गाभा:
दहावीला पुष्क्ळ जणाना बीजगणित आणि भुमितिचा पेपर कठिण जातो.तुम्हाला काय वाट्ते, हे विषय आपल्याला प्रत्यक्ष आयुष्यात उपयोगी पडते का?(ता.क. कॄपया इन्जिनियर, वैज्ञानीक्,गणितज्ञ यानी प्रतिक्रिया देउ नये, हि चर्चा सामान्य वाचकासाठी आहे, याची दखल घ्यावी)
प्रतिक्रिया
30 Mar 2010 - 6:40 pm | महेश हतोळकर
सार्वजनीक जीवनात उपयोगी पडणारे मराठी बोलायला, लिहायला, वाचायला इ.२ त शिकलो. पुढे ८ वर्षे जे मराठी शिकलो (गण, मात्रा, वृत्त माती न् दगड) ते मला तरी प्रत्यक्ष आयुष्यात उपयोगी पडले नाही.
हिंदी मी शाळेत का शिकलो कोणास ठाऊक? हिंदी बोलायला तर शाळेत जायच्या आधीच येत होते. (चित्रपट आणि दूरदर्शनची कृपा). मराठी लिहा-वाचायला येऊ लागताच हिंदी ही समजू लागले. पुढे ३ वर्षे जे हिंदी शिकलो ते प्रत्यक्ष आयुष्यात कधीच उपयोगी पडले नाही.
संस्कृत तर मृत भाषाच आहे. ती मला कधीच प्रत्यक्ष आयुष्यात उपयोगी पडली नाही.
तीच गोष्ट इंग्रजीची. कशाला ते डायरेक्ट-इनडायरेक्ट, चेंज द व्हॉईस आणि काय न् काय शिकलो काय माहीत. ते मला तरी प्रत्यक्ष आयुष्यात उपयोगी पडले नाही. बोलून बोलूनच जास्त समजलं.
जीवशास्त्र. घेवडा द्विदल वनस्पती असेल नाही तर बेडूक पृष्ठवंशीय प्राणी असेल नाही तर गांडूळ शेतकर्याचा मित्र असेल. मला काय करायचय ते. ते मला तरी प्रत्यक्ष आयुष्यात उपयोगी पडले नाही.
भौतीकशास्त्र. गुरुत्वाकर्षणाचे नियम शिकल्यामुळे मी काय पडायच राहीलो का विद्युतशास्त्र शिकल्याने माझ्या घरचे बिल कमी झाले? ते मला तरी प्रत्यक्ष आयुष्यात उपयोगी पडले नाही.
रसायनशास्त्र. पाणी हायड्रोजन आणि ऑक्सीजनने बनले असेल. म्हणून मी काय करू. ते मला तरी प्रत्यक्ष आयुष्यात उपयोगी पडले नाही.
राजे जाऊन ३०० वर्षे झाली. किती वेळा तेच ते घोकत बसू. ते मला तरी प्रत्यक्ष आयुष्यात उपयोगी पडले नाही.
विषुववृत्तावर रोज पाऊस पडत असेल नाही तर टुंड्राप्रदेशातले लोक इग्लू मधे रहात असतील. मी काय करू. ते मला तरी प्रत्यक्ष आयुष्यात उपयोगी पडले नाही.
खरयं हे. या प्राथमीक शिक्षणाचा काहिच उपयोग नाही. डायरेक्ट उच्चशिक्षणच दिले पाहिजे.
महेश हतोळकर
शिक्षण : उत्पादन अभियंता (प्रॉडक्षन इंजीनीयर)
व्यवसाय : संगणकाचा कळफलक बडवणे
31 Mar 2010 - 7:35 am | गोगोल
उपरोधाचा व्यवस्थित उपयोग केल्याबद्दल.
31 Mar 2010 - 12:10 pm | वाहीदा
सि़कंदर ने पोरस से कि थी लढाई ... (|:
गर की थीलढाई ... तो मै क्या करूं ?? :/
गर पियुटी पुट है , तो क्यूं बियुटी बट है ... :S
यह उलटी पढाई समझमें ना आई ~X(
;-)
~ वाहीदा
30 Mar 2010 - 6:58 pm | नितिन थत्ते
मी यांच्याशी शब्दशः सहमत.
परिणिता यांच्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे बहुधा ५वी पासून किंवा पहिली पासूनच अॅप्टिट्यूड टेस्ट घेऊन लाईन ठरवणे. ;)
हे कितपत फीजिबल आणि डिझायरेबल होईल ते ठाऊक नाही.
असो उपयोग करून घेतला तर प्रत्येक गोष्टीचा करून घेता येतो. मी यांच्या उदाहरणातला घेवडा प्रथिनांचा चांगला सोर्स आहे हे आज पुस्तकात न पाहता द्विदल धान्यांत प्रथिनांचा चांगला साठा असतो या तेव्हा शिकलेल्या ज्ञानातून कळते. (अवांतरः घेवडा एकदल की द्विदल हे पुस्तकात पहायला लागत नाही. घेवडा पाहून कळते ;) )
नितिन थत्ते
(शु सुधारक संपादकांना सूचना : माझ्या लेखनात शुद्धलेखनाच्या चुका आढळल्यास ते दुरुस्त केले जावे. माझी हरकत नाही. मात्र ते दुरुस्त केल्या जाऊ नये)
30 Mar 2010 - 6:54 pm | अविनाशकुलकर्णी
प्रेमचा त्रिकोण वगैरे साठी उपयोग होतो असे एकले आहे...जाणकार या वर मत देतिल
30 Mar 2010 - 6:57 pm | इन्द्र्राज पवार
मी सामान्य वाचक आहे याचा मला आता या क्षणी खूपच आनंद होतोय; कारण या जीवावर बेतलेल्या विषयावर काही लिहीता येईल. या विषयावर प्रेम करणारे खूप आहेत याची मला पूर्ण जाणीव आहे. तथापि प्रश्नाकर्त्याप्रमाणे मलाही या दोन विषयांचा पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेताल्यानानंतर व्यावहारिक जीवनात काय उपयोग झाला हे कधीच न उलगडणारे कोडे बनले आहे. ठीक आहे काही म्हणतात त्याप्रमाणे एका विशिष्ट शाखेत प्रवेश घेणार्यांसाठी बीजगणित आणी भूमिती उपयोगी असेलही, पण जो घटक सुरुवातीपासून कला वा वाणिज्य शाखेकडे जाणार आहे हे गृहीत धरले असेल तर त्या बिचाऱ्याला या दोन अहिरावण आणि महिरावण यांच्याशी दुष्मनी करायला का लावता ? व्यवहारातही मला माहित आहे कि गणिताच्या पेपरात अगदी १०० पैकी १०० गुण मिळविलेल्या Scholar ला देखील भाजी मंडईतील बाई जितक्या वेळेत त्याने घेतलेल्या भाज्यांचा हिशोब करते त्याच्या अर्ध्या वेळेत देखील पूर्ण हिशोब येत नाही. असो. थोडक्यात, Personally speaking these subjects are subjects of least importance though students are facing them in compulsory manner.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
31 Mar 2010 - 3:27 am | नेत्रेश
व्यवहारातही मला माहित आहे कि गणिताच्या पेपरात अगदी १०० पैकी १०० गुण मिळविलेल्या Scholar ला देखील भाजी मंडईतील बाई जितक्या वेळेत त्याने घेतलेल्या भाज्यांचा हिशोब करते त्याच्या अर्ध्या वेळेत देखील पूर्ण हिशोब येत नाही.
अर्ध्या वेळेत ? इथे दुप्पट वेळेत म्हणायचे आहे का?
31 Mar 2010 - 3:31 am | शुचि
=)) =)) =))
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर
बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे
31 Mar 2010 - 7:40 am | इन्द्र्राज पवार
मेलो मेलो चित्ताड मेलो मी !!! विशाल अंतकरणाने माझी "उपसंपादकाची डुलकी' माफ करावी. खरय ~~~ `दुप्पट` टायीप करायला हवे होते ! पाहिलात मी श्री गणित यांचा दुश्मन का आहे?
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
30 Mar 2010 - 7:07 pm | अरुंधती
मराठी भाषेचा उपयोग मला टोमणे मारणे, कोपरखळ्या मारणे, उखाळ्या पाखाळ्या काढण्यासाठी वगैरे वगैरे फार झाला.
इंग्रजीचा उपयोग परगावी / परराज्यात गेल्यावर झाला.
संस्कृतचा उपयोग आयुष्यात नाही, पण लिखाणात झाला. गेला बाजार, उच्चार जरा अंमळ स्पष्ट, खणखणीत झाले.
गणित : दूध, पेपर, इस्त्रीवाला वगैरे हिशेब करणे, रिक्षाभाडे - बसभाडे वगैरे साठी, घासाघीस करताना, कोडी सोडविताना.... त्याशिवाय चेहरा चौकोनी करताना ;-), कोणाचा त्रिशंकू करताना, गोल गोल गप्पा करताना.... इ.इ. ठिकाणी झाला.
इतिहासाचा उपयोग नक्की काय चुका आयुष्यात करु नयेत वगैरे महत्त्वाचे धडे शिकण्यासाठी झाला.
भूगोल : हवामान निरीक्षण वाचता येणे, नकाशातील खुणा पाहून आपण रस्ता चुकल्यावर नक्की कोठे आहोत व गंतव्य काय हे हुडकून काढण्यासाठी इ. इ.
शास्त्राचे उपयोग तसे रोजच्या आयुष्यात होत असतात, पण ते मान्य करायची माझी अद्याप तयारी नाही ;-) [सूड]
बाकी चालू देत.
:-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
30 Mar 2010 - 7:53 pm | इन्द्र्राज पवार
तसे पाहिले तर मराठी भाषेतही हुडहुडी भरायला लावणारे प्रसंग काही कमी नव्हते. विशेषतः अतिशय सुंदर सुंदर अशा कविता सोडून आमच्या शेजारी राहणारे `पंत` प्रांतातले गुरुजी ज्यावेळी "वसंततिलका, भुजंगप्रयात, इंद्रवज्रा, शार्दुलविक्रिडीत" अशी नावे उचारू लागले की असे वाटे ही मंडळी कवितेच्या गल्लीतील सदस्य आहेत कि हस्तीनापुरपती दुर्योधन राजाच्या गटातील सैनिक ! तरीदेखील श्रीयुत गणित आणि श्रीमती भूमिती यांच्या तुलनेने ही जनता आम्हाला शाकाहारी वाटे.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
31 Mar 2010 - 9:30 am | श्रावण मोडक
इतकं शिकलात तुम्ही? धन्य... :)
30 Mar 2010 - 7:12 pm | शुचि
मेंदू हा हळूहळू विकसित होत असतो. एखादी गोष्ट तत्कळ 'शो रिझल्टस" या निकषावर उतरत नसेलही पण मेंदूचा विकास होण्यासाठी त्या त्या वेळी त्या त्या गोष्टीची नितांत आवश्यकता असते.
"लॉजिकल थिंकिंग" , "रॅशनल थिंकिंग" या बाजू बीजगणित, भूमिती ने विकसीत निश्चित होत असावेत.
"सांकेतिक सौंदर्य", "संस्कार" या बाजू भाषा, कविता आदिंनी विकसित होत असाव्यात.
माझ्या मते अभ्यासक्रम आदर्श नसला तरी बीजगणित आणि भूमिती हे जे काही अभ्यासक्रमात आहेत ते आवश्यक आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर
बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे
31 Mar 2010 - 7:26 am | चिन्मना
असेच म्हणतो. मला असे वाटते अॅनॅलिटिकल थिंकिंग हा प्रकार गणित शिकल्यामुळे जास्त चांगल्या रितीने जमतो. अर्थात मी याच्यात सर्व प्रकारच्या गणितांचा अंतर्भाव करेन - बीजगणित, भूमितीबरोबर अंकगणित आणि कॅलक्युलस सुद्धा.
मेंदूचा उजवा भाग प्रभावी आहे का डावा भाग यावर गणित आवडते का कला हे अवलंबून आहे. माझ्या माहितीप्रमाणे डावा भाग प्रभावी असलेले लोक जास्त कलासक्त असतात (किंवा उलटे). त्यांना अर्थातच गणितात विशेष गम्य नसल्यामुळे गणिताचा उपयोग काय असे प्रश्न पडू शकतात. माझ्यासारख्या गणितात गम्य असलेल्या व्यक्तींना बरोबर उलटे वाटू शकते.
जगाचा इतिहास पाहिला तर दोन्ही प्रकारच्या माणसांची आवश्यकता आहे.
_______________________________
जुनी वाईन, जुनी मैत्री, आणि जुन्या आठवणींचे मूल्य करता येत नाही
31 Mar 2010 - 9:49 am | इन्द्र्राज पवार
शुचीताई, याचा दुसरा अर्थ असाही होतो की "लॉजिकल थिंकिंग" , "रॅशनल थिंकिंग" या बाजू बीजगणित, भूमितीशी फटकून वागणं-याना जमणार नाही. त्याच नात्याने "सांकेतिक सौंदर्य", "संस्कार" या बाजू भाषा, कविता आदिंनी विकसित होत असतीलही, तथापि हा नियम किंवा विचार केवळ कला विषयाशी निगडीत असलेल्या व्यक्तीना लागू होतो असेही नाही. येथे आमच्या कोल्हापुरात "स्मृतिगंध लिसनर्स क्लब" नावाची चित्रपट संगीतांची परंपरा जपणारी व त्याची आवड असणा-यांनी स्थापन केलेली एक संस्था आहे, जिथे फक्त संगीतप्रेमी नेमाने जमतात व संबधित विषयावर तासंतास गप्पा घडवून आणतात. तीन प्रेमींनी स्थापन केलेला हा क्लब असून एक गणित विषयाचे नामांकित प्राध्यापक आहेत, दुसरे रसायनशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेले कारखानदार, तर तिसरे वाणिज्य शाखेचे नामवंत व्यावसायिक ! त्यातही खास म्हणजे गणिताचे पीएच. डी. होल्डर ज्यावेळी संगीत सौंदर्य", "संस्कार" या बाबी रसिकांना आपल्या प्रभावी पद्धतीने सांगतात त्यावेळी हा माणूस गणिताचा नसून संगीताचा शिक्षक आहे असे वाटू लागते.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
31 Mar 2010 - 3:13 pm | अन्या दातार
स्मृतिगंधची आठवण निघाली की खूप बेचैन होतो राव मी!
असो, बाकी सांकेतिक सौंदर्य वगैरे गोष्टी व्यवस्थित समजावून सांगण्यासाठी गणिताचा उपयोग होत असावा, किंवा रागाचे बारीक तपशील समजण्यासाठी/ समजावून देण्यासाठीही रॅशनल थिंकिंग, लॉजिकल थिंकिंगचा उपयोग होत असावा असे माझे मत आहे.
इंदुराजजी, भेटु एकदा स्मृतिगंधमधे
31 Mar 2010 - 3:38 am | नेत्रेश
बीजगणित आणि भुमिति हे जास्त मार्क (१००%) मिळणारे विषय आहेत , त्यांच्या मुळेच आमच्या सारखे तरुन गेले
बाकी मराठी, हिंदी आणि संस्कृत या वीषयांनी पार बुडवले होते.
--------------
घाणेरडे हस्ताक्शर, (अ)शुद्ध लेखन आणी व्याकरणाची भीती हे (अव्)गुण असलेला....
नेत्रेश
31 Mar 2010 - 6:29 am | अक्षय पुर्णपात्रे
परिणितातै, हे विषय निश्चितपणे आयुष्यात उपयोगी पडतात. या विषयांच्या इतरांनी केलेल्या उपयोगांमुळे ते आपल्या आयुष्यातही उपयोगी पडतात. तुम्ही स्वत: त्यांचा उपयोग आयुष्यात केल्या न केल्याने या निष्कर्षात काही फरक पडत नाही.
*या धाग्याला शुआध संपादकांचा परीसस्पर्श झालेला दिसत नाही.
_______________
We weren't lovers like that and
Besides it would still be alright
-लेनर्ड कोहेन
31 Mar 2010 - 7:24 am | हुप्प्या
१. खरे वाटणार नाही पण बीजगणित आणि भूमितीच्या सूत्रांत एक सौंदर्य आहे. त्याचा उपयोग असेल वा नसेल पण त्यातील सौंदर्य आपले जीवन समृद्ध करते. जसे एखादी सुंदर कविता, सुंदर गाणे करते तसेच. युक्लिड, पायथॅगोरस, न्यूटन, पास्कल, अपोलोनियस, भास्कराचार्य असल्या महान लोकांनी हे देखणे शोध लावले आहेत. त्यावर सगळी पाठ्यपुस्तके बनली आहेत. त्या सौंदर्याचा आनंद कुणीही घेऊ शकतो. उच्चनीच, गरीब श्रीमंत, धर्म, आस्तिक नास्तिक, पुरुष महिला, कसलाही भेद नाही. एक बौध्दिक क्रीडाकरमणूक असे याकडे बघता येईल.
२. इंजिनियर व गणितीच नव्हे तर सुतार, टर्नर, फिटर, शेतकरी, लोहार, शिंपी गवंडी अशा हाताने कामे करणार्या लोकांनाही भूमितीचा उपयोग होतो. उदा. अमक्या व्यासाचा गोल सिलिंडर बनवायचा असेल तर किती मटीरियल लागेल त्याचा आडाखा बांधणे, जमिनीचे क्षेत्रफळ मोजणे, त्यांची वाटणी करणे. जमिनीला कुंपण घालायचे तर साधारण किती तार विकत घ्यावी लागेल ते ठरवणे, अमक्या इतक्या शेताकरता किती पाणी उपसावे लागेल, किती बैलं, किती ट्रॅक्टर लागतील ते ठरवणे, अशी अनेक उदाहरणे देता येतील. अशिक्षित कामगारही हळूहळू ही विद्या आत्मसात करू शकतात पण गणिती ज्ञान असेल तर हे जास्त लवकर होते. आणि मग काम जास्त एफिशियंट होते. हे ज्ञान माहित नसेल तर कधी मटिरियल कमी पडेल कधी जास्त आणि मग नुकसान होणे, बाजारात हेलपाटे मारावे लागणे हे घडते.
31 Mar 2010 - 7:46 am | गोगोल
हे जे तुम्ही करता आहात त्याला ट्रोलिंग म्हणतात (हा घ्या इंग्लीश चा एक प्रत्यक्ष जीवनातला उपयोग)
तुम्हाला असा म्हणायचाय का की या विषयांचा प्रत्यक्ष जीवनात कसा उपयोग करायचा ते शाळेत शिकवात नाहीत?
तसा असेल तर ते १००% कबूल. पण त्याचा अर्थ असा होत नाही की हे विषय रोजच्या जीवनात उपयोगी पडत नाहीत.
याचा अर्थ फक्त इतकाच होतो की तुमच्या दुर्दैवाने तुम्हाला ते विषय वापरता येत नाहीत.
फक्त विषय माहीत असणे हे हॅविंग इन्फर्मेशन .. आणि त्यांचा उपयोग करणे हे हॅविंग नॉलेज.
31 Mar 2010 - 8:22 am | शाहरुख
आज उशीरा उठल्याने बस चुकणार होती..महत्वाची मिटींग होती. "त्रिकोणाच्या दोन बाजूंची बेरीज ही कधीही तिसर्या बाजूपेक्षा जास्त असते" हा भूमितीचा नियम वापरत (आणि थोडासा धोका पत्करत) बस मिळवण्यात आणि वेळेवर पोहचण्यात यशस्वी झालो :-)
31 Mar 2010 - 9:23 am | राजेश घासकडवी
शुचिंशी सहमत.
त्याहीपलिकडे जर लहानपणापासूनच बीजगणित शिकवलं नाही, तर नक्की कोणाला इंजिनिअर करायचं हे कसं कळणार? विषयाची गोडी काही जन्मत:च तर नसते...
31 Mar 2010 - 12:20 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
वरती सगळ्यांनीच 'रोचक' उत्तरं दिल्यामुळे मी परिणिताताईंच्या प्रश्नाच्या उत्तरात शिरत नाही.
पण इन्जिनियर, वैज्ञानीक्,गणितज्ञ ही पण माणसंच नाहीत का? त्यांना आपलं म्हणा!
अदिती
31 Mar 2010 - 12:50 pm | वाहीदा
इन्जिनियर, वैज्ञानीक्,गणितज्ञ ही पण माणसंच नाहीत का? त्यांना आपलं म्हणा!
तू तर अगदी आहेच आपली .. माउ, तुला कधी ग परकं पण दिल ?? :T
~ वाहीदा
31 Mar 2010 - 9:42 pm | चतुरंग
परग्रहावरची! ;)
(R2D2)चतुरंग
1 Apr 2010 - 12:13 am | गोगोल
R2-D2, you know better than to trust strange humans
(C-3PO) गोगोल.
31 Mar 2010 - 2:49 pm | चिरोटा
प्रत्यक्ष आयुष्यात आपण काय प्रकारची नोकरी/व्यवसाय करतो त्यावर ते अवलंबून आहे.सहसा साधे बीजगणित/भूमिती आपण बर्याचवेळा कळत नकळत वापरत असतोच.
बेरजा/वजाबाक्या/गुणाकार्/भागाकार हे तर पैसे देताना/घेताना करावेच लागतात्.अमुक गाडीला तमुक ठिकाणी पोचायला किती वेळ लागेल सारखे प्रश्न सोडवताना आपण बीजगणित्(भौतिक्)चा आधार घेतोच. भूमितीचा/भूगोलाचाही वापर केला जातो.उ.दा.वर्तुळाचे क्षेत्रफळ,त्यात चौरस मावेल की नाही वगैरे.
कुठलाही व्यवसाय असो वा नोकरी- काळ्,काम्,वेग ,आलेख तयार करणे/तो वाचणे ह्या सारख्या मूलभूत गोष्टी आयुष्यात उपयोगी पडतात्.
ह्यावरची पायरी म्हणजे-quadrartic equation/mensuration/limits/calculus..ह्याचा वापर अर्थात आपल्या नोकरी/व्यवसायावर अवलंबून आहे.
भेंडी
P = NP
1 Apr 2010 - 11:47 am | वाहीदा
भेंन्डी ची भाजी कशी विकत घेतोस रे तू .. शाळेतिल बिजगणित वापरून ;-)
भाज्या विकत घेण्यासाठी शाळेत गणित जाऊन कशाला शिकायला पाहीजे ?
मुद्दा हा आहे की आम्हाला शाळेत परिक्शार्थी म्हणून शिकविले जाते, विद्यार्थी म्हणून नव्हे .. शाळेत विद्या मिळविणे महत्वाचे नसते पण मार्क्स मिळविणे अतिशय महत्वाचे :-(
आमची एजुकेशन सिस्टीम हीच मुळात चुकीची आहे
~ वाहीदा
3 Apr 2010 - 8:47 am | अप्पा जोगळेकर
आमची एजुकेशन सिस्टीम हीच मुळात चुकीची आहे
तर मग बरोबर अशी एजुकेशन सिस्टिम कशी असते हे तरी स्पष्ट करावे.
2 Apr 2010 - 9:42 pm | सागरलहरी
या धाग्यावर वाचून विचार करताना जाणवतंय अगदीच काही वाया शिकलो नाही...
वर कुणी तरी म्हणले आहे बीज गणीत / भूमिती मधे सौंदर्य आहे... नक्कीच त्या ज्ञानाचा पुढे कळत्या वयात विविध सौंदर्यांचा रोचक आस्वाद घेण्यात, त्यांवर साधक बाधक चर्चा करण्यात (इथे मराठी / संस्कृत / जीवशास्त्र यांनी ही हात धुउन घेतले !) "त्यांच्या" पर्यंत पोचण्याचा shortest distance शोधण्यात आणि जोडे चुकवत पळून जाण्याचा short cut शोधण्यात उपयोग नक्की झाला.
3 Apr 2010 - 8:44 am | अप्पा जोगळेकर
टॅनन बम नावाचा परदेशी लेखक म्हणतो," Like learning a latin & eating a spinatch some things are considered good for you in some abstract way. "
आणि हे इष्टच आहे. आधुनिक काळात ज्ञान आणि कर्म यांची पुष्कळशी सांगड घातली गेली आहे. पूर्वी ज्ञानोपासना करणे म्हणजे केवळ वेदाध्ययन, मंत्रपठण असे असायचे. आणि कर्म करणारे जसे चर्मकार, लोहार इत्यादी पिढ्यानुढ्या त्याच पद्धतीने प्रॉडक्शन करत राहायचे. त्यामुळे उत्पादन क्षमता, उत्पादनाचा दर्जा यात सुधारणा होत नसे. पण आता तसे नाही. इलेक्ट्रिशियन जरी झाला तरी त्याला एक ठराविक अभ्यासक्रम शिकावा लागतो.(जो नविन शोध लागतात तसतसा पिरिऑडिकली रीवाईज होत राहतो.) प्रयोगशाळेत काम करणारा शास्त्रज्ञ किंवा एखादा संगणक अभियंता यांचे कर्म ज्ञानाधिष्ठित असते.
म्हणूनच 'बीजगणित्-भूमितीचा उपयोग ?' हा प्रश्न निरर्थक आहे.
3 Apr 2010 - 9:17 am | प्रकाश घाटपांडे
काटकोन त्रिकोण हे नाटक ज्यांनी पाहिले नसेल त्यांनी ते जरुर पहावे.
लेखक डॉ विवेक बेळे. दिग्दर्शक गिरिश जोशी.
भुमिका- डॉ. विवेक बेळे. केतकी थत्ते व डॉ मोहन आगाशे
जीवनात भुमितीचा काय उपयोग समजण्यास उत्तम नाटक
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.