...
--
आपला नम्र,
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

इंटरनेटस्नेही's picture

25 Apr 2010 - 2:42 am | इंटरनेटस्नेही

आपले सर्वाचे प्रतिसाद वाचून आनंद झाला. ज्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिले त्यांचा तर मी आभारी आहेच मात्र नकारात्मक प्रतिसाद ज्यांनी दिले त्यांचा ही ऋणी आहे. मी केवळ एक अल्पसा खुलासा करू इच्छितो कि, मी ही सर्व चर्चा केवळ मिसळपाव वरील प्रेमा पोटी घडून आणली.. या व्यतिरिक्त यात माझा कोणताही उद्देश नाही.
मात्र रेवती ताई म्हणतात त्याप्रमाणे हा विषय आता पुरेसा चर्चिला गेला असून आता ही चर्चा इथेच थांबावी अशी माझी देखील इच्छा आहे.
--
आपला नम्र,
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.