काही दिवसांपुर्वी ओरिसा कृषी मंत्रालयासाठी एक छोटासा सर्व्हे प्रोजेक्ट करण्यासाठी म्हणुन भुवनेश्वरला गेलो होतो. भुवनेश्वरपासुन साधारण १०-१५ किमी अंतरावर असलेल्या बलियंता नामक छोट्याशा गावातील एका शेतात आम्ही कॅडस्ट्रल मॅपिंगसाठी हा सर्व्हे केला. आमची कंपनी ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम्स (GPS) विकते. GPS वापरुन शेती किंवा शेतांचा सर्व्हे हा प्रकार युरोपात सर्रास वापरला जातो. पण भारतात अजुनही हे तंत्रज्ञान वापरले जात नाही. इथे अजुनही सॅटेलाईट इमेजरीच्या साह्याने काही गणिते बांधुन कॅडस्ट्रल मॅपिंग केले जाते. त्यामुळे आम्ही ही संधी घ्यायचे ठरवले.
गावात शिरतानाच लक्षात आले की सगळा गाव एका छोट्याशा कालव्याने वेढलेला आहे. महानदीचे पाणी वळवून त्याचा शेतीसाठी वापर करण्याच्या उद्देश्याने हा कालवा खोदण्यात आला आहे.
कालवा ओलांडुन आम्ही गावात प्रवेश केला. गावात शिरणारा रस्ताच मोहात पाडणारा होता.
जिथे आम्हाला आमचा सर्व्हे करायचा होतो, त्या शेतापाशी पोहोचलो तिथे आमच्या स्वागतासाठी ही हसरी फुले आणि मुलेही हजर होती.
सुरूवातीला आम्हाला देण्यात आलेला शेताचा तुकडाच सापडेना. तेव्हा तिथल्याच एका शेतकर्याने आम्हाला रस्ता दाखवून आपल्या कामाची वाट धरली. नारळाच्या झावळ्यांपासुन बनवलेली छत्री वापरून त्या तसल्या उन्हात आपली गुरे राखणारा हा शेतकरी ओरिसातल्या सामान्य शेतकर्याचे मुर्तिमंत प्रतिक होता.
तिथेच एका झाडाच्या सावलीत या चार बहिणी विसावल्या होत्या. (त्या बहिणी आहेत हे त्या शेतकर्याकडुनच कळले....!)
" वो चचेरी बहने है साहब !" दुसर्या एका शेतकर्याने पुस्ती जोडली.
आमच्या GPS system सहीत मी आणि एक सहकारी....
संध्याकाळ झाली आणि सुर्याजीरावांनी निरोप घ्यायला सुरूवात केली.
तसे आम्हीही आमचा पसारा आवरायला सुरूवात केली.
विशाल
प्रतिक्रिया
25 Mar 2010 - 6:48 pm | समंजस
सुंदर छायाचित्रे
कामाच्या निमीत्ताने का होइना, ओरीसा बघायला मिळाला तर :)
25 Mar 2010 - 7:30 pm | डावखुरा
काम करतानाही छ्न्द जोपसता येतो याचे अप्रतिम उदाहरण!!!
"राजे!"
25 Mar 2010 - 7:31 pm | प्रदीप
छायचित्रे व माहिती. दुसरे छायाचित्र पाहून मला अनेक वर्षांपूर्वी पाहिलेल्या बेनेगलच्या 'अंकूर'ची आठवण झाली. त्यात आंध्रातील एका गावाचे संध्याकाळच्या वेळचे असेच काही चित्रण होते असे आठवते.
25 Mar 2010 - 7:34 pm | आळश्यांचा राजा
छान फोटो!
(ओडियांचा) राजा
25 Mar 2010 - 7:47 pm | प्रमोद देव
माहिती आणि छायाचित्रेही.
26 Mar 2010 - 12:09 am | विसोबा खेचर
क्या बात है..!
26 Mar 2010 - 8:57 am | विशाल कुलकर्णी
मन:पूर्वक आभार ! :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
26 Mar 2010 - 9:08 am | बिपिन कार्यकर्ते
छान!!!
बिपिन कार्यकर्ते